Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो . मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले. मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड ! यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे. आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =)) mi - 'मी' अतिअवांतर : मीनिमॅलिझम
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

इथे मी एकटा जेवढा दंगा करतो तेवढा दंगा सगळ्या अनाहिता मिळुनही करत असतील असं वाटतं नाही. अनाहिताच्या चावडीवर काय चालतं ते माहित नाही =))

अनाहिता या मधमाश्या आहेत. ट का सांभाळुन रे... पोळ्यावर दगड मारण्याचे उध्योग करतोयस तू ! नको तिकडे डंख बसायचा हो... ;) आधीच सावध करतोय बघ ! या पेक्षा चांगली गुबगुबीत गालांची "पाखरे" शोधण्यात वेळ सत्कारणी लाव ! प्रेमाचा "मध" चाखायची सोय होइल बघ ! ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

चायला इथे कोणालाच समज्ले नै मला काय म्हणायचे होते...मला म्हणायचे होते की अनाहितांइतकी एकी मिपावरच्या दुसर्या कोणत्याच कंपू/ग्रुप मध्ये नाही...अनाहितांमध्ये एकमेकींबद्दल कदाचित काही रुसवे फुगवे असतील तरीही "बाहेरचा" कोणी अनाहितांना डिवचायला आला तर मग त्याची खैर नै :)

हनी ट्रॅप
हा हा हा ... की फनी ट्रॅप.. बादवे, टका नि कॅप्टन सारख्या दिग्ग्जांबरोबर आमचे नाव जोडले गेल्याने धन्य जाहलो आहे.. ;) तरी आम्हास बाजूलाच ठेवावे.

बादवे, टका नि कॅप्टन सारख्या दिग्ग्जांबरोबर आमचे नाव जोडले गेल्याने धन्य जाहलो आहे.. ;)
एवढं उपद्रवमुल्य वाढलयं हे ऐकुन ड्वॉळे पाणावले की रे....

तुझ्या मिपा-जन्मापासूनच आमाला हे ठौक होतं की हे बेणं लई किडे करणारे.. ;) माई मोड ऑन आज हे मिपावर असते तर त्यांना तुझा कोण अभिमान वाटला असता रे चिमण्या.. माई मोड ऑफ

अरारारा.. स्रुजा सारख्या भले मोठ्ठे सेन्सिबल (की तसा आव आणून) प्रतिसाद देणार्‍या आयडीस ही असा मोह व्हावा हे पाहून, असं वाटतंय की.. ते पूर्वीचं मिपा राह्यलं नै बगा..

आव आणुन ?? आवरा !!! एकदा म्हणायचं मिपा साचलं, बदलायला गेलं की म्हणायचं मिपा पूर्वीसारखं राह्यलं नाय बघा.. लय घोळ आहे राव. आणि इथे या धाग्यावर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;)

आव आणुन ?? आवरा !!! स्रुजा - Fri, 22/05/2015 - 20:23 आव आणुन ?? आवरा !!! एकदा म्हणायचं मिपा साचलं, बदलायला गेलं की म्हणायचं मिपा पूर्वीसारखं राह्यलं नाय बघा.. लय घोळ आहे राव. आणि इथे या धाग्या
वर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;) उत्तर द्या तुम्ही अस विचार करु शकता हे जाणवलेले म्हणुनच तसा प्रतिसाद लिहिलेला ;)

मी गरीब बिचारी आणि लहान दोन्ही आहे. आणि मला फार त्रास होतोय. कधी सेन्सिबल असल्याचा आव आणा कधी विनोदी.. बुद्धीवर फार ताण यायला लागला बाबा..

प्रगो ह्यांनी अतिशय संयमित भाषेत, "चित्रकला" ही पण एक भाषाच आहे, "मी"चे मन व्यक्त केले आहे. खरे तर "प्रगो" ह्यांनी वर्तुळ, षटकोन, त्रिकोण किंवा इतर कुठलाही कोन न वापरता, फक्त चौकोन आणि त्यातूनही, चौरसच घेतला आणि इथेच त्यांनी ९०% यश संपादन केले. प्रथम आपण चौरसाचा अभ्यास करू. मुळात चौरस तयार होतो तो ४ बिंदूंपासून. आणि हे ४ बिंदू विविध असू शकतात. कौटुंबिक जीवनात ह्या चौरसाचा खूप सहभाग असतो. आपण, आपला जोडीदार आणि त्या जोडीदाराचे माता-पिता, हा पण एक चौरसच. आपण आणि आपले कॅरमचे किंवा ब्रिजचे जोडीदार हे पण चौरसाचेच भाग. आपण, आपला जोडीदार, आपली २ मुले, ह्या पासून पण चौरस बनतो.(ज्यांना एकच मुल असते, अशा लोकांनी त्रिकोणाचा अभ्यास करावा आणि ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांनी दुसरा बिंदू शोधावा, असे आमचे गुरु म्हणतात.) पण ह्या जगातला, सगळ्यात महत्वाचा चौरस म्हणजे....."आपण, आपले शिक्षण, आपला बॉस आणि आपला पगार हा पण चौरासाच एक भाग." तुम्हाला योग्य वाटेल तो चौरस घ्या, सध्या तरी "मी" वेगळा चौरस घेतला आहे. "मी, एकच आय.डी. असणारे मिपाकर, मिपाकरांच्या कलाक्रुती आणि डू.आय.डी." हे आमच्या चौरसाचे मुख्य बिंदू. आता एकदा आपल्या चौरसाचे प्रमुख बिंदू ठरल्यानंतर, त्यात रंग भरणे, हे आलेच. आणि उरलेल्या १०%चे काम रंगाने पुर्ण केले. प्रगो, ह्यांनी नेमक लाल रंग निवडून , ते १०% साध्य केले आहे. एखाद्या क्रांतीचे प्रतिक म्हणजे, लाल रंग. तस्मात आम्ही पण ह्या डू.आय.डींच्या प्रतिसादाला किंवा लेखाला अनुल्लेखाने मारत असतो. हीच आमची लोकशाही क्रांती. आम्ही जसा आमचा चौरस ओळखला, तसाच तुम्हाला पण तुमचा चौरस ओळखता यावा, अशी आमच्या गुरुंची इच्छा आहे.

महीनाभराच्या मौखिक मौनानंतर, माझाळलेले मुक्तक ! माझ्यामुळे मुखवट्याचा माज, माझेच माठ मस्तक मंत्रमुग्ध मह्फिल्,माझेपणाचे मनात मीच मनरंग !! मीपणाचे महिरपीचा मेल्याने (प्रगोने) केला मुखःभंग !!!
  • मोकाट मी माझा या माझोळी संग्रहातून साभार.
  • फक्त एकच अक्षर ने सुरु करता आले नाही त्या बद्दल माफी
  • माझोळी हा चारोळीशी साधर्म्य असला तरी त्यात "मी"पणाचा अभाव नाही.
मझाकार माखु.