प्रतिशब्द
"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…"
"यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?"
"अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. "
हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये. पण एवढंच सांगायचा प्रयत्न आहे कि आपली भाषा एवढी अवघड आणि दरिद्री नाही कि आपण आपल्या हाताने (तोंडाने) तिचा नाश करावा.
आज हे लिहावसं वाटलं कारण एक पुस्तक वाचता वाचता सावरकरांचा एक किस्सा वाचला. पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर यांचं "एका स्टुडीओचे आत्मवृत्त". या पुस्तकात मराठीतले मोठे दिग्दर्शक भालजी पेंढारकर (लेखकाचे वडील) यांनी कोल्हापुरात उभारलेल्या जयप्रभा स्टुडीओची कहाणी सांगितली आहे. त्याच्या सुरुवातीपासून घडलेल्या घडामोडी, तिथे बनलेले चित्रपट, किस्से, तिथली माणसं, तिथलं राजकारण अशा गोष्टींवर हे पुस्तक आहे.
त्यातला एक किस्सा असा. सावरकर हा स्टुडीओ पाहायला आले होते. पूर्ण स्टुडीओ बारकाईने पाहून झाल्यावर त्यांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण तिथल्या विभागांच्या पाट्या "एडिटिंग डीपार्टमेंट", "रेकॉर्डींग डीपार्टमेंट" अशी इंग्लिशमध्ये का आहेत असं विचारलं. त्यावर तिथल्या लोकांनी चित्रपट हि गोष्टच मुळात बाहेरून आलेली आहे आणि त्यातल्या संकल्पना सगळ्या बाहेरच्या आहेत असं स्पष्टीकरण दिलं. सावरकरांनी ताबडतोब त्यांनी पाहिलेल्या सर्व विभागांना "मुद्रण विभाग", "चित्रण विभाग", "संकलन विभाग", "दिग्दर्शन विभाग" असे प्रतिशब्द सुचवले. यातले बरेच शब्द आज प्रचलित आहेत, आणि आपल्या रोजच्या बोलण्यात जरी नसले, तरी चित्रपटातली नामावली, वर्तमानपत्रातल्या बातम्या, भाषणे, अशा ठिकाणी तरी यांचा वापर होतो.
सावरकरांचं मराठी भाषेतलं योगदान प्रचंड आहे. मुळात त्यांचे ऐतिहासिक, राजकीय विषयावर ग्रंथ, महाकाव्य पाहिले तर तीच कामगिरी खूप मोठी आहे. पण एवढ्यावर थांबतील ते सावरकर कसले?
भाषा हि शेवटी संवादाचं मध्यम असते. आणि ज्याचं राज्य त्याची भाषा प्रभावी ठरते. भारतात काही शतके मुगलांचा सुलतानांचा अंमल होता. त्यामुळे हिंदी मराठी या भाषांमध्ये उर्दू फारसी या सत्ता गाजवणाऱ्या लोकांच्या भाषांचा शिरकाव झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी पहिली तरी तो प्रभाव लक्षात येतो. पुढे इंग्रज आले तेव्हा इंग्लिश भाषेने आपली छाप आपल्या भाषांवर सोडली.
पण यामुळे मुळात सुंदर असलेली, "अमृतातेही पैजा जिंके" अशी आपली मराठी काही अंशी भ्रष्ट झाली.
सावरकर मोठे विद्वान आणि पंडित होते. त्यांची साहित्यातली आणि काव्यातली भाषासुद्धा (जयोस्तुते हे गीत आठवा) संस्कृतप्रचुर होती. सावरकरांनी मराठी शुद्ध करण्याचा विडा उचलून असे फारसी इंग्लिश शब्दांचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले, वापरात आणले.
मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टींचाही प्रभाव मोठा असतो. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पहिल्यांदा संबोधलं ते एका जाहीर सभेत आचार्य अत्रे यांनी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव रूढ झालं. प्रल्हाद केशव अत्रे यांनासुद्धा आचार्य अत्रे म्हणून संबोधलं ते सावरकर यांनी. जशी हि सहज म्हणून वापरलेली संबोधने रूढ झाली. तसेच त्यांनी दिलेले प्रतिशब्द सुद्धा रूढ झाले. इतके कि ते त्यांनी योजलेले शब्द होते हे हि आपल्याला माहित नसतं.
एका माणसाचं आपल्या मातृभाषेवर किती प्रेम असू शकतं ते पहा. त्यांचा आपली भाषा शुद्ध बोलण्यावर वापरण्यावर कटाक्ष तर होताच पण ती आणखी प्रवाही कशी करता येईल, आणखी संकल्पना मराठीत कशा आणता येतील, बोलता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न होता.
आज आपल्यावर आपल्याच लोकांचं राज्य आहे. तरी आपण इंग्लिशचेच गुलाम आहोत. इंग्लिश मिडीयम, इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचन यावर आपला इतका भर असतो. पण आपण हेच विसरतो कि आपण मराठी आहोत. आपण आपली भाषा कशी बोलतो, आपल्या भाषेतलं साहित्य आपल्याला माहित आहे का याची आपल्याला पर्वा नाही.
दुसऱ्या भाषा शिकुन त्यात प्राविण्य मिळवण्याला कोणाचीही हरकत नाही. पण आपल्या भाषेला तिच्या सौंदर्याला विसरायला नको.
इथे मराठीच्या राजकारणाचा विषय नाही. मराठीच्या नावावर आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या किती तरी "कार्यकर्त्यां"चं मराठी किती चांगलं असतं? असे आंदोलन करून "SUREKHA GENERAL STORES" हि पाटी "सुरेखा जनरल स्टोर्स" अशी लावता येते. पण हि मराठी पाटी आहे कि मराठी लिपीतली पाटी आहे?
मी बोलताना आणि माझे मराठी लेख लिहताना जमेल तितके मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो. पण ते शब्द काही मराठी लोकांनाच समजायला जड जातात. मग असं जड का बोलतो किंवा लिहितो अशा हावभावांना किंवा थेट प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आज काल मला जाणवायला लागलंय कि बोलताना मलासुद्धा मराठी शब्द लवकर सुचत नाहीत.
तुम्हाला वाटेल याचा एवढा बाऊ का करावा? नवीन काळेच्या एका लेखात या विषयावर लिहिलं होतं कि आपण ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज बोलतो का? भाषा हा प्रवाह असतो आणि तो काळानुसार बदलत राहतो. मराठी सुद्धा वाहत राहील आणि कोणत्या न कोणत्या स्वरुपात तिचं अस्तित्व टिकून राहील.
पटण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलीच काय आपण आपल्या वडलांच्या काळातली मराठीसुद्धा बोलत नाही. भाषा बदलते, ढंग बदलतो, पण शब्द बदलत नाहीत. ते वापरात राहतात किंवा वापरातून जातात. आई तेव्हासुद्धा आईच होती आणि उद्यासुद्धा आईच राहील. पण तिला आई म्हणणारे राहतील का? माहित नाही.
शंभर टक्के शुद्ध मराठीचा वापर खूप अवघड आहे. पण आपण मराठीचं प्रमाण तरी कायम राखुयात. मराठीत नसलेल्या संकल्पना, नवे शोध, याबद्दल मराठीत लिहून मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न अच्युत गोडबोले सारखे लेखक करत आहेत, त्यांना प्रतिसाद देऊयात. इंग्लिश भाषेत दरवर्षी नव्या शब्दांची भर पडते आहे. त्यात बाकीच्या भाषेतले शब्दसुद्धा स्वीकारले जातात. हि लवचिकताच त्यांची शक्ती आहे. आपणहि अशी लवचिकता दाखवूयात. आपण आजही नकळत अनेक इंग्लिश शब्द वापरतोच.
जिथे पर्याय नाही तिथे इंग्लिश शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे सुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे ते वापरले जावेत एवढीच अपेक्षा आहे. नव्या शब्दांचे सृजन करून भाषेला देणगी देण्याची प्रतिभा सावरकरांसारख्या मोजक्याच लोकांकडे असते. पण आहेत ते शब्द वापरण्याची काळजी आपण घेऊयात.
आपणच मराठी शब्द सोडून दिले तर काही वर्षांनी बोलली जाणारी जी भाषा असेल, तिची बांधणी आणि व्याकरण मराठी असू शकेल पण शब्द मराठी असणार नाहीत.
संवादाचं माध्यम एवढंच भाषेचं अस्तित्व नसतं. भाषेत त्या समाजाची सगळी संस्कृती, इतिहास सामावलेला असतो. आज काही आदिवासी भाषा लोप पावत आहेत. ती भाषा बोलणारे लोक दहा, काही ठिकाणी एक एवढेच लोक शिल्लक आहेत. आपल्या भाषेत कोणाशी न बोलता येण्याचं दुःख तेच सांगू शकतील. पण तेही त्यांच्या भाषेत नाही. आज आपल्याला हे समजणार नाही.
हा म्हटलं तर महत्वाचा सोडलं तर बिनकामाचा विषय आहे. भावना पोचल्या ना बास…. म्हणून सोडून देता येईल.
एवढंच सांगतो… नदी जेव्हा स्वतंत्रपणे वाहते तेव्हाच तिला वेगळं नाव आणि आपली ओळख असते. ती एकदा का मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळाली, तर त्या पाण्यात तिचं अस्तित्व तर असतं पण वेगळी ओळख नसते.

💬 प्रतिसाद
(65)
म
मराठी_माणूस
Fri, 03/13/2015 - 05:14
नवीन
छान लेख
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 05:31
नवीन
आजही आम्हाला अलिकडले नव्या पिढीतले लोक उगाच इंग्रजी शब्द का वापरतात याचं कोडं आहे....
उदा. गणवेशाला युनिफॉर्म
पोषाखाला ड्रेस वगैरे....
बाकी सावरकर झाले म्हणून त्यांनी सुचवलेले सगळेच शब्द प्रॅक्टिकल होते असे नव्हे...
सावरकर हे थोर देशभक्त होते यात काडीमात्र संशय नाही
पण त्यानी सुचवलेले सिग्नलला 'अग्निरथविश्रामधाम' वगैरे शब्द अगदीच 'हे' होते....
आता नव्या पिढीने ते सुधारून त्या जागी नवे मराठी शब्द आणले पाहिजेत.
आणि जर ते मिळत नसतील तर इंग्रजी शब्दांचा अंगिकार केला पाहिजे....
तिथे मुक्तविचार (मराठीतः ओपन माईन्ड) वापरलं पाहिजे...
कसं म्हणता?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 05:42
नवीन
सिग्नल = संकेत ?
- Log in or register to post comments
आ
आकाश खोत
Fri, 03/13/2015 - 05:44
नवीन
बरोबर… मला पण हेच म्हणायचय. लवचिकता हवी. अति अवघड शब्द योजून आपण उलट लोकांना परावृत्त करू.
काही वैज्ञानिक अथवा तांत्रिक गोष्टी मराठीत किंवा भारतात नव्हत्याच त्यांना काही ठिकाणी चांगले प्रतिशब्द मिळाले तर काही ठिकाणी अवघड शब्द मिळाले. सोय महत्वाची.
इथे सावरकरांचाच एक ऐकीव किस्सा आठवतोय. त्यांनी रेनकोट ला पाणकोट हा शब्द सुचवला होता. त्यावर अत्रेंनी त्यातला कोट तर इंग्रजीच आहे ना, त्याला काय पर्याय असा प्रश्न विचारला होता.
हे झालं नसलेल्या संकल्पना मराठीत आणण्याचं. अगदी अट्टाहासाने सगळं मराठीत आणि तेही अवघड करून आणण्याची गरज नाही.
त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे कि जे सुंदर शब्द मराठीत आधिपासून आहेत, त्यांना बाद करून इंग्रजी शब्द आणू नयेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/13/2015 - 13:42
नवीन
काँबो शब्द तर अरबीफार्सीकरिताही वापरतात. सबब पाणकोट हा शब्द एक नंबर आहे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 03/13/2015 - 06:01
नवीन
'अग्निरथविश्रामधाम' हा प्रतिशब्द सिग्नलसाठी नसून स्टेशनसाठी आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 06:36
नवीन
अग्निरथविश्रामधाम = थांबा / स्थानक
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 06:53
नवीन
पूर्णतः मान्य! मी माफी मागतो आणि तुमच्या दयेची याचना करतो.
सिग्नलला त्यांनी 'अग्निरथगमनागमनमार्गनिदर्शक पट्टिका' हे सुचवलं होतं.
हे तर जास्तीच 'हे' आहे....
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 07:01
नवीन
काय झाला अचानक ?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 07:13
नवीन
आमच्या हातून नजरचूक झाली, त्याची क्षमा मागितली, इतकंच! :)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 07:16
नवीन
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 07:21
नवीन
आता तुम्ही कशाला पाया पडताय? तुम्ही आणि त्या ताईंनी लिहिलेलं बरोबरच आहे.
चूक आम्ही केली होती, कपिलमुनि! :)
आणि केलेल्या चुकीबद्दल विनाशर्त माफी मागण्यात आम्ही कमीपणा मानत नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 07:23
नवीन
मला वाटलं माझ्यासाठी उपप्रतिसाद होता की काय !
बाकी आशिर्वाद द्या :)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 07:26
नवीन
त्रैलोक्यसुंदरीस्य यजमानः भव||
:)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 03/13/2015 - 08:23
नवीन
याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Fri, 03/13/2015 - 19:11
नवीन
ज्युनिअर बच्चनने तुमचाच आशीर्वाद घेतला असेल!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 03/13/2015 - 08:26
नवीन
माफी ठीक, पण 'दयेची याचना' वैग्रे का ब्रं ..?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 18:20
नवीन
ते 'बेग युवर पार्डन'चं धर्मांतर होतं!!!
:)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 03/13/2015 - 10:44
नवीन
अग्निरथगमनागमनमार्गनिदर्शक पट्टिका
यात ताम्रपट्टीका असा शब्द होता अस अंधुकस आठवतयं.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/13/2015 - 13:45
नवीन
बरोबर. लोहताम्रपट्टिका असा शब्द आहे मध्ये.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 03/18/2015 - 16:50
नवीन
अग्निरथगमनागमनताम्रलोहपट्टिका असा शब्द ऐकल्याचे स्मरते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 03/19/2015 - 12:20
नवीन
एग्झॅक्टलि.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/13/2015 - 13:44
नवीन
हे शब्द खरोखरच सावरकरांनी सांगितले होते की उगीच त्यांच्या नावावर खपवले जातात? तो आईस्क्रीमवाला "आम्रदुग्धशर्करावगुंठितगोलगट्टू" शब्दही तसाच ट्रोलछाप वाट्टोय कुणा टवाळाने उगीच खपवलेला. ;)
मला विचाराल तर जे सावरकर वेतन, दिनांक, मुद्रण, इ. सुटसुटीत शब्द सुचवू शकतात ते याच एका केसमध्ये इतके वाईट गंडतील असं आजिबात वाटत नाही.
- Log in or register to post comments
अ
अगोचर
Fri, 03/13/2015 - 19:12
नवीन
+१७६०
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 03/13/2015 - 15:25
नवीन
@'अग्निरथगमनागमनमार्गनिदर्शक पट्टिका'>>> नोहे आचार्य ..नोहे..!
त्यासी - आरक्तपीतहरीतदीपवाहनगमनागमननिर्णायकनिदर्शकपट्टीका ऐसे म्हणणे अधिक उचित नोहे का??? :D
- Log in or register to post comments
आ
आनंद
Mon, 03/16/2015 - 14:19
नवीन
सिग्नलला 'अग्निरथ आगमन निर्गमन सुचक लोह ताम्र पत्तिका असा शब्द ऐकला होता.
अग्निरथविश्रामधाम स्टेशन साठी असावा.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 05:53
नवीन
पूर्णतः सहमत आहे....
विशेषतः ज्यासाठी मराठीत आधीच शब्द उपलब्ध आहेत (उदा. थॅन्क्यू वा थॅन्क्स साठी आभार वा धन्यवाद) त्यासाठी तरी इंग्रजी वा धेडगुजरी शब्द आणू नयेत...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/13/2015 - 13:47
नवीन
आभार, धन्यवाद, इ. शब्द हे इंग्लिशसाठी पर्याय म्हणून 'पाडण्यात' आलेले आहेत असे वाटते. तसाच तो संस्कृती नामक शब्दही रीसेंटलि पाडण्यात आलेला आहे. कल्चरसाठी पाडल्या गेला आहे. त्याचा किस्सा असा, की कल्चरसाठी रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा कृष्टी हा शब्द सुचवला, तो शब्द इतिहासाचार्य राजवाड्यांना समजला. मग त्यांनी संस्कृती हा शब्द सुचवला तोच टागोरांनाही पसंत पडला अन अख्ख्या भारतभर रुळला.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 03/13/2015 - 06:04
नवीन
साधे साधे मराठी शब्द इंग्रजीला पर्याय म्हणून कटाक्षाने वापरावे याच्याशी सहमत. पण टेबल, ग्लास यासारखे इंग्रजी शब्दही मराठीत सामावून घेण्यास हरकत नसावी.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Fri, 03/13/2015 - 14:30
नवीन
टेबल = मेज
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 03/16/2015 - 13:47
नवीन
मेज हाही फारसीतून आलेला आहे.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 03/17/2015 - 04:03
नवीन
फारसी की अरबी (की फारसी मार्गे अरबी)?
कारण स्पॅनिशमध्ये टेबलासाठी मेसा असा शब्द आहे, त्याचे मूळ मेजात असण्याची शक्यता आहे. मूरकालीन स्पॅनिशात असे बरेच अरबी शब्द आले होते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 06:41
नवीन
ग्लास = पेला ?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 03/13/2015 - 07:23
नवीन
संपादक महोदय,
याबाबत इथे एक चिकट धागा तयार करता येईल का? जिथे फक्त इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द असतील. बाकीच्या संवादिकांना (पोस्ट?) तिथे पूर्ण मज्जाव असेल. बर्याच वेळा असं लक्षात येतं की मला मराठी तर लिहायचंय पण त्यासाठी मराठी प्रतिशब्द मला माहिती नाही. असे लोक तिथे जावून प्रतिशब्द माहीत करून घेवू शकतील.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 03/13/2015 - 07:34
नवीन
इथे
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 03/13/2015 - 07:47
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 03/13/2015 - 08:19
नवीन
अतिशय भ्रष्ट अशी मराठी ( इंग्लिश / पंजाबी मिश्रित ) वापरण्यात म टा पुढे आहे. अशी भाषा वापरली म्हणजे आपला खप जास्त होईल असे तिथे बसलेल्या रेम्याडोक्यांना वाटते
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 03/13/2015 - 08:30
नवीन
इंग्रजीचं सोडा . हिन्दी भाषा मराठीला आणि इतर प्रादेशीक भाषाना अक्षरशः गिळंकृत करत चालली आहे त्याचे काय.
हिन्दीचे आक्रमण हे मराठीला मारकच आहे. आपण अजून जागे झालेलो नाहिय्ये.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/13/2015 - 09:33
नवीन
विजू काही हिंदीचा दुस्वास सोडत नाही.
विजू,अरे ह्याला आपणच जबाबदार नाही का?त्या सुधीर गाडगीळच्या एक दशांशही मराठी माहित नसलेले लोक सध्या टी.व्ही.चॅनेलसवर बातम्या सांगत आहेत...चर्चा करीत आहेत.मराठी म्हणून जन्माला येउन उभे आयुष्य हिंदी गाणी गाण्यात, गाण्यांना चाली लावण्यात गेलेले अनेक कलाकार होते,आहेत.. जाब ह्या लोकांना विचारायचा असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 03/13/2015 - 09:23
नवीन
चला आता भराभर शब्ध द्या बरं slang पडशब्द ,
बरणी jar,
चटपटीत tangy
चुरचुरीत Crunchy
समज समजुतदारmature
वयस्क adult
बोजा load
ताण tension
बळकावणे encroachment
खूण signal
इशारा signal a person
वानगी पाककृती recepe
नडणे bother
रीत method
अपरिचित unknown
पती Mister नवरा नवरोबा हे
misses पत्नी बायको श्रीमती ही
tryप्रयत्न
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 03/13/2015 - 12:55
नवीन
'बटन'ला मराठी प्रतिशब्द काय असावा ब्र ?
- Log in or register to post comments
ख
खान्देशी
Fri, 03/13/2015 - 13:35
नवीन
;)
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Fri, 03/13/2015 - 14:28
नवीन
बटणाला मराठीत 'गुंडी' म्हणतात .
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 03/13/2015 - 16:18
नवीन
घंटीची गुंडी दाबली किंवा सद-याच्या कळी लाव हे कसे वाटते ?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 03/13/2015 - 18:16
नवीन
तुम्हाला बटनाची पडल्येय, आम्हाला 'मटन' ला प्रतिशब्द काय असावा ह्याची चिंता पडल्येय!
ते मांस वगैरे अगदीच पुस्तकी वाटतं...
:)
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Mon, 03/16/2015 - 12:17
नवीन
किंवा सागुती (पदार्थ)
-----रच्याकने मट(न / ण)?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 03/16/2015 - 13:48
नवीन
संदर्भ व जातीप्रमाणे बरबाट, वशाट, सागुती, इ. शब्द आहेत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/16/2015 - 13:55
नवीन
असे शब्द ऐकले की भूक लागते
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 09:25
नवीन
अरे रागाला कशाला येतोस ?
त्याने माझ्या गाडीला कट मारला मग मी त्याला फुल्ल राग दिला ..
करायला मागत नाही
अशी भयंकर मराठी सर्व वाहिन्यांवरून चालू असते
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 03/13/2015 - 10:11
नवीन
हे मराठी नागपूर बाजूचं. चाल्लो गेलो होतो प्रकारचं.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »