Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी उपवर तरुण असतो तर

श
श्रीरंग_जोशी
Sun, 03/22/2015 - 07:12
🗣 89 प्रतिसाद
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच. कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे. जसे आपल्याला शाळेत असताना निबंधाचे विषय असत, 'मी मुख्यमंत्री झालो तर' त्याचप्रमाणे 'मी उपवर तरुण असतो तर' मी काय केले असते या दिशेने विचार करू लागलो. तर सर्वप्रथम समस्येला शब्दबद्ध करूया. मी व्यवस्थित शिकून अन बऱ्यापैकी ठीकठाक नोकरी मिळवूनही लग्नाच्या बाजारामध्ये दुर्लक्षित आहे. कारणे बरीच असू शकतात जशी
  • माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अनेक उमेदवारांचे उत्पन्न अधिक असणे.
  • माझे बाह्यरूप सामान्य असल्याने माझे पटकन नजरेत न भरणे.
याखेरीज इतर अनेक कारणे जी तार्किकदृष्ट्या स्वतःला पटत नसली तरी त्यांच्याबद्दल बाऊ करून माझी समस्या कदापिही सुटणार नाही (उदा. लग्न जुळवताना पत्रिका बघणे, रोटीबेटी व्यवहारांमधला अतिरेक इत्यादी). तर ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या सोडून मी असे काय करू शकतो ज्याने मी या स्पर्धेत पुढे जाऊ शकेल? मी स्वतःमध्ये बदल करताना नेमके कोणते बदल करणे फायदेशीर ठरेल हा प्रश्न मनात आला. चांगली नोकरी, आर्थिक स्थैर्य यापलीकडे जाऊन उपवर तरुणींना काय आवडू शकेल हा प्रश्न महत्त्वाचा वाटला. गेल्या एकदोन दशकातली विवाहित जोडप्यांची उदाहरणे डोळ्यासमोर आणताच काही गोष्टी स्पष्टपणे जाणवू लागल्या. नवरा बायको दोघेही पूर्णवेळ नोकरी करतात अन चांगले पैसे कमावतात. पण घरातली कामे करताना बायकोवर पडणारा ताण कितीतरी अधिक असतो. घराची साफसफाई, स्वयंपाक अन मुलं सांभाळणे यात बहुतांश नवऱ्यांचा सहभाग त्यांच्या बायकांना खूपच कमी वाटतो. या बाबतीत जर मी काही आश्वासक गुण दाखवू शकत असेल तर कदाचित लग्नाच्या बाजारामधली माझी किंमत वाढू शकते. तर सर्वप्रथम कधी कधी उपाशी राहावे लागू नये म्हणून थोडाबहुत स्वयंपाक करणे यापासून आठवड्यातले पाच ते सहा दिवस संध्याकाळी तरी नियमितपणे स्वयंपाकाची सवय करणे. नेहमीच्या साध्या घरगुती पदार्थ बनवण्याचा व्यवस्थित सराव झाल्यानंतर बनवायला जरा अवघड पण बहुतांश खवय्यांना आकर्षण वाटेल. असे पदार्थ जमेल तेव्हा बनवून पाहणे. यूट्यूबवरील या विषयावरचे व्हिडिओजतर खूपच मार्गदर्शक ठरू शकतात. स्वतःचे घर टापटीप ठेवणे व जुजबी का होईना सजावट करणे (येथे मी नोकरीनिमित्त आईवडीलापासून लांब दुसऱ्या शहरात भाड्याचे घर घेऊन राहतोय हे अध्याहृत आहे). याबाबतीत स्वतःला शिस्त लावून घेणे सर्वाधिक महत्त्वाचे. स्वच्छतेच्या कामाचे दडपण येईल इतकी वेळ येऊ न देणे हे केव्हाही इष्ट. मुले सांभाळण्याची सवय - या गोष्टीचा सराव मिळणे तसे सोपे नाही पण शक्य झाल्यास जवळच्या नातेवाइकांच्या बाळांचे अन लहान मुलांचे बेबीसिटींग करणे. या गोष्टीची संधी नेहमी मिळणार नाही पण जेव्हाही मिळेल गमवू नये. याखेरीज उपवर तरुणींच्या प्राथमिक अपेक्षांमध्ये नसतील पण अशी कौशल्ये विकसीत करणे ज्याने आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
  • जसे स्वतःचे काटोकोर आर्थिक नियोजन.
  • घरातील खर्चांची संगणकीकृत नोंद ठेवणे अन ठराविक काळानंतर त्या आकडेवारीचे विश्लेषण करणे.
  • घरातील नेहमी न लागणाऱ्या वस्तू, कागदपत्रे या ठराविक ठिकाणीच ठेवून शक्य तेवढे त्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे गरजेच्या वेळी एखादी वस्तू चटकन हाती लागेल.
हे सर्व करताना नोकरीतील कामावर दुर्लक्ष होऊ न देणे हे फार महत्त्वाचे. अन या गोष्टी आपल्याला आयुष्यभरच करायच्या आहेत अशी मानसिकता बनवणे. कारण केवळ दिखाव्यापुरते केल्यास विवाह तर जुळेल पण संसार सुरळीत चालण्याची शक्यता फारच कमी. कसंही करून लग्नाच्या बंधनात अडकण्याचा काळ कधीच गेला. लग्नानंतर पटले नाही म्हणून काडीमोड घेण्याकडे आजकाल पूर्वीसारखे नकारात्मकतेने पाहिले जात नाही. त्यामुळे स्वतःतले हे बदल केवळ लग्नाच्या बाजारात स्पर्धकांच्या पुढे जाण्यापेक्षा यशस्वी संसार करण्याच्या उद्देशाने केल्यास कायमस्वरूपी लाभ होईल. कारण संसार अयशस्वी होण्यासाठी कितीतरी घटक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात ज्यामध्ये आपण फारसे काही करू शकत नाही. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये व जोडीदारामध्ये पुरेपूर सामंजस्य निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला जोडीदार इतर सर्वसाधारण नवऱ्यांपेक्षा अधिक गंभीर आहे ही भावना निर्माण करता येणे गरजेचे आहे. माझ्या सुदैवाने या सगळ्या अग्निदिव्यातून मला जावे लागले नसले तरी एक आश्वासक जोडीदार म्हणून स्वतःमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करत राहणे हे माझे परम कर्तव्य आहेच. तर मंडळी तुम्ही स्वतःला या आव्हानाच्या केंद्रस्थानी ठेवून बघा अन सांगा काय उपाय सुचतात ते. या निमित्ताने या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या सर्व उपवर तरुण तरुणींना मनपूर्वक शुभेच्छा!!

प्रतिक्रिया द्या
27632 वाचन

💬 प्रतिसाद (89)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 03/22/2015 - 07:26 नवीन
शिर्षक वाचून वाटल होत की मिपावरच्या सध्याच्या ट्रेंड प्रमाणे, जोशीसरांनाही आता आत्मवृत्त लिहायची हुक्की आली की काय? रच्याकने:-लग्न करणे खरोखर इतके गरजेचे आहे का? (लग्न केल्यानंतर मतपरिवर्तन झालेला)पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/23/2015 - 09:49 नवीन
लग्न करणे खरोखर इतके गरजेचे आहे का?
हेच म्हणतो!! (लग्न झालेल्यांची आणि होऊ घातलेल्यांची अवस्था बघून विचारात पडलेला)- सूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ट
टवाळ कार्टा Mon, 03/23/2015 - 10:01 नवीन
तुला तुझ्यासारखीच मिळाली तर काय होईल याचा विचार केलास का आधी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 03/23/2015 - 10:30 नवीन
माझ्यासारखी म्हणजे कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Tue, 03/24/2015 - 11:09 नवीन
टक्या, उत्तर देतोयेस ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Tue, 03/24/2015 - 11:14 नवीन
फ्रस्टेट *blum3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 03/24/2015 - 11:15 नवीन
गप्रांव मेल्या, इथे नायतर व्हॉट्स अ‍ॅपवर पकडेन त्याला. उत्तर मिळवीन येवढं खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Tue, 03/24/2015 - 11:39 नवीन
वर मिळाले ना उत्तर...बघ सग्गळ्यांना माहीत आहे तु कस्साय ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Sun, 03/22/2015 - 07:28 नवीन
लोल फारच भाबडॅ आहात तुम्हि जोशिबुआ
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 03/23/2015 - 10:48 नवीन
अरे टका नशीब त्यांनी भार्यासन ( इथे काहीही नाही ये. हम्म आले लगेच +)) ) करायला नाही सांगितले ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 03/23/2015 - 11:01 नवीन
कुठे आहे भार्यासनाची माहिती....व्यनीतून सांग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रमोद देर्देकर Tue, 03/24/2015 - 04:48 नवीन
एवढा घाई कशाला करतोस रे. तुझं लग्न जमलं की सांग. लग्न झाल्यानंरच हे आसन करायचे असते. मग बायको सुखी आणि पर्यायाने एकंदर संसार सुखी. +))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एसमाळी Sun, 03/22/2015 - 08:05 नवीन
रंगा शेठ काय हे ???? (संन्यस्त होण्याचा मार्गावर) जेपी
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 03/22/2015 - 10:59 नवीन
मालीबुवा गल्ली चुकलांव काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एसमाळी
ब
बॅटमॅन Sun, 03/22/2015 - 15:43 नवीन
रंगा शेठ काय हे ???? एसमाळी - Sun, 22/03/2015 - 12:35 रंगा शेठ काय हे ???? (संन्यस्त होण्याचा मार्गावर) जेपी डुआयडी स्वतःच उघड केल्याबद्दल एसमाळी ऊर्फ जेपी यांचे कचकून अभिनंदन - की हबिणंडण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एसमाळी
ह
हाडक्या Sun, 03/22/2015 - 16:16 नवीन
:)))) .. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Mon, 03/23/2015 - 02:41 नवीन
+)) बाकी डुआयडी लैच सोज्वळ हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
अ
अजया Mon, 03/23/2015 - 10:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 14:31 नवीन
जेपी, साधा आहेस हे माहीती होतं. भोळाही आहेस हे आज कळलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एसमाळी
स
सूड Wed, 05/11/2016 - 14:39 नवीन
अगदी!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी Wed, 05/11/2016 - 14:47 नवीन
चालु द्या.. कुंथा आता हुंब..हुंब..हुंब=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
न
नगरीनिरंजन Sun, 03/22/2015 - 08:15 नवीन
नोकरीनिमित्त आईवडीलापासून लांब दुसऱ्या शहरात भाड्याचे घर घेऊन राहतोय हे अध्याहृत आहे
ही तर बेसिक गरज आहे राव! एकाच शहरात असले तरी. आणि भाड्याचे घर? च् च् च्. बाकी स्वतःत बदल करण्याची इतकी तयारी दाखवली तर लग्नानंतर काही वर्षांतच आई-वडिल व मित्रमंडळींनाही ओळखू यायचा नाहीत. आहे तसं स्विकारणारी मिळाली तर करा नाहीतर लग्न झालंच पाहिजे असा काही दैवी आदेश नसतो.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 03/22/2015 - 13:33 नवीन
If the shoe doesn't fit, must we change the foot?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
व
विवेकपटाईत Sun, 03/22/2015 - 08:43 नवीन
जोशी बुआ (?) १. घरातले कामे नवरा बायकांना आवडत नाही. निदान पहिल्यावर्षी तरी घरातल्या कुठल्या ही कामाला हात लाऊ नये (अनुभवाचे बोल). नंतर हळू हळू एक एक काम तुमच्या डोक्स्यावर बायको घालणारच. जमेल तेवढा विरोध कर २. लग्न जुळवताना पत्रिका बघणे, रोटीबेटी व्यवहारांमधला अतिरेक इत्यादी फालतू गोष्टी विसराव्या. बर्या पैकी कमविणारी असेल तर पत्रिकेतल्या राहू केतू शनी मंगल सर्वांकडे दुर्लक्ष करावे. भरपूर पैसा सुख मिळण्याची ग्यारंटी. (हे ही अनुभवाचे बोल - बायको नौकरी न करणारी आहे, एका सरकारी कार्मचारीला दिल्ली सारख्या शहरात एका पगारवा कसे जीवन जगावे लागले याचा अनुभव - खैर आता लवकरच लग्नाला ३० वर्ष पूर्ण होतील ).
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 03/22/2015 - 09:27 नवीन
लग्न जुळवताना पत्रिका बघणे, रोटीबेटी व्यवहारांमधला अतिरेक इत्यादी फालतू गोष्टी विसराव्या
एवढी एक ओळ सोडली तर, दोन्ही सल्ले एकांगी आणि न पटणारे आहेत. आमलात आणले तर लग्न अयशस्वी होण्याची १००% खात्री देता येईल. (घरातले पडेल ते काम करणारा)पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
क
कवितानागेश Sun, 03/22/2015 - 10:40 नवीन
उपवधू असा शब्द आहे. :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 03/22/2015 - 11:13 नवीन
असे काही लग्न न जमण्याचे खरेखुरे प्रश्न सोडवण्यासाठी दादा /ताई/वहिनी/? सल्ला सुरू करावा का ?
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/22/2015 - 12:26 नवीन
जुईचे अभिनंदन! ;)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 03/22/2015 - 12:30 नवीन
शिररंग भौ काहाले आपुन वापस थे इमेजिन कराव म्हणतो म्या!!! आता आपुन उपवर नाई खपेल हाओ हे पक्के हाय न बापा!! ज्याले चिंता आसन तो त्याचे पाहुन घिन ना!!! आपुन आपलं गजानन बाबा की जय म्हणाव अन सरके बायको न सांगतलेले भांडे घासाव!!!
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 03/22/2015 - 13:18 नवीन
कित्ती चान चान, गोग्गोड लिहिलय. मेरे हात की शिकरण लागू तुमको रंगा भाय. -- सॆपाकात अचानक रस निर्माण जहालेला ईस्पा
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/22/2015 - 17:08 नवीन
कांदेपोहे संपले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पियुशा Wed, 03/25/2015 - 12:07 नवीन
ओह अच्चा अच्चा तलिच्च तु सैपाक शिकतोयेस ना मन्या :) शिकरण के साथ मटारउसल भी मान्गता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/25/2015 - 13:25 नवीन
आता मज्जा येणार मज्जा! =)) वेटींग फॉर पां डुब्बा'ज उत्तर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
ख
खटपट्या Sun, 03/22/2015 - 17:18 नवीन
अरेरे, हा लेख १४ वर्षे उशीरा आलाय.. आणि आला असता तरी फायदा नव्हता.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 03/22/2015 - 17:21 नवीन
निबंध लेखन सर्धेत तुम्हाला पहिला नंबर नेहमीच मिळत असनार :-)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 03/22/2015 - 20:11 नवीन
नाही. त्यासाठी शेवट कवितेच्या ओळींनी होणे आवश्यक आहे. उदा. "अशीच अमुची आई असती सुंदर रूपमती" किंवा "मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची" (टीप- कवितेच्या चरणाचा आणि निबंधाच्या देहाचा काहीच संबंध नसला तरी चालतं. आपण नाही सगळ्या शर्टवर काळे बूट घालत?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
स
स्वप्नांची राणी Sun, 03/22/2015 - 17:41 नवीन
मनःपुर्वक अभीनंदन, भावा!!! यू आर ऑन दा राईट ट्रॅक!! टीकोजीराव, शिका काहितरी यांच्याकडून!
आहे तसं स्विकारणारी मिळाली तर करा
यात ईतकच अ‍ॅड करते की जे शोधताहेत, त्यांना मीळालीच तर तिला पण जशी आहे तशी स्विकारा. आणि १८५७ साली लग्न केलेल्यांचे सल्ले बिनदीक्कत फाट्यावर मारा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/23/2015 - 06:16 नवीन
टीकोजीराव
कोण हो कोण हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Tue, 03/24/2015 - 11:00 नवीन
नाम म्हणून पाहिलत तर तेच हो ते अनाहितांचे लाडके वगैरे वगैरे! विशेषण म्हणून पाहिलत तर मात्र अखिल बम्हाण्डातले झ्युस येतिल त्यात....मिपा, माबो, ऐसी वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Tue, 03/24/2015 - 11:40 नवीन
अग्गाग्गा काय ते कौतिक उतू जातेय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Tue, 03/24/2015 - 14:38 नवीन
टका...लगेच मातू नकोस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Tue, 03/24/2015 - 14:47 नवीन
टक्याचं सोडा हो, अगोदर ते अनाहितांचे लाडके कोण हे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा Tue, 03/24/2015 - 15:36 नवीन
तसे नै ओ...असे अनाहितांनी कौतुक केले की जरा शंका येते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ब
बॅटमॅन Tue, 03/24/2015 - 12:12 नवीन
अनाहितांचे लाडके आणि कोण आता? काय समजेना, अधिक मार्गदर्शन करावे ही विनंती. (विदोत्सुक) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
श
शेखर काळे Mon, 03/23/2015 - 02:18 नवीन
अहो .. तुम्हाला वर हवाय की वधू? वर हवा असेल तर जरा वेगळा विचार करावा लागेल ...
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 03/23/2015 - 02:45 नवीन
हे लग्नाआधी करायचे की लग्नानंतर ? +D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/23/2015 - 06:57 नवीन
@ हे लग्नाआधी करायचे की लग्नानंतर ?>>> :-D लग्ना ऐवजि! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/23/2015 - 04:14 नवीन
काँपिटिशन वाढली असती एका नंबरानी =))
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 03/23/2015 - 05:25 नवीन
स्नेहांकिताशी सहमत … आणि माझाही हाच प्रश्न… स्वयपाक करणे, मुले संभाळणे आणि घर नीटनेटके ठेवणे या लग्ना नंतर निदर्शनास येणाऱ्या गोष्टी आहेत… लग्न ठरण्यासाठी याचा उपयोग कसा करायचा … मुलीला आधीच सांगायचे का कि मला मुले सांभाळायची सवय आहे नि मी जेवण बनवतो कि मुलीकडच्यांना लग्ना आधी जेवायला बोलवून असे सांगायचे "आमच्या विनोदला (काल्पनिक नाव) सगळा स्वपाक बनवता येतो " अजून एक प्रश्न … लग्नासाठीची उपयुक्तता शिवणकाम भरतकाम साडीला फॉल लावणे अशा गोष्टी शिकण्याबद्दल काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 03/23/2015 - 14:37 नवीन
विनोदला (काल्पनिक नाव)
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा