Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

ग
ग्रेटथिंकर
Mon, 05/18/2015 - 11:55
🗣 259 प्रतिसाद
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे. या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे. http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis-foreign-visits/15923158 An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign visits and the amount of money spent on those tours has opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”. Opposition leaders claim the government is refusing to share information fearing public outcry Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the talk of the town ever since he became the country’s PM in May 2014. While he has managed to win over the hearts of a few, there are many who wonder how much of the common man’s hard-earned money has been used to sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014 demanding to know the number of foreign visits Modi has made from May 2014 to November 30, 2014, the delegates who have accompanied him and the amount spent on these trips. The reply that he got from the Prime Minister’s Office (PMO) was far from satisfactory. स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.

प्रतिक्रिया द्या
75635 वाचन

💬 प्रतिसाद (259)
व
विनोद१८ Mon, 05/18/2015 - 19:41 नवीन
हाच प्रतिसाद मी चेपुवर वाचला होता इंग्रजीत तो देणारच होतो, तुम्ही मराठीत दिलात फार उत्तम झाले. ह्या मुद्द्यांवर काथ्याकूट व्हावा.
↩ प्रतिसाद: चिनार
न
नांदेडीअन Tue, 05/19/2015 - 04:41 नवीन
हाच मेसेज एका व्यक्तीने माझ्या फेसबुक वालवर इंग्रजीमधून चिकटवला होता. त्याला इंग्रजीमध्येच प्रतिसाद द्यावा लागला होता. तो इकडे कॉपी-पेस्ट करतो. 1. Will you please share any news regarding this deal ? and what are its benefits ? 2. As far as I know Bhutan exports energy to India since many years. And we do not get it for free. We pay for it. 3. Nepal would get 12 percent of the electricity free of charge. GMR is an Indian company who is going to build this dam. And they said it would take five years to build the plant. This plant will operate for 25 years and then we will hand over this plant to Nepal. 4. Japan used to invest in India also when Congress was in power. But yes, this time they have invested some extra money. Let's see how it is going to help us. 5. UPA had signed such deals couple of times with Vietnam in the past. Please read these news. http://www.businessinsider.com/india-and-vietnam-just-signed-an-oil-exploration-deal-that-will-infuriate-china-2011-10?IR=T (2011) & http://www.newindianexpress.com/nation/India-Vietnam-ink-pact-to-expand-oil-exploration-in-South-China-Sea/2013/11/21/article1902209.ece (2013) 6. This Chabahar port deal has been signed in year 2003. Aur isi America ke pressure me humne Iran se oil import 50% se bhi kam kar diya tha, between January to April 15 By the way, I seriously don't know the benefits or drawbacks of importing less or extra oil from Iran. Will you please enlighten me ? 7. If you look at his record, I've no doubt that he will soon visit mars, jupiter and sun. And regarding uranium, please read this news dated December 4, 2011 http://www.smh.com.au/national/labor-votes-in-favour-of-selling-uranium-to-india-20111204-1od53.html 8. Couple of months back SriLankan prime minister had said, "Indian fishermen will be shot if they cross border" 9. China was always desperate to invest in growing markets like India. In February 2014, China had offered to invest 300 billion dollars in various projects of India. UPA had rejected their offer on multiple occasions fearing it would be risky in areas like J&K and Northeast. On the other hand, BJP and Modi ji used to criticize Chinese products and Chinese investment in India, aur ab wohi red carpet lekar baithe hai unke liye. 10. Yes, you are right. This is perhaps the only good decision he has made while appointing people. 11. 'Border Roads Organisation' (UPA tenure) has already built 600+kms of roads along side border in last 5 years and still working on it. But yes, there were some delays due to environmental clearances. Let's see how NDA government acts on it. 12. Every Indian has praised this act of our government. 13. Infact this would be perhaps the first scam building up in NDA's regime. No country outside France has so far bought the Rafale With the kind of money India has pledged to buy the planes, it can actually buy over the entire company that makes them. The deal should be frozen or scrapped. - KC Singh, Former Diplomat and Strategic Affairs Expert Terming the deal “corrupt”, Swamy said it will bring bad name to the party. If the government wanted to please France, then it should have bought the company, which is anyway running into losses. I may have to go to court if the government clears the Raffale deal in which TDK got a hefty bribe. Better we buy Dassault company than that. - Subramanian Swamy, Our own entertainer 14. 2010 me Manmohan Singh ji ka bhoot gaya tha kya Canada ? This uranium supply agreement was finalized in September 2013 15. Come on dude, it's the other way around. It is us who are giving visa on arrival to Canadians. Canada is not giving us visa on arrival. 16. As far as I know, France is going to help us in building Jaitapur nuclear plant. Shivsena is opposing this. Will you please tell me why ? 17. IAEA already tracks and monitor all the uranium that we import. I'm no 'expert' in all these things, therefore I request you to correct me if any of the information I've provided is wrong.
↩ प्रतिसाद: चिनार
ख
खंडेराव Tue, 05/19/2015 - 12:40 नवीन
कच्च्या तेलावर "ON Time delivery premium charges" न लावण्याचा भारताचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मान्य केला आहे. साधारणपणे, कपडे इस्त्री करताना धोबी आपल्याला जे urgent म्हणून charges लावतो तोच या ON Time delivery premium charges चा अर्थ आहे. यातून काही हजार कोटींची बचत नक्कीच होईल ! आणि पर्यायाने पेट्रोल ,डिझेल चे भाव कमी होतील.
आजचे क्रूड चे दर ६०$ प्रति बॅरल आहेत. १ वर्षापुर्वी हे ९२ $ होते. एक वर्षापुर्वी दिल्लीत पेट्रोल ७१.५० रु. होते, आज ६६.२९ आहे. तुम्ही म्हणताय त्या बदलाचा आपल्याला फायदा झाला म्हणजे मिळवली.
भूतान मध्ये भारत ४ अजस्त्र धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
अहो, हे जुनेच आहे. ही २००९ ची बातमी बघा - Larsen &Toubro said April 1 the project is the first of 10 hydro projects totaling 11,576 MW that the two governments plan to implement by 2020. (HNN 2/26/08) The dam package contract, valued at 12.45 billion rupees (US$245.8 million) calls for Larsen &Toubro's Construction Division to build a diversion tunnel, dam, intake, and desilting arrangement, including hydro-mechanical works, over 66 months. The India firm won the contract in a bidding process. India approved an intergovernmental agreement with Bhutan in 2007 to implement Punatsangchhu 1. (HNN 7/24/07) It includes a 400-kilovolt double-circuit transmission lines from the project site to the Indo-Bhutan border. Punatsangchhu is to provide surplus power to India and further integrate the economy of Bhutan with that of India. भुतान मधे आपण खुप वर्षांपासुन ही गुंतवणुक करतोय. मोदी कंटिन्यु करत आहेत ही चांगली गोष्ट.
नेपाळमध्ये भारत जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
दावा चुकीचा आहे. चीन जो प्रोजे़क्ट बांधतोय त्याची किंमत १.६५ बिलीयन $ आहे, भारतीय प्रोजे़क्टची १.४ बिलीयन $. हा जिएमआर बांधतेय. नेपाळमधे भारत आणि चीन दोन्हीची अहमिका आहे. हा सिंहाचा वाटा आपल्याला जिएमआर कडुन बाजारभावाने विकत घ्यावा लागेल.
अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण आता भारताला कच्चॆ तेल विकणार आहे आणि ते सुद्धा भारतीय रुपयांमध्ये ! याचाच अर्थ देशातील परकीय गंगाजळीला धक्का पोहोचणार नाही. इराण मधल्या 'चाबहार' बंदराचे बांधकाम भारत करणार आहे जिथे भारतीय नौकांना खास प्रवेशद्वार असेल.
हे जुणे झाले, २०१३ पासुन आहे ही सोय. http://articles.economictimes.indiatimes.com/2013-07-14/news/40570111_1_halkbank-rupee-payments-iranian-oil बातमी वाचा वरची. अमेरिकेची बंधणे झुगारुन :-)
व्हियेतनाम सोबत राजकीय संबंध मजबूत केल्यामुळे व्हियेतनामच्या समुद्रातील तेल उत्त्खाननाचे कंत्राट ONGC ला मिळणार आहे. चीनशी संबंध बिघडतील या भीतीमुळे आधीचे सरकार हे कंत्राट घ्यायला घाबरत होते
आधीच मिळालेय हो हे कंत्राट. कोणी घाबरत नव्हते. OVL (ONGC Videsh Ltd ) forayed into Vietnam as early as 1988, when it was awarded the exploration license for Block 06.1. Presently the block is producing natural gas. The company also got exploration Blocks 127 and 128 in 2006. Block 127 was relinquished after completing the work programme. Block 128 is currently under exploration. http://articles.economictimes.indiatimes.com/2014-05-07/news/49689745_1_petrovietnam-oil-blocks-south-china-sea
ऑसट्रेलिया भेटीदरम्यान पंतप्रधान टोनी अबोट यांनी भारताला युरेनियम पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. ऑसट्रेलिया हा जगातील सगळ्यात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.
ऑसट्रेलिया हा नाही हो सगळ्यात मोठा उत्पादक. कझाकस्तान तिपटीहुन जास्त बनवते. हा पुरवठा फक्त उर्जा निर्मितीसाठीचा आहे.
चीन भारतात २० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (१,४०,००० कोटी रुपये !)
अहो, १०० कोटी करणार होते, ८० कमी केले त्यांनी. http://www.business-standard.com/article/economy-policy/china-dashes-100-bn-hope-to-invest-20-bn-over-5-years-114091800557_1.html संभाळुन रहायला पाहीजे चीन पासुन, पैसा लावुन काय घेतील भरोसा नाही.
भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील.
Pentagaon कुठली, अमेरिकेतलीच कि अजुन कोणी आहे? अतिरेकी कुठले, पाकिस्तानचेच ना? बघा, ISI चा आधीच एखादा करार असायचा! स्वप्नाळुपणा वाटतोय हे वाक्य म्हणजे.
जपान भारतात ३० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (२,००,००० कोटी रुपये !). ही गुंतवणूक दिल्ली - मुंबई औद्योगिक कोरेडोर मध्ये करण्यात येणार आहे.
आकडा चुकलाय, ३० नाही, ३५. हे एक चांगले झाले. जपानकडे पैसा पडुन आहे, ग्रोथ थांबलिय. आपल्यालाही गरज आहे गुंतवणुकीची.
पूर्वोत्तर सीमारेषा रस्ता बांधण्याचे भारत-चीन ने मान्य केले आहे. मागील सरकारच्या काळात कितीतरी वर्ष हा प्रस्ताव्व प्रलंबित होता. आणि यासाठीच चीन ने भारतातील गुंतवणूक थांबवली होती.
हे काही कळाले नाही, समजवुन सांगता का?
भारत सरकारने येमेन मधून ४५००+ भारतीय लोकांना सुखरूप मायदेशी परत आणले. शिवाय ४१ देशातील लोकांना मायदेशी परत नेण्यास मदत केली. सौदी अरेबिया ने येमेन वर हा हल्ला केला होता आणि येमेन ने "नो फ्लाय झोन" घोषित केला होता. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: सौदी अरेबिया चे राजे सुलेमान यांना दूरध्वनी करून भारतीय विमान सौदी अरेबिया च्या हदीत येऊ देण्याची मागणी केली. सुलेमान यांनी ती मान्य केली. अजित डोवल, सुषमा स्वराज आणि व्ही के सिंग यांनी या प्रकियेत महत्वाचा हातभार लावला. आणि हो ...४५०० भारतीयांपैकी फार कमी हिंदू होते बंर का !!!
अहो, काम आहे सरकारचे ते. ऑपरेशन होमकमिंग चे नाव ऐकलय का? सुकुन? इथेही भारताने हजारो लोक परत आणले, आपले आणि शेजार्यांचेही. फक्त तेव्हा इतका बोलबाला नव्हता झाला
श्री नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे फ्रांस ने भारताला ३६ लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले. ह्या सौद्यामध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता.
प्रयत्न? फ्रान्सचे प्रयत्न होते हो. वर्षाला ११ विमाने बनवते दस्साल्ट. बंद पडली असती हे डील नसते मिळाले तर.
क्यानडा भेटीदरम्यान भारतीय न्युक्लीयर प्लांट साठी ५ वर्षे य़ुरेनिउम पुरवठा करण्याचे क्यानडा ने मान्य केले.
बरोबर आहे. १९७४ च्या स्फोटात आपण कॅनेडियन तंत्रज्ञान वापरले म्हणुन सहकाय बंद केले होते. आता विकायला तयार झालेत.
२६ जानेवारीच्या ओबामा भेटीदरम्यान अमेरिकेने भारतावरील अणु निर्बंध शिथील करण्याचे मान्य केले आहे. याद्वारे १६ भारतीय अणु प्रकल्पांना चालना मिळाली आहे.
२००५ पासुन चालु आहेत प्रयत्न. भारत ग्राहक आहे या तंत्रज्ञानाचा.
१६. फ्रांस भारतामध्ये २ बिलियन युरो ची गुंतवणूक करणार आहे.
अहो, ते वरचे जेट्स ४ बिलियन युरो चे आहेत. हा असाच हिशोब असतो सगळा. तुम्ही दोन द्या, मी चार देतो. असो, आता थांबतो. मोदींविषयी कुठलाही आकस नाही, पण हे जे चाल्लय, ठासुन खोटे बोलणे आणि गेल्या ६० वर्षात काही झाले नाही, आता मी बघा काय करतोय, याला विरोध आहे. प्रेस वाले विरोधात लिहु लागले कि त्यांना शिव्या, दुसर्याच्या मातीवरुन आपली भांडणे काढणे, कोणी विरोध केला की तो सिक्युलर आणि काय काय याचा राग येतो.
↩ प्रतिसाद: चिनार
क
कपिलमुनी Tue, 05/19/2015 - 13:00 नवीन
मोदी काम करत आहेत पण त्यांचे भक्त गाजावाजा जास्त करत आहेत. आणि भक्तांची खोटे बोला पण रेटून बोला अशी गोबेल्स नीती आहे. जिथे चुकले ते चुकले हे सुद्धा मान्य करत नाहीत. बाकी दौरे वगैरे चालू द्या . पण परदेशी जाउन स्वतःच्या देशाबद्दल पूर्वीच्या सरकारबद्दल वाइट बोलणे चुकीचे आहे. एकदा टोक्योमध्ये ते म्हणाले होते "मी गुजराथी आहे. बिझिनेस माझ्या रक्तात आहे". आता बाहेर तुम्ही भारतीय की गुजराथी ? मोदींची भाषणे अजूनही प्रचारकी थाटाची असतात असेच वाटते ज्यामधे वस्तुस्थिती कमी आणि अभिनिवेश जास्त वाटतो . दुसरा मुद्दा असा की भक्त लगेच पूर्वीच्या सरकारचे दाखले देतात . ते हे विसरतात की पूर्वीच्या सरकारने काम केले नाही म्हणून त्यांना घरी बसवले आहे. आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे , ज्यांचे तुम्ही 'प्रधान सेवक' आहात त्यांना तुमच्या कार्यशैली बद्दल प्रश्न विचारायचा , टीका करायचा हक्क आहे. बाकी एकंदरीतच मोदी असो की केजरीवाल टीका सकारात्मक घेणे हा प्रकार संपला आहे. ब
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/19/2015 - 13:17 नवीन
सोडा हो, केजरिवाल समर्थक शिव्या देत नाहीत ( माझा अनुभव ) किमान, इकडे काही बोलले की घोडे लावायला सैन्य आहे भक्तांचे ( हा ही माझाच )
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मृत्युन्जय Tue, 05/19/2015 - 14:13 नवीन
की घोडे लावायला सैन्य आहे भक्तांचे आपल्या वाक्यातली विसंगती आपल्याला जाणवली का?
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/19/2015 - 14:21 नवीन
समजवुन सांगा..
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Tue, 05/19/2015 - 13:12 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) अहो इतकं मुद्देसूद वाचणं भक्तांना झेपत नाही हो. गोल्डफिशपेक्षाही लहान अटेन्शन स्पॅन असलेली ही माणसे.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/19/2015 - 20:18 नवीन
भक्त कंपनीचे जॉब रोल ठरलेले असणार, २% लिहितात, आणि उरलेले चोप्य पेस्त करतात..या उरलेल्यांचा आवाका गोल्ड फिश एवढाच असावा. सुसुचे अचाट आरोप शेयर करणारे बघुन निराशा येते!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 05:36 नवीन
Unofficial Subramanyam Swami page कोणी फेबु वर follow करत का ? धम्माल चालू असते तिथे . बाकी सुसु यांनी अटलबिहारी वाजपेयी सारख्या पुज्य माणसावर कसले गलिछ आरोप केले होते हे तपासायची तसदी भक्त घेतील याची शक्यता नाहीच म्हणा
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 06:19 नवीन
अटलबिहारी वाजपेयी तरी पूज्य हे नक्की ना? ते ही भाजपाचेच होते म्हणुन परत विचारतोय. नाही तश्या भावना कळतात मला. एकदा अटलजींनी मोदींना जाहिररीत्या फटकावले होते म्हणुन गुलामांना आणि मोदीद्वेष्ट्यांना एकाएकी वाजपेयींचा पुळका यायला लागला आहे एरवी तेच लोक वाजपेयींना शिव्या घालायचे. असो. तुम्ही त्यातले नसाल अशी आशा.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 06:25 नवीन
वाजपेयी माझ्यासाठी आदरणीय होते आणि आहेत . त्यांच्या कारकिर्दीत काही चुका (माझ्या मते ) झाल्या पण तो माणुस महान होता याबाबत दुमत असायचं काही कारण नाही . भाजप मधले परीकर , शिवराज चौहान असे अनेक नेते पण मला आवडतात . बर वाजपेयींना काही पक्षीय विरोधक टीका करत असतील पण त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप करणारा सुसु भाजपात आणि मोदींच्या जवळच्या वर्तुळात का आहे यावर तुमच मत जाणून घ्यायला आवडेल
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नांदेडीअन Wed, 05/20/2015 - 06:34 नवीन
वाजपेयी माझ्यासाठी आदरणीय होते आणि आहेत . त्यांच्या कारकिर्दीत काही चुका (माझ्या मते ) झाल्या पण तो माणुस महान होता याबाबत दुमत असायचं काही कारण नाही . भाजप मधले परीकर , शिवराज चौहान असे अनेक नेते पण मला आवडतात . बर वाजपेयींना काही पक्षीय विरोधक टीका करत असतील पण त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप करणारा सुसु भाजपात आणि मोदींच्या जवळच्या वर्तुळात का आहे यावर तुमच मत जाणून घ्यायला आवडेल
+१ मलासुद्धा पर्रीकर यांच्याबद्दल आदर वाटतो आणि शिवराजसिंग चौहानबद्दल आदर वाटायचा. पर्रीकर यांचा साधेपणा अजूनही भावतो. त्यांच्याबद्दल जास्त वाईट कधी ऎकले किंवा वाचले नाही. चौहान यांच्याबद्दलचे मत मात्र ‘व्यापम’ घोटाळ्यामुळे बदलले आहे. या घोटाळ्यातील सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यु झाला आहे.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
र
रमेश आठवले Wed, 05/20/2015 - 08:00 नवीन
वाजपायी मोदींच्या बाबत नेमके काय म्हणाले ते इथे ऐका-- https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 08:07 नवीन
सुसु वाजपेयी यांच्याबद्दल काय काय बोलले याची पण एक लिंक टाकाच : )
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 09:28 नवीन
माझे शहाणे वाटणारे मित्रही सुसु भक्त आहेत, त्यांना दाखवतो.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 09:42 नवीन
जाऊ दे त्याना कशाला त्रास . मीच टाकतो : ) http://www.outlookindia.com/article/why-vajpayee-hates-swamy/205236
↩ प्रतिसाद: खंडेराव
र
रमेश आठवले Wed, 05/20/2015 - 15:43 नवीन
कल्याण सिंग हे दोन वेळा उत्तर प्रदेश चे मुख्य मंत्री होते. त्यांच्या नावावर वाजपायी पंतप्रधान असताना हे उद्गार म्हटल्याचे खपवले जाते -नेता पियक्कड ,पार्टी फक्कड और जनता भुक्कड- हे वाक्य त्यांनी मुख्य मंत्री पद आणि भाजप पक्ष सोडल्या नंतर की आधी म्हटले हे मला माहित नाही. सध्या त्यांचे पुनर्वसन झाले असून ते आता राजस्थानचे राज्यपाल आहेत .
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 17:17 नवीन
अहो मुद्दा काय ? तुम्ही बोलत काय आहात ? सुसु बद्दल बोला की .
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले गुरुवार, 05/21/2015 - 00:58 नवीन
-अहो मुद्दा काय ? तुम्ही बोलत काय आहात ? सुसु बद्दल बोला की .- आपण सुस्वा च्या आत्मचरित्रातील वाजपायी यांच्या पीण्याच्या सवयी विषयीच्या माहिती वर बोट ठेवलेत. मी त्या अनुषंगे भा ज पा मधील दुसऱ्या नेत्याने काय म्हटले आहे हे सांगितले . मिपावरील चर्चा हि फक्त दोन व्यक्ती मधील संवाद या स्वरूपाची नसते असे मी मानत आलो आहे.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ह
हाडक्या Tue, 05/19/2015 - 15:09 नवीन
मोदींविषयी कुठलाही आकस नाही, पण हे जे चाल्लय, ठासुन खोटे बोलणे आणि गेल्या ६० वर्षात काही झाले नाही, आता मी बघा काय करतोय, याला विरोध आहे. प्रेस वाले विरोधात लिहु लागले कि त्यांना शिव्या, दुसर्याच्या मातीवरुन आपली भांडणे काढणे, कोणी विरोध केला की तो सिक्युलर आणि काय काय याचा राग येतो.
अगदी अगदी.. चांगल्या कामाचे देखील अशा इतरांच्या अतिउत्साहाने म्हणा अथवा आक्रस्ताळेपणाने म्हणा, उगी अवमूल्यन होतेय असे वाटते मग. आता सोशल मिडिया आहे तेव्हा थोडेफार जोक होतील, दरवेळी लगेच ऑनलाईन ब्रिगेडने (कुठल्याही पक्षाची का असेना) प्रतिहल्ला, गोबेल्स नितीने "खोटे बोला पण रेटून बोला, पुरावे मात्र इतरांना मागा" असे प्रकार करण्याची काहीच गरज नाही. बरेचसे कट्टर समर्थक प्रत्येक जोक अगदी "दिल पे" घेतात असे निरिक्षण आहे. तेच लोक चिमणरावांचा नियम पाळण्याबद्दलचा धागा त्यांना पाठवल्यास मात्र "तू काहीही मनावर घेतोस" असे म्हणतात हे पाहून सखेद आश्चर्य वाटले होते. :) (असो, बाकी नेहमीचीच धुळवड, नेहमीचाच धुरळा..)
↩ प्रतिसाद: खंडेराव
आ
आनन्दा Wed, 05/20/2015 - 08:34 नवीन
१००% सहमत. अश्या लोकांमुळे नेत्याचे नुकसानच जास्त होते. पहिल्यापासूनच मला मोदींची या बाबतीत दया येते. त्यांचे समर्थक आणि विरोधक, दोघेही कट्टर आहेत.
↩ प्रतिसाद: हाडक्या
ख
खटासि खट Wed, 05/20/2015 - 19:14 नवीन
भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील. >>> हे पुन्हा एकदा समजावून सांगा. दहशतवादी हल्ले याने कसे थांबतील ?
↩ प्रतिसाद: चिनार
ह
होबासराव Mon, 05/18/2015 - 12:19 नवीन
ग्रेटथींकर अभ्यास वाढवा.. :) मन्सुर दार्वेश हा माईंचा भाउ का, कि हितेश चा साळा कि नानाचां मेव्हणा..... जेव्हा मनमोहन सिंग घरात बसुन गारगोटया खेळत होते तेव्हाचा जो सर्वसामाण्य माणसाचा पैसा वाचला त्याचि काय सोनियांना साडि चोळि घेतलि का राहुल ला धोतरजोड ? मोदिंच्या विदेश दौर्‍यानि काय साध्य होणार आहे हे कळायला अभ्यास लागेल, तो सुध्दा एकांगि नाहि. जाउद्या ये आप णेफळे लोगो के बस कि बात नहि. रच्याकने राहुल बाबा विपश्यना करायला बँकॉक ला का गेला बर ? इथे महाराष्ट्रात ईगतपुरि ला विपश्यना साधना केंद्र आहे तिथे का नाहि गेला ? णेफळे धागा काढुन पळायचे नाहि आता.
ग
ग्रेटथिंकर Mon, 05/18/2015 - 12:23 नवीन
खर्चाचा तपशील द्यायला काचकूच कशासाठी मग,उपरोक्त कामे करन्यासाठी त्या देशाची ट्रिप करायची गरज नाही,संबंधीत मंत्रालये ही कामे त्यादेशाच्या मंत्रालयाशी संपर्क साधून करु शकतात , त्यासाठी आपल्या कार्यकाळातला एक चतुर्थांश वेळ् परदेशात दवडन्याची काहीच गरज न्हवती
अ
अनुप ढेरे Mon, 05/18/2015 - 12:28 नवीन
सहमत आहे. तुमच्याशी सल्लामसलत करायला हवी होती.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
च
चिनार Mon, 05/18/2015 - 12:28 नवीन
बर बर !!...तुम्ही 'छान छान गोष्टी' वाचा !
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 05/18/2015 - 12:35 नवीन
माफ करा, व्यक्तिशः तुम्हाला मला काहीच म्हणायचे नाही, पण या सारखा हास्यास्पद प्रतिसाद मी कुठेच पाहीला नाही.
संबंधीत मंत्रालये ही कामे त्यादेशाच्या मंत्रालयाशी संपर्क साधून करु शकतात
परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर अवलंबून राबवता येत? म्हणजे माझा अभ्यास काहीच नाही याबाबतीत, पण सारासार विचार केल्यावर हे शक्य आहे असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ग
ग्रेटथिंकर Mon, 05/18/2015 - 13:02 नवीन
परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर अवलंबून राबवता येत? म्हणजे माझा अभ्यास काहीच नाही याबाबतीत, पण सारासार विचार केल्यावर हे शक्य आहे असे वाटत नाही.>>>>>>>>>>>>अहो बुरोक्रसीवर नाही हो, संबधीत मंत्री जाऊ शकतात ,पन् या सर्वांना बाजुला सारुन हे साहेब् एकटेच फिरत आहेत,तिकडचे एकही पिएम् हिंग लावुन विचारत नाहीत, पण् यांचे जागतिक नेता व्हायचे मुंगेरीलालचे स्वप्न पुर्न करायला जनतेच्या पैशाचा वापर कशासाठी?
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 05/18/2015 - 13:07 नवीन
असो.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
काळा पहाड Mon, 05/18/2015 - 13:08 नवीन
देशांना भेटी देवून जागतिक नेता होतो काय? आणि तेही तिकडचे पीएम हिंग लावून विचारत नसताना? ते काही नाही. ग्रेटथिंकर, कराच तुम्ही मोदींवर केस. अगदी सुप्रीम कोर्टातच जावूया.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ब
बेकार तरुण Mon, 05/18/2015 - 13:16 नवीन
मला खात्री आहे तो दिवस दूर नाहि जेव्हा ग्रेट्थिंकर साहेब केस जिंकतील आणी भारताला सोन्याचे (नाहि जरा कमीच पडलं, हिरे मोती वगैरे वगैरे) नि मढलेले दिवस दाखवणारे युवराज राज्य करतील. जे फक्त ५७ दिवस कुठे गेलो वगैरे नाहि तर प्यायलेल्या पाण्याचे व टांगाभाड्याचेहि बिल जनते समोर ठेवतील.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
संदीप डांगे Mon, 05/18/2015 - 12:31 नवीन
हा धागा खूप मोठ्ठा ट्रोल आहे. जाणकारांनी इथे उत्तरे देत वेळ घालवण्यापेक्षा गप्प राहिलेले बरे... काय म्हणतां..?
प
पिंपातला उंदीर Tue, 05/19/2015 - 13:06 नवीन
@ संदीप डांगे तुमची troll ची व्याख्या काय आहे नेमकी ? म्हणजे एकच agenda (मोदी विरोधाचा ) राबवणारे troll आहेत हे मान्य केले तर त्याची दुसरी बाजू किंवा विरुध्द टोक असणारे (सतत मोदिसमर्थन करून असंख्य चुकांकडे डोळेझाक करणारे आणि वर मी कुठलाच चष्मा घातलेला नाही असे म्हणणारे ) पण troll ठरतात का तुमच्यासाठी . जर ती दुसरी बाजू तुम्हाला संतुलित निरपेक्ष वाटत असेल तर मग प्रश्नच संपला
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 05/19/2015 - 16:43 नवीन
तुमच्या या दोन ओळींच्या प्रतिसादात मूळ लेखापेक्षा जास्त मजबूत मुद्दे आहेत. चेपुछाप पिंका चेपुवर शोभून दिसतात. टोमणेवजा पिंका मिपावर टाकायच्या असतील तर प्रतिसादात असल्या तर चालून जातील. पण अशा मुद्देहीन, अभ्यासहीन पिंका लेख म्हणून यायला लागल्या तर मिपाच्या दर्जाचं काय होईल? इथे कुणीही कोणत्याही बाजूचं मत मांडावं. पण लेख म्हणून एक मुद्देसूद, अभ्यासू लिखाणाची अपेक्षा असते. निव्वळ शेरेबाजी करायची असल्यास माझ्यामते तरी मिसळपाव ही जागा योग्य नव्हे.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ग
गॅरी ट्रुमन Mon, 05/18/2015 - 12:37 नवीन
ग्रेटथिंकरराव, तुमचे बरोबर आहे. मोदींचे परदेश दौरे म्हणजे पैशाची वारेमाप उधळपट्टी आहे आणि जनतेच्या पैशावर मोदी पिकनिकवर फिरायला जातात. (पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
च
चिनार Mon, 05/18/2015 - 12:43 नवीन
क्लिंटन भाऊ ...आप तो ऐसे न थे ! क्या "आप" ने आपको ऐसा कर दिया ?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 05/18/2015 - 12:53 नवीन
नाही हो. :) असे लेख हे फार गांभीर्याने घ्यायचे नसतातच. तेव्हा लेखकाशी सहमती दर्शवून मोकळे व्हायचे कारण अशा लेखांवर उगीच चर्चा करण्यात काही अर्थ नसतो असे मला वाटते :)
↩ प्रतिसाद: चिनार
ब
बेकार तरुण Mon, 05/18/2015 - 12:55 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
च
चिनार Mon, 05/18/2015 - 12:57 नवीन
वोक्के सर !
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Mon, 05/18/2015 - 12:40 नवीन
जरा कुतूहल वाटलं म्हणून लेख उघडला आणि लेखकाचं नाव पाहिलं. नेहमीचे भाजप द्वेष्टे बघितल्यावर जरा हायसं वाटलं. माहिती अधिकार कायद्यासारख्या चांगल्या कायद्याचाही लोक कसा पूर्वग्रहदूषित वापर करतात ते बघून मौज वाटली. कॉंग्रेसचे महामहीम राहुल गांधी ५७ दिवस सुट्टीवर होते. कुठे गेले होते, काय करत होते, कोणाला भेटत होते - काहीही माहित नाही. दहा वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाचा उपाध्यक्ष असलेला हा माणूस आहे. त्याला भारताची सामरिक गुपिते नक्कीच माहित असतील, त्यामुळे तो कुठे जातो आणि कोणाला भेटतो हा नक्कीच देशाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे पण त्याच्याबद्दल कोणी माहिती अधिकारान्वये काही माहिती मागितल्याचे ऐकिवात नाही. मागे एकदा सोनिया गांधी आजारपणामुळे अमेरिकेला गेल्या होत्या. त्याची माहिती कोणत्याही माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेली आठवत नाही. आणि मोदींच्या दौऱ्यावर झालेला खर्च हा अपव्यय आहे की भविष्याकडे लक्ष ठेवून केलेली गुंतवणूक आहे ते मजण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो देण्याचीही या माहिती अधिकारवाल्या ग्रेट थिंकर लोकांची तयारी नाही. खरंतर यांना अशी माहिती मिळवून काय साधायचं असतं आणि ही माहिती कोणाकडे जाते ह्यावर कुणीतरी RTI अंतर्गत माहिती मागायला हवी. माहिती मागण्यात गैर काही नाही पण जेव्हा ती अशी पूर्वग्रह ठेवून मागितली जाते तेव्हा त्या अधिकाराचा तो दुरुपयोग आहे असंच म्हणायला पाहिजे. बाकी चालू द्या.
श
श्रीरंग_जोशी Mon, 05/18/2015 - 15:05 नवीन
सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च पदाधिकार्‍यांना जे थेट सरकारमध्ये नाही त्यांना सरकारची धोरणात्मक माहिती असणे यात गैर नाही. पण सामरिक गुपिते त्यांना ठाऊक असणे (खरे असल्यास) तत्कालिन संरक्षण मंत्री व पंतप्रधान व कॅबिनेटमधील सुरक्षा समितीचे सदस्य यांनी त्यांच्या पद व गोपनियतेच्या शपथेचा भंग केला असे म्हणावे लागेल. १९९८ साली वाजपेयी सरकारमध्ये स्व. प्रमोद महाजन व जसवंत सिंह मंत्री नव्हते. महाजन पंतप्रधानांचे राजकीय सल्लगार म्हणून व जसवंत सिंह पंतप्रधानांचे अमेरिकेतील दूत म्हणून काम करणार होते (स्वतः पंतप्रधानांकडे परराष्ट्र खाते होते) तेव्हा पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी या दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली होती. राहूल गांधी यांना भारताची सामरिक गुपिते ठाऊक असावीत हा दावा तुम्ही कशाच्या आधारे केला हे सांगितले तर बरे होईल.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रसाद१९७१ Mon, 05/18/2015 - 15:43 नवीन
राहूल गांधी यांना भारताची सामरिक गुपिते ठाऊक असावीत
अगदी ठाऊक असतील तरी त्यांना ती कळतील का?
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/19/2015 - 10:54 नवीन
अहो मोदीसरकार सत्तेत येण्यापूर्वी कोणत्यातरी मोठ्या सरकारी बाबूने लिहीलेले पुस्तक कोणते ते? त्यात त्याने लिहीले होते की मनमोहनांकडून क्लीयर व्हायला सगळ्या फायली १० जनपथला जायच्या वगैरे.. त्यावरून असे वाटले असेल.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ग
ग्रेटथिंकर Tue, 05/19/2015 - 11:40 नवीन
त्या पुस्तकाचा या विषयाशी काहीही संबंध नाही.
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मोहनराव Mon, 05/18/2015 - 14:00 नवीन
ग्रेट थिंकर ...यु आर थिंकिंग ग्रेट!!
द
द-बाहुबली Mon, 05/18/2015 - 14:10 नवीन
नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे या दौर्‍यातुन मोदीनी चिनला अक्षरशः घेरलं, अगदी चिनच्या अधिकृत मेडीआने देखिल मोदीना "धुर्त-धोकादायक" असेच मानलं आहे. बाकी आपल्याला "सामरीक महत्व" या शब्दाचा अर्थच आपणास माहीत नाही असेंच वरील वाक्य स्पष्ट करत असल्याने... फार चर्चा न करता मोदीनी ज्या क्षणी अजित डॉवालना सोबत घेतलं तिथेच माझं मन जिंकलय असे म्हणेन. नाही दाखवायला राजनाथसिंह मंत्री आहेत पण खरं काम अजित भाउच करतात :) असो... बाकी यानुशंगाने मला मेक इन इंडीया मात्र विषेश पट्लं नाहीये. एक काळ होता जेंव्हा परदेशी प्लांट लागणार म्हटल्यावर हजारो स्थानीकांना रोजगार उपलब्ध्द होत असे, व अनेक लघुउद्योजकांनाही बरीच कामे मीळत असतं. आता काळ बदलला आहे, आता हे घडतेच असे अजिबात नाही. कारण आता सर्वत्र ऑटोमेशन झाले आहे. सर्व कामे यंत्र करतात व म्हणून ती जास्त अचुक, दर्जेदार व जलदही असतात. मानवी हस्तक्षेप प्रॉडक्शनमधे शक्य तितका टाळला जातो. स्थानीक लघु उद्योजकांनाही विषेश कामे मिळत नाहीत कारण भारतीयांना तो दर्जा राखता येतोच असे नाही. ( ऑटोमेशन असल्याशिवाय) म्हणजे पुन्हा ऑर्डर्स बाहेरच... मग मेक इन इंडीया नक्कि कोणाला जास्त फायदेशीर आहे ? सोपं उदाहरण घेउ, मला विदेशी गाडी हवी आहे ? त्यावर किमतीच्या जवळपास १००% टॅक्स भरल्याशीवाय ही गाडी भारतात येणेच शक्य नाही.. पण त्याच्या स्पेअरपार्ट्सना हे लागु नाही मग ? मेक इन इंडीया म्हणत भारतातच मॅनुफॅक्चरींग टाकायचे, खरे तर फक्त असेंब्लिंगच कारण (सर्व महत्वाचे) सुटेभाग बाहेरुनच टॅक्स वाचवत मागवायचे, इथे ते मशीन कडुन जोडुन घ्यायचे ( म्हणजे रोजगार गेला) व स्वस्तात गाडी भारतात विकायची... यात सामान्य माणसाला पैसा मिळणार कुठे हा यक्षप्रश्न आहे. एकेकाळी जपान, चिन वा इतरही अनेक देशांनी तिथेच उत्पादनाला चालना देउन देशामधे पैसा आणला सम्रुध्दी आणली हे सत्य आहे. आणी मोदीजी तेच करत आहेत पण... बदलता काळ सामान्य माणसाबाबत हे होउ देणार आहे काय ?
प
पिंपातला उंदीर Tue, 05/19/2015 - 12:52 नवीन
हैला ! कुणीतरी इथले 'भक्तांचे ' प्रतिसाद कॉपी करून मंगोलियन जनतेपर्यंत पोंचवा पाहू . आपला देश कसा महत्वाचा आहे यावर हिरीरीने टाकलेले स्तुतीवाचक प्रतिसाद पाहून उर भरून येईल हो त्यांचा . पुढचा दौरा कुठाय म्हणायचा ? कांगो ? भक्तांचा 'रिसर्च ' सुरु पण झाला असेल कांगो हा देश कसा महत्वाचा आहे यावर
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ब
बॅटमॅन Mon, 05/18/2015 - 14:24 नवीन
ये एहे एहे एहे!!!! ग्रेटथिंकरांचा धागा मंजे पर्वणीच.
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/18/2015 - 15:03 नवीन
अगदी अगदी!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा