Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणी कुणाला काय हाक मारावी !

अ
अत्रन्गि पाउस
Sat, 05/16/2015 - 15:15
🗣 51 प्रतिसाद
काही महिन्यांपूर्वी एका सदरात एक प्रसंग वर्णन केला होता एका कुटुंबात पहिले अपत्य येते आणि त्या नवजात बालकाला आणि पहिलटकरणीला भेटायला सासरची मंडळी (बाळाची आत्या आजी, इव्हन पणजी) त्या सुनेच्या माहेरी जातात .... आगतस्वागत झाल्यावर सुनेची आई आत वळून हाक मारते," अग पिंकी ... कोण आलंय बघ .. बाळाला घेऊन येतेस का बाहेर ?"
आणि
त्या पाहुण्यांपैकी पोक्त आजी त्या सुनेच्या आईला फटकारतात "अहो तुमची पिंकी आता स्वत:च आई झाली आहे ..तिला पिंकी काय म्हणताय अजून चांगले तिचे नाव आहे नं "XXXX" आता तशी हाक मारा बघू तिला ...पुरे आता पिंकी बिन्की ....सुनेच्या आईचा चेहेरा खर्रकन उतरतो ..आणि कसंनुस हसत आपल्या लेकीला ..कधीही सवय नसलेल्या तिच्या नावाने हाक मारतात ...(पुढची कथात जी काय असेल ती )... पण मुद्दा : हि अशी लाडाची नावे, संबोधने सोडून द्यावीत का ? ते हि कुणा तिसऱ्याच्या सांगण्यावरून ? वरील प्रसंग किती जुना आहे माहित नाही पण हल्ली लग्न झाल्यावर बर्याच मुली जिथे माहेरचे आडनाव बदलत नाहीत तिथे हि अशी संबोधने बदलू देतील ? ...नै मुद्दा फार फार छोटा आहे पण तुमचे काय मत आहे ??

प्रतिक्रिया द्या
16312 वाचन

💬 प्रतिसाद (51)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/21/2015 - 16:09 नवीन
लेखन आवडलं. दुसर्‍या बाजूच्या मुद्द्याचे महत्व समजत आहे तरी पण चित्रगुप्त यांच्या दृष्टिकोनाशी सहमत व्हावेसे वाटते. आपल्या अवती भवती अनेक चीड आणणार्‍या गोष्टी घडत असतात, त्यावरच्या उपायांनी किमान नव्या समस्या उभ्या राहतील हा प्रयत्न असावा...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा