आपण सगळेच सलमान
क्षणभर कल्पना करा आणि शक्य झाला तर त्या कल्पनेत ४-५ तास घुसून राहा ...... आणि विचार करा तुमचे जगभरात पसरलेले आपला एकेक शब्द झेलणारे लाखो चाहते ... स्वत:च्या हिमतीवर कमवलेले ४०० -५०० कोटी रुपये आणि अजून तितकेच किंबहुना त्याहून जास्त कमवायची क्षमता ... पैशाने विकत मिळणारे कोणतेही सुख उपभोगायचे शिल्लक नाही किंवा पुढच्या ७ पिढ्यांना एक रुपया कमवायची गरज नाही इतके आर्थिक स्थैर्य ...उत्तम तब्ब्येत मोट्ठे कुटुंब ..एकोप्याने राहणारे ...
अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ???
भारतासारख्या समाजव्यवस्थेत आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सलमान सारखे वागू शकतो ..किंबहुना माणसे मारणे वगैरे नसेल कदाचित पण लहान मोठ्या प्रमाणात ..आपण तसे वागतोही ...
आत्ताच अमेरिकेत सेट्ल झालेय एका मित्राची chat आली कि अरे अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडतंय .. ते समाज म्हणून आपल्याला हवय आणि ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना मान्यसुद्धा आहे ..हे एकदा जाणले कि ...मग आता पुढे काय ह्याचा ठोस विचार करायला हरकत नाही ...
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...नक्कीच ! कारण पृथ्वीवरच्या सर्व देशांत (-क्रसी कोणती का असेना, पण) माणूस नावाच्या प्राण्याचेच राज्य असते, नाही का ?! पण अशी उदाहरणे किती संख्येनी आणि किती बेदरकारपणे मिळू शकतील यावर "कायद्याचे राज्य आहे की नाही ?" या वर्णपटात त्या देशाचे स्थान ठरते !