Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

ग
ग्रेटथिंकर
Mon, 05/18/2015 - 11:55
🗣 259 प्रतिसाद
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे. या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे. http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis-foreign-visits/15923158 An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign visits and the amount of money spent on those tours has opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”. Opposition leaders claim the government is refusing to share information fearing public outcry Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the talk of the town ever since he became the country’s PM in May 2014. While he has managed to win over the hearts of a few, there are many who wonder how much of the common man’s hard-earned money has been used to sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014 demanding to know the number of foreign visits Modi has made from May 2014 to November 30, 2014, the delegates who have accompanied him and the amount spent on these trips. The reply that he got from the Prime Minister’s Office (PMO) was far from satisfactory. स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.

प्रतिक्रिया द्या
75635 वाचन

💬 प्रतिसाद (259)
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 07:44 नवीन
हसून हसून पुरेवाट झाली राव : )
↩ प्रतिसाद: खंडेराव
न
नाव आडनाव Wed, 05/20/2015 - 07:47 नवीन
:))
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 09:12 नवीन
कोंगो बद्दल जेव्हा मोदी हे विधान करतील त्यानंतर मी तहहयात मोदीविरोधी मतदान करेन. तोपर्यंत या प्रतिसादाची किंमत विनोदी कल्पनाविस्तार यापेक्षा जास्त नाही. अवांतरः हसुन करमणुक झाली हे नक्की. :)
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 09:23 नवीन
पण ह्या विषयी तुमचे काय मत आहे? A serial planned for television will put Prime Minister Narendra Modi in the league of emperors Chandragupta Maurya and Ashoka, projecting them as men who have done the oil-pressers community proud. Modi belongs to the Ghanchi community of oil-pressers in Gujarat. The muhurat of serial Diye Jalte Hain took place in Gandhinagar Monday with the Prime Minister’s eldest brother Somnath, better known as Sombhai Modi, as guest. The muhurat shot was of a young Teli boy, unsure of his roots. “His mother tells him about the community’s glorious past, its heroes Chandragupta, Ashoka and Modiji,” Maharashtra-based producer Suresh Chaudhari said हे जास्त होत नाहीये आता? यालाही कल्पनाविस्तार म्हणावे ना? http://indianexpress.com/article/india/india-others/tv-serial-on-emperors-and-modi/
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 09:26 नवीन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का चंद्रगुप्‍त मौर्य और सम्राट अशोक से क्या रिश्ता हो सकता है? चंद्रगुप्त मौर्य की मृत्यु लगभग 2300 साल पहले हुई ‌थी और सम्राट अशोक की लगभग 2200 साल पहले। ऐसे में प्रधानमंत्री का उन दोनों से क्या संबंध? दूरदर्शन पर जल्द ही एक ऐसा धारावाहिक प्रसारित किया जाएगा, जिसमें प्रधानमंत्री मोदी, मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य और सम्राट अशोक की जीवनियों को दिखाया जाएगा। दरअसल चंद्रगुप्‍त मौर्य, सम्राट अशोक और नरेंद्र मोदी एक ही समुदाय के हैं- घांची समुदाय। घांची गुजरात का समुदाय है और मुख्यतः तेल के कारोबार से जुड़ा है। धारावाहिक में ऐसी शख्सियतों की कहानी दिखाई जाएगी, जिन्होंने घांची समुदाय को गर्व करने का मौका दिया। 'दीये जलते हैं' नाम के धाराव‌ाहिक का मुहूर्त सोमवार को किया गया। नरेंद्र मोदी के बड़े भाई सोमभाई मोदी भी कार्यक्रम में मौजूद थे। हे बरे झाले नंतर दुरदर्शनने नकार दिला. अर्थात अडचण नाही, इतर आहेतच दाखवायला.
