पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही.
त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे.
मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील)
कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल.
शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) )
मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :)
अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.
कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय?कट्ट्याला कंपु नसतो..मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतआपले आवडते पेय आपली वाट बघत आहे. ह्याची नोंद आपण घेतली असेलच.यस्स सर...