एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
म
मृत्युन्जय
Wed, 05/27/2015 - 08:38
नवीन
खरे आहे. पण चांगले काम करणार्यांना कोंडीत पकडल्याचे दिसत नाही. तुम्ही केजरीवालांना कोंडीत पकडले असे काय ते म्हणालात ना?
ज
जानु
Tue, 05/26/2015 - 19:37
नवीन
आजकाल शासनकर्ते मंडळी मग ती कोणतीही असो संशयाचा सर्वाधिक फायदा आपल्यालाच मिळाला पाहिजे आणि विरोधी पक्षाने मात्र संशयातीत असावे असे सांगत असते. मान्य आहे की मा. मोदी शासन करतांना पर्वाश्रमीच्या ममो सरकार पेक्षा वेगळे काम करीत असेल. पण ममो यांच्याशी तुलना हे मोदी साहेब व त्यांच्या वतीने काम करणार्यांना शोभत नाही. अपेक्षा तुम्हीच वाढवायच्या आणि काम करतांना वेळ मागायचा, सरळ होणार नाही, हे तर सहजच बोलणे असते असे सांगायचे हे तर शासकीय कामातील ठेकेदारासारखेच झाले की. टेंडर भरतांना वेगळे आणि काम सुरु झाल्यावर फुगवटा!
त
तिमा
Wed, 05/27/2015 - 06:46
नवीन
भारतातील भाबड्या जनतेला कायम कोणीतरी युगपुरुष हवा असतो. पण काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे, दरवेळेस त्यांचा भ्रमनिरास होतो. केजरीवालांवर आशा ठेवावी तर त्यांनाही भांडणात गुंतवून ठेवले आहे. या देशांत येत्या ५० वर्षांत खरे चांगले सरकार येईल अशा भ्रमात जर कोणी असेल तर तो त्यांनी बाजूला टाकावा. साधनसंपती मर्यादित आणि लोकसंख्या अमर्यादित, अशा देशाला चांगले दिवस कसे येतील? भारतीय जनतेने आता वास्तववादी होण्याची जरुर आहे.
श
श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 06:48
नवीन
दैनिक सकाळने काल या विषयावर अनेक पाने खर्ची घातली होती. त्यात विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करून रेटिंग दिले होते. 'सकाळ'चे सरासरी रेटिंग ६.५५/१० इतके आहे. माझे रेटिंग त्याच्याच जवळपास म्हणजे ६.८/१० इतके आहे.
मी या लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे अविनाश धर्माधिकारींच्या लेखात जास्त व्यवस्थितपणे मांडले आहेत.
काही जणांना हा लेख अभ्यासू नसून प्रचारकी स्वरूपाचा वाटला असला तरी एकंदरीत लेख प्रचारकी स्वरूपाचा नसून बर्यापैकी जमला आहे असे दिसत आहे.
काल या लेखावर बर्याच प्रतिक्रिया आल्या. खंडेराव, मदनबाण, मृत्युंजय यांचे बरेच प्रतिसाद विषयाशी सुसंगत होते. मात्र आज इथे शुकशुकाट आहे. विषयाशी सुसंगत नवीन प्रतिसाद आले तर उत्तर देईनच. असो.
प
पिंपातला उंदीर
Wed, 05/27/2015 - 07:14
नवीन
बाकी मोठ्या साहेबांची राष्ट्रवादी आणि नमोंची कमळाबाई सध्या दो बदन एक जान असल्यामुळे सकाळ मधून असले अनुकूल लेख येणारच .
स
संदीप डांगे
Wed, 05/27/2015 - 07:59
नवीन
दैनिक सकाळने काल या विषयावर अनेक पाने खर्ची घातली होती. त्यात विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करून रेटिंग दिले होते. 'सकाळ'चे सरासरी रेटिंग ६.५५/१० इतके आहे. माझे रेटिंग त्याच्याच जवळपास म्हणजे ६.८/१० इतके आहे.
फक्त दैनिक सकाळचं एवढं काय कौतुक? अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या धंद्याचा एक भाग म्हणून ही सगळी उठाठेव केली आहे.
मी या लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे अविनाश धर्माधिकारींच्या लेखात जास्त व्यवस्थितपणे मांडले आहेत.
हो. पण अविनाशजींच्या लेखात कोणतेही खोटे चित्र, दिशाभूल करणार्या बातम्या व उल्लेख, जाहिराती भाषा नाही. जे तुमच्या लेखात तुडूंब भरून वाहत आहे. इथल्या सदस्यांनी उघड केलेल्या त्या गोष्टी तुम्ही सोयिस्करपणे टाळल्यात. शिवाय अविनाशजींच्या लेखात विद्यमान सरकार कोणत्या बाबतीत कमी पडलंय तेही आहे जे तुमच्या लेखात नाही. त्यामुळे थोरामोठ्यांचे दाखले देऊन स्वत:ला त्यांच्या पातळीवर नेऊन बसवायचे प्रयत्न हास्यास्पद आहे.
काही जणांना हा लेख अभ्यासू नसून प्रचारकी स्वरूपाचा वाटला असला तरी एकंदरीत लेख प्रचारकी स्वरूपाचा नसून बर्यापैकी जमला आहे असे दिसत आहे.
इसे कहते है अपने मुंह मिया मिठ्ठू बनना. हा लेख फक्त प्रचारकीच नसून चक्क जाहिरातबाजी आहे. खंडेराव यांनी या लेखातली कितीतरी वाक्यं वानगीदाखल दिली आहेत.
काल या लेखावर बर्याच प्रतिक्रिया आल्या. खंडेराव, मदनबाण, मृत्युंजय यांचे बरेच प्रतिसाद विषयाशी सुसंगत होते. मात्र आज इथे शुकशुकाट आहे. विषयाशी सुसंगत नवीन प्रतिसाद आले तर उत्तर देईनच. असो.
विषयाशी सुसंगत प्रतिसादावर नव्हे तर जिथे सोयिस्कर आहे तिथेच प्रतिसाद दिले आहेत. पुढेही तेच करणार आहात. म्हणून इथे शुकशुकाट आहे.
श
श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 10:04
नवीन
तुमचा एकच प्रतिसाद विषयाला धरून होता परंतु त्यातील निष्कर्ष चुकीचा होता (ऐच्छिक विमा योजनांमध्ये स्वशुषीने भरलेले पैसे सरकार नागरिक त्यांच्या नकळत काढून घेत आहे असा तुमचा चुकीचा उत्कर्ष होता). त्या प्रतिसादाला योग्य ते उत्तर दिलेले आहे.
तुमचे बाकीचे प्रतिसाद म्हणजे निव्वळ त्रागा आणि आदळआपट होती.
स
संदीप डांगे
Wed, 05/27/2015 - 10:36
नवीन
पाकिस्तानी गोळीबार आणि खलिता? ब्रिक्स बँक? इथे तुमच्याकडे काहीच उत्तर नाही म्हणून तोंड चुकवत आहात.
उपलब्धी मांडल्यात तशा चुका आणि आव्हानंही मांडायची असतात संतुलित लेखांमधे. अन्यथा त्याला प्रचारकी आणि जाहिरातबाजीच म्हटल्या जाते. वर्तमानपत्रीय भाषेत पेड न्युज, पेड आर्टिकल.
म्हणून म्हणतो गुरुजी, रहने दो बेटा, तुमसे ना हो पायेगा.
श
श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 11:25
नवीन
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि प्रचार राहू देत थोडा वेळ बाजूला. मीही तुमचा त्रागा आणि आदळआपट थोडा वेळ बाजूला ठेवतो. मोदी सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे ते सांगता का. सांगायचं नसेल तर नका सांगू. तशी अजिबात सक्ती नाही. पण सांगायचं असेल तर त्रागा आणि आदळआपट न करताना सांगा.
नाही, म्हणजे इतका वेळ तुम्ही मोदी सरकारविषयी फारसं न बोलता माझ्यावरच डूख धरलाय आणि त्यामुळे धागा भरकटत चाललाय म्हणून विचारतोय. आणि सांगायचं नसेल तर नका सांगू, तशी अजिबात सक्ती नाही याचा पुनरूच्चार करतो.
प
पिंपातला उंदीर
Wed, 05/27/2015 - 12:24
नवीन
@श्रीगुरुजी - अस कस जाऊ दे भाऊ ? एकतर प्रचारकी खोट ठासून बोलायच आणि ते खोट उघडकीला आल की जाऊ जाऊ दे अशी सारवासारव करायची . नही चलेगा भाई ऐसे . इथे तुम्ही एक चूक तर मान्य केलीच आहे . रादर खंडेराव यांनी कबूल करून घेतली आहे
http://www.misalpav.com/comment/699572#comment-699572
ब्रिक्स बँक च्या मुद्द्यावर तुम्ही मुग गिळून गप आहेत . इतरही धाग्यावर पुरेसे वस्त्रहरण झाले आहेच . माझा मुद्दा जरा लार्जर स्केल वर आहे . मोदी सरकारच्या एक वर्षातल्या उपलब्धी एवढ्या कमी आहेत का एवढ्या धादांत खोट्यांचा वापर कराव लागत आहे . एवढी दीनवाणी परिस्थिती का आली भक्तांवर ? तुम्ही मोदी सरकार वर असले तोंडावर पडलेले धागे काढण्यापेक्षा वर कुणीतरी सुचवल्याप्रमाणे काही दिवस सन्यास घेतला तर तेच मोदी सरकारसाठी जास्त उपकारक राहील .
ब
बॅटमॅन
Wed, 05/27/2015 - 13:23
नवीन
ठ्ठो =))
सॉल्लिड.
स
संदीप डांगे
Wed, 05/27/2015 - 13:00
नवीन
का बुवा बाजूला ठेवायचं? तुम्हीच खोटं बोलायचं आणि ते बाजूला ठेवा म्हणायचं? वेरी गुड.
कुठे आहे त्रागा आणि आदळआपट? चष्मा काढा साहेब.
माझं काय मत आहे ते पाच वर्ष पुर्ण झाल्यावर सांगेनच. कारण माझ्या लेखाची दखल घेऊन आता सरकारी धोरणं बदलायला मी काही अविनाश धर्माधिकारी नाही. जेव्हा लिहिन तेव्हा ते मतदारांच्या जनजागृतीसाठी असेल, प्रचार आणि जाहिरातबाजीसाठी नाही.
मी तुमच्यावर डूख धरलाय हा तर अतिशय पांचट आणि आक्षेपार्ह आरोप आहे. तुम्हीच काय अगदी कुणीही असा जाहिराती धागा काढला असता तर हेच माझे प्रतिसाद असते. इतरही मुद्दाहीन धाग्यांवर मी योग्य ते प्रतिसाद दिलेत. धागा भरकटवण्याचे मटेरिअल लेखातच भरपूर भरलेले आहे, बाहेरच्या मदतीची अजिबात गरज नाही. मीच नाही तर इतरांनी या लेखावर टीका केली आहे. तेव्हा कुणावरही आरोप करतांना जरा सांभाळून.
फॉर योर इन्फोर्मेशन. हे मोदी सरकार नाही. भारत सरकार आहे. माझं सरकार आहे. ह्याच्यासाठी मी मतदान केलंय. फक्त इथं सत्ताधारी पक्षाचं सरकार नसतं, विरोधी पक्षही सरकारात असतात. त्यांचं मिळून भारत सरकार बनतं. जेवढी सत्ताधार्यांची जबाबदारी तेवढीच विरोधी पक्षांचीही. दोघांच्याही चांगल्या-वाईट गोष्टींवर टीका करण्याचा, न करण्याचा माझा अधिकार अबाधित आहे. उगाच उतावीळपणा करून, खोटं बोलून आपल्याच सरकारचं जनमानसात मत बिघडवण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही.
स
संदीप डांगे
Wed, 05/27/2015 - 13:08
नवीन
आणि हो,
एक भाजप समर्थक म्हणून अशा धाग्यांवर योग्य ते प्रतिसाद देऊन आपल्या पक्षाची होणारी हानी टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे योग्यच आहे. नाही का?
ख
खंडेराव
Wed, 05/27/2015 - 13:18
नवीन
श
श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 20:13
नवीन
अंदाजाप्रमाणे याही प्रतिसादात इतर प्रतिसादातला नेहमीचाच त्रागा आणि आदळआपट झाली आहे. एखादा प्रतिसाद तरी अपवाद असावा अशी इच्छा होती. पण . . . असो. चालायचंच.
स
संदीप डांगे
Wed, 05/27/2015 - 20:39
नवीन
अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे मूळ प्रश्नांना सोयिस्कर बगल दिलीच आहे. एखादाही प्रतिसाद अपवाद असणार नाही याची खात्री होती...
असो. चालायचंच.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 09:29
नवीन
अपेक्षेप्रमाणेच प्रतिसाद आहे.
प
पिंपातला उंदीर
Wed, 05/27/2015 - 06:56
नवीन
ते ब्रिक्स बँक च्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत . तिथे हजेरी लावावी ही इनाणती
H
hitesh
Wed, 05/27/2015 - 10:26
नवीन
स्र्कारी तेल कंपन्या मेल्या का ?
http://www.railnews.co.in/after-7-years-gap-ril-to-supply-diesel-to-indian-railways/
क
काळा पहाड
Wed, 05/27/2015 - 10:48
नवीन
Sources said that Reliance has offered a discount of about INR 1.50 a litre to the Railways.
बाकी रिलायन्स चा क्रूड शुद्धीकरण प्रकल्प सरकारी तेल कंपन्यांना सुद्धा पुरवठा करतो.
H
hitesh
Wed, 05/27/2015 - 13:51
नवीन
सव्वा रुपया वाचवायला उरलेले सगळे पैस अंबानीच्या घशात घालायचे !
अच्चे दिन आ गये
H
hitesh
Wed, 05/27/2015 - 14:00
नवीन
https://m.youtube.com/watch?v=M__jj-0GfUM
क
काळा पहाड
Wed, 05/27/2015 - 15:24
नवीन
हे बघ, तुझी जळजळ तू दुसर्या कुणाच्या तरी रिप्लाय ला व्यक्त कर. मूर्ख प्रतिसादांना मी प्रतिसाद देत नाही. तेव्हा नमस्कार.
श
श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 20:10
नवीन
योग्य उत्तर
न
नांदेडीअन
Wed, 05/27/2015 - 14:00
नवीन
व्हाट्सऍपवर एका ग्रूपमध्ये हा मेसेज वाचला.
मला यातले फार काही कळाले नाही.
कुणी सोप्या भाषेत हे समजावून सांगेल का ?
व्हाट्सऍपवर व्हायरल होणारे ९९% पोस्ट खोटे असतात हे मला माहित आहे.
हाही त्यापैकी एक असेल, तर कृपया दुर्लक्ष करा.
पण हा उर्वरीत १ टक्क्यामधला पोस्ट असेल, तर प्लीज मला समजाऊन सांगा.
क
कहर
गुरुवार, 05/28/2015 - 08:13
नवीन
यांनी तर निरीक्षण परीक्षणावरून तर्क आणि अनुमान लावण्यात चक्क शेरलोक होम्स ला मात दिली राव. भारताच्या खुफिया विभागात घ्या साहेबांना (ज्यांनी हा message बनवला)
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 09:25
नवीन
तो मेसेज म्हणजे अगदीच "कहर" आहे.
च
चिनार
Mon, 06/08/2015 - 08:40
नवीन
नांदेडीयन साहेब..
ज्याने कोणी ही पोस्ट तयार केली असेल त्याला एक्साइज ड्यूटी मधलं काहीही कळत नाही हे उघड आहे. (माझा पुढील प्रतिसाद हा वरील पोस्ट मधील संज्ञा स्पष्ट करण्यासाठी आहे. पंतप्रधान मोदी आणि अंबानी यांच्या संबंध यावर मला वाद घालायचा नाही.)
एखादी कंपनी जेंव्हा कोणताही माल भारतात उत्पादित करून भारतातच विकते तेंव्हा त्यांना त्यावर एक्साइज ड्यूटी (उत्पादन शुल्क किंवा कर) भरावी लागते. त्यामुळे रिलायंस ला भारतात तेल उत्पादन केल्यावर एक्साइज ड्यूटी भरावी लागत नाही या वाक्यात काहीही तथ्य नाही. (अर्थात एक्साइज ड्यूटी आकारणे अथवा न आकारणे हे कंपनीचा टर्न ओव्हर आणी इतर काही गोष्टी यावर अवलंबून आहे.)
थोडक्यात भारतात तयार करून भारतात विकण्यात येणाऱ्या तेलावर रिलायंस किंवा अन्य कोणत्याही कंपनीला एक्साइज ड्यूटी + VAT भरावे लागते .( इतरही काही कर आहेत ज्याविषयी मला पूर्ण माहिती नाही)
एखादी कंपनी जेंव्हा कच्चा माल परदेशातून आयात करते तेंव्हा तिला आयात शुल्क (Custom duty )भरावे लागते. आयात शुल्काचे तीन भाग आहेत
आयात शुल्क = इम्पोर्ट ड्यूटी + एक्साइज ड्यूटी + VAT
ह्याची बेरीज साधारण २६ % आहे. आयात शुल्क आकारताना एक्साइज ड्यूटी + VAT लावण्याचे कारण असे आहे की तसे न केल्यास प्रत्येकच कंपनी कच्चा माल आयात करायला लागेल आणि सरकारचे एक्साइज ड्यूटी + VAT मधून मिळणारे उत्पन्न कमी होईल.
वरील लिखाणाचे सार असे की सरकारी कंपन्यांना एक्साइज ड्यूटी + VAT भरावे लागते म्हणून त्यांना तेल महाग पडेल आणि रिलायंस ला भरावे लागत नाही (त्यांना भरावे लागतेच!) म्हणून त्यांना स्वस्त पडेल या निष्कर्षाला काही अर्थ नाही.
आता..जर रिलायंस भारतातील जमिनेतले तेल बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून भारतात तेल विकू शकते तर सरकारी कंपन्या का करू शकत नाहीत याचे उत्तर माझ्याजवळ नाही. तसे केल्यास इम्पोर्ट ड्यूटी वाचू शकेल.
कदाचित भारतातले तेल बाहेर काढण्याची परवानगी फक्त रिलायंस जवळ असेल. आणी ही परवानगी त्यांना मोदी सरकारने दिली असे माझ्यातरी वाचनात आलेले नाही.
आणखी एक गोष्ट..माझ्या माहितीप्रमाणे एक्साइज ड्यूटी ही वाट्टेल तेंव्हा वाढवता येत नाही. ती वर्षातून एकदाच तेही बजेट च्या वेळी कमीजास्त करण्यात येते.
व
विनोद१८
Mon, 06/08/2015 - 09:24
नवीन
भारतात प्रत्येक उत्पादकाला 'एक्साइज ड्यूटी' (उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर) ही भरावीच लागते त्यापासुन कोणाचीही सुटका नसते. फक्त '१००% निर्यातदार उत्पादक' व काही छोटे उद्योजक ज्यांचा टर्न ओव्हर हा कमी असतो व जे एक्साइज ड्यूटीच्या किमान कक्षेमध्ये येत नाहीत अशांनाच फक्त त्यामधुन सूट आहे.
च
चिनार
Mon, 06/08/2015 - 10:20
नवीन
बरोबर आहे आपले..मी जास्त तपशील दिला नाही ..
एक अवांतर माहिती..जर एखादी कंपनी माल आयात करून त्यावर प्रकिया करून ठराविक कालावधीत निर्यात करणार असेल तर तिला आयात शुल्क, एक्साइज ड्यूटी वैगेरे सगळं माफ होते.
न
नांदेडीअन
Wed, 06/10/2015 - 11:00
नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
ख
खंडेराव
Wed, 05/27/2015 - 14:08
नवीन
धाग्याला २०० पुर्ण केल्याबद्दक, धागा टाकणारे, आणि वाचणारे आणि खेचणारे यांचे १ कर्णा ( प्रचारासाठी ), एक एक्सेल शीट ( हिशोबासाठी ), एक ब्रॉड बॅण्ड कन्नेक्शन ( गुगलण्यासाठी ), एक लिटर थंड दुध ( देशी गायीचे, थंड होण्यासाठी ) एक अनुविद्युत केंद्र ( संगणक चालवण्यासाठी ) एक खलिता,साडी आणि दंबुक ( पाकिस्तानला दम देण्यासाठी ), एक विट ( ब्रिक्स बँकेच्या बांधकामासाठी ), १२ रुपये ( विमा काढण्यासाठी ), एक समन्स ( वड्राला पाठविण्यासाठी ), एक पांढरा डब्बा ( काळा पैसा परत आल्यावर ठेवण्यासाठी ) इत्यादि इत्यादि..ज्याला जे पाहिजे ते निवडुन घ्यावे!
न
नाव आडनाव
Wed, 05/27/2015 - 14:25
नवीन
खंडेराव म्हाराज भगतांच्या सपनात येत्याल आता :)
ग
ग्रेटथिंकर
Wed, 05/27/2015 - 15:58
नवीन
राज्यात भिषण दुष्काळ असताना फडणवीस सरकारने बाटलीबंद पाण्यावर पाच लाख रुपयांचा चुराडा केला.
http://navshakti.co.in/featured/207622/
अच्छे दीन आ गए.
ध
धर्मराजमुटके
Wed, 05/27/2015 - 16:15
नवीन
मुळ धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. एकंदरीत यापुढची निवडणूक जिंकण्यासाठी फार मोठे कार्य करावे लागणार नाही. ज्या पक्षाच्या भक्त मंडळींची संख्या जास्त राहील तो निवडून येईल. सारासार विचार करु शकणारे नागरीक नेहमीप्रमाणे अल्पमतातच राहतील.
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/27/2015 - 20:21
नवीन
गम्मत आहे !
अन्नसुरक्षा बिलाची पाठराखण करताना "बिलाला विरोध करणारे गरीबाच्या तोंडचा घास काढून घेत आहेत" असा आरडाओरडा करणारे लोक "सालाना १२ रुपये दराच्या गरीबांच्या विमासंरक्षणाला विरोध करत आहेत" हे पाहून या देशात विनोदाची कधीच कमतरता नव्हती हे परत एकदा दिसले ! :) ;)
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 10:01
नवीन
अगदी बरोबर
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 05/28/2015 - 05:34
नवीन
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!).
एक फरक आहे . राहुल गांधी यांनी पुनरागमना नंतर थोडी तरी चमक दाखवली . इथ सगळा आनंदी आनंद आहे . : )
ख
खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 06:30
नवीन
आणि काही प्रश्न
१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( गुगलुन सापडले नाही, १०० मार्काचे संस्क्रुत ही कामाला आले नाही )
२) शय्यासोबत आणि मळवट भरणे
अ) भाजपने शिवसेनेबरोबर वरिल काय केले?
ब) भाजपने पिडिपी बरोबर वरिल काय केले?
क) जे रास्त्रवादी भाजपमधे गेले, त्यांनी वरिलपैकी काय केले?
ड) एनडीए मधील पक्ष भाजपाचा मळवट भरतात की शय्यासोबत करतात?
( प्रश्न विचारण्याचा हेतु हाच आहे की हे शब्द मला हीन वाटले, अर्थात तुम्हाला वाटले नाहीत, कारण तुम्ही ते लेखात वापरले)
उत्तरांच्या अपे़क्षेत..
खंडेराव
त
तुषार काळभोर
गुरुवार, 05/28/2015 - 08:28
नवीन
ब्लु आईड बॉय...
लाडका बाब्या
a man who is liked and admired by someone in authority
त
तुषार काळभोर
गुरुवार, 05/28/2015 - 08:30
नवीन
मला संयुक्त संस्कृत (हाप संस्कृत - हाप हिन्दी) ५० मार्कांचं होतं.
करा statistical हिशोब.
ख
खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 09:29
नवीन
.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 09:28
नवीन
१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( गुगलुन सापडले नाही, १०० मार्काचे संस्क्रुत ही कामाला आले नाही )
Blue Eyed Boy अर्थात अत्यंत लाडका
२) शय्यासोबत आणि मळवट भरणे
अर्थ उघड आहे.
अ) भाजपने शिवसेनेबरोबर वरिल काय केले?
काहीच नाही.
ब) भाजपने पिडिपी बरोबर वरिल काय केले?
काहीच नाही.
क) जे रास्त्रवादी भाजपमधे गेले, त्यांनी वरिलपैकी काय केले?
काहीच नाही.
ड) एनडीए मधील पक्ष भाजपाचा मळवट भरतात की शय्यासोबत करतात?
दोन्ही नाही.
ख
खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 09:32
नवीन
हे फारच झाले आता, दुसरे दोन बरोबर आले की शय्यासोबत, मळवट भरणे, आणि भाजपने केले की काहीच नाही?
तुम्हाला स्वतःला आता प्रचारकी लिखाणाचा अर्थ कळाला असेलच!
तुमचा अभ्यास कळायला लागलाय आता!
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 09:39
नवीन
काँग्रेसने लालूबरोबर जाऊन त्याच्या सर्व अटी मान्य करून तो देईल त्याच आणि तेवढ्याच जागा लढविण्यात संतोष मानणे आणि भाजपने स्वबळावर निवडणुक लढवून प्रथम स्थान प्राप्त करून नंतर स्वतःच्या अटींवर शिवेसेनेबरोबर युती करणे यातला फरक लक्षात आला तर मी वापरलेल्या शब्दांचे आश्चर्य वाटणार नाही.
ख
खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 10:23
नवीन
पिडिपी विसरले वाटते. सगळ्याच तडजोडी आहेत, फक्त हा तुमचा भ्रम आहे कि भाजपच्या योग्य आणि इतरांच्या शय्यासोबती.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 11:35
नवीन
पीडीपी बरोबर युती करण्याआधी भाजपने स्वबळावर लढून दुसर्या क्रमांकाच्या जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर पीडीपी + नॅकॉ + अपक्ष किंवा पीडीपी + काँग्रेस + अपक्ष अशी कुठलीच बेरीज बहुमतापर्यंत जात नसल्याने पीडीपीला भाजपची साथ घ्यावी लागली. त्यांची बोलणी तब्बल २ महिने सुरू होती. पीडीपीच्या जाहीरनाम्यातील मुख्य अटी (अॅफ्स्पा रद्द करणे, सीमेच्या दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांचा सुलभ भेटीसाठी व्हिसा इ.) भाजपने मान्य न केल्याने चर्चा लांबली. शेवटी भाजपने आपल्या अटींवर युती केली. भाजपला मंत्रीमंडळात स्थान मिळालेच. पण त्याबरोबरीने उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाचे सभापतीपद सुद्धा मिळाले. पीडीपीने जेव्हा जेव्हा हुरियतबरोबर मवाळ भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तेव्हातेव्हा भाजपने डोळे वटारले.
आता मी वापरलेल्या शब्दांचा अर्थ समजला असेल.
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 05/28/2015 - 11:54
नवीन
पुन्हा तेच आणि तेच खोटे . पीडीपी आणि भाजप मधली चर्चा लांबली ती त्याचवेळेस तोंडावर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे . हि अनैतिक युती झाली तर दिल्ली विधानसभेत जनमतावर प्रतिकुल परिणाम होईल अशी भीती भाजप नेतृत्वाला होती . त्यामुळे हि अभद्र युती लांबवण्यात आली . अर्थात दिल्ली विधानसभेत हे सगळे करून पण एका ऑटो रिक्षात बसतील एवढेच आमदार निवडून आले तो भाग वेगळा . दिल्लीत दणदणीत पराभव होताच पीडीपी भाजप युती झाली . मस्रत आलम प्रकरण , काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावणे , सैन्यावर दगडफेक प्रकार या अभद्र युतीमुळे अजूनच सुखनैव सुरु झाले . मुलीच अपहरण झाल म्हणून अतिरेक्यांना सोडून देणारे आणि कंदाहार इथे अतिरेक्यांना सोडून येणारे स्वार्थी पक्ष एकत्र येणे यापलीकडे या दोन पक्षात कुठलेही साम्य नाही
ख
खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 11:57
नवीन
तुमचे ग्रुहितक मान्य केले तर असा अर्थ निघतो, की
भाजपाने शिवसेनेबरोबर शय्यासोबत केली नाही, मळवटही भरला नाही.
शिवसेनेने भाजपाबरोबर शय्यासोबत केली, मळवट ही भरला.
संदर्भासहीत स्पष्टीकरण :
पक्ष अ ने प़क्ष ब बरोबर युती केली, परंतु जे पक्ष ब ला पाहिजे होते ते दिले नाही. ( भाजप शिवसेना, तुमच्या म्हणण्यानुसार )
पक्ष य ने व बरोबर युती केली, पक्ष व ला जे पाहिजे होते ते सर्व दिले. आता, व हा इथे अ बनतो. ( लालु आणि कॉन्ग्रेस्स )
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 16:42
नवीन
शिवसेनेबाबत तसे म्हणता येणार नाही, कारण मंत्रीपदाचे वाटप कोणत्याही एका पक्षाच्या बाजूला जास्त झुकलेले नाही. शिवसेनेचे भाजपच्या तुलनेत निम्मे आमदार आहेत. त्या प्रमाणात शिवसेनेला मंत्रीपदे मिळाली आहेत. त्याच्याबरोबरीने विधानसभा व विधानपरीषदेचे उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले आहे. आपल्या एकूण आमदारांच्या प्रमाणात शिवसेनेकडे लाल दिव्यांच्या गाड्या आहेत.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »