Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भ्रष्टाचाराचा भस्मासूर

न
नांदेडीअन
Fri, 05/22/2015 - 12:24
🗣 146 प्रतिसाद
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही. त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत. कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती. सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ? सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ? राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ? Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ? माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे. असे का बरे ? आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ? भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ? AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ? निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ? व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?

प्रतिक्रिया द्या
44926 वाचन

💬 प्रतिसाद (146)
व
विनोद१८ Tue, 05/26/2015 - 12:16 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-withdraws-case-from-delhi-hc-against-trial-court-decision-sending-him-to-jail-in-a-defamation-complaint-1106726/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 05/26/2015 - 12:58 नवीन
मानहानीची केस गडकरींनी दाखल केलीये हो. केजरीवाल कशी माघार घेऊ शकेल ? ही केस अजूनही संपलेली नाहीये. तसे असेल तर सोप्या भाषेत समजावून सांगा हो मला. पाया पडतो तुमच्या. की कट्टी करू तुमच्याशी ? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
प
पिंपातला उंदीर Mon, 05/25/2015 - 04:56 नवीन
जेठमलानी यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत . हे बघा http://www.firstpost.com/politics/jethmalani-slams-gadkari-for-taking-bjp-on-path-of-suicide-537064.html http://www.ibnlive.com/news/india/jethmalani-slams-sick-bjp-478176.html पक्षांतर्गत टीका हि पक्षाच्या व्यासपीठावर (पक्षाची बैठक ) चार भिंतीच्या आंत करायची असते माध्यमामध्ये नाही . केजरीवाल केस हरला ? कुठल्या जगात ? कुठल्या समांतर विश्वात ही घटना घडली असली तर कल्पना नाही . काही पुरावा किंवा लिंक द्या पाहू . अवांतर -बाकी सुसु ने वाजपेयी यांच्यावर कसली अभद्र टीका केली आहे याची कल्पना आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
प
पिंपातला उंदीर Sat, 05/23/2015 - 17:31 नवीन
भाजप ला पण त्यांचे आरोप खरे वाटत नाहीयेत खरे च्या जागी 'खोटे ' असे वाचावे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 05/23/2015 - 18:23 नवीन
भ्रष्टाचाराचा भस्मासूर म्हणजे काँग्रेस !! पंधरा लाख कोटींचा कोळसा घोटाळा,पावणेदोन लाख कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा,सत्तर हजार कोटींचा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा अशी सणसणीत उदाहरणे देता येतील !
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 05/25/2015 - 14:28 नवीन
कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा होताच, त्यात वाद नाही, पण हे ७०,००० कोटी कुठुन आले? हा एकून खर्च होता. सगळा घोटाळा असेल तर गेम्स काय फु़कट झाले का? Of the total Games- related spending on improving Delhi's infrastructure, Rs 5,700 crore has been allocated for flyovers and bridges alone, Rs 650 crore for stadiums, Rs 16,887 crore for the Delhi Metro expansion and Rs 35,000 crore for new power plants. बाकी, notional value विषयी बघा जरा. इतरही दोन आकडे चुकीचे आहेत. CAG चा रिपोर्ट कुठेही कोळसा खाण वाटपात पैसे खाल्ले असे म्हणत नाही, फक्त वाटप अजुनही नीट करता आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
N
NiluMP Mon, 06/29/2015 - 17:59 नवीन
आणि कळस म्हणजे यातील एकही पैसा कोणत्याही सरकारला परत सरकारी तोजरीत आणता आला नाही. अश्या प्रकारे पैसा गायब करण्याचा चमत्कार फक्त राजकरणी करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
प
पिंपातला उंदीर Sun, 05/24/2015 - 04:51 नवीन
तंबी दुराई यांचा अच्छे दिन वरचा जबरी टेक वाचा . Its worth http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47398257.cms
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 05/25/2015 - 14:30 नवीन
मस्त लिहिलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
इ
इरसाल Mon, 05/25/2015 - 12:34 नवीन
मग काय ठरलं ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 13:24 नवीन
सगळ्यांना हक्काचे घर मिळेपर्यंत थांबायचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
न
नांदेडीअन Mon, 06/29/2015 - 12:56 नवीन
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?
हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते. गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे. http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/one-more-accused-suspected-death-in-vyapam-scandel/articleshow/47853696.cms
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Mon, 06/29/2015 - 13:38 नवीन
हे भयानक आहे. राज्यसरकार, राज्यातला विरोधी पक्ष, एनजीओ, केंद्रातलं सरकार, केंद्रातले विरोधी पक्ष कोणंच कसं काही बोलत नाही या बद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
म
मृत्युन्जय Mon, 06/29/2015 - 15:44 नवीन
काँग्रेस याबाबत निदर्शने करत आहेच. यावर आधीही बातमी येउन गेली होती. त्यावेळेसपर्यंत ८ लोक गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 08:59 नवीन
हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते. गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे. http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/one-more-accused-suspected-death-in-vyapam-scandel/articleshow/47853696.cms

व्यापमं आरोपियों की मौत की CBI जांच जरूरी नहीं । - गृहमंत्री बाबुलाल गौर http://www.samaylive.com/regional-news-in-hindi/madhya-pradesh-news-in-hindi/319034/vyapam-deaths-natural-says-mp-minister-rejects-probe-demand.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ल
लिओ Mon, 06/29/2015 - 15:41 नवीन
या धाग्यावर भ्रष्टाचाराची पर्‍करणे व त्यावर चर्चा सुरु आहे. फरक पडणार असेल अथवा नसेल तरी, भारतीय संरक्षण दलाबद्दल अथवा भारतीय संरक्षण दलात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आपले मत व्यक्त करण्याएवजी भ्रष्टाचारासहीत अथवा भ्रष्टाचाराशिवाय संरक्षण दलास योग्य ती व आवश्यक युद्धसाहित्य मिळावी यासाठी प्रार्थना करा. सध्या याची जास्त गरज आहे. (संरक्षण दलाच्या गरजा हा स्वतंत्र धागा होउ शकतो. ). राफेल विमान खरेदीचा या धाग्यात उल्लेख झाला म्हनुन मी माझे हे वैयक्तिक मत मांडत आहे. जाणकारांनी कोणत्याही सरकारवर टीका अथवा कौतुक वर्षाव न करता भारतीय संरक्षण दलाच्या गरजेवर खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 16:34 नवीन
हे तर एखादया चित्रपटातल्या कथानकात शोभेल असे माणस खरोखर मारत सुटलेयत.. जे काहि बाहेर निघेल चौकशी झालिच तर ते फार भयानक असेल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 06/29/2015 - 17:21 नवीन
अ‍ॅक्च्युअल उघड झालेल्या हत्या इतक्या आहेत. बाकि पडद्यामागे किती बळी गेले असतील, किती मानसीक छळ झाला असेल कोण जाणे :(
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 07/08/2015 - 18:10 नवीन
आज व्हॉट्सअ‍ॅप वर एक उपरोध वाचला: There is only one way to kill Dawood Abraahim now..Add his name too in Vyapam scam कदाचीत त्याच्या पुढे असे म्हणता येईलः जर व्यापम प्रकरण बंदच करायचे असेल तर "साहेबांचे" नाव घाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
पुण्याचे वटवाघूळ Tue, 06/30/2015 - 07:14 नवीन
व्यापम प्रकरणात अनेक साक्षीदार्/संशयित संशयास्पदपणे गेले हे नक्कीच धक्कादायक आहे. याची चौकशी होऊन गरज असल्यास शिवराजसिंगांवर कारवाई व्हायला हवी. अहो नांदेडियनराव, तुम्ही म्हणता त्या मोदीभक्तांमध्ये आणि तुमच्यासरख्या केजरीच्या गुलामांमध्ये हाच फरक आहे. तथाकथित मोदीभक्तांपैकी बरेचसे व्यापम प्रकरणातील एकामागोमाग एक लोक मरत आहेत त्याला धक्कादायकच म्हणतील.पण केजरीच्या गुलामांपैकी फारच थोडे गजेन्द्रसिंग प्रकरणी काहीच काळेबेरे आहे हे मान्य करतील. आआपच्या बैठकीत बाऊंसर आणले होते आणि एकाची हाडे मोडली तर त्याला 'फेविकॉलने चिकटवलेली हाडे' असे तुम्हीच की अन्य कुणा आपटार्डने म्हटले होते. हाच मोदीभक्तांमध्ये आणि केजरीच्या गुलामांमध्ये उर्फ आपटार्डांमध्ये फरक आहे.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 08:32 नवीन
तुम्ही म्हणता त्या मोदीभक्तांमध्ये आणि तुमच्यासरख्या केजरीच्या गुलामांमध्ये हाच फरक आहे.
झाडावर उलटं लटकण्यात आयुष्य गेलं तुमचं. साहजिक आहे, रक्तप्रवाह सुरळीत नसेल मेंदूपर्यंत. :)
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 06/30/2015 - 08:52 नवीन
गुरित्वाकर्षणाने रक्त डोक्यात साचून साकळले असेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पुण्याचे वटवाघूळ Tue, 06/30/2015 - 08:59 नवीन
मुद्दे न राहिल्यामुळे वैयक्तिक चर्चेवर घसरायचे ही आपटार्डांची सवयच आहे. त्यामुळे मुद्देसूद चर्चेची अपेक्षा तुमच्याकडून नव्हतीच. बरोबर अहे. जर तुमचे नेतेच असा आक्रस्ताळेपणा करत असतील तर तुमच्यासारखे लोक वेगळे कसे करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 09:05 नवीन
हो का ? :O थोडा वेळ सरळ उभे टाका, रक्तप्रवाह सुरळीत होईल. आणि तासाभरापूर्वी आपण स्वतः काय लिहिले होते हा विसरण्याचा जो रोग जडलाय, तोसुद्धा बरा होईल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
म
मदनबाण Tue, 06/30/2015 - 08:52 नवीन
२ आठवड्या पूर्वीची एक बातमी देत आहे :- जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो! ही कालची :- आठ महिन्यात सरकारच्या प्रतिमेला तडे मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 11:29 नवीन
After Pankaja Munde, Vinod Tawde faces allegations of irregularities in awarding contract. http://indianexpress.com/article/india/india-others/after-pankaja-munde-vinod-tawde-his-ok-to-191-cr-contract-is-put-on-hold/ Maharashtra minister Pankaja Munde lands in fresh controversy http://indiatoday.intoday.in/story/pankaja-munde-jalyukta-shivaar-scam-maharashtra-drought-devendra-fadnavis-bjp-shiv-sena/1/447908.html
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 12:02 नवीन
जेव्हा एखादा शाहीर खड्या आवाजात पोवाडा म्हणत असतो, तेव्हा त्याच्या मागे उभे असलेले त्याचे साथीदार गप्प उभे असतात. पोवाड्याच्या काही ओळी म्हणून तो समेवर येऊन थांबतो, तेव्हा मागचे साथीदार एक हात कानावर ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' असे म्हणून पोवाड्यात खंड पडू देत नाहीत. फेब्रुवारी-एप्रिल या काळात जवळपास ८ आठवडे परदेशी जाऊन श्रमपरिहार करून ताजेतवाने झालेल्या युवराजांना भारताच्या भेटीवर आल्यावर अचानक कंठ फुटला आणि ते मनाला येईल ते बरळायला लागले. सूटबूट की सरकार असे काहीतरी आचरटासारखे बोलणे, मी आयुष्यभर तुमच्या साठी लढत राहीन असे शेतकर्‍यांना/कोळ्यांना सांगणे, मनमोहन सिंगांनी मोदींची शिकवणी घेतली अशी हास्यास्पद विधाने करणे, बोलताना प्रत्येक तिसर्‍या वाक्यात किसान, मजदूर, गरीब या शब्दांचा न चुकता वापर करणे असा पोवाडा त्यांनी सुरू केला. बराचवेळ खड्या आवाजात पोवाडा गायल्यावर ते थकले आणि नेहमीप्रमाणे १०-१२ दिवसांपूर्वीच परदेशी रवाना झाले. यावेळी बरोबर राजमाता, युवराज्ञी, जमाई राजा इ. बरोबर होते. लंडनमध्ये एका हॉटेलच्या लॉबीत चुकून त्यांचा एका व्यक्तीला धक्का लागला आणि आश्चर्य म्हणजे ती व्यक्ती होती ललित मोदी. मग दोघांनी एकमेकांना हाय, हॅलो वगैरे केले. भारतात शेतकरी, कामगार, गरीब इ. ची परिस्थिती कशी आहे, त्यांना रोजचे जेवण वगैरे मिळते का इ. मोदींनी कळवळून युवराजांना विचारले. ही भेट ठरवून झाली होती असा भाजप उगाचच कांगावा करीत आहे. दरम्यानच्या काळात भारतात पोवाड्यात खंड पडू नये म्हणून जयराम रमेश, सचिन सावंत वगैरे पाठीमागचे साथीदार कानावर हात ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' करीत आहेत व त्यातूनच पंकजा मुंडे, तावडे इ. वर हास्यास्पद आरोप होत आहेत. हे आरोप म्हणजे फुसका बार आहे. त्यातून आवाज निघणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही. बादवे, माध्यमात भुजबळांवर होत असलेल्या आरोपांची चर्चा थांबावी म्हणून काकांनीच ही काडी लावून दिल्याचे बोलले जात आहे. त्यांची खेळी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
D
dadadarekar Wed, 07/01/2015 - 12:10 नवीन
आणि ते वरुण गांधी कधी भेटले होते म्हणे ? वरुण गांधी सोनियाच्या मदतीने ललित मोदीला सोडवणार होते ना हो ? चक्क काकू मला वाचवा ? माय मरो पण मावशी जगो ही म्हण आता माय मरो पण काकु जगो अशी करावी का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
D
dadadarekar Wed, 07/01/2015 - 12:12 नवीन
http://m.ibnlive.com/news/politics/now-lalit-modi-targets-varun-gandhi-claims-he-offered-to-settle-everything-with-sonia-gandhi-for-60-million-1014086.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Sun, 07/05/2015 - 11:29 नवीन
व्यापम घोटाळा कव्हर करायला गेलेल्या आज तकच्या पत्रकाराचा काल मध्यप्रदेशमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. आणि आज परत एकाचा मृत्यू. Jabalpur medical college dean with links to Vyapam accused found dead http://www.business-standard.com/article/pti-stories/jabal-med-college-dean-with-links-to-vyapam-accused-found-dead-115070500168_1.html
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/05/2015 - 12:00 नवीन
माझ्यामते व्यापम घोटाळा सर्वच बाबतीत भाजपसरकारवर एक सर्वात मोठा डाग असेल. याबद्दल अजिबात योग्य ती चौकशी होत नाहीये. ललितमोदी प्रकरणावर फुकाचं रान माजवणार्‍या च्यानलांना हे दिसत नाहीये का? अरे इथे तर अलिबाबाची गुहा आहे. पँडोराज बॉक्स आहे. मधमाशांच पोळं आहे. इतक्या अटका आणि इतके मृत्यू, काय चाल्लंय तरी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Sun, 07/05/2015 - 16:22 नवीन
या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. अनेक साक्षीदारांचा व आरोपींचा संशयास्पद मृत्यु झालाय. यामागे नक्की कोण आहे आणि नक्की किती जण आहेत हे बाहेर येत नाहीय्ये. सध्याच्या तपासयंत्रणेला हे गूढ उकलत नाहीय्ये किंवा जाणूनबुजून तपास नीट होत नाहीय्ये. मध्यप्रदेश मधल्या भाजप सरकारचे हे एक प्रचंड मोठे अपयश आहे आणि आता सरकारवरच संशय येतोय. एकंदरीत या भ्रष्टाचारात एकापेक्षा जास्त पक्षांचे हितसंबंध असणार असं दिसतंय. आता सर्वोच्च न्यायालयानेच सर्व तपास हाती घेऊन फक्त स्वतःच्याच नियंत्रणाखाली असलेली एक एसआयटी बनवून तपास करावा व या प्रकरणातील सर्व साक्षीदारांना तातडीने २४ तास संरक्षण पुरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
विकास Mon, 07/06/2015 - 15:45 नवीन
हे प्रकरण गंभीर आहे. त्या संदर्भात सरकारने पारदर्शक रहाणे अतिमहत्वाचे आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे जे कोणी त्यातील आरोपी आणि फिर्यादी असतील त्या सर्वांच्या जीवाची काळजी घेणे महत्वाचे आहे. बाकी ललित मोदी वरून रान माजवणारी काँग्रेस या संदर्भात बर्‍यापैकी "हात रे" असे लहान मुलासमोर म्हणावे इतकी कमी निषेध करत आहे असे वाटते. शिवराजसिंग चौहान यांच्या बद्दल कायम चांगले ऐकले आहे. त्यांची ही नक्की सत्वपरीक्षा आहे. भले स्वत: (कदाचीत) गुंतले नसले तरी हे प्रकरण कसे सोडवणार आहेत ह्यावर त्यांचे राजकीय चारीत्र्य आणि नेतृत्व ठरेल. मात्र जो काही सिबिआय चौकशी करा म्हणून ओरडा चालला आहे ते पाहून काही समजत नाही. कारण हायकोर्टाच्या आदेशामुळे सिबिआय चौकशी करता येत नाही आहे. In 2014, the Madhya Pradesh High Court rejected demands for a CBI inquiry from the Congress and others. हा दुवा एनडीटिव्ही मधला आहे. पण माध्यमातले मथळे वाचून असे वाटते की सरकार करायला तयार नाही म्हणून, जे वास्तवाला धरून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 07/06/2015 - 19:24 नवीन
>>> . In 2014, the Madhya Pradesh High Court rejected demands for a CBI inquiry from the Congress and others सीबीआय चौकशीची मागणी फक्त राज्य सरकार केंद्र सरकारकडे करू शकते. इतरांना तो कायदेशीर अधिकार नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही कोणीतरी त्रयस्थाने केलेली मागणी त्यामुळेच कदाचित न्यायालयाने फेटाळली असावी. परंतु या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राज्य सरकारने स्वतःहून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. राज्य सरकारवर येणारा संशय कदाचित त्यामुळे कमी होईल. २ दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन दिल्लीत मृत अवस्थेत आढळले. म्हणजे हे प्रकरण मध्य प्रदेशच्या सीमा ओलांडून केव्हाच बाहेर गेले. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणात सर्वपक्षीय सहभाग असणार हे नक्की. म्हणून तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस क्षीण विरोध करीत आहे. कोळसा घोटाळा, २-जी तरंगलहरी घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा इ. प्रकरणातील मुख्य आरोपी व लाभार्थी काँग्रेसचे व मित्रपक्षांचे होते. इतर विरोधी पक्षांचा त्यात फारसा हात नव्हता. त्यामुळेच भाजप व इतर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ माजवून प्रकरण दाबून दिले नाही. व्यापम् प्रकरणात सर्व पक्षांचा मोठा हात दिसत आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष सुद्धा लुटुपुटीचा विरोध करीत आहेत. शिवराजसिंग चौहान यांची व भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हे नक्की. ते जेवढा उशीर करतील तेवढा त्यांच्याविषयी संशय वाढत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नाव आडनाव Sun, 07/05/2015 - 17:17 नवीन
या घोटाळ्याशी संबंधित जे लोक जिवंत आहेत, ते कसे जगत असतील देवाला माहित. त्यांना मरणाची रोज - खरंतर दर तासाला, दर मिनिटाला भिती वाटत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
इ
इरसाल Wed, 07/08/2015 - 13:08 नवीन
या घोटाळ्याशी संबंधित जे लोक जिवंत आहेत, ते कसे जगत असतील देवाला माहित. त्यांना मरणाची रोज - खरंतर दर तासाला, दर मिनिटाला भिती वाटत असेल. मी तर असं म्हणतो की ही भिती अजुन हजारपट वाढेल तर चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/05/2015 - 17:52 नवीन
व्यापम घोटाळा पाण्यातल्या बर्फासारखा, जितका वर (उघड) आहे त्यापेक्षा अनेक पटींनी लपवलेला आहे असेच दिसत आहे. छोट्यांपासून ते राज्यपालांच्या घरापर्यंत पसरलेल्या आणि सर्व राजकीय पक्षांना पंखाखाली घेतलेल्या ह्या घोटाळ्यातील सर्व सत्य बाहेर येईल असे वाटत नाही. कारण, इतका हजारो लोक गुंतण्याइतका मोठा घोटाळा असून आणि क्षुल्लक राईचे पर्वत बनविण्याची सवय असूनसुद्धा, कोणताच प़क्ष त्याचे भांडवल बनवू इच्छीत नाही !... यातच काय ते आले, नाही का ?!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 07/06/2015 - 17:14 नवीन
यातील पहिली तक्रार २००० साली केली गेली. पण हे एवढे मोठे professional racket आहे हे मात्र समजायला २००७ साल उजाडले आणि त्यात अटकसत्र आणि मोठ्या प्रमाणावर तपास २०१३ पासून चालू आहे. २०१३ मध्ये मध्यप्रदेश हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे special task force ची स्थापना झाली. पुढे याच कोर्टाने दिग्विजय सिंगांची CBI तपासणीची विनंती फेटाळून लावली. या घोटाळ्यामध्ये २००० पेक्षा जास्त आरोपी आहेत आणि आत्तापर्यंत १९०० आरोपींना अटक झालेली आहे व जवळपास ५०० आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपी म्हणून राम नरेश यादव (राज्यपाल) यांचे नाव आहे जे कॉंग्रेसचे आहेत. तसेच भाजपाचे लक्ष्मीकांत शर्मा यांचे ही नाव आहे व त्यांनाही अटक झालेली आहे. अजून पण विविध पक्षांचे लोक यात अडकलेले असून सर्वांवर कारवाई (भाजपाच्या लोकांवर सुद्धा) चालू आहे. त्यामुळे असे वाटत नाही की शिवराज सिंग कोणाला पाठीशी घालत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विकास Mon, 07/06/2015 - 17:29 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद! त्यामुळे असे वाटत नाही की शिवराज सिंग कोणाला पाठीशी घालत आहेत. शिवराज सिंग यांची प्रतिमा स्वच्छ चारीत्र्याचे नेते म्हणून आहे. त्यामुळे काही म्हणा, पण त्यांच्याकडून अधिक अपेक्षा केल्या जातील. (जया अंगी मोठेपण...). त्या जागी दिग्गीराजा असते तर लोकं म्हणाली असती, चालायचचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
न
नाखु Wed, 07/08/2015 - 06:05 नवीन
या गंभीर बाबीवर तुटून पडत नाही अगदी कमुनिष्ट ही म्हणजे सगळेच गुंतलेले आहेत. भाजपाने याची सखोल आणि निप्क्ष चौकशी करून अगदी भाजपाचे आमदार असतील त्यांना सुद्धा जबर शिक्षा केली पाहिजे.
  • चांगला संदेश जाईल आणि संभाव्य भुजबळी थंडावतील
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/08/2015 - 09:53 नवीन
निष्पक्ष प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मदनबाण Wed, 07/08/2015 - 11:57 नवीन
व्यापम अपडेट :- व्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 07/08/2015 - 17:49 नवीन
मध्यप्रदेश हायकोर्टाने मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची सिबिआय चौकशी साठीची याचिका फेटाळून लावली! नक्की काय भानगड आहे कळत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीगुरुजी Wed, 07/08/2015 - 20:09 नवीन
“We requested the (Madhya Pradesh) High Court that the probe should be done by CBI. The matter is likely to come up before the Supreme Court tomorrow. We will make the same prayer there too,” Chouhan said. Earlier, the Madhya Pradesh High Court refused to hear the govt’s plea for a CBI probe into the Vyapam scam and deferred the matter till July 20. The HC cited pendency of similar plea in Supreme Court for deferring the hearing. The apex court will hear the plea on July 9.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सव्यसाची गुरुवार, 07/09/2015 - 08:55 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने व्यापम घोटाळ्याची चौकशी सीबीआयला देऊ केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हि चौकशी होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत या केसशी संबंधित सगळ्या मृत्यूंची चौकशीही सीबीआय करणार आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/09/2015 - 09:08 नवीन
सीबीआयचा आजवरचा इतिहास पाहिला तर सीबीआयच्या चौकशीतून फार काही निष्पन्न होणार नाही याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 07/09/2015 - 09:21 नवीन
जर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे झाले तर काहीतरी बाहेर निघेल असे वाटते. जर फक्त सीबीआय चौकशी करणार असेल तर मग काहीच सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी गुरुवार, 07/09/2015 - 09:36 नवीन
सीबीआय ही केवळ राजकीय पक्षांची बटकी आहे. जो पक्ष सत्तेवर त्यांच्या तालावर नाचण्यात धन्यता मानतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ई
ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 07/09/2015 - 10:04 नवीन
सीबीआय ही केवळ राजकीय पक्षांची बटकी आहे... खंप्लिटलि अ‍ॅग्री
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 07/22/2015 - 15:35 नवीन
‘आप’च्या आमदारांना जेलमध्ये टाकण्यासाठी आता काही कारण भेटत नसल्यामुळे कदाचित दिल्ली पोलीसांनी हा नवीन मार्ग अवलंबला असावा. कोणी सांगावे, व्यापमची अर्धशतकीय इनिंग दिल्लीमध्ये कंटिन्यु करून यांना शतक मारायचे असेल. जरा दोन मिनिटांचा हा व्हिडिओ बघा. https://www.youtube.com/watch?v=LlXuOny6W5Y
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा