असह्य हा उकाडा...
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
💬 प्रतिसाद
(209)
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/31/2015 - 19:06
नवीन
धागाकर्ते पुण्यात राहत असल्याने कुणी डेझर्ट कूलरबाबत सुचवलं नसावं.
डेझर्ट कूलर चा हा फटू जालावरून साभार. माझ्या काकांच्या घरी होता. मागच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर ठेवला असायचा. घरातली खोल्यांची दारे बंद केली तरी समोरच्या खोलीपर्यंत दारांच्या खालच्या फटीतून थंड हवेचा झोत पायांना जाणवत असे.

- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 04/01/2015 - 08:12
नवीन
विदर्भात, त्यातल्या त्यात, गावांमधे उन्हाळ्यात ह्या धुडाला पर्याय नाही. एका कुलरमध्ये, घराबाहेर उघडणारी दारं-खिडक्या बंद केल्यास ३-४ खोल्या गार होतात. दुपारी आमरस/पन्हं कुरड्यांसोबत चापून, हा कुलर लाऊन ताणून द्यायची.. बाहेरुन रणगाडा गेला तरी आवाज ऐकू येणार नाही.. ;-) फ्रिज नसण्याच्या काळात, कुलरच्या वरच्या ट्रेमध्ये बर्याच गोष्टी थंड राहण्यासाठी ठेवल्या जायच्या, हा त्याचा अॅडेड अॅड्व्हान्टेज..
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 03/31/2015 - 12:29
नवीन
आमच्या घरात वायूवीजन व्यवस्थीत होत नव्ह्ते, सोसायटीच्या रचनेमुळे घरात मोठे बदल करण्यास मर्यादा होत्या. त्यामुळे आम्ही हॉलच्या स्लायडिंग विंडोला १०" बाय ३' चे तीन झरोके केले (काचेच्या शटर्सची उंची कमी करून) व त्यास उघडझाप करण्यासाठी लूवर्स लावले. लगतच्याभींतीबहेर 'C.' आकाराची मोकळी जागा होती, तेथे सतत सावली असल्यामुळे ती भिंत थंड असे. त्या भिंतीला १ फूट व्यासाचे होल पाडून त्यावर त्याच व्यासाचा टू वे एक्झॉस्ट फॅन (दोन्ही बाजूस फिरण्याची सोय) लावला. बेडरूमला बाथरूमच्या खिडकीच्या मापाची एक खिडकी काढली व लूवर्स लावले. दिवसा घरातील गरम हवा एक्झॉस्ट फॅनने बाहेर फेकल्याने घरात थंडावा येतो. रात्री एक्झॉस्ट फॅन उलटा फिरवल्याने बाहेरची थंड हवा घरात खेळवली जाते. ठाण्यात असूनही आर्द्रतेचा त्रास होत नाही. मच्छरांच्या अटकावासाठी एक्झॉस्ट फॅन व लूवर्सला जाळ्या लावल्या.
सूचना- एक्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी (घरातील हवा बाहेर फेकण्यासाठी) बेडरूमचा दरवाज्या अर्धवट बंद असेल तर पुर्ण बंद करावा घरातील हवा खेचली गेल्यामुळे दरवाजा ओढला जावून एखाद्याची बोटे दरवाज्यात सापडली जावू शकतात.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/31/2015 - 12:40
नवीन
एक्झॉस्ट फॅन आहे का जेट इंजिन?
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Tue, 03/31/2015 - 12:53
नवीन
=))
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 03/31/2015 - 13:38
नवीन
हाहाहा! एक्झॉस्ट फॅनच आहे. हे असे घडण्याची शक्याता फॅनचा आकार( घरातील अंदाजे एक फूट व्यास) व त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे व त्याच वेळेस घराच्या सर्व खिडक्या व बाथरूमचे दरवाजे बंद असल्यास फक्त बेडरूमचे लूवर्स पुर्ण उघडे व दरवाज्या अर्धवट बंद असल्यास हे घडू शकते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 03/31/2015 - 14:21
नवीन
ठ्ठो =))
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/31/2015 - 15:59
नवीन
टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो? सर्व साधारण विजेच्या दुकानात मिळतो का? आमच्या स्वयंपाक घरातील बिघडला आहे. मुलुंड ठाण्यात दुकानाचे नाव सांगा.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/31/2015 - 16:59
नवीन
टु वे एक्झॉस्ट फॅन एक कनेक्शन उलटं करुन बनवता येतो. :)
त्याला क्लॉकवाईज आणि काउंटरक्लॉकवाईजच्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 03/31/2015 - 18:52
नवीन
टू वे एक्झॉस्ट फॅन ठाण्यात प्रभातच्या गल्लीत मिळेल. मुलुंडची कल्पना नाही. मुंबईत लोहार चाळीत मिळतात. युनिक कंपनिचा थोडा महाग परंतू टिकाऊ व दर्जेदार असतो. जितक्या व्यासाचा फॅन तितक्याच व्यासाचे भिंतीला होल असावे व तेही गोलाकार. चौकोनी होल असल्यास एक्झॉस्ट फॅन त्याच्या पुर्ण क्षमतेने काम करत नाही. किचनचे एक्झॉस्ट फॅन बर्याचदा विंडोच्या चौकोनी फ्रेममध्ये बसवलेले असतात अशावेळी प्लायवूडला एक्झॉस्ट फॅनच्या मापाइतके गोल होल पाडून त्यावर एक्झॉस्ट फॅन फीट केला तरी चालते.
टू वे एक्झॉस्ट फॅनला इनबिल्ट टू वे स्विच असते एक्स्ट्रा लावावे लागत नाही. फक्त फॅनच्या पात्यांची दिशा बदलताना एक्झॉस्ट फॅन बंद करण्यासाठी ऑन ऑफचे स्विच लावावे लागते.
- Log in or register to post comments
भ
भिंगरी
Tue, 03/31/2015 - 12:39
नवीन
आपण जर हे स्वतःच्या कल्पनेने केले असेल तर तुमचे अभिनंदन!
मलाही आमच्यकडील एका खोलीचे वायूवीजन व्यवस्थित करायचे आहे. आपणांस व्यनी करू का?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 03/31/2015 - 13:42
नवीन
तुम्हीच खिडकीत आडव्या/आडवे झोपा ना. लाइटशिवाय काम होत असेल तर कशाला खर्च करता. ह.घ्या.
- Log in or register to post comments
भ
भिंगरी
Wed, 04/01/2015 - 07:59
नवीन
तिरडीवर आडवे व्हायचे वय झालयं,खिडकीवर आडवे व्हायला काय सांगताय?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/01/2015 - 08:45
नवीन
१ भोचक प्रश्न विचारू का? :D
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 04/01/2015 - 09:38
नवीन
कुणाच्या वयाची उठाठेव कुणी का करावी =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/01/2015 - 10:08
नवीन
तुम्ही भिंगरी तैंच्या ड्वैडी क्काय? ;)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/01/2015 - 11:23
नवीन
ओ तै...तो काय वय विचारणार नौता कै....तो ओळखीची समवयीन मुलगी आहे का ते विचारणार होता. ;)
तेवढचं एक पुण्ण्ण्ण्याचं काम =))
- Log in or register to post comments
भ
भिंगरी
Wed, 04/01/2015 - 02:15
नवीन
'मार्मिक' उपाय सांगितल्या बद्दल.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/01/2015 - 04:13
नवीन
ज्यांना घराचं वायुविजन करायचं आहे अश्या सर्व मंडळींसाठी एक सल्ला. पुश आणि पुल सेटअप करायचा प्रयत्न करा. पुश अँड पुल सेटअप म्हणजे एका एक्झॉस्ट पंख्याने हवा आत ओढायची तर दुसर्या एक्झॉस्ट पंख्याने हवा खोलीबाहेर फेकायची. हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो.
शिवाय वर श्रीरंग जोशींनी दिलेल्या डेझर्ट कुलरचा वापर करायलाही हरकत नाही पुण्यामधे. पण त्याचा आवाज मोठा असतो असा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Wed, 04/01/2015 - 14:59
नवीन
य कूलर बद्दल पण विचार केला होता.. पण त्याचा अवाढव्य आवाज ऐकून कॅन्सल केला...
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 04/01/2015 - 15:26
नवीन
त्या आवाजामुळेच रणगाड्याचा आवाज येत नाही.
- Log in or register to post comments
श
शि बि आय
Wed, 04/01/2015 - 16:27
नवीन
कूलर पेक्षा एसी नक्कीच बरा... विंडो पेक्षा हि स्प्लिट चांगला..
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 04/06/2015 - 04:27
नवीन
शतक पुर्ण केल्याबद्दल गार पाण्याचा माठ देउन सत्कार करणेत येत आहे.
--आखिल भारतिय मिपा चालू होण्याची वाट पहणारे मंडळ
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 04:28
नवीन
साधा आहे का नक्षीदार आहे? =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/06/2015 - 11:18
नवीन
नक्षीदार पण गारगार आहे !!!!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 04/07/2015 - 23:28
नवीन
सोलापुरात रिक्षाचालकाची वातानुकूलित सेवा, प्रवाशांना खुश करण्यासाठी अनोखी शक्कल

- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 04/08/2015 - 12:41
नवीन
पूर्वी माई आणि नानाच्या काळात महाब़ळेश्वरला अशा रिक्षा असायच्या .
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 04/08/2015 - 17:15
नवीन
पूर्वी माईसाहेब आणि नानासाहेबांच्या काळात महाब़ळेश्वरला अशा रिक्षा असायच्या.
आपल्या वयाचे आहेत का ते? :-)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 04/08/2015 - 17:20
नवीन
खरंच की!! माई म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा दीड दिवस लहान आणि नाना माईंपेक्षा अगदी दोन घटका मोठे... असं असतानाही एकेरी उल्लेख करतात म्हणजे हद्द झाली. द्रौपदीच्या लग्नात माईच गेल्या होत्या करवली म्हणून!! ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/08/2015 - 18:16
नवीन
कहर आहेस बाबा =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/08/2015 - 18:19
नवीन
मी तर ऐकलय की ब्रम्हदेवाच्या मुंजीत नाना-माईंचं मेहुण जेवलेलं म्हणुन. खरं खोटं नाना जाणोत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 04/08/2015 - 18:23
नवीन
अन सीताहरणाच्या वेळी सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं...
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 04/10/2015 - 06:55
नवीन
अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं...
यात स्वतःचा असा शब्द टंकायला विसरलात काय ??
बाकी एकेरी उल्लेखाबद्दल तीव्र निशेध?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 04/10/2015 - 07:22
नवीन
हात तरी आहे ना =))
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/10/2015 - 11:15
नवीन
त्याचं काये, द्रौपदीच्या नातीच्या मोठ्या मुलीच्या नातीच्या मुलीच्या लग्नात पंगतीत जेवताना माई त्यांच्या तत्कालीन मैत्रिणीला सांगत होत्या, "अगो, हरिण पाह्यला आणि आमचे 'हे' गेले हुशारी दाखवायला, म्हटलं नेहमीसारखे माती खातील आता परत; म्हणून मग मीच लक्ष्मणाला पिन मारुन पाठवला. नाहीतर "ह्यांचं" हसं झालं असतं, नेहमीसारखंच!! मनचं का सांगत्ये मी!!"
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/10/2015 - 11:16
नवीन
आयडीचं नाव सार्थ केलचं पाहिजे का अगदी नेहेमी ;)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 14:04
नवीन
आता एवढे नाट्य झाल्यावर एक गीत अन संधीसाधू नृत्य पण हवे...
हात लावणार मुंगाला,
पिन मारली लक्ष्मणाला...
टन टन टन...
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/10/2015 - 14:16
नवीन
@सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं... >>>
ह्याचाच वचपा काढायला नंतर नानांनी आयोध्येत बाजारपेठेत सुवर्णमृगकांचन छाप चोळी वस्त्रभांडार नावाचं दुकान चालवलं...असं उर्मिला बिभिषण भावजींच्या बायडीला सांगत होती.. असे म्हणतात! 
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 15:40
नवीन
ओह म्य गोद थिस इस तू मुच =)) .
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/10/2015 - 15:49
नवीन
ओह म्य गोद. अफ्तेर रेअदिन्ग योउर चोम्मेन्त इ चोउद्न्त चोन्त्रोल म्य लौघ्तेर.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/10/2015 - 15:53
नवीन
योउ पेओप्ले अरे व्रितिन्ग वेर्य फुन्न्य!! =))))
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 16:16
नवीन
अल्ल च्रेदित गोएस तो पूजा अलिअस जेनी... :-)
षे इस थे पिओनीर फोर थिस लन्गुअगे ओन मिपा.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/10/2015 - 16:20
नवीन
जेनेज मोथर इन लव विल्ल बे अन्ग्र्य रेअदिन्ग थिस जुस्त सो योउ क्नोव
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 16:25
नवीन
दोएस्न'त मत्तेर. व्हो चरेस अन्य्वय. =))
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/10/2015 - 16:35
नवीन
व्हो इस हेर मोथेर इन लव? अन्द होव इ दोन्त क्नोव थत? ;)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 16:37
नवीन
प्लेअसे इन्च्रेअसे योउर स्तुद्य...
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 04/21/2015 - 17:13
नवीन
http://www.misalpav.com/node/1610 हा अजरामर धागा आठवला!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 04/21/2015 - 17:15
नवीन
जरा उशिराच आठवला :-)
http://www.misalpav.com/comment/681556#comment-681556
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 04/21/2015 - 17:19
नवीन
श्रीरंगा, मी सध्या मिपा मिपा खेळण्याऐवजी गावाला जास्त दिवस होते, त्यामुळे सगळे धागे आणि प्रतिक्रिया वाचल्या नव्हत्या! तरी म्हटलं हा धागा कोणाला आठवला नव्हता का!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 04/21/2015 - 17:28
नवीन
गावाकडे राहून पुण्यातल्या उकाड्याची झळ लागली नसणार :-) .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »