एक जिलबी पाडायचीच
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...
तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी
सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती
दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच
उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे
झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच
- अपूर्व ओक (२७-३-१५)
सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती
दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच
उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे
झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच
- अपूर्व ओक (२७-३-१५)
💬 प्रतिसाद
(54)
स
सूड
Wed, 04/01/2015 - 11:39
नवीन
पन्नाशी गाठली बुवा एकदाची!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/01/2015 - 11:46
नवीन
आपणा सर्वांचे लाडके संगीतप्रेमी, जिलबीप्रेमी श्री. वेल्लाभट ह्यांचा काका हलवाईकडच्या सुद्द साजुक तुपातल्या पावशेर जिलब्या, अर्धा ग्लास मठ्ठा व पुस्प्गुच् देउन करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 04/01/2015 - 11:48
नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.वेल्लाभट आणी श्री.चिमणराव यांचा सत्कार एक एक तांब्या देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 04/01/2015 - 11:49
नवीन
सत्काराला येणे येताना किमान तांब्याची प्रतिकृती म्हणून मड़क आणू नये ! जिलबी कशीही अस्ली तरी माश्यांस़कट पुड्यात बांधू नये.
चिट्(कव)णीस
अखिलमिपाजिल्बीप्रतिसादक्आस्वादक्वाट्प केंद्र संचालीत शेंच्युरी/हाफशेंच्युरी सत्कार मंडळ
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2