अकादमी 4 : मैत्री चा रंग
अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६
***
पीटी सुरु झाल्या नंतर डे 2 ला आमची अवस्था काय बिकट झाली होती हे मागच्या भागात तुम्ही पाहिलेच आहे मित्रहो. त्याच दिवशी दुपारी लंच नंतर आमचे आयजी ओपनिंग एड्रेस देणार होते. रजक स्टाफने (धोबी, त्यांना कोणी ही धोबी म्हणत नाही रजकसाब किंवा वॉशरड्यूटीमेन असे म्हणतो आमच्या अकादमी ला) खाकी यूनिफार्म आणुन ठेवले होते रूम वर.खरे पाहता त्या यूनिफार्म वर काहीच बिल्ले नव्हते तेव्हा, विद्यार्थी लोकांचे गणवेश ते, एनसीसी ला असतात तसे खाकी. सोबत बुट्स अन बॅरेट कॅप अन नावाची नेम प्लेट. आधीच पीटी ने अंगाची वाट लावलेली त्यात मिठाच्या पोत्या चा एपिसोड. मी अन पुनीत दोघे मढ़े असावे तसे कड़क झालो होतो. कुथतकुथत यूनिफार्म चढ़वला अन बाहेर पडलो हॉस्टेल पासुन ऑडिटोरियम जवळपास 800 मीटर्स. त्यात जायचे ते दौड़ चाल मधे, ते ही एकटे नाही व्यवस्थित फॉलइन होऊन. फॉलइन होणे हे psycological regimentation साठी सर्वोत्कृष्ट टूल असते. उस्तादजी आले अन आम्हाला पळवत ऑडिटोरियम ला नेले. ऑडिटोरियम सही होते तिथे आम्हाला सिंगललाइनतोड़ करायला लावुन आम्ही खुर्च्यात बसलो माझ्या शेजारी समीर अन त्याच्या शेजारी अन्ना होता समोरच नीमा सांगे होता शेजारी पुनीत होता. मोसाय अन सरदार मधे अजुन सीझफायर झाले नव्हते बहुतेक. तसेही माझ्यात अन अन्ना अन सांगे ह्या त्रिकोणात तरी कुठे झाले होते म्हणा!!!. व्ही एस सर अन सिंह सर आले फॉर्मल इंट्रोडक्शन्स झाली अन त्या परिचयाच्या गोंधळात एक गोष्ट विलक्षण लक्षात राहिली व्हीएस सरांच्या हातावर कापल्याची एक वित् लांब खुण. ते बोलायला उठले तेव्हा pindrop silence होता. आतून आम्ही बोरच झालो होतो म्हणले आता परत लेक्चर ऐका वैल्यूज एथोज अन काय काय पण पुढची 15 मिनट्स जबर होती!!! सर बोलु लागले!!
"welcome tigers, firstly I congratulate u 35 toppers for being men apart from the rest lacs u have beaten!! keep the carnivore instinct alive, but with a sense of teamwork and belonging, fight with your shortcomings towards excellence,you know why I am telling you this?? because you are synonym to the future borders of this great nation. the border would be literally as much strong as you chaps become by the end of this training"
अंगावर सरसरून आलेला काटा आवरत आम्ही त्या शब्दांत भिजु लागलो
"people say and talk about 3 armed forces with great respect , they obviously deserve that respect. its similarly ur duty to bring laurels to your unit and force. if god forbid war clouds accumulate on us you chaps would be first to have the honor of defending ur holy motherland and bear the first round (bullet). अब ज्यादा बोर नहीं करूँगा! मैंने भी यहीसे ट्रेनिंग ली है! आजकी आपकी हालत मैं जानता हूँ अब हम सब सिंधिया हॉल में साथ में चाय पिएंगे बॉयज"
आम्ही निःशब्द बसुन होतो . तेवढ्यात खणखणीत आवाजात बड़े उस्ताद ची ऑर्डर आली
"सिंगल लाइन दौड़के सिंधिया हॉल, तेज चल!!"
अन अंगदुखी विसरत आम्ही विद्युतवेगाने उठलो!! ह्याला म्हणतात "पेपटॉक" "आपण महान काम करू शकतो ह्याची एका वरिष्ठाने जाणीव करुन देणे"
सिंधिया हॉल ला मस्त इंतजाम होता , चहा कूकीज, समोसे इत्यादी. व्ही एस सर u आकारांत बसलेल्या एकेक विद्यार्थ्याशी हात मिळवत पुढे येत होते . मझ्यासमोर आले तसे मी कप सारून उभा राहिलो अन एक कड़क सैल्युट मारला. तितकाच कड़क प्रतिसाद आला सोबत सिंह सर होते त्यांना पण सैल्युट केले माझी नेमप्लेट वाचुन ते व्हीएस सर म्हणाले
"ओहो वी हॅव टु गणपतस् विथ अस थिस टाइम, गुड लक सन"
मिलिट्री परलंस मधे मराठी सैनिकांस "द गणपत्स" ह्या नावाने ओळखले जाते. भारतीय थल सेनेच्या सर्वाधिक जुन्या इन्फंट्री रेजिमेंट, मराठा लाइट इन्फंट्री ने हे नाव अजरामर केले आहे ते आपल्या गुणा मुळे , इन्फंट्री रेजिमेंट्स मधे सर्वात जुनी आहे ती (स्थापना 1757). मी अन किश्या दोघे गणपत होतो. किश्या echo कंपनी ला होता सोलंकी उस्ताद च्या अंडर, सांगे त्याचा कंपनी बडी होता अन रूम पार्टनर पण.
चहा झाला तेव्हा आम्हाला मस्त न्यूज़ मिळाली. आज सेकंड हाफ ऑफ दिला होता वेपन उद्या पासुन होते तेव्हा आज बस ने सगळ्यांना ग्वालियर ला नेणार होते किल्ला पहायचा अन मग काही एसेंशियल शॉपिंग चा कार्यक्रम होता. पण जोवर आम्ही ड्रिल ला परफेक्ट होत नाही तोवर खाकी घालून सिविल लाइफ मधे जायचे नाही अशी ऑर्डर होती सो आम्ही चेंज करायला रूम वर आलो होतो.
"बापुसाहब तेरा सांगे का क्या हुआ बे?" समीर
"च्युxx है साला बकवास कर रहा था गांx" मी मग त्याला पूर्ण किस्सा सांगितला
"अबे कोई नहीं काक्के सांगे मेरेको भी ऐसेही बोला हो जायेगा नॉर्मल" समीर
वरच्या मजल्यावर गिल अन मोसाय चा प्रेमसंवाद ही तारस्वरात आला होता
अन,
मिठाचे रिकामे पोते न्यायला आलेल्या बड़े उस्ताद ने सारे ऐकले!
आमच्या रूम्स ची नावे घेऊन फॉलआउट ची ऑर्डर निघाली अन आम्ही थिजलो! असे वाटले संपले ग्वालियर इथेच.
चोरा सारखे बाहेर पडलो न मुकाट उभे राहिलो
"तुम सब लोग आज झगड़ रहे हो कल सालो सगे भाई बन के रोने वाले हो पास आउट परेड पे"
मला सांगेचे तोंड पाहुनच राग येत होता मी कधी नव्हे ते हिंमत गोळा करुन विचारले
"बड़े उस्तादजी हमारा एक भी पॉइंट नहीं मिलता हम कैसे भाई बनेंगे???"
उत्तर ऐकून आम्ही सर्द झालो होतो
"तुम सब एकही पॉइंट पे भाई बनोगे,यही बोल कर बनोगे की चौधरी उस्ताद ने हम सब की बोहोत मारी थी एकसाथ मारी थी!, अब चुपचाप बस में बैठो.
ग्वालियर चा किल्ला मस्त होता. तिथेच किल्यात एक गुरुद्वारा पण होता तिथून ग्वालियर शहराचे विहंगम दृश्य दिसत असे एखाद तास तिथे भटकुन आम्ही बस ने परत कॅन्टोन्मेंट ला आलो तिथेच जवळ बिग बाजार होते अजुन काही शॉपिंग साठी ऑप्शन्स होते. मी समीर अन पुनीत नेहमीप्रमाणे सोबत होतो. मला वाटेत एक ग्रामीण माणुस दिसला, तो काही रानभाज्या, फळे ,मध् वगैरे घेऊन बसला होता.मी तिकडे वळलो. पुनीत म्हणाला
"तुम देखो यहाँ जो देखना है, मैं थोड़ी एसेंशियल दवाएँ ले लेता हूँ अपने लिए"
समीर पण त्याच्यासोबतच गेला. शक्यतो गावठी मध् हे उत्तमप्रतीचे मिळते इतके माहिती होते.रोज पहाटे पीटी ला जाताना एखाद चमचा मध् खाल्यास ऊर्जा मिळत राहील असा माझा अदमास होता.त्या दुकानदाराला मी म्हणले
"भाई शहद चाहिए था"
"आइये आइये सर, सबसे उमदा शहद दूँगा आपको"
त्याने एक मोठा डालड्या चा ड़बा उघडला अन दोन थेंब मध् चखायाला दिला , चवीला तरी बरा लागत होता. माझे लहानपण जरी वस्तीला गेले असले तरी मला मधाची वगैरे पारख नव्हती. तो दुकानदार आता घाईला आला होता
"बोलिये सर कितना?? आधा किलो दे दू क्या???"
मी त्याला होकार भरणार इतक्यात मागून आवाज आला
"वन्न मिनट अन्ना इफ़्फ़्फ़् यो डोंड माइंड"
चमकुन मागे पाहिले ते दिवाकर होता. त्याला हिंदी इतके नीट येत नव्हते तरी तो धडपडत म्हणाला
"मैं हनी चेक करती अन्ना तुम वेट"
मी काही बोललो नाही, तीच संमती समजुन अन्ना त्या दुकानदाराला म्हणाला
"आमाको तोड़ा टेस्ट ओना"
दूकानदार आता अस्वस्थ झाला होता , तरीही त्याने अन्ना ला अर्धा चमचा मध् दिलाच अन्ना ने त्यातले मोजून 2 थेंब हातातल्या बिसलेरी च्या बाटली मधे घातले अन बाटली चांगली हलवली मध् विरघळून गेला!!!
"अन्ना बापुसायब ये नकली हनी रहती !! it is molassess तुम काली पेट खायेगी थो एसिडिटी होती, please dont buy it, original honey dissolve नही होती अन्ना, बिलीव मी!"
आता मी दूकानदारा कड़े वळलो , तो म्हणाला
"साहेब असली माल है ये कुछ गलत बोल रहे है"
मला भड़भडून येत होते!! अन्ना ने मला जिंकले होते!! मी आवाज करडा करत त्याला झाड़ला
"ओये, ये बोहोत बड़े फौजी साहब है साले!, 15 मिनट में दूकान समेट के भाग जा, नहीं चाहिए तेरा शहद".
"हम अब आपको बेचेंगे भी नहीं सरजी".
उगा शब्दाला शब्द नको म्हणुन मी पुढे झालो. ह्यावेळी मात्र माझा हात अन्नाच्या खांद्यावर होता!.
"थैंक्स अन्ना, lets go!".
औषधांच्या दुकानात पुनीत अन समीर ला जेव्हा भेटलो तेव्हा , समीर अन पुनीत ने कड़क शेक हैण्ड ने आमच्या युती चे स्वागत केले, पण काहीतरी मिसिंग होते, मी अन्ना कड़े पाहिले काळ्या मजेत हसत होता. चिमणी इतके तोंड करुन मी म्हणालो
"I am sorry anna i was rude with you earlier , please forgive me and accept my friendship".
"आम इंदी सिकेगा, अन्ना आमसे इंदी बात करो!!!, no formalities my brother we are friends now".
आयुष्याच्या पायात मैत्रीचे मजबुत कंक्रीट ओतले गेले होते.
आता आम्ही चौघे बाजारात हिंडत होतो , लेवीज च्या शोरूम मधुन आम्ही बाहर पडत होतो तेव्हा रस्त्यावर एक आवाज आला,
"एsssss देख साला चाउमिन हाहाहा"
7-8 टारगट पोरांची एक गँग एका नॉर्थईस्टर्न पोराला छेड़त होती, तो सांगे होता.
अपमान झाला अन आपण एकटे आहोत ह्या भावनेने तो माझ्याकडे पाठ करुन उभा होता अन मान खाली घातली होती, अन्नाच्या गूडविल ने माझ्यात काहीतरी आले होते, माफीची ताकद अन मैत्री जोडायची कला!.
"चाउमिन किसको बोला रे हीरो??? साले भाई है वो मेरा"
सांगे चमकुन माझ्याकडे पाहत होता, अन तो टपोरी बोलला
"अबे ओ फौजी, दो ही लोग हो गायब ऐसा करेंगे की पैलेस में वापस नहीं पहुंचोगे"
मराठी रक्ताचा एक दोष असतो, बेटे गरम फार लवकर होते ! इथे मारामारी ती ही फर्स्ट मार्केट विजिट ला केल्यास माझ्यावर disciplinary action घेतली जाऊ शकते हे विसरून मी मुठी आवाळल्या अन त्याला म्हणालो
"इधर आ रे भोसड़ीके!".
तेवढ्यात एक हात खांद्यावर पडला , समीर सांगवान ,सहा फूटी जाट
"हरामखोरो तुमको ऐसे क्यों लगा की मेरे दो भाई अकेले ही है?"
आता आम्ही पाच होतो!.
तरीही समोरचे आठ होते अन आता उठत होते , तितक्यात अजुन एक आवाज आला, आज रंगभवन पैलेस ची सारी पोरे एक होत होती
"दादा ई ना चोलबे!" आमचा डे वन चा हीरो मोसाय.बाजुच्याच हॉटेल मधुन बाहर पडून सामील झाला होता
तितक्यात ही मी त्याला विचारुन घेतले
"दादा तबियत ठीक ऑशबेन की नाही?"
मातृभाषा ऐकून खुश झालेला मोसाय बोलला
"भालो बापुसाहब खूब भालो"
तितक्यात टपोरी लोकांचा म्होरक्या बोलला "आ गया बंगाली भी मार खाने"
अन त्या दिवशीच्या मैत्रीपर्वातला अत्युच्च क्षण आला
"ओये की होया, तु मारेगा बंगाली को??" गर्दी पाहून कुतुहलाने घुसलेला आमचा सातवा भाऊ सरदार अंगदसिंह गिल आला होता!, सात लोक त्यातले हेअरकट वाले 6 पाहून गर्दीला ही तोंड फुटले
"सर इन लोगो का रोज का है कभी बेटियो को छेड़ा तो कभी बूढ़े बुजुर्गो को, आप छोड़िये सर आप जाइये यहाँसे".
तो गृप पांगला तरी आम्ही तिथेच उभे होतो, अन सरदार मिश्किलपणे बोलला
"हाय मेरी बंगालन कुतिया अपने यार को माफ़ नहीं करेगी क्या??"
मोसाय ने त्याच्याकडे पाहिले अन खो खो हसत सुटला!!!
"साले हरामी सरदार! इधर आ!" पगड़ीवाल्याची अन मोसाय ची भरतभेट त्या दिवशी ग्वालियर च्या मार्केट न पाहिली
पण,
सांगे
सांगे मान खाली घालुन दुर निघुन जात होता , आम्हाला कळायच्या आत रिक्षा पकडून तो गायब झाला होता!!
ज़रा लवकरच 5 वाजता आमच्या बस ने आम्हाला परत पैलेस ला आणून कोंडले अजुन डिनर ला तीन तास होते, परत येताना सांगे एकटा त्याची रक्सैक मांडी वर घेऊन शून्यात पाहत सगळ्यात मागच्या सीट वर बसला होता अन आमच्या सहा जणांच्या सोबत बसुन हसण्या खिदळण्याला उत् आला होता.
परत आल्यावर माझ्या रूम नंबर 13 ला मैफल जमली होती गप्पा रंगात आल्या होत्या, अन्ना ऑथेंटिक सांबर ची रेसिपी सांगत असताना दारावर टकटक झाली अन आम्ही एकदम शांत झालो.
समीरने सावधपणे दार उघडले तर सांगे उभा होता.
"मै अंदर आऊ??"
"!!!!.....आजा आजा"
तो आत आला समीरच्या बेड वर गिल शेजारी बसला, मी पसरलेल्या मोसाय च्या अंगावर रेलून बसलो होतो , मी एकदम conscious झालो , अन सांगे ने बोलायला सुरवात केली,
"बापुसाहब, I am sorry but let me please tell u and other guys why i am so reserved if you may buddy?"
सगळ्या नजरा माझ्याकडे वळल्या अन मी म्हणालो
"बोल सांगे बोल, नो फॉर्मेलिटी ब्रदर"
"मेरा एक भाई है बापुसाहब ,real brother elder one, उसको ग्रेजुएशन के बाद तुम्हारे यहां में जॉब लगी थी, not fancy simple bpo job, उसके साथ उसके कॉलेज की ही शीतल थापा को भी जॉब लगी थी, दोनों साथ में रहते थे वहां लेकिन उसको भी ऐसे टीसिंग का तकलीफ हुआ, उसने इग्नोर किया, लेकिन तकलीफ बढ़ता गया , एक दिन कुछ लोगो ने शीतल को छेड़ा बोले नेपाली लड़की है तु, आती क्या खंडाला वगैरह, वो बोहोत humiliate हुई , मेरा भाई उनको समझाने गया तो उसको खूब मारा , वो लोग लोकल कॉर्पोर्टेर के लोग थे, बादमे तकलीफ और बढ़ी उपरसे नाईट शिफ्ट में काम और सबकुछ....."
आम्ही श्वास रोकुन ऐकत होतो
"...फाइनली वो जॉब छोड़ के वापस आया ! फ्रस्ट्रेट हो गया था कहता था मेनलैंड वाले कभी हमको नहीं अपनाएंगे चाहे दिल्ली हो या मुंबई कही नहीं एक्सेप्ट करेंगे, उसी फ्रस्ट्रेशन में वो अल्कोहॉलिक हो गया और आज rehab में है, इसिलए मैं रिजर्व्ड हो गया, यहाँ जॉब इसलिए एक्सेप्ट किया की ट्रेनिंग के बाद पहाड़ी में पोस्टिंग होगी तो जिंदगी मेनलैंड से दुर कटेगी, मुझे किसीपर भरोसा नही रहता था, लेकिन साले आज तुने जता दिया आदमी सब एक जैसे नहीं होते सब मराठे अच्छे होते है बस मेरा भाई unlucky था ! I am sorry बापुसाहब sorry for lashing out at you brother"
विचित्र क्षण होता तो, मी उठलो , सांगेच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणालो
"सब ठीक होगा सांगे, और सुन तु अकेला नहीं है! हम सब साथ है ".
सांगे शांतपणे खाली बसला बॅगपॅक काढले अन म्हणाला,
"तुम लोग दारु पीते हो क्या???"
आत्ताच त्याच्या भावाचा विषय ऐकल्याने आम्ही ह्या प्रश्नावर अवघड़लो , घसा खाकरून पुनीत बोलला
"देख सांगे हम एंजॉय करते है दारु , पर तुझे तकलीफ होगी तो तेरे सामने नहीं पियेंगे भाई"
अन मिश्किल हसत सांगे हरामी बोलला
"मैं भी तो एंजॉय करता हूँ कमीनो!" असे म्हणत त्याने रम चा खंबा काढला सैक मधुन.
"बोलो नीमा सांगे महाराज की जय!" आम्ही 6 कोरस मधे कोकललो! अन एकच दंगा झाला! ज़रा दंगा कमी झाल्यावर मिठ्या सैल झाल्यावर सांगे बोलला
"यार एक बात कहूँ, मेरा रूममेट बोहोत होमसिक हो गया है, अकेला रो रहा है वो अपना उमरीकर, गलती मेरी है यार मैं अपने रिजर्व्ड रहने के चक्कर में उससे बात ही नहीं किया उसको भी बुलाऊँ क्या???"
मी म्हणले "रुक अपन ही जाते उसको चीयरअप करने तेरे रूम में ही बैठेंगे, यार पुनीत फिर गौड़ा को भी बुला ले यार अच्छा बन्दा है"
लगेच प्लान वर शिक्कामोर्तब झाले अन पुनीत अमित गौड़ा ला आणायला पळाला, तो अन अमित आले तेव्हा आम्ही सगळे 22 नंबर बाहेर जमा होतो,
"किशोर दार उघड रे, मी बापूसाहेब" हळूच दार उघडले त्याने ते आमची वरात भसकन आत घुसली!".
"अरे तुम सब इधरकु!, आओ आओ बसो ना अंदर" किश्याच्या हिंदीला इलाज नव्हता!!!.
"तु लेका होमसिक होतोय असे ऐकले रे भाड़खाव...."
"ए हिंदी में बोलो बे हमको नहीं समझेगा ना" समीर.
"हा ते आपलं बरं किश्या होमसिक मत हो इधर सब तेरे भाई है!, चल दारु पीते है, अरे गौड़ा किधर गया! गौड़ा नो फॉर्मेलिटी नो रिजर्वेशन! फील फ्री".
गौड़ा ने हसुन मान डोलावली , दारू पिताना गोल करुन बसायचे, ही माणसाला बहुतेक उत्क्रांति ने दिलेली अक्कल असावी अश्या सराइतपणे आम्ही 9 नवे दोस्त बसलो!, किश्याने चक्क चकल्या काढल्या
"सब खावो रे!!! मेरी वैनी ने बनाया है!".
आता 9 पोरे एक खंबा, काय होणार होते तेवढ़याने! पण आज सेलिब्रेशन होते! दारुत कालवलेली, दुखर्या अंगाची, व्हीएस सरांच्या पेपटॉक ची देन अन बड़े उस्ताद च्या दूरदृष्टी चे परिपाक असली ती आयुष्यभराची जोडलेली मैत्री आम्ही आमचे स्मॉल पेग अन चकली घेऊन एकमेकांची टंगड़ी खेचत सफल संपूर्ण केली होती.
आता सुरु होणार होते टीमवर्क! असली ट्रेनिंग अन तावुनसुलाखून बाहेर पडणे.
Book traversal links for अकादमी 4 : मैत्री चा रंग
💬 प्रतिसाद
(50)
म
मोहनराव
Wed, 04/01/2015 - 17:24
नवीन
छान रंगतदार किस्से!!
(आणि हो मी पयला!)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 04/01/2015 - 17:27
नवीन
हा ही भाग उत्तम झालाय.
आपल्याच देशात परकेपणाची वागणुक किती त्रासदायक असू शकते हे इशान्य भारतातील माणसांना चिडवणार्यांचा गावीही नसते.
बाकी हा लेख वाचून स्वतःच्या होस्टेल लाइफचे दिवस आठवले.
मागील भागांचे दुवे:
- अकादमी भाग 1: एंट्री
- अकादमी 2 : नव्याची नवलाई
- अकादमी 3: रूटीन अन आयोडेक्स
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 04/01/2015 - 17:34
नवीन
लिंक्स साठी आभार श्रीरंग साहेब
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 04/01/2015 - 17:42
नवीन
जिकला राजा तुम्हि... एक नंबर लिहिलय
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 04/01/2015 - 17:50
नवीन
जबरदस्त!!
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Wed, 04/01/2015 - 17:50
नवीन
अत्यंत रोमांचक वर्णन. खूप आवडला हाही भाग.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/01/2015 - 17:59
नवीन
जियो....आपण गर्गर फिरणारा फ्यान झालोय
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/01/2015 - 18:05
नवीन
मस्तचं. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
- Log in or register to post comments
न
निमिष ध.
Wed, 04/01/2015 - 18:30
नवीन
सही लिहिलं आहे एकदम. चालू राहू द्या :)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/05/2015 - 22:48
नवीन
मस्त चाललीय लेखमाला. हाही लेख तितकाच सुरस !
- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 04/06/2015 - 18:45
नवीन
Jiyo .... ekch no ,khub bhalo, ek no pappe :)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/06/2015 - 00:09
नवीन
मस्त लिखाण.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 04/06/2015 - 01:49
नवीन
ये बात बापूसाहेब!
"गणपत" वाचून मनोहर माळगांवकरांच्या Distant Drums या कादंबरीची आठवण झाली. वाचली नसेल तर नक्की वाचा.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 04/06/2015 - 02:55
नवीन
वा! मझा आया!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 04/06/2015 - 06:06
नवीन
चला!! चारी भाग वाचून आजपासून कॅडैट हाजीर है।
लाओ जी। अगला भाग जल्दी जल्दी लाओ।
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 04/06/2015 - 06:43
नवीन
जियो दोस्त....
हर मर्ज की दवा होती है दोस्ती !!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 07:00
नवीन
विकु माझे लग्न व्हायच्या आधी एकदा मी घरी जात होतो, जबलपुर ला अन्नाची ट्रेन क्रॉस होणार असे कळले! हाती फ़क्त ३ तास होते!! दुसरी ट्रेन पकडायच्या अगोदर तितक्यात आम्ही चैन करुन घेतली होती!!!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 04/06/2015 - 06:48
नवीन
हाही भाग उत्तम रंगला आहे!
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Mon, 04/06/2015 - 07:32
नवीन
प्रत्येक भाग जबरदस्त!!
पु.भा.प्र.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 04/06/2015 - 07:40
नवीन
सर्व मिपाकर टीमवर्कने गरगरा फिरणारे पंखे झालेत राव तुमचे. अजून येऊंद्या लौकर!!!!
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/06/2015 - 08:01
नवीन
मार्केटातला किस्सा तरी लै म्हणजे लै भारी...
बाप्पू एक सलाम तुम्हास्नी..
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 04/06/2015 - 08:04
नवीन
रोचक! पुभाप्र!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 04/06/2015 - 09:04
नवीन
सही दोस्ती बापूसाहेब! मी पुण्याला शिकत असताना विद्यापीठात अनेक नाॅर्थ ईस्टमधले मित्र भेटले. त्यातल्या जवळपास सगळ्यांशी आज १७ वर्षांनंतरही संपर्क आहे. मित्र म्हणून त्यांचा जवाब नाही.
-(चष्म्यामुळे इच्छा असूनही आर्मीत जाऊ न शकलेला)बोका-ए-आझम
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Mon, 04/06/2015 - 10:33
नवीन
मागील लेखामधील प्रतिसादच परत येथे लिहितो आहे. तुमची अकादमी , आयएमए , मर्चंट नेवी व अशाच प्रकारच्या कोणकोणत्या संधी आहेत . व त्यासाठी तयारी कशी करावी , कोणत्या training institues यांसाठी चांगल्या आहेत . या सर्व संदर्भातील तुमचे विचार , तुमची मते व तुमचे अनुभव हे सुद्धा नंतर वाचायला आवडतील व उपयोगी ठरतील . अर्थात हे सर्व तुमच्या सवडीने लिहा . बाकी लेखमाला उत्तमच .
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 11:17
नवीन
जसे जमेल प्रयत्न तोच असेल
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 04/06/2015 - 10:37
नवीन
अच्छा हैं..बहोत अच्छा हैं !
- Log in or register to post comments
स
सविता००१
Mon, 04/06/2015 - 10:38
नवीन
अप्रतिम लेखमाला...
पटापट पुढील भाग येउद्यात.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 04/06/2015 - 12:48
नवीन
चकलीसारखी खंग्री भाषा आणि किस्से.
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 04/06/2015 - 13:17
नवीन
भारी लेखमाला...
सोन्याबापू.. एक सुचवतो आहे. जेथे जेथे शक्य आहे तेथे अंतर्जालावर मिळणारे लिखाणाशी संबंधीत (कोणत्याही कॉपीराईटमध्ये नसलेले) फोटो चिकटवले तर आणखी मजा येईल. उदा. एखाद्या शस्त्राचा उल्लेख आला तर ते शस्त्र..
किंवा दोरीवरचे ट्रेनींग..
तुम्हाला फोनवर फोटो शोधणे आणि ते चिकटवणे हा त्रास होणार असेल तर आहे तसे लिखाण सुरू ठेवले तरी चालेल.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 17:34
नवीन
प्रयत्न करतो मोबाइल वर कठीण पडेल , पिकासा ला फोटो लोड करणेच कठीण जाते म्हणुन इथे मुश्किल होते
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 17:50
नवीन
कुतूहलापोटी एक प्रश्न विचारतो.
चतुरभ्रमंणध्वनीवरून एवढे लेखन करता हे कौतुकास्पद आहेच पण संगणक अजिबातच वापरत नाही असे दिसत आहे. असे का?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 18:35
नवीन
सद्ध्या आहे तिथे संगणक नाही देवा
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 18:42
नवीन
बरं बरं.
फॅब्लेट प्रकारचा चतुरभ्रमणध्वनी वापरत असाल तर यासारखे ब्लुटूथ किबोर्ड जोडून टंकन करणे सोपे जाईल अन स्क्रीन मोठा असल्यास लेख सजवणे सोपे होईल.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/06/2015 - 19:41
नवीन
पंत, त्यांचे शब्दच फार बोलके आहेत. आणखी सजावट कशाला?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 19:45
नवीन
सजावट हा शब्द जरा अस्थानी झालाय.
लेखनाबरोबर एखादा फोटू देणे किंवा दुवे देणे (एखाद्या शस्त्राचा उल्लेख असेल तर त्याच्या विकी पानाचा दुवा द्यावासा वाटू शकतो) हे मला अभिप्रेत होते.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/06/2015 - 19:46
नवीन
मंग चालतंय!! :)
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 13:28
नवीन
भारी लिहलं आहे. :)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 04/06/2015 - 13:54
नवीन
चारी भाग वाचुन काढले. मस्त चालीय लेखमाला.
पुभाप्र
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/06/2015 - 16:23
नवीन
मस्त !! आवडलं. आधी एकमेकांना पाण्यात बघणारे आणि आता जीवाभावाचे झालेले काही मित्र आठवले.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बापुसाहेब या कथेचा भाग असले तरी सबंध कथानक निव्वळ बापूसाहेबांभोवती फिरत नाही हा या कथामालिकेचा प्लस पॉईंट आहे. जो फार थोड्या युद्धकथा, लष्करकथांमध्ये बघायला मिळतो.
बर्याचशा खुद से शुरु खुद ही पे खतम टाईप वाटतात. ही त्यातली नाही हे वाचून बरं वाटलं. लिहीत रहा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 17:31
नवीन
अहो हे अनुभव आहेत!!! मला पहा फुले वहा केले असते तर हे अनुभव आलेच नसते!!! मुळात् मिसळून वागणे हेच मर्म ट्रेनिंग चे
- Log in or register to post comments
अ
अमोल मेंढे
Mon, 04/06/2015 - 14:02
नवीन
एका झटक्यात चारही भाग वाचुन काढले ना भाऊ... मस्त लिहीता ब्वॉ तुमी..मानलं तुमाले
- Log in or register to post comments
अ
अवतार
Mon, 04/06/2015 - 20:15
नवीन
प्रदीप दळवींच्या पसायदान ची आठवण झाली!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 04/06/2015 - 21:31
नवीन
हे "मी नथुराम..." लिहिणारेच का? पुस्तकाबद्दल अधिक माहिती देता येईल का?
- Log in or register to post comments
अ
अवतार
Tue, 04/07/2015 - 16:56
नवीन
ह्या कादंबरीत कोल्हापुरात राहणाऱ्या आर्मीतील आजोबा आणि नातवाची कहाणी आहे. शाळेत असतांना वाचली होती. कादंबरीचा काळ फाळणीच्या वेळचा आहे. आर्मीच्या प्रशिक्षणाचे अप्रतिम वर्णन आहे. अधून मधून गांधीजींना-नेहरूंना उपदेशाचे डोस पाजले आहेत. सरदार पटेलांची भलावण आहे. पाकिस्तानातील मुस्लिमांच्या तावडीत सापडलेल्या हिंदूंचे वर्णन आहे. शाहू महाराजांच्या वारश्याची कहाणी आहे. कादंबरी अत्यंत वाचनीय आहे. आज त्यातलं सर्वच पटत नसलं तरी मी अजूनही वाचतो.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 04/06/2015 - 21:54
नवीन
वरती सर्वांनी लीहीलेच आहे. अजून काय लीहीणार.
ज ब र द स्त !!
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 04/07/2015 - 17:31
नवीन
ऑस्ट्रेलिअन खेळाडूसुद्धा असेच प्रशिक्षण घेत असणार . त्यामुळेच ते एवढे शारीरीक व मानसीकद्रुष्ट्या सक्षम असतात .
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 04/07/2015 - 18:44
नवीन
त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही गेम ला सूटेबल असते , मानसिक बला साठी टीम चा एक साइकेट्रिस्ट असतो तो त्यांना पेपटॉक वगैरे ने ऑपटिमिस्ट ठेवतो बहुतेक
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 04/07/2015 - 18:58
नवीन
बरोबर, सामन्याआधी मैदानावर होणार्या ऑस्ट्रेलीया संघाच्या टीम मीटींग्स आठवा...
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 04/29/2015 - 19:38
नवीन
तुमची लेखनशैली फार छान आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 04/29/2015 - 21:31
नवीन
मस्त!!
- Log in or register to post comments