स्रीचे अस्तित्व!
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला.
या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी?
नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा
आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते.
कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर
कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही
"आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो.
अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा?
लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी
ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते.
तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं .
प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे.
मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते.
तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण
ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन.
जय महाराष्ट्र!
रचना-सौ.अश्विनी कोल्हे.
💬 प्रतिसाद
(170)
ख
खटपट्या
Tue, 04/14/2015 - 22:55
नवीन
आवो ताई, आमच्या सारखे वाचक हायेत ना तुमच्या पाठीशी. लीवा लीवा बिंधास्त...
तुमची ही कविता मला खूप म्हंजे खूप आवडली आहे. मी पण कवीता करतो. पण धाडस होत नाही प्रसीद्ध करण्याचं. घरी सर्वांसमोर वाचली ही कविता. सर्वांना आवडली.
हे मी सर्व मनापासुन लीहीत आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 04/14/2015 - 10:02
नवीन
सर्वप्रथम आपल्या लेखनामागची कळकळ पोचली हे नमूद करतो. हे काव्य नाहीच आहे . हे महाकाव्य आहे. तेव्हा तुमच्या कवितेला निबंध म्हणणार्यांकडे उदार अंतःकरणाने दुर्लक्ष करा. हा धागा मी पुन्हा पुन्हा वाचून काढला आणि दर वेळेस अधिकच सद्गदित (विग्रह - सत् + गदित) होत गेलो. माझ्या अंतर्मुख मनावर इतका परिणाम झाला की मी माझ्या बायकोची क्षमा मागितली आणि ती नको म्हणत असतानाही तिचा एक दुखरा पाय चेपून दिला. फक्त तो चुकीचा पाय होता हे नंतर तिने मारलेल्या एका फटक्याने आणि ओरडण्याने मला कळाले. परिणामी आता तिचे दोन्ही पाय दुखताहेत आणि सकाळची न्याहरी मलाच बनवावी लागली. एवढे एक सोडता आमच्या मधुर नात्याचे अस्तित्त्व आपल्या कवितेने अजूनच दृढ झाले ह्याबद्दल आपले अनेक आभार. बायकोने एक टोमणा तिच्या नेहमीच्या सवयीने मारलाच, पण तिच्या मुखातून निघणार्या अशा अग्निज्वाळांची आताशा सवय झाल्याने माझी सहनशक्ती तिच्यापेक्षाही कैकपटीने वाढली आहे हे मात्र (माञ असावे बहुतेक. चूभूदेघे) नक्की. स्त्री क्रोधाची जननी असते ह्यावर मात्र तिचा जोरदार आक्षेप आहे हे सांगू इच्छितो (आमच्या कार्टीचे नाव क्रोधा नाही.) त्यामुळे ही दुसरी स्त्री कोण ह्या प्रश्नावरून आमच्या घरी अंमळ संशयकल्लोळ झाला आणि माझ्यावरच क्रोधाचा 'जनक' असल्याचाआरोप करण्यात आला. पण जाऊ द्यात. एवढे चालायचेच, नाही का?
असो. तर सांगायचा मुद्दा असा की, मी आपल्या काव्याचा फार मोठा चाहता आहे. ते असेच भरभरून मिपाच्या डेटाबेसमध्ये कोंबले जाणे हे 'स्री' च्या अस्तित्त्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा लिहीत रहा. थांबू नका.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 11:59
नवीन
बेस बेस
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/14/2015 - 12:12
नवीन
बस भी करो पगले स्वॅप्सभौ !
अब हसवाहसवाके मारोगे क्या +))
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 13:47
नवीन
हे बाकी आहे हं.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 04/14/2015 - 10:12
नवीन
कोल्हेताई तुमच्या कवितेमधील भावभावनांशी सुसंगत अशी एक कविता ...
ओझे किती युगांचे
साचले या अंतरी
वंचना सात जन्मांची
साहीली तुजसाठी |
पायधूळ ही तुझी
घेतली मी मस्तकी
जाण तुज नसे जराही
माझीया अस्तित्वाची |
तोडिली मग बंधने
झुगारली सारी नाती
पंखात बळ माझ्या
होतेच घेण्या भरारी |
मनमुक्त मी आकाशी
पायतळी ही धरती
नजरेत तुझ्या होती
तीच आदीम आसक्ती |
मज नकोत ते तराणे
अन् रीतीचे उखाणे
प्रितीची गंधगाणी
ते उसासे, ते रडणे |
न येणे मी परतुनी
तुजसाठी, तुजपाशी
राहशील सदा तु रे
माझीया चरणांपाशी |
... शेवट बरोबर वाटला का ?
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 04/14/2015 - 13:42
नवीन
मनिषा सुरेख कविता.
शेवट कसा असावा;कसा नसावा हे ज्याने त्याने ठरवावे. म्हणजे लिहीणार्याने. जर कविता एकाच व्यक्तीला उद्देश्य्न असेल तर त्याला पायतळी घालायला हरकत नाही, पण जर समुदायाला उद्देश्उन असेल तर मात्र हृदयाच्या ठोक्यांना साथ देणारे अनेक असतील, शोधावे आणि ओळखावे लागतील.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 04/15/2015 - 03:06
नवीन
बरोबर आहे तुझं .
कुणीच कुणाला पायतळी ठेवण्याची आकांक्षा ठेवू नये .
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 14:19
नवीन
आणि १५० !
पदार्पणातच १५० मारणा-या तुमचं प्रचंड प्रचंड अभिनंदन !
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 04/14/2015 - 14:43
नवीन
दिडशतका निमीत्त धागाकर्ती कु/सौ. अश्विनी कोल्हे आणी कु/श्री.वेल्लाभट यांचा सत्कार एक एक पुस्पगुच्च देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 15:36
नवीन
माझा कशाबद्दल? मी एक शुभेच्छुकच आहे ओ
- Log in or register to post comments
ब
बहीरखेडकर
Tue, 04/14/2015 - 17:18
नवीन
स्त्री ही बला नाही,
अबला ही नाही,
मात्र पुरूषांच्या हाती सापडलेला
तबला आहे.
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 04/14/2015 - 18:04
नवीन
म्हणून काही दुष्ट पुरुष हातोडीने मारुन त्यांना 'पट्टीत' आणतात.
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 18:14
नवीन
या, तुमचीच कमी होती.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/14/2015 - 19:06
नवीन
डग्गा कुठाय ?
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 04/15/2015 - 03:07
नवीन
वा उस्ताद .. व्वा!!
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Wed, 04/15/2015 - 06:10
नवीन
ठीक
ह्यापेक्षा सासू च्या कवितेत जास्त प्रगल्भता दिसून येत आहे
- Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते
Wed, 04/15/2015 - 21:10
नवीन
कविता आणि प्रतिसाद वाचुन मंत्रमुग्ध झालेय.
तुफान आहे.. चालु द्या.
--मयुरा.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/16/2015 - 05:06
नवीन
मंत्रसुन्न व्हायचं असेल तर ह्या कवितेचा आणि प्रतिसादांचा सखोल अभ्यास करा.
http://www.misalpav.com/node/30460
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 10:11
नवीन
त्र व ञ या दोघांतला फरक समजावून घेतलात तर आनंद होईल.
आपण मराठी नामक भाषा देवनागरी लिपी वापरून लिहित आहात. त्+र = त्र.
ञ हा स्वर आहे. व्यंजन / जोडाक्षर नव्हे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4