Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असह्य हा उकाडा...

ब
बाप्पू
Wed, 03/25/2015 - 18:07
🗣 209 प्रतिसाद
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न - १ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? २ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ? ३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल ६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?

प्रतिक्रिया द्या
40485 वाचन

💬 प्रतिसाद (209)
स
सुनील गुरुवार, 03/26/2015 - 04:29 नवीन
काही उत्तरे -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
पास
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
तुम्ही जर मुंबईत/मुंबईजवळ (समुद्रकिनार्‍यालगत) राहात असाल तर कूलरपेक्षा एसी बरा पडेल
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
पास
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
तुमच्या रूमची साइझ पाहता किमान १ टनाचा एसी तरी लावावा लागेल. एसी भिंतीवर वरच्या बाजूस लावा. बाहेरून हवा येण्याचे सर्व मार्ग (खिडक्या-दारे) पूर्णपणे बंद होतील हे पहा. एसी शक्यतो BEE ५ स्टार्सचा घ्या. तापमान २४-२६ डिग्री सेल्सियसवर सेट करा.
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
कूलर्स - पास एसी - बरेच आहेत जसे की विदेशींमध्ये सॅमसंग, हिताची आणि देशींमध्ये वोल्टास
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
हवेत दमटपणा वाढतो. तापमान फार नसले तरी उकाडा जाणवतो. अस्वस्थता वाढते (किमान माझी तरी!). इतर वस्तूंवर काय परिणाम होतात ते ठाऊक नाही/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/26/2015 - 04:52 नवीन
मुंबई सारख्या दमात हवामानात कूलर काम का करत नाहीत? पहा http://www.nbc11news.com/home/headlines/Humidity_makes_swamp_coolers_ineffective_125246814.html http://en.wikipedia.org/wiki/Evaporative_cooler
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 03/26/2015 - 05:21 नवीन
असा काही घरगुती उपाय करता येतो का ते पहा ... Homemade AC : https://www.youtube.com/watch?v=5NZ-2KcAF_0 https://www.youtube.com/watch?v=-NcUDMpk6ms
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 03/26/2015 - 06:12 नवीन
काहीही घ्या पण क्रोमा मधुन घेवु नका.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/26/2015 - 07:31 नवीन
का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
स
स्पा गुरुवार, 03/26/2015 - 08:23 नवीन
काही उपाय झोपण्या पूर्वी बर्फ घातलेल्या पाण्यात पाय बुडवून बसा , शरीराचे तापमान झटकन खाली येईल झोपण्यापूर्वी मनगटावर ,मानेभोवती,थंड रुमालाच्या पट्ट्या ठेवा.बरंच फरक पडेल तळपायाला , डोळ्यांना , कपाळाला "कैलास जीवन " चोपडा तळपायाला काशाची वाटी घेऊन खोबरेल तेल लावून अभ्यंग करा , पाय जितके काळे होतील तितकी हिट बाहेर पडेल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/26/2015 - 11:02 नवीन
+++१११ टु पांडुब्बा! मलाहि उन्हाळयाचा त्रास होतोच. आमच्या कामामुळे. बाहेर उन्हातून जायचे .कधिही केंव्हाही आणि कुठेही..आणि वर परत या उन्हाळ्याच्या सिझन मधे जास्तीत जास्त होमहवनाची कामे असतात. लग्न/मुंज/वास्तुशांत..मग आंम्ही बाहेर एक,आणि यजमान घरी ही दुसरी हिट-खातो. यावर मी करत असलेले काहि मस्त फलित देणारे उपाय.. त्यातला बर्फपाण्याच्या बादलीत पाय बुडवुन बसणे..हा वर आलेलाच आहे. शिवाय रोज गुलकंद खाण्यात ठेवणे..(तो जर पत्रीखडीसाखर्,वापरून आणि गावरान गुलाबापासून घरीच केलात्,तर अतीउत्तम!) उन्हातून आल्यावर लिंबा एव्हढा लाल गुळाचा खडा खाऊन..वर दोन तांबे (साधे) पाणी पिणे. आणि चेहेरा, पायाचे तळवे..याला मुलतानी माती(गोपिचंदन..) याचा लेप-करणे. हे नित्य केलं...तर ४० डिग्रीच्या वरचा उन्हाळापण बरा जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
आ
आयुर्हित गुरुवार, 03/26/2015 - 11:03 नवीन
पेट को रखो नरम और पैर को रखो गरम, सर को रखो ठंडा नही तो पडेगा दंडा| असेच ऐकले आहे... त्यामुळे "झोपण्या पूर्वी बर्फ घातलेल्या पाण्यात पाय बुडवून बसा" हे जरा चुकीचे वाटते. पंखा चालवण्याने पाय थंड होतात व त्यामुळे दुखतात. माझ्या मते आपण कंबरेपर्यंत पांघरून घेवून झोपावे, जेणेकरून पाय दुखणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
र
रुस्तम गुरुवार, 03/26/2015 - 11:54 नवीन
=)) मला वाटल व्यनि करायला सांगताय की काय पाय दुखीवर उपाय सांगायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/26/2015 - 11:58 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
अ
असंका गुरुवार, 03/26/2015 - 14:54 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
ब
बाळ सप्रे गुरुवार, 03/26/2015 - 15:37 नवीन
बाय द वे व्यनि मधे तरी हे उपाय सांगतात की तिथे क्लिनिकला येउन भेटा असं सांगतात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
र
रुस्तम गुरुवार, 03/26/2015 - 15:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ख
खंडेराव Tue, 03/31/2015 - 18:48 नवीन
महान लोक आहात. खुदकन हसु आले प्रतिक्रिया वाचुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
स
स्पा गुरुवार, 03/26/2015 - 13:21 नवीन
पेट को रखो नरम और पैर को रखो गरम, सर को रखो ठंडा नही तो पडेगा दंडा|
काका , ऋतूनुसार वागावे हो, कोणी काहीतरी म्हटले म्हणून तेच बरोबर असे नसते. आईस बकेट हि सुद्धा खूप प्रसिद्ध उपचार पद्धती आहे , हवतर स्वत: करून बघा. आणि स्वताला झेपेल इतके गार पाणी घ्यावे . एवढे तर डोके लावू शकतो णा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Mon, 04/06/2015 - 06:33 नवीन
माझ्या मते आईस बकेट ही डोक्यावर घेतात. बऱ्याच सेलेब्रीटींनी डोक्यावरून घेतल्याचे फोटो पाहण्यात आहेत. पण कोणी पाय बुडवायला वापरल्याचे वाचले/ऐकले नाही. असल्यास त्यांचे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बॅटमॅन Fri, 04/10/2015 - 15:01 नवीन
"बाकी अधिक माहितीसाठी व्यनि करा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
व
वेल्लाभट Fri, 03/27/2015 - 07:33 नवीन
शरीराचं तापमान खाली आलं की जास्त उकडणार नाही का? शरीर गार; बाहय हवा गरम. त्यामुळे उकाडा जास्त जाणवेल; नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 03/27/2015 - 08:49 नवीन
बाहेर उकडतय म्णुन शरीराचे तापमान वाढवा, हा अघोरी उपाय झाला वेल्ला साहेब इतकेही कळु नये म्हणजे कमाल आहे. शरिराचे तापमान नाॅर्मल राहिले पाहिजे, उकाड्याने ते वाढलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
स्पा Fri, 03/27/2015 - 08:51 नवीन
बाहेर ५० डिग्री तापमान असेल तर आतले तापमान तुम्ही ७० करुन गार गार वाटतय म्हणाल का :D असो मी काही डाॅक्टर नाही. त्यामुळे काॅमन सेन्स लावता आला तर पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
वेल्लाभट Fri, 03/27/2015 - 10:28 नवीन
मी कुठे म्हटलं शरीराचं तापमान वाढवा. मी म्हटलं थंड केलं तर गरम नाही का वाटणार. तुम्ही का गरम झालात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
वेल्लाभट Fri, 03/27/2015 - 10:29 नवीन
हा डेडलिफ्ट चा साइड इफेक्ट की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 15:06 नवीन
वेल्लाभट साहेब शरीराचे तापमान ९८" F ते १००"F किंवा ३८ते ३९ सेल्सियस या अत्यंत कमी कक्षेत ठेवले जाते. जेंव्हा बाह्य तापमान वाढल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढू लागते तेंव्हा शरीर घाम वाळवण्याच्या उपायाने आपले आतील ( CORE ) तापमान टिकवून ठेवते. घाम वाळून जसे शरीराचे तापमान ९८' f ला येते तेंव्हा आपल्याला घाम येणे बंद होते. तेंव्हा शरीराचं तापमान खाली आलं की जास्त उकडणार नाही उलट आपल्याला बरे वाटू लागते जसे आपण कडक उन्हातून थंड सावलीत येतो तेंव्हा. थंडीत जेंव्हा बाह्य तापमान कमी असल्याने जसजशी आपल्या शरीरातून उष्णता गमावली जाते तसे वेगवेगळ्या उपायांनी( त्वचेचे रक्ताभिसरण कमी करून किंवा कुडकुडून ( स्नायूंची वेगाने हालचाल होऊन) शरीरात उष्णता राखली किंवा निर्माण केली जाते. या तर्हांनी शरीराचे तापमान अगदी कमी कक्षेत( NARROW RANGE) नियंत्रित ठेवले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 03/27/2015 - 15:51 नवीन
हे हवं होतं. उगाच आमचा कॉमन सेन्स काढला गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रुस्तम Mon, 03/30/2015 - 08:22 नवीन
ज्ञानात भर पडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
'
'पिंक' पॅंथर्न गुरुवार, 03/26/2015 - 09:09 नवीन
एक घरगुती उपाययोजना आम्ही रात्री चादरी भिजवुन फरशीवर पसरवायचो आणि छताचा पंखा चालु ठेवायचो. बेडवर झोपायचो... वातावरणात थंड राहण्यास ब-यापैकी मदत होते ! हा उपाय घाटावरचा आहे. मुंबईच्या दमट वातावणात कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 03/26/2015 - 10:05 नवीन
हा उपाय चालणार नाही. एसी हा उत्तम पर्याय आहे.कैलास जीवन ने तलखी कमी होईल. अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 03/26/2015 - 12:01 नवीन
अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे ऑऑऑ ..? रात्री भिजवायचे तर प्यायचे केव्हा? सकाळी पिले तर त्याचा effect पुढील रात्रभर राहील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
क
कपिलमुनी गुरुवार, 03/26/2015 - 12:10 नवीन
याबद्दल माहिती हवी आहे ? कोणत्या कंपनीचा चांगला आहे ? मॉडेल ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/26/2015 - 13:16 नवीन
केल्व्हिनेटर सिंफनी विंटर सिरिज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 03/27/2015 - 08:51 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सस्नेह Fri, 03/27/2015 - 08:55 नवीन
फेदर्स लॉयड १.५ टन ३ स्टार गेली ५ वर्षे वापरत आहे. विना-मेंटेनन्स मस्त चाललाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ए
एस Fri, 03/27/2015 - 15:21 नवीन
तो एसी आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Mon, 03/30/2015 - 05:28 नवीन
हो अर्थात कूलर नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ख
खंडेराव Tue, 03/31/2015 - 18:53 नवीन
याचा हिशोब करुन घ्या. नाहीतर कुलर त्रासदायक ठरतात. अगदी पुण्यातही आम्हाला रात्री ३ वाजता बंद करावा लागायचा आद्रता वाढली की. अर्थात आता जो आहे सिंफनी त्याला टायमर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 03/26/2015 - 13:11 नवीन
पण मुंबई आम्हाला सोड्त नाही ना..... असो....१ ट्नचा घ्या पण विंडो एसी घ्या... स्प्लिट नको....
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 03/26/2015 - 15:33 नवीन
स्प्लिट आणि विंडो ए सी मध्ये काय फरक असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
न
नितिन थत्ते Fri, 04/24/2015 - 05:35 नवीन
स्प्लिट एसी हा नवर्‍याप्रमाणे असतो. आवाज फक्त घराच्या बाहेर घराच्या आत नाय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ट
टवाळ कार्टा Fri, 04/24/2015 - 07:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
त
तिमा गुरुवार, 03/26/2015 - 13:12 नवीन
तुमच्या एकच खिडकीच्या समोरची भिंत जर मोकळी असेल तर तिथे एक एक्झॉस्ट फॅन लावा. त्याच्या समोर खिडकीत पण एक लावा, पण तो हवा आंत येईल या पद्धतीने. दोन्ही फॅन रात्रभर चालू ठेवा. चांगले वायुवीजन होईल व घरांत हवा खेळून थंडावा वाढेल. हा उपाय एकाकडे केलेला पाहिला आहे. नाहीतर एसीशिवाय पर्याय नाही. १४० चौ. फूट रुमला १.५ टनाचा तरी घ्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/26/2015 - 13:18 नवीन
वीजबिलात किती फरक पडतो ए.सी. आणि कुलरच्या? १.५ टन ए.सी.चे वॅटेज कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/26/2015 - 14:10 नवीन
चिमणराव आमच्या १. ५ टनाच्या एल जी विंडो ए सी चे १८५० वॅट आहेत म्हणजे दर तासाला १५ रुपये बिल आहे रात्री साधारण ५ तास चालतो ( चालू बंद होत) आणी आम्ही दुपारी २ तास लावतो. स्वच्छ हिशेबाने एक दिवसाचे ५० रुपये होतात. म्हणजे महिन्याचे ए सी चे १५०० रुपये होतात. तीन महिने १५ मार्च ते १५ जून चालविला तर ४५०० रुपये होतात. कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी इतके पैसे दोन दिवसाचेच होतात. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबई सोडून आम्ही कुठेही जात नाही. ( शिवाय मुंबईत लोड शेडींग नाही). स्वतःचे थंड घर यासारखे सुख नाही. बायको कटकट करयला लागली तर दोन दिवस बाहेरून जेवण मागवा. तरीही खूपच स्वस्त पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सांगलीचा भडंग गुरुवार, 03/26/2015 - 15:34 नवीन
भारी प्रतिसाद आणि केलक्यूलेशन तर मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मास्टरमाईन्ड Fri, 03/27/2015 - 14:30 नवीन
कॅल्क्युलेशन आवडलं. पण दुपारी २च तास कसे काय पुरणार बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 14:32 नवीन
तीन तासांपैकी ए सी प्रत्यक्ष २ तासच चालतो. (कट ऑफ आणि ओंन धरून) म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
आ
आदूबाळ Tue, 03/31/2015 - 14:37 नवीन
आणि एसीचं डेप्रीसिएशन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 14:54 नवीन
एवढ्या खोलात नाही जायचं. एकेका गोष्टीचा विचार करत बसलं तर भर एसी मधे घाम फुटेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सुबोध खरे Tue, 03/31/2015 - 15:56 नवीन
माझा पहिला ए सी १९९८ मध्ये विशाखापट्टणमला घेतला रुपये १९,०००/- होता. तो २०१४ मध्ये बॉडी गंजल्यामुळे बदलला. दुसरा ए सी मुलांच्या खोलीला २००५ साली लावला आहे तो अजून उत्तम चालू आहे. डेप्रीसिएशन काय झालं ते तुम्ही काढा. आम्ही फक्त एसी ची थंड हवा एप्रीशीएट करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सुबोध खरे गुरुवार, 03/26/2015 - 14:12 नवीन
बाप्पू राव आपण कुठे राहता ते सांगा ( व्यनी नको, इथेच) म्हणजे त्याप्रमाणे उपाय सुचवता येईल.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 03/26/2015 - 15:27 नवीन
मी पुणे नावाच्या प्रसिद्ध देशात राहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा