Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श

क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 04/11/2015 - 09:58
💬 79 प्रतिसाद
अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६ *** अकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले!! एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे "ड्रिल". शाळेत ड्रिल म्हणजे पीटी वगैरे असे, पण फोर्सेज च्या भाषेत मार्चिंग ला म्हणतात ड्रिल. जनरल "लेफ्ट राईट लेफ्ट" इतकेच त्याचे स्वरुप नसते , त्यात अनेक बारकावे असतात. काही सांगायचे झाल्यास 1. चटख :- म्हणजे "तेजsssss चलssssss" किंवा इतर कोणती ही ऑर्डर मिळाल्यावर इंस्ट्रक्टर किंवा कमांडर ची ऑर्डर संपल्या संपल्या भयानक विद्युतवेगाने डावा पाय अन उजवा हात एकाचवेळी बाहेर काढणे किंवा सांगितली असेल ती करवाई करणे. 2. टर्नआउट :- ड्रिल च्या वेळी आम्हाला परफेक्ट ड्रेसिंग बाय सेन्स ऑफ़ ड्यूटी आले पाहिजे बैरेट कॅप घालायचा कोन, डोक्याच्या उजव्या भागावर टोपी चेपली म्हणजे तिचा डावा भाग अन त्यावर लावलेला लोगो किंवा यूनिट इंसिग्निआ हा डोक्यावर डाव्या बाजुला डाव्या डोळ्याच्यावर अर्धी वित वर असावा, टोपी घातल्यावरही ती कपाळ पुर्ण झाकता कामा नये, त्यात 4 बोटांची गॅप असावी, इत्यादी. 3.सिस्त (शिस्त) :- फाइल्स बनवणे, ब्लैंक फ़ाइल सोडणे, दाहिने देख च्या ऑर्डर ला फ़ाइल च्या गाइड ने सरळ पाहत राहणे इत्यादी हे फ़क्त काही नमुन्यादाखल देतोय अश्या असंख्य गोष्टी असतात, बड़े उस्ताद ह्या बाबीत फार कड़क लक्ष्य घालत असे, सकाळी उठलो की रनिंग , मग कैनेडियन पीटी मग फिजिकल ट्रेनिंग अन मग ड्रिल असा एकंदरित कार्यक्रम असे, ह्यात फिजिकल अन ड्रिल हे कोर फोर्सेज चे ट्रेनिंग समजा, ह्या फिजिकल मधे दोर चढणे , वुडन लॉग पुलप्स , पुशप , फ्रंट रोल बॅक रोल (कोलंटउड्या सरळ अन रिवर्स), डिच क्रोलिंग वगैरे असे. सगळेच आधी तंत्रशुद्ध माहिती नव्हते तेव्हा ते हाहाकारी भासे, दोर चढ़ताना गुढघे फ़क्त सपोर्ट ला वापरून एंकल लॉकिंग ने वर चढायचे असते, दात ओठ चावत आम्ही वर चढत असु पण उतरताना ब्रेकिंग ला हमखास गुढघे घासत असु जाडजुड़ काथ्यासारख्या त्या दोराला घासल्यामुळे आतल्या बाजूंनी गुढघे अन मांड्यांवर अक्षरशः कट्स पडत, अन त्याची आगाग होत असे मग आम्ही कैंटीन मधुन nycil वगैरे पावडरी आणून तिथे लावायचो अन टंगड्या फासकटुन रात्री पंख्याखाली उताणे पसरायचो, मला त्या फिजिकल मधे खुप जास्त रगड़ा लागे. त्यात मी शर्मा उस्ताद चा लाडका होतो!!! पुलप्स मारतो पण फ्रंटरोल आवर असे व्हायचे, एक चुक झाली की पुर्या फिजिकल ग्राउंड ला फ्रंट रोल ने राउंड मारवा लागे. तिथून परत आले की अंघोळ करुन वेगळा यूनिफार्म घालून मेस ला जायला 25 मिनट्स असत, डेली वेगळा ब्रेकफास्ट असे, शक्यतो अंडी अन स्प्राउट्स वगैरे हायप्रोटीन डाइट असायचा तेव्हा. दहा ते दुपारी एक सिविलियन प्रोफेसर लोक्स लेक्चर घेत असत आम्ही ह्याच लेक्चर मधे जांभया कंट्रोल करायची कला अवगत केली होती विषय पण बोरिंग स्ट्रेटेजिक स्टडीज अन ऑल आमच्या फोर्स ला स्पेसिफिक असलेल्या पहाड़ी राज्यांबद्दल तिथल्या संस्कृति बद्दल वगैरे (अर्थात आज लोकल लोकांसोबत जेलिंगअप करताना त्या लेक्चर चे महत्त्व ही जाणवते) त्यानंतर मॅप रीडिंग (ह्यात कन्वेंशनल मॅप, जीपीएस वगैरे सगळे असे) मग वेपन चा क्लास असे, वेपन ला मजा असायची , ते झाले की स्पोर्ट्स तेव्हा इंचार्ज प्रभजोत सर स्वतः आमच्या बरोबर खेळत असत विविध गेम्स, ज्यांना गेम्स खेळायचे नाही त्यांस जिम ला जाणे कंपल्सरी असे, सहज फिरताना कोणीही दिसला की खैर नाही. 6.00(1800) वाजता ते संपले की 6.30 (1830) ते परत 8.00 (2000)पर्यंत स्टडी टाइम असे लेक्चर चा अभ्यास करायला, अर्थात त्यावेळी आम्ही पण अभ्यास उरकुन टाकत असु,8.15 (2015) ला मेस ला डिनर असे, डिनर शक्यतो लाइट असे पण प्रोटीन्स चा मारा असे ह्या ही वेळी. सगळ्यांना सगळ्या टेबल्स वर सर्व करण्यात श्रीवास्तवजी अन मेस स्टाफ चे प्रोफेशनलिज्म डोळ्यात भरण्यालायक असे.साधारण 9 पर्यंत डिनर आटपे कुजबुजत गप्पा मारत.परत 9 (2100) ते 9.44 (2145) स्टडी देत , ह्या वेळात आम्ही उद्याचे लेक्चर पाहून ती पुस्तके बॅग मधे घालुन ठेवणे, सकाळ च्या पीटी चा यूनिफार्म खुर्चीवर जय्यत तयार ठेवणे इत्यादी उद्योग करत असु अन मग हॉस्टल च्या मधल्या चबुतर्यावर एकमेकांची टांग ओढ़त बुट पट्टे वगैरे हाती येतील त्या चमकवण्यालायक गोष्टी घासत बसत असु, त्या चबुतर्याला आम्ही "बेइज्जती मंडप" असे नाव दिले होते . ह्याचवेळी अन्ना ला हिंदी चे धड़े द्यायचे ही कार्य करावे लागे, कारण ऑर्डर येऊन ती समजून करवाई करण्यात अन्ना ढीला पड़े व् जवळपास रोज आम्हाला रगड़ा लागे. मग सगळे आवरून 9.45(2145) ला लाइट्स ऑफ़ होत असत!. अश्याच रोजच्या रूटीन मधे काही काही दिवस विलक्षण गमतीदार म्हणुन लक्षात राहत. उदा वेपन सुरु झाले तो दिवस. आमची सुरुवात ऑर्डनेन्स फैक्ट्री बोर्ड (OFB) च्या 9 mm pistol ने झाली होती. वेपन्स स्वतः बड़े उस्तादजी शिकवत असत. पहिल्या दिवशी कोत मधुन(शस्त्रागार) DM pistols (डमी हत्यारे) आणायची जबाबदारी किश्या अन अल्फा कंपनी च्या तेज प्रताप गुरुंग ला दिली होती! एका हातात 2 ह्या प्रकारे 8 pistols घेऊन दोघे आले. वेपन्स म्हणजे नुसते वेपन्स नसते तर सोबत वेपन्स च्या माहिती चे चार्ट्स, ती वेपन्स खोलुन ठेवल्यावर मातीत ठेवावी लागु नये म्हणुन ती ठेवायला काही ताड़पत्री च्या मॅट्स वगैरे पण जामानिमा असे. हत्यारे न बघितलेल्या पोरांना एकदम लाइव ammo ला एक्सपोज़र नको म्हणुन बैरल जैम केलेल्या किंवा फायरिंग पिन्स काढून टाकलेल्या अश्या राइफल किंवा पिस्टल्स असत. त्याला म्हणायचे डीएम पिस्टल. त्या पिस्टल घेऊन जेव्हा किश्या अन तेजु आले तेव्हा सगळी पोरे कौतुहलाने फ़ाइल तोडायला येतील असे वाटले पण पोरे औत्सुक्य दाबून चुळबुळत जागेवर उभी होती! उस्तादजी ने मला अन समीर ला फॉलआउट करायला सांगितले अन आदेश दिला "दोनों आदमी, मैट्स बिछाओ, हर मैट पर एक एक पिस्टल, बैरल टारगेट की तरफ होगी, मगज़ीन निकली होगी, उसके बाद टारगेट पेपर सेट करो" आम्ही इमानेएतबारे आधी मैट्स अंथरल्या मग टारगेट्स लावली अन पिस्टल्स ना हात लावला, आयुष्यात पहिल्यांदा एक आधुनिक शस्त्र अन त्याचे शास्त्र डोळ्यासमोर होते , उगाच आपण लै भारी टाइप फील होता. अन मी तो मूर्खपणा केला! सहज गंमत म्हणुन मी त्या वांझोटया पिस्टल चा बैरल समीर कड़े केला अन त्याला डोळा मारला!. मागे वळलेल्या उस्तादजी ने एक सेकंड मधे आमची करवाई पाहिली अन मला अन समीर ला फरमान सुटले. "दौड़ के इधर आओ" सम्या चरफडत होता अन मी ओशाळलेलो होतो. "कभी भी बैरल किसी अपने की तरफ नहीं मोड़ा करते, सिखलाई कैसे भुल गया ओसी बापुसहब??" "......" "ओसी पुनीत, ओसी दिवाकर फॉलआउट, जो करवाई इन दो मकरो से छुटी है पुरी करो" अन्ना ने डबल गाढवपणा केला! "क्या करना सर???" "जब इंस्ट्रक्शन दिया इनको तब तु सोया था या इंस्ट्रक्शन सिर्फ इनके लिए था रे xxxx, ओसी पुनीत इन्हें करवाई सिखाओ" "......" "मजाक बना रखा है क्या पुरे ट्रेनिंग का??, पूरा कंटिंजेंट प्लांक पोजीशन" बड़े उस्तादजी बरसला!!! अल्फा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,एको साऱ्या कंपनी पुशप पोजीशन ला आल्या तसे मी अन समीर ही साळसुदपणे प्लांक होऊ लागलो! "आप दोनों नहीं जी, आप तो जान हो इस पनिशमेंट की..." आता मी अन समीर हादरलो पुढे ऑर्डर आली ".... पुरी कंटिंजेंट 10 पुशप करके तबतक प्लांक रहेगी जबतक ओसी बापुसहेब ओसी सांगवान को कंधे पर फायरमैन लिफ्ट देकर पुरे परेड मैदान की एक राउंड नहीं लगता..." "....मजाक बना रखा है ट्रेनिंग का!!, मैंने पहले ही दिन कहा था एक गलती करेगा ट्रूप को सजा होगी , टीमवर्क इसीको कहते है, अगर ओसी बापुसहब गिरा तो ट्रूप की सजा दोगुनी और ट्रूप में से किसीने प्लांक पोज़ छोड़ा तो बापुसहब की पनिशमेंट दोगुनी, ओसी बपुसहब ओसी सांगवान पीछे मुड़ तेज चल" समीर ला माझ्या खांद्यावर आडवे उचलले होते मी, सहा फूटी होता हरामखोर आजकाल फिजिकल शिक्षेचे काहीच वाटत नसे , अगदी वाढत्या शारीरिक ताकदी सोबत ती ही चढत्या भाजणीत असली तरी. त्याला फायरमैन लिफ्ट दिल्यावर त्याचे मुंडके माझ्या डाव्या कानाशी आले होते अन त्याने अखंड लाखोली गजरनाम सुरु केले होते, फुसफुसत्या शिव्या ऐकून मला अजुनच हसु येत होते. "भोसडीके काक्के, बड़े शौक तेरे शूटर बननेके कमीने कुत्ते भाग वरना रात तक ऐसेही रहेंगे" तिकडे अन्ना किश्या सांगे सहित सारे माझ्याकडे आशेने पाहत होते त्यांचे प्रेमळ संवाद काय असतील हे क्लियर समजत होते!! एव्हाना 5 पुशप झालेल्या त्यांच्या मी समीर चे धूड़ घेऊन दुडक्या चालीत मजेत होतो! जास्त थकवा नव्हता डोळ्याच्या कोपर्यातून मागे चाललेला आमच्या नावचा शिमगा समीर मला लाइव सांगत होता! अन त्याला ही कळले नाही सांगे ला शिक्षेतुन मुक्ति का मिळाली. नंतर माझ्या ढुंगणानेच त्याचे उत्तर दिले!! मी हळू चलतोय म्हणल्यावर उस्ताद ने सांगे ला मुक्त केले! त्याच्या हाती स्वतःची केन दिली अन आमच्या मागे धावत गरज पडेल तिथे आमच्या बोच्यावर वळ उमटवायची जबाबदारी दिली. धावत आलेल्या सांगे ने चप्पकन एक केन आमच्या कुल्ल्यावर ओढली तसे मी दबक्या आवाजात ओरडलो "साले सांगे कमीने इकलौती गांड है मेरी आराम से केन मार" "सॉरी यार बापु ,उस्तादजी तो तु जानता ही है" असे म्हणत तो हळूच केन पिछाड़ी ला टच मात्र केल्यासारखे करु लागला तशी त्या पिनाकदृष्टि उस्ताद चा आवाज कडाडला "ओसी सांगे मकरे की गांड पे मार रहा है की घरवाली के!! जोर से मार वरना तेरी खाट खड़ी करूँगाsssss" पर्यवसान आमच्या टिरी वर एक अजुन सज्जड़ फटका बसण्यावर झाले!!मी हाय हुई करत होतो अन स्पीड कमी झाली की सांगे वळ काढत होता! समीर खांद्यावर मजेत होता असे ही नाही त्याच्या बरगड़ी ला अन "सेण्टर फ्रेश" ला माझे खांदे टोचत होते तो ही मेटाकुटीला येऊन शिव्या घालत होता!! तसाच परेड ग्राउंड ला एक चक्कर मारून आम्ही जागेवर आलो, तरी मी त्याला उतरवला नाही म्हणले परत त्या मिठाच्या पोत्यागत व्हायचे!! पण तोच म्हणाला "निचे उतारो उसको और तीनो ओसी मिल जाओ, बाकी लोग भी आराम से" आम्ही घामाघुम होऊन खाली बसलो तसे उस्तादजी बोलु लागले "ये हथियार है ओसीज, इससे कभी मजाक मत करना! उसको अपना खुद का दिमाग नहीं होता इसकी नली सिर्फ दुश्मनो की तरफ होनी चाहिए,ये एक खतरनाक हथियार है जिसे हम लोग "लीथल वेपन" कहते है", निशाने पर इसकी गोली हो तो जान बचना मुश्किल होती है, इसी कारण यह वेपन Indian arms act,1959 के तहत PB अर्थात PROHIBITED BORE वेपन होता है,कोई भी सिविलियन इसे अपने पास नहीं रख सकता है, ये पहली बात, आजसे यह हथियार तुम्हारा हिस्सा होनेवाला है! जैसे पाउडर क्रीम लगाके चेहरा खूबसूरत रखते हो उसे खरब नहीं होने देते वैसेही हथियार होगा,यह हुई दूसरी बात और तिसरी बात ट्रेनिंग की सिस्त बरकरार रखो! बॉर्डर पे रहना है आपको , खेतो में चिड़िया नहीं हांकनी है, हर हफ्ते तुम्हे खिलाने पर लाखो में पैसा खर्च कर रही है सरकार,दाना दाना कर्ज है तुमपर, मकरा बंद करो" आम्ही ही सीरियस होतोच पण परिस्थिती, वय , रगड़ा ह्या सगळ्यामुळे कधी कधी मस्ती ही करायचो! ते तसेच राहणार हे उस्ताद ला ही माहिती होतेच फ़क्त दरवेळी चांस आला की तो आम्हाला तांब्याच्या भांड्यागत ठोकुन सरळ करत असे इतकेच. "तो अब सुनो, इसे कहते है क्लोज क्वार्टर बैटल वेपन या फिर सीक्युबी वेपन , इसे ऑफिसर्स पर्सनल वेपन भी कहा जाता है. रेंज 50 मीटर्स. इसमें कुल 54 कलपुर्जे होते है, तो आओ हम पहले इसके बाहरी रूप को जाने, यह है मैगज़ीन इसमें चौदह गोलिया या राउंड्स आ सकते है लेकिन जाम न हो इसलिए एक बैरल में और 13 मैगज़ीन में रखे जाते है, हर राउंड में 0.450 ग्रॅम बारूद होता है ...." आमच्या आधुनिक द्रोणाचार्याने मुक्तहस्ताने आम्हाला आधुनिक विद्या वाटायला सुरवात केली होती अन आता लेक्चर संपत आले तसे ऑर्डर आली "ओसी बापुसाहब फॉलआउट" माझ्या सकट सात पोरे आम्ही एकेक मॅट समोर उभे होतो" "अपने अपने वेपन उठाओ, जो हात से लिखते हो उस हात से हथियार पे मजबुत ग्रीप बनाओ, बाया हाथ पीछे पीठ पर मुठ्ठी बांधके रखो,टारगेट का बुल्स आय, फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु और तुम्हारी ऐमिंग आँख सबकुछ एक लाइन में अलाइन करो, सांसे काबू करो , सांसो की तरह हात पैर की तरह हथियार को अपने शरीर का हिस्सा बनाओ" अन , घराबाहेर पडलेल्या, अकादमी मधे नवे मित्र जोडून कक्षा रुन्दावणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या कक्षा अजुन रुंद झाल्या, आपण इथे का आहोत ह्याची जाणीव देणारा तो क्षण होता, बुल्सऑय, फ्रंटसाइड टिप, बॅकसाइड यु अन माझा डोळा एका लाइन मधे होते! जणू प्रत्येक श्वासा बरोबर मी त्या 9 mm ला सुद्धा रक्त पुरवठा करत होतो , पोसत होतो!. शेवटी "ती" मला जाणावली , एकरूप झालो मी तिच्याशी, अन खऱ्या अर्थाने तो आयुष्यातला पहिला असा एक विलक्षण "तिचा स्पर्श" होता.

Book traversal links for अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श

  • ‹ अकादमी 4 : मैत्री चा रंग
  • Up
  • अकादमी 6 :- पाहिले रेकी ऑप ›

प्रतिक्रिया द्या
41088 वाचन

💬 प्रतिसाद (79)
अ
अजया Sat, 04/11/2015 - 10:17 नवीन
जबरदस्त झालाय हाही भाग!लष्करी हिंदीतल्या त्या आॅर्डर्स वाचताना आपण तिथेच आहोत असं वाटतंय अगदी. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 04/11/2015 - 10:19 नवीन
जबरी! वाटच पहात होतो. एक प्रश्न - पिस्तुलाचे सगळे ५४ कलपुर्जे वेगवेगळे सोडवता येतात का? तो मेन्टेनन्स ऑफिसर स्वतः करतो की त्यासाठी विशेष डिपार्टमेंट असतं?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 10:29 नवीन
मेंटेनेंस किट असल्यास सगळे वेगळे होतात, अर्थात ते खाली म्हणजे बैक एंड करवाई मधे असते, ऐन पोस्ट वर रूटीन मधे फायरिंग असेंबली वेगळी होते अन आम्हीच सुती कापड़ाने हत्यार साफ़ करतो आपापले , काही विशेष उपकरणे असतात, उदा बैरल क्लीनिंग रॉड्स किंवा फुलतुर (एका टोकाला चिंधी गुंडाळलेली बारकी दोरी टाइप असते) ,ऑइल (कुठलेही चालते पण आम्ही आळशी चे तेल (लिनसीड ऑइल) किंवा कैस्टर ऑइल किंवा जे पोस्ट च्या भटारखान्यात असेल ते ऑइल) वापरतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ज
जगप्रवासी Sat, 04/11/2015 - 10:26 नवीन
आजकाल मिपावर आलो कि पहिल तुमचे काही लिखाण आलाय का हे पाहतो कारण तुम्ही तुमच्या लिखाणातून आमच्यासमोर लष्करी वातावरण अस काही तयार करता कि आम्ही त्यात रमून जातो. हा हि भाग अप्रतिम झाला आहे हेसांवेनला.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 04/11/2015 - 10:39 नवीन
_/\_ ती आवडली _/\_ जब्राट.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 04/11/2015 - 10:54 नवीन
तुमची गळाभेट घ्यायची फार इच्छा होतीये. संपुर्ण माहौल नजरेसमोर उभा केलात. एक मिनिटापुर्वी सांगे तुम्हाला वेताने फटकावित असताना खुदुखुदु हसत होतो, तेव्हढ्यात शेवटच्या परिच्छेदाने अंगावर सर्रकन काटा आला. (हा पाहा, प्रतिसाद टायपुन झाला तरी,अजून काटा तसाच आहे)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 11:04 नवीन
आभार पैलवान!! अविस्मरणीय असतो तो क्षण!! आता रोज होल्स्टर मधे नाइन एमएम असते सतत !! पण त्या रगड्या मुळे कुठे कशी कधी अन का वापरायची ह्याचे ज्ञान ही मेंदुच्या "फिक्स्ड रॉम" मधे राहते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार ताकवले Sat, 04/11/2015 - 10:56 नवीन
NCCत असताना अनुभवला. भन्नाट. रगड़ा राहून गेला तो गेलाच. तुमच्या लिखनातून तो अनुभवतो
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 04/11/2015 - 11:04 नवीन
आहा!! वाचताना सगळच्या सगळ डोळ्यासमोर उभं रहातयं. विलक्षण लिखाणाची हातोटी आहे तुमच्याकडे बापूसाहेब. तुमच्या शिक्षेचा प्रसंग वाचताना खुदु खुदु हसायला येत होतं.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 11:10 नवीन
अकादमी च्या नव्वद टक्के आठवणी ह्या शिक्षेच्याच् असतात हो!! पण त्यात मोनोटोनी नाही जाणवत कधीच!! दरवेळी कारण स्थलकाल वेगळे असते !! त्याच्यामुळे शिक्षण मैत्री आठवणी सगळे घट्ट करत जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पॉइंट ब्लँक Sat, 04/11/2015 - 11:44 नवीन
जोरदार आहे एकदम! चालू राहू द्या?
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Sat, 04/11/2015 - 12:02 नवीन
बापूसाहेब . . रोज येउन बघत बसतो तुमचा लेख आला का . जबरदस्त लिहिताय .
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 04/11/2015 - 12:55 नवीन
मस्त चाललय...
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 04/11/2015 - 15:37 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 16:08 नवीन
फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु हे खरे पाहता फ्रंट साईट टिप अन बॅक साइट यु असे होते पण उस्तदजी साइडम्हणत ते आम्हांस ही तीच सवय लागली
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 04/11/2015 - 16:17 नवीन
प्रत्यक्ष भेटीची आत्यंतिक आस आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 04/11/2015 - 16:19 नवीन
सलाम कुणी कुणाला कधी कसा केव्हा करायचा ... आणि केव्हा तो करायचा नाही आम्ही फारच बेसिक लेव्हल ला शिकलो पण पुन्हा उजळणी करावीशी वाटते ...
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 16:39 नवीन
सलूट चे असंख्य प्रकार असतात , वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे असतात समोर डिपार्टमेंटल सीनियर आहे की क्रॉस disciplinary ह्यवर पण अवलंबुन असते, सिविलियन अथॉरिटी असल्यास त्यांनी जर कुठले ही पारंपरिक भारतीय "हेडगियर" परिधान केले असले तर ते सलूट ला पात्र असतात, लैच डिटेल मधे हवे असल्यास ब्यूरो ऑफ़ पोलिस रिसर्च एंड डेवलपमेंट (बीपीआरडी) ह्यांच्या संकेत स्थळावर "पोलिस ड्रिल मैनुअल" सापडेल ते डालो केल्यास खुप काही कळू शकेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
आ
आतिवास Sat, 04/11/2015 - 16:47 नवीन
सुरेख लेखमाला - आवर्जून वाचण्याजोगी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 04/11/2015 - 18:44 नवीन
मस्त लिहिताय. आवर्जून वाचत आहे. मागील एक ट्रेकला भारतीय सैन्यातील जवानांशी बातचीत करायचा - काही काळ घालवायचा योग आला होता, तेह्वा आमच्या विनंतीखातर मॅगझिन काढून घेऊन एके ४७ हातात धरायला दिली होती ते आठवले!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 18:10 नवीन
रियली, कुठे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 04/11/2015 - 18:39 नवीन
काश्मीरमध्ये सोनमर्ग - गगनगीर च्या पुढे.ग्रेट लेक्स असा ट्रेक आहे. (सोनमर्ग ७८०० फू -निचनई पास व शेकदुरु ११५०० फू - विशनसर + किशनसर हे जुळे तलाव १२००० फू -गडसर पास १२५०० फू - गडसर १२००० फू - सतसर १२०००फू - झच पास (१३५०० फूट) - गंगबाल आणि नंदकोल जुळे तलाव ११५०० फू - नारनाग ७४५० फू) ह्या अख्ख्या मार्गावर ३ महत्वाची सैनिकी ठाणी आहेत. शेवटच्या दिवशी हार्डकोअर कमांडोजना भेटलो, रादर दर्शन घेतलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 18:49 नवीन
सोनमर्ग!!! रम्य ठिकाण!! आर्मी चे हॉज (हाई अल्टीट्यूड वारफेयर स्कूल) आहे तिथे! मस्त जागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बॅटमॅन Sun, 04/12/2015 - 10:17 नवीन
ग्रेट लेक्समध्ये नंदकुल ते नारनाग या दरम्यान, तसेच निचनई पास नंतर ठाणी लागतात. काय जबर्‍या ट्रेक आहे तो, खरंच तेजायला. लै मजा आली होती. (यद्यपि तितकीच लागलेली असूनही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 04/12/2015 - 10:37 नवीन
ट्रेक्स मजेदार असतात! फ़क्त ट्रेक्स चे "पेट्रोल रुट्स" झाले की डोके उठते!!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 04/12/2015 - 12:10 नवीन
हाहा, अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
यशोधरा Sun, 04/12/2015 - 21:04 नवीन
पहिले ठाणे गडसर पासनंतर आहे. दुसरे सतसरच्या आधी आणि तिसरे नंदकोल आणि नारनागच्या मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
दमडी Sat, 04/11/2015 - 18:22 नवीन
खुप छान लिखाण. आम्ही अकादमीत असताना चे दिवस आठवले . अगदी तंतोतंत वर्णन आहे.फक्त मुलींच्या उस्ताद लेडी डी.आय. असायच्या. आमची पहिली पनिशमेंट मात्र रडापडीची होती. नंतर मात्र आम्ही तासंतास लाइन पोजिशन मधे आगे बढ आवडीने करायचो.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 18:36 नवीन
आपण कुठल्या अकादमी ला होतात???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमडी
च
चाणक्य Sat, 04/11/2015 - 19:06 नवीन
फार भारी लिहीताय.
  • Log in or register to post comments
द
दमडी Sat, 04/11/2015 - 19:21 नवीन
मी महाराष्ट्र पोलिस अकादमीत P.S.I. च्या ट्रेनिंग साठी होते. बाकी अकादमीच्या आठवणी न विसरता येणाऱ्याच!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 04/11/2015 - 19:29 नवीन
अरे वा!! एमपीए!! उत्तम उत्तम!!! तुमचे अकादमी कैंपस अतिशय सुंदर त्यात नाशिक चे माइल्ड वातावरण! पण पाहिले काही आठवडे अन्न गोड लागत नाही अजिबात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमडी
श
श्रीरंग_जोशी Sun, 04/12/2015 - 04:48 नवीन
नेहमीप्रमाणेच खास. वाचकांच्या सोयीसाठी पूर्वीच्या भागांचे दुवे...
  • अकादमी भाग 1: एंट्री
  • अकादमी भाग 2: नव्याची नवलाई
  • अकादमी भाग 3: रूटीन अन आयोडेक्स
  • अकादमी भाग 4: मैत्रीचा रंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 04/12/2015 - 05:39 नवीन
चालू द्या! मस्त चालू आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 04/12/2015 - 05:48 नवीन
सोन्याबापु, आधीच्या सगळ्या भागांचे दुवे याच धाग्यात सुरूवातीला अपडेट केले आहेत. शिवाय, सगळे दुवे नवीन टॅबमध्ये उघडतील. असेच प्रत्येक भागात टाकत जा. वाचकांची सोय होते.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/12/2015 - 05:58 नवीन
धन्यवाद बि.का. ते फोनवरुन टंकत आहेत त्यामुळे कदाचित एवढा मोठा कोड कॉपी पेस्ट करायला अडचण येत असावी. त्यामुळे येथुन पुढच्या भागांना सं.मं. नी हे छोटसं काम करावं अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 04/12/2015 - 06:55 नवीन
मनःपूर्वक आभार बि.का. , अहो नुसतेच् फोन वरुन नाही कैप्टेन जॅक् त्यात एंड्रॉइड एप्प वापरतोय मिपाचे , इथून लिंक कॉपी करुन हाइपरलिंक तयार करणे ही त्रासाचे जाते म्हणुन त्या बाबतीत आपण महानुभाव किंवा संम वर अवलंबुन आहे मी ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 04/12/2015 - 09:20 नवीन
धन्यवाद जॅक आणि सोन्याबापु. एक उपाय असा की, टेक्स्ट टाईप करून झालं की संमंपैकी कोणाला तरी पाठवा. मग तो व्यवस्थितपणे (तुमच्या नावाने) प्रकाशित करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
आ
आवडाबाई Sun, 04/12/2015 - 07:25 नवीन
सर्व भाग वाचले आहेत येतील तसतसे. आधीच्या भागाना प्रतिसाद दिला नाही, माफ करा. हा भाग पण छान
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 04/12/2015 - 10:17 नवीन
सगळे संवाद बाकी फारच प्रत्ययकारी पद्धतीने मांडता तुम्ही. मान गये सोन्याबापुसाहेब.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 04/12/2015 - 10:43 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अन्या दातार Sun, 04/12/2015 - 12:24 नवीन
झकास चालू आहे लेखमाला. पुभाप्र
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 04/12/2015 - 15:49 नवीन
अफाट सुंदर आहे लेखमाला __/\__
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sun, 04/12/2015 - 17:33 नवीन
काय सांगु बापुसाहेब,आळंदीच्या ट्रेनिंग कँपवर जेंव्हा पहिल्यांदा वेपन हातात घेतल तेंव्हा असच काहीतरी झाल होत.पण त्याच बरोबर आला एक जबरदस्त आत्मविश्वास आणी जबाबदारीची जाणिव. विसरुच शकत नाही.तुमचा लेख वाचताना अंगावर काटा आला आज.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/12/2015 - 17:48 नवीन
मस्तच! आधीचे भाग आता वाचते एकेक! काय अफाट लिहिताय बाप्पू!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 04/12/2015 - 18:12 नवीन
आपली लेखमाला उत्तमच आहे. जुन्या दिवसांची( आणि कष्टाची) आठवण येत आहे. शिवाय गणवेशातील माणसाला काय कष्ट पडतात याची सर्व सामान्य माणसाला कल्पना नसते. तुमच्या लेखमालेमुळे लोकांना त्याची थोडीशी झलक मिळते आहे हे अतिशय चांगले आहे. ड्रील बद्दल बरेच काही लिहायचे आहे परंतु आपल्या धाग्याला उगाच आमचे ठिगळ नको म्हणून एक वेगळा धागा काढत आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 04/12/2015 - 18:29 नवीन
कथारूप अनुभवांत टेक्निकल डिटेल्स जास्त दिल्यास फ्लो बिघडेल ही भीती मला उगाच असते, म्हणुन ड्रिल चे जास्त डिटेल्स टाळले मी डॉ.साब तुम्ही काढ़ा भारी धागा!! आम्ही येतोच बघा तिथे अवांतर मध्यांतरी एक नार्वेजियन आर्मी अकादमी अन एक एनसीसी कॅडेट्स च्या ड्रिल्स चा वीडियो पाहिला होता! साला कलेजा खुश झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
यसवायजी Sun, 04/12/2015 - 21:22 नवीन
भावा, एक क-ड-क सेल्यूट _/\_. आज पाचही भाग वाचले. लई भारी. hi-5. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 04/13/2015 - 01:19 नवीन
+१ क -ड्ड- क सॅल्युट भावा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
न
नाखु Mon, 04/13/2015 - 06:09 नवीन
अतिशय प्रत्ययकारी अगदी शेजारी बसून मित्र आठवणी सांगतोय असं वाटतय हेच ह्या लि़खाणाचं खर बलस्थान आहे. शिक्षा जास्त कठोर वाटत असल्या तरी तावून्-सुलाखून निघण्यासाठी हव्यातच असं तुम्ही सोदाहरण सांगताय हेही जास्त आवडले. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा