Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टोपणनाव

प
पगला गजोधर
Fri, 01/30/2015 - 08:09
🗣 121 प्रतिसाद
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ? आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ? प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे". आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे. [संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””] ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त) , (३० वर्षे )- (३३-६६%) , (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी) त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious. उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही. Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते. माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर

प्रतिक्रिया द्या
24966 वाचन

💬 प्रतिसाद (121)
प
पगला गजोधर Mon, 02/02/2015 - 15:04 नवीन
What's in a name? that which we call a rose, By any other name would smell as sweet; नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो, तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले, तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार. --- रोमिओ जुलीएट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्थितप्रज्ञ म्हैस Sun, 02/01/2015 - 06:15 नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय् कंबख्त, तुने कभी पिही नहीं।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 06:21 नवीन
आम्ही अन्य ठिकाणी काफी तराट होके 'पी' ली है. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ म्हैस
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 07:59 नवीन
ऐसाईच्च बोल्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ म्हैस
स
सस्नेह Mon, 02/02/2015 - 07:01 नवीन
म्हंजे म्हशीपण पितात ? *wacko*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ म्हैस
ख
खेडूत Mon, 02/02/2015 - 14:47 नवीन
नव्हे नव्हे - ते नाव घेणारा आयडी ज्याचा आहे, तो/ ती व्यक्ती मद्य पिणारा असतो/ असू शकतो/ शकते . . !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
य
यसवायजी Sun, 02/01/2015 - 12:59 नवीन
खरे नाव वापरण्याचे फायदे मला दिसले नाहीत. काही फायदे आहेत काय? डोक्याला त्रास व्हायचे चांसेस नक्की आहेत.
  • Log in or register to post comments
ह
होकाका Sun, 02/01/2015 - 18:42 नवीन
या धाग्याचा टिआरपी चांगला असेल असं दिसतंय म्हणून ही लि़ङ्क टाकत आहे. जरूर बघा:
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 02/02/2015 - 09:52 नवीन
आजसे कोइ अपने नाम से नही जाना जाएगा.... व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/02/2015 - 15:08 नवीन
मी आधी माझ्या व्हर्जिनल नावाने लिहीत असे. नंतर मोबिल्यावरुन लॉगिन करताना नाव आडनाव टाईपण्यात आणि लॉगिन करण्यात प्रचंड वैताग यायचा. दरम्यानच्या काळात एफेम वर सूड नावाचं एक पात्र विनोद सांगायला यायचं, माझ्या नावाचा तो शॉर्टफॉर्म करुन हापिसात पार म्यानेजरपासनं सगळी लोकं सूड हाक मारायला लागली. मग तोच मिपा आयडी झाला. आता मराठीतला अर्थही सार्थ करतो बर्‍याचदा!! ;)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 02/02/2015 - 15:33 नवीन
उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली
डॉक, जरा या गोष्टीतली अंदरकी बात सांगतो. आंतरजाल ज्या समाजाने पॉप्युलर केलं* त्यांचं मत हे वरीजीनल आयडीजची सक्ती होवू नये असंच होतं. किंबहुना त्याचमुळे ही टेक्नॉलॉजी मासेस ला द्यायला त्यांचा विरोध होता. फेसबूक आणि व्हाट्सएप नंतर कुठलाही सोम्या-गोम्या-दादा-भाऊ ब्राऊझिंग करून स्वतःचं मत द्यायला लागला. त्यांची कल्पना होती की बाहेर जसे आपले भाट आहेत तसे इथेही असतील. जशी उलट उत्तरं यायला लागली तसं त्यांचं डोकं भडकायला लागलं. पण काय करता येईना. तेव्हा ही जी वरीजीनल आयडीने लिहायची सक्ती आहे ती या सोम्या-गोम्या-दादा-भाऊ पैकी जे राजकारणी होते त्यांची आहे. अर्थातच, त्यांना किती महत्व द्यायचं हे तुम्ही जाणताच. जोक्स अपार्ट, इंटर्नेट वर अ‍ॅनोनिमिटी (अनोळखीपणा) हा महत्वाचा गुण आहे, नव्हे तो त्याचा एकमेव गुण आहे. जर तो काढून घ्यायचा राजकारण्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा 'कच्चा चिट्ठा' काढून तो वेशीवर टांगायला फारसा अवघड नाही. * म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Mon, 02/02/2015 - 17:50 नवीन
म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.
हा हा हा.. ह्याच्यावर काकू टाका भौ. मग बोलू.. थोडक्यात सांगायचे तर आयटी एक हत्ती आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या समोर जे येते त्यावरुन स्वतःची मते तयार करतो, मांडतो. मला भारतातल्या या क्षेत्रातल्या RnD ची खूपच कमी माहिती आहे पण जेवढे माहीत आहे त्यानुसार या क्षेत्रात भारतात काही दर्जेदार तयार होत नाही बहुतेक. त्याला कारणपण हा असला (आयटी म्हणजे हमाल आणि लवकरात लवकर मुकादम बनावे आणि आराम करावा) दृष्टीकोन ठेवणारे असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
माझीही शॅम्पेन Mon, 02/02/2015 - 19:07 नवीन
टोपण नावाने लिहिणे किंवा न लिहिणे हा ज्याचा त्याचा व्ययक्तित मत आहे , त्या वरून हमारी तुमरी येण हे काही योग्य लक्षण नाही. ज्याला ज्या प्रकारे योग्य वाटत त्या प्रमाणे त्यांनी मोकळ व्हाव :) तसेच ज्या प्रकारे टोपण नाव घेतात त्या प्रकारे लोक त्या प्रकारे लोक प्रतिक्रिया देतात , मला बरेच वेळा माझ्या विचित्र नाव मुळे गमतीदार प्रतिक्रिया येतात , पण उंदीर नाव घेतलेल्या टोपण नावाला लोक कदाचीत सिंहा प्रमाणे ट्रीटमेंट देणार नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे , त्यामुळे मी सुध्धा हलकेच घेतो मात्र कोणी टोपण नावमागे असलेली खरी ओळख जर सातत्याने लपवत असेल तर ते योग्य नाही
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/02/2015 - 19:11 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
म
मुक्त विहारि Mon, 02/02/2015 - 20:05 नवीन
लपता लपत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
स
संदीप डांगे Mon, 02/02/2015 - 20:25 नवीन
१००% सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कवितानागेश Tue, 02/03/2015 - 07:34 नवीन
येथे मान्यवरान्नी क्रुपया कुसुमाग्रज, गोविन्दाग्रज, आरती प्रभू वगरै विशयान्वर मत मान्डावे. :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 02/03/2015 - 07:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 08:02 नवीन
हल्कट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पिवळा डांबिस Tue, 02/03/2015 - 22:14 नवीन
समर्पक प्रतिसाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/03/2015 - 08:40 नवीन
रोजच्या व्यवहारात, समाजात वावरताना कांही व्यक्तीविषयक वाईट अनुभव, राग, संताप येतो पण व्यक्त करता येत नाही. त्यामुळे हा 'कचरा' मनांत साठून राहून त्याचे दुष्परिणाम (स्वभावात नकारात्मक बदल) भोगावे लागू नये म्हणून पूर्वी होळी, शिमगा अशा सणांना एखाद्याच्या नांवाने 'बोंब' मारण्याची मुभा ठेवली आहे. त्यामुळे ह्या साठलेल्या 'कचर्‍याचा' निचरा होऊन मन पुन्हा शांत होतं. आपल्या स्वभावात नकारात्मतेचा शिरकाव होत नाही. पूर्वी कवी, लेखकांनी आपले नांव लांबलचक किंवा कांही कारणाने आपल्या लेखनाला साजेसे न वाटल्याने टोपणनांवे घेतली. पण त्यांनी त्या टोपण नांवांच्या आडून इतरांवर अवमानकारक लेखन नाही केले. संस्थळांचा सुकाळ झाल्यानंतर प्रत्येकाला टोपणनांवाचा मोह होऊ लागला. तसेच 'टोपणनांवांच्या' आडून समोरच्यावर अकारण वार करण्याची वृत्ती वाढीस लागली. 'माझा वार कसा जिव्हारी लागला आणि तो कसा तडफडतो आहे' ह्या असुरी विचारात आनंद शोधणार्‍यांची संख्या वाढीस लागली. टोपणनांवाने लिखाण करण्यात कांही गैर नाही. पण टोपणनांवाच्या आडून कोणीच कोणावरही असभ्य आणि समक्ष भेटीत वापरली जाणार नाही अशी भाषा वापरू नये. स्वतःच्या मूळ नांवाने किंवा टोपणनांवाने लिहिताना कुणाही सदस्याने सभ्यतेची मर्यादा सोडू नये. तेव्हढे ताळतंत्र बाळगले तरी पुरेसे ठरेल. मी माझ्या मुळ नांवाने सर्वत्र वावरतो. मला कधी कुठल्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा