एक विचार
आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला.
मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की.
आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते.
पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का?
आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का?
मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता.
म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.
त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम.
त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे.
लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'
आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे.
आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे.
आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.
💬 प्रतिसाद
(185)
ज
ज्योति अळवणी
Wed, 02/04/2015 - 19:14
नवीन
सर्वच reply मी मनापासून वाचले. काही मतं पटली काही नाही पटली. पण अनेकांना मी विचार करायला प्रव्रुत्त केल हयात मला आनंद आहे.
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 10:44
नवीन
आधी माझी सासू शोधा माझा नंबर आधी (रांगेचा फायदा सर्वांना :) )
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 10:44
नवीन
आणि मी असून सुध्धा काय फायदे आहेत ते अजून समजलेले नाहित...त्यामुळे मलासुध्धा सांगा :)
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 02/03/2015 - 13:07
नवीन
अहो पै तै, "कोणत्याही एका बाजूचा" असा विचारच चुकीच नै का ? थोडा सारासार विचार करायला का बंदी असावी ?? जे चूक ते चूक , जे बरोबर ते बरोबर. शिम्पल्स..
(अवांतरः आमाला भाजपवाले काँग्रेसचा आणि काँग्रेसवाले भाजपचा म्हणतेत, त्यांनापण आमी हेच म्हनतो.)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 10:44
नवीन
हायला मी आणि "कौतुकाचा बाब्या"??? कित्ती ते कौतिक :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/03/2015 - 08:34
नवीन
म्हणजे तुम्ही उभे होतात काय ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 02/03/2015 - 08:38
नवीन
असेच काही नाही. वर बसलेला माणूसही नंतर खाली बसू शकतोच की. त्याकरिता उभे रहावेच लागते असा विदा तरी आजवरच्या निरीक्षणावरून दिसला नाही कुठे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 02/03/2015 - 11:50
नवीन
ते उभे नव्हते तर उलटे लटकलेले होते छताला!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/03/2015 - 14:23
नवीन
पकडा गया ! :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/03/2015 - 08:46
नवीन
रच्याकने-- आजकालच्या मुलांना चष्मा लागतो हे सुदृढ नसल्याने नसून पालक जास्त जागरूक झाले आहेत याचे लक्षण आहे. पूर्वी मुलाचा परीक्षेत निकाल चांगला लागत नसेल तर मुल अभ्यास करीत नाही म्हनून त्याला फैलावर घेतले जात असे आता पालक जास्त जागरूकपणे पाहतात कि मुलाला स्वच्छ दिसते आहे कि नाही. शिवाय दूर दर्शन आल्यामुळे मुलाला लांबचे साफ दिसत नाही हे लवकर लक्षात येते. हे मी माझ्या एका लेखात लिहिले आहे
http://www.misalpav.com/node/25044. ( जाहिरात केली आहे हे लक्षात घ्या)
तेंव्हा आपण मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत आहोत हि वस्तुस्थिती नाही. उलट भारतवर्षात अन्नधान्याची मुबलकता हरित क्रांती पूर्वी कधीच नव्हती शतकानु शतके दुष्काळच होता. १९७५ नंतर रेशनच्या रांगेत उभे राहून घाणेरडे धान्य घेणे( अरगट/ तांबेरा पडलेली ज्वारी बाजरी किंवा गुरांना खायचा तांबडा गहू इ ) किंवा टोण्ड दुध घेणे हे बंद होऊन उलटे पौष्टिक अन्न उपलब्ध झाले आहे.
जुना काळच चांगला असे म्हणणार्यांपैकी मी नाही.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 02/03/2015 - 10:32
नवीन
परफेक्ट. हेच लिहायला फार आधीच सुरुवात केली, पण एकूण लेख अन प्रतिसादांचा रोख पाहून हे नेमके कितपत सिरियसली आहे हे कळेना, म्हणून अंदाज येईस्तोवर टंकनश्रम थांबवायचे ठरवले.
आता खुद्द डॉक्टरांनीच हे मत मांडलं हे पाहून आनंद झाला. शिवाय गुस्ताखीबद्दल आधीच माफी मागून आणखी एक म्हणू इच्छितो की "डोळ्याला चष्मा लागणे" विशेषतः लहान मुले /टीनएजर्स या पर्टिक्युलर विषयाबाबत आहार अथवा पौष्टिकता, किंवा जास्त टीव्ही पाहणे, किंवा अंधारात वाचणे यापैकी कशाचा चष्मा लागण्याशी संबंध असेल असे वाटत नाही.
या वयोगटात दूरचा चष्मा लागणे ही गोष्ट माझ्यामते फिजिक्सशी जास्त संबंधित आहे आणि कदाचित डोळ्याच्या गोलाच्या उंची आणि वक्रतेत होणार्या बदलांशी. तो लागायचा तेव्हा लागणारच. टीव्ही कमी बघून किंवा चांगले खाऊन तो टळेल किंवा "जाईल" असं वाटत नाही.
हां. रातांधळेपणा किंवा डोळ्यांच्या इतर काही वैदयकीय समस्या आहाराशी नक्कीच संबंधित असाव्यात. हे म्हणणं फक्त चष्मा या विषयी आहे. चूक असेल तर कृपया ते सुधारावे.
-(भौतिकशास्त्राचा ग्राज्वेट) गवि
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 02/03/2015 - 10:49
नवीन
आईने नोकरी केल्याने मुलांना चष्मा लागतो याबद्दल भौतिकशास्त्र काय म्हणते ?
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 02/03/2015 - 10:53
नवीन
..हॅ हॅ हॅ..
आमाला पावर नाय.. ;-)
- Log in or register to post comments
व
विटेकर
Tue, 02/03/2015 - 11:18
नवीन
म्ह्ण्जे तुम्ही भौतिकी तज्ञ नाही ???
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 02/03/2015 - 12:03
नवीन
..नायतर म काय वैदिक शास्त्रज्ञ हाय?
..आमाला आमच्या लायनीपरमान जाऊ द्या.
..लायसन बगू पैले..
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Wed, 02/04/2015 - 07:15
नवीन
पुलंचे म्हैस आठवले
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 02/04/2015 - 07:49
नवीन
हुश्श...!!
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Wed, 02/04/2015 - 15:53
नवीन
=))
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 02/04/2015 - 12:14
नवीन
कसली, चष्म्याची का? मग 'डोकेदुखी' करीता असेल चष्मा..
(चष्मीश) चिगो
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/04/2015 - 12:21
नवीन
त्ये म्हैस मधला आहे हो सर्व !
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 02/04/2015 - 17:47
नवीन
काय सांगतैस? टाक बंडल, वड बिडी.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/03/2015 - 12:38
नवीन
नोकरी सुद्धा चालेल ग! पण लंच अवर मध्ये चर्चा नाही केली ना..म्हणुन लागला असेल.
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Tue, 02/03/2015 - 09:06
नवीन
अगदी बरोबर.लेख चन्गला आहे. पण काही विचार पटत नाहीत.मोठ्या शहरामधे एका च्या पगारात खर्च चालेल हे अवघद आहे.बायाकानी जर आपल्या कुटुम्बअला मदत म्हनुन नोकरि केली तर त्यत काही वाइट नाही. उलट हल्लि तरुणी लग्ना अगोदर नोकरी करुन पैसा साठवतात. लग्न होउन जेव्ह बाळ होते त्या वेळी बाळा साठी १ २ वर्श ब्रेक घ्यायची पण तयारी ठेवतात. सशक्त मुल घड्वण्यासाठी बायाकानी घरात बसायची गरज नाही.आई नी वडील व बाकी कुतुम्ब यानी डोळसपणे वागायला हवे.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 02/03/2015 - 10:07
नवीन
ज्याने त्याने आपल्या जीवनातील गरजांचे प्राधान्य ओळखुन त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत . काही ठराविक कालावधी नंतर या प्राधान्यक्रमाचा व सद्य परिस्थितीचा आढावा घेउन त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावेत . आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये आपणच अडकून पडु नये .
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Tue, 02/03/2015 - 10:11
नवीन
सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला नकोय्?प्रत्येकालाच आपला समाज,आपले कुटुंब सुखी हवय.पण त्यासाठी फक्त स्त्रियांनी त्याग करावा,प्रयत्न करावा अस का?कुटुंबाची,समाजाची जबाबदारि हि स्त्री आणि पुरुष दोघांवर सारखीच असायला हवी.
ज्या स्त्रीया नोकरीकरतात त्या पैशाच्या आकर्षणासाठी हे तर अगदिच चूक.उत्तम शिक्षण घेतलेल असते,काहिवेळा कुटुंबाला आर्थिक गरज असते,उत्तम संधी असते मग स्त्रीने नोकरी का करू नये?आणि प्रत्येक स्त्रीमधे कुटुंबाची काळजी घेणे हे उपजतच असते.नोकरी करणारी(वा न करणारी)कोणतीहि स्त्री मुलांच्या आहारासाठी,विकासाठी,शिक्षणासाठी जागरूक असतेच.आजुबाजुला समाजात ज्या स्त्रीया आपण बघतोय त्या बहुदा सगळ्याच अत्यंत कसोशीने मुल्,घरातील वृद्ध्,स्वयपाक या कडे लक्ष देताना दिसतायत.मग विश्रांती म्हणून कधी बाहेरच क्वचित काहि मागवल तर काय बिघडल?(यातहि बहुतेक वेळा घरातील इतरंना काय आवडेल याचा जास्त विचार स्त्री करते)शिवाय गरज असेल तेव्हा ती घरात थांबतेच कि नोकरी सोडून.
पण या उलट आपल्याकडे पुरूष मात्र फक्त नोकरी करुनच दमतात(काहि अपवाद असतीलहि)त्यांचीहि जबाबदारि नाहि का सशक्त कुटुंब बनवायची?
ज्यावेळेस या सगळ्या बाबतीत समानता येइल तेव्हाच सुखी समाज अस्तित्त्वात येइल.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/03/2015 - 16:33
नवीन
पर्फेक्ट ! फक्त पैसे कमावणे हे कधीच एकमेव उद्देश्य नसतं . बाकी सविस्तर लिहिन च वेळ मिळेल तसा. अत्ता रूमाल टाकून जाते.
- Log in or register to post comments
प
पलाश
गुरुवार, 02/05/2015 - 09:01
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मीता
Tue, 02/03/2015 - 10:18
नवीन
मस्त प्रतिसाद इशा
- Log in or register to post comments
स
सविता००१
Tue, 02/03/2015 - 10:46
नवीन
इशा
- Log in or register to post comments
ज
जागु
Tue, 02/03/2015 - 10:20
नवीन
टिव्ही आणि फ्रिज च्या बाबतीतले अनुभव मलाही आहेत.
माझ्या लहानपणी आमच्या गावात ३ टिव्ही होते. त्यातला एक आमच्या घरी होता. शनिवार रविवार आमच्याघरी हॉलमध्ये सतरंज्या अंथरायला लागायच्या. हॉलभरून बायका-माणसे पिक्चर बघायला यायची. बातम्या पहायलाही काही टह्रावीक मंडळी यायची.
आमच्या घरी फ्रिज यायच्या आधी उन्हाळ्यात पन्ह किंवा आमरस केला की टोप घेऊन ज्यांच्याकडे फ्रिज आहे त्यांच्याकडे बर्फ मागायला जायचो. तेंव्हा ते मागण्यात कोणताही परकेपणा किंवा ओशाळेपणा वाटत नसे.
- Log in or register to post comments
र
रायनची आई
Tue, 02/03/2015 - 11:15
नवीन
लेखातील विचार खूप विस्कळित आणि बाळ्बोध आहेत..मुलीन्चे ब्युटी पार्लर मधे जाणे काय किन्वा मुलान्चा चश्मा काय..खूप जनरलायजेशन केले आहे.
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Tue, 02/03/2015 - 12:01
नवीन
हो, यात एक नाही अनेक विचार(सुमने) आहेत - चष्मा (वर चर्चा झालीच/चालूच आहे), शिळे खाणे आणि मजबूत बनणे, अधूनमधून हॉटेलातल खाणे आणि कुपोषित होणे, ताग्यातले कपडे शिवणे आणि पैसे वाचवणे, फिरायला न जाणे आणि एकत्र वेळ न घालवणे (इथे मॉलचा उल्लेख कसा आला नाही तो!) आणि मुख्य म्हणजे tv, fridge सर्वांकडे नव्हते तो काळ कसा रम्य होता वगैरे, वगैरे. या सर्वांना जोडणारा विचार म्हणजे आजच्या स्त्रिया कुटुंबवत्सल की काय ते राहिल्या नाहीत.
थोडक्यात, ज्याला जे योग्य वाटेल ते घ्यावे आणि चर्चा करून धाग्याला सुदृढ बनवावे.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 02/03/2015 - 11:38
नवीन
धागाकर्तीचा सदस्यकाळ ५ दिवस २२ तास असा आहे, हा नक्कीच कुणाचतरी डु आय असल्याचा संशय येतोय.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/03/2015 - 11:48
नवीन
प्रत्येक तापाला स्वाईन फ्लू म्हणून धोपटू नका
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 02/03/2015 - 11:58
नवीन
आणि समजा डुआयडी असला म्हणून काय झाले? प्रत्येक डुआयडीजनित साहित्य हे ट्रोलिंगच असते काय?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/03/2015 - 14:34
नवीन
मुनिवर या म्हणीवर पेटंट हक्क प्रस्थापित करा चटकन् ;)
बघा, बघा, वादावादात कशी मराठी भाषेला अधिक श्रीमंत करणारी भाषामौक्तिके ओघळतात मिपावर ! :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 02/03/2015 - 12:06
नवीन
मिपावर स्वागत!
एवढा मोठा लेख पहिल्याच प्रयत्नात लिहिल्याबद्दल अभिनंदन!
मात्र सगळे विचार पटले नाहीत. माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. पूर्वेच्या काळात सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे एक हजार पौर्णिमा बघितलेला माणूस ही दुर्मिळ गोष्ट होती यावरूनही लक्षात यावे. औषधे, पूरक आहार यांची उपलबधता ही याची कारणे आहेत. आजाराचे प्रमाण वाढल्यासारखे वाटते याचे कारण म्हणजे लोकांची जागरूकता वाढली आहे. ज्या आजारासाठी आपण आज डॉक्टरकडे धाव घेतो, त्यासाठी ५० वर्षांपूर्वी कोणी गेले नसते.
डोळ्यांचे आजार किंवा इतर काही गोष्टी या निव्वळ घरचे जेवण चांगले नसते म्हणून होतात असे नव्हे. नको इतक्या प्रमाणात टीव्ही कॉम्प्युटरचा वापर, अन्नधान्यातली भेसळ, जंतुनाशकांचा सढळ हस्ते वापर अशी बरीच इतर कारणे आहेत. पण स्त्रीने नोकरी केली नाही तर या समस्या सुटतील असे अजिबात नाही. मुलांना नीट वाढवणे ही आईबाप दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे.
लेखिका स्वतः नोकरी करतात असे दिसते. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य, त्यातून मुलांना अधिक चांगल्या सोयी पुरवता येणे हे शक्य झाले का नाही हे त्याच सांगतील.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/03/2015 - 12:41
नवीन
त्यांच्याकडे स्वयंपाकाला मदतनीस आहे. अर्थात हे कसे शक्य झाले ते नको विचारु.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 02/04/2015 - 16:01
नवीन
पैसा ताई
" टीव्ही कॉम्प्युटरचा वापर, अन्नधान्यातली भेसळ, जंतुनाशकांचा सढळ हस्ते वापर" या पैकी नक्की कोणत्याही कारणाने चष्मा लागतो याला अजून तरी शास्त्राधार नाही. परंतु गेल्या काही वर्षात याचे प्रमाण वाढते आहे हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. अर्थात याचे एक कारण हेही आहे कि आता जास्त लोक शिकू लागले असल्याने आपल्याला दिसत नाही हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. "पूर्वी पायाखालची जमीन दिसते ना मग पुरे किंवा चेहरा ओळख्ता येतो आहे न मग झाले"यावर लोक समाधान मनात होते.
चष्मा लागण्याचे मूळ कारण म्हणजे वाढत्या वयात जर नेत्रगोल भिंगाच्या प्रमाणात जास्त वाढला तर कॉर्नियाची वक्रता(CURVATURE) कमी होऊन दीर्घ दृष्टी येते ( MYOPIA) यासाठी आपल्याला चष्म्याचा उणे नंबर येतो. अंतर्गोल(CONCAVE) भिंग लावावे लागते.
Myopia occurs when the eyeball is too long, relative to the focusing power of the cornea and lens of the eye. This causes light rays to focus at a point in front of the retina, rather than directly on its surface.
आणी जर नेत्र गोल कमी वाढला तर कॉर्नियाची वक्रता(CURVATURE) जास्त होऊन आपल्याला ह्रस्व दृष्टी( HYPERMETROPIA) येते. यात आपल्याला चष्म्याचा नंबर अधिक येतो आणी आपल्याला बहिर्गोल (CONVEX) भिंगाचा चष्मा लावावा लागतो.
+६ ते -६ हा नंबर केवळ अशा कारणांनी येतो आणी हा सरासरी च्या आसपास म्हणून स्वीकारला जातो
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/04/2015 - 17:40
नवीन
पण मी लिहिताना डोळ्यांचे आजार असं लिहिलं नव्हतं तर इतर अनेक आजार असं लिहिलं होतं. लोकांमधे अवेअरनेस वाढला आहे त्यामुळे आजारपण जास्त वाटतं हेही लिहिलं आहेच. घरचं खाणं न मिळाल्याने चष्मे लागतात असा काहीसा सूर लेखात दिसला, तो पटला नाही यासाठी हे बाकी लिहावंसं वाटलं, की आई घरात राहिली आणि मुलांना घरचं जेवण मिळालं तरी ही बाह्य कारणं दूर होणार नाहीत.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/04/2015 - 17:55
नवीन
वाढत्या वयात चष्मा कसा, का लागतो हे समजले. धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 02/03/2015 - 12:28
नवीन
बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतात.मी बाहेर असते म्हणून मुलांची आबाळ होते.त्यांना चारी ठाव स्वैपाक करुन घालू शकत नाही.त्यात आपल्या आया आज्यानी आपल्याला वाढवलेलं असतं निगुतीने त्याच्या आठवणींची यात भर असते.मग अशा विचारांचा जन्म होतो.त्यात लिहिणारीच्या हेतूविषयी शंका नाही.पण नवरा हे चाक पण तुमच्या संसाररथाला आहे.दोघांच्या समन्वयाने चांगले देण्याचा प्रयत्न आपण करु शकतो ना? तो अॅस्पेक्ट न दिसल्याने धागा एकांगी झाला.बाकी पहिल्याच लेखाला शतकी मजल मारणार तुम्ही!पुस्प्गूच आमच्याकडून आणून ठेवल्या गेला आहे.
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 02/03/2015 - 13:09
नवीन
बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतात. >>>>> +१
मला तर हा लेखही त्याचाच परिणाम वाटतोय.
ज्योतिताई, असे विचार असण्यात चूक काहीच नाही. पण आपल्या विचारांमागच्या धारणा मात्र वारंवार विवेकाच्या कसोटीवर घासून बघितल्या पाहिजेत असे वाटते.
बाकी मला न पटलेले मुद्दे अनेकांनी आणि अनेकींनी बोलून झालेत. त्यामुळे जास्त लिहीत नाही.
पण या सर्व प्रतिसादांवर आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Wed, 02/04/2015 - 06:40
नवीन
होममेकर स्त्रीयादेखिल न कमावण्याच गिल्ट बाळगतात..
तो एकेकीच्या स्वभावाचा भाग असतो ..
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 02/03/2015 - 12:30
नवीन
पुरुषांनी स्वयंपाक आणि मुलांचे संगोपन नक्कीच शिकून घेतले पाहिजे. आपल्यावरची जबाबदारी म्हणून नाही तर त्यातून आनंद मिळतो म्हणून, मनापासून स्विकारले पाहिजे.
तसे, मुलांचे संगोपन ह्या विषयात अगदी तान्ह्या मुलांचे शी-शू काढणे, ढुंगण धुणे (मुलांचे), आंघोळ घालणे, जेऊ घालणे, शाळेची तयारी करणे, शाळेत पोहोचवणे, अभ्यास घेणे आदी पासून जसजशी मुले मोठी होत जातात तसतसे त्यांच्या भावविश्वात सहभागी होत संवाद साधणे, त्यांना जाणवेल इतपत मायेची उब त्यांना देणे ही अत्यंत महत्त्वाची अंगे आहेत.
तान्ह्या मुलांना हाताळणे कित्येक पुरुषांना जमत नाही त्यामुळे ती जबाबदारी घरच्या स्त्रीवर सोपविली, ढकलली जाते. बाकी शाळेचा अभ्यास घेण्यापासून पुढील जबाबदार्या पुरुषमंडळी घेताना घरोघर दिसतात. जसे तान्ह्या मुलांना हाताळणे पुरुषांना जमत नाही तसेच वयाने मोठ्या मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडते. अर्थात, हे माझे मर्यादीत निरिक्षण आहे, चुकीचे असू शकेल.
दोघांनी मिळून संसारातल्या सर्व जबाबदार्या समजुन-उमजून आनंदाने स्विकारल्या तर संस्कारही होतात, समृद्धीही येते आणि देशाचा विकास की काय म्हणतात तोही होईल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 02/03/2015 - 12:33
नवीन
असं जनरली पाहिलंय खरं.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Tue, 02/03/2015 - 12:43
नवीन
हे तुमचे वैयक्तिक मत आहे असे मानतो.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 02/03/2015 - 15:35
नवीन
माझ्या प्रतिसादातील 'अर्थात, हे माझे मर्यादीत निरिक्षण आहे, चुकीचे असू शकेल.' हे वाक्य तुमच्या नजरेतून सुटलेले दिसते आहे. हो हे माझे वैयक्तिक मत आहे.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 02/03/2015 - 16:24
नवीन
ढुंगण धुणे ह्या पुढे (मुलांचे) हे वाचून डोळे पाणावले
- Log in or register to post comments
स
सविता००१
Tue, 02/03/2015 - 12:38
नवीन
पदार्पणात शतकी धागा...........
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »