Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 06/04/2015 - 08:38
🗣 243 प्रतिसाद
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

प्रतिक्रिया द्या
57902 वाचन

💬 प्रतिसाद (243)
अ
असंका गुरुवार, 06/04/2015 - 11:52 नवीन
धन्यवाद हो ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलबेला सजन
आ
आदिजोशी गुरुवार, 06/04/2015 - 12:14 नवीन
एकंदर समाज व्यवस्था बघता हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरसकट सगळ्या मुलांना पैष्टीक आहार, उत्तम शिक्षण आणि भरपूर व्यायाम दिला की आपोआप सगळे काही वर्षात एका पातळीवर येतील.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 06/05/2015 - 08:48 नवीन
कृपया, असले सरळ मार्ग सुचवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/04/2015 - 12:48 नवीन
मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल. विज्ञान इतके प्रगत झालेच आहे तर मानव आणी इतर प्राण्यांच्या संबंधाने जीवनिर्मिती शक्य आहे का ते देखील बघावे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करावे. असे झाल्यास संपुर्ण प्राणीजगताची जनुकीय संरचना बदलुन जीवसृष्टीला त्याचा खुपच मोठा फायदा होइल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/04/2015 - 14:01 नवीन
आणि असे केल्याने समाजाला म्युटंट एक्समेनदेखील लाभतील तो एक वेगळाच लाभ झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/04/2015 - 15:27 नवीन
योग्य विचार. सध्या म्युटंट्स फक्त अमेरिकेत तयार होतात मग संपुर्ण ब्रह्मांडात तयार व्हायला लागतील. त्यांच्या सुपर्नॅचरल पॉवर्समुळे जगाचे कल्याण होइल. अर्रे देवा मनुष्याला हे आधी का नाही सुचले रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/04/2015 - 16:14 नवीन
हा मुद्दा विचारात घेणेबल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड गुरुवार, 06/04/2015 - 15:27 नवीन
मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल.
+१०*n रच्याकने, आपल्या देशाची सद्य लोकसंख्या, पोरांच्या शाळेच्या/कॉलेजांच्या फिया, वाढती स्पर्धा येवढे उपद्व्याप असूनही लोकांना अजूनही पोरेबाळे हवी असल्याचं वाचून हसावं की रडावं ते कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/04/2015 - 18:09 नवीन
जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं. आपण म्हणता तसे आंतर्देशीय विवाहही सुरु होतीलच ते आंतरधर्मीय विवाह म्हणुन आता मान्यता पावत आहेत आणि आजच्या जालीय युगात अधुन मधुन अशा बातम्या वाचायला मिळतातही. अशा गोष्टींसाठी चळवळ गरजेची असते. अशी चळवळ मग जातीभेद दुर व्हावेत म्हणुन सावरकरांनी लावलेले आंतरजातीय विवाह असतील किंवा ‘आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची चळवळीस प्रोत्साहन देणारे अंनिस‘चे संस्थापक-अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर असतील अशा आधुनिक विचारांशी बांधलेल्या गेलेल्या लोकांनी सतत काम सुरु ठेवले लोकांमधे जागृती केली आणि एक निकोप दृष्टी आता वाढू लागलेली दिसते, असे अनेक लोकनेते जन्माला येतील, काही लोकांना विचार पटू लागेल आणि असे विवाह पुढे वाढीस लागतील. संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. मानव वंशास फायदा होईल अशा गोष्टी भविष्यात होतच राहतील. कोणती जनुके मानवाच्या फायद्याची आहेत त्याचा विचार भविष्यात येईलच. मानवी शरीरातील पस्तीस हजार जनुकीय गोष्टी आहेत असे म्हणतात त्यातील काही मेंदु चेतसंस्था यासाठी कार्यरत असतात. मानवांच्या डोळ्यांसाठी, कानाने कितीतरी दुरवरचा आवाज ऐकु यावासाठी, पोक काढुन बसणा-यांसाठी भविष्यात विज्ञानाला जनुकीय बदल करावेच लागतील आंतरजातीय विवाहामुळे सहज काही जनुकीय बदल होणार असतील तर असे बदल होण्यासाठी आपल्याला काही विचार करायची आणि विरोध करायची गरज नसेल लोकच स्वत: अशा गोष्टीला तयार होतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 08:21 नवीन
जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं. तुमच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने हा धागा या वाक्यातच बाद करुयात असे नमूद करु इच्छितो. कारण जसे जगातले येउ शकत नाहित तसे भारतातलेही येउ शकत नाहित मग तर. आपण असा निराशावादी सूर आळवण्याची काहिच गरज नाही. आपण आपले ध्येय मोठे आणि सुस्पष्ट ठेउयात. जागतिक जनुकीय बदलाची ही नांदी ठरु देत. टांझानियाची अबेदा आणि कवठे महांकाळचे पाटील यांच्या संबंधातुन जनुकीय क्रांती घडवुन अवघे विश्व समृद्ध करणारी संतती निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहुन मानवजातीला प्रोत्साहन देत राहुयात हीच प्रभूचरणी प्रार्थना ( वैज्ञानिक दृष्टीकोनातुन जनुकीय क्रांती घडवुन आणली जात असताना प्रभूची प्रार्थना केलेली चालेला ना?). आमेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख
खटपट्या Fri, 06/05/2015 - 10:37 नवीन
जगातील सर्व लोकांनी एकत्र येउन काही केलं जाउ शकतं का की नाही हे माहीत नाही. पण माझ्या चार ते पाच वर्षाच्या परदेशातील वास्तव्यात मला काही गोष्टी कटाक्षाने जाणवल्या. १. गोरे लोक भारतीय मुलींशी लग्न करायला खूप उत्सुक असतात. माझ्या दोन सहकार्‍यांनी तेलगू मुलींशी लग्न केले होते. कारण विचारता "घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात" असे त्यांचे मत २. काही वयाने जास्त असलेल्या मुली/बायका भारतीय पुरषांशी लग्न करायला उत्सुक असतात. कारण विचारता "घटस्फोटाने कंटाळलेल्या असतात." अर्थात हे माझे मत, निरीक्षण आणि अनुभव आहे. ईतर लोकांचे निरीक्षण/मत वेगळे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 10:41 नवीन
"घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात"
नॉट एनीमोर, अप्यारंटलि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 10:47 नवीन
खिक्क...भारतीय मुली एक घाव दोन तुकडे करून संपवण्यापेक्षा टोचून टोचून स्लो डेथवर जास्त विश्वास ठेवतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कहर Fri, 06/05/2015 - 10:57 नवीन
+१ (जोडीदाराच्या ना ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
निनाद मुक्काम … Sat, 06/06/2015 - 23:29 नवीन
आयला अजाणतेपणी आम्ही ह्या महान कार्यात आपला खारीचा वाटा उचलला हे पाहून आमचे उर भरून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 06/04/2015 - 20:31 नवीन
@मृत्युंजय साहेब, तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया उपहासात्मक वाटली. आपल्याबद्दल मला माहिती नाही पण तरीही आपण जर बाहेर फिरला असाल तर हे पाहिलच असेल कि आंतरदेशीय विवाह हे होतच असतात आणि ज्यांना त्याचा फायदा होणार आहे, त्यांना होईलच! इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे तुमची प्रतिक्रिया संयुक्तिक वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
काळा पहाड गुरुवार, 06/04/2015 - 21:11 नवीन
ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे. म्हणजे बघा, पाकिस्तान मधले हाफीझ मसूद सईद यांची कन्या आणि अमेरिकेतले श्री. जेब बुश यांचे भाऊ यांचं लग्न केवळ जनुकीय गरजेसाठी करण्याबद्दल विचार करूया. किंवा सोमालियायाचे अब्दुल मोम्बासा (अतिशय गाजलेले माजी समुद्री चाचे) यांच्या कन्येचा विवाह श्री. शब्दबंबाळ यांच्या पुत्राशी ५० बकर्‍या आणि ५ म्हशी घेवून विवाह. फक्त जनुकीय गरजेसाठी हं. किती रोमांचक कल्पना ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 06/05/2015 - 04:11 नवीन
तुमचा मुद्दा : "ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे" त्यांच्या पूर्ण प्रतिक्रियेत अरेंज्ड किंवा लव्ह मॅरेजबद्दल एकही शब्द नाहीये. हा अर्थ आपण "सोयीस्कर"रित्या काढलेला दिसतोय. तुमची इतकी जळजळ का झाली हे कळाले नाही पण खाली मी लेखावर दिलेली प्रतिक्रिया वाचायचे कष्ट घेतले असते तर मी हि जनुकीय कारणासाठी लग्नाच्या कल्पनेला विरोधच दर्शवला आहे हे समजले असते तुम्हाला! आणि पुन्हा, इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे उगाच भरकटू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 07:27 नवीन
माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत लव्ह मॅरिज असेल तर प्रश्नच मिटला अश्या आशयाला एक उल्लेख होता. तो काप नी वाचलेला असावा. कदाचित आपण वाचलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 07:56 नवीन
मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन कदाचित पण इतके माहिती आहे की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात. आंतरजातीय विवाहांपेक्षा हे प्रमाण कमीच असेल. आता केवळ माझे मत खोडण्यासाठी एखादा निनाद मुकाम पोस्ट जर्मनीचे उदाहरण देइल पण ते अपवादात्मक उदाहरणच आहे. एकुण लोकसंख्येचा विचार करता अशी उदाहरणे कमीच. शिवाय आपण नीट लेख वाचला असता आपल्याला कळेल की लेख भारताबद्दल नसुन जनुकीय विकासाबद्दल आहे. त्यामुळे मी संकुचित विचार बाजूला ठेवायचा सल्ला देउन व्यापक दृष्टीकोन समजावुन सांगितला. आंतरदेशीय विवाहांचे देखील तेच फायदे असु शकतील जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे आहेत. शिवाय माणसाने फक्त माणसापुरता विचार का करायचा? त्याने आधिक व्यापक विचार केला तर संपुर्ण सृष्टीच जनुकीय दृष्ट्या समृद्ध होणार नाही का? आज तुम्हाला असले विचार टॅबू वाटतीलही कदाचित पण व्यापका हिताच्या दृष्टीकोनातुन हा विचार देखील झालाच पाहिजे. खासकरुन यामुळे जनुकीय क्रांती होणार असेल तर नक्की. तुम्ही विचार करा टांझानियाची लुलु आणि कवठे महांकाळचे पाटील (इथे नावे केवळ वानगी दाखल आहेत) यांच्या संबंधांनी एक अतिशय समृद्ध जनुकीय संतती निर्माण होणार असेल तर अश्या विवाहांना प्रोत्साहन द्यायला नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 06/05/2015 - 08:28 नवीन
तुमच आधीच वाक्य: " जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे." आंतरदेशीय विवाह :- जगातल्या भिन्न देशाच्या लोकांनी आपापसात केलेला विवाह मग इथे आता तुम्ही जे म्हणताय "की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात." त्याचा संबंध येतोच कुठे? मुळात तुमच्या प्रतिक्रियेमध्ये आंतरदेशीय विवाह हि कल्पना "फक्त" भारतीय लोकांसाठी मांडलीच नव्हती. म्हणून मी म्हणालो ज्यांना फायदा होणार आहे(जर काही असला तर) त्यांना होईल. आधी आपल्या देशात तरी मोकळेपणा येऊ दे लोकांच्या विचारात! आता लेखाच म्हणाल तर, "आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे" या वाक्याने सुरुवात झाली आहे आणि आपल्या इथे जनुकीय विकास कसा साध्य करता येऊ शकतो याविषयी लेखकाने स्वतःची मते मान्डली आहेत. अर्थात आपण पूर्ण जग बदलू इच्छित असाल तर माझा काहीही आक्षेप नाहीच आहे. पण तुमच्या प्रतिक्रियेत उपहासच जास्त दिसल्यामुळे मी माझे मत मांडले होते. बाकी वानगी दाखल उदाहरण देण्याची गरज समजली नाही, मी हि चांगली उदाहरणे देऊ शकतो पण जाऊ दे, आपल्यात तेवढा फरक राहून देतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 08:44 नवीन
१. मी जगातल्या भिन्न लोकांनी एकत्र येउन विवाह करण्ञाबाबत बोलतो तेव्हा त्यात भारतही येतो. भारत जगात येते असे मला इयत्ता पहिलीत शिकवले आहे. त्यामुळे इथे योग्य संबंध आहे. २. मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे, ३. लेखाची सुरुवात ज्या अनुषंगाने झाली आहे त्याच अनुषंगाने मी मत मांडले आहे आणि उदाहरणे दिली आहेत. ४. मी पुर्ण जग बदलु इच्छित आहे असे काही नाही. नाही असेही काही नाही. मी एक मत मांडले फक्त. ५. माझ्या प्रतिक्रियेत आपल्याला उपहास दिसला असेल तर त्याला मी काय करु शकतो? ६. उदाहरणे दिल्यामुळे मुद्दा नीट कळतो. ७. आपण माझ्यापेक्षा चांगली उदाहरणे देउ शकत असाल तर जरुर द्यावीत म्हणजे सगळ्यांनाच मुद्दे नीट कळतील. ८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
क
काळा पहाड Fri, 06/05/2015 - 09:08 नवीन
८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो
जनुकीय फरक? (काडी टाकण्याचे वगैरे आयकन्स कसे टाकायचे हो?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/05/2015 - 09:19 नवीन
>>>>>मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे, मला वाटतं व्यापक भुमिकेपेक्षा प्रतिसाद उपरोधाने भरलेला होता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 09:27 नवीन
असे तुम्हाला वाटते. त्यातली व्यापक भूमिका तुम्ही लक्षात का घेत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 06/04/2015 - 13:54 नवीन
@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/04/2015 - 15:23 नवीन
मी एकदम सेन्सिबल विचार मांडला आहे. काय चुकीचे आहे त्यात? मी तुमचाच प्रतिवाद अजुन थोडा पुढे नेला आहे इतकेच. भारतातले आंतरजातीय / धर्मीय विवाहाल प्रोत्साहन मिळाले पाहिजे तसे इतर गोष्टींना का नको? आणी त्याहीपुढे जाउन माणसाने फक्त माणसाचाच विचार का करावा मग? तुम्हीच जरा सेन्सिबल विचार करा. प्लीजच्च्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
कहर Fri, 06/05/2015 - 08:23 नवीन
१००% सहमत… धाग्यावर जसा आंतर उपजातीय किंवा आंतर पोटजातीय विवाहाच्या (जे अजून नीटसे होत नाहीत ) पुढे जाउन आंतरजातीय / धर्मीय विचार मांडला असेल तर त्याही पुढे जाउन आंतरदेशीय / आंतर खंडीय (प्रचंड जनुकिय विविधता ) विवाहाच्या विचारला काहीच हरकत नसावी र च्या क ने … समजा सहा फुटीय मी तुमच्या धागाकर्त्याच्या उदाहरणाप्रमाणे तीन फुटीय मुलीशी आंतर उंचीय विवाह केला तर होणाऱ्या साडे चार फुटीय अपत्याशी विवाह करण्यासाठी माझ्यासारख्या आंतर विचारांची साडेसहा फुटीय व्यक्ती मिळेल का ? (आणि तीन फुटीय व्यक्तीशी विवाहाचे दूरगामी परिणाम नंतर होतील पण नजीकगामी रोज रातीय (दूष:) परिणाम श्री अमिताभ बच्चन साहेबांना विचारावेत का ? कारण पित्याशी याच चर्चेनंतर श्री अभिषेक बच्चन साहेबांनी राणी मुखर्जी बाईसाहेबांशी विवाह तहकूब केल्याचे ऐकिवात आहे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ग
गुलाम गुरुवार, 06/04/2015 - 14:41 नवीन
@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. तुमच्या वैतागामागे लेखकाच्या एकांगी प्रतिसादाचा इतिहास आहे हे माहिती आहे. तरीही मूळ लेखामध्ये तसा काही सूर नसताना विनाकारण हा विषय आणून चर्चा भरकटवणे खटकले. तुमच्या मिपावरच्या एकंदर लिखाणाबद्दल आदर आणि संयत प्रतिवाद करण्याच्या क्षमतेबद्दल विश्वास असल्यामुळे हे सुचवण्याचे धाडस केले. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/04/2015 - 14:58 नवीन
सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
म
म्हया बिलंदर गुरुवार, 06/04/2015 - 16:24 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विनोद१८ गुरुवार, 06/04/2015 - 15:05 नवीन
@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.
हे बरोबर, आता मुळ धाग्याला सोडुन थोडेसे विषयांतर होइल असे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे या 'तथाकथीत पुरोगामांच्या' इतिहासाकडे जर पाहिले तर अगदी असेच दिसून येइल. माझ्या मते, पुरोगामी होण्याची पहिली पायरी ही नेहमीच फक्त आणि फक्त हिंदुद्वेश्टेपणा अंगात मुरविल्याशिवाय ओलांडता येत नाही. येथे हिंदुद्वेश्टेपणा म्हणजेच ब्राह्मणद्वेष्टेपणा असा घ्यावा. म्हणुनच कदाचित असे तुम्ही समजता तसे प्रतिसाद येत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ह
हाडक्या गुरुवार, 06/04/2015 - 15:11 नवीन
बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब
साहेब ?? असो.. तुमचा प्रतिसाद मान्यच. बॅट्याने तसाही बेनिफिट ऑफ डौट्ट दिलाच आहे नंतर. तेव्हा सर्वांनीच कोणताही विशिष्ठ जाति-उल्लेख मग तो तथाकथित उच्चवर्णीय अथवा इतर कोणत्याही जातीचा असेल तो टाळावा.
लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.
त्या दोघांनाही ओळखत नाही मी. तरी देखील इतक्या विनम्रतेची काहीही गरज नव्हती असे नमूद करतो. उगी ते नाटकी वाटतं. आणि तुम्ही इतकेही काही कोणास दुखावणारे बोललेले नाही आहात. बॉटम लाईन म्हणजे, जालावर कोणी लहान मोठा नै. बॅट्या कालिजात जाणारा पोरगा असेल आणि मी साठीतला प्रकांड पंडित असेन तरी माझ्या न पटलेल्या प्रतिसादाची तो पिसे काढू शकला पाहिजे आणि vice versa.. (जालावर मान-अपमान घेऊन येऊ नयेत असे मानणारा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ग
गुलाम Fri, 06/05/2015 - 07:58 नवीन
आदर हा वयाचा नाही ज्ञानाचा आहे. मिपावर असे काही आयडी आहेत ज्यांना काही सुचवताना किंवा प्रतिवाद करताना अशी विनम्र होण्याची ईच्छा होते. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/04/2015 - 15:20 नवीन
आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आनंद अहे. परंतु या प्रतिसादात माझे नाव का आले ते कळाले नाही. मी तर माझ्या प्रतिसादात कुठेही ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे म्हटलेले नाही (ते तसे नाहितच असे काही मला म्हणायचे नाही पण ते तसे आहेत असे मी तरी कुठेही म्हटलेले नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
न
नाखु गुरुवार, 06/04/2015 - 15:53 नवीन
असेलही पण माणूस ताक सुद्धा फुंकून पितो म्हणून बॅटमण ने प्रतीपादले असावे असा कयास आहे. आणि ही गोष्ट जालावरही लप्प्न राहिली नाहीच अगदी आजच्या ताज्या घडामोडीत याचा उल्लेख आहे. नक्की काय खरे कारण आणि सुरवातीसच संशयाचा फायदा असा स्पष्ट उल्लेख असताना पुढील प्रतीसादाची गरज नसावी. हाडक्या साहेब आपण दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल अभिनंदन पण असे शेरे ऐकायची सवय झाल्याने मी सुद्धा बॅटोबाच्या प्रतिसादाला अनुमोदन दिले. आप्ल्या सर्वंकश भूमीकेचे स्वागतच आहे. नेमस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ह
हाडक्या गुरुवार, 06/04/2015 - 18:14 नवीन
हाडक्या साहेब
ऑ ..? कय चुकलं माकलं कय हो काका ? नका हो साहेब वगैरे म्हणू असे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गुलाम Fri, 06/05/2015 - 07:52 नवीन
तुमचे नाव या प्रतिसादामुळे आले. तुमच्या नेहमीच्या तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ लेखनाच्या प्रतिमेला छेद देणारा युक्तिवाद वाटला तो. कारण मुळात कुणी सरसकट ७ किंवा ५ असणार नाही. प्रत्येकामध्ये काही गोष्टी ५ रँकींगच्या तर काही ७ रँकींगच्या असतात. मुळ लेखनात असे दोन वेगवेगळ्या जेनेटीक पूल मधून आलेल्या पालकांच्या मुलांना दोघांच्यापण चांगल्या (७ रँकींगच्या) जीन्सचा फायदा होऊ शकेल असे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 08:06 नवीन
भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. मी माझ्या प्रतिसादात (ज्याचा तुम्ही उल्लेख केला आहे) ब्राह्मण शब्द कुठे वापरला आहे. तसेच ग्रेटथु़ंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे कुठे म्हटलेले आहे (ते तसे नाहितच असे काही माझे म्हणणे नाही पण ते तसे आहेत असे मी कुठेही म्हटलेले नाही) हे कृपया दाखवुन द्या अन्यथा माझा उल्लेख गैरसमजातुन आला आहे असे मान्य करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करु इच्छितो. मी कुठल्याही पुरोगाम्याला माझ्या सदर प्रतिसादार ब्राह्मण द्वेष्टा म्हटलेले नाही (हॅविंग सेड दॅट, ग्रेटथु़ंकर पुरोगामी आहेत की नाहित याबद्दलही मी काही मतप्रदर्शित केलेले नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ग
गुलाम Fri, 06/05/2015 - 11:38 नवीन
लेखक ब्राह्मण्द्वेष्टा असल्याचा आरोप आपण केला नाही हे मान्य. परंतु आपला प्रतिसाद अकारण पुर्वग्रहदुषित व अतार्किक वाटला. दोघांना वेगवेगळा प्रतिसाद देण्यापे़क्षा एकच प्रतिसाद देण्याचा आळस केला कारण मला दोघांनाही एकच विनंती करायची होती की लेख कोणी लिहिला आहे यापेक्षा काय लिहिला आहे हे बघुन उत्तर द्या आणि पुर्वग्रह ठेवु नका. तार्किक प्रतिसादाचे सुंदर उदाहरण खाली इस्पिकच्या एक्का यांच्या 'या लेखातले अनुमान सरळधोपट आहे' प्रतिसादामध्ये दिसते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 11:45 नवीन
ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम वरच्या प्रतिसादाची लिंक उद्धृत केलीये. तो प्रतिसाद पहा आणि ठरवा की ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत किंवा नाहीत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
श
शब्दबम्बाळ Fri, 06/05/2015 - 12:22 नवीन
अहो पण जरी आपण मान्य केल कि ते ब्राह्मणद्वेष्टे आहेत तरी त्यांच्या या लेखात त्यांनी कोणत्याही जातीवर टिप्पणी केलेली नाहीये. ज्या संकेतस्थळावर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती, ती योग्य नव्हती आणि तिथे त्यावर टीका - टिप्पणी झालीच असेलच! पण हा धागा मिपावर आहे, आणि धाग्यातील "मुद्द्यांवर" चर्चा होणे अपेक्षित आहे, जे काही लोक करत आहेत…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 13:31 नवीन
वैज्ञानिक दृष्टीकोनातुन माझा प्रतिसाद कसा अतार्किक आहे हे कोणी समजावुन सांगितल्यास मी तद्नुषंगाने दुरुस्ती करायला तयार आहे. अन्यथा माझा प्रतिसाद ही ग्रेटथु़ंकरांच्या धाग्याच्या आशयाला अनुसरुनच आहे. त्यांनी जो युक्तिवाद केला आहे त्याचा मी विस्तार केला आहे एवढेच. त्यांच्या लोककल्याणकारी योजनेचा मी विस्तार केला आहे. एका विधानाने भौगोलिक सीमा मोडुन तो विस्तार घडवुन आणल आहे तर दुसर्‍या विधानाने मानववंशाने अप्पलपोटा विचार सोडुन देउन समस्त प्राणीवर्गाचा आणि जीवसृषटीचा विचार केला आहे. त्यात योग्य तिथे "शक्य असेल तर" वगैरे शब्दांचा उपयोग करुन विचारांना केवळ एक दिशा दिली आहे. धाग्यावरचा प्रतिसाद केवळ मूळ युक्तिवादाचा विस्तार आहे. धाग्यातील युक्तिवादाच्या अनुषंगाने मी लिहिलेले कसे आणि किती चुकीचे आहे हे कळाले तर त्यात नक्की बदल करता येतील असे मी आपल्याला आश्वासन देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/04/2015 - 14:57 नवीन
मुद्दा पटणारा. भविष्यकाळात जनुकीय गरज म्हणुन असे विवाह होतील की नै माहिती नाही. परंतु भविष्य काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह होतील कारण सामाजिक चौकटी आणि परंपरा यांच्या पायर्‍या खचू लागल्या आहेत. धर्माच्या बाबतीत अतिशय कट्टर असलेले तो कोणताही समाज असू देत, परंतु आता त्यांनी असला कट्टरपणा सोडून दिलेला दिसतो आणि लवचिक धोरण स्वीकारलेले दिसते. प्रेमविवाह करणार्‍यांची संख्या आता वाढत चालली आहे. मुला-मुलींचे लग्न आता पालकांच्या काळजीचे विषय झालेले आहेत. धार्मिकता आणि परंपरेच्या जोखडात बांधुन घेतलेल्यांनी आपल्या मुलीने चांगला कर्ता धर्ता मुलगा निवडला ना, याचा आनंद पालकांच्या मनात दडलेला दिसतो. लोक काय म्हणतील याचं दडपण असतं पण आता त्या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करायला लागले आहेत, मला वाटते, जनुकीय बदलांसाठी नाही, पण भविष्यात आपण म्हणता तसे जनुकीय बदल नक्की दिसून येतील असे मला वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/04/2015 - 15:51 नवीन
या लेखातले अनुमान सरळधोपट आहे, पण वस्तूस्थिती इतकी सोपी नाही. जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही... माता आणि पित्याकडून येणारी (सरमिसळ होणारी) जनुके कोणत्या प्रकारची आहेत त्यावर मुलांची जनुके कशी असतील हे अवलंबून असते. ही सरमिसळ स्वैर (random) असल्याने, मातापित्यात लग्नापूर्वीचे जवळचे कौटुंबिक-जातीय-धार्मीक संबध नसल्यास त्यातून नेहमी अथवा बहुतेक वेळेस उत्तम जनुकीय संच तयार होईल हे म्हणणे तार्किक नाही. कारण प्रत्येकी अंदाजे २४,००० जनुके असलेल्या मातृ आणि पितृ या दोन संचांची व्यवहारात अगणित परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स होतात ! त्यातला केवळ एकच संच एका मुला/मुलीत असेल. तो उत्तमच असेल याची खात्री कशी काय असेल ? मात्र, मातापित्याच्या जनुकीय संचांत वेगळेपणा जेवढा जास्त तेवढे रिसेसिव जनुकीय आजारांचे तोटे टळण्याची शक्यता नक्कीच वाढते... रिसेसिव जनुकिय आजारांमध्ये मानवाच्या जनुकाच्या जोडीतले एक रोगकारक व दुसरे आरोग्यपूर्ण जनुक असल्यास, त्या एका रोगकारक जनुकामुळे रोग पुढच्या पिढीत संक्रमित होउ शकतो, पण तो रोग सद्यपिढीत प्रकट होत नाही (डॉर्मंट राहतो). प्रयोगशाळेतील परिक्षणांत अश्या रोगांची चाहूल (trait) लागू शकते पण तो रोग आस्तित्वात (manifestation) येत नाही. असे रोग आस्तित्वात येण्यासाठी जनुकाच्या जोडीतील दोन्हीही जनुके रोगकारक असणे आवश्यक असते. जवळच्या नातेवाईकांमध्ये बरीच जनुकिय समानता असणे ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांत लग्ने झाल्यास त्यापासून होणार्‍या संतत्तीला मातेकडून एक आणि पित्याकडून एक अशी एकाच प्रकारच्या रोगकारक रिसेसिव जनुकांची जोडी मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थातच, जवळच्या (पहिल्या, दुसर्‍या अथवा तिसर्‍या स्तरांच्या) नातेवाईकात लग्न करण्याची प्रथा असलेल्या समाजांत काही रिसेसिव जनुकिय आजारांचे प्रमाण सर्वसामान्य जनतेच्या मानाने जास्त दिसते. त्याविरुद्ध, खूप दूरचे नातेवाईक असलेल्या अथवा कौटूंबिक संबंध नसलेल्या स्त्री-पुरुषांच्या (जनुकिय वैविध्य असण्याची शक्यता असणार्‍या) संबंधाने रोगट जनुकांची जोडी बनण्याची शक्यता कमी होऊन मूल निरोगी असण्याची शक्यता वाढते. आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांत रिसेसिव रोगकारक जनुकिय जोडी बनणे अधिकच कठीण असते त्यामुळे मुलांत रिसेसिव जनुकिय रोगांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता खूपच वाढते... परंतु, अश्या विवाहातील संतत्ती नेहमीच आणि सर्वप्रकारे/बहुप्रकारे शारीरीकदृष्ट्या जास्त सबळ, जास्त निरोगी अथवा जास्त बुद्धिमान होईलच असा त्याचा अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/04/2015 - 15:57 नवीन
अजून एक... आंतरजातीय, आंतरधर्मिय किंवा आंतरराष्ट्रीय विवाहांमुळे बदलणार्‍या आर्थिक-सामाजिक-भौतीक परिस्थितीच्या नविन पिढीवर होणार्‍या परिणामाची आणि त्या पिढीला मिळणार्‍या नविन संधीचाही नविन पिढी कशी विकसित होईल यावर परिणाम होत असतो. जनुकिय आजार सोडले तर व्यक्तीचा विकास त्याच्या जनुकिय संचाइतकाच त्याच्या भोवतालच्या परिस्थितीने दिलेल्या संधी आणि/अथवा उभी केलेली आव्हाने यावर अवलंबून असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या गुरुवार, 06/04/2015 - 18:28 नवीन
+१ .. एक नंबर हो एक्का काका.( हेच लिहिणार होतो पण इत़कं नीट जमलं नसतं. ;) ) हे उत्तर धाग्याचे सार आहे. सगळे मुद्दे नीट मांडलेले आहेत. पुढची चर्चा यावर व्हावी अन्यथा नाही झाली तरी चालू शकेल असं वाटतंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
शब्दबम्बाळ Fri, 06/05/2015 - 10:15 नवीन
प्रा डॉ आणि आपला अतिशय उत्तम आणि समतोल प्रतिसाद! कंपूबाज लोकांनी हल्ली सेन्सीबल चर्चा करण्याची काही सोय ठेवली नाहीये… त्यामुळे अशा प्रतिक्रिया ओअसिससारख्या वाटतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चिनार Fri, 06/05/2015 - 10:46 नवीन
समतोल प्रतिसाद ! सहमत ! असाच काहीतरी माझा मत होतं पण ते शास्त्रीय भाषा जमेना ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पैसा Fri, 06/05/2015 - 09:14 नवीन
लेखात लिहिलेली परिस्थिती एक शक्यता आहे. पण हे असे मुद्दामहून ठरवून केले जाईल याबद्दल शंका आहेच. आणि
जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही..
. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि इसाडोर डंकन यांच्यातल्या "his beauty and her brains" या कथित चकमकीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा