आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
💬 प्रतिसाद
(56)
व
विजुभाऊ
Sat, 03/14/2015 - 11:14
नवीन
पुढे?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/14/2015 - 11:17
नवीन
जल्ला आपुन इंजीनियरच नाय!!! आपुन फ़क्त वाचताव!!
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Sat, 03/14/2015 - 14:02
नवीन
सेम पिंच
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 03/14/2015 - 11:26
नवीन
शहर तिथे दहा इंजिनिअरिंग कॉलेजेस असे झाले तर आणखीन काय होणार.? माझ्यामते अजुनतरी मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल्स, इलेक्ट्रोनिक्स ह्या सारख्या बेसिक स्ट्रीम साठी तितकीच स्पर्धा आहे. व विद्यार्थ्यांचा त्यामधील इंटरेस्टच संपल्याने इतक्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत हे कारण फसवे वाटते.(म्हणजे श्री. जयंत पाटील ह्यांनी दिलेले.)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/14/2015 - 11:34
नवीन
हे पटण्या सारखे आहे!!! मागणी कमी अन पुरवठा ज्यादा झाला की भाव पडणारच हा शुद्ध नियम आहे!!! त्यात आपल्याकडे ग्रॅज्युएशन म्हणजे इंजीनियरिंग असे काहीसे झालेले आहे !! आमचा एक नातलग एचओडी मेकॅ निकल इंजीनियरिंग आहे एका कोल्हापुर कडल्या कॉलेज ला अन "नॉन कन्वेंशनल एनर्जी" का कुठला तरी एक पेपर असतो पुणे यूनिवर्सिटी मेकॅनिकल थर्ड का फाइनल ला त्याचे एक पुस्तक लिहिले आहे त्याने तो म्हणतो "आवड म्हणुन इंजीनियरिंग करणारे आजकल नाही च्या बरोबर आहेत" चुभुदेघे
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 03/14/2015 - 11:51
नवीन
काही वर्षांपूर्वी कॉलेजसाठी अजुन इमारत नाही फक्त अॅप्रूवल मिळाले आहे म्हणुन एखाद्या प्राथमिक अथवा माध्यमि़क शाळेच्या इमारतीत लेक्चरर्स साठी झालेली मुलाखत पाहीलेली आहे. हाईट म्हणजे त्यातले जे काही उमेदवार निवडले गेले त्यांना असतील नसतील ती पुस्तके घेऊन येण्यास सांगितले गेले. कशासाठी तर लायब्ररीसाठी.! बरीचशी इंजिनिअरिंग कॉलेजेस ही शिक्षणसम्राटांनी स्वतःच्या सोयीसाठी काढलेली आहेत विद्यार्थ्यांच्या नाही. जर किमान दर्जा ही नाही गाठता आला तर एखाद्या निकृष्ठ हॉटेलसारखे अशी इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडणेही साहजिकच आहे.
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Sat, 03/14/2015 - 12:05
नवीन
आयटी ची तुमची व्याख्या काय आहे... ?
कोडिंग व टेस्टींग करण्यासाठी इंजीनियरिंग करायची गरज नाही, हे बहूदा विद्यार्थांना समजले आहे..
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sat, 03/14/2015 - 12:07
नवीन
आणि त्यातून विद्यार्थी म्हणजे कहर असतात. परिक्षा पास होण्यासाठी रट्टे मारतात आणि मग इंटर्व्ह्यू मध्ये वशिला लावता येतो का बघ, उत्तर येत नसलं तरी काही तरी खोटंच उत्तर रेटून देणे असले उद्योग करतात. शिक्षण सम्राटांच्या कॉलेज मधले बरेच विद्यार्थी त्यांच्या फुगलेल्या ईगोने आणि नसलेल्या ज्ञानाने परिपूर्ण असतात असं निरिक्षण आहे.
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Sat, 03/14/2015 - 12:28
नवीन
तुमचं म्हणणं बर्याच अंशी बरोबर आहे.
आजकाल ८०% पोरांना (आणी पोरींना) सुद्धा असं वाटतं की engineering झालो म्हणजे बस. आपण सर्वज्ञ झालो.
लै वैताग येतो अशा पोरापोरींचा इंटरव्ह्यू घ्यायला.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 03/14/2015 - 14:14
नवीन
लै शाना ह्यांच्याशी बाडीस
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Sat, 03/14/2015 - 14:27
नवीन
अगदी अगदी
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 03/14/2015 - 14:17
नवीन
अहो पण अनेक राजकारण्यांचीच कॉलेजेस असतात ना? प्रत्येक गल्लीत कॉलेज काढले तर जागा रिकाम्या राहणारच!
- Log in or register to post comments
स
सभ्य माणुस
Sat, 03/14/2015 - 14:31
नवीन
इतकी flooding झलीय या field मधे आणि तुम्ही म्हणता "तुटवडा"?? हे संस्था चालक तर हेच सांगणार की तुटवडा आहे सगळीकडे इंजिनियर लोकांचा ..! त्यान्ना काय करायचय कुणाच्या भविष्याच! त्यांची colleges भरली म्हणजे झाले.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Sat, 03/14/2015 - 14:52
नवीन
>>> आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर <<<<
या शीर्षकाशी सहमत.
परंतू, या ग्लॅमरमुळे इंजिनियरिंगच्या बाकी बाजुन्ना विद्यार्थी मिळत नाहीत ही कारण मिमांसा अतिशय अपुरी वाटते.
बाकी बाजुन्ना विद्यार्थी न मिळण्यामागे प्रधान कारणे म्हणजे, या रिकाम्या जागा कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे जागोजाग नव्याने उगवलेल्या/उगवविलेल्या विविध शिक्षणसम्राटांच्या विनाअनुदानित संस्थांमधील आहेत.
मागणिपेक्षा पुरवठा जास्त, शिवाय, या संस्थांच्या अधिकृत/अनधिकृत फीया जास्त, व तितक्या फीया भरण्याची ऐपत असणारे शेवटी संख्येने कितीक असणार, याचा विचार न होता गल्लोगल्लीत पानपट्ट्या उघडल्याप्रमाणे उघडलेली कॉलेजेस, ज्यांची ऐपत या महामूर फीया भरण्याची आहे, तरी मग तेवढा पैका व्याजी लावून विद्यार्थी नुस्ता घरी बसला तरी त्याचे प्वॉट भरेल असा व्यवहारी विचार करणार्यांची वाढती संख्या, ही प्रमुख कारणे.
याव्यतिरिक्त, आयटीमधील बैठ्या, शरिरकष्ट नाहीत अशा (गैर)समजातून निर्माण झालेले आकर्षण, (शरिरास कष्ट न देण्याची/हातकपडे काळे न करण्याची तयारी), आयटीमधील भिन्नलिंगिय भरपूर उपस्थितीचे आकर्षण, आयटीच्या चकाचक बिल्डिंगा अन हायफाय इन्गिशमधिल अगम्य पाश्चात्य बातचित, शिक्षण झाल्यावर स्टार्टीन्गच्या पगाराचे डोळे दिपवणारे (फसवे) आकडे, अशा विविध बाबींनी ग्लॅमर की काय ते उत्पन्न होते यातही शंका नाहीच.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 03/14/2015 - 23:01
नवीन
कोल्ह्याला लिंबु आंबट
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sat, 03/14/2015 - 14:59
नवीन
ईतर अभियांत्रीकी शाखांबद्दल ग्लॅमर कसे वाढेल ह्याचाही विचार झाला पाहिजे.सिव्हिल इंजिनियरिंग्मध्ये तर मोठी समस्या झाली आहे.येथे देशात १० ते २० वर्षे अनुभव असलेले लोक जवळपास नाहीतच.आहेत ते सरकारी नोकरीत..मोठ्या प्रोजेक्टस्साठी लागणारे डिझायनर्स्,साईट इंजिनियर्स खूप कमी आहेत.परिणामी भारतातल्याच मोठ्या प्रोजेक्तससाठी(मेट्रो प्रोजेक्ट्स वगैरे) खाजगी कंपन्या युरोपियन अभियंत्यांना वर्षभरासाठी बोलवून घेतात.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sat, 03/14/2015 - 17:34
नवीन
कशाला हवेत हो सिव्हील इंजिनियर्स? आधीच या बिल्डर लोकांनी किंमती वाढवून ठेवलेत. आम्ही इथं किंमती कोसळतायत याची वाट बघतोय. हे बिल्डर लोकान्च एकच क्षेत्र अस आहे की पार कोणीही विकत घेवू नये आणि बिल्डर लोक रस्त्यावर भीक मागावेत अशी अवस्था व्हावी अशी तीव्र इच्छा आहे. राहू देत बिल्डिंग अर्धवट बांधलेल्या.
- Log in or register to post comments
प
प्रथम म्हात्रे
Mon, 03/16/2015 - 03:01
नवीन
दादा, सिव्हील इंजीनियर्स फक्त घरेच बांधत नाहीत.
आय टी प्रमाणे त्यातही substreams आहेत.
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 03/16/2015 - 05:46
नवीन
सिव्हील इंजीनियर्स रस्ते सुद्धा बांधतात हो ! उन्हात काम करतात बिचारे
ते नसतील तर काय होईल याचा विचार करा !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/16/2015 - 15:11
नवीन
सिव्हील इंजिनियर्स ऐवजी कन्त्राटदारच रस्ते बांधत असल्यानेच आजची रस्त्यांची अवस्था अशी आहे.
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Sat, 03/14/2015 - 17:15
नवीन
ईतर क्षेत्रातील मिळकत जसजशी वाढत जाईल तसे आईटीचे ग्लॅमर कमी होईल.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 03/14/2015 - 19:23
नवीन
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर!
डॉक्टरांना मिळणारे उत्पन्न !
यावर एकच उपाय

- Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग
Sat, 03/14/2015 - 19:30
नवीन
अरे वा . आईटी क्षेत्राला ग्लॅमर आहे म्हणजे भारीच कि … सकाळी उठून ऑफिस ला जायचे . दुपार पर्यंत काम करायचे .मग डब्बा खायचा आणि परत संध्याकाळ पर्यंत काम करायचे . मग घरी जायचे . असेच साधारण आठवड्याचे पाच दिवस करायचे . आणि एवढे करून पण ग्लॅमर आहे असे वाटते म्हणजे भारीच आहे .
मला तर इतके दिवस फक्त मनोरंजन , खेळ , राजकारण आणि मोठे सनदी अधिकारी , संरक्षण दलामधले अधिकारी यांनाच फक्त ग्लॅमर आहे असे वाटत होते .
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 03/14/2015 - 19:43
नवीन
आजकाल सगळ्या क्षेत्रांवर संगणकांचा प्रभाव आहे. बँका व अन्य आर्थिक उलाढाल करणार्या संस्था तर आहेतच. पण शेती, हवामानशास्त्र, संरक्षण, सर्व अभियांत्रिकी क्षेत्रे, कला (सिनेमे, संगीत, छायाचित्रण, व्हिडियो), रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, भूगोल. अशा सर्व क्षेत्रात संगणकाने पाय रोवले आहेत वा रोवू घातले आहेत. अशा राक्षसी वाढीमुळे ह्या क्षेत्रात काम करणार्या लोकांकरता मोठी मागणी आहे आणि तुलनेने कमी खर्चात लोकांना प्रशिक्षित केले जाऊ शकते त्यामुळे भारतासारख्य गरीब व अफाट लोकसंख्येच्या देशात ह्या क्षेत्राचे आकर्षण आहे ह्यात नवल नाही. निदान काही प्रमाणात भारताला ह्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. बाकी क्षेत्रात तसे नाही. त्यामुळे ह्या क्षेत्राला वलय लाभलेले आहे. अर्थातच ह्या क्षेत्रात काम करणार्या लोकांना मिळणारी आर्थिक सुबत्ता हेही मोठे आकर्षण आहेच.
बाकी क्षेत्रातील तंत्रज्ञांचा तुटवडा जेव्हा कडेलोट होण्याइतका मोठा होईल तेव्हा पुन्हा स्थित्यंतर झालेले दिसेल. आज तरी तो कडेलोटाचा प्रसंग आलेला नाही. तोवर आपण हळहळ व्यक्त करण्याशिवाय काही करु शकत नाही. अशा क्षेत्रात जबरदस्तीचा उपयोग नसतो. पैशाचा ओघ दुसरीकडे दिसू लागला तर लोक आपोआपच त्या क्षेत्राकडे वळतील.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 03/14/2015 - 20:29
नवीन
हा फेज बहुदा सुरु झाला आहे. माझ्या माहीतीतले काहीजण हेतुपुरस्सर आय.टी पासुन दूरच राहीले पात्रता व बुद्धिमत्ता असुनही. तेव्हा त्यांचा हा निर्णय अगम्य वाटला होता. पण काही दिवसांपूर्वीच असा एक मित्र भेटला व त्याने सांगितले कि कोअर क्षेत्रात अश्या अभियंत्यांची फारच कमतरता आहे. अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधले बरेचसे इंजिनिअर्स काहीही करुन आय.टीत घुसले त्यामुळे चांगला अनुभव असलेल्यांचा कोअर क्षेत्रात फार तुटवडा आहे. त्यामूळे जे ह्या क्षेत्रात आहेत त्यांना प्रचंड मागणी आहे. म्हणजे आय.टीत तितक्या वर्षांचा अनुभव असलेल्याला जितका पगार मिळतो त्याहीपेक्षा जास्त पगार ह्या मंडळींना त्यांच्या ह्या क्षेत्रातील अनुभव व गुणवत्ता ह्या दोन्हीही मुळे आहे. उदाहरण देताना त्याने हिट ट्रिटमेंट ह्या क्षेत्रातील दिले. एकाच वेळी अनेक कंपन्यांशी हिट ट्रिटमेंट कन्सल्टंट म्हणुन हा मित्र काम पाहतो आहे सध्या. त्याच्या ह्या द्रष्टेपणाचे आता कौतुक वाटते.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 03/14/2015 - 20:38
नवीन
सहमत आहे. पण आयटी क्षेत्राचे आकर्षण अनावश्यक आहे असे म्हणता येणार नाही. जेव्हा मेकॅनिकल, सिव्हील इत्यादी ठिकाणी ३-३५०० वर नोकरी मिळण्याचीही मारामार होती तेव्हा आयटीत चांगला पगार मिळायचा. आयटी क्षेत्रात झालेल्या आऊटसोर्सिंगमुळेच भारतात अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. आता "मेक इन इंडिया" या घोषणेतून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही तसे आऊटसोर्सिंग घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. तसे झाल्यास इतर इंजिनीअर्सनाही महत्त्व येणारच. त्याची सुरुवात झालेली आहे.
ढीगभर कॉलेजांमध्ये सध्या आयटी इंजिनिअरिंगला गर्दी करणारे पस्तावणार.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 03/15/2015 - 17:15
नवीन
एकंदरीत सहमत पण फ़क्त
निदान काही प्रमाणात भारताला ह्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. बाकी क्षेत्रात तसे नाही.
ह्याच्याशी असहमत, बाकी अनेक क्षेत्रे आहेत ज्यांच्यात भारताला विलक्षण जास्त मान आहे काहीतर अभियांत्रिकीशी संबंधित आहेत उदाहरणार्थ स्पेस प्रोग्राम जगात सर्वात स्वस्त दरात उपग्रह अवकाशात नेणारे इस्रो झाले किंवा कार्डियोलॉजी अन इतर शल्यविद्या पारंगत डॉक्टर्स असोत बाकी अनेको अनेक क्षेत्रांत भारताला मान आहे असे नोंदवतो !
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 03/15/2015 - 04:44
नवीन
इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिशेन्स इंजिनिअरींग करणारे ९५% टक्क्यांहून अधिक लोक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. नव्या गोष्टी शिकण्याची व सहजपणे आत्मसात करण्याची क्षमता असणार्यांच्या प्रगतीत काही बाधा येत नाही पण ज्यांना हे जमत नाही त्यांचे मुळात कम्प्युटर सायन्स मध्ये शिक्षण नसल्याने काम करताना अडचणी येतात.
बहुतेक लोकांना सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये करिअर करायचे असताना इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिशेन्स शाखेला इतकी मागणी का असते?
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 03/15/2015 - 04:44
नवीन
डॉक्टरनी पैसे मिळवायचे नाहीत असा एक धागा निघाला.
आता आयटीवाल्यांचा नंबर.
- Log in or register to post comments
प
पिंगू
Sun, 03/15/2015 - 13:26
नवीन
आयटीचे ग्लॅमर आता हळूहळू उतरणीला लागले आहे. पण अजून तरी कित्येकजण मोहापायी आंधळे होऊन आयटी एके आयटी करताना दिसत आहेत. वेळीच सावध नाही झाले, तर मात्र नवशिके आयटी इंजिनियर नोकरीच्या बाजारात कवडीमोल होणार आहेत.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 03/16/2015 - 14:54
नवीन
भारताचे कॉम्पिटिटिव अॅडवान्टेज पूर्वी होते तितके राहिलेले नाही हे खरेच आहे.
मात्र दुसरा मुद्दा असा आहे की क्लाऊड कंप्युटिंग आणि वर्चुअलायझेशनच्या नव्या लाटेमुळे विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर सेटप आणि मेंटेनन्सची कामे भारतात आऊटसोर्स करायची गरज राहणार नाही. क्लाऊड कंप्युटिंगमुळे डेटा सेंटरसारख्या गोष्टी कालबाह्य व्हायला सुरुवात झालीच आहे. क्लाऊड कंप्युटिंगमुळे छोट्या स्टार्टप कंपन्यांचीही वाढ मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. त्यामुळे आयबीएम-ओरॅकलसारख्या परंपरागत खेळाडूंनाही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
आज इलेक्ट्रिसिटी कंपनीकडून आपण वीज विकत घेतो, स्वतः घरी तयार करत नाही. त्याचप्रमाणे कंप्युटिंग सेवा अॅमेझॉन, सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांकडून भाड्याने घ्यायला खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात होईल. युरोप-अमेरिकेतील ग्राहकांना भारतात कामे पाठवण्याची गरज राहणार नाही.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Sun, 03/15/2015 - 14:29
नवीन
कुणी आयटीत येतो सॅप किंवा आणखीन कशात काम करतो. वर्षभरात ऑनसाइट म्हणून सहा महीने किंवा वर्षभरासाठी बाहेर देशात जातो. आल्यावर पुण्यात एक घर घेतो. लग्न करतो. परत काही तरी जमवून बाहेर जातो. फुकटात हनीमुन होतो. कधी वर्ष तर कधी कधी चक्क चार वर्षे तिकडे काढतो. इकडे आल्यावर दोघही काही वेगळेच जीवन जगायला लागतात. लोकांना या साऱ्यांच आकर्षण का नसावे? आधी म्हणजे साधारणतः अठरा वीस वर्षापूर्वी ही फक्त आयआयटी किंवा मूठभर श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती. आज हे कुणालाही शक्य आहे, ग्लॅमर आह ते त्याच मुळे. दुसरे म्हणजे बाहेरुन चकचकीत दिसनारे ऑफिस, आयटीवाल्यांची लाइफ स्टाइल ह्या इतर काही गोष्टी सुद्धा आहेत. ग्लॅमर आहे यात काहीही चुकीचे नाही.
आज हा १४६ बिलियन डॉलर्सचा व्यवसाय आहे आणि पस्तीस लाखाच्या वर लोक कामाला आहेत. आजतरी येवढ्या मोठ्या प्रमाणात (इंजीनियर्ससाठी) रोजगार उपलब्ध करनारा दुसरा उद्योग नाही.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 03/17/2015 - 13:18
नवीन
हा हा हा गेले ते दिवस भौ.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 13:25
नवीन
त्याऐवजी परदेशात घर घेणे परवडु लागले आहे ;-) .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 03/15/2015 - 16:14
नवीन
आय टी क्षेत्राचे ग्लामर ठीक आहे. यात भरपूर पगार तरुण वयात मिळतो. चकाचक कार्यालये विलायतेला जाण्याची संधी इ मुले तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही.खालील दुव्या वरून एक लक्षात येईल कि या क्षेत्रातही जे लोक उच्च दर्ज्याचे कौशल्य मिळवतील ते वर जाऊ शकतील नाही तर साचलेपण( stagnation) फार लवकर येईल. आणि जर डॉट कॉम सारखा याचा फुगा फुटला तर सब घोडे बारा टक्के वाले बाराच्या भावात जातील. मी एक वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सांगत असतो कि दर दहा वर्षांनी तुमची उंची वाढवली पाहिजे कारण तुमचे कनिष्ठ लोक तुमच्या खांद्याशी पोहोचले तर ते तुमच्या वर पोहोचायला वेळ लागणार नाही. कारण ते तुमच्या पेक्षा स्वस्तात सेवा उपलब्ध करून देतील
कदाचित हाच न्याय माहिती तंत्रज्ञानात लागू शकेल. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहणे आवश्यक आहे.
\http://trak.in/tags/business/2015/01/27/ibm-2015-layoff-100000/
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Sun, 03/15/2015 - 19:05
नवीन
आयटी क्षेत्रास ग्लॅमर मिळाले म्हणून कोणाच्या पोटात दुखत नसून खरा प्रश्न निराळाच आहे .
आयटी मधले मुले /मुली लग्न /प्रेमसंबंध या बाबतीत थोडे आधुनिक विचारांनी (?)प्रभावित असल्याने त्यांच्या वागण्यात उच्छृंखलपणा आढळत असावा ,तसेच लग्न करताना शक्यतो आयटी वाळया मुला/मुलीला आयटी वालाच जीवनासाठी हवा असतो. असे केल्याने आयटी वाल्यांचा एक विशिष्ट वर्ग निर्माण होत असून समाजरचनेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे , असे मला वाटते
आयटी वाल्यांना / अमेरिकेत किंवा परदेशात सेटल झालेल्यांना लग्नासाठी मुली लगेच मिळतात ,किंबहुना सगळ्या मुली तेच पटकावतात .मग इतरांना मुली मिळताच नाहीत असे माझ्या बघण्यात आलेले आहे,
असो ,या विषयाचा गांभीर्याने विचार करून "आयटी जनरेशन " चे गारुड जांनामाणसावरून उतरावे ,असे मनोमन वाटते ,या धागाकर्त्याच्या मताशी सहमत
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Mon, 03/16/2015 - 02:00
नवीन
हा हा हा !!!
हा हा हा !!!
हा हा हा !!!
हा हा हा !!!
(गडबडा लोळणारी स्माईली कल्पावी)
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Mon, 03/16/2015 - 05:54
नवीन
=)) =))
असे कैच्याकाय अंदाज कश्यावरून बांधलात ते हि सांगितलं तर बरं होईल
तोपर्यंत हसून घेतो
=))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 03/16/2015 - 15:12
नवीन
लोल!
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Sun, 03/15/2015 - 19:07
नवीन
*जीवनसाथी * जनमानसावरून
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 03/16/2015 - 05:57
नवीन
आयटी क्षेत्राला ग्लॅमर आहे ही गोष्ट खरी आहे. आवश्यक की अनावश्यक हा भाग वेगळा. पण आयटी मध्ये काम करतो असं सांगितला की समोरच्याला एकदम भारी वाटते. माझ्या घरात सक्खे-चुलत मिळून ८ भावंडांपैकी मी एकटाच mechanical engineer आहे आणि कोअर कंपनीत कामाला आहे. बाकी सगळे आयटी मध्ये. सगळ्यांचे उत्पन्न जवळपास सारखेच. त्यामुळे मला खेद वाटत नाही. पण मी, माझी कंपनी काय काम करते हे प्रश्न मला खोदून खोदून विचारतात सगळे. पण इतर भावंडांना कोणी काहीच विचारात नाही. सोफ़्टवेयर मध्ये आहे म्हटलं की झालं ! उलट मी mechanical engineer असल्यामुळे कुठेतरी हात काळे करत असणार अशी सगळ्यांची खात्री आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/16/2015 - 16:03
नवीन
सहमत व्हा अगर नका होउ. कोअर ब्रँचेस मधे फायनान्शिअल ग्रोथ आणि करिअर ग्रोथ तुलनेनी कमी असते. कदाचित आयटी मधे फक्त पदाचं नावं बदलुन ग्रोथ झाल्याचे प्रकार घडत असतीलही पण त्याबरोबरीनी जी अॅपरायजल्स मिळतात ती खुप दणदणीत असतात. २ वर्ष अनुभव असणार्या मेक/प्रोड/ट्रिकल्/ट्रॉनिक्स (कोअर) आणि आयटी वाल्यांच्या पगारांची तुलना केली तरी आयटीला एवढी मागणी का ह्याचं उत्तर मिळेल. परत आयटी मधे कोअर पेक्षा अधिक प्रमाणात ऑनसाईट कामं असल्यानी तोही एक लव्ह फॅक्टर असतो.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/16/2015 - 19:48
नवीन
छान चालली आहे चर्चा.एखादी जावा,सी ++,पाय्थॉनसारखी संगणकीय भाषा,बी.एस.डी.सारखी चांगली संगणक प्रणाली आमचे आय.टी.अभियंते तयार करतील अशी केव्हापासून ईच्छा आहे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 03/17/2015 - 05:59
नवीन
आयटी क्षेत्राला लाभलेले तथाकथित "अनावश्यक ग्लॅमर" आणि आयटी आणि ईतर "नॉन ग्लॅमरस" क्षेत्रांच्या जॉब सिक्युरिटीबद्दल काय मत आहे?
२००८ साली २००१ साली जे प्रचंड नोकरकपात झाली त्यात आयटी आणि नॉन आयटी लोकांचे प्रमाण किती होते याचा काही विदा आहे का?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 03/17/2015 - 13:24
नवीन
सध्या काही कंपन्यानी एस ए पी सारख्या गोष्टीम्साठी ट्रेनिंग देवुन फ्रेशर डिप्लॉय करुन त्यांच्याकडून काम करुन घ्यायचा उपद्व्याप केला. त्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा ढासळला. निव्वळ कोडिंग येते म्हणून एस ए पी मधे काम मिळते असा मोठ्ठा गैर समज आहे.त्यासाथी इतर गोष्टींचा अनुभव आवश्यक असतो. उदा अकाउंट्स , प्रोक्युअरिंग , डिस्ट्रीब्युशन वगैरे.
हे ज्ञान असेल तरच त्यात टिकू शकता.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 03/17/2015 - 13:28
नवीन
आयटी तील जॉब हे फार्च जेनेरीक होतेय.
सायबर कॅफे चालवणारा ,केबल व्यवसाय करणारा , एम एस ई बी च्या कोलसेंटर मधे काम करणारा ,डी टी पी करणारापासून ,डेटा एन्ट्री करणारे डॉक्टर पासून ते नासातील स्पेस शटल चे ऑपरेशन डिफाईन करणारा शास्त्रज्ञ तसेच त्यासाठी प्रोग्रम लिहीणारा इथपर्यन्त हे सगळेच आयटीत काम करतात.
- Log in or register to post comments
प
पिरतम
Tue, 03/17/2015 - 18:42
नवीन
ओ ते ट्रेड नाही ब्रांच असते ट्रेड आय टी आय ला . इंग्गीनीरिंग ला ब्रांच
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/09/2015 - 10:06
नवीन
ग* म* भ* !!
२ दिवस १०२ ताप असताना ऑफिसला यायला लागत आहे.
कसला भो* ग्लॅमर :(
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 04/09/2015 - 10:21
नवीन
काय बोलावं आता यावर...?
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 11:10
नवीन
वंशा तेव्हा कळे !
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »