मी उपवर तरुण असतो तर
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय
हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.
जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच.
कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे. जसे आपल्याला शाळेत असताना निबंधाचे विषय असत, 'मी मुख्यमंत्री झालो तर' त्याचप्रमाणे 'मी उपवर तरुण असतो तर' मी काय केले असते या दिशेने विचार करू लागलो.
तर सर्वप्रथम समस्येला शब्दबद्ध करूया.
मी व्यवस्थित शिकून अन बऱ्यापैकी ठीकठाक नोकरी मिळवूनही लग्नाच्या बाजारामध्ये दुर्लक्षित आहे. कारणे बरीच असू शकतात जशी
- माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अनेक उमेदवारांचे उत्पन्न अधिक असणे.
- माझे बाह्यरूप सामान्य असल्याने माझे पटकन नजरेत न भरणे.
- जसे स्वतःचे काटोकोर आर्थिक नियोजन.
- घरातील खर्चांची संगणकीकृत नोंद ठेवणे अन ठराविक काळानंतर त्या आकडेवारीचे विश्लेषण करणे.
- घरातील नेहमी न लागणाऱ्या वस्तू, कागदपत्रे या ठराविक ठिकाणीच ठेवून शक्य तेवढे त्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे गरजेच्या वेळी एखादी वस्तू चटकन हाती लागेल.
लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो तर...हा सगळा उपवर तरूणांच्या जर, तर वरचा लेख आहे... तेव्हा त्यांना 'वर' देणे गैरकायदेशीर नसले (आणि माझी त्याला हरकतही असू शकत नसली) तरी ते समस्यापूर्ण असू शकते... इतकेच म्हणायचे होते :) ;)- ठरवून विवाह करण्याच्या प्रक्रियेचा मला शून्य अनुभव आहे.
- अन माझ्या मते क्षमता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे एकदा ती निर्माण झाल्यावर त्याबाबत प्रसिद्धी करण्याचे मार्ग शोधणे फारसे अवघड नसते. कष्टाने जे कौशल्य मिळवले असते त्याची लक्षणे वागण्याबोलण्यातून अन सकारात्मक देहबोलीतून आपोआपच दिसू लागतात.
बाकी या प्रक्रियेत जे मार्ग वापरले जातात जसे बायोडाटा, मॅट्रिमोनियल साइटसवरच्या प्रोफाइलमध्ये उल्लेख करणे वगैरे हा पर्याय आहेच. बाकी मला जे स्वतःला करायला जमलं असतं तेच मी सुचवलं आहे. हे प्रत्येकासाठी उपयोगी ठरेलच असे काही आवश्यक नाही. एकाही प्रतिसादात इतर कुणी स्वतः काय केले असते हे लिहिण्यास प्रवृत्त झाले नाही हे या लेखनाचे अपयश आहे.