Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

क
क्लिंटन
Mon, 02/09/2015 - 14:11
🗣 163 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

प्रतिक्रिया द्या
37758 वाचन

💬 प्रतिसाद (163)
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 05:15 नवीन
किरण बेदी दुसर्‍या फेरीतसुद्धा पिछाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 05:18 नवीन
कुणीतरी किरण बेदी यांच्याबद्दल समर्पक विशेषण वापरल होत . Parachute Leader .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 05:21 नवीन
तिसर्‍या राऊंडमध्येसुद्धा किरण बेदी पिछाडीवर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:22 नवीन
आआपच्या झंझावातात भाजप पालापाचोळ्यासारखा उडून गेला असे चित्र आहे. या निकालाचे अन्वयार्थ पुढीलप्रमाणे: १. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडगोळी अजिंक्य आहे या कल्पनेच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. २. एप्रिल-मे २०१४ मध्ये पक्षाला लोकांनी भरभरून मते दिली ती नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान होतील या आशेवर दिली होती. साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या नेत्यांनी लोकांची मते त्यांच्या विचारांना होती असा त्याचा अर्थ घेऊन कट्टर हिंदुत्वाचा प्रचार केला.नरेंद्र मोदींना ही गोष्ट फारशी आवडलेली नाही अशा बातम्या आहेत पण त्यांनी अशा तत्वांविरूध्द तितक्या प्रमाणावर assertiveness दाखविलेला नाही.यातून असा अर्थ निघू शकेल की एकतर नरेंद्र मोदींचा स्वत:चा त्याला पाठिंबा आहे नाहीतर नरेंद्र मोदी जितके बलदंड नेते आहेत हे चित्र उभे केले होते तितके प्रत्यक्षात ते नाहीत-- शेखर गुप्ता एन.डी.टि.व्ही वर बोलताना म्हणाले. नरेंद्र मोदींना ही परिस्थिती बदलायला हवी. ३. बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) मध्ये अंतर्गत भांडणे आहेत.अशा बातम्या आहेत की भाजप जीतनराम मांझींना आपल्या कळपात घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता अशा बाहेरच्या मंडळींना बरोबर घेणे धोक्याचे आहे हे समजून भाजपने तसे काही करण्यापेक्षा जनता दलात जी काही भांडणे चालू आहेत ती मजा बाहेरून बघावी आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुकांना आपल्याच हक्काच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जावे. ४. आम आदमी पक्षानेही दिल्लीत झाले ते सगळ्या भारतात होईल असे काही समजू नये.त्या अर्थाने दिल्ली बहोत दूर है. पंजाबमध्ये चार लोकसभा जागा जिंकूनही आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकांमध्ये अनामत रक्कम गमावली होती हे विसरू नये.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:30 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ७० आआप: ५९ (+३१) भाजप: १० (-२२) कॉंग्रेस: ० (-८) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. भाजप १९९८ पेक्षाही खाली आटपणार असे दिसते. लोकसभेत भाजपला ६० जागांवर आघाडी तर आआपला १० जागांवर आघाडी असे चित्र होते.हे चित्र बरोबर उलटे होणार असे दिसते.या प्रचंड मोठ्या पराभवानंतर भाजपने कारभारात सुधारणा कराव्या ही अपेक्षा. १९८४ मध्ये लोकसभेत मोठा पराभव झाल्यानंतर तीन महिन्यातच रामकृष्ण हेगडेंनी कर्नाटक विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या.दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाला हेगडेंच्या १९८५ मधील विजय हेच एक समकक्ष उदाहरण आहे असे दिसते.एन.डी.टी.व्ही वर तेच म्हटले जात आहे. कॉंग्रेसला व्हाईटवॉश मिळताना दिसत आहे. कॉंग्रेस मुख्यालयासमोर "प्रियांका लाओ देश बचाओ" अशा घोषणा चालू आहेत.तसे झाल्यास कॉंग्रेसला तात्पुरती का होईना नवसंजीवनी मिळेल आणि राजकारणाला नवे वळण लागेल असे दिसते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/10/2015 - 05:44 नवीन
बहुतांशी लोक अरविंद केजरीवालला वेडा म्हणत होते आज त्यांना नाक नसेल राह्यलं काही बोलायला... अभिनंदन कजरीवाल साहेब. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 05:45 नवीन
+१ केजरीवाल, आआप व दिल्लीकरांचे स्पष्ट बहुमताबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टिल्लू Tue, 02/10/2015 - 05:46 नवीन
हॅट्स ऑफ टू केजरिवाल !!!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:48 नवीन
भाजपने प्रचारात एक मोठी चूक केली.केजरीवालांना टारगेट करून अरविंद केजरीवाल हे नाव कायम प्रकाशझोतात ठेवले.इतकी वर्षे नरेंद्र मोदींना असे टारगेट केल्यामुळे लोक नरेंद्र मोदी हे नाव कधीच विसरणार नाहीत याची तरतूद मोदी विरोधकांनी करून ठेवली होती आणि त्याचा फायदा नरेंद्र मोदींनाही झाला.नेमकी तीच चूक भाजपने केली.म्हणजे आआपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू केजरीवाल आणि भाजपच्या प्रचाराचाही केंद्रबिंदूही केजरीवालच.म्हणजे ही निवडणुक केजरीवालांभोवती फिरत राहिली.आआपला त्याचा फायदा नक्कीच झाला असे दिसते.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:49 नवीन
या निकालाला लोकसभा निवडणुकांच्या निकालाशेजारी ठेवले तर काही समान मुद्दे दिसतात: १. लोकप्रिय नेता असेल तर त्या नेत्याच्या नावावर मते फिरवता येतात. २. अशा नेत्याने लोकांच्या अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या तर असा नेता सत्तेत असलेल्या सरकारपेक्षा लोकांना अधिक चांगला वाटतो आणि लोक भरभरून मते देतात. पण त्यानंतर जर नेत्याने स्वत:हून वाढवून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असे चित्र असेल तर मात्र जनमत ज्या वेगाने त्या नेत्याच्या बाजूने गेले त्याच्या दुप्पट वेगाने त्या नेत्याच्या विरोधात जाऊ शकते.केजरीवालांना काही महिन्यांनी यालाच सामोरे जायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अशा नेत्यांचा पराभव झाला तर नंतर मात्र राजकारणी पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा कितपत वाढवायच्या यावर स्वत: लगाम घालतील.भारतीय राजकारणासाठी ही एक चांगली गोष्ट असेल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:49 नवीन
अर्थात आताचे मॅन ऑफ द मॅच निर्विवादपणे अरविंद केजरीवाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 05:51 नवीन
भाजप का हारल आणि आप का जिंकल - १) दिल्ली च्या निवडणुकी मध्ये स्थानिक मुद्दे शिवाय राष्ट्रीय मुद्दे पण महत्वाचे होते . मोदी सरकारच्या हनिमून पिरीयड मध्ये भाजप ने महाराष्ट्र , हरियाना आणि इतर निवडणुका पण जिंकल्या . पण आता ९ महिन्यानंतर बरीच धूळ बसली आहे . मोदी सरकार अपेक्षे इतक काम करत नाहीये हि भावना आता हळूहळू देशभर मूळ धरू लागली आहे . त्यामुळे त्याचा फटका भाजप ला बसला . २) साध्वी , स्वामी , योगी , घरवापसी , लव जिहाद , हा कोळसा जितका कमी भाजपवाले उगाळतील तितक बर . लोकसभे मध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मोदी यांना मत दिली होती . पण मोदी विजयाचा विहिप , बजरंग दल या लोकांनी आता आपल्याला रान मोकळ असा लावला त्यामुळे मध्यममार्गी जनमानस भाजप च्या विरुद्ध गेल . ३) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी भाजप ने काळा पैसा वापस आण्याच जे आश्वासन दिल तो एक प्रचारात वजन आणण्यासाठी वापरलेला एक निव्वळ 'जुमला ' होता अस विधान केल . ते भाजप ला जाम भोवल . सोशल मिडीयावर या विधानावरून अमित शाह आणि मोदी यांची जाम टर उडवण्यात आली . आप ने या मुद्द्याचा वापर कौशल्याने करून भाजप निवडणुकीतली आश्वासन पाळण्यात गंभीर नाही हे लोकांच्या मनावर ठसवल . ४) भारतीय लोकांना underdog च आकर्षण असत . आप ने कौशल्याने असे चित्र उभ केल की एकट्या मफलर मन विरुद्ध पंतप्रधान , अर्ध केंद्रीय मंत्रिमंडळ , ४ मुख्यमंत्री , १२० खासदार दिल्लीच्या गल्लीबोळात प्रचार करत आहेत . त्यामुळे एकहाती लढा देणाऱ्या केजरीवाल च्या बाजूने जनमत एकवटले . ५) सोशल मिडिया जिथे भाजप मजबूत होत तिथे पण आप ने बाजी मारली . पंतप्रधान यांनी घातलेला १० लाखाचा सुट वैगेरे मुद्द्यावरून त्यांनी भाजप हा श्रीमंत लोकांचा पक्ष आहे अशी इमेज व्यवस्थित उभी केली . ६) किरण बेदी यांच parachute नेतृत्व . या बाईनी भाजप च्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली नाही . नंतर नंतर तर त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत व्हयला लागली . आलिया भट ची आणि किरण बेदी ची तुलना करणाऱ्या क्लिपा मोबाइल वर फिरू लागल्या होत्या . या बाई विधानसभेला पडल्या तर ते त्यांच्यासाठीच बर राहील . कारण १० -१२ भाजप विधायकांसोबत त्या विधानसभेत काय करणार हाच प्रश्न आहे . ७) हा पराभव भाजप च 'स्तालीनग्राद ' ठरू नये . कारण मोदी आणि शाह जोडगोळी अजेय नाही हा संदेश लोकांमध्ये आणि विरोधकांमध्ये गेला आहे .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/10/2015 - 07:14 नवीन
+ १ + दिल्ली भाजपमध्ये--- विशेषतः स्वार्थी राजकारणामुळे--- जितकी अंतर्गत फूट आहे तितकी ती भारतात इतर कुठल्याच ठिकाणी नसावी. यामुळे छुप्या रितीने मते आपकडे वळवून मुख्यमंत्री उमेदवार बेदी आणि तसा उमेदवार लादणार्‍या मध्यवर्ती भाजप नेतृत्वाचे नाक कापण्याचे प्रयत्न झाल्यास आश्चर्य नाही. आपच्या भूकंपी विजयामध्ये या वस्तुस्थितीचा सहभाग नक्की आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/10/2015 - 07:51 नवीन
यावरून काही अक्कल शिकण्याइतकी बुद्धी संबद्धीत लोकांत असावी हाच आशावाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विलासराव Tue, 02/10/2015 - 05:52 नवीन
अपेक्षीत निकाल. भाजपने आता बोगस गप्पा बंद करुन खरच अच्छे दिन कसे येतील ते पहावे. वाचाळपणा करण्यापेक्षा जे काही चांगले करता येण्यासारखे असेल ते करावे. तुमचे तोंड बंद ठेवा,कामाला बोलु द्या. आंधळ्या समर्थाकांनीही साधक-बाधक विचार करावा. कल्पना आणी वास्तव काय आहे याचा विचार करावा. आपकडुन मलातरी अपेक्षा आहेत. पाहुया प्रत्यक्ष काय होतय ते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/10/2015 - 05:55 नवीन
मी राजकारण आकडेवारीच्या माध्यमातून न अभ्यासता वर्तनाच्या माध्यमातून पहातो. त्यानुसार राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मायावती, मुलायम सिंग , लालूप्रसाद ,शरद पवार व गांधी घराणे ,जयललिता याना राजकारणात आणून भारतीय मतदारानी वेळोवेळी फार मोठी चूक केली आहे व किंमत मोजली आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे. आता केजरीवाल हे जिकणार. ममतांसारखे जबरदस्त पणे जिकणार , मोदींसारखी लाट आणून जिंकणार हे नक्की. पंण ही माणसे वरील यादीपेक्षा बरी आहेत असे माझे मत झाले आहे. भारतात केमाल पाशांसारखे नेते होणे ही अपेक्षाच नाही. भारतातील राजकारण वर्ग व्यवस्थेकडे वळविण्या ऐवजी ते वर्ण व जातीव्यवथेकडे कसे जाईल याचीच काळजी १९५० च्या सुमाराला घेतली गेली आहे. सबब इथे प्रत्येक धर्माला सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे वागण्यास वाव मिळाला आहे. हेल्मेट सक्ती सारक्या गोष्टीतही धर्म डोकावलेला आहे तर एकपत्नी पणाची बातच सोडा ! अशा वेळी केजरीवालनी एका समुदायाच्या धर्मगुरूचा पाठिंबा नाकारून इतिहास घडविला आहे. मात्र सिंहासन हे आलीशान असले तरी मुकुट काटेरी असतो याचे भान त्यानाही येईल. त्यावेळी त्यांच्या खरी परीक्षा होईल. मोदी त्या परीक्षेत नापास झाल्याचे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 02/10/2015 - 06:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 06:48 नवीन
नुकताच Whats App वर आलेला एक विनोद - मोदी यांनी केजारीवालाना फोन करून त्यांच अभिनंदन केल आणि त्यांना आपल्या टेलर चा पण नंबर दिला *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 06:05 नवीन
लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६२, भाजप: ७ आणि इतर: १. कॉंग्रेसला मागच्या वेळी ८ जागा मिळाल्या होत्या.भाजपा यावेळी आठपेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत हा दैवदुर्विलास दिसतो. इतक्या प्रचंड विजयाची अपेक्षा खरोखरच कोणीच केली नसेल. तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:06 नवीन
>>> तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे. १९९१ मध्ये अद्रमुक-काँग्रेस युतीला २३४ पैकी २३३ जागा मिळाल्या होत्या. द्रमुकला मिळालेल्या एकमेव जागेवर करूणानिधी निवडून आला होता. त्या जागेचाही नंतर राजीनामा दिला होता. २०१० मध्ये बिहार विधानसभेत भाजप-संजद युतीला २४३ पैकी २०६ जागा (८४%) मिळाल्या होत्या. काही पूर्वोत्तर राज्यांमध्ये स्थानिक पक्षाला ८०% हून अधिक जागा मिळाल्याची उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 08:09 नवीन
आणि हरियाणामध्येही १९८७ मध्ये लोकदल+भाजप युतीने ९० पैकी ८५ जागा जिंकल्या होत्या. तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंटने ३२ पैकी ३१-३२ जागा २००४ आणि २००९ मध्ये जिंकल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वेल्लाभट Tue, 02/10/2015 - 06:10 नवीन
काहीही आहे हे ! अरे मुख्यमंत्री झाल्यावरही लहान मुलासारखा आंदोलनरुपी हट्ट करणा-या, पुढे सत्ता सोडणा-या अविचारी माणसाला कसं काय बहुमत मिळू शकतं? कमाल आहे. महाराष्ट्रात टोकाचे का होईना पण सुविचार मांडणा-या नेत्यालाही पूर्ण बहुमत न मिळावं; याचं कुठेतरी वाईट वाटतं. आता बघूच. किती दिवस टिकतंय आणि काय करतंय.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 06:18 नवीन
लाखो दिलों की धडकन और आदर्श विनोद कुमार बिन्नी ९००० मतांनी पिछाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 02/10/2015 - 06:22 नवीन
आआपचे अभिनंदन, केजरीवाल आतातरी शहाणपणाने वागतील ही अपेक्षा. काँग्रेसी गवत उपटून टाकल्याबद्धल दिल्लीवासीयांचे अभिनंदन. मोदी-शहा-भाजपचे सांत्वन, बिहारसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 02/10/2015 - 06:22 नवीन
जाम खूष झालो मी. गेल्या ५ वर्षात भारतातले मतदार खूपच बदलले आहेत आणि त्याचे थोडे श्रेय केजरीवाल ला पण आहेच.
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Tue, 02/10/2015 - 06:24 नवीन
अरविंद केजरिवाल आणि आपचे हार्दिक अभिनंदन!!! जे लोकसभेत मोदींसाठी झालं तेच आज आप साठी झालं... संपुर्ण बहुमत. ह्यातुन जनतेचखुप मोठ्या अपेक्षाच दिसुन येतात.. पुढिल ५ वर्षांसाठी हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 02/10/2015 - 06:27 नवीन
श्री केजरीवाल आता दिलेल्या वचनांची पुर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागतील. ती मिळाली नाही की त्यांच्या नावाने ओरडतील. आता बिहारमधे तेच चालले आहे.... कालच्या लोकसत्तेतील अग्रलेख वाचावा. जनतेला "फुकट काही मिळत नसते'' हे जेव्हा कळेल तो सुदीन. अर्थात ते कळणार नाही हेही निश्चित... :-) पण भाजपने कटू असले तरी अर्थशास्त्र दोरीवर वाळत टाकू नये. नाहीतर अर्थव्यवस्थेची वाट लागलीच समजा...... आणि त्यांना धडा मिळाला हेही एका अर्थाने बरेच झाले असे मला वाटते....
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 02/10/2015 - 06:29 नवीन
प्रखर हिंदुत्वाचा वाचाळपणा, मोदिंनी दिलेली अवास्तव आश्वासनं, निगेटीव्ह प्रचार, किरण बाई... इ. सर्व घटक मिळुन सुद्धा आप ला ६२ जगांचा पुश देऊ शकत नव्हत्या. मग उरलं एकच कारण... लोकांना यंदा केजरीवाल सीएम म्हणुन हवा'च' होता. भाजपला इतक्या कमि वेळात प्रतिकेजरीवाल तयार करता आला नाहि ( ते फारसं शक्य देखील नव्हतं) अन्यथा केजरीवालशिवाय आपलं काहि अडत नाहि हा विश्वास तरी वाटायला हवा होता लोकांना... ते ही नाहि जमलं मोदिंना. आता जे मोदिंबद्दल खरं तेच केजरीसाहेबांबद्दलही. त्यांनी जेव्हढी वचनं दिली त्याच्या वास्तवीक शक्यतेएव्हढं काम केलं तरी पुरे. अभिनंदन एण्ड ऑल द बेस्ट केजरीवालजी.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 06:34 नवीन
लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६६, भाजप: ३ आणि इतर: १. आम आदमी पक्ष एकटाच ७० जागा जिंकणार आणि इतर सगळ्यांचा व्हाईटवॉश करणार की काय? इतके प्रचंड बहुमत मिळणेही वाईट.
  • Log in or register to post comments
आ
आदित Tue, 02/10/2015 - 06:34 नवीन
केजरीवाल यांनी निवडणूकीअाधी त्या ४९ दिवसानंतर दिलेल्या राजीनाम्याबद्दल जनतेची माफी मागितली अाणि जनतेने त्यांना एक चान्स दिला. याबरोबरच बीजेपीची अांधळी-कोशिंबीरही कारणीभूत अाहे. त्यापलीकडे याला महत्त्व देणं म्हणजे बेडकीला बैल केल्यासारखे अाहे. केजरीवाल अाता डोेकं ताळ्यावर ठेवून काम करतील ही अपेक्षा... पण ले़फ्टीस्ट मिडिया अाणि अापवाले यातून अाक्रस्ताळेपणाचं प्रदर्शन करतील हेही नक्की...
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Tue, 02/10/2015 - 06:40 नवीन
भाजपाला दणदणीत ४ जागा मिळत आहेत, श्रीगुरुजींचे दणकून हाभिनंदन :ROFL:
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 02/10/2015 - 07:07 नवीन
खांग्रेसला एकही नाही. तुमचेही अभिनंदन. बाकी इतका कुजकटपणा नाही हं करायचा. तुम्हाला देवबाप्पाने शिक्षा दिली बरे. भाजपाच्या जागा तुम्ही सांगितल्यापेक्षा ५०% ने वाढलेल्या दिसत आहेत आता. ६ जागांवर पुढे आहे. हाहाहाहा. नमो आणी अमित शहांचा अवाजवी भपकेपणा नडला त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:10 नवीन
तुमचंही अभिनंदन नानासाहेब (काँग्रेसला भोपळा मिळाल्याबद्दल)! आज तुमच्या घरावर लाईटिंग असेल ना आणि तुम्ही आणि माई ठेवणीतला कोट-टोपी, पैठणी, नथ वगैरे घालून सत्यनारायण घालणार असाल ना!!! :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
म
मृत्युन्जय Tue, 02/10/2015 - 08:12 नवीन
म्हणजे अर्धांग कोट आणी अर्धांग पैठणी असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला गुर्जी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 02/10/2015 - 06:42 नवीन
आप निवडून येत असताना शेअर बाजार २५०/७५ (सेन्सेक्स/ निफ्टी) ने वर आहे हे कशाचे द्योतक आहे?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/10/2015 - 07:28 नवीन
दिल्लीच्या "स्थानीक" निवडणूकीचा शेअर बाजारावर फारसा परिणाम पडत नाही. गेले काही दिवस (आणि विशेषतः काल) खाली गेलेल्या किंमतींमुळे स्वस्त झालेल्या समभागांची खरेदी होत असल्याने बाजार वर गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मित्रहो Tue, 02/10/2015 - 06:44 नवीन
अरविंद केजरीवालांचे अभिनंदन व्होट शेअर बघितला तर भाजपाचा व्होट शेअर फार कमी झालेला नाही आहे. तो अजूनही ३२.५% जवळ जवळ आहे. संपूर्ण निकालानंतर निश्चित आकडे कळतील. म्हणजे इतरांनी एकगठ्ठा आआपला मतदान केले. काँग्रेस फकत ८% वर घसरली आहे सध्यातरी.इतरही मागे सरले. ७० पैका ६५ जागांवर निवडून आल्यावर अपेक्षा पूर्ण करणे कठीण असते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 02/10/2015 - 06:58 नवीन
मी खरे तर निकाल आल्या आल्या पहिला प्रश्न मित्राला हाच विचारला होता. व्होटे शेअर काय आहे? काँग्रेसने आपली सागळी ताकद 'आप'च्या मागे उभी केली आहे असे सकृतदर्शनी दिसत आहे. बाकी क्लिंटनसारख्या जाणकारांच्या विश्लेषणाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
आ
आनन्दा Tue, 02/10/2015 - 07:06 नवीन
http://zeenews.india.com/delhi-assembly-elections-2015/results#Voteshare
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मित्रहो Tue, 02/10/2015 - 07:37 नवीन
चित्र भयंकर बदलेय आआप 73% गेल्या कित्येक वर्षात हे दिसले नव्हते भाजपा १९.४ इतरांचे हाल विचारुच नये. म्हणजे ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत भाजपाल मत दिले तेही आता आआपकडे वळले. याचे कारण फक्त बेदी नाहीत. ही विचार करण्यसारखी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 02/10/2015 - 11:20 नवीन
नाही हो. ती लिन्क गंडली होती बहुतेक. आता लेटेस्ट पहा. काँग्रेसने आपला वॉकओव्हर दिला आहे असेच दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 06:52 नवीन
हा फक्त प्रामाणिक पणाचा विजय नसुन एका विश्वासाचा हे विजय होणार आहे. आणि जनतेनेही लगेच एका दिवसात कांडी फिरावी तशी अपेक्षा करु नये. या वेळॅस अरविंद केजरीवाल यांनी योग्य रीतीने प्रचार केला आणि मुद्देसुद प्रचार केला या बद्दल अभिनंदन. भारतीय राजकारणात मुद्देसुद प्रचार करुन आपले विचार जनते पर्यंत योग्य पोहचवु शकतो हे अरविंद जींनी दाखवुन दिले. त्यांचे अभिनंदन. आणि एक खास झाले कॉन्ग्रेस ए प्रचारात न उतरवुन आप ला मदत केली असे म्हणण्याची सोय ही आप ने मागे ठेवली नाही हे बरे झाले.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/10/2015 - 06:52 नवीन
भाजप इतक्या कम्मी जागा घेईल असे कुणालाच वाटले नव्हते भाजप ४ , आ आ पा. ६४. भाजपला दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहिय्येत. जिंकले तर मोदी हरले तर बेदी.........ही भाजपची तयारीच सांगत होती की त्यांचे काय होणार आहे ते.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 02/10/2015 - 06:53 नवीन
अापला छप्पर फाडके विजय मिळाला. मतदारांनी भाजपला चांगलाच धडा शिकवला. - मतदारांनी निश्चितपणे प्रस्थापितांना नाकारलेले दिसते. मोदींच्या तथाकथित प्रतिमेचा काहीच परिणाम झाला नाही. अाप ही अाम अादमीला केंद्रस्थानी ठेवणारा पक्ष निवडून अाला. - अापचा विजय हा नव्या प्रकारच्या राजकारणाला दिलेली पसंती होय. त्याांनी राजकारणाचे नियमच बदलून टाकले. अाता इतर पक्षांनाही याच नियमांवर काम करावे लागेल. देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दिलासादायक अाहे. - केजरीवाल अाणि मंडळीना अाता ‘अराजक माजवणारे’ या प्रतिमेला पुसून काढेल असे काम करावे लागेल. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 02/10/2015 - 07:00 नवीन
नाहि. अगदी लोहिया वगैरे मंडळींपासुन ते नितीशकुमारने लालु यादवला पराजीत करेपर्यंत हेच कौतुक चालत आलय. डाव्यांना बंगालमधे पाणि पाजणार्‍या ममताबाईंना देखील असच मखरात बसवलं गेलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 02/10/2015 - 07:21 नवीन
प्रचाराच्या सांगतेदिवशी केजरीवाल यांना सकाळी टीव्हीवर दाखवले. तो माणूस एका साध्या सलून दुकानात केस कापायला गेला. मोदी, फडणवीस, पवार, भुजबळ, ठाकरे यांचं नख तरी सामान्य माणसाला दिसतं का कधी? एकदा मुख्यमंत्री होउन गेलेला माणूस कधी असा अॅप्रोचेबल पाहिला अाहे काय? - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 02/10/2015 - 15:47 नवीन
स्वतः फडणवीस, शिवराजसींग चौहान, पर्रिकर, स्व. साहेबसिंग वर्मा, लालु यादव... इतरही अनेक आहेत. मुख्यमंत्री होऊन गेलेला माणुस जर सामान्यांप्रमाणे सलुनमधे जाताना दिसला तर तो नवीन ट्रेण्ड सेटर कसा बनतो हे कळलं नाहि. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/10/2015 - 18:13 नवीन
अहो तो फडणवीस मुलीच्या शाळेत साधेपणाने गेला हे पाहीले नव्हते का? त्याची बायको साधेपणाने आर टी ओ च्या रांगेत जाऊन उभी राहीली माहीत नाही का? नाहीतर लगेच केजरीवाल यांची बायको रांगेत उभी राहीली की त्यांच्या साधेपणाचे ढोल वाजणे चालू होईल म्हणून आधीच नोंदवून ठेवले. साधेपणाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 07:00 नवीन
मागच्या वेळेस कॉंग्रेस ची आमदारसंख्या बघून इंनोवात मावतील अशी हेटाळणी केली गेली होती . आता भाजप चे आमदार रिक्षात बसून जातील बहुतेक . भाजप समर्थक ह. घेणे *biggrin*
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 02/10/2015 - 07:05 नवीन
डबलसीट गेले नाहीत म्हणजे मिळवले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा