Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं. ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत वीरगर्जना कडक घुमली; लोकं थिरकली; लोकं शहारली. या वादनाची मी टिपलेली काही छायाचित्रं इथे देत आहे. सहभागी होण्यासाठी फेसबुक ग्रूपचा पत्ता हा ब्लॉग दुवा हा 1 2 3 4 5 6 7 8 9
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पुरे झाला तुझा आगलावेपणा! तुझ्यासाठी अज्जूनही स्थळे शोधण्याची ताकद माझ्यात आहे हे विसरू नकोस. ;) आता उगीच सन्यासच कसा चांगला हे सांगू नकोस.

सगळे सण.. गणपती, शिवजयंती, दिवाळी, दुर्गाष्टमी, आंबेडकर जयंती, मुहर्रम, फर्स्ट इयर, सगळे बर्थडेज पब्लिक पद्धतीनं साजरे करायला कायद्यानं आणि बळाचा वापर करून बंदी आणली पाहिजे. तुमचा धर्म तुमच्या घरात. रस्त्यावर नको. इथं आधी एक गणपती म्हणजेच फक्त त्रास होता आता सगळ्या सणांना हे बेक्कार लोक डीजे आणि ढोल ताशे घेवून फिरतात. ज्यांना एवढंच नाचायचंय त्यांची रग उतरवायला पोलिसांनी सगळ्यांना परेड करून रस्त्यातले खड्डे भरायच्या आणि ट्रॅफिक मॅनेज करायच्या कामाला जुंपलं पाहिजे. जबरदस्तीनं. डेली त्रास साला.

बरं. मात्र; तुमच्यासारख्यांनी १) आताच्या मुलांना काही संस्कृती/परंपरा माहिती नाहीत २) आमच्यावेळी काय धमाल असायची गणपतीत ३) हे शहरातले सण कसले चार भिंतीतले! असल्या बोंबा मारायच्या नाहीत हं.

सहमत. बाकी गूगलमध्ये नवरोजचे डूडल आल्याने आणि गुढीपाडव्याचे न आल्याने 'मराठी माणसाला' नक्की काय फरक पडला आहे बॉ?

नुसताच आवाज वाढवण्यापेक्षा एकजूट अधिक महत्वाची. ज्याप्रमाणे त्यांचे सण एकाच दिवशी एकाच दिशेला तोंड करून देशभरात साजरे केले जातात तसे आपले किती सण आहेत? स्वत:च्या अनुयायांना एकत्र येण्याची प्रेरणा धर्मच देऊ शकत नसेल तर असले तात्पुरते उपाय योजणे भागच पडते. नुसता आवाज वाढवून कट्टरता निर्माण करता येत नाही. धर्माधारित राष्ट्रवाद जनतेच्या गळी उतरवण्याआधी मुळात धर्माबद्दल अनुयायांच्या मनात कितपत आदर आहे हे तपासले पाहिजे. प्रत्येक वेळी इतर धर्मियांच्या आक्रमक वृत्तीच्या भयानेच जर आमचा धर्माभिमान उफाळून येणार असेल तर आमच्या धर्माशी आमचे नेमके नाते काय हा प्रश्न विचारणे अतिशय गरजेचे आहे.

हाफशेंच्युरी निमीत्त फक्त श्री.वेल्लाभट यांचा सत्कार आsssऑsssऑsssआ अशी गर्जना करुन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते. चला आजचा कोटा संपला *wink*

हातिजायला. गुढीपाडवा,स्वागतयात्रा,ढोलताशे,आपले सण्,गूगल डूडल इथपासून विषय सज्जनपणा,सत्कार्,सन्यास इथवर गेलाय तर. जय हो! उठसुठ म्हणजे निवडणूक जिंकल्यावर, लग्न इत्यादी वेळी पारंपारिक ढोलताशे वाजवून (घेऊन) त्यांची एक्स्क्लुजिविटी गेलीय याचा मलाही त्रास होतो. जातिवंत पथकं त्याबाबत काळजी घेतात हेही नमूद करतो. (जातिवंत म्हणजे काय यावर चर्चा रंगेल अशी अपेक्षा आहेच) पण ज्या पथकांनी बिजनेस म्हणूनच याकडे बघितलंय, त्यांना वाढदिवस काय किंवा शोकसभा काय. ढोलताशे वाजवतील ते. पण हा विषयच वेगळा आहे. गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेचे फोटो टाकले होते राव ! कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा !?!

वेल्लाभटच्या मतांशी सहमत आहे. कधीही बघा हिंदुंच्या सणवारांवरच गदा आणायचा प्रयत्न होतो. म्हणे दिवाळीला फटाके फोडु नका. सालं भकाभका सिग्रेटचा धुर काढणार्‍या, गाड्या विनाकारण उडवणार्‍या लोकांकडुन असे सल्ले ऐकले की डोकं फिरतं. हां असं म्हणा की कर्णकर्कश्श आवाजाचे फटाके उडवु नका. ध्वनिप्रदुषण बंदिच्या जागांवर फटाके उडवु नका.. हे ठिक आहे. एक लिमिटेड सण ठरवा ज्यात मिरवणुका काढायला परवानगी द्या जसं की गणपतीविसर्जन, वीरगर्जना, महाराष्ट्र दिन, संघाची जांबोरी वगैरे. बाकी तोरणाच्या मिरवणुका वगैरे नव्या टाकाउ प्रथा आणु इच्छिणार्‍यांच्या पार्श्वभागावर पोकळ बांबुचे फटके दिले तरी काही हरकत नाही. ते डी.जे. बी.जे. वर बंदी घाला. फक्त पारंपारिक वाद्य हाच एक निकष ठेवा. आणि सर्व धर्मांना समान नियम असु द्या. नाहीतर पुढाकार घेउन पहाटे पहाटे जोरदार आवाजात काकड आरत्या चळवळ सुरु करावी लागेल. ते मधे एक बातमी वाचलेली संभाजी ब्रिगेडमुळे एका गावात गुढ्या उभारल्या गेल्या नाहीत. आपल्या प्रथा संपवुन टाकायचा हा डाव आहे. हिंदु परंपरांच पालन करायलाच पाहिजे. आपले सण दुसर्‍याला त्रास नं होउ देता साजरे केलेच पाहिजेत.

सर्व धर्मांना समान नियम असु द्या. शांत आवाजात सनई सह मिरवणूक ठीक आहे. पण ढोल बडवीत लोकांना कानठळ्या बसविण्यात कोणती संस्कृती आहे? एका विशिष्ट पातळीच्या वर ध्वनी प्रदूषणाला परवानगी देऊच नये. कुणाचाही सण असो बारसे असो कि मयत असो. आणि ध्वनिप्रदूषण केल्यास सज्जड असा दंड म्हणजे दर एक मिनिटाला २५ हजार रुपये सारखा ठेवा. एक तासाला पंधरा लाख रुपये दंड भरून किती लोक संस्कृतीचे रक्षण करू इच्छितात ते तरी पाहू. ठणठणाट आवाज करणे कोणत्या संस्कृतीत बसते? पारंपारिक संस्कृती म्हणायचे आणि आधुनिक विज्ञानातील उपकरणे वापरून भयानक आवाज करायचा याला संपूर्ण आळा बसला पाहिजे. मग तो मोहरम असो कि गणेशोत्सव.

+११११ जुन्या काळात जेव्हा ढोल वाजवायचे...त्यावेळेस सामान्य जीवनात ध्वनीप्रदूषणाचा त्रास नव्हताच त्यामुळे ढोल कितीही जोरात बडवला तरी त्याचा त्रास तुलनेने कमी असावा

तो मोहरम असो कि गणेशोत्सव.
अगदी, फक्त तथाकथित अल्पसंख्यांकांनी 'आईऽऽऽ, माझं चॉकलेट घेतलंऽऽऽऽ' टाईप भोकांड पसरत रडारड सुरु केली की ती रडारड थांबवून नियम कसे गळी उतरवायचे याचाही बॅक अप प्लान रेडी असला पाह्यजे.