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 09:31 नवीन
दुरदर्शनने नकार दिला\ यातच सगळे आले. असो. आधी लिहिलेल्या प्रतिसादाला ही केवळ पुरवणी आहे. बाकी प्रतिसाद जसाच्या तसा वाचावा,
↩ प्रतिसाद: खंडेराव
स
सव्यसाची Wed, 05/20/2015 - 10:12 नवीन
माफ करा, पण इंडियन एक्स्प्रेस ने इथे खेद व्यक्त केला आहे आणि दूरदर्शन ने हे सांगितले आहे. (ठळक पणा माझा) May 7, 2015: Responding to the report ‘Now, a serial on PM’s community’ (May 5), which stated that Doordarshan had cleared a 128-episode serial Diye Jalte Hain on the oil-pressers community to which Prime Minister Narendra Modi belongs, Doordarshan Additional Director General Deepa Chandra has said “no such project is under consideration or has been approved by Doordarshan for any of its channel”. According to Chandra, the matter had been inquired into on the instructions of the Prasar Bharati CEO. “You may please note that Doordarshan traditionally does not grant approval for 128 episodes at one go and that too for a period of ten years continuously. The reporter has also not cared to check whether any approval letter has been issued by Doordarshan to the Producer or Director. Being a public service broadcaster, Doordarshan is simply being taken for granted through this news story,” Chandra said.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 10:30 नवीन
सरळच लिहिले आहे की माझ्या दुसर्या पोस्ट मधे. प्रश्न तो नाहीये, मृत्युन्जय यांनी जे लिहिलेय, तो जातियवाद वाढु देणे/ वाढु न देणे हे मोदींच्या हातात आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा कल्ट बनवणे, थेट अशोकाशी संबंध जोडणे, हा घोळ आहे. बघुयात कुठे पोहोचतिय ही मालिका आता.
↩ प्रतिसाद: सव्यसाची
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 09:29 नवीन
याला मी मुर्खपणा म्हणेन. भारतीय जनतेने असा मुर्खपणा याआधी बर्‍याच वेळा केला आहे. सचिन, अमिताभ, सोनिया आणि मोदींची मंदिरे बांधण्याचा जो दळभद्रीपणा पब्लिक करते त्याची कीव येते (मोदी मंदिर मोदींनी स्वतः बंद करायला लावले असे ज्ञात आहे. बाकिच्यांबद्दल माहिती नाही). मोदींनी जातीने लक्ष घालुन या "जात" प्रकरणातुन स्वतःची सुटका करुन घ्यावी आणि त्यांच्या आरत्या ओवाळणार्‍या लोकांपासुन दूर रहावे असे वाटते. असो. या प्रकरणात मोदींचा सहभाग ते जे लिहिले आहे तिथपर्यंतच मर्यादित असेल अशी अपेक्षा.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 10:32 नवीन
या प्रकरणात मोदींचा सहभाग ते जे लिहिले आहे तिथपर्यंतच मर्यादित असेल अशी अपेक्षा.
तोही कमी नाही हो, त्यांचा भाउ उद्घाटण करतोय. एका जिवंत व्यक्तीवर अशी मालिका बनवायला त्या व्यक्तिची परवानगी लागत असेल असा माझा होरा आहे.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
P
psajid Wed, 05/20/2015 - 08:33 नवीन
नुकतेच पेट्रोल दर वाढल्यानंतर "मोदीं परदेश दौरे करतात पण त्यांच्या फिरण्याचा पेट्रोल खर्च भारतीयांच्या डोईवर" अश्या आशयाची पोस्ट what'up वर वाचली. दुसरे म्हणजे नुकतेच चीन दौऱ्यामध्ये त्यांनी तेथे राहणाऱ्या भारतीयांसमोर भाषण करताना मी पंतप्रधान होण्यापूर्वी भारतातील लोकांना भारतीय असल्याची लाज वाटत होती मात्र आता या वर्षभरात त्यांना भारतीय असण्याचा अभिमान वाटतोय असे म्हणून देशाची लाज काढण्याचा प्रयत्न केला, देशाच्या अस्मितेवर घाव घालणे ही खरेतर शरमेची बाजू ! परदेश दौरे करू देत मात्र आपण सत्तेवर येण्यापूर्वी देश कसा दरिद्री होता आणि आता देशाची परिस्थिती कशी सुधारली आहे हे सांगून स्वतःचे ढोल बडवण्यात काय हासील ? आजही पूर्वीसारख्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत, रोजगाराची परिस्थिती कुठे सुधारली आहे ? आताही आमच्या आया-बहिणी कितीतरी किलोमीटरचे अंतर तुडवून पाण्यासाठी वणवण फिरतायत अश्यावेळी आपल्या पंतप्रधानांना परदेश दौरे करून विदेश पाहण्यापेक्षा भारताचा दौरा करून अगोदर भारत पहिला पाहिजे असे मला वाटते.
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 09:12 नवीन
"मोदीं परदेश दौरे करतात पण त्यांच्या फिरण्याचा पेट्रोल खर्च भारतीयांच्या डोईवर" अश्या आशयाची पोस्ट what'up वर वाचली. what'up नका वाचु मग,
↩ प्रतिसाद: psajid
क
कपिलमुनी Wed, 05/20/2015 - 09:50 नवीन
परराष्ट्र दौरा करणे योग्यच आहे . आपले परराष्ट्र खाते त्याबद्दल अधिक जाणते . पंतप्रधान म्हणून देशाने मोदींना निवडले आहे . ५ वर्षांनी त्यांचे मुल्यमापन जनता पुन्हा करेल . पण परदेशी जाउन देशाबद्दल वाईट उद्गार काढणे , पूर्वीच्या सरकारबद्दल टीका करणे हे सर्वथा चुकीचे आहे. या गोष्टीचे भक्त समर्थन करतात याचे आश्चर्य वाटते. पक्षीय अजेंडा वेगळा आणि जगात भारताचे प्रतिनिधित्व करणे वेगळे ! हे मोदींनी समजून घेतले पाहिजे . सामाजिक माध्यमांमधून याविषयी रोष प्रकट झाला आहे.
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 10:38 नवीन
ह्याचे समर्थन करणारे म्हणजे खरे शहाणे. माझ्या माहीतीतरी कोण्त्याही पंप्रने असे केलेले नाही. हे मोदी का करत आहेत?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सव्यसाची Wed, 05/20/2015 - 10:07 नवीन
बऱ्याच गोष्टीची चर्चा आधीच झाली आहे तरीही थोडेसे लिहितोच. परदेश दौरे कसे गरजेचे असतात वगैरे हे सगळे लोकांनी लिहिले आहेच. मी जरा वेगळा मुद्दा मांडतो. गेल्या वर्षभरामध्ये अश्या कोणत्या भेटी नरेंद्र मोदी दिल्या ज्या ते निवडून यायच्या आधीच ठरल्या होत्या?( जरी मनमोहन सिंग परत पंतप्रधान झाले असते तरी त्यांना या परिषदांना तरी हजेरी लावावीच लागली असती. ) -- ब्रिक्स परिषद, ब्राझील -- आसियान परिषद -- जी -२०, ऑस्ट्रेलिया -- युन जनरल असेम्बली, अमेरिका -- सार्क शिखर परिषद, नेपाळ -- Hannover Messe, जर्मनी जी-२० च्या परिषदेला गेल्यावर ते फिजी बेटांवर जाऊन आले जिथे ३३ वर्षानंतर आपले पंतप्रधान गेले आहेत. जर्मनी ला गेल्यानंतर फ्रांस आणि कॅनडा अश्या दोन भेटी ते घेऊन आले आहेत. कुणीही पंतप्रधान झाले असते तरी या भेटी देणे गरजेचेच होते. या वर्षीही सार्क शिखर परिषद, ब्रिक्स, जी-२० या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. या शिखर परिषदांना जाणे म्हणजे फिरायला जाणे असले गैरसमज लोक का करून घेताहेत हे काही कळले नाही. तीच गोष्ट इतर दौर्यांची पण.
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 10:35 नवीन
पण जे काय फॉरवर्डी फटाके वाजवले जातायत, ते इथे होउ नये, त्यासाठी फेबु आणि इतर माध्यमे आहेतच. आलेली माहीती खुशाल कशीही पुढे ढकलणा, एक मिनिटही अभ्यास न करता, याला माझा विरोध आहे.
↩ प्रतिसाद: सव्यसाची
म
मृत्युन्जय Wed, 05/20/2015 - 10:42 नवीन
धाग्याच्या शीर्षकावर तुमची प्रतिक्रिया आली नाही हो म्हणुन अंमळ गोंधळ झाला.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 05/20/2015 - 11:08 नवीन
दौरे करावेत का? हो, केलेच पाहीजेत. जागतिक संबंध राखणे आणि वाढवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. याचा अर्थ ते हे करणारे पहिलेच आहेत का? नाही. त्यांनी जगभरातील व्यासपिठावरुन पुर्विच्या सरकारांची बदनामी करावी का? नाही, त्याला औच्यित्यभंग म्हणतात. समर्थकांनी खोट्यानाट्या बातम्या फिरवाव्यात का, म्हणजे जे भक्त नाहीत ते भक्त होतील? नाही. भारतात ६० वर्षात काहीही झाले नाही, आणि मोदींनी एका वर्षात ते केले, हे खरे आहे का? नाही. मागच्या सरकारने माध्यमांचा कमी वापर केला, हे फारच करत आहेत. मी आकाशवाणी एसेमेस सेवेचा वापरकर्ता आहे. आधी, पंप्र काय करत आहेत हे आठवड्यातुन एकदा कळायचे, इथे दिवसातुन २ मेसेज तरी येतात.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ग
ग्रेटथिंकर Wed, 05/20/2015 - 12:28 नवीन
खंडेरावांचा प्रतिसाद एकदम तडका प्रतिसाद आहे.
आ
आजानुकर्ण Wed, 05/20/2015 - 15:13 नवीन
मोदी काहीही म्हणोत. १६ मे पूर्वीही भारतीयांना भारताचा अभिमान होता असे दिसते. दुवा एक शक्यता अशी आहे की १६ मे पूर्वी परिधानमंत्र्यांना व्हिसे वगैरे मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे लाज वाटण्याची माफक शक्यता असू शकते. (फिरेंद्रशेठच स्वतःला कायम गुजराती, गुजराती म्हणवून घेत असतात. आणि गुज्जुला दिला विसा, गुज्जु घुसले भसाभसा अशी म्हण आहेच. या प्रकाराचा व्हिश्याच्या मान्यतेत काही संबंध आहे काय? ते एक असो. ) मात्र आता पदावर अाल्यावर तशी अडचण येत नसल्याने त्यांच्या दृष्टिकोणात भारताविषयीच्या प्रतिमेत फरक पडला आहे असे दिसते. - भारताची लाज न वाटणारा एक सामान्य भारतीय नागरिक
स
संदीप डांगे Wed, 05/20/2015 - 18:02 नवीन
हे काय ऐकतोय मी...? भारतीयांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो..? कधीपासून...? आम्हाला तर जिथे तिथे भारताबद्दल घृणा वाटणारे भारतीय दिसत होते कालपरवापर्यंत... अगदी थर्ड वर्ल्ड टॉयलेट वैगेरे म्हणण्यापर्यंत मजल जात होती. बाकी इकडे तिकडे पिंका टाकणारेही दिसत होतेच. तेच पंप्र बोलले तर रिवर्स गीअर...? या भारतीयांचं काही खरं नाही भाऊ... उद्या हे पाकिस्तानचाही अभिमान वाटतो म्हणून सांगितील.. 'वयम पंचाधिक शतम' चा दाखला देऊन...
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विकास Wed, 05/20/2015 - 19:51 नवीन
भारताची लाज न वाटणारा एक सामान्य भारतीय नागरिक अगदी सहमत आणि असेच मी देखील म्हणतो. पण ते तुमच्याआमच्यासारख्या सामान्यांचे झाले. पण असमान्यांचे काय?

I feel ashamed to call myself an Indian: Rahul Gandhi

↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 05/20/2015 - 20:09 नवीन
भारताच्या पंतप्रधानांनी परदेशात असे वक्तव्य करणे आणि इतरांनी भारतात असताना म्हणणे यात बराच फरक आहे असे वाटते. बाकी "मंगोलियाच्या दौर्यादरम्यानही त्यांनी माझ्या पक्षाचे चिन्ह आणि तुमच्या राष्ट्रीय चिन्हात कमळ असल्याने या देशाशी माझा वैयक्तिक संबंध निर्माण झाला आहे असे म्हटले होते. " असेही वाचले. परदेशात असताना भाजपाचे प्रतिनिधी नसून सर्वच नागरिकांचे प्रतिनिधी आहोत इतपत जाणीव निदान पंतप्रधानांना असावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 05/20/2015 - 21:36 नवीन
परदेशात असताना भाजपाचे प्रतिनिधी नसून सर्वच नागरिकांचे प्रतिनिधी आहोत इतपत जाणीव निदान पंतप्रधानांना असावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटत नाही. अहो ते फिरेंद्र असतील नरेंद्र नसावेत! ;) असो. याच ट्रोलसंप्रदायांच्या (तुम्ही नाही!) धाग्यात आधी म्हणल्याप्रमाणे, मोदींच्या जागी मी पंप्र असतो तर असे बोललो नसतो. पण त्यामुळेच ती जागा मिळत नसावी मला. :( त्यामुळे मोदींनी नक्कीच सर्व भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून वागले पाहीजे असे म्हणेन. पण त्याहूनही कठीण प्रश्न मला पडतो, मोदी विरोधक, मोदींना त्यांचे प्रतिनिधी आणि पंतप्रधान समजतात का?
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/20/2015 - 15:48 नवीन
मिपावर आलं-लिंबु-आवळा सुपारी वगैरेच्या व्यापार्‍यांना सुवर्णसंधी आहे. ह्या अश्या ओकार्‍या काढणार्‍यांचा इलाज पण होईल आणि तुम्हाला पैसा पण मिळेल क्काय??
प
पिंपातला उंदीर Wed, 05/20/2015 - 17:27 नवीन
नाही म्हणजे मूळ मुद्द्याना उत्तर न देता विरुध्द मत मांडणाऱ्या ना ओकार्‍या काढणारे वैगेरे म्हणणे म्हणजे स्वतःची काही मत नसण्याचे आणि भक्त जे म्हणतील ते डोळे झाकून आपल्याला आवडते आणि म्हणून त्या सुंगधी ओकाऱ्या वाटणे याला काय म्हणावे . मध्ये मांडलेल्या अनेक मुद्यांना तुमच्यासारख्या लोकांकडून उत्तर मिळतील अशी अपेक्षा नाहीच
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/21/2015 - 02:31 नवीन
उत्तरं दिली तरी कुठलाही पक्षीय संबंध नं लावता कळवुन घ्यायची वॄत्ती आहे का? आंतराष्ट्रीय संबंध म्हणजे काय गल्लीबोळातल्या मॅचचे स्कोर सेटल करण्याएवढं सोपं वाटलं का? तिथे जातीनी उपस्थित रहायलाचं हवं की. सत्ता कुठल्याही पक्षाची असु देत ह्या गुंतवणुकीचे परिणाम दिसायला वेळ लागणारचं आहे. पण किमान त्याची फळं आपल्याला नाही तरी पुढच्या पिढीला तरी चाखायला मिळतील हे लक्षात घ्या. असो. त्यामुळे सारासार विचार नं करता मतं लिहिणं टाळा. शेवटचा प्रतिसाद ह्या धाग्यावर. हल्ली त्रास करुन घेत नाही. रच्याकने... आवळ्याला हिंग लावलं तर मळमळ लवकर कमी होते असं म्हणतात,
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ख
खटासि खट Wed, 05/20/2015 - 19:27 नवीन
बरं ते जाऊ द्या. सोसायटीचा अध्यक्ष झाल्यावर शेजारच्या सोसायटीचा दौरा केला. मला घ्यायला या सोसायटीचे अध्यक्ष फाटकात आले होते. त्यांच्या क्लब हौसात माझे भाषण ठेवले होते. माझ्या भाषणादरम्यान खट खट खट असा जयघोष चालला होता. विरोधक टेरेस वर दडून बसले होते. चडफडत होते. आमच्या सोसाटीतल्या बितंबातमी मंडळाने स्मार्टफोन मधल्या मोबाईल मधल्या कॅमे-याने चलचित्रण चालू ठेवले होते. या सर्व वातावरणाचा परिणाम होऊन मी बोलून गेलो, पूर्वी जेव्हां आमच्या सोसायटीतले लोक तुमच्या सोसायटीत कामानिमित्त यायचे तेव्हां स्वतःच्या सोसायटीचे नाव सांगताना ते लाजत असत, आज त्यांच्या माना उंचावलेल्या आहेत. मला थांबवत त्या सोसायटीचे अध्यक्ष म्हणाले दहा लाखाचं कर्ज पण देणार का ? यावर नकळत पुणेरी सवयीने पैसा काय आमच्या पिताश्रींचा आहे का असं बोलून गेलो...
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/21/2015 - 02:23 नवीन
खट्याक =))
↩ प्रतिसाद: खटासि खट
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/21/2015 - 06:27 नवीन
हाहाहाहहा :)
↩ प्रतिसाद: खटासि खट
H
hitesh Wed, 05/20/2015 - 20:10 नवीन
फेसबुक फॉर्वर्ड्स बहुत दिनों पहले की बात है ( 369 दिन पहले की ) मैं एक देश में रहा करता था. मुझे अपने आप पर बहुत शर्म आती थी कि मैं इस देश में पैदा हुआ. उस देश के राजा बहुत लापरवाह और ढीले ढाले थे. छोटी छोटी रियासतों के मुखिया अपनी मनमर्जी करते थे. समुदाय विशेष को रियासतदारों से डर लगता था, लोग भयभीत थे. पूरा देश भीख माँगकर गुज़ारा करता था. जब भी कभी मैं विदेश जाता, मुझे वहाँ मुहँ छुपाना पड़ता था, लोग मुझे देखना पसंद नहीं करते थे, यहाँ तक कि लोग मुझे अपने देश में घुसने तक नहीं देते थे. और फिर आई सोलह मई की वह अलौकिक तारीख़, राजगद्दी पर देवता स्वयं विराजमान थे. अचानक जिन नदियों में निखालिश मैला बहता था वहाँ दूध उफना रहा था. पूरा देश खालिश दूध की चाय पी रहा था. जिस देश ने एक दिन मुझे अपने यहाँ घुसने से मना कर दिया था, उसी देश का राजा घुटनों के बल चलता हुआ हमारे राजा से मिलने पहुँचा था. आज विश्व के सारे देश मिलकर भी मेरे देश के मुकाबले घुइंयाँ लग रहे हैं. छब्बीस इंच का मेरा सीना अचानक छप्पन इंची हो गया था ( जाहिर है जब तक मेरा ख़ास सूट सिलकर नहीं आ गया, मैं अर्धनग्न अवस्था में ही रहा ) मैं हैरान था साहेब, अगले दिन मेरे बैंक खाते में पंद्रह लाख रुपये घुस गए थे. दरवाजे पर बुलेट ट्रेन खड़ी थी. स्वर्ग सिधारे मेरे पुरखे आज मेरे सपनों में आते हैं, यहाँ के किस्से सुन - सुन कर अपना सर पीटते हैं. वो तो स्वर्ग से वापस आने को भी तैयार बैठे हैं. अब जा कर महान हुआ है मेरा देश और मुझे गर्व है अपने देवता तुल्य राजा प
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/21/2015 - 02:35 नवीन
चिनार ह्यांनी चेपू वर फिरणारा संदेश मिपावर आपल्या नावावर येथे खपवला ते पाहून लखू रिसबूड आजही आपल्यात हयात आहे ह्याचे सखेद आश्‍चर्य वाटते. बहुतेक मिपाकर हा चेपू वर आहे तरीही असे धाडस करायला ... असो बाकी मोदींच्या परदेश दौर्यांवर अजून ओविसी घसरला नाही आहे अजून राजदीप बरखा सुद्धा बहुतेक ह्या मुद्यांवर रान माजवत नाही आहेत मोदींच्या प्रत्येक परदेश दौर्यात तेथील स्थानिक प्रसारमाध्यमे भारताविषयी सकारत्मक चर्चा करीत आहेत जर्मनीत मेक इन इंडिया ने भारावलेले वातावरण मी स्वतः अनुभवले आहे मंगोलिया च्या बाबतीत प्रसार माध्यमांनी च´ध चा मा केला आहे. मदत भारताने अफगानिस्तानला आजपर्यत २ पेक्ष्या जास्त अब्ज रुपयांची केली आहे त्यातून रस्ते दवाखाने आणि इतर उपयोगी गोष्टी तेथे बांधण्यात आल्या आहेत त्याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध एल नाही माझ्य्मते असा विरोध कोणत्याही विरोधी राजकीय पक्षाने मंगोलिया बाबत केला नाही ,
च
चिनार गुरुवार, 05/21/2015 - 05:31 नवीन
चिनार ह्यांनी चेपू वर फिरणारा संदेश मिपावर आपल्या नावावर येथे खपवला ते पाहून लखू रिसबूड आजही आपल्यात हयात आहे ह्याचे सखेद आश्‍चर्य वाटते. बहुतेक मिपाकर हा चेपू वर आहे तरीही असे धाडस करायला मूळ संदेश चेपू वरचा आहे हे मान्य. तो मी मराठी मध्ये भाषांतरित केला. याचा अर्थ मी तो माझ्या नावावर खपवला असं होत नाही. तो केवळ एक प्रतिसाद म्हणून वाचावा. आणि त्यातील मुद्द्यावर चर्चा करावी. उगाच लखू रिसबूड वैगरे म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. मी माझ्या नावावर प्रतिसाद खपवून "आता सगळ्यांनी माझं कौतुक करा (किंवा शिव्या घाला)" असं कुठेही म्हटलेलं नाही. जर चेपू वरचा संदेश इथे देणं हे चौर्य होत असेल तर कोणत्याही प्रतिसादामध्ये अन्य कुठल्याही जालाची लिंक सुद्धा देऊ नये !
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/21/2015 - 11:48 नवीन
तु्म्हाला मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते कारण सादर लिंक मध्ये हा मजकूर हजारो लोकांनी चेपू वर शेअर केल्याचे दिसत होते. मजकूर अनुवादित केला म्हणजे त्याचा मालकी हक्क आपसूकच प्राप्त होत नाही ,असे आते तर काळे काकांनी नुकतेच अनुवादित केलेले पुस्तक स्वताच लिहिले असा दावा करून प्रकाशित करू शकले असते स्वतः अभ्यास करून वाचन करून लिखाण केले तर त्याचे कौतुक होईल , उगाच दुसर्याचा बौद्धिक संपदा आपल्या नावावर खपविण्याचा रिसबूड पणा केला तर टीका होणारा लखू रिसबूड हे नाव नाही तर एक प्रतिरूप आहे. ह्यापुढे अश्या लिखाणाखाली अनुवादित किंवा चेपू वरून साभार असे लिहिले तर ते लिखाण एक प्रतिसाद म्हणून नक्कीच वाचता येईल. मिपावर असे सभ्य मिपाकर आवर्जून लिहितात. बाकी आपण आणि मोदी समर्थक त्यामुळे मला अधिक वादात शिरायचे नाही , एक सल्ला देतो जर तुम्ही मिपावरील एखादे लिखाण त्या इंग्रजीत भाषांतरित केले व त्याखाली मूळ मिपाकाराचे नाव लिहिले नाही तर तो तुमच्यावर कॉपी राईट च्या संबंधित गुन्हा दाखल करू शकतो , काळे काकांनी त्यांचे पुस्तक अनुवादित करण्यासाठी मूळ लेखकाची रीतसर परवानगी घेतली होते हे आवर्जून येथे नमूद करतो.
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार गुरुवार, 05/21/2015 - 12:12 नवीन
ह्यापुढे अश्या लिखाणाखाली अनुवादित किंवा चेपू वरून साभार असे लिहिले तर ते लिखाण एक प्रतिसाद म्हणून नक्कीच वाचता येईल. मिपावर असे सभ्य मिपाकर आवर्जून लिहितात. हो ..ही चूक झाली आहे हे मान्य.. स्वतः अभ्यास करून वाचन करून लिखाण केले तर त्याचे कौतुक होईल , उगाच दुसर्याचा बौद्धिक संपदा आपल्या नावावर खपविण्याचा रिसबूड पणा केला तर टीका होणारा लखू रिसबूड हे नाव नाही तर एक प्रतिरूप आहे. दुसर्याची बौद्धिक संपदा मी माझ्या नावावर खपवलेली नाही आणि खपवणार नाही. त्याची मला गरज नाही. आणि हा लखू रिसबूड आहे तरी कोण ? बाकी आपण आणि मोदी समर्थक हो..आहोत ! जय हिंद ! जर तुम्ही मिपावरील एखादे लिखाण त्या इंग्रजीत भाषांतरित केले व त्याखाली मूळ मिपाकाराचे नाव लिहिले नाही तर तो तुमच्यावर कॉपी राईट च्या संबंधित गुन्हा दाखल करू शकतो , ही वेळ येणार नाही. काळे काकांनी त्यांचे पुस्तक अनुवादित करण्यासाठी मूळ लेखकाची रीतसर परवानगी घेतली होते हे आवर्जून येथे नमूद करतो. काळे काका मध्ये कुठून आले कळलं नाही . कशाला त्या सदगृहस्थाला मध्ये खेचताय ? बाकी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो..काळे काकांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकाच्या विषयावरच आधारित असलेले दुसरे एक पुस्तक मी भाषांतरित केले आहे. पण रीतसर परवानगी नसल्यामुळे आजवर कुठेही प्रकाशित केले नाही .
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
क
काळा पहाड गुरुवार, 05/21/2015 - 12:15 नवीन
आणि हा लखू रिसबूड आहे तरी कोण ?
http://www.misalpav.com/user/3200
↩ प्रतिसाद: चिनार
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 05/21/2015 - 15:53 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: चिनार
न
निनाद मुक्काम … Fri, 05/22/2015 - 01:12 नवीन
चिनार लखू रिसबूड पु ल देशपांडे ह्यांचा व्यक्ती आणि वल्ली मधील मानसपुत्र . मिपावर कोणितर त्यांचे नाव धारण केले आहे असेच नाव आमच्या सोकाजी ने सुध्धा ठेवले आहे. बाकी रीतसर परवानगी घेऊन लवकरच आपले पुस्तक प्रकाशित करा , वाचायला आवडेल. आपल्याशी व्यक्तिशः वाद नाही ,
↩ प्रतिसाद: चिनार
न
निनाद मुक्काम … Fri, 05/22/2015 - 01:24 नवीन
मुळात परदेशी दौर्यांच्या वरून मोदींवर टीका होतांना बीबीसी ने वेगळीच माहिती पुरावे देऊन सांगितली आहे , ह्यातून मोदींची हुशारी दिसून येते अगदी मोदी समर्थकांना सुद्धा सुषमा स्वराज ह्यांनी मोदींच्या पेक्षा जास्त परदेशी दौरे परराष्ट्र मंत्री ह्यां नात्याने केल्याचे वाचून नवल वाटेल. ह्यामुळे मोदिनी स्वराज ह्यांना नामधारी मंत्री बनवले आहे ह्या आरोपाला सुद्धा उत्तर मिळाले आहे. चाणाक्ष देशी मिडीयाला ह्या बद्दल माहिती असू नये
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 05/21/2015 - 08:11 नवीन
ऑ,लिंक देणे आणि चेपुवरचे व व्हॉट्सापवरचे बिंडोकी प्रतिसाद ईथे देणे यात फरक आहे.
L
lakhu risbud गुरुवार, 05/21/2015 - 08:19 नवीन
या चर्चेत माझे नाव आणण्याचे प्रयोजन समजले नाही.
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 05/21/2015 - 09:45 नवीन
ते चिनारच सांगु शकतील
प
प्रतापराव गुरुवार, 05/21/2015 - 14:17 नवीन
ग्रेटथिंकर कृपया मोदींविरुद्ध असले लेख टाकू नका.
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/21/2015 - 17:04 नवीन
भाजपा व मोदींना मतदारांनी ५ वर्षासाठी निवडून दिले आहे,मोठ्या जनदेशाने.तेव्हा सरकारच्या वा नरेंद्रच्या प्रत्येक कृतीचा,निर्णयाचा उठसूठ कीस पाडू नये असे ह्यांचे मत. नको तेवढे खोलात शिरायचे,चित्रविचित्र संख्या,आकडेवारी मांडायची,त्यांचे गोषवारे..पाश्स्चिमात्यांची ही पद्धत भारतातही रूढ होऊ लागली आहे.
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/21/2015 - 17:13 नवीन
पहिल्यांदा माईंशी सहमत.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ह
हाडक्या गुरुवार, 05/21/2015 - 17:21 नवीन
ह्या ह्या ह्या.. हम कब से कह्य रह्या है.. ;)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रतापराव गुरुवार, 05/21/2015 - 18:43 नवीन
प्रतापराव खरच मोदींविरुद्ध लेख टाकू नका आधीच मोदींना मत देवून पस्तावलोय. त्यात तुम्ही आमच्या दुखावर डागण्या देताय. तुमच्या प्रश्नाचे नि खंडेराव ह्यांच्या प्रतिसादाचे उत्तर आम्हा कोणाकडेही नाही हि वस्तुस्तिथी आहे. परंतु गिरे तो भी टांग उपर अशी आमची अवस्था झालीय.देशातला शेतकरी मदतीची वाट बघत असताना ज्या देशाचे कधी नाव एकले नाही तो देश मदत घेवून जातोय नि आमचा शेतकरी मोदींच्या नऊ लाखाच्या कोट कडे नुसता बघत राहतोय. नका देवू हो आमच्या दुखाला डागण्या...
क
काळा पहाड गुरुवार, 05/21/2015 - 18:51 नवीन
प्रतापराव खरच मोदींविरुद्ध लेख टाकू नका
प्रतापराव प्रतापरावांनाच बोलतायत?
↩ प्रतिसाद: प्रतापराव
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/22/2015 - 02:35 नवीन
ड्वायडी असावा.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
ग्रेटथिंकर Fri, 05/22/2015 - 08:17 नवीन
प्रतापरावांना काहितरि वेगळेच नाव लिवायचे असावे ,पण त्यांनी चुकून स्वतःचेच नाव घेतले.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा