Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एनआरआयची भारतभेट..

ग
गवि
Wed, 03/18/2015 - 06:34
🗣 139 प्रतिसाद
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं.. अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते. वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्‍या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं. माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं. प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील. भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अ‍ॅटिट्यूड असतात. परदेशात राहणार्‍या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का? काही प्रश्न, टु बिगिन विथः -ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का? -मत्सर हेवा दिसतो का? -भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का? -इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का? -तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का? -तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का? -भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात? -नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का? -चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का? -परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का? अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच. परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

प्रतिक्रिया द्या
66261 वाचन

💬 प्रतिसाद (139)
क
कपिलमुनी Wed, 03/18/2015 - 06:36 नवीन
:) जागा पकडून बसलो आहे
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 03/18/2015 - 06:42 नवीन
फार धमासान युद्ध व्हावं हा धाग्याचा उद्देश नाही. पण मी माझे मित्र परदेशातून आले की त्यांना इथे खिलवणंपिलवणं आणि फिरवणं या सर्वाची आर्थिक आणि लॉजिस्टिक जबाबदारी आवर्जून उचलतो. कारण ते इथे मला भेटायला आलेत. "मी तिथे परदेशात आलो तर तेव्हा मी त्यांचा पाहुणा..पण आज तुम्ही खर्च नाही करायचा.." असं दोस्तीखातर बजावतो. पण अशी वर्णनं किंवा अनुभव वाचून वाईट वाटतं. हे अपवादच असावेत अशी आशा वाटते. थेट अनुभव घेणार्‍यांकडून ऐकायला आवडेल. नाव घेण्याचा प्रश्नच नाही. जेनेरिक अनुभव अशा रुपात सांगितले तरी बास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 03/18/2015 - 06:51 नवीन
माझ्या एनारआय मित्रांचे अनुभव मिश्र आहेत. बहुतेकजण मित्राम्च्या ओढीने भेटतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात . त्यामध्ये कधी श्रेष्ठत्वाची भावना वाटत नाही. ९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये. त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे. आता उरलेल्या कॅटेगरीमधे काही नग असतात.. ते भेटायला आले की 'तिकडे' कसा चांगला आणि इकडे कसा वाईट एवढाच बोलतात. आपण समोरच्याला भेटायला आलोय. त्याला 'क्ष' देशाचा विकि सांगायला आलो नाही हे त्यांना मुळी कळतच नाही. आणि इकडचे काहीजण कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने तिकडच्या लोकांवर टीका करत असतात. हे साधारण झाला बाकी वैयक्तीक खमंग अनुभव निवांत टंकतो
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 03/18/2015 - 08:03 नवीन
९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये. त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे.
सहमत ! पल्याडचं आयुष्य म्हणजे एकदम आरामदायक हा समज सुद्धा आता बदलला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मृत्युन्जय Wed, 03/18/2015 - 07:04 नवीन
एकही जवळचा एनाराय मित्र नसल्याने याबाबत काही प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे. नाही म्हणायला एक अगदी जवळचा मित्र सध्या परदेशात असतो. पण तो एनआरआय आहे असे काही वाटत नाही. म्हणजे तो मधुनच जातो २ वर्षासाठी. मग परत येतो वर्ष दोन वर्ष असतो मग परत जातो. जेव्हा तिकडे असतो तेव्हा इथे धावती भेट देत नाही आणि जेव्हा इथे येतो तेव्हा काय इथलाच असतो मग कसला आलाय डोंबलाच एन आर आय. पण इतरांचे अनुभव वाचण्यासाठी सरसावून बसलो आहे. होउन जाउ द्यात घमासान. काही चर्चा आता अनुषंगाने होणरच आहेत त्यमुळे मजा येइल. उदा.: १. अल्याडचे लोक म्हणतील की चोंबडे एन आर आय परदेशात जाउन गुबगुबीत जगतात आणि भरल्य पोटाने तंगड्या पसरुन भारताच्या करुन स्थितीवर आणि भारतीयांच्या मानसिकतेवर टिप्पणी करतात. २. अल्याडचे लोक म्हणतील की इथल्या सुविधा आणि साधन संपत्तीच्या जीवावर उच्च शिक्षण घेतले आणि थोड्या पैशासाठी इमान गहाण टाकुन गोर्‍यांच्या तुंबड्या भरताहेत झाले. मग इतकेच होते तर सब्सिडाइज्ड दरावर इथले शिक्षण घेताना लाज नाही का वाटली? ३. पल्याडचे लोक म्हणतील आमच्या जीवावर तुमच्या गमजा चालल्या आहेत. आम्ही परकीय गंगाजळी आणतो म्हणुन तुमचा बीओपी तग धरुन आहे नाहितर तुमचे हाला कुत्र्याने खाल्ले नसते. ४. पल्याडचे लोक म्हणतील इथल्या लोकांची सडकी मनोवृत्ती बदलायल तयार नाही. स्वतःला परदेशात जायला मिळाले नाही म्हणुन आमच्यावर जळतात. तुमची लायकी नाही म्हणुन तुम्हाला इकडे यायला जमले नाही. संधी मिळाली तर **णाला पाय लावुन इकडे यायला निघाल. ५. अल्याडचे लोक म्हणतील यांचे नखरे बघा. १० दिवसांसाठी येतात तर इथले प्रदूषण, लोकसंख्या, अस्व्च्छता यावर लेक्चर झोडुन जातात. जन्मतःच महालात उठले होते जणू. अर्रे वयाची २० -३० वर्षे इथेच काढलीत ना? एवढेच असेल तर या ना इथे आणि बदला परिस्थिती. ६. पल्याडचे लोक म्हणतील यांना सुधारण्याची इच्छाच नाही हो. कंस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सहनच करु शकत नाहित हे. ७. अल्याडचे लोक म्हणतील आमची संस्कृती, आमचे देशप्रेम भॉ भॉ भॉ. पल्याडचे लोक म्हणतील आमची प्रगती, आम्चे योगदान भॉ भॉ भॉ. ३ -४ दिवसांची निश्चिंती केली गविंनी.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 03/18/2015 - 07:09 नवीन
..हे सर्व अपेक्षित नाही..लोक कसे वागतात ते जाणायचेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
स्पा Wed, 03/18/2015 - 07:08 नवीन
तेच म्हटल बर्याच दिवसात निवासी - अनिवासी वाद झालेला नाही आता येणार मजा पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच कमीत कमी ३०० कुठे नाही गेले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 03/18/2015 - 07:11 नवीन
गांव बसा नही के डाकू आ गये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/18/2015 - 07:46 नवीन
पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच कमीत कमी ३०० कुठे नाही गेले
>>> Image removed. ========================== मी पण...मी पण .. बसणार आता..पां डुब्बा च्या शेजारी! पॉपकॉर्णं घेऊण! =)) पण एकंदरीत ते ही कमी पडतील्,असं वाट्ट्य. म्हणून मग ज्येवानच घेऊण बसू... Image removed. ...कसे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
कपिलमुनी Wed, 03/18/2015 - 07:13 नवीन
बाकी मोदी सर्व एन आर आय लोकांचा फारच लांगुललाचन करतात बॉ !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 07:20 नवीन
धागा धुमसायला लागण्याआधीच येवढ्या समिधा टाकू नये. त्यांच्या भाराखाली विझून जाईल ना तो :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/18/2015 - 08:06 नवीन
@त्यांच्या भाराखाली विझून जाईल ना तो SmileWink>> सहमत आहे मी पण! ;) पन मी काय म्हन्तो? कशाला ते एन.आय.आर.वर एव्हढं कुणी(कुणी ;) ) चिडायचं? :-/ एनाराय भारतात आलेले कित्ती चांगलं! आंम्हाला मस्त चॉकलेट देतात...दक्षिणेबरोबर. =================== एनाराय आवक संघाचा समर् थकः- अतृप्तभट आत्मावाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय Wed, 03/18/2015 - 07:21 नवीन
आर आय - एन आर आय खिचडी मध्ये मोदींचा तडका बसला तर धाग्याचे काश्मीर काय पार आयसिस, इराक, बोको हराम होइल हो. नका हो नका इतके बाँब एकत्र टाकु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे Wed, 03/18/2015 - 07:48 नवीन
रच्याकने-- "आर आय - एन आर आय" शिवाय एक अजून क्याटेगरी आहे "आर एन आय"( रेसिडेंट नॉन इंडियन). पैलतीरी नेत्र लावून बसलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चिनार Wed, 03/18/2015 - 08:10 नवीन
*dance4* *DANCE* :dance:*dance4* *DANCE* :dance: *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अगोचर Wed, 03/18/2015 - 16:10 नवीन
किन्वा परदेशात जाउन पार नागरिकत्व घेउन परत आलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
यसवायजी Wed, 03/18/2015 - 07:22 नवीन
मज्जा येणार निश्चित।
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/18/2015 - 08:32 नवीन
अंहं. "निच्छीत". ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कपिलमुनी Wed, 03/18/2015 - 07:36 नवीन
टिपीकल भेट येणार येणार म्हणून येण्याआधीच निवडणुका , पाउस यांची चर्चा असते तशीच चर्चा एनआरआयच्या भारत भेटीची असते. विदेशातपण भरपूर दंगल चाललेली असते . एका महिन्यात कोणाला भेटायच , सासरी किती दिवस - माहेरी किती दिवस यावरून तुम्बळ युद्ध झालेले असते . मागच्या ट्रीपमधले हिशोब व्याजासकट ऐकवले जातात ( कोणाला म्हणून विचारू नका ! संसारात ऐकणारा एकच ). बुकिंग झाला की खरेदीची गडबड सुरू होते . इथे लग्नामधले सूड घेतले जातात. "त्या वेळी - या वेळी" ची उजळणी होते . तोवर इकडून काय आणायचा याची यादी मिळालेली असते. फ्लिपकार्ट वर चेक केले तर तिकडेच स्वस्त आहे असं वाटतं पण नेला नाही तर "एवढे डॉलर्स कमावतो पण एक पैसा सुटत नाही " अश्या वाग्बाणांना घाबरून इकडेच खरेदी आटोपली जाते मधे मधे "आता बरी आठवण आली भावाची " यासारखे चिमटे निघत असतात. घरी कळते मूल असेल तर अजून धमाल असते . त्याचा इंडियन कल्चरचा क्रॅश कोर्स घेतला जातो . त्या बिचार्‍यला फक्त वाकून नमस्कार करायचा एवढाच लक्षात रहाते. सरते शेवटी घरादाराची व्यवस्था लावून कुटूंब भारतवारीस निघते. प्रवासात कंफर्टेबल म्हणून घातलेली बर्मुडा आणि मोठ्या बॅगा अशा थाटात उतरले की उकाड्यामुळे आणि झोप न झाल्यामुळे झालेला त्रासिक चेहरा पाहिला की न्यायला आलेल्यांपैकी एकजण म्हणतो , आपल्या देशात पाउल ठेवल की यांचा तोंड वाकड :) आणि सुरू होतो पार्ट : २
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 03/18/2015 - 07:50 नवीन
आमच्या माहितितले एनाराय हे बिझनेसमन वगैरे नसून आयटीच्या कृपेने ऑनसाइट जाउन आलेले लोक असल्याने.. चॉकलेट्स वगैरे आणतात पण गिफ्ट वगैरे खूप जवळच्यांसाठीच असतात.. घाउक सर्वांना नसतात.. तिकडेही सामान्य जीवन जगत असल्याने (इथल्या तुलनेत जास्त सुखवस्तु असलं तरिही) श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे खास बघितल्याच नाही.. इकडच्या रीअल इस्टेट्च्या वाढत्या भावाने आजकाल ४-५ वर्ष साठवलेले डॉलर्स देखिल कमी पडायला लागलेत ते कुठलं प्रदर्शन करत बसणार!! बाकी आल्या आल्या धूळ,उकाडा,ट्रॅफिक,शिस्त वगैरेच्या नावाने शंख होतो काही दिवस.. पण ते चालायचच..
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Wed, 03/18/2015 - 08:34 नवीन
सेम अनुभव आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ज
जेपी Wed, 03/18/2015 - 08:03 नवीन
एन आर आय मंजे प्रवासी भारतीय का ? (प्रवासी भारतीय) जेपी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/18/2015 - 08:09 नवीन
एकवेळ "एनआरआय" परवडले, पण "आरएनआय" अगदी डोक्यात जातात.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Wed, 03/18/2015 - 08:27 नवीन
मी काहि फार मुरलेला एन आर आय नाहिये, पण परदेशि येउन मला आता ३ वर्ष होतिल. ३ वर्षापुर्वि काहि कारणानि नोकरि बदलावि लागणार होति, तेव्हा मुंबईत (मी अर्थक्षेत्रात काम करत असल्यानि भारतात मुंबई हाच पर्याय आहे) मला नोकरि मिळालि नाहि म्हणुन ईकडे आलो. मी दर सहा महिन्यानि भारतात येतो आणी उरलेले दिवस त्या ट्रिप चि वाट पहाण्यात घालवतो. आल्या दिवसापासुन बाहेर मिळेल तिथे हादडत असतो. आणी फक्त मीच नाहि तर आमच्या ५ वर्षाच्या मुलीलाहि पाण्यचा आणि खाण्याचा काहि एक त्रास होत नाहि. भारतात मित्र आणि नातेवाईक भेटि हेच मुख्य आकर्षण असतं मला तरि. मी बहुधा पूर्ण दिवस घरि आई बाबांबरोबर घालवुन संध्याकाळी मित्र असा कार्यक्रम ठेवतो जास्तित जास्त दिवस. दोन तीनदा सिंहगड पण केला मित्र आणी भाऊ बहिणींसोबत. बाकि ईथे काय चांगलं आणि तिथे काय वाईट असले विचार मी कधिच केला नाहि. मी दहा वर्ष मुंबईत आणी आधि खुप वर्ष पुण्यात काढल्यानि ह्या दोन्हि शहरांचि खूप ओढ आहे. तसेच कदाचित ३च वर्ष झाल्यानि काहि फार बदल झालेत वगैरे पण कधि वाटत नाहि (फक्त टोल वाढलेत सोडुन). राहिलि गोष्ट गिफ्ट्स चि - मी घरातिल लहान मुलांना सोडुन काहि गिफ्ट आणत नाहि. कारण आता बहुतेक सगळ्या वस्तु भारतातच चांगल्या आणि स्वस्तहि मिळतात आणी मी हाडाचा कंजुश आहे ;) . मित्रांबरोबर कधि गिफ्ट्चा विषय पण निघत नाहि, बाकि चिडवा चिडवि मधे मला $ वाला म्हणुन एखादेवेळि तीर्थप्रसादाचे बिल भरावे लागते, पण ते त्याच ट्रिप मधे वसुल पण होते. शेवटि मला वाटत मैत्रिचे धागे किति पक्के आहेत ह्यावरच खूप गोष्टी अवलंबुन असतात. तेच नातेवाईकांबद्दल पण आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/18/2015 - 12:01 नवीन
अर्रर्र! पुण्याची पण ओढ आहे म्हणता?? सापडलातच आता तुम्ही पुण्याद्वेष्ट्यांच्या तावडीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 15:18 नवीन
"लक्षपूर्वक र्‍ह्स्वदीर्घ उलटे लिहीणे हा एनारायचा गुणधर्म असावा यावर संशोधनाला जागा आहे काय ?" असा संशय येण्याइतपत सबळ पुरावा मिळाला आहे. धन्यवाद ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 17:44 नवीन
ते अर्थशास्त्रात काम करत असल्याने उगाच इकडेतिकडे दीर्घ ईकार-ऊकार टाकून उधळमाधळ करायची त्यांना सवय नसावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 17:50 नवीन
शेवटी हसरी स्मायली :) टाकायची आणि ह. घ्या म्हणायचं र्‍हायलं. हो, तिच्यायला आजकाल मिपावर हे पण ल्ह्यायला लागतं!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ह
हाडक्या Wed, 03/18/2015 - 18:55 नवीन
हो, तिच्यायला
एकदा पुण्यातल्या रस्त्यावर सरळमार्गी अशा आम्हाला एका व्यक्तीचा जोराचा धक्का लागला आणि आमच्याकडून हा उद्गार अभावितपणे निघाला. त्या माणसाने अश्लील शिवीचा वापर केल्याचा आरोप करून दंगा सुरु केला. तो येऊन धडकला ते बाजूलाच आणि ही शिवी नाही म्हणून कचकून भांडावे लागले ते आठवले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सिरुसेरि Wed, 03/18/2015 - 10:50 नवीन
एन आर आय लोकांना सुरुवातीला विदेशात खुप कष्ट , त्रास सहन करावे लागले असतील याची कल्पना आहे. परदेशातील जीवन / राहणीमान पद्धती , छोटे मोठे जॉब्स करुन उच्चशिक्षण पुर्ण करणे , खर्च , कर्ज , होमसिकनेस , तब्येतीच्या तक्रारी ,कम्युनिकेशन ,नोकरी , व्यवसाय , आर्थिक मंदी , रेसिझम , त्यातुन निर्माण होणारे धोके ही सर्व आव्हाने रोजच्या रोज सांभाळुन कोणी जर तेथे टिकुन सुबत्ता मिळवत असेल तर अशांचा सत्कारच केला पाहिजे .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 03/18/2015 - 10:54 नवीन
आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संपादिका रेवती यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. सुगरण सानिकास्वप्निल यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 17:32 नवीन
आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
बसा, बसा! प्रतिक्षेत बसा!! पण आम्ही या एनाराय किंवा आरएनआय या दोन्ही कॅटेगरीत नसल्याने आम्हीही पॉपकॉर्न (चिकन) घेऊन बसलेलो आहोत!!! :) -पिवळा डांबिस (येनारनाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 18:01 नवीन
मंजे तुमी नक्की "पियाओ" आसनार ! चिकन चखण्याला चालतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 18:09 नवीन
येस! आम्ही 'खिलाओ-पिलाओ!' :) म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विकास Wed, 03/18/2015 - 18:13 नवीन
म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता. *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 18:56 नवीन
मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता.
नाय बॉ! उगीच खोटां कशाला बोलियाचां? आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी. तुम्हां बॉस्टन अमेरिकनांसारखे हाय-फाय शिरिमंत नाय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रदीप गुरुवार, 03/19/2015 - 06:25 नवीन
आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी. थंय टेक्सासवाल्यांनी सवतोसुभो मांडलेलो आयकलेलो आमी! आता ह्यां क्यॅलीफोर्नियाचां खूळ केव्हाक झालां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/19/2015 - 17:13 नवीन
हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां? तां काय नाय, "पोर्टलंड, वेगास, फिनिक्स सहित संयुक्त कॅलिफोर्निया झालाऽऽऽच पाहिजे!!!!" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 17:27 नवीन
एकीकडे कॅलिफोर्नियाचे ६ भाग करण्याची चळवळ जोम धरत असताना.... Image removed. संदर्भ - Petition to Split California Into Six States Gets Green Light
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/19/2015 - 17:34 नवीन
कॅलिफोर्नियात अशे अनेक चळवळी येकाच वेळी चालू असतंत! त्यातले आमी संयुक्त कॅलिफोर्नियावाले!! तुमकां तां लॉजिक कळूचां नाय. येकतर तुमच्याकडे माणसांच कमी आणि त्यातली निम्मी निरक्षर!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 17:38 नवीन
आमच्या हिकडं तसंबी यकाच ठिकानी राहून बी सहा-सहा महिने दोन ठिकानी राहन्याचा अनिभाव घितो. सहा महिने बर्फात लोळतो अन मग उरलेले सहा महिने तलावांच्या पाण्यात डुंबा डुंबा करतो :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/19/2015 - 17:49 नवीन
पाण्यात डुंबा डुंबा करतो
हॅपी डुंबा डुंबा टू यू!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खटपट्या गुरुवार, 03/19/2015 - 18:05 नवीन
पिडा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हय !! आयना का बायना घेतल्याशिवाय जायना.. आवाज कोनाचा.....वगैरे जय कॅलीफोर्निया. (जय कोकण (?))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 18:09 नवीन
पिडा नाय वो पिडां. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/19/2015 - 18:13 नवीन
या दुरुस्तीवद्द्ल तुमचे १०० अपराध माफ आहेत!! अनुस्वाराला खूप महत्व आहे. उदा. चाचा आनि चांचा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
व
विकास गुरुवार, 03/19/2015 - 18:17 नवीन
हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां? क्षमस्व, हा दोष माझा नाही तर बॉस्टनचा आहे. इथले पाणी प्यायल्याने तसा स्वभाव झाला असेल. *sorry2* तुमचे बरे आहे, कॅलिफोर्नियाचे पाणी प्यायचे म्हणजे... *mosking* (ह घ्या हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नंदन Wed, 03/18/2015 - 18:57 नवीन
म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! Wink
'बहुतेक' या शब्दावर आक्षेप. या निष्काळजीपणाबद्दल पिडांकाकांचा कॅडबरी डेरी मिल्क (भारतीय, भारी इ.) देऊन सत्कार करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
त
तिमा Wed, 03/18/2015 - 11:20 नवीन
तिथले अनुभव भरपूर ऐकले आहेत. ज्याची कष्ट करायची तयारी आहे आणि कित्येकदा विपरीत हवामानात जगण्याची तयारी आहे, अशा सर्वांना तिथे खूप छान वाटतं. रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक असली तरी हक्काचे शनिवार-रविवार मिळतात, त्यांतला एक वार घरातल्या कामांसाठी गेला तरी एक दिवस मौजमजा करायला मोकळा असतो. बाकी मुलांचे शिक्षण, संस्कार यावर स्पेशल लक्ष ठेवावे लागते. गिफ्ट मागणारे लोक प्रातिनिधिक वाटत नाहीत. खर्‍या जवळच्या लोकांना 'आपलं माणूस' किती दिवसांनी भेटलं, याचाच आनंद असतो. पण बहुतांशी नॉरेइं ना भारताची भावनिक गुंतवणूक असते आणि त्याच्या ओढीनेच ते येतात. माझ्यासारख्या आळशी आणि कामचुकार माणसांना मात्र, आपलाच देश रहायला चांगला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 03/18/2015 - 11:24 नवीन
रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक असली तरी हक्काचे शनिवार-रविवार मिळतात,
..हे वीकेंडचं खरंच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2015 - 17:41 नवीन
..हे वीकेंडचं खरंच आहे का?
तुम्ही 'नवरा' असाल तर अजिबात नाही!!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा