अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श
अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६
***
अकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले!! एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे "ड्रिल".
शाळेत ड्रिल म्हणजे पीटी वगैरे असे, पण फोर्सेज च्या भाषेत मार्चिंग ला म्हणतात ड्रिल. जनरल "लेफ्ट राईट लेफ्ट" इतकेच त्याचे स्वरुप नसते , त्यात अनेक बारकावे असतात. काही सांगायचे झाल्यास
1. चटख :- म्हणजे "तेजsssss चलssssss" किंवा इतर कोणती ही ऑर्डर मिळाल्यावर इंस्ट्रक्टर किंवा कमांडर ची ऑर्डर संपल्या संपल्या भयानक विद्युतवेगाने डावा पाय अन उजवा हात एकाचवेळी बाहेर काढणे किंवा सांगितली असेल ती करवाई करणे.
2. टर्नआउट :- ड्रिल च्या वेळी आम्हाला परफेक्ट ड्रेसिंग बाय सेन्स ऑफ़ ड्यूटी आले पाहिजे बैरेट कॅप घालायचा कोन, डोक्याच्या उजव्या भागावर टोपी चेपली म्हणजे तिचा डावा भाग अन त्यावर लावलेला लोगो किंवा यूनिट इंसिग्निआ हा डोक्यावर डाव्या बाजुला डाव्या डोळ्याच्यावर अर्धी वित वर असावा, टोपी घातल्यावरही ती कपाळ पुर्ण झाकता कामा नये, त्यात 4 बोटांची गॅप असावी, इत्यादी.
3.सिस्त (शिस्त) :- फाइल्स बनवणे, ब्लैंक फ़ाइल सोडणे, दाहिने देख च्या ऑर्डर ला फ़ाइल च्या गाइड ने सरळ पाहत राहणे इत्यादी
हे फ़क्त काही नमुन्यादाखल देतोय अश्या असंख्य गोष्टी असतात, बड़े उस्ताद ह्या बाबीत फार कड़क लक्ष्य घालत असे, सकाळी उठलो की रनिंग , मग कैनेडियन पीटी मग फिजिकल ट्रेनिंग अन मग ड्रिल असा एकंदरित कार्यक्रम असे, ह्यात फिजिकल अन ड्रिल हे कोर फोर्सेज चे ट्रेनिंग समजा, ह्या फिजिकल मधे दोर चढणे , वुडन लॉग पुलप्स , पुशप , फ्रंट रोल बॅक रोल (कोलंटउड्या सरळ अन रिवर्स), डिच क्रोलिंग वगैरे असे. सगळेच आधी तंत्रशुद्ध माहिती नव्हते तेव्हा ते हाहाकारी भासे, दोर चढ़ताना गुढघे फ़क्त सपोर्ट ला वापरून एंकल लॉकिंग ने वर चढायचे असते, दात ओठ चावत आम्ही वर चढत असु पण उतरताना ब्रेकिंग ला हमखास गुढघे घासत असु जाडजुड़ काथ्यासारख्या त्या दोराला घासल्यामुळे आतल्या बाजूंनी गुढघे अन मांड्यांवर अक्षरशः कट्स पडत, अन त्याची आगाग होत असे मग आम्ही कैंटीन मधुन nycil वगैरे पावडरी आणून तिथे लावायचो अन टंगड्या फासकटुन रात्री पंख्याखाली उताणे पसरायचो, मला त्या फिजिकल मधे खुप जास्त रगड़ा लागे. त्यात मी शर्मा उस्ताद चा लाडका होतो!!! पुलप्स मारतो पण फ्रंटरोल आवर असे व्हायचे, एक चुक झाली की पुर्या फिजिकल ग्राउंड ला फ्रंट रोल ने राउंड मारवा लागे.
तिथून परत आले की अंघोळ करुन वेगळा यूनिफार्म घालून मेस ला जायला 25 मिनट्स असत, डेली वेगळा ब्रेकफास्ट असे, शक्यतो अंडी अन स्प्राउट्स वगैरे हायप्रोटीन डाइट असायचा तेव्हा.
दहा ते दुपारी एक सिविलियन प्रोफेसर लोक्स लेक्चर घेत असत आम्ही ह्याच लेक्चर मधे जांभया कंट्रोल करायची कला अवगत केली होती विषय पण बोरिंग स्ट्रेटेजिक स्टडीज अन ऑल आमच्या फोर्स ला स्पेसिफिक असलेल्या पहाड़ी राज्यांबद्दल तिथल्या संस्कृति बद्दल वगैरे (अर्थात आज लोकल लोकांसोबत जेलिंगअप करताना त्या लेक्चर चे महत्त्व ही जाणवते)
त्यानंतर मॅप रीडिंग (ह्यात कन्वेंशनल मॅप, जीपीएस वगैरे सगळे असे) मग वेपन चा क्लास असे, वेपन ला मजा असायची , ते झाले की स्पोर्ट्स तेव्हा इंचार्ज प्रभजोत सर स्वतः आमच्या बरोबर खेळत असत विविध गेम्स, ज्यांना गेम्स खेळायचे नाही त्यांस जिम ला जाणे कंपल्सरी असे, सहज फिरताना कोणीही दिसला की खैर नाही. 6.00(1800) वाजता ते संपले की 6.30 (1830) ते परत 8.00 (2000)पर्यंत स्टडी टाइम असे लेक्चर चा अभ्यास करायला, अर्थात त्यावेळी आम्ही पण अभ्यास उरकुन टाकत असु,8.15 (2015) ला मेस ला डिनर असे, डिनर शक्यतो लाइट असे पण प्रोटीन्स चा मारा असे ह्या ही वेळी. सगळ्यांना सगळ्या टेबल्स वर सर्व करण्यात श्रीवास्तवजी अन मेस स्टाफ चे प्रोफेशनलिज्म डोळ्यात भरण्यालायक असे.साधारण 9 पर्यंत डिनर आटपे कुजबुजत गप्पा मारत.परत 9 (2100) ते 9.44 (2145) स्टडी देत , ह्या वेळात आम्ही उद्याचे लेक्चर पाहून ती पुस्तके बॅग मधे घालुन ठेवणे, सकाळ च्या पीटी चा यूनिफार्म खुर्चीवर जय्यत तयार ठेवणे इत्यादी उद्योग करत असु अन मग हॉस्टल च्या मधल्या चबुतर्यावर एकमेकांची टांग ओढ़त बुट पट्टे वगैरे हाती येतील त्या चमकवण्यालायक गोष्टी घासत बसत असु, त्या चबुतर्याला आम्ही "बेइज्जती मंडप" असे नाव दिले होते . ह्याचवेळी अन्ना ला हिंदी चे धड़े द्यायचे ही कार्य करावे लागे, कारण ऑर्डर येऊन ती समजून करवाई करण्यात अन्ना ढीला पड़े व् जवळपास रोज आम्हाला रगड़ा लागे. मग सगळे आवरून 9.45(2145) ला लाइट्स ऑफ़ होत असत!.
अश्याच रोजच्या रूटीन मधे काही काही दिवस विलक्षण गमतीदार म्हणुन लक्षात राहत. उदा वेपन सुरु झाले तो दिवस. आमची सुरुवात ऑर्डनेन्स फैक्ट्री बोर्ड (OFB) च्या 9 mm pistol ने झाली होती. वेपन्स स्वतः बड़े उस्तादजी शिकवत असत. पहिल्या दिवशी कोत मधुन(शस्त्रागार) DM pistols (डमी हत्यारे) आणायची जबाबदारी किश्या अन अल्फा कंपनी च्या तेज प्रताप गुरुंग ला दिली होती! एका हातात 2 ह्या प्रकारे 8 pistols घेऊन दोघे आले. वेपन्स म्हणजे नुसते वेपन्स नसते तर सोबत वेपन्स च्या माहिती चे चार्ट्स, ती वेपन्स खोलुन ठेवल्यावर मातीत ठेवावी लागु नये म्हणुन ती ठेवायला काही ताड़पत्री च्या मॅट्स वगैरे पण जामानिमा असे. हत्यारे न बघितलेल्या पोरांना एकदम लाइव ammo ला एक्सपोज़र नको म्हणुन बैरल जैम केलेल्या किंवा फायरिंग पिन्स काढून टाकलेल्या अश्या राइफल किंवा पिस्टल्स असत. त्याला म्हणायचे डीएम पिस्टल. त्या पिस्टल घेऊन जेव्हा किश्या अन तेजु आले तेव्हा सगळी पोरे कौतुहलाने फ़ाइल तोडायला येतील असे वाटले पण पोरे औत्सुक्य दाबून चुळबुळत जागेवर उभी होती! उस्तादजी ने मला अन समीर ला फॉलआउट करायला सांगितले अन आदेश दिला
"दोनों आदमी, मैट्स बिछाओ, हर मैट पर एक एक पिस्टल, बैरल टारगेट की तरफ होगी, मगज़ीन निकली होगी, उसके बाद टारगेट पेपर सेट करो"
आम्ही इमानेएतबारे आधी मैट्स अंथरल्या मग टारगेट्स लावली अन पिस्टल्स ना हात लावला, आयुष्यात पहिल्यांदा एक आधुनिक शस्त्र अन त्याचे शास्त्र डोळ्यासमोर होते , उगाच आपण लै भारी टाइप फील होता. अन मी तो मूर्खपणा केला! सहज गंमत म्हणुन मी त्या वांझोटया पिस्टल चा बैरल समीर कड़े केला अन त्याला डोळा मारला!. मागे वळलेल्या उस्तादजी ने एक सेकंड मधे आमची करवाई पाहिली अन मला अन समीर ला फरमान सुटले.
"दौड़ के इधर आओ"
सम्या चरफडत होता अन मी ओशाळलेलो होतो.
"कभी भी बैरल किसी अपने की तरफ नहीं मोड़ा करते, सिखलाई कैसे भुल गया ओसी बापुसहब??"
"......"
"ओसी पुनीत, ओसी दिवाकर फॉलआउट, जो करवाई इन दो मकरो से छुटी है पुरी करो"
अन्ना ने डबल गाढवपणा केला!
"क्या करना सर???"
"जब इंस्ट्रक्शन दिया इनको तब तु सोया था या इंस्ट्रक्शन सिर्फ इनके लिए था रे xxxx, ओसी पुनीत इन्हें करवाई सिखाओ"
"......"
"मजाक बना रखा है क्या पुरे ट्रेनिंग का??, पूरा कंटिंजेंट प्लांक पोजीशन"
बड़े उस्तादजी बरसला!!!
अल्फा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,एको साऱ्या कंपनी पुशप पोजीशन ला आल्या तसे मी अन समीर ही साळसुदपणे प्लांक होऊ लागलो!
"आप दोनों नहीं जी, आप तो जान हो इस पनिशमेंट की..."
आता मी अन समीर हादरलो पुढे ऑर्डर आली
".... पुरी कंटिंजेंट 10 पुशप करके तबतक प्लांक रहेगी जबतक ओसी बापुसहेब ओसी सांगवान को कंधे पर फायरमैन लिफ्ट देकर पुरे परेड मैदान की एक राउंड नहीं लगता..."
"....मजाक बना रखा है ट्रेनिंग का!!, मैंने पहले ही दिन कहा था एक गलती करेगा ट्रूप को सजा होगी , टीमवर्क इसीको कहते है, अगर ओसी बापुसहब गिरा तो ट्रूप की सजा दोगुनी और ट्रूप में से किसीने प्लांक पोज़ छोड़ा तो बापुसहब की पनिशमेंट दोगुनी, ओसी बपुसहब ओसी सांगवान पीछे मुड़ तेज चल"
समीर ला माझ्या खांद्यावर आडवे उचलले होते मी, सहा फूटी होता हरामखोर आजकाल फिजिकल शिक्षेचे काहीच वाटत नसे , अगदी वाढत्या शारीरिक ताकदी सोबत ती ही चढत्या भाजणीत असली तरी.
त्याला फायरमैन लिफ्ट दिल्यावर त्याचे मुंडके माझ्या डाव्या कानाशी आले होते अन त्याने अखंड लाखोली गजरनाम सुरु केले होते, फुसफुसत्या शिव्या ऐकून मला अजुनच हसु येत होते.
"भोसडीके काक्के, बड़े शौक तेरे शूटर बननेके कमीने कुत्ते भाग वरना रात तक ऐसेही रहेंगे"
तिकडे अन्ना किश्या सांगे सहित सारे माझ्याकडे आशेने पाहत होते त्यांचे प्रेमळ संवाद काय असतील हे क्लियर समजत होते!! एव्हाना 5 पुशप झालेल्या त्यांच्या
मी समीर चे धूड़ घेऊन दुडक्या चालीत मजेत होतो! जास्त थकवा नव्हता डोळ्याच्या कोपर्यातून मागे चाललेला आमच्या नावचा शिमगा समीर मला लाइव सांगत होता! अन त्याला ही कळले नाही सांगे ला शिक्षेतुन मुक्ति का मिळाली. नंतर माझ्या ढुंगणानेच त्याचे उत्तर दिले!!
मी हळू चलतोय म्हणल्यावर उस्ताद ने सांगे ला मुक्त केले! त्याच्या हाती स्वतःची केन दिली अन आमच्या मागे धावत गरज पडेल तिथे आमच्या बोच्यावर वळ उमटवायची जबाबदारी दिली.
धावत आलेल्या सांगे ने चप्पकन एक केन आमच्या कुल्ल्यावर ओढली तसे मी दबक्या आवाजात ओरडलो
"साले सांगे कमीने इकलौती गांड है मेरी आराम से केन मार"
"सॉरी यार बापु ,उस्तादजी तो तु जानता ही है" असे म्हणत तो हळूच केन पिछाड़ी ला टच मात्र केल्यासारखे करु लागला तशी त्या पिनाकदृष्टि उस्ताद चा आवाज कडाडला
"ओसी सांगे मकरे की गांड पे मार रहा है की घरवाली के!! जोर से मार वरना तेरी खाट खड़ी करूँगाsssss"
पर्यवसान आमच्या टिरी वर एक अजुन सज्जड़ फटका बसण्यावर झाले!!मी हाय हुई करत होतो अन स्पीड कमी झाली की सांगे वळ काढत होता!
समीर खांद्यावर मजेत होता असे ही नाही त्याच्या बरगड़ी ला अन "सेण्टर फ्रेश" ला माझे खांदे टोचत होते तो ही मेटाकुटीला येऊन शिव्या घालत होता!!
तसाच परेड ग्राउंड ला एक चक्कर मारून आम्ही जागेवर आलो, तरी मी त्याला उतरवला नाही म्हणले परत त्या मिठाच्या पोत्यागत व्हायचे!! पण तोच म्हणाला
"निचे उतारो उसको और तीनो ओसी मिल जाओ, बाकी लोग भी आराम से"
आम्ही घामाघुम होऊन खाली बसलो तसे उस्तादजी बोलु लागले
"ये हथियार है ओसीज, इससे कभी मजाक मत करना! उसको अपना खुद का दिमाग नहीं होता इसकी नली सिर्फ दुश्मनो की तरफ होनी चाहिए,ये एक खतरनाक हथियार है जिसे हम लोग "लीथल वेपन" कहते है", निशाने पर इसकी गोली हो तो जान बचना मुश्किल होती है, इसी कारण यह वेपन Indian arms act,1959 के तहत PB अर्थात PROHIBITED BORE वेपन होता है,कोई भी सिविलियन इसे अपने पास नहीं रख सकता है, ये पहली बात, आजसे यह हथियार तुम्हारा हिस्सा होनेवाला है! जैसे पाउडर क्रीम लगाके चेहरा खूबसूरत रखते हो उसे खरब नहीं होने देते वैसेही हथियार होगा,यह हुई दूसरी बात और तिसरी बात ट्रेनिंग की सिस्त बरकरार रखो! बॉर्डर पे रहना है आपको , खेतो में चिड़िया नहीं हांकनी है, हर हफ्ते तुम्हे खिलाने पर लाखो में पैसा खर्च कर रही है सरकार,दाना दाना कर्ज है तुमपर, मकरा बंद करो"
आम्ही ही सीरियस होतोच पण परिस्थिती, वय , रगड़ा ह्या सगळ्यामुळे कधी कधी मस्ती ही करायचो! ते तसेच राहणार हे उस्ताद ला ही माहिती होतेच फ़क्त दरवेळी चांस आला की तो आम्हाला तांब्याच्या भांड्यागत ठोकुन सरळ करत असे इतकेच.
"तो अब सुनो, इसे कहते है क्लोज क्वार्टर बैटल वेपन या फिर सीक्युबी वेपन , इसे ऑफिसर्स पर्सनल वेपन भी कहा जाता है. रेंज 50 मीटर्स. इसमें कुल 54 कलपुर्जे होते है, तो आओ हम पहले इसके बाहरी रूप को जाने, यह है मैगज़ीन इसमें चौदह गोलिया या राउंड्स आ सकते है लेकिन जाम न हो इसलिए एक बैरल में और 13 मैगज़ीन में रखे जाते है, हर राउंड में 0.450 ग्रॅम बारूद होता है ...."
आमच्या आधुनिक द्रोणाचार्याने मुक्तहस्ताने आम्हाला आधुनिक विद्या वाटायला सुरवात केली होती अन आता लेक्चर संपत आले तसे ऑर्डर आली
"ओसी बापुसाहब फॉलआउट" माझ्या सकट सात पोरे आम्ही एकेक मॅट समोर उभे होतो"
"अपने अपने वेपन उठाओ, जो हात से लिखते हो उस हात से हथियार पे मजबुत ग्रीप बनाओ, बाया हाथ पीछे पीठ पर मुठ्ठी बांधके रखो,टारगेट का बुल्स आय, फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु और तुम्हारी ऐमिंग आँख सबकुछ एक लाइन में अलाइन करो, सांसे काबू करो , सांसो की तरह हात पैर की तरह हथियार को अपने शरीर का हिस्सा बनाओ"
अन , घराबाहेर पडलेल्या, अकादमी मधे नवे मित्र जोडून कक्षा रुन्दावणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या कक्षा अजुन रुंद झाल्या, आपण इथे का आहोत ह्याची जाणीव देणारा तो क्षण होता, बुल्सऑय, फ्रंटसाइड टिप, बॅकसाइड यु अन माझा डोळा एका लाइन मधे होते! जणू प्रत्येक श्वासा बरोबर मी त्या 9 mm ला सुद्धा रक्त पुरवठा करत होतो , पोसत होतो!. शेवटी "ती" मला जाणावली , एकरूप झालो मी तिच्याशी,
अन खऱ्या अर्थाने तो आयुष्यातला पहिला असा एक विलक्षण "तिचा स्पर्श" होता.
Book traversal links for अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श
💬 प्रतिसाद
(79)
च
चिनार
Mon, 04/13/2015 - 06:12
नवीन
खूपच जबरदस्त बापूसाहेब !!
लिहित राहा !!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 04/13/2015 - 09:31
नवीन
वा.. आज पाचही भाग वाचले... जबरदस्त..
तुमचं प्रत्येक भाग संपवायचं टायमिंग आणि त्यात लिहिलेलं सारं प्रत्यक्ष दृश्य पुढं उभं करणारं आहे... एखादी सीरियलची जमलेली पटकथा असावी आणि एपिसोड संपताना प्रेक्षकाला बरोब्बर इमोशनली पकडायची कला आहे राव तुमच्याकडे ... झकास !!!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 04/13/2015 - 09:56
नवीन
अवांतर :
गंमतीतसुद्धा वेपन आपल्या माणसाकडे रोखू नये, हा धडा महत्त्वाचा. यावरून दोन सत्यकथा आठवल्या.
पहिली आमच्या हॉस्टेलमेटची. त्याचे वडील पोलीस अधिकारी होते आणि घरी मित्र असताना पिस्तुल हाताळताना मित्राला वर्मी गोळी लागली. तो जागेवर गेला. या आमच्या डॉक्टर मित्राने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.वर्तमानपत्रात मोठी बातमी आली होती.
दुसरी सत्यकथा माझ्या चान्गल्या वकील मित्राने सांगितलेली. त्याच्या दुसर्या एका मित्राकडे लायसन्सड वेपन होते.या दोघांनी एकत्र वेपन्स घेतली होती. मित्राला दाखवले त्याने. ट्रिगरवर बोट ठेवून त्याच्याकडेच रोखले होते. मला दे, असे मागता मागता गोळी सुटली, थेट छातीत. तोही गेला. ऐकून हळहळ व्यक्त करणे, इतकंच आपल्याला शक्य.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/13/2015 - 10:35
नवीन
अरे रे!!! दुर्दैवी झाले!! मुळात आता चुक कोणाची ह्या विश्लेषणाला काहीच अर्थ नाही!!, लॉक पण करत नाहीत लोकं वेपन्स! आता काय बोलावे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/13/2015 - 10:40
नवीन
मास्तर
हा महत्त्वाचा धडा लष्करात अगदी गिरवून घेतला जातो. आम्ही येउर येथील फायरिंग रेंज वर गेलो असताना लाईट मशीन गन मधून गोळी सुटत नाही म्हणून एका नौसैनिकाने तिचे तोंड उलटीकडे फिरवले. तेंव्हा आमच्या तोफखाना विभागाच्या वरिष्ठ नौसैनिकाने अक्षरशः त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारली आणि त्याला, "बेवकूफ पहले गन उधर करो! गलतीसे गोली छुट गयी तो किसी बेकसूर को अपनी जान से हाथ धोना पडेगा!." फायरिंग झाल्यावर त्याला रायफल डोक्यावर पकडून त्याच मैदानाला तीन चकरा मारायला लावल्या आणि सर्वाना स्पष्टपणे सांगितले कि बंदूक का रुख सिर्फ दुष्मनकि तरफ हि होना चाहिये. कोई अपनोकी तरफ गलती से भी नही! जिंदगी कि किमत ही नही होती, वो अनमोल है!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/13/2015 - 11:20
नवीन
हे आपले झाले डॉक्टर साहेब, सिविलियन मधे वेपन्स चे एक वेगळेच आकर्षण , त्यात शास्त्रोक्त ज्ञान नाही, त्यात सारखे प्रैक्टिस नाही , मग होतात मिसहॅप
फोर्सेज मधे वेपन चे एक्चुअल फायरिंग करायच्या अगोदर तिप्पट ते चौपट मेहनत ही वेपन चा प्रकार त्याची निगा फायरिंग चे डूज़ एंड डोंट्स इत्यादी वर घेतली जाते मगच पहिला राउंड फायर होतो!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 04/13/2015 - 11:42
नवीन
याचमुळे 'तुमच्यात' असे मिसहॅप होत नाहीत किंवा झाले तरी प्रमाण खूपच कमी असावे.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Mon, 04/13/2015 - 16:04
नवीन
वेपनसाठी जर अर्ज करायचा असेल तर ट्रेनिंग सर्टीफिकेट आवश्यक असत पण ५ वर्षापुर्वी त्याची फी होती ३०००/५००० यामध्ये फायरिंगला राउंड देतात, १०+१० तेव्ह्डे झाल की तुमच ट्रेनिंग सर्टीफिकेट लगेच इश्यु होत.बर तिथ कोठल वेपन वापरला काही कळत नाही, बर्याचदा तर .२२ च देतात.परत हत्याराचा निदान काही वर्ष तरी संबध नाही. यानंतर लायसन्सची प्रोसेस चालु होते सरासरी २ वर्ष त्यात एखादी इलेक्शन लागली ६ महिने अधिक त्यानंतर समजा जर चुकुन लायसन्स मिळालेच तर वेपन खरेदीला ६ महिन्यांची मुदत असते.आपल्याकडे अंबरनाथ आणी कानपुर फॅक्टरीची रिव्हाल्वर्स मिळतात पण त्याला सरासरी सहा महिने ते एक वर्षाचे वेटींग आहे आणी त्यालाच फक्त लॉक आहे.प्राव्हेट मध्ये जे वेपन्स आहेत ती १९८७ च्या पुर्वीची त्यानंतर सरकारने परदेशी वेपन्स अधिकृतरित्या खरेदीस बंदी केली आहे.तरी पण ही सरकारी माल सगळ्यात सेफ मानला जातो.कोलकत्ता फॅक्टरीचे पिस्टल मिळते त्याला वेटींग आहे १ ते दिड वर्षाचे . एव्हडे सगळे झाल्यावर वेपन हातात पडते त्यात रिव्हाल्वरला राउंड मंजुर होतात ५० आणी बंदुकवर्षाला, एक वर्षाला मग सांगा फायरिंग प्रॅक्टीस कधी आणी कुठे करायची.त्यात फायरिंग रेंज कुठे उपल्बद्ध आहेत ते पण सांगा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/13/2015 - 16:10
नवीन
देवा देवा एवढे कुटाने!! मग काय खरे आहे!!
अवांतर - तुमच्याकडे कुठला मेक आहे पाटील??
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Mon, 04/13/2015 - 16:21
नवीन
सरकारी माल
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Mon, 04/13/2015 - 16:52
नवीन
नाहीतरी पोलिस्,महसुल,वन आणी नगरविकास या एका एका डिपार्टमेंट वर एक एक लेख तयार होइल
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 04/14/2015 - 10:18
नवीन
जाऊदे झाडून
द्या ३ लेख पाडून.
हम वाचते है
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Fri, 04/17/2015 - 15:54
नवीन
.आपल्याकडे अंबरनाथ आणी कानपुर फॅक्टरीची रिव्हाल्वर्स मिळतात पण त्याला सरासरी सहा महिने ते एक वर्षाचे वेटींग आहे आणी त्यालाच फक्त लॉक आहे.
बाप रे... म्हणजे बर्याचशा लायसन्स्ड पिस्तुलांना लॉकच नसते? कठीण आहे ...
- Log in or register to post comments
स
सविता००१
Mon, 04/13/2015 - 11:58
नवीन
अप्रतिम लिहिताहात
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 04/13/2015 - 16:27
नवीन
मिपाच्या इतिहासातील काही सर्वोत्तम लेखमालांपैकी एक..
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/13/2015 - 16:38
नवीन
अहो इतके काही नाही शैलेन्द्र!! आपल्याला आवडले ह्यातच सारे आले!! _/\_
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/13/2015 - 16:50
नवीन
नेहमीप्रमाणेच वाचनीय !! पुभाप्र..एकदम चित्रदर्शी वर्णन!!
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Mon, 04/13/2015 - 19:42
नवीन
तीचा पहिला स्पर्श हे असलं आता सार्वजनिक होणार?
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 04/14/2015 - 10:16
नवीन
प्रतिक्रिया देण्यापूर्वी जरा लेख वाचायची तसदी घ्या हो!!
(या असल्या प्रतिक्रिया हे आता सार्वजनिक होणार?)
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 04/14/2015 - 11:05
नवीन
पाचही भाग वाचले. जबरदस्त लेखमाला!
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Tue, 04/14/2015 - 12:49
नवीन
खुप छान झालाय हा पण भाग. मस्त. पुभाप्र. :)
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 04/15/2015 - 10:48
नवीन
जबर्याच् ! तुमची लेखनशैली इतकी प्रभावी आहे की सगळ डोळ्या समोर घड़तय अस वाटतं
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Wed, 04/15/2015 - 14:27
नवीन
जबराट!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 04/17/2015 - 15:57
नवीन
का हो सोन्याबापू, एक डौट आहे.
मिलिट्रीत असताना तुम्हांला ही हत्यारे वापरायला मिळतात त्यांची लाईफसायकल किती वर्षांची असते? तुम्ही रिटायर झालात की तुमची बंदूक दुसर्याला देतात की काय करतात?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 04/22/2015 - 17:39
नवीन
वाचतो आहे.
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 04/22/2015 - 20:41
नवीन
डाेळ्यासमोर चित्र उभे करण्याची ताकद प्रत्येक भागात आहे.जियो....
- Log in or register to post comments
स
स्वीत स्वाति
गुरुवार, 04/23/2015 - 11:57
नवीन
मस्त अनुभव
आणि चुकून क्रमश: लिहायचे राहिले आहे का … पुढील भागाच्या प्रतीक्षेत
- Log in or register to post comments
स
स्वीत स्वाति
गुरुवार, 04/23/2015 - 11:59
नवीन
पुढी भागाची लिंक दिसत नव्हती
ती मिळाली ..
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 04/29/2015 - 21:29
नवीन
वाचताना थांबवत नाहीये. पण इतकं छान वाचून प्रतिक्रिया न देणं म्हणजे स्वार्थीपणा होईल.
तुमचं लेखन फारच जबरदस्त आहे!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2