Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करवंदं, उंबरं... मोदक आणि अर्थातच कोकण !

व
विशाल कुलकर्णी
Mon, 06/01/2015 - 12:07
💬 81
आपण खरंच नशीबवान आहोत. रोजच्या रामरगाड्याचा कंटाळा आलाय, थोडा बदल हवाय असे वाटले की फारशी धावपळ करावी लागत नाही. 'रजा मिळत नाही'यासारखी कारणे बायकोच्या तोंडावर फेकून तिचे वाकडे झालेले तोंड बघावे लागत नाही. कंटाळा आलाय तर दोन कपडे बॅगेत भरा आणि निघा.... सज्जनगड आहे, कोयनाडॅमचा परिसर आहे अगदीच एक-दोन दिवस हातात असतील आणि हाताशी स्वतःचे वाहन असेल तर मग कोकणही फार दूर नाही. गेल्या महिन्यात असेच झाले. बायकोला कधी नव्हे ते शनीवारची सुटी मिळाली तिच्या शाळेतून आणि रवीवार जोडून घेवून आम्ही दिवे आगारला कुच केले. सकाळी लवकरच घर सोडले. ताम्हिणीच्या रस्त्याला लागताना आजुबाजुचे कोरडे वातावरण बघून थोडा मुडऑफच झाला होता. पण जरा आत शिरल्यावर हळुहळू हिरवाई दिसायला सुरुवात झाली. त्यात एका ठिकाणी करवंदाची जाळी दिसली म्हणून थांबलो आणि मग हरवलेला मुड परतायला वेळ लागला नाही. प्रचि १ 1 प्रचि २ 2 खरेतर दिवेआगारला ज्यांच्याकडे उतरणार होतो त्या केळकरकाकुंना आधी फोन करून जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो असे सांगितले होते. पण ताम्हिणी घाटातला हा रानमेवा पाहून काकुंना परत फोन केला आणि आता काय जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे वाटत नाही असे सांगुन टाकले. पण काकुंनी , "काळजी करु नका, तुम्ही चार वाजता पोहोचलात तरी गरम गरम जेवायला वाढेन" असे सांगितले आणि आम्ही निश्चिंत झालो. प्रचि ३ कच्ची-पक्की करवंदे 3 प्रचि ४ हि फळे भलतीच टेम्प्टींग वाटत होती, पण नक्की काय आहे ते माहीत नसल्याने तोंडात टाकायचा धीर झाला नाही. 4 प्रचि ५ उंबर 5 प्रचि ६ 6 प्रचि ७ 7 प्रचि ८ 8 आजुबाजुला फिरताना हे दोस्तही सापडले ... प्रचि ९ 9 प्रचि १० 10 प्रचि ११ 11 शेवटी अकरा-साडे अकराच्या दरम्यान नाईलाजानेच तिथून बाहेर पडलो आणि माणगावच्या दिशेने कुच केले. यानंतर मात्र अध्येमध्ये कुठेच थांबलो नाही. करवंदं, उंबरं खाऊन पोटही बर्‍यापैकी भरलेलं असल्यामुळे आता जेवायला मुक्काम पोस्ट दिवे आगार गाठायचे असेच ठरवले होते. त्यानुसार दोन वाजेपर्यंत दिवेआगारला पोचलो. केळकरांचे हे केळकर भोजन आणि निवासगृह काही फार उत्कृष्ट वगैरे कॅटेगरीतले नाहीये. खरेतर ते साधेच आहे अगदी. पण त्यामुळेच तिथे घरचा फिल येतो. महत्वाचे म्हणजे कोकणच्या गाभ्यात राहात असुनही, स्वतः अस्सल कोब्रा असुनही केळकर कुटुंबिय कोब्रांना लाज आणतात. चक्क अतिशय प्रेमाने, मायेन विचारपूस करतात. स्वतःचेच गाडे पुढे न रेटता तुमचे म्हणणे ऐकुन घेतात. आणि महत्वाचे म्हणजे 'हे असलं काही आमच्याकडे मिळत नाही' असे वस्सकन अंगावर न येता 'ते' कुठे मिळू शकेल हे प्रेमाने सांगतात. ( हे आणि ते म्हणजे मांसाहारी अन्न)." केळकरांकडे त्यांच्या घराव्यतिरीक्त सहा-सात जादा खोल्या आहेत त्या ते पर्यटकांसाठी भाड्याने देतात. प्रत्येक खोलीत दोन कॉट, गाद्या, पंखे यासारखे जुजबी सामान असते. एसीची चैन इथे नाही. पण तरीही लोक केळकरांकडे यायला धडपडतात. त्याचे कारण म्हणजे काकुंकडे मिळणारे उकडीचे मोदक. ते तसे कोकणात सगळीकडेच मिळतात हो, पण आंब्यांच्या दिवसात काकुंकडे खास हापुसचे शाही मोदक असतात आणि अप्रतिम चवीचं शुद्ध शाकाहारी जेवण .... प्रचि १२ 12 प्रचि १३ केळकर निवास 13 बरं खोलीत गरम होतय म्हणून तुमच्यावर कोणी खोलीतच बसून राहा म्हणून सक्ती नाही केलेली काही. केळकरांची छान दोन एकराची वाडी आहे. कुठेही जावून पथारी पसरा. दिवे आगारला गेले की समुद्रावर फिरणे तर होतेच. पण माझा मुख्य प्रोग्राम असतो, काकुंकडून एक चटई घ्यायची आणि वाडीत जावून तोंड वर करून पडायचे. एखादे पुस्तक आणि जोडीला कधी तलत, तर कधी वसंतराव, कधी आशाबाई तर कधी अख्तरीबेगम असतातच. सुख म्हणजे तरी दुसरे काय असते हो? प्रचि १४ 14 प्रचि १५ 15 केळकरांकडे पोचलो आणि गरमागरम जेवूनच घेतले आधी. माफ करा मोदकांचे फोटो काढायला वेळ नाही मिळाला. (खरेतर बायकोने मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही काढून घेतला होता. आता आधी गपचूप, व्यवस्थीत जेव असा दम भरुन) तसेही समोरचे गरमागरम खास हापुसचे शाही मोदक पाहिल्यावर फोटो काढण्याचे भान आणि वेळही कुणाला होता म्हणा. केळकरांच्या वाडीत अजुनही बरंच काही आहे बरंका... प्रचि १६ फणस... 16 प्रचि १७ 17 प्रचि १८ 18 प्रचि १९ 19 प्रचि २० 20 प्रचि २१ 21 प्रचि २२ 22 प्रचि २३ 23 प्रचि २४ 24 प्रचि २५ 25 त्या दिवशीही संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर एक चक्कर झालीच. दिवे आगारच्या समुद्रकिनार्‍याची मात्र वाट लागलेली आहे आता. तिथे वॉटरस्पोर्ट्स सुरु झाल्यापासून सगळ्या किनार्‍यावर ती वाहने दिवसभर इकडून-तिकडे फिरत असतात. निवांतपणे समुद्रकिनार्‍यावर बसून सागराची गाज ऐकण्याचं सुख आता दिवे आगारमध्ये उपभोगता येत नाही. त्यासाठी मग तुम्हाला रात्री साडे सात-आठच्या नंतर बीचवर जावं लागतं. त्यावेळी लोकांची गर्दीही विरळ झालेली असते. त्यामुळे वॉटरस्पोर्ट्सवाल्यांचा धिंगाणाही कमी झालेला असतो. तरीही एखादा चुकार रेंगाळत असतोच शेवटची गिर्‍हाइके शोधत... प्रचि २५ 25 आम्ही सहा-साडे सहाच्या सुमारास गेलो होतो बीचवर. भास्कररावांना बाय-बाय केल्याशिवाय निघायचे नाही असे ठरवले होते. गर्दी कमी व्हायला लागली होती. प्रचि २६ 26 प्रचि २७ 27 प्रचि २८ 28 शेवटी भास्करराव अगदीच दिसेनासे झाल्यावर आम्हीही बीचचा निरोप घेवून परत केळकरांच्या घराकडे निघालो. मोदक वाट बघत होते. सकाळी लवकर उठून एक चक्कर समुद्रकिनार्‍यावर टाकायची, सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आणि मग साडे आठ-नऊच्या दरम्यान न्याहारी करून हरिहरेश्वराकडे प्रयाण करायचे. असा बेत होता. त्यानुसार सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान समुद्रकिनार्‍यावर येवून हजर झालो. समुद्रकिनार्‍यावर तसा उजेड होता बर्‍यापैकी, पण अजून सुर्यनारायणाचे आगमन झालेले नव्हते. आमच्यासारखेच सकाळची शुद्ध हवा खायला आलेले काही रसिक लोक दिसत होते. काहींचा व्यायाम सुरू होता, तर काही जण नुसतेच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होते. इतक्यात पुर्वा उजळायला लागली.. प्रचि २९ 29 पूर्वा उजळली तसे आसमंतही झळाळून निघाले.. प्रचि ३० 30 प्रचि ३१ 31 प्रचि ३२ 32 आणि तेवढ्यात सुर्यनारायणाने हजेरी लावलीच. प्रचि ३३ 33 प्रचि ३४ 34 आता काकुंच्या हातचे गरमागरम पोहे-उप्पीट जे असेल ते हाणायचे आणि हरिहरेश्वरला रवाना.... जाते-जाते एक सेल्फी हो जाये? 35 हरिहरेश्वरबद्दल पुन्हा कधीतरी... ! विशाल.

प्रतिक्रिया द्या
19760 वाचन

💬 प्रतिसाद (81)
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 14:23 नवीन
मनोज, पाऊस नाही म्हणता येणार, पण बर्‍यापैकी रिमझीम होती. एक जोराची सड सुद्धा येवून गेली घाटात शिरण्यापूर्वीच. करवंदाचे जे फोटो आहेत ते ताम्हिणी गाव सोडल्यावर एका ठिकाणी मध्येच मारुतीचे मंदीर आहे डाव्या बाजुला तिथुन एक कच्चा रस्ता आत जातो, त्या ठिकाणी काढलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 14:44 नवीन
रुपनारायण (गावातील लोक सुंदरनारायण पण म्हणतात),
नाही. रूपनारायण आणि सुंदरनारायण अशा दोन मूर्ती आहेत तिथे. सुंदरनारायणाचे देऊळ शेजारीच असून लहानसे आहे. हा सुंदरनारायण Image removed. आणि हा रूपनारायण Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 14:46 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 06/02/2015 - 14:47 नवीन
धन्यवाद.. कन्फ्युजन क्लियर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सुहास झेले Fri, 06/05/2015 - 08:47 नवीन
धन्स वल्लीशेठ !! मस्त फोटो रे विकु.. एकदम गारेगार वाटले :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 14:06 नवीन
एकच नंबर रे मित्रा !! बरं कधी गेलेलास ? परत एखादी ट्रीप करु पावसाळ्या नंतर !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 14:19 नवीन
नक्की रे प्रगो, नक्की जावुयात. पैसाताई, वल्ली रुपनारायणाच्या दर्शनाला मागच्या वेळी गेलो होतो. यावेळी फारसा वेळ हातात नसल्याने नाही जमले. पण ती जवळ-जवळ दिड मिटर उंचीची अदभूत म्हणता येइल इतकी देखणी मुर्ती विसरणे निव्वळ अशक्यच आहे _/\_ सर्वांचे मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 06/02/2015 - 14:39 नवीन
गोनीदांची "दर्याभवानी" नावाची एक शिवकालावरील कादंबरी आहे.. ती त्यांना दिवेआगर गावातील एका प्राचीन ताम्रपटावरून सुचली असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. हे शक्य आहे कारण गोनीदांचे मामा दिवेआगरातील होते (शां. वि. आवळसकर) तसेच ह्यागावाचे वैशीष्ट्य म्हणजे ह्याची रचना..समांतर रस्ते त्यांना छेद देणारे आंतररस्ते आणी त्यामुळे तयार होण्यार्‍या आयताकृती वाड्या.. तसेच गावात शिरल्यावर डावीकडे ब्राम्हणवस्ती आणी उजवीकडे ब्राम्हणेतर अशी रचना.. असो.. आता परत एकदा जायलाच हवे आगराला..तसे ह्याशेजारचे वेळास गावही तेवढेच अफलातून आहे पण थोडेसे पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षीत..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 14:45 नवीन
अगदी अगदी. दिवेआगरच्याच ताम्रपटाचे वर्णन त्यात आले आहे. आणि समांतर रस्ते आणि त्यांना छेद देत केलेली ही रचना पार गाव वसल्यापासूनची आहे. म्हणजे किमान १२००/१३०० वर्षे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 14:49 नवीन
तसे ह्याशेजारचे वेळास गावही तेवढेच अफलातून आहे पण थोडेसे पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षीत.. कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले गाव वेळासच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 06/02/2015 - 14:55 नवीन
नाय रे.. ते वेळास रत्नागिरीती जिल्ह्यातील आणी मोठे गाव आहे..हे अगदी सख्खे शेजारी आणी छोटेसे.. गावाच्या उत्तरेला जी खाडी आहे त्यापलीकडील गाव म्हणजे वेळास्..वेळासलाही असाच समुद्रकिनारा आहे पण छोटा आणी थोडा वक्राकार्.. पण दिवेआगरसारखे सरळ, ६ किमी लांब, समुद्राच्या पाण्यात शिरताना एकसमान आणी खडकविरहीत असे किनारे कोकणात तरी फारच कमी.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 06/03/2015 - 05:53 नवीन
ओह, मला तेच वाटलं. तिथे एकदा जायचय कासव महोत्सवाला हजेरी लावायचीय. बघू कधी योग येतो ते. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
प
पद्मावति Tue, 06/02/2015 - 18:49 नवीन
आंब्याचे मोदक......हे तर फारच युनिक आहे. कधी ऐकले नव्हते. मस्तच असणार...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/02/2015 - 22:01 नवीन
मस्त फोटु आणि लेखनही नेहमीसारखंच छान आहे रे, विशाल!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/03/2015 - 07:00 नवीन
गेल्या ऑगस्टात हरिहरेश्वर ते गणपतीपुळे हा सगळा पट्टा आतल्या रस्त्याने पालथा घातला होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. कोकणात कुठेही आणि कितीही वेळा जा, मन भरत नाही! तुझे फोटो आणि भटकंती जोरदार झाली रे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/03/2015 - 07:22 नवीन
सुंदर ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:17 नवीन
कोकणातल्या आंब्यासारखे गोड आणि फणसासारखे बाहेरून काटेरी दिसले तरी आतुन रसाळ असे लोक आहेत जसे हे केळकर... फार छान फोटोज आहेत☺☺
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/05/2015 - 08:21 नवीन
निव्वळ अप्रतिम , माझ्या सर्व कोकण ट्रीप आठवल्याच.. पण तुमचे फोटो खुपच क्लास आहेत
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/08/2015 - 08:48 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 06/09/2015 - 11:43 नवीन
मस्त झालय लेख.. >>पण आंब्यांच्या दिवसात काकुंकडे खास हापुसचे शाही मोदक असतात >> म्हणजे सारणात हापुस चा रस असतो की उकड काढताना हापुस चा रस घालतात.. फोटो नाही तर जरा वर्णन तरी करा म्हणजे प्रयोग करुन बघता येइल आम्हाला ;-)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 11:48 नवीन
म्हणजे सारणात हापुस चा रस असतो की उकड काढताना हापुस चा रस घालतात सारण करताना त्यात हापुस आंब्याचा चमच्याने किंवा चाकुने खरवडून काढलेला गर मिसळला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
स
स्मिता श्रीपाद Tue, 06/09/2015 - 12:10 नवीन
हापुस चा पल्प घालुन प्रयोग करुन बघणेत येइल.... :-)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 13:33 नवीन
आम्हाला पण बोलवा खायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
स
स्मिता श्रीपाद Tue, 06/09/2015 - 14:09 नवीन
मोदक चांगले जमले तर नक्कीच बोलवु....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Wed, 06/10/2015 - 06:05 नवीन
जमतील, जमतील ! आम्हां मिपाकरांना खायला बोलवायचे आहे हे ठरवून बनवा, मग आपसुक चांगलेच बनतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
य
योगेश आलेकरी Fri, 12/18/2015 - 19:07 नवीन
भारीय
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/18/2015 - 19:57 नवीन
हा धागा मिसला होता. आज हे सगळे मिस करत असण्याच्या वेळी बरोब्बर वर आला आहे. किती सुंदर आहे हे सगळे. मला कधी जायला मिळणार?
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sat, 12/19/2015 - 01:54 नवीन
फोटो क्रमांक ३१ सर्वात भारी
  • Log in or register to post comments
अ
अभय म्हात्रे Sat, 12/19/2015 - 04:21 नवीन
फोटो व वर्णण खुपच छाण केले आहात.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 12/19/2015 - 06:37 नवीन
वा विशालदा मस्त वाटले. अगदी कोकणात फिरल्यासारखे. प्रचि १०,११ कुडाची फुले प्रचि २५ मेहेंदीची फुले.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 12/19/2015 - 07:23 नवीन
धन्स जागु ! मला नावे माहीत नव्हती _/\_
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा