Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक विचार

ज
ज्योति अळवणी
Mon, 02/02/2015 - 17:39
🗣 185 प्रतिसाद
आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला. मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की. आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते. पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का? आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का? मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता. म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे. त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम. त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे. लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.' आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे. आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे. आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.

प्रतिक्रिया द्या
37442 वाचन

💬 प्रतिसाद (185)
स
स्पंदना Tue, 02/03/2015 - 12:32 नवीन
चुक!! आज ऑस्ट्रेलियात तीन कुटुंब पहाते आहे. नवर्‍याला जॉब नाही, बायको कमावते आहे. नवरा घरी मुले, स्वयंपाक आणि साफ सफाई पहातो. ग्रोसरी वगैरे भरतो. कुछ कम नही है इन परिवारोंमे॥ अ‍ॅन्ड फॉर युअर काईंड इन्फर्मेशन मराठी कुटुंब आहेत हो. नायतर म्हणाल पर प्रांतिय अथवा इंग्लीस असतील म्हणुन. आयला नका होउ ना हमाल मग!! त्या हमाली पेक्षा घरी बसा मुलांना चार चांगल्या सवयी लावा, त्यांचा अभ्यास घ्या! माझ्या घरात माझा नवरा माझ्यापेक्षा चांगल बाल संगोपन करतो आणी अतिशय प्रेमाने. मला जमलच नसत इतक मुलांच न कंटाळता करण. काय तरी काय!! छ्या!! विटू काका, तुम्ही लय वंगाळ बाजू उचलुन धरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 08:24 नवीन
केहना क्या चाहते हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सस्नेह Tue, 02/03/2015 - 08:29 नवीन
बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे ..
पुरुषाने मुले प्रसवावीत असे कुणीच म्हणत नाही. पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ? पिता का नाही करू शकत ?
बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ?
शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?
अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी,
मग नवरा कमावत नाही त्या कामकरी वर्गातील स्त्रियांनी काय उपाशी मरावे ? आणि प्रतिभावंत, बुद्धीमान नसलेल्या स्त्रीने बालसंगोपन / होम मेकर शिवाय दुसरे काहीच करू नये ? आयटी हमाल किवा कारकून या दोन्ही नसलेल्या लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत आणि त्यांची कुटुंबेही सुविद्य, समृद्ध आहेत हे आपल्याला माहिती आहे काय ? ( विटेकरकाकांचा प्रतिसाद उपरोधिक नसावा असे समजून लिहिले आहे...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 08:43 नवीन
किंवा कारकुन असण्यात काय वाइट आहे? तिला जे आवडेल ते तिला करू दे की . आणि तसेही पुरुष समर्थ बुद्धिमान वेग्रे वेग्रे असतात तर कुटुंब व्यवस्था जीवंत ठेवायाची खंबीर वेग्रे जबाबदारी घेऊ देत की त्याना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सुबोध खरे Tue, 02/03/2015 - 08:52 नवीन
आय टी हमाल किंवा कारकून असेल तरी स्त्रीला घराबाहेर पडण्याची स्वातंत्र्य उपभोगण्याची त्या निमित्ताने चार लोकांशी बोलण्याची जग पाहण्याची संधी मिळते हे काय वाईट आहे? नवर्याला संध्याकाळी "दमून" घरी आल्यावर हात चहाचा कप किंवा शिरा पोहे हे मिळणार नाहीत. किंवा बायको त्याच्या वर आर्थिक दृष्ट्या "अवलंबून" राहणार नाही. पण तिच्या स्वातंत्र्याची हि थोडीशी किंमत द्यायला काय हरकत आहे? आणि नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांचे संगोपन चांगले होत नाही या विधानाला कोणताही शास्त्राधार नाही. माझ्या मते या निवडीचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 09:27 नवीन
आपले काही तरी ग्रह करून घ्यायचे आणि तेच बरोबर म्हणून दामटत रहायचे. स्त्री च्या सुखाचा स्वातंत्रया चा बली देऊन कशाला टिकायला हवी तुमची संस्कृति? आणि संस्कृति म्हणजे कुठली हो? २०० का ४०० का १००० का २००० वर्षा पूर्वीची? कारण वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी वेग वेगळ्या प्रथा अणि संस्कृति नांदत होत्या. केरल मधे काही कालापूर्वी पर्यन्त मातृसत्ताक पद्दत होती मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे बाकी संस्कृति अणि समाजा पेक्षा. समाजाचा एक अविभाज्य भाग असलेली स्त्री सुखी नसेल तर तुमचा समाज कसा सुखी होणार हो? स्त्री ही माणुस आहे. समाज संस्कृति इ इ टिकवून ठेवण्याचे साधन नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:06 नवीन
मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे बर्र्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 10:12 नवीन
म्हणजे काय समजून घेणार का नाही? समजून घ्यायला जमणार की नाही? समजून घ्यायची इच्छा आहे की नाही? समजून घेण्याची पात्रता आहे की नाही? नक्की काय ते कळत नाही त्या बर्र मधून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:13 नवीन
घराबाहेर पडल्याने खरोखरच स्वातंन्त्र्य मिळते का हो ? पुरुष जे जे अगोदर करत होते ते सगळे सगळे ( शिक्षण / व्यवसाय / नोकरी ) केल्यामुळे स्वातंत्र्य येते का हो ? आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 10:18 नवीन
आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?
त्या घराबाहेर पडतात हेच तुमचे दुखणे दिसते. म्हणून असे प्रश्न येताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:23 नवीन
आमचं दुखणं कळ्ळ ना तुम्हाला ? आता तुमचं नेम्कं काय दुखणं आहे ते सांगा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 10:27 नवीन
"स्त्रिया घराबाहेर पडतात ही गोष्ट दुखणे वाटणे" हे आमचे खरे दुखणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:31 नवीन
घर आणि नोकरी करताना ज्याने आपल्या आईची आणि बायकोची ओढाताण बघितली आहे त्याला आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी तरी स्त्रियांनी घराबाहेर पडावे असे वाट्णार नाही. जाऊ दे , तुम्हाला नाही समजाणार ब्याट्मन भाऊ... परदु: ख शीतळ असते ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 10:34 नवीन
बायकांनी नोकरी केल्यामुळेच सावरलेली कुटुंबेही पाहिली आहेत. स्वतःच्या केसमध्ये काय झाले त्यावरून जनरलाईझ करणे हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:47 नवीन
जाऊ दे ना ब्याट्मन भाऊ .. तुम्हाला कळ्ले पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नव्हता आणि नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 11:42 नवीन
कळायचं ते साफच कळालं ओ. असूद्यात ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
स्पंदना Wed, 02/04/2015 - 00:23 नवीन
विटेकर काका तुअम्च्या आई आणि बायकोची ओढाताण नोकरी करण्यामुळे झाली नसून तुमच्या "बायकांची कामे आणि पुरुशांची कामे" या मानसिकतेमुळे झाली आहे अस मला वाटतं. माझ्या हाताला चव आहे, मग मी स्वयंपाक करते, तर नवरा भांडी आवरतो, मी कपडे धोपटते,( हाय हाय वॉशींग मशीन हाय्,पण काही कपडे जरा हाताने धोपटून काढावे लागतात. बर असते ते मनस्वास्थ्याकरता ;) ) नवरा पिळून घेतो. (त्याच्याही मनस्वास्थ्याकरता बरे पडते पिळवणुक ;) ) ही अशी मनाची पारंपारिकता आडवी न आणता जर मिळुन कामे होत गेली तर तुम्ही म्हणता ती ओढातण झालीच नसती. असे कसे हो तुम्ही आई दमून आली तरी आयते पानावर बसलात? मग बायकोला तर मदत करायचा विचारही शिवणार नाही तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 06:24 नवीन
एक्झॅक्टली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
व
विटेकर Wed, 02/04/2015 - 06:44 नवीन
अपर्णा ताई , मी बायकोला अथवा आईला मदत करतं नाही , "आयते" पानावर बसून खातो हा निष्कर्ष तुम्ही काढलात , धन्यवाद ! केवळ वादाकराता तुम्ही हे उदाहरण घेतले अन्यथा तुम्हाला इतके "पर्सनल" व्हायचे नव्हते असे मी समजतो. पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे, तसा माझाही वैयक्तिक अनुभव आहे. बाकी चालू द्या. आता या धाग्यावर मी थांबायचे असे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 10:39 नवीन
पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे
अगदी चूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 10:54 नवीन
तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे
याचा अर्थ मदत कमी पडतेय.. आणि एकतर तिला मदत म्हणजे .. हे तिचं काम आहे असे गृहितक... सगळ्यांचे काम आहे .. सोयीने सगळ्यांनी वाटून करायला हवे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 10:39 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 10:39 नवीन
मी माझ्या आईची ओढताण बघितली आहे....घरातल्या सगळ्यांनी थोडी थोडी कामे "समप्रमाणात" वाटून घेतली तर कधीही काहीही प्रॉब्लेम येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
स्वप्नांची राणी Tue, 02/03/2015 - 12:23 नवीन
मला आज पहिल्यांदा मनापासून 'ठ्ठो' म्हणावसं वाटतय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Tue, 02/03/2015 - 10:27 नवीन
'घराबाहेर' पडलेले सगळे पुरुष स्वतंत्र आहेत म्हणता ? आणि स्त्रिया 'स्वातंत्र्य' मिळवण्यासाठीच घराबाहेर पडतात म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:45 नवीन
एक्क्झ्याक्ट्ली.... "स्वांतत्र्य" अथवा "समानता" असण्याचा आणि नोकरी/व्यवसाय करण्याचा काही एक संबंध नाही !! ( माझा प्रतिसाद डॉ. साहेबआना होता) असली तर ती एक तुझ्यापेक्षा मी मोठी / मोठा हे सांगणारी एक अत्यंत वाईट स्पर्धा ! परस्परांच्या सहजीवनामध्ये आपण परस्परांना किती आदर देतो ( स्पेस नव्हे !) यांवर संसाराचे यश अवलंबून असते. कोण किती पैसे मिळवतो आणि त्यावर जर उच्च - नीच ठरत असेल तर ते सहजीवन विनाशाकडे नेणारे आहे.. समाजाच्या दृष्टीने घातक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:01 नवीन
पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ? होय, बाप पोराला दूध पाजू शकत नाही . वात्सल्य हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. अपवाद असू शकतील शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ? पडतील ना , पण पुन्हा तेच , स्त्रीयांइतके सफाईने करु शकणार नाहीत, आणि बाल संगोपन आनि होम मेकर हे खालच्या दर्जाचे काम आहे का ? लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत आहेत ना , पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
क
कपिलमुनी Tue, 02/03/2015 - 10:27 नवीन
ज्यांच्या घरातील पुरुषांचा अपमृत्यू होतो त्यांच्या घरातील स्त्रिया कमावत्या / नोकरदार/ व्यावसायिक असतील ती कुटुंबे सावरली आहेत. त्याच स्त्रिया जर घरी बसून असत्या तर त्या कुटुंबांचे फार बिघडले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:33 नवीन
मग अशा " लाखो" स्त्रीया आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 02/03/2015 - 10:42 नवीन
" लाखो" आहेत ! रोजच्या अपघाताची आणि अपमृत्यूची आकडेवारी पाहिली तर दर वर्षी अशा लाखो स्त्रिया आहेत. शिवाय नवर्‍याने सोडलेल्या , घटस्फोटीत , फसवलेल्या , नवर्‍याने नाडलेल्या अशा सुद्धा लाखो स्त्रिया आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
कपिलमुनी Tue, 02/03/2015 - 10:44 नवीन
http://ncrb.gov.in/adsi/main.htm इथे थोडी आकडे वारी सापडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:50 नवीन
धन्यवाद ! तुमचा मुद्दा असा आहे की अपवादात्मक परिस्थितीत ( विधवा /परित्यक्ता/ अनाथ) स्त्रियांनी नोकरी करावी आणि अशी परिस्थिती आता अपवादत्मक राहीली नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 02/03/2015 - 11:05 नवीन
माझा मुद्दा " कोणत्याही परिस्थितीत (अपवादात्मक किंवा सामान्य ) नोकरी करण्याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य स्त्रीला आहे"
पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?
पण काम केले नसते तर फार बिघडले असते अशांचा विदा दिला आहे आणि आकडे वारीवरून ही परीस्थिती अपवादत्मक नाहिये . सध्या पेंशन नसते ,शहरी कुटूंबाकडे शेती नसते , गृहकर्ज असते , मुलांच्या जबाबदार्‍या असतात..अशा वेळेस नोकरी - काम हवेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
M
Maharani Tue, 02/03/2015 - 08:32 नवीन
विटेकर हा अपर्णा बाईंचा (रामतीर्थंकर) डूआयडी आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:02 नवीन
तुमचा काय अंदाज आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Maharani
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 08:36 नवीन
पडला आहे. लेख जास्त विनोदी का हा अभिप्राय? या प्रश्नाच्या उत्तरा साठी एक नविन धागा काढावा का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:08 नवीन
अत्यंत हिणकस प्रतिसाद देणार होतो पण आवरतो .. अनुल्लेखाने मारणे उचित ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
म
मीता Tue, 02/03/2015 - 08:55 नवीन
खूपच वैचारिक प्रतिसाद . माझे डोळे खाडकन उघडले . आता मीही नोकरी सोडून घरी बसणार कारण मी काही अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान वगैरे नाही . साधी IT हमाल आहे . आणि नवराही फार प्रतिभावंत नाहीये म्हणून त्यालापण घरीच बसवणार . तुमची समानतेची व्याख्या वाचून हसुन हसुन डोळ्यात पाणी आलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Tue, 02/03/2015 - 10:10 नवीन
तुमची समानतेची व्याख्या काय आहे सांगता का जरा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
स
सामान्य वाचक Tue, 02/03/2015 - 10:17 नवीन
निर्णय घेण्या चा अधिकार असणे , ही समानता आहे. सुजाण आणि समंजस माणूस योग्य तो निर्णय घेतो मग तो नोकरी करायचा असेल किंवा दूसरा कुठला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 08:16 नवीन
समस्या तर आहेच. पण ही फक्त स्त्री वा फक्त पुरुष यांची जबाबदारी नाही. इतके बोलून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/03/2015 - 12:10 नवीन
मला वाटले यावेळी तू २००० पर्यंत तरी पोचवणार. आणि तू बाजू बदलल्याचा सौंशय येतोय मला! टवाळ कार्ट्यासारखा आमचा कौतुकाचा बाब्या व्हायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 12:22 नवीन
टवाळ कार्ट्यासारखा आमचा कौतुकाचा बाब्या व्हायचंय का?
समजा झालो तर मला फायदा काय ते सांगा की. पटलं तर लग्गेच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 02/03/2015 - 12:27 नवीन
सासू शोधून देईन एखादी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/03/2015 - 12:31 नवीन
थ्यान्क्स पण ते काम करणारे लोक ऑन डूटी आहेत. सबब, नो थ्यान्क्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 02/03/2015 - 15:50 नवीन
यालाच तुम्ही "उभे" आहात असे म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 02/04/2015 - 08:20 नवीन
माहितीकरिता धन्यवाद. -बॅटमॅन आणि आर्य विदोत्सुक मंडळाचे कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 10:44 नवीन
"आर्य विदोत्सुक मंडळ" हे कधी स्थापन झाले? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 10:44 नवीन
हायला...कोण कर्ते हे काम? किती कमिशन्/फी घेतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 02/04/2015 - 10:47 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा