Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अकादमी 3: रूटीन अन आयोडेक्स

क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 03/30/2015 - 15:55
💬 71 प्रतिसाद
अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६ *** (टिप : ह्या भागात थोड़ी शिविगाळ आहे!!! टिपिकल अकादमी शिव्या) हॉस्टेल ला आपापल्या रूम्स ना सेटल झाल्यावर आमचे तिसऱ्याच दिवसापासुन "रूटीन" सुरु झाले ! सकाळी 0445 hrs ना बिगुल होणार 0500 hrs पर्यन्त बेड टी घेऊन पीटी यूनिफार्म म्हणजेच पांढरी चड्डी पांढरा राउंड नेक टीशर्ट पायात कैनवास शुज अन सोबत ड्रिलसाठी असलेला खाकी यूनिफार्म व् बूट्स पट्टा अन एक पाण्याची बॉटल इतके पिठ्ठु (बारकी कैनवास ची रकसॅक) मधे भरून घ्यायचे अन हॉस्टेल बाहेर फॉलइन व्हायचे! आमच्या कंपनी चा उस्ताद मग आम्हाला रनिंग ला नेत असे. शर्मा उस्ताद ने पहिल्याच दिवशी गोड बोलत रागवत "बस आधा किमी और" म्हणत 5 किमी ओढले!!!. पुर्या कंपनी च्या तोंडाला फेस यायचा सुद्धा बाकी राहिला नव्हता. मी , समीर, पुनीत सुरु मोठ्या जोशात झालो होतो साढे 3 किमी पर्यन्त काही वाटले नाही नंतर ज़रा थकवा वाटला पण जेव्हा 5 किमी झाले अन बिना रेस्ट परत जायचे ऐसा उस्ताद नामे खविस बोलला तेव्हा मात्र सपशेल गलपाटलो आम्ही!!!परत जेव्हा पीटी ग्राउंड ला आलो तेव्हा आमचे ऑलरेड़ी पांढरे डोळे जे काही पाहिले त्याने तिप्पट पांढरे झाले अन आपण नशीबवान आहोत असे वाटले!! चार्ली कंपनी घामेजलेली उभी होती कंपनी च्या उजव्याबाजुला मोसाय चक्क उताणा पडला होता अन ठो ठो बोंबलत होता "सरssssss आम्ही से ना होतायsssss आम्ही मर जाबो सरsssss" मीणा उस्ताद त्याच्यापालिकडे उभा होता तोच चार्ली कंपनी चा उस्तादजी होता आम्ही आवंढे गिळत मोसाय कड़े पाहतच होतो तोवर मीणा उस्ताद कडाडला "फॉल आउट के ऑर्डर बिना तु बाहेर कैसे आगया बंगाली, पुरी चार्ली कंपनी, परेड ग्राउंड के चक्कर तब तक लगाएगी जबतक ये *मकरा उठ के अपनी फाइनल लॅप पुरी नहीं करता, शूटsssss" चार्ली कंपनी मोसाय कड़े खाऊ की गिळु पाहत होती पण न धावुन जातात कुठे !!! दुड़क्या चालीने 6 चार्ली धावायला लागले त्यांना ती ऑर्डर देताना मोसाय अवाक् होऊन पाहत होता चार्ली कंपनी 100 मीटर पुढे गेली होती तोवर मीणा उस्ताद चा आवाज परत एकदा घुमला "थमsssssss" "पिच्छे मुड़ssssss" आता चार्लीच नाही तर सरदार ची ब्रावो अन आमची डेल्टा धरून बाकी 2 कंपनीजला अवाक करणारा नजारा होता, धडपड़त मोसाय उठून उभा राहिला होता अन चार्लीच्या दिशेने बऱ्यापैकी स्पीड ने धावत होता. हे सगळे दुरून पाहत असलेला बड़े उस्ताद तोवर ओरडला "बाकी की कारवाई क्यों बंद हो गई!!दौड़ रहा है वो!! मरा नहीं है!!" आम्ही ताबडतोब पीटी फॉर्मेशन मधे आलो !!! मोसाय दातओठ खात शेवटचा राउंड पुर्ण करत होता, तो होताच हे ध्यान मीणा उस्ताद पुढे जाऊन उभे राहिले, अन पीटी थांबवुन बड़े उस्ताद ओरडला "ओसीज अपने कंपनी के लिए मेहनत करने वाले ओसी सुदीप्तो के लिए ताली बजाओ" "1....2....123" ह्या ठेक्यावर आम्ही 3 वेळा टाळ्या वाजवल्या अन डे वन चा विजेता सुदीप्तो मोसाय ह्याला आज्ञा झाली "जाओ अपने कंपनी में मिल जाओ" त्या दिवशी अंग खाच्चुन घाम गाळल्यामुळे असेल बरेच हलके वाटत होते! अगदी मोसाय पण बरा वाटत होता!!! दुपारी लंच ला असलेला पुलाव, फिश अन फ्रूट्स पार चट्टामट्टा केले पोरांनी!!! पहिल्या दिवसभर काही नाही जाणवले!! अन मग उगवली ती मनहूस दूसरी सकाळ!!! 0440 hrs चा गजर कानाशी ठेवला होता मी हात मागे वळवुन घड्याळ उचलयचा प्रयत्न केला अन लक्षात आले !! माझे हात पाय दगडासारखे घट्ट झाले होते! पण विस्सल ची भीती होतीच्!! दात ओठ खात उठलो अन शेजारी पाहिले तर समीर ची पण तीच अवस्था!!! अक्षरशः घसटत खुरडत टॉयलेट ला गेलो ते निराळीच् पंचाइत! कमोड वर बसायलाच येइना !! दात ओठ खाऊन वेदना विसरून बसलो ते स्पष्ट बोलायचे झाल्यास आतून बुच मारल्यागत पोट ढिम्म् पाच मिनिटे बसलो!!! ते घड्याळ कोणाच्या बापाचे नसते हे लक्षात आले !! तसाच पुन्हा लंगडत रूम मधे आलो!!! आता एक महत्वाचे मिशन होते!! नाईट पैंट उतरून पीटी ची चड्डी चढ़वणे!!! ती कशी चढवली हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे!!! तसाच दातओठ खात फॉलइन झालो!! समीर कड़े पाहिले तसे तो हळूच कुजबुजला "काक्के तेरे भी पॉटी के सियापे हो गए क्या बे???" "हाँ बे पेट के मसल्स हिल ही नहीं रहे!!" इतक्यात आमची नजर ब्रावो कंपनी कड़े गेली गिल तंगड्या फासकटुन चालत येत होता सहा फूटी काटकुळा सरदार असा चालताना पाहून आम्ही त्या ही अवस्थेत हसायचा प्रयत्न केला! हो फ़क्त प्रयत्न!! कारण जबड़ा हलवायला गेलो ते बरगड्या बोंबलायला लागल्या होत्या!! त्या दिवशी आम्ही पीटी अन ड्रिल कशी केली हे फ़क्त आम्हीच जाणोत!!! त्या दिवशी ब्रेकफास्ट ला मेस मधे गरम ऑम्लेट्स पानात पडत होती पण ती ही बेचव लगायला लागली!! दुसऱ्या दिवसापासुन आमची वेपन्स अन मैप रीडिंग ची लेक्चर सुरु होणार होती! आज अंग दुखत होते तरी एक बरे होते आज ऑडिटोरियम ला व्हीएस सरांचा ओपनिंग एड्रेस होता, पानात पडले ते गिळून कसे बसे अंघोळीला पोचलो !!! ते हॉस्टेल लॉबी ला बड़े उस्तादजी एक पोते घेऊन हजर , मी पुनीत सोबत खुरडत चालत येत होतो ते पाहून उस्ताद ओरडला "ये दोनों आदमी दौड़ के आ" कसेबसे "दौड़त" पोचलो ते नवीन झ्यांगट "अकादमी के अंदर हर काम दौड़ चाल में होगा ये जानके भी दोनों पैदल कैसे चले *मकरो??" आम्ही "......." "दोनों आदमी 20 20 पुशप अभी" तिरिमिरित आम्ही वाकलो अन 20 पुशप मारुन मी उठून उभे राहायची अगळीक केली!!! "उठने की करवाई क्यों की!, पोजीशन फिरसे, मराठे तु 20 पुशप और , पंडितजी आप प्लांक पोजीशन में वैसे ही !!" "जल्दी शुरू करोssssss" मी जीव लावुन पुशप करायला लागलो पण पुनीत ची ही अवस्था भयानक होती, जिम् मधे ऐब्स चे रूटीन केलेल्या लोकांस "प्लांक" पोजीशन काय असते ते चांगलेच ठाऊक असेल!!! पुशप करुन मी तसाच पोजीशन मधे होतो तेव्हा उस्ताद म्हणाला "खड़े होss" उभे राहिल्यावर पुढचा आदेश ऐकून जीव अर्धा झाला!! "ये नमक का बोरा है! उठा के बाथरूम के दरवाजे में रखो! और सब को बोलो आज नहाने के पानी में एकएक मुठ्ठी डालो बदन दर्द ठीक होगा" कणहत कुथत आम्ही ते 50 किलोचे पोते ठेवले अन तेवढ्यात उस्तादजी ने स्वतःच सारी पोरे फॉलइन करुन त्यांना मिठाची काशी करायला सांगितले आम्ही सूटल्यासारखे मटकन बसलो पण लगेच उठलो!!न जाणो ह्या सैतानाच्या परत नजरेला पडलो तर बोंबला!!! त्या गोंधळात दोन ओसीज एका मागे एक आले बाथरूम मधे अंघोळीला , मोठी मजेशीर ध्याने होती दोघेही, एक काळाकुळकुळीत अंगात जानवे इतक्या वेदनेत ही जवळ आला अन म्हणाला "वनक्कम आम एस दिवाकर,अल्फा कंपनी, मदुरई तमिळनाडु ,बाई थुड़ी एल्प करदो" मला पाच मिनट सुधरना हा कोण काळू? माला बाई का म्हणतो??? पण कळले तेव्हा मी वेदनेच्या तिरिमिरित उठलो अन म्हणले "क्या हेल्प होना अन्ना??" "बाथरूम का फ्लोर पर मग पड़ती !! आम उठा नै सकती मग उठा के देता क्या बाई?" माझे टाळके हलले म्हणले "अबे गांx जान लेगा क्या बच्चे की निकल यहाँसे भोसड़ीके" खाली मान करुन तो निघुन गेला , त्याच्यामागे एक चीनी दिसणार ध्यान आले! नीमा सांगे, राहणार सिक्किम,आधीच गोरेभरड त्यात रगड्याने लाल तोंड झालेले माकडा सारखे !! मी हसु दाबत म्हणले "हॅलो" तर म्हणाला "dont talk to me man u marathas harass my bros in your state" च्यायला म्हणले हा काय भिकारचोटपणा "निकल भोसड़ीके" अस्मादिक! एका आयुष्यभरच्या घट्ट मैत्री ची सुरवात अशी झाली होती!!! अर्थात त्यात कोणाचाच दोष नव्हता!! सगळे वेदनेत होते प्रत्येकाच्या स्नायु मज्जा चेता लसुण कांदे प्रत्येक भागात तोबा दर्द होता!!! तिकडे मोसाय पारच हेंदरला होता मुटकुळ करुन बसला होता बोxखाली उशी घेऊन!! गिल बरा होता पण तो ही "वक्रतुंड" होता त्याने शक्य तितकी धावपळ केली होती मोसाय साठी , मोसाय जरा स्टेबल भासत होता पण हायहुई करत होता!! त्याच्या रडण्याला कंटाळून गिल ओरडला "ओ भोसड़ीवाले नी होती है मेहनत तो आया क्यों फ़ौज में!!! गांx बंगाली खोत्या" ते ऐकुन मोसाय ने ही तोंड फिरवले!!! आज वेदना मैत्रीवर भारी पडत होती! पण नियती अन उस्तादवृंद सोडुन कोणालाच माहिती नव्हते की आम्हाला सोबत प्रेस करुन एक केले जाते आहे *मकरा :- कामात अळंटळं करणारा ट्रेनी , मकरे त्याचे अनेक वचन!!

Book traversal links for अकादमी 3: रूटीन अन आयोडेक्स

  • ‹ अकादमी 2 : नव्याची नवलाई
  • Up
  • अकादमी 4 : मैत्री चा रंग ›

प्रतिक्रिया द्या
39468 वाचन

💬 प्रतिसाद (71)
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 03/31/2015 - 07:19 नवीन
कालबाह्य ही जनरल टर्म झाली. आपल्या परलंस मधे "वेटरन"!! मुद्दा घड्याळ आहे ! अपना समय बदलने वाले उस्तादजी को घडी का गिफ्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
झ
झकासराव Tue, 03/31/2015 - 07:27 नवीन
सुरेख लिहिताय. :) मावसभाउ आर्मीतच आहे. अर्थात तो जीडी म्हणुन जॉइन आहे. जॉइन झाला तेव्हा बराच हट्टाकट्टा होता. रेग्युलर जिम, रनिन्ग आणि स्पोर्ट्स मुळे. ट्रेनिन्ग वरुन आला तेव्हा काटक झालेला पण बारीक पण. त्याने त्याचे काहि अनुभव सांगितलेले. ते ही बरेचसे असेच होते. हेच उस्ताद तुमच्या पासिन्ग आउट परेड पर्यंत मित्रच होतील. :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 03/31/2015 - 07:38 नवीन
बापु, जियो यार ! कसले खतरा अनुभव आहेत. सालं आपण रोज इतकं बोलतो. एकमेकाला वाट्टेल तशा शिव्या घालतो. पण आता मात्र ठरवलय यावेळेला जेव्हा भेटशील ना हलकटा तेव्हा एक कडकडून मिठी मारायचीय तुला.. आणि हो, त्या आधी त्रिवार मुजरा सुद्धा ! तुला म्हणून नाही, तर या अफाट यातना, कष्ट सोसून पुन्हा आयुष्यभर आपले सर्वस्व देशासाठी वेचणार्‍या तुझ्यासारख्या असंख्य सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून ! _/\_
  • Log in or register to post comments
च
चिनार Tue, 03/31/2015 - 07:52 नवीन
अगदी खरं ! एकदा भेटावच लागेल तुम्हाला सोन्याबापू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 03/31/2015 - 09:27 नवीन
लेको मीठी काय भेटु तेव्हा भरतभेट प्रकरण करू!!! त्यात काय बे इतके!!! मुजरा नाको!! मी तितका लायक नाही की सगळ्या सैनिकांच्या वतीने मुजरा स्वीकारावा!! मुजरा करायची सोय आर्मी ने केली आहे अन पोलिस ने ही सदर्न कमांड, पुणे ला वॉर मेमोरियल आहे तिथे जाऊ!!! तु अन मी सोबत मुजरा घालु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
च
चिनार Tue, 03/31/2015 - 07:50 नवीन
सोन्याबापू.. वाचूनच अंग आकडल्यासारखं वाटतंय ! जबरदस्त वर्णन !
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 03/31/2015 - 08:41 नवीन
लेख मालिका अतिशय आवडली. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 03/31/2015 - 09:16 नवीन
कसली मस्त कथामालिका चालू झाली आहे.. अप्रतिम लेखन या क्षेत्राबद्दल फार कमी माहीत आहे.त्यामुळे वाचतानाच कित्येक गोष्टी अगदी नवीनच कळताहेत. तुमचे अनुभव सॉलीडच आहेत. कसे सहन करत असतील आपले सैनिक कोण जाणे. पुभाप्र..
  • Log in or register to post comments
अ
अभिरुप Tue, 03/31/2015 - 10:07 नवीन
मकरागिरी हा शब्द एनसीसी मध्ये खुप वापरायचो...आज त्याची आठवण झाली.खुप सुंदर लेखन....पुभाप्र
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Tue, 03/31/2015 - 10:11 नवीन
लय भारी...
  • Log in or register to post comments
न
नितीन पाठक Tue, 03/31/2015 - 12:26 नवीन
बापूसाहेब, तुमची लिहीण्याची शैली उत्तम आहे. वाचनीय आहे, या लेखमाले चे मला चिशेष आकर्षण आहे, कारण मी सुध्दा आमच्या खात्यातर्फे प्रादेशिक सेना (Territorial Army ) मध्ये १० वर्षे सेवा दिली आहे. आणिबाणीच्या परिस्थिती मध्ये काश्मिर, दिल्ली, कोलकता इ.इ. ठिकाणी "ड्यूटी" केली आहे. आम्हाला सुध्दा पूर्णपणे सैनिकी शिक्षण दिले होते. "रगडा" कसा असतो याचा पूर्ण अनुभव आलेला आहे. १९९६ साली काश्मिर मध्ये प्रथमच निवडणूक जाहीर झाली होती. संपूर्ण काश्मिर हा त्यावेळी दहशती खाली होता. मी तीन महीने काश्मिर येथे अतिशय अशांत अशा क्षेत्रात SLR, A – 47/56, Carbine . LMG अशी हत्यारे घेउन ड्यूटी केली होती. आमच्या camp वर अतिरेक्यंनी हल्ला केला होता. आज त्याची आठवण आली. माझ्या कडे सुध्दा भरपूर अनुभव आहे, परंतु श्री. बापूसाहेबां सारखी लेखनशैली नाही त्यामुळे एवढे समर्पक शब्दात लिहीणे जमेल असे वाटत नाही. असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...............
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 03/31/2015 - 12:39 नवीन
ओहो वेटरन !!!!! सलुट घ्यावा सर!!! हॉट झोन मधे ड्यूटी करणे खरेच थोड़क्या नशीबवान सैनिकांना लाभते!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
प
प्रचेतस Tue, 03/31/2015 - 12:48 नवीन
जसे जमेल तसे लिहा. पण अवश्य लिहाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 13:03 नवीन
तुमची लेखनशैली कशीही असुद्या...आम्ही वाचुच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
ब
बॅटमॅन Tue, 03/31/2015 - 14:16 नवीन
_/\_ बाकी काही बोलण्याची औकात नाही, तरी कॄपया जमेल तसे आपले अनुभव लिहावेत ही अत्याग्रहाची विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 14:26 नवीन
लिहा हो. स्वागतचं असेल मिपावर सैनिकी अनुभवांचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
स
स्वप्नांची राणी Tue, 03/31/2015 - 12:49 नवीन
इन्टरेस्टींग लेखमालीका!! पुतण्याने एवढ्यातच पहिली स्टेप पार पाडलीय. अजून दिल्ली बहुत दूर है..पण तरिही त्याला लगे हाथ हे लेख फॉरवर्ड केले..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Tue, 03/31/2015 - 15:18 नवीन
जबरदस्त लेखमाला.. एका दमात सगळ्या भागांचा फडशा पाडला. पुढचे भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 03/31/2015 - 19:33 नवीन
अस्सल मिल्ट्री भाषेतले वरिजिनल अनुभवकथन.
  • Log in or register to post comments
श
शुभा मोरे Wed, 04/01/2015 - 09:20 नवीन
जबरद्स्त अनुभव !!! बापुसाहेब. आता आम्हाला वाचताना ह्सु येतय. पण, त्यावेळची तुमच्या अवस्थेचा विचार केला की किती भयंकर हालत होत असेल...
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 04/06/2015 - 06:50 नवीन
मस्त अनुभव कथन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा