Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 08:42
🗣 115 प्रतिसाद
कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात? नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे. कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई. मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती... डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :) कार कव्हर http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432792933&sr=1-3 फुट मॅट http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25RO/ref=sr_1_6?s=automotive&ie=UTF8&qid=1432793108&sr=1-6 सन शेड http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_1?s=automotive&ie=UTF8&qid=1432793540&sr=1-1 ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B3T5A/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432793608&sr=1-3 किंवा मॅन्युअल टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQUQZI0/ref=sr_1_7?ie=UTF8&qid=1432794010&sr=8-7&keywords=air+pump रॅट गार्ड http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_7?s=automotive&ie=UTF8&qid=1432793768&sr=1-7

प्रतिक्रिया द्या
41491 वाचन

💬 प्रतिसाद (115)
श
शैलेन्द्र Sat, 05/30/2015 - 07:58 नवीन
अगदी बरोबर..एका सछिद्र कापडी पीशवीत थोडे तांदुळ व कापुर घालुन ठेवुन द्यावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ख
खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 10:15 नवीन
फक्त एकच..
कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो
हे फारच हानिकारक असतात, वापरु नयेच, लहान मुल असल्यास तर नकोच. नेटवर शोधल्यावर अजुन माहिती मिळेल. अगदीच गरज असेल तर निलगिरी वगैरे सारख्या तेलाची बाटली ठेवावी एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 10:17 नवीन
अजून लहान मूल नै ओ...त्याची तयारी करायची तर पाखरांना आवडणारे पर्फ्युम कोणते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
व
वेल्लाभट गुरुवार, 05/28/2015 - 10:42 नवीन
मस्क, वूडी किंवा अ‍ॅक्वा नोट्स वाले मस्त वाटतात. व्हेरी एलिगंट. पाखरा पाखरानुसार आवड बदलू शकते हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी गुरुवार, 05/28/2015 - 10:43 नवीन
गुर्जीं कडून अत्तर घे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 11:14 नवीन
होय होय....त्येच कर्नार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पाटील हो गुरुवार, 05/28/2015 - 11:20 नवीन
पर्फ्युम पेक्ष्या पाखरांना मोठा IRVM खूप आवडतो, सारखा फिरवून त्यात तोंड बागात बसतात म्हणून Glove box मध्ये एक आरसा घेवून ठेवा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/29/2015 - 03:13 नवीन
चिल्ड्रेन इन बॅकसीट कॉझेस अ‍ॅक्सीडेंट अँड अ‍ॅक्सीडेंट्स इन बॅकसीट्स कॉझेस चिल्ड्रन!!! =)) -चतुर्चाकीप्रेमी अनिरुद्ध-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वेल्लाभट गुरुवार, 05/28/2015 - 09:45 नवीन
आजवर उंदरांसाठी एकही उपाय प्रभावी ठरलेला नाही हे सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 05/28/2015 - 10:34 नवीन
ट का अभिनंदन. :) वेलकम टु द वॅगन आर क्लब. माझीही पहिली चारचाकी सेकन्ड हॅन्ड वॅगन आरच. अ‍ॅक्सेसरीज मध्ये सर्वप्रथम घेतलेल्या गाडीत काय काय आहे ते पहा. १) म्युजिक सिस्टीम स्पीकर सहीत. (ब्लु टुथ नवीन सिस्टीम मध्ये येतं. फोन जास्त येत असतील तर चांगली सोय) २) रिव्हर्स पार्किन्ग सेन्सर ३) फॉग लॅम्प ४) सीट कव्हर्स ५) स्टेअरीन्ग व्हील कव्हर ६) मड फ्लॅप ७) फ्लोअर मॅट ८) चार्जर ड्युअल वाला घ्या. तो ही ब्रॅन्डेड. एक गट्टु येतो तो गाडीच्या पॉइन्ट मध्ये खुपसायचा. त्याला दोन युएसबी केबल चार्जिन्ग जोडु शकतो. सॅमसन्ग वै चे २५० ते ३५० मध्ये येतील. हे बेसिक असावे. १) डोअर सील गार्ड २) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स ३) डे लाइट रनिन्ग आणि ही यादी वाढवत न्याल तितकी....
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 05/28/2015 - 10:45 नवीन
२) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स ३) डे लाइट रनिन्ग
अतिशय झँग (झगरमगर) ! आरारारा आणि आहेत ते लाईट्स काढून फेक झेनॉन च्या पांढ-या भगभगाटाला भुलू नकोस टका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 11:15 नवीन
आहेत ते लाईट्स काढून फेक झेनॉन च्या पांढ-या भगभगाटाला भुलू नकोस टका.
बाईक अथवा कारमध्ये ईलेक्ट्रॉनिक बदल करूच नये या मताचा आहे मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 11:17 नवीन
१) म्युजिक सिस्टीम स्पीकर सहीत. (ब्लु टुथ नवीन सिस्टीम मध्ये येतं. फोन जास्त येत असतील तर चांगली सोय) २) रिव्हर्स पार्किन्ग सेन्सर ४) सीट कव्हर्स ५) स्टेअरीन्ग व्हील कव्हर ६) मड फ्लॅप
हे सगळे आधीच आहे
३) फॉग लॅम्प ७) फ्लोअर मॅट ८) चार्जर ड्युअल वाला घ्या. तो ही ब्रॅन्डेड. एक गट्टु येतो तो गाडीच्या पॉइन्ट मध्ये खुपसायचा. त्याला दोन युएसबी केबल चार्जिन्ग जोडु शकतो. सॅमसन्ग वै चे २५० ते ३५० मध्ये येतील.
हे घेणे बाकी आहे
१) डोअर सील गार्ड २) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स ३) डे लाइट रनिन्ग
हे सगळे कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरीजमध्ये येते त्यामुळे सध्ध्या विचार नाही करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Fri, 05/29/2015 - 06:47 नवीन
चांगला निर्णय अभिनंदन. :) कॉस्मेटिक मध्ये जास्त लक्ष घालुच नये. गाडीचे वायपर चेक करुन घ्या. त्यातले रबर बदलुन घ्या. फार पैसे नागत नाहीत. सध्या पावसाळा जवळ येइल त्यमुळे तितकी गरज नाहिये पण पुढच्या काचेला सन कन्ट्रोल फिल्म लावलेली चांगली. त्याने पुढच्या काचेतुन येणारी उष्णता कमी होइल. मिपावर आधी एक धागा होता त्यावरच वाचलेल आहे. मलाहि हे करुन घ्यायच आहे राहुनच गेलय. आता पुढच्या उन्हाळ्याच्या आधीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 09:21 नवीन
सन कन्ट्रोल फिल्म साठी परमिशन नै ना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Fri, 05/29/2015 - 09:56 नवीन
ट्रान्सपरन्ट सन कन्ट्रोल फिल्म मिळते. पुढच्या काचेला लावायला. गरवारे आणि अजुन एक कंपनी आहे. दोन कंपन्यांची आहे. २५ टक्के ४० टक्के असे प्रमाण असते. व्हिजिबिलिटी कमी होत नाही. काहिजण हीच फिल्म डोअर विन्डॉज आणि मागच्या काचेला लावतात. पैसे जास्त आहेत ह्या फिल्मचे. पण आरटिओ कटकट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 05/28/2015 - 11:04 नवीन
महत्त्वाची अ‍ॅसेसरी विसरली वाटतं ! लिंबू, मिरची, कोळसा एकत्र बांधलेले सुरक्षा यंत्र विकत घ्या. भारतात तेच वापरतात म्हणून महागड्या सेफ्टी फीचर्स असलेल्य गाड्या जास्त खपत नाहित असा अंदाज आहे. (कृ. ह. घ्या.) :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 11:14 नवीन
खिक्क :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ल
लालगरूड गुरुवार, 05/28/2015 - 11:22 नवीन
ठो . . . मेलो ... टका इकडे लक्ष दया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ल
लालगरूड गुरुवार, 05/28/2015 - 11:23 नवीन
ठो . . . मेलो ... टका इकडे लक्ष दया
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 05/28/2015 - 11:49 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.टवाळ कार्टा यांचा सत्कार तिन हिरव्या मिरच्या ,दोन लिंबु आणी एक बिब्बा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम बाइक कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 12:03 नवीन
काळी भावली नस्ल्याबद्दल णिशेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कपिलमुनी गुरुवार, 05/28/2015 - 12:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2015 - 12:07 नवीन
हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन सुद्धा मिळते ! ;) Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु गुरुवार, 05/28/2015 - 12:11 नवीन
फलकात क शब्द पूर्ण लिहिल्याबद्दल आणी टक्याचे गाडीबद्दल (आधी गाडी मग आपोआप बाय्डी) अभिनंदन. चुकार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 12:24 नवीन
हा हा...हे भारीये अपना लक साथ लेके चलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मोदक गुरुवार, 05/28/2015 - 12:30 नवीन
उंदरांचा त्रास टाळण्यासाठी कार पार्किंगजवळ एखादा बोका पाळा..!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 12:42 नवीन
चायला वाटलेच होते इतका वेळ कोणी या बोक्याची आठवण कशी नै काढली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/29/2015 - 03:16 नवीन
मामोऑ- नै मी काय म्हणते. अ‍ॅक्सेसरीजवर एवढे पैसे उडवण्यापेक्षा आधी ड्रायव्हर लायसन काढ हो टका. आणि गाडीही शिकुन घे हो चिमणकडुन. ;) मामोऑ
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 09:22 नवीन
खिक्क...यावेळी माई म्हणाल्या...माईंचे हे गेले कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
G
gogglya Fri, 05/29/2015 - 09:07 नवीन
शीडी Rear View Mirror ला टान्गुन घ्या ! झालेच तर "हीच माझी BMW / Mercedes / [आपला लाडका Brand ] असे रेडीयम स्टीकर लावून घ्या!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 09:23 नवीन
खिक्क....नाय ओ...मी त्या टैपचा नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 09:23 नवीन
खिक्क....नाय ओ...मी त्या टैपचा नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
क
काळा पहाड Fri, 05/29/2015 - 09:41 नवीन
१. पाठीमागे "बग्तुस काय रागानं, वरटेक केलंया वागानं" असं लिवा. २. नंबरप्लेटला घड्याळ किंवा कमळ चिक्टवा (हाताची व्हॅल्यू घसरलेली आहे). ३. काळ्या किट्ट सन फिल्म लावा. त्यावर दोन पैलवान लढतायतचा स्टिकर आणि "पैलवान" लिहिलेला स्टीकर लावा. ४. पुढे बंपरच्या पुढे "उपसरपंच - मुणगे बुद्रूक" असा काहितरी अर्ध वर्तुळाकार लिहिलेला बोर्ड (फक्त पितळेचा) लावा. त्याला हार पण घाला. ५. एक किलोमीटर अंतरावर ऐकू येणारे दोन स्पीकर बसवा. शिवाय तमाशा गाण्यांची एक आणि ढाकचिक ढाकचिक वाली एक अशा दोन सीडी खरेदी करा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 09:55 नवीन
यापैकी तुमच्या गाडीला काय काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Fri, 05/29/2015 - 10:15 नवीन
आमच्या गाडीला असलं बसवता येत नाही. उगीच काही लोक भारतात त्या मेक्सिकन हॅट घालून फिरतात तसं वाटेल. पण साधारण पणे सगळ्या महिंद्राच्य गाड्यांना, सुमो, इंडिका, व्हिस्टा, पजेरो, एंडेव्हर, क्वालीस आदी गाड्यांना आणि आल्टो व सॅन्ट्रो ला हे सगळं चालेल. वॅगन आर, आय टेन, आय ट्वेन्टी, पोलो आदी गाड्यांना नाही चालणार विचित्र वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 10:54 नवीन
हे म्हैत न्हव्हते...मला वाटायचे आत बसणार्याच्या मर्जीमुळे गाडीला बाहेरना असे सगळे लावावे लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
वेल्लाभट Fri, 05/29/2015 - 11:34 नवीन
खलास !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 11:51 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
काळा पहाड Fri, 05/29/2015 - 12:08 नवीन
अहो बसणार्‍याचा प्रोफाईल सांगितला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 05/29/2015 - 12:28 नवीन
कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Fri, 05/29/2015 - 12:34 नवीन
जौ दे झालं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/30/2015 - 08:30 नवीन
त्यांना गावगुंड आणि गुंठामंत्र्यांच्या आवडीनिवडीविषयी बोलायचय रे. सर ब्लॅकमाउंटन त्याला असलं काही झेपत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 05/30/2015 - 08:56 नवीन
सर ब्लॅकमाउंटन >> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ख
खटपट्या Sat, 05/30/2015 - 03:39 नवीन
सर्वप्रथम ट्का यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन, वर वेल्लाभट यांनी फ्लोअर लॅमीनेशन करुन घ्यायला सांगीतले आहे. ते करताना जास्त सुळ्सुळीत मटेरीअल वापरु नका. कारण त्यावरुन पाय्/मॅट घसरते आणी कालांतराने ते लॅमीनेशन फाटते. आणी मग लॅमीनेशनच्या आतमधे गेलेली माती काढताना खूप त्रास होतो. मी एक मोठे पाय पुसणे स्क्वेअर फुटाच्या भावाने खरेदी करुन ते हव्या त्या आकारात कापुन त्याचा मॅट म्हणून वापर करतोय.. खूप स्वच्छ वाटते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 05/30/2015 - 07:27 नवीन
हे लक्षात ठेवले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
य
योगी९०० Sat, 05/30/2015 - 05:30 नवीन
टका यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन... बर्‍याच जणांनी सल्ले दिले आहेत त्यामुळे मी वेगळा सल्ला काय देणार..? रिवर्स सेन्सर आणि कॅमेरा, मोबाईल स्टॅड आणि चार्जर ह्याच मला उपयोगी पडलेल्या अ‍ॅक्सेसरीज आहेत. मी left blind spot mirror पण वापरतो. पण याचा उपयोग wagan-R ला होणार नाही कारण tall boy design असल्याने डाव्या बाजूला ब्लाईंड स्पॉट तुम्हाला जाणवत नसावा. बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 05/30/2015 - 05:53 नवीन
बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.
गाडी झाडाखाली पार्क करु नये. कारण बाकीचा कचरा साफ करता येतो पण कावळे,कबुतर आणि इतर पक्षांनी केलेली घाण साफ करताना खूप त्रास होतो. निघता निघत नाहीत ते डाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ट
टवाळ कार्टा Sat, 05/30/2015 - 07:28 नवीन
गाडी झाडाखाली पार्क करु नये.
हा एकच उपाय आहे...माझी कार मोकळ्या जागेत आहे...ती स्वच्छ असते पण बाईक मात्र रंगून गेलेली असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
य
योगी९०० Sun, 05/31/2015 - 04:15 नवीन
गाडी झाडाखाली पार्क करु नये दुसरी जागाच नाही हो...सोसायटीत तिच जागा आहे..!! ज्यांच्या गाड्या झाडाखाली नाहीत त्यांवर देखील थोड्याफार प्रमाणात रंगरंगोटी केलेली असते. कव्हर टाकून उपयोग नाही कारण कव्हर टाकले तर गाडी वाचेल पण कव्हर खराब होईल. आणि कव्हर टाकले तर उंदीर आतमध्ये जाण्याची शक्यता वाढते. कबुतरांना घाबरवायला एखादे बुजगावणे चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा