Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्रीचे अस्तित्व!

अ — अश्विनि कोल्हे, Mon, 04/13/2015 - 12:52
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो. अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा? लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते. तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं . प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे. म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन. जय महाराष्ट्र! रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

प्रतिक्रिया द्या
30752 वाचन

💬 प्रतिसाद (170)
व
वेल्लाभट Mon, 04/13/2015 - 12:58 नवीन
कविता वाटलीच नाही. त्यामुळे आवडली नाही. आणि विचार फारच एकांगी. बोझाखाली, कुचलून वगैरे हिंमराठी शब्द का लागतात? मराठी संपन्न आहे. -हस्वदीर्घही काही ठिकाणी गडबड (कदाचित टाईप करताना चुकलं असावं) असो. प्रयत्न बरा होता असं म्हणतो. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 04/13/2015 - 13:25 नवीन
हेच म्हणायचं होतं. मुक्तछंदातली असली तरी कवितेला लय असते. ती यात सापडली नाही. ही तर वाक्य तोडलेली गद्य वाक्यरचना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/13/2015 - 13:37 नवीन
माफ करा
तुम्ही काय घोडं मारलं म्हणून माफी मागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अश्विनि कोल्हे Mon, 04/13/2015 - 14:24 नवीन
म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. धन्यवाद. मी कोणी मोठी कवियिञी नाहीय.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे. दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय. पुरुषांनी विचार करावा की आपण तर असे वागत नाही ना. एकुणच समाजातील पुरुष जातीची विचारधारा बदलण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 14:35 नवीन
@.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे.>> द्येको...मै क्या बोल्या था!!! @दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय.>> १०० परतिसादांची खात्री...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
प
प्रदीप साळुंखे Mon, 04/13/2015 - 19:23 नवीन
अश्विनी बाई तुम्ही जरा चाणक्य नीती वाचा,आणि त्यामध्ये स्त्री चे गुणही सांगितले आहेत काय असतात ते वास्तविक . तेही वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
स
सूड Mon, 04/13/2015 - 13:19 नवीन
ठीक आहे, पण हे सत्तरच्या दशकातल्या स्त्रीचं वर्णन वाटतंय. आताच्या स्त्रिया "स्त्रियांसाठी" लिहीलेल्या जागेवर कोणी पुरुष बसला असेल तर त्याला उठवतात आणि एकमेकींकडे बघून कुत्सित हसतात. त्यांची एक मैत्रिण उभीच असते. मग "स्त्रियांसाठी" असं लिहीलेलं "नसलेल्या" जागी जिथे पुरुष बसलेले असतात तिथे आपल्याला बसायला मिळेल याची ती वाट बघत असते. आणि त्यातलीच उभं राहावं लागलेली एखादी मग मिपावर येऊन स्त्रीमुक्तीच्या कविता लिहीते. पुरुष कित्ती वैट्ट असतात आपल्याला बसायला पण जागा देत नाहीत वैगरे वैगरे!!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 04/13/2015 - 13:31 नवीन
स्वस्तात दिसतंय पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एस Mon, 04/13/2015 - 13:43 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 14:02 नवीन
च्यायला डोक्यात जातात अशा बायका... हल्ली तर मी 'स्त्रियांसाठी' असणार्‍या जागा मोकळ्या असतांना इतर जागेवर (या जागांना 'पुरुषांसाठीच्या' म्हणू शकत नाही) बसणार्‍या स्त्रियांना तेवढ्याच हलकटपणे उठवून लावून जागा मिळवतो. बाकी एखादी 'स्त्रियांसाठी'ची जागा मोकळी असतांना त्यावर पुरुष (वय कोणतेही) बसल्यावर तो जणू काही आपल्या मांडीवरच बसला आहे या आविर्भावात त्याचा पाणउतारा का करतात? त्याला सौम्य भाषेत सांगू शकत नाही का? मुंबईत सुरुवातीपासूनच हा भयंकर प्रकार पाहिल्याने जागा रिकामी असेल तरी मी बसत नसायचो. इस बात पे एक किस्सा: एक सहप्रवासीसोबत घडलेला त्याने स्वतः सांगितलेला अनुभव. तो मार्केटींग निमित्त मुंबईभर भटकंती करत असतो. दिसायला सामान्य सावळा वर्ण, टीपीकल मिशी वैगेरे ठेवणारा, एका विशिष्ट मागास वर्गातला वाटावं असं व्यक्तिमत्व. त्याचे एवढे वर्णन सांगण्याचे कारण लोकांचा पुर्वग्रह कसा असतो ते कळावे म्हणून. एकदा बस मधे भयंकर गर्दी असता त्याला सीट मिळाली. पुढच्या कुठल्यातरी थांब्यावर एक पस्तीशीतली स्त्री चढली, सोबत कदाचित ५-६ वर्षाचे मूल असेल. आपल्या नायकाने सोबत मुल बघून प्रतिक्षिप्त क्रियेने तीला स्वत:चे आसन दिले आणि गर्दीमुळे तो तिच्याच बाजूला उभा राहीला. ५-१० मिनिटे गेली आणि ती त्याच्यावर भयंकर चिडली. उठून तिने याच्या सण्ण्कन थोबाडीत मारली. ह्याला काय समजेना काय झालं. ती म्हणाली, "@#$#%&$, जगह दिया तो क्या चान्स मारेगा क्या?" ती काय म्हणते आहे नक्की ते याच्या मेंदूपर्यंत पोचण्याआधी अक्ख्या बसला कळलं. झालं ना पब्लिक नेहमीप्रमाणे सुरु. त्याने तिचा प्रतिकार करण्याचा, तिचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला पण 'पुरुष अस्सेच असतात' या सर्वमान्य पुर्वग्रहापुढे त्याचे काहीच चालले नाही. गर्दीमुळे त्याचा तीला धक्का लागत होता आणि ती भलताच समज करून बसली. तर बंधुंनो, "हीच अशी असेल" म्हणून स्त्रियांना दोष देणारे वेळेनुसार "ह्यानेच काहितरी केले असेल" इतपत बदलू शकतात. त्यामुळे सांभाळून र्‍हावा. जमाना खराब हैं| अवांतरः घरी झालेल्या भांडणाचा राग कविता लिहून काढतात कधी कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अश्विनि कोल्हे Mon, 04/13/2015 - 14:36 नवीन
कुठल्या जगात जगत आहात आपण? आजही एखाद्या स्री अर्भकाला रस्त्यावर फेकुन दिलं जातंय. तुमच्या विचारांवर खुप हसावंसं वाटलं. केवळ बसमध्ये जागा बळकावणार्या मुली तुम्हाला दिसल्या,पण त्याच बस मध्ये एखादी एकटी मुलगी बघुन तिच्यावर अत्याचार केला जातो हे नाही दिसलं तुम्हाला? मी कोणी बसमधील जागा न मिळालेली मुलगी नाहीय,जी सर्व पुरुषांना वाईट म्हणतेय. पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 04/13/2015 - 14:44 नवीन
पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.
ती फक्त पुरषांनीच बदलणे गरजेचे आहे म्हटलात तेव्हाच कळलं आपली वैचारिक पोच काय आहे!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
स
संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 14:49 नवीन
पुरुष अर्भकाला फेकण्याच्या घटना माहित नाहीत तुम्हाला? बरेचदा बर्‍याच बसेसमधे एकटी मुलगी असते, त्या प्रत्येक मुलीवर बलात्कार नाही होत हो. मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार? याच जगात घडणार्‍या ह्या घटनाही बघा: http://ekhusbandkimaut.blogspot.in/ नेहमी एकाच बाजूचे अतिरंजीत चित्र दाखवून वातावरण गढूळ का करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
ट
टवाळ कार्टा Mon, 04/13/2015 - 16:18 नवीन
मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार? मीच तो...मीच तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 00:00 नवीन
हो हो. तुम्हीच ट का भौ. द वन यँड वोन्ली. काल-परवाच कुठेतरी वाचलं तुमचं विधान आणि डोक्यात फिट्ट होऊन गेलं बगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 04/14/2015 - 06:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वेल्लाभट Mon, 04/13/2015 - 17:47 नवीन
चायला जाम दिवस झाले यावर लिहायचंय. कित्येकदा विचार करायला बसलो आणि नुसता राग राग झाला. लिखाण झालंच नाही. तू पुन्हा ठिणगी पाडलीस आज. आज बशीतही एक अशी केस बघितली. सो आता एक तिकाट जिलबी पाडायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 00:03 नवीन
वेल्लाशेठ, येउद्या. या मुळमुळीत शेवयांवर तिकाट उतारा पायजेल राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ज
ज्योति अळवणी Sun, 04/19/2015 - 10:33 नवीन
आजही आपल्या समाजात स्त्री लग्नानंतर पतिच्या घरी जाते. जावयाचा मान आयुष्यभर राखला जातो... कधीतरी सणा-समारंभाला बोलावून. आज जरी पति-पत्नी स्वतंत्र राहात असले तरी पतिच्या पालकांची जवाबदारी अध्यारुत आहे आणि पत्नीच्या पालकांसाठी जावयाने काही केले तर त्याची कौतुकास्पद मोठी चर्चा आहे. आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती तिचे विचार परखड़पणे मांडू शकते. तिचे अधिकार हक्काने घेते... पण मग खाजगीत ती 'भांडकुदळ, तापट....' इत्यादि असल्याची चर्चा होतेच. मुद्दा एवढाच की काळा बरोबर वागण्यात बदल आहे; विचारात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आदूबाळ Mon, 04/13/2015 - 13:46 नवीन
हे "स्री" म्हणजे काय असतं?
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 04/13/2015 - 13:46 नवीन
कविता आहे की निबंध ? दोन्हीला १५ पैकी ३ मार्क .. या कवितेला चाल लावून दाखवा ...त्याचा लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला मी तयार आहे . आता थोडं कवितेच्या आशयाविषयी १. नक्की कुठल्या काळातली स्त्री आहे ही ? २, स्त्र्रीयांवर अन्याय आजही होतात हे मान्य ! पण ते या स्वरूपाचे असतात यावर आक्षेप !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 13:51 नवीन
त्यांना कवियट्री-व्हायचं असेल.. ! म्हणून तयार होऊ पहाणार्‍या बल्लवा प्रमाणे त्या पिझ्झा आधी थालपीठ लाऊन बघत आहेत! हो णा हो कवियट्री टाई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ज
जेपी Mon, 04/13/2015 - 14:05 नवीन
लागली वाट एका उद्योन्मुख लेखीकेची =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/13/2015 - 14:47 नवीन
अच्चं जालं तल
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 04/13/2015 - 14:48 नवीन
मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते
मागच्या आठवड्यात खोटे लग्न करून सगळा माल गोळा करून अनेक पुरुषांना गंडा घातलेल्या 'स्त्री ' ची बातमी पहिली नाही का ? कुठल्या जगात आहात ?
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 04/13/2015 - 14:51 नवीन
स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
तरी पुरुषांनी तिचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करायचे ? बात कुछ हजम नाही हुई
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/13/2015 - 14:55 नवीन
सर्वांत भारी असूनही स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता येत नाही म्हणजे खरेच कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 15:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अश्विनि कोल्हे Mon, 04/13/2015 - 15:04 नवीन
माझ्या लेखनातील आशय कुणी समजुन घेतला नाही. सर्व पुरुष लेखकांना माञ अहंकार रुपी ठसका बसला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 15:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
ज
जेपी Mon, 04/13/2015 - 15:08 नवीन
ठ्ठो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
स
संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 15:19 नवीन
जेपीभौ.... जरा सत्काराच्या तयारीला लागा. कार्यकर्त्यांना पळवा. 'भव्य महीलांचा सत्कार' सोरी 'महिलांचा भव्य सत्कार' करायला लागंल. पन्नाशी आता हुईल अर्ध्या तासात, मग टायम नाय गावंल बगा. कशानं सत्कार करायचा तो आयटेमबी ठरवा बुवा सर्वांचं मत घीऊन... आम्हाला माफ करा. आम्हाला अहंकाराचा ठसका लागलाय... डोळे पांढरे झालेत... काय जीव कुचूलून गेलाय जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अजया Mon, 04/13/2015 - 15:24 नवीन
सत्कार फोडणीची पळी देऊन करा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Tue, 04/14/2015 - 05:54 नवीन
फोडणीची पळी नुसती द्यायची का फोडणीसकट हा यक्षप्रश्न आणि सोबत घासणी आणि साबू द्यावा लागेल तो वेगळाच (वर हे साहीत्य दिलंच आहे तर जर घासून ही द्या मागणी होऊ शकते) स्त्री-पुरुष दोघेही समान स्वातंत्र्यप्रिय असावेत पण स्व तंत्र (स्वैराचारी) नसावेत अशी प्रतीगामी मते असलेला भोट नाखू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Tue, 04/14/2015 - 07:33 नवीन
पळी द्या,फोडण्या घालण्यात तै एकसपर्ट दिसत आहेत. घासणी आणि साबू!!किती ते इस्त्रीवरील अन्यायाचे प्रतिक!! असं लिहिता मग भाव्ना कुचल्ली जाते. प्रतिगामी कुठचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
आ
आदूबाळ Mon, 04/13/2015 - 15:21 नवीन
माझ्या लेखनातील आशय कुणी समजुन घेतला नाही.
अहो आशयच लिहायचा ना डायरेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
ह
हाडक्या Mon, 04/13/2015 - 15:29 नवीन
आदूबाळ, तुम्हाला पण लागला का ठसका ? ऑं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सूड Mon, 04/13/2015 - 15:46 नवीन
सर्व पुरुष लेखकांना माञ अहंकार रुपी ठसका बसला.
भारीच बै विनोदी तुम्ही!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
ख
खटपट्या Mon, 04/13/2015 - 19:32 नवीन
मला समजलाय आशय. मी तुमच्या पाठीशी आहे. या अशाच कविथा मरगळलेल्या मराठी साहीत्यविश्वाला वळण लावतील. लीवा बिंधास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
प
प्रदीप साळुंखे Mon, 04/13/2015 - 19:37 नवीन
वळण वाकडे असते बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
नाखु Tue, 04/14/2015 - 05:55 नवीन
मानीटर बदलावा लागेल मी चुकून दळण वाचले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
ट
टवाळ कार्टा Tue, 04/14/2015 - 07:07 नवीन
भीउ नकू असे लिहायचे रैले कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 04/14/2015 - 07:10 नवीन
आता काय बोलणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मोहनराव Wed, 04/15/2015 - 13:11 नवीन
अगागा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे
अ
अजया Mon, 04/13/2015 - 15:09 नवीन
बास एवढीच बॅटिंग झाली? मी पाॅपकाॅर्न आणायला गेलेली.माझ्या भाव्ना कुचल्ल्या गेल्या कमी प्रतिसाद वाचुन.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Mon, 04/13/2015 - 15:19 नवीन
अहो तै, टाळी एका हाताने वाजत नै. आता काकूंच्या मदतीस कोणी आले तर टाळ्या वाजायला लागतील हो, नै तर नुसताच एका हातानेच वारा घातल्यासारखं व्हईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 04/13/2015 - 15:23 नवीन
कोल्हेताई,सुरु ठेवा तुमच्या प्रतिसादाच्या फोडण्या!लागु दे ठसके,उडु दे बार!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/13/2015 - 15:27 नवीन
एकतर्फी लिहीलयहो तै फारच.. नाही म्हणजे आहेत खरंच खुप प्रॉब्लेम्स.. पण तुम्हाला वाटतय तेवढंही जग वाईट नाहीये.. असंच जाता जाता.. सौ. अश्विनी कोल्हे हे सासरचं नाव की माहेरच? (असंच विचारलय.. जज वगैरे काहीही करणार नाहीये..)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 04/13/2015 - 15:30 नवीन
प्रतिसाद वाचुन हसुन मरतय .. जगल तर हाफशेंच्युरी निमीत्त कार्यकर्त्याकडुन सत्कार करण्यात ईल . कार्यकर्ते -टवाळ कार्टा ,चिमणराव
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 04/13/2015 - 15:33 नवीन
काय रे ए ब्याटया आत्मुस न सुड ईथेच तुम्ही कवितेला नाव ठेवून सिद्ध केल आहे की पुरुष ही औरत को छळ्ता है काही नविन करायला गेल की नाव ठेवता है,सिद्ध झाल,:प। तै तुम्ही लिहा ही फाट्यवर मारा सगळ्या पुरुषाना बाला गोपालना :प
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा