Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

क
क्लिंटन
Sat, 02/07/2015 - 18:34
🗣 107 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी शक्य झाल्यास रजा घेऊन निकालांसाठी नवा धागा चालू करेन. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवालांनी ज्या हिंमतीने हा सामना लढविला आहे त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.विशेषत: एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा दिल्लीत मोठा पराभव झाला होता, नंतरच्या काळात अनेक महत्वाचे साथीदार सोडून गेले, योगेन्द्र यादव यांच्याबरोबरही मतभेद आहेत असे चित्र होते आणि मतदानाला १५ दिवस राहिलेले असताना शांती भूषण या आआपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महत्वाच्या नेत्याने केजरीवालांनाच बदला अशी मागणी केली या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तसेच दिल्लीसारख्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत काही दशके होत असताना तिसऱ्या पक्षाला चंचूप्रवेश करणेच मुळात कठिण होते.ते त्यांनी केलेच.आणि आता सर्व एक्झिट पोल्स कॉंग्रेसला ५ पेक्षाही कमी जागा देत आहेत (काही शून्य जागा सुध्दा देत आहेत) म्हणजे केजरीवालांनी कॉंग्रेसला दिल्लीतून जवळपास हद्दपार केले आणि परत दिल्लीचे राजकारण दुरंगी केले या दाखविलेल्या हिंमतीबद्दल केजरीवालांना माझ्यासारख्या आआपविरोधकाकडूनही १०० पैकी ११० मार्क. जर आआपला यश मिळाले तर १. आआप: हा विजय नक्कीच आआपसाठी मोठा मनोबल उंचाविणारा असेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे केंद्रात नरेंद्र मोदींना सामोरे जायला लागणार आहे त्याच गोष्टीला (लोकांच्या आपणच वाढविलेल्या अपेक्षांना सामोरे जाणे) भविष्यात केजरीवालांनाही सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कारभार करायला हवा. धरणे धरणे आणि राज्यकारभार या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. असे रस्त्यावरचे राजकारण करणे हे बेजबाबदारपणाचे आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. तसेच दिल्ली हे अजूनही पूर्ण राज्य नाही आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आहेत त्या चौकटीतच राहून काम केले पाहिजे.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही अधिकार द्या ही मागणी रास्त आहे आणि त्यासाठी घटनात्मक मार्ग अवलंबल्यास कोणाचीही हरकत त्याला असेल असे वाटत नाही.पण मागच्या वेळी जो आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखविला तो हद्दपार करावा ही अपेक्षा नक्कीच आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वबळावर सरकार येणार आहे तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले तर दोष इतर कोणावरही ढकलता येणार नाही ही परिस्थिती नाकारून चालणार नाही. तसेच दिल्ली म्हणजे सगळा देश नाही हे पण केजरीवालांनी (आणि त्यांच्या समर्थकांनी) लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे ९५% पेक्षा जास्त शहरी राज्य आहे.दिल्लीत ज्या मार्गांचा पक्ष वाढवायला उपयोग झाला तेच मार्ग सगळ्या देशात उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणातच अपेक्षा ठेवाव्यात.मागच्या वेळी विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकसभेत १०० जागा जिंकणार अशा अपेक्षा, कोणी कोणी तर केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला निघाले होते.असल्या अपेक्षा ठेवायला योग्य वातावरण दिल्लीतील विजयामुळे निर्माण होईल असे वाटत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केजरीवालांना पक्ष एकत्र ठेवता आला पाहिजे.शेवटी आम आदमी पक्ष म्हणजे ’चळवळ्या’ लोकांचा पक्ष आहे.त्यात विविध मतेमतांतरे असलेल्यांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात आपापसातल्या भांडणांचे जाहिर प्रदर्शन इतक्या वेळा आआपने केले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मतदार केजरीवालांना परत संधी द्यायला तयार झाले असतील तर त्या लोकभावनेवर स्वार होऊन पक्ष एकत्र ठेवणे आणि राज्यकारभार करणे ही कौशल्याची गोष्ट आहे.ती केजरीवालांना साधता यायला हवी. २. भाजप: पक्षासाठी हा पराभव नक्कीच धक्कादायक असेल.विशेषत: २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा विजयरथ जो चौफेर उधळला होता त्याला अटकाव नक्कीच बसला असे चित्र या पराभवातून उभे राहिल.मतदान व्हायच्याही आधी ही निवडणुक म्हणजे मोदी सरकारवरील सार्वमत नाही अशी पूर्वी कॉंग्रेसचे नेते भाषा करायचे ती भाषा भाजपवाले करत होते ती नक्कीच धक्कादायक आहे.हा पराभव झाल्यास सर्वात पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांनी त्या पराभवाची जबाबदारी जाहिरपणे स्विकारायला हवी.अन्यथा कॉंग्रेसमध्ये चालायचे तसे-- जिंकल्यास श्रेय गांधी घराण्याचे आणि पराभव झाल्यास दोष इतर कोणाचा अशी परिस्थिती भाजपमध्ये मोदी-शहांच्या नावाने उभी राहिल्यास ते योग्य नाही.असे करणे म्हणजे परिस्थितीपासून दूर पळून आत्मवंचना करणे हा त्याचा अर्थ होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा पराभव नक्की का झाला हे आत्मपरिक्षण करणे योग्य ठरेल.लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा एका रात्रीत पूर्ण होतील अशी कोणाचीच अपेक्षा नाही.पण निदान त्या दिशेने पावले पडत आहेत हे चित्र निदान वरकरणी नाही.धोरणे बनविण्याच्या दृष्टीने पावले पडत असतीलही कदाचित पण अजून ’अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत तेव्हा लोक कुठे आहेत ’अच्छे दिन’ हा प्रश्न नक्कीच विचारणार आहेत.तेव्हा मतदारांना गृहित धरून चालायचे नाही. मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल.त्यामुळे कारभारात सुधारणा करून त्याची फळे दिसायला पुरेसा वेळ आहे.त्या संधीचा पूर्ण फायदा पक्षाने उठवायला हवा. दिल्लीत पराभव झाला असला तरी आभाळ कोसळलेले नाही.शेवटी दिल्ली म्हणजे लोकसभेत अवघ्या सात जागा असलेले छोटे राज्य आहे.पण या पराभवानंतर कोषात जाऊन यानंतरच्या काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये (विशेषत: बिहारमध्ये) पराभव झाल्यास मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील.२०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,आसाम) भाजपला आसाम सोडून इतर राज्यांमध्ये फार चमकदार कामगिरी करता येणे कठिण आहे.तेव्हा बिहारनंतर थेट मार्च २०१७ मध्ये गोवा,पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच निवडणुका असतील.तेव्हा मधल्या काळात नरेंद्र मोदींची पकड ढिली होत आहे हे चित्र उभे राहणे भाजपला परवडणार नाही. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणुकांचे महत्व लक्षात यावे. दुसरे म्हणजे दिल्ली भाजप हे एक दुभंगलेले घर गेली कित्येक वर्षे आहे ही परिस्थिती बदलायला हवी. सतत एकमेकांशी भांडणार्‍या स्थानिक नेत्यांना नारळ देऊन मीनाक्षी लेखींसारख्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी केली तर ते चांगले ठरेल. दुभंगलेले सैन्य घेऊन आयत्या वेळी सेनापती बदलून युध्द जिंकता येत नाही हे भाजपने दिल्लीत १९९८ मध्ये अनुभवले तेच २०१५ मध्ये अनुभवले असे चित्र उभे राहिल.त्या दृष्टीने निदान पुढच्या निवडणुकांसाठी तरी भाजपने आतापासून लोकांसमोर एकजुटीने सामोरे जावे हे इष्ट. ३. कॉंग्रेस: हे निकाल मात्र कॉंग्रेस पक्षाची झोप उडवतील हे नक्कीच.दिल्लीमध्ये ७० पैकी ५ पेक्षा कमी जागा मिळणे म्हणजे पक्षाची मोठीच वाताहत झालेली असेल.पक्षाला राहुल गांधी नवी दिशा देऊ शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द होईल.अजय माकनसारखा चेहरा पुढे करूनही आणि दिल्लीमध्ये १५ वर्षे काम करूनही इतका मोठा पराभव का पदरी पडला याचे आत्मपरिक्षण करणे नक्कीच गरजेचे असेल.१९७९ ते १९९७ या काळात विरोधी पक्षात असताना इंग्लंडमधील लेबर पक्षाने टोनी ब्लेअर हे नवेच नेतृत्व पुढे आणले आणि मग सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या त्याप्रमाणे कॉंग्रेसला नक्कीच स्वत:ला रिइन्व्हेंट करायला हवे.

प्रतिक्रिया द्या
16195 वाचन

💬 प्रतिसाद (107)
प
प्रचेतस Sat, 02/07/2015 - 18:49 नवीन
उत्तम विवेचन क्लिंटन.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 02/07/2015 - 18:53 नवीन
ही निवडणूक नक्कीच कठीण जाणार भाजपाला... १० तारखेची वाट बघतोय :) आणि हो वेलकम बॅक... :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 02/07/2015 - 18:57 नवीन
मते आवडली.. आनखिन विस्तारीत पणे लिहिले असते तरी चालले असते. पण १० तारखे पर्यंत वाट पाहुन आनखिन छान पद्धतीने ठोस लिहिले तर जास्त आवडले असतेच.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 02/08/2015 - 05:29 नवीन
धन्यवाद. इतर प्रतिसादांना नंतर उत्तर देतो. मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता. म्हणून मतमोजणीपूर्व धागा काढत आहे कारण अवांतरापेक्षा मुद्द्यांवर चर्चा घडावी अशी इच्छा आहे. मग भले वीसच प्रतिसाद आले तरी चालतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
श्रीगुरुजी Sun, 02/08/2015 - 09:07 नवीन
>>> मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता. याविषयी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Sun, 02/08/2015 - 19:09 नवीन
मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता.
नाही .. कदाचीत असे नसते झाले. तसे व्हायचे असते तर येथे पण झाले असते. धागा कर्ता नक्की कोणात्या गोष्टी अधोरेखित करतो यावर पण रिप्लाय बरेच अवलंबुन असतात. जरी तुम्ही आप विरोधी असला तरी तुम्ही विश्लेषण योग्य केले आहे. त्यात वावगे काही नाही. झालेल्या चुका पुन्हा होता कामा नये हे नक्कीच झाले पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 04:52 नवीन
श्रीगुरुजी यांनी काढलेल्या धाग्यातच केजरीवाल हे कसे उंटाच्या एका विशिष्ट अवयवाचा मुका घ्यायला निघाले आहेत असा एक अतिशय हीन उल्लेख होता . राजकीय विरोध समजू शकतो पण वैयक्तिक अनुचित विधान अयोग्य होते . आपची बाजू घेणारया लोकांची बुद्धिमत्ता कशी कमी आहे असे म्हणून त्यांचा आप्टार्ड वैगेरे अनावश्यक उल्लेख केले गेले . Backlash तर होणार होताच तसा तो झालाच . या धाग्यावर समयोचित आणि चांगली चर्चा (वैयक्तिक अभिनिवेष न बाळगता ) झाली तर स्वागतच आहे . तिथे माझ्या वकुबानुसार सहभाग देण्याचा प्रयत्न करेल . कारण दिल्ली ची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते . त्याची उचित चर्चा होणे अतिशय आवश्यक आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 09:51 नवीन
>>> श्रीगुरुजी यांनी काढलेल्या धाग्यातच केजरीवाल हे कसे उंटाच्या एका विशिष्ट अवयवाचा मुका घ्यायला निघाले आहेत असा एक अतिशय हीन उल्लेख होता . राजकीय विरोध समजू शकतो पण वैयक्तिक अनुचित विधान अयोग्य होते . अहो, हा नेहमी व सढळपणे जाणारा मराठी वाक्प्रचार आहे. त्यात हीन काहीही नाही. शरद पवारांनी सुद्धा एका जाहीर सभेत हा वाक्प्रचार वापरला होता. अनेक प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील लेखात या वाक्प्रचाराचा उल्लेख केलेला असतो. खालील काही उदाहरणे वाचा आणि या वाक्प्रचाराचा कसा नेहमी उपयोग केला जातो ते वाचा. (१) http://www.lokprabha.com/20110527/fulya.htm (२) http://www.sureshbhat.in/node/1780 (३) http://lokpatra.in/index.php/archives/211 (४) http://www.esakal.com/esakal/20140420/5412253461667452573.htm (५) http://www.misalpav.com/node/28493 (६) http://72.78.249.126/esakal/20130619/5445061294239123191.htm हा जर वाक्प्रचार खरोखरच हीन असेल तर संपादकांनी तो माझ्या लेखातून काढून टाकावा असेही मी त्या धाग्यातल्या एका प्रतिक्रियेत लिहिले होते. संपादकांनी तो अजूनही काढलेला नाही. कदाचित तो वाक्प्रचार हीन नसावा किंवा मिपावर हीन लेखनाला परवानगी असावी असे दिसते. संपादकांना त्यात काहीही हीन किंवा आक्षेपार्ह वाटलं नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असो. मूळ धाग्याशी काहीही संबंध नसलेले प्रतिसाद लिहायची तुम्हाला सवय आहे त्यातलाच हा एक प्रतिसाद. >>> आपची बाजू घेणारया लोकांची बुद्धिमत्ता कशी कमी आहे असे म्हणून त्यांचा आप्टार्ड वैगेरे अनावश्यक उल्लेख केले गेले . Backlash तर होणार होताच तसा तो झालाच . पुन्हा एकदा अपप्रचार. स्वतःचा उल्लेख करताना "Proud to be an AAPtard !" हा उल्लेख मिपावरील एका आआपभक्तानेच कोण जिंकणार दिल्ली या धाग्यात केला होता. अनेक सामाजिक संकेतस्थळावर आआपभक्त अभिमानाने स्वतःचा उल्लेख आपटार्ड असा करतात. मी तोच उल्लेख केला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? >>> या धाग्यावर समयोचित आणि चांगली चर्चा (वैयक्तिक अभिनिवेष न बाळगता ) झाली तर स्वागतच आहे . तिथे माझ्या वकुबानुसार सहभाग देण्याचा प्रयत्न करेल . कारण दिल्ली ची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते . त्याची उचित चर्चा होणे अतिशय आवश्यक आहे . बरोबर आहे. पण त्यासाठी तुम्ही, नानांनी व काही इतरांनी धाग्याच्या मूळ विषयाशी संबंधित नसणारे आणि धागा भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकणे थांबविले पाहिजे. कोण जिंकणार दिल्ली या धाग्यात जेव्हा जेव्हा तुमचे मुद्दे खोडून काढले तेव्हा तेव्हा तुमच्याकडे नवीन मुद्दे नसल्याने तुम्ही, नाना आणि इतर काही जणांनी धाग्याच्या मूळ विषयाशी संबंधित नसलेले आणि विषय भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकले होते. धाग्याचा मूळ विषय भरकटू नये यासाठी मी तसल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केल्यानेच धागा मूळ विषयापासून भरकटला नव्हता. तुमच्यासारखे काही जण 'मोदीभक्तांची कशी जिरली' या थाटात प्रतिसाद टाकून मूळ धागा भरकटत नेतील यासाठीच हा धागा निकालाच्या २ दिवस आधी काढला असे या धाग्यात क्लिंटन यांनी लिहिले आहे. माझ्या धाग्यात मतदानोत्तर चाचणीचे निकाल येताच तसे प्रतिसाद सुरू झाले होते, हे लक्षात घेता क्लिंटन यांनी घेतलेली भूमिका बरोबरच आहे. असो. मी लिहिलंय त्यावर जरा अंतर्मुख होऊन विचार करा आणि मगच उत्तर द्या. या किंवा इतर कोणत्याची धाग्यावर मूळ विषयाशी संबंधित नसलेले आणि विषय भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकणे थांबवा. जरी तसे प्रतिसाद टाकले तरी फाट्यावर मारले जाईल हे लक्षात आले असेलच. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 10:50 नवीन
प्रतिसाद द्यायची लई इच्छा आहे पण हा धागा भरकटू नये म्हणून हा प्रतिसादच फाट्यावर मारत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 10:52 नवीन
गुड. वरच्या प्रतिसादात दिलेला परखड डोस लागू पडलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 10:55 नवीन
दिल्लीच्या दुसर्या धाग्यावर कोण पळाल आणि तिथे फिरकत पण नाही हे तिथे गेल्यावर कळेलच . लेखनसीमा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 11:00 नवीन
निवडणुक झाल्यावर मतमोजणी ३ दिवसांनी होती. दरम्यानच्या काळात लिहिण्यासारखे काही नव्हतेच. उद्या मतमोजणी झाल्यावर परत धागा सुरू होईल. अर्थात धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद असेल तरच उत्तर दिले जाईल हा डोस आधी दिलेला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
न
नांदेडीअन Mon, 02/09/2015 - 10:55 नवीन
*mosking* *good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
न
नांदेडीअन Mon, 02/09/2015 - 10:57 नवीन
पिंपातला उंदीर, तुमच्यासाठी आहेत त्या स्माईली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 10:59 नवीन
*lol* *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:38 नवीन
श्री गुरुजी, जास्त वयक्तीक मनाला लावुन घेवु नये असे वाटते. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम होता हे मान्य, परंतु तुमच्या म्हणण्याला वेळ मिळेल तसे योग्य उत्तरे दिलेली आहेत. परंतु तुम्ही काहीही झाले तरी भाजपच योग्य असेच म्हणुन राहता हे खरेच योग्य नाही. असो बाकी वयक्तीक द्वेष नसावा. आणि आपल्याल रिप्लायला डोस म्हणु नये असे वाटते. ते हाश्यास्पद वाटते. आणि ह्याने धागे रिप्लाय दुषित होतात. मान्य एकोळी रिप्लाय आणि भरकटवणारे एकोळॅए रिप्लाय योग्य नाही. परंतु आपले मत मोठे लिहिले म्हणजे तेच योग्य आणि तसेच हे सुद्धा आतातायी पणाचे वाटते. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशाखा पाटील Sat, 02/07/2015 - 19:13 नवीन
चांगले विश्लेषण. भाजपने आआपला शह देण्यासाठी किरण बेदींना आणले खरे, पण फासे उलटले असं शेवटच्या चरणात तरी दिसले. आआप येणं ही तशी चांगली बातमी आहे. भाजपला आता असा धक्का बसण्याची गरज आहे. त्यामुळे ते थोडे जमिनीवर येतील आणि anarchy कडे वळणाऱ्या केजरीवालांवर जबाबदारी येऊन पडेल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 02/07/2015 - 19:16 नवीन
मस्त मुद्दे मांडलेत क्लिंटनभौ. मोदि वि. केजरीवाल अशी निवडणुक होऊन आप बहुमतात आल्यास दिल्लीकरांसारखे करंटे कोणि नाहि. प्रस्थापीत राजकारणाला समर्थ पर्याय म्हणुन आप निवडुन आलं तर दिल्लीकर अत्याभिनंदनास पात्र. भाजप समर्थीत आप किंवा आप समर्थीत भाजप सत्तेत आल्यास एक अत्यंत वेगळा प्रयोग पहायला मिळेल. शहा आणि कंपनीने निवडणुका जिंकण्याच्या नवीन टेक्नीक्स शोधणे आवश्यक आहे. हा धडा भाजपने शिकल्यास गुड फॉर देम. मागिल निवडणुकांशी तुलना करता यंदा केजरीसाहेब खुप परिपक्व वाटले. इतर कुणि नाहि तरी यांनी जर मोदिंच्या अतुलनीय कामचं महत्व ओळखलं तर बेस्ट फॉर इंडीया.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 02/07/2015 - 19:30 नवीन
चांगला लेख... मला वाटते (काहीसे लेखात म्हणल्याप्रमाणेच) आप जिंकल्यास केजरीवाल आणि आपच्या चळवळ्यांना एक सुवर्णसंधी मतदारांनी दिली असेल. त्याचा फायदा घेतल्यास एक चांगला पक्ष तयार होईल. देशाला आणि देशातील राजकीय परीस्थितीला त्याची गरज आहे. पण तसे घडते का हे ब॑घण्यासाठी मात्र दिल्ली अजून दूरच आहे! तुर्तास परत रस्त्यावरील तीन पैशाचा तमाशा चालू होईल का ही भिती आहेच. त्या व्यतिरीक्त केजरीवालांवरील खटल्याचे काय झाले? बरोबर-चूक जे काही असेल पण जर निकाल विरोधात लागला तर काय होईल? भाजपा च्या संदर्भात, क्लिंटन यांच्या "मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल." पूर्णपणे सहमत. इंग्रजीत ज्याला blessing in disguise म्हणतात तसेच काहीसे पक्षाच्या बाबतीत आणि राज्यकर्ते आहेत म्हणून देशाच्या बाबतीत होईल. काँग्रेसच्या बाबतीत काय म्हणावे? शेवटी गांधीजींचे स्वप्न सत्य होणार असे दिसते. स्वातंत्र्यापूर्वी जी एक स्वातंत्र्यासाठीची चळवळ होती त्याच्या नावाचा पॉलीटीकल ब्रँडींगसाठी वापर केला गेला. अर्धशतक चालला... पण मला वाटते आता सोनीया आणि राहूल गांधी तसेच तमाम काँग्रेसजनांसाठी "अब तुम्हारे हवाले, वतन साथीयो" इतकेच म्हणणे बाकी राहीले आहे. :)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 09:21 नवीन
काँग्रेसच्या बाबतीत काय म्हणावे? शेवटी गांधीजींचे स्वप्न सत्य होणार असे दिसते. स्वातंत्र्यापूर्वी जी एक स्वातंत्र्यासाठीची चळवळ होती त्याच्या नावाचा पॉलीटीकल ब्रँडींगसाठी वापर केला गेला. अर्धशतक चालला... पण मला वाटते आता सोनीया आणि राहूल गांधी तसेच तमाम काँग्रेसजनांसाठी "अब तुम्हारे हवाले, वतन साथीयो" इतकेच म्हणणे बाकी राहीले आहे.
सध्या काँग्रेसमध्ये स्वतःचा जनाधार असलेले फार नेते शिल्लक नाहीत.याचे कारण काँग्रेसची हायकमांड संस्कृती हे नक्कीच आहे.या प्रकारामुळे सामुहिक नेतृत्व आणि दुसरी फळी हे प्रकार काँग्रेस पक्षात कधी उदयास आलेच नाही.भाजपमध्ये पूर्वी असे केंद्रिकरण कधीच नव्हते. वाजपेयी-अडवाणींबरोबरच त्यांच्याइतक्याच ज्येष्ठतेचे मुरली मनोहर जोशी, भैरोसिंग शेखावत, कुशाभाऊ ठाकरे इत्यादी नेत्यांचे सामुहिक नेतृत्व होते.कुणी एक पक्षाध्यक्ष असला तरी तोच सगळे निर्णय घेत आहे आणि बाकी कोणाला काही महत्व नाही असे चित्र पक्षात नव्हते.तसेच वाजपेयी आणि अडवाणींनी जाणीवपूर्वक दुसरी फळी तयार केली होती.तशी दुसरी फळी काँग्रेसमध्ये कधी उभीच राहिली नाही.त्यात राजेश पायलट, माधवराव शिंदे अशा सारख्यांचा अकाली मृत्यू झाला.आज भाजपमध्ये चौहान, रमणसिंग, पर्रिकर असे राज्य पातळीवर जनाधार असलेले नेते आहेत तसे काँग्रेसकडे कोणीच नाही.असो. भिती एवढीच वाटते की काँग्रेसच्या पडझडीबरोबर विरोधी पक्षात जी पोकळी निर्माण होत आहे त्या जागेत आम आदमी पक्षासारखा पक्ष जायला नको. आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींनी दुसरी फळी जाणीवपूर्वक उभी केली आणि सामुहिक नेतृत्व आणले तसे नरेंद्र मोदींनी केलीच पाहिजे.अन्यथा भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असा काँग्रेसप्रमाणे एकखांबी तंबू उभा राहिला तर कधीतरी भाजपची सुध्दा सध्या काँग्रेसची आहे तशी अवस्था होईल.भाजपमध्ये काँग्रेसचे ते हायकमांड कल्चर आले आहे असे आताचे तरी चित्र आहे ते वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 10:50 नवीन
दुसर्‍या फळीबद्दल अतिशय योग्य विश्लेषण ! ज्या पक्षांमध्ये , कोणत्याही टीम वर्कमध्ये सक्षम दुसरी फळी असणे फार गरजेचे आहे . एकखांबी तंबू फार काळ टिकून राहू शकत नाही ! भाजपा मध्ये सुद्धा सध्या हीच भिती वाटत आहे ! सबकुछ मोदी ला सध्या यश लाभला आहे पण योजना राबवायला आणि लोकाभिमुख सरकारसाठी शिवराज चौहान , पर्रीकर , फडणवीस यां सारख्या नेत्यांना येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर एक्सपोजर मिळणे गरजेचे आहे . पक्षार्तगत विरोधाला स्विकारला पहिजे . प्रत्येकाचा संजय जोशी करून चालणार नाही.. नाहीतर भाजपा काँग्रेसच्या वाटेने जायचा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हाडक्या Mon, 02/09/2015 - 11:04 नवीन
आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींनी दुसरी फळी जाणीवपूर्वक उभी केली आणि सामुहिक नेतृत्व आणले तसे नरेंद्र मोदींनी केलीच पाहिजे.अन्यथा भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असा काँग्रेसप्रमाणे एकखांबी तंबू उभा राहिला तर कधीतरी भाजपची सुध्दा सध्या काँग्रेसची आहे तशी अवस्था होईल.भाजपमध्ये काँग्रेसचे ते हायकमांड कल्चर आले आहे असे आताचे तरी चित्र आहे ते वाईट आहे.
सगळ्याच प्रतिसादाशी सहमत असलो तरी.. हा मुद्दा अगदी चपखल. दुसर्‍याने आधी केलेल्या चुका पाहूनदेखील आपण त्याच चुका करायला लागावं, याला काय म्हणायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रसाद१९७१ Mon, 02/09/2015 - 13:42 नवीन
पहील्या फळीतल्या सो कॉल्ड नेत्यांना कमीत कमी एका मतदारसंघातुन नक्की निवडुन येण्याच्या गॅरेंटी हवी तर त्यांना पहील्या फळीतले म्हणता येइल. अडवानींना तर मोदींनी ठरवले असते तर ५० हजार मते पण मिळू दीली नसती गांधीनगर मधे. बाजपाई तर बोलुन चालुन कॉग्रेस चाच माणुस, भाजपला नुकसान करण्यासाठी सोडलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
प
प्रसाद१९७१ Mon, 02/09/2015 - 13:16 नवीन
भाजपत ह्या पूर्वी पहील्या फळीचेच नेतृत्व कधी नव्हते तर दुसर्‍या फळीतले कुठुन असणार? भाजपचे उमेदवार जिंकायचे ते बिचार्‍या कार्यकर्त्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या जोरावर. पहील्या फळीतले नेतृत्व म्हणजे ज्याच्या फक्त नावावर देशभरात काही टक्के तरी मते मिळतील. जे पूर्वी इंदीरा बाईंचे होते आणि आता मोदींचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 13:28 नवीन
धन्य झालो हा प्रतिसाद वाचून ! प्रसाद१९७१ यांच्या असीम ज्ञानाने डोळे दिपले / उघडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मृत्युन्जय Mon, 02/09/2015 - 13:30 नवीन
मान्य आहे. पण मला वाटते तुम्ही १९९१ च्या आधीच्या काळाबद्दल बोलत आहात. त्यानंतर अडवाणी - वाजपेयी ही द्वयी राष्ट्रीय नेतृत्वच होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 16:20 नवीन
>>> भिती एवढीच वाटते की काँग्रेसच्या पडझडीबरोबर विरोधी पक्षात जी पोकळी निर्माण होत आहे त्या जागेत आम आदमी पक्षासारखा पक्ष जायला नको. भारतात एकूण ३ विचारधारा असलेले पक्ष आहेत. डाव्या विचारसरणीचे पक्ष, उजव्या विचारसरणीचे पक्ष आणि काँग्रेस विचारसरणीचे पक्ष. यातले काँग्रेस विचारसरणीचे पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाचे अनेक तुकडे, अनेक प्रादेशिक पक्ष इ.) हे डाव्या विचारसरणीचा बुरखा पांघरलेले परंतु प्रत्यक्षात उजवी विचारसरणी असलेले पक्ष आहेत. हे पक्ष आणि डावे पक्ष यात अनेकवेळा साटंलोटं झालेलं आहे. परंतु उजवे पक्ष आणि डावे पक्ष हे कायमच एकमेकांच्या विरोधात असतात. उजवे पक्ष आणि काँग्रेस कधीच एकत्र येत नाहीत. परंतु काँग्रेस विचारसरणी असलेल्या उर्वरीत पक्षांनी वेळोवेळी डाव्या व उजव्या पक्षांशी युती केलेली आहे. २००९ पासून डावे पक्ष नामशेष व्हायला सुरूवात झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६२ खासदार निवडूण आणणार्‍या डाव्या पक्षांना २००९ मध्ये फक्त २४ तर २०१४ मध्ये फक्त १२ जागा मिळाल्या. सलग ३४ वर्षे सत्ता भोगलेल्या डाव्या पक्षांचा २०११ मधील प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. या डाव्या पक्षांच्या अस्तंगतामुळे निर्माण झालेली पोकळी दिल्लीत आआप भरून काढत आहे. काँग्रेसने सत्ता गमाविली असली तरी काँग्रेसचे स्थान अबाधित आहे. तिथे पोकळी अजून निर्माण झालेली नाही. त्यामुळे आआप काँग्रेसच्या जागी जाऊ शकत नाही. परंतु आआप डाव्या पक्षांना पर्याय म्हणून दिल्लीत पुढे आलेला आहे. अर्थात दिल्लीच्या बाहेर आआपला अजूनही शून्य स्थान आहे. तसं पाहिलं तर केरळ, प. बंगाल व त्रिपुरा ही तीन राज्ये सोडली तर डाव्या पक्षांनाही उर्वरीत भारतात नगण्य स्थान होते. आआपचे सध्याचे स्थान फक्त दिल्लीपुरते मर्यादीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हाडक्या Mon, 02/09/2015 - 17:40 नवीन
भारतात एकूण ३ विचारधारा असलेले पक्ष आहेत. डाव्या विचारसरणीचे पक्ष, उजव्या विचारसरणीचे पक्ष आणि काँग्रेस विचारसरणीचे पक्ष. यातले काँग्रेस विचारसरणीचे पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाचे अनेक तुकडे, अनेक प्रादेशिक पक्ष इ.) हे डाव्या विचारसरणीचा बुरखा पांघरलेले परंतु प्रत्यक्षात उजवी विचारसरणी असलेले पक्ष आहेत
इथे किंचित असहमत श्रीगुरुजी, डावे, उजवे याच्यामध्ये centre left आणि centre right अशा दोन विचारसरणी गृहित धरल्या जातात. काँग्रेसला पहिल्यापासून centre left म्हणून ओळखले जाते. क्लिंटनने कुठेतरी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाला सबळ अशा centre right पक्षाची गरज आहे असे त्यांचे मत आहे. माझ्यामते गेल्या वीस वर्षात काँग्रेस centre left कडून centre right कडे संक्रमित होत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात दिसत मात्र नाही तसे.. जनता दल (सगळेच) बराचसा डावाच आहे फक्त मान्य करत नाही, तृणमूलसारखे स्वतःला centre left म्हणून मांडू पाहतात पण ते आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष संधिसाधू म्हणायला हवेत त्यापलिकडे त्यांना कोणतीही विचारधारा नाही आणि विशेष म्हणजे त्यांना कोणी त्यांच्या धोरणांबद्दल विचारत पण नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Mon, 02/09/2015 - 17:00 नवीन
प्रतिसादाशी सहमत. जेथे दुसरी फळी तयार झाली नाही तेथे दुफळी झाली आणि मग त्रिफळा उडला. हे कुणाबाबतही सत्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
निनाद मुक्काम … Sat, 02/07/2015 - 19:45 नवीन
भाजपचे सरकार आले नाही तरी एकवेळ चालेल पण काँग्रेस ला ५ किंवा ठाहून कमी जागा मिळाल्या पाहिजे, राजधानीतून हा पक्ष हद्दपार झालेला पाहायला मी आतुर झालो आहे. भाजपला आतच बिहार मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. निदान त्या दृष्टीने तयारी म्हणून तेथील राजकीय घडामोडीतून स्वतःच्या फायद्याचे राजकारण पडद्याआड शहा करू शकतात. माझ्यामते ह्यावेळीही बहुमत कोणत्याही पक्षाला मिळणार नाही तेव्हा पुढचे पाढे पंच्चावन्न
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/08/2015 - 19:16 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
स्वाती२ Sat, 02/07/2015 - 20:19 नवीन
विश्लेषण आवडले.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sat, 02/07/2015 - 21:02 नवीन
दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे दिसत आहेत. दुसर्‍या संधीचे तरी त्यांनी सोने करावे अशी अपेक्षा. पहिली संधी गमावल्यामुळे विश्वासार्हता गेली ती पुन्हा प्रचंड प्रयत्नांनी मिळवता आली. पण हे पुन्हा पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे नीट कारभार करावा लागेल. म्हणजे भाजपाला धाक राहिल आणि त्यांना काहीतरी ठोस करून दाखवावे लागेल. सध्या नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे वाटावे अशी परिस्थिती आहे. मोदींचा नामांकित सूट वगैरे दिखाऊपणा आता नको वाटू लागला आहे. सामान्य लोकांपर्यंत पोचणारा चांगला बदल हळूहळू दिसायलाच हवा. हनीमून संपायला हवा. काँग्रेसचा धुव्वा उडणार हे अपेक्षित होतेच. पण आता आप आणि भाजपा ह्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्याकरता का होईना शीला दीक्षित, कलमाडी, राज, जमाईराजा आणि ह्या माळेतले अन्य मणी ह्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करायला सुरवात करावी. तसे झाले तरच काँग्रेसचे उच्चाटन होईल नाहीतर पुन्हा उत्थापन होईल.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 02/09/2015 - 06:39 नवीन
दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे दिसत आहेत. दुसर्‍या संधीचे तरी त्यांनी सोने करावे अशी अपेक्षा. पहिली संधी गमावल्यामुळे विश्वासार्हता गेली ती पुन्हा प्रचंड प्रयत्नांनी मिळवता आली. पण हे पुन्हा पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे नीट कारभार करावा लागेल. सहमत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुळ लेखात क्लिंटन यांनी म्हटल्याप्रमाणे केजरीवाल यांना सगळ्या सहकार्‍यांना प़क्षाशी बांधून ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सुजित पवार Sun, 02/08/2015 - 03:39 नवीन
आप, सप, जनता द्ल, MIM, या सर्वानि जवळ जवळ एक्त्रित येउन हि निवद्नुक लढलि आहे... या सर्वाना आत कसहि करुन BJP ला रोखायच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 02/08/2015 - 03:39 नवीन
एक वर्तूळ पूर्ण व्हायच्या मार्गावर असल्याचं दिसतय. लोकशाहीचा रथ दौडत निघालाय. दिवसेंदिवस अधिक परिपक्वतेकडे जाण्याचा कल दिसतोय तिचा. इंग्रजी राज्य गेलं. लोकशाही आलि. पण हे नेमकं काय आहे हेच लोकांना माहित नव्हतं. या नव्या राज्यव्यवस्थेत सत्ताप्राप्ती अजीबात अवघड नव्हती. म्हणुन तिची प्रायोरिटी देखील नव्हती. तेंव्हा सर्वप्रथम लोकसहभागाची आवष्यकता होती. गेल्या ६ दशकात हा लोकसहभाग चांगल्यापैकी अचिव्ह झाला. हा लोकसहभाग जसा जसा वाढत गेला तसं तसं सत्ताप्राप्ती आव्हानात्मक बनत गेली. केवळ लोकसहभाग आणि सत्ता पुरेशी नसुन लोकांच्या सुखी जीवनाच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार हि नवि मागणी आकाराला येऊ लागली. व त्याला उत्तर द्यायला विशिष्ट तत्वज्ञानाधारीत राजकीय प्रवाहं समोर येऊ लागले. साम्यवाद, समाजवाद, परंपराप्रीयता, भाषीक व प्रादेशीक अस्मीता वगैरे आपापल्या पद्धतीने सत्ता व समृद्धीची सांगड घालायचा प्रयत्न करु लागल्या. या सर्व प्रयोगातुन अगदी सुरुवातीला जे लोकसहभागाचं टार्गेट अचीव्ह करायचं होतं ते झालं. पिढीजात चालुन येणारं सत्तांतर बंद झालं, व पूर्ण लोकसहभातुन सत्ताप्राप्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. धर्माधारीत राजवटीपेक्षा लोकसहभागाधारीत राजवटीवर विश्वास ठेवणारे सर्व अल्पसंख्यांक, बर्‍यापैकी लवचीक बहुसंख्यक, समाजातले दोष जाळायला आपल्या जीवनाची होळी करणारे समाज सुधारक, विज्ञानाचं महत्व उमगलेले पुढारी अशा अनेकांच्या प्रयत्नाने लोकशाही देशात चांगली रुजली. आता दुसरा अंक आकाराला येतोय कि काय असं वाटायला लागलय. विभीन्न तत्वज्ञानाधारीत राजकीय पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण का करु शकल्या नाहित? कदाचीत त्या तत्वज्ञानंच्या मर्यादा असतील, त्या पक्षातील लोकांच्या मर्यादा असतील, झपाट्याने बदलणारं विज्ञानयुग कारणीभूत असेल... काहि का असेना, पोकळी जाणवतच राहिली. आपसारख्या पक्षाच्या उदयाची हि नांदी असावी. कुठल्याही तत्वज्ञानावर अधारीत नसलेला व केवळ समोर दिसणार्‍या समस्या सोडवण्याचं वचन देणारा हा पक्ष लोकांना बराच आवडलेला दिसतोय. त्या पक्षातल्या लोकांच्या उणिवा पक्ष संवर्धनाला आघात करत गेल्या हे खरं असलं तर तो पक्ष मूळ धरुन तगलाच. आता हिच कहाणि पुढे सरकणार काय? सरकली तरी कशी असेल ति? आज ना उद्या त्या पक्षाचं स्वतःचं तत्वज्ञान तयार होणारच. त्याशिवाय हा पक्ष एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वाढु शकणार नाहि. फक्त या तत्वज्ञानात सो कॉल्ड सर्वधर्मसमभाव, साम्यवाद आणि समाजवादाचे समाजाला भिकेचे डोहाळे लावणारे अर्क न उतरो म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 02/08/2015 - 09:33 नवीन
आवडला प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
व
विकास Sun, 02/08/2015 - 17:40 नवीन
प्रतिसाद आवडला आणि सहमत... सध्या मला सावरकरांनी केलेली "क्रांती" या शब्दाची व्याख्या आठवते आहे: "गतीशून्य माणसाच्या किंवा कुजू पहाणार्‍या राष्ट्राच्या पायात बद्ध असलेल्या शृंखला, प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्‍या आवाजाला क्रांती असे म्हणतात." (तुर्तास काँग्रेसमुक्त भारत ही प्रगतीची सुरवात समजत आहे. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
नाखु Mon, 02/09/2015 - 06:18 नवीन
राजकारणावरचा धागा असूनही चांगल्या विवेचनात्मक मुद्देसूद प्रतिसादांनी सजलेला धागा. अलिकडची एक चांगली चर्चा (आणि हा ओघ असाच रहावा ही इच्छा ) सकाळचे १०.४५ झाले आहे ऐकूया समूह गान "हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 08:40 नवीन
या सर्व प्रयोगातुन अगदी सुरुवातीला जे लोकसहभागाचं टार्गेट अचीव्ह करायचं होतं ते झालं. पिढीजात चालुन येणारं सत्तांतर बंद झालं, व पूर्ण लोकसहभातुन सत्ताप्राप्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला.
लोकसहभागावरून आठवले. यावेळी आआपने मोहल्ला समित्यांवर विशेष भर दिला नव्हता.तो मागच्या वेळी होता. मोहल्ला समिती ही संकल्पना ती एक सूचना करणारी यंत्रणा असेल तरच योग्य आहे असे वाटते. त्या व्यतिरिक्त अधिकार मोहल्ला समित्यांना देणे (विशेषतः पैसे खर्च करायचे) मला तरी अजिबात मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 02/09/2015 - 17:38 नवीन
प्रशासनाशी मोहल्लासमित्या अधिकृतपणे जोडल्या जाण्याचा केजरीसाहेबांचा मूळ प्लॅन मलापण अजीबात नाहि पटला. इथे लोकसहभाग म्हणजे लोकांना मतदानाचं महत्व कळणे व त्यांनी सत्तास्थापनेच्या प्रोसेसमधे त्याचा उपयोग करणे या अर्थाने म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ख
खटपट्या Sun, 02/08/2015 - 04:28 नवीन
सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे कठीण. केजरीवालांनी ५ वर्षे राज्य करून दाखवले पाहीजे (जे कठीण वाटतंय). यावेळेला जर आआप ला सत्ता मिळाली आणि त्यांना ती टीकवता आली नाही तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. कदाचित भाजप धूरीणांना हेच हवे असेल की सत्ता आआप ला मिळावी आणि ती अंतर्गत कलहामुळे कींवा अन्य कारणामुळे जास्त दीवस चालू नये. पुढे काय होतंय हे पहाणे मनोरंजक असेल.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Mon, 02/09/2015 - 10:36 नवीन
सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे कठीण. केजरीवालांनी ५ वर्षे राज्य करून दाखवले पाहीजे (जे कठीण वाटतंय). प्रचंड सह्मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/08/2015 - 04:41 नवीन
मस्तं विवेचन. आआप येउ दे नाही तर भाजपा. पळपुटेपणा केला नाही म्हणजे मिळवलं. देशाच्या राजधानीला एवढे दिवसं स्थिर सरकार नसणं ही शरमेची गोष्टं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 02/08/2015 - 04:49 नवीन
दिल्ली निवडणूका तोंडावर आल्यानंतर भाजपने चाली केल्या.पण निवडणूक होणारच अाहेत,त्यासाठी मोर्चेबांधणी,पक्षातली अंतर्गत वाद,यातल्या कुठल्याच गोष्टीवर भाजपने फारसे गांभीर्याने काम केल्यासारखे वाटले नाही.किरण बेंदींसारखे चमको नाव शेवटी अाणून दाखवणे यापलिकडे भाजपची लोकसभेच्या वेळेसारखी किलर रणनीतीही दिसली नाही. केजरीवाल आरंभशूर ठरु नये ही अपेक्षा!नाहीतर दिल्लीकरांना असमानसे गिरे,खजूरपें अटके चा प्रत्यय नक्कीच येईल!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 02/08/2015 - 05:24 नवीन
कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, आक्रमण करण्यापूर्वी वाघ जसा दोन पाऊले मागे जातो तसे केले आहे, प्रचार आणि पैसा दोन्ही ही खर्च केला नाही. याचा वापर पुढच्या लोक सभेच्या निवडणूकीत कॉंग्रेस भरपूर करेल आणि दिल्लीत ही पाच वर्षानंतर पुन्हा पुढे १५ वर्षे तरी राज्य करेल. या निवडणूकीत एका वोट ची किंमत हजार रुपये होती. आमच्या उत्तम नगरच्या आपच्या उम्मेद्वाराच्या गोदामातून ८८०० बाटल्या पोलिसांनी जब्त केल्या तरी ही दारू वाहत होती. बहुतेक निवडणूक जिंकेल. बाकी: गेल्या वर्षी आमच्या गल्लीत (२० घरांपैकी ६ वीज चोरी करताना पकडल्या गेले होते. त्यांचे वोट आपलाच गेले. अनधिकृत कोलोनितले सर्व घर मलिक (दिल्लीतले ७०% मतदाता अनिधिकृत कोलोनीत राहतात) जे भाडेकर्यांकडून १० रुपये युनिट घेतात आणि वीज ही चोरी करतात, आता पाणी चोरी ही सुरु केली आहे. संपती कर इत्यादी सर्व प्रकारच्या करांमध्ये घट येईल. सर्व प्रकरचे कार्य बंद पडतील. उदा. दिल्लीत १२००० बसेस ची गरज आहे, सध्या ५५०० बसेस आणि ३००० मिनी (निजी १६ SEATER ज्यात ४० लोक भरले जातात), नव्या बसेस येणार नाही. बाकी सर्वांचे खापर केंद्र सरकार वर फोडून अराजकता माजविली जाईल. आणि याचा फायदा कॉंग्रेस पक्ष घेईलच यात नवल नाही. कारण आम्ही भ्रष्ट असलो तरी कारभार आम्हाला करता येतो. किरण बेदी आल्यावर ईमांदारीचे राज्य येईल , जे कुणालाच नको होते. दिल्ली विजयाचा उपयोग केजरीवाल, देशात अस्थिरतेचे वातावरण पसरविण्या साठी करतील. जो प्रधानमंत्री राजधानी सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 02/08/2015 - 05:36 नवीन
पटाईत साहेबांशी सर्वार्थाने सहमत. यानी टॅक्स बंद वगैरे सारखी आंदोलने नाही केली म्हणजे मिळवली. बाकी फुकटच्या गोष्टीमुंळे लोक लिथर्जिक होतात असे माझे वैयक्तिक मत. त्यामुळे फुकट गोष्टी देण्यापेक्षा त्या जनतेला थोड्या कमी किमतीत देण्याचा मार्ग मला पटतो. तसेच एक विशिष्ठ मर्यादेच्यावरचा वापर अशा सब्सिडाईझ्ड गोष्टीचा झाला तर मर्यादेच्यावरील सर्व मात्रा ही पूर्ण बाजारभावाप्रमाणेच दिली जावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
प
पिंपातला उंदीर Sun, 02/08/2015 - 05:51 नवीन
जो प्रधानमंत्री राजधानी सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार. हे विधान अनावश्यक आहे असे वाटते. एका सम्भाव्य पराभवाने कुठला नेता छोटा होत नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विवेकपटाईत Sun, 02/08/2015 - 06:49 नवीन
आपण कांग्रेसच्या दृष्टीकोनातून विचार करा - त्यांना चांगला मुद्दा सापडला आहे, हे निश्चित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
प्रतापराव Sun, 02/08/2015 - 17:00 नवीन
https://twitter.com/timesofindia/status/561391518863216641
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा