Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक जिलबी पाडायचीच

व — वेल्लाभट, Fri, 03/27/2015 - 06:31
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच - अपूर्व ओक (२७-३-१५)

प्रतिक्रिया द्या
21852 वाचन

💬 प्रतिसाद (54)
क
कंजूस Fri, 03/27/2015 - 08:58 नवीन
गोड्डरस
  • Log in or register to post comments
श
शशिका॑त गराडे Fri, 03/27/2015 - 11:23 नवीन
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
मधुमेह असलेल्याना वेगळी जिलेबी ?
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/27/2015 - 12:00 नवीन
ओके, कधीपासून होतयं असं?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/27/2015 - 13:41 नवीन
@ ओके, कधीपासून होतयं असं?>> =)) तुझ्यासारखि हलकट माणसं चावायला लागली, तेंव्हापासून! =)) ... बाकी वेल ल्ला भटा,चांगली पडली जिलबी .. पटा पटा! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
आ
आदूबाळ Fri, 03/27/2015 - 12:09 नवीन
आमचीबी यक... एक तरी जिल्बी पाडु द्या कि रं मला बी बोर्डाव येउ द्या की
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 03/27/2015 - 12:15 नवीन
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं.
या पहिल्या वाक्यालाच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि फेटे. =))
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/30/2015 - 13:10 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
त
तिमा Fri, 03/27/2015 - 13:45 नवीन
त्या फोटोत जिलब्यांच्या मागे मठ्ठा ठेवला आहे की रबडी ? आम्हाला काहीही असलं तरी चालेल, पण त्यांतल्या त्यांत रबडी असेल तर फारच मजा येईल!
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Fri, 03/27/2015 - 15:02 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/27/2015 - 15:30 नवीन
चविष्ट झाली आहे ही जिलबी...
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 03/30/2015 - 11:11 नवीन
जिलबी फक्क्डशान पडलीय पर मट्ठा पण द्या की वाईच.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 03/30/2015 - 11:17 नवीन
गु रु जी रू मा ल जी ल बी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/31/2015 - 14:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 14:11 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चुकलामाकला Mon, 03/30/2015 - 11:21 नवीन
जिलबी आवडली!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 03/30/2015 - 12:14 नवीन
धन्यवाद सगळ्यांचे ! :) गोड मानून घेतल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 03/30/2015 - 13:51 नवीन
एकदा नागपुरात जलेबी दह्या सोबत खाल्ली होती. बाकी मी पाव वर जलेबी सर्वात आवडता पदार्थ आहेच.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Mon, 03/30/2015 - 19:19 नवीन
रसदार.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 04:42 नवीन
जमलाय घाणा. आता मठ्ठा पण पाड. :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 03/31/2015 - 07:28 नवीन
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/31/2015 - 07:51 नवीन
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. मग मते मिळ्तील मिपाकरांची...एक गठ्ठा ;) -------- तांब्या पास केलाय.. पाडा रे पुढे.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अन्या दातार Tue, 03/31/2015 - 08:42 नवीन
तांब्या पास केलाय.
चला. म्हणजे तांब्या अजून तुमच्याकडेच आहे हे मान्य केलेत शेवटी तर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/31/2015 - 08:53 नवीन
@हे मान्य केलेत शेवटी तर =))>>> असोच्च! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 09:07 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
स
सूड Tue, 03/31/2015 - 11:08 नवीन
>>चला. म्हणजे तांब्या अजून तुमच्याकडेच आहे हे मान्य केलेत शेवटी तर
=)))) एकच नंबर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 13:13 नवीन
तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी ;) =)) ह घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 14:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 14:08 नवीन
अगायायायायायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) =)) टोर्टूगातला खास प्रथमधारीय सोमरस प्राशुनी कविता पाडली काय हो? लयच भारी. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 14:17 नवीन
नाही रे. प्रथमधारेची फक्त आणि फक्त काफी घेतो... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/31/2015 - 14:08 नवीन
@तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी>>> Image removed. तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सस्नेह Tue, 03/31/2015 - 14:08 नवीन
बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. आमच्या गुर्जींचं नाव घ्यायला लाज नै वाटली ..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 14:11 नवीन
=)) खतरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 14:12 नवीन
खेळता रोजरोज विटीदांडू गुर्जींचं नाव घेणारा कोण रे तो पांडू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Tue, 03/31/2015 - 14:14 नवीन
गुर्जींच्या तांब्याचा फार परिणाम होऊन देऊ नये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 14:18 नवीन
ताम्रयुग यू सी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/31/2015 - 14:15 नवीन
हल कट शब्दछळू दू दू खाटुक खरंखुरं वट वाघुळ..नाव त्याचं ब्याटुक! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 14:57 नवीन
ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं पण लिहलं तर गुर्जी मंत्र मारतील म्हणुन आवरतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Tue, 03/31/2015 - 15:01 नवीन
मला पण!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 15:12 नवीन
मलापण मलापण व्यनि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 15:16 नवीन
मला पण व्यनी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Wed, 04/01/2015 - 05:11 नवीन
दोन थेंब या दिशेला पण टाका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 04/01/2015 - 07:31 नवीन
दो बूंद जिंदगीके =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/01/2015 - 11:27 नवीन
टाकलेत दोन शिंतोडे पाकाचे... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/31/2015 - 14:12 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/31/2015 - 16:09 नवीन
तांब्याधारी जो जो त्यासी, विहीत नित्य कर्म जिलब्या पाडणे हाची होई, आगळा न धर्म रोज ताजे पीठ शोधणे, हाची एक नेम अचरटांचा गोतावळा, सुखे करो काम पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/31/2015 - 18:25 नवीन
मला या विषयावर एकदा लै गंभीर काथ्या कुटायचा आहे! =))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 04/01/2015 - 03:41 नवीन
कोणत्या विषयावर ? तांब्या की जिलबी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मदनबाण Wed, 04/01/2015 - 07:05 नवीन
अद्भुत जिलबी ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 04/01/2015 - 08:37 नवीन
धाग्याच्या नावाप्रमाणे अनेकांनी एक तरी जिलबी पाडायचीच असं ठरवलंय :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/01/2015 - 11:27 नवीन
आपणही लावा जोर....एखादी पडेलही जिलबी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा