Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 06/04/2015 - 08:38
🗣 243 प्रतिसाद
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

प्रतिक्रिया द्या
57902 वाचन

💬 प्रतिसाद (243)
ल
लालगरूड गुरुवार, 06/04/2015 - 16:01 नवीन
भारतातील जात व्यवस्था बदला.. दाखले वगिअरे ठिकाने जात लिहने बंद करा.सर्व लोकाना सामान वागणूक, आरक्षण बंद करा.सर्वाना माफक दरात शिक्षण वैद्यकीय सेवा दिले गेले पाहिजे. तेव्हाच भारत धर्मं निरपेक्ष होइल.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 06/04/2015 - 16:09 नवीन
तुम्हाला 'जातनिरपेक्ष' म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ल
लालगरूड गुरुवार, 06/04/2015 - 16:17 नवीन
दोन्ही पण चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 06/04/2015 - 16:15 नवीन
जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय विवाह करा असं सुचवायचं असेल तर हा तर्क फक्त पाच दहा वर्ष चालेल. कारण एकदा CRISPR Cas9 साराखी जनुकामध्ये हवे तसे बदल करणारी यंत्रना प्रचलित झाली की तुमचे रेसेसिव्ह दोष काढूण टाकता येतील, आणि जेनेटिक्सवाले डिझायनर बेबीज तुम्हाला देण्याची स्वप्न दाखवयला लागली आहेत. एकदा ते झालं कि मग आंतरजातीय विवाहाची गरज राहाणार नाही असा निष्कर्ष काढायचा का? जातीभेद अमानविय आहेत इतकं सरळ सांगता येत असताना, उगाच विज्ञानाची अर्धी अधुरी ढाल वापरायचा प्रयत्न काही समजला नाही. बाकी जेनेटिक्समधल्या संकल्पना शास्त्रोक्त म्हणून फार विश्वासानं वापरू नका. कारण बहुतांश गोष्टी असोसियेशन लेव्हलला अडकल्या आहेत. त्याची कारण मिमांसा अजून व्हायला वेळ आहे.
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Fri, 06/05/2015 - 07:00 नवीन
रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार??? डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही,ती जेव्हा येईल तेव्हा तुमचे म्हणणे ग्राह्य मानता येईल ,तोपर्यंत आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Fri, 06/05/2015 - 12:18 नवीन
रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार???
जिन एडिटिंग वापरून.
डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही
डिझायनर बेबीसाठी जनुकांची साखळी कशाला निर्माण करायला लागते? आहे तो जनुक एडिट करून काम नाही का चालणार? तुमची काही तरी गफलत होते आहे. खालील माहिती वाचा डिझायनर बेबी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 12:27 नवीन
ग्रेटथुंकरांपुढे लॉजिक म्हणजे नेपाळच्या नेव्ही मिनिस्टरपदासारखे आहे. वट्ट उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
ग
ग्रेटथिंकर Fri, 06/05/2015 - 13:05 नवीन
आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी कन्सेप्टमुळे human gene pool वर विपरीत परिणाम होतील असे लिहले आहे .नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Fri, 06/05/2015 - 13:09 नवीन
आता चर्चा अतार्किक होत आहे. इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ग
ग्रेटथिंकर Fri, 06/05/2015 - 13:14 नवीन
अतार्कीक कशी .जीन एडीट करता येऊ शकतो ,पण मी लेखात दिल्याप्रमाणे एक गुणधर्म ठरवणारे शेकडो जनुकं असतात, पैकी डीझायर्ड जनुक कसे बनवणार? अजुनही प्रयोगशाळेत जनुकं बनवता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Fri, 06/05/2015 - 18:05 नवीन
जीन डिनएवर असतो आणि डिनए एडिट करता येतो. नवीन निर्माण करायचा अट्टाहास कशापायी? नवीन प्राणी निर्माण करायचा आहे का? गर्भामध्ये डिनए असतो की राव. त्याला बदलायचं. नवीन कशाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ख
खटपट्या गुरुवार, 06/04/2015 - 16:59 नवीन
खूप चांगली चर्चा चालू आहे.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड गुरुवार, 06/04/2015 - 17:06 नवीन
आंतरजातीय असो किंवा स्वजातीय विवाह असो प्रत्येकाला आपला जोड़ीदार निवडन्याचे स्वातंत्र्य हवे. चार दिवस जगलो तरी आनंदाने जगता आले
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 06/04/2015 - 20:26 नवीन
माझ्या मते लग्न हि केवळ अपत्य जन्माला घालण्यासाठी केलेली गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जोडीदाराबद्दल काहीतरी अपेक्षा असणार आणि जर त्या बर्यापैकी पूर्ण होत असतील तर लग्न होण्याची शक्यता! अर्थात हि गोष्ट झाली शहरातली आणि त्यातही सुधारलेल्या म्हणजे तथाकथित उच्च अथवा उच्चेतर (नीच कसे काय म्हणावस वाटत…) असूनही शिक्षित समाजाची… गरिबी आणि अज्ञानात राहणाऱ्या लोकांना कसली आलीये निवड! मुळात जात आणि लग्न या दोन्ही व्यक्तीच्या अत्यंत खासगी गोष्टी असल्या पाहिजेत. मुद्दामहून आंतरजातीय/धर्मिय विवाह करणेसुद्धा चुकीचेच होईल, हा पण ते करण्याची दोघांची तयारी असेल तर त्याला होणारा विरोध मात्र कमी व्हायला हवा… मला जातीवाचक उल्लेख नको वाटतो पण हल्ली मिपा वर ब्राह्मण या विषयावर बरीच चर्चा सुरु असते, त्याचा इतिहास वगैरे जाणून घ्यायची इच्छा नाही पण एकदाच जे कोणी ब्राह्मण विरोधी(असले तर) आणि समर्थक असतील त्यांनी एखादा धागा उघडून चर्चा करून विषय संपवावा!
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Fri, 06/05/2015 - 04:25 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे Fri, 06/05/2015 - 07:15 नवीन
जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही. हे म्हणण्यासाठी आपल्या जवळ कोणता पुरावा किंवा विदा आहे. जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न झाल्याने अनुवांशिक रोग जास्त होतात हे मान्य आहे. परंतु एकाच जातीत असलेले जनुकीय सारखेपण अजून तरी सिद्ध झालेले नाही (माझ्या माहितीप्रमाणे मी चूक असू शकतो) वर म्हटल्याप्रमाणे ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही). एका अनुसूचित जातीचे पुढारी मला पुण्यात एका सभेत म्हणाले होते कि आमच्या मुलांनी ब्राम्हण मुलींशी लग्न करायला पाहिजे. मी विचारले साहेब तुमच्या मुलीनी मग ब्राम्हण मुलाशी लग्न करायला पाहिजे.त्यावर ते म्हणाले अहो तिने ब्राम्हणाशी लग्न केले तर तिच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही पण मुलाने ब्राम्हण मुलींशी लग्न केले तरी आमच्या नातवंडाना आरक्षण मिळेल. (शेवटी राजकारणी हे डोम कावळे असतात)परन्तु ते जे म्हणाले त्यातून स्वार्थी असे विदारक सत्य मात्र उघड झाले असो. आंतरजातीय/ धर्मीय विवाह व्हायला पाहिजेत( खरं तर एक पुरुष अन स्त्री या दोनच जाती असाव्यात आणि लग्न त्यांनी स्वखुशीने करावे) या बाबत मी सहमत आहे पण त्यासाठी जनुकीय आवश्यकतेच्या शिखंडीच्या आड राहून लढायची गरज नाही किंवा जीन पूल वगैरेच्या कुबड्याची गरज नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 06/05/2015 - 07:57 नवीन
ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)
डॉक्टर साहेब, हे वाक्य थोडंसं विचित्र वाटतंय, कारण चिंपांझी आणि मानव यांच्यात फक्त ४% जनुकीय फरक आहे. http://genome.cshlp.org/content/15/12/1746.full
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 06/05/2015 - 08:31 नवीन
फरक हा शब्द variation चे भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. माझे म्हणण्याचा उद्देश दोन भावांमध्ये असलेला फरक किंवा दोन माणसांच्या गुणसूत्रात, जीन्स मध्ये असलेला फरक असा असुन दोन जैविक प्रजातीन्मधील नाही. gene, allele, trait इ चे भाषांतर कसे करावे ते समजत नाही. यात जरा गोंधळ झाला आहे. तो दूर झाला कि तुम्हाला मी सांगेन. तोवर भावना समजून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मदनबाण Fri, 06/05/2015 - 08:04 नवीन
ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही). डॉक, कर्‍हाडे मंडळींच काय बुवा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Fri, 06/05/2015 - 08:18 नवीन
हा... हा... हा... हे मिपावरच पहिल्यांदा वाचलं होत मी ! मला वाटत झाशीची राणी, सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी हे "कर्‍डाडे" ब्राम्हण होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कहर Fri, 06/05/2015 - 07:53 नवीन
म्हणजे IT मधल्या मुला मुलींनी एकमेकात लग्न केल्याने ते IT जनुक त्यांच्यापुरतेच मर्यादित रहाते. याउलट IT किंवा तत्सम उच्च शिक्षित व्यावसायिकाने BA / BCom अशा बँक किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकाशी लग्न केल्यास जनुक (आणि पगारही ) योग्य रीतीने वाटला जाउन समाज समजनुकीय आणि समआर्थिक अशा समान पातळीवर येण्यास मदत होणार नाही का ? (IT / BA / BCom /बँक / शिक्षक हे शब्द केवळ नमुना दाखल आहेत. विचार करताना उच्च शिक्षित /उच्च व्यावसायिक आणि नीच शिक्षित / नीच व्यावसायिक ((नीच : तुलनात्मक शब्द) असा करावा ) ता क: या आधीही कोणत्यातरी धाग्यावर अशीच काहीशी चर्चा झाल्याचे स्मरते (IT व्यावसायिक नसलेल्या अल्पसंख्यान्कातील एक ) कहर
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 07:56 नवीन
याला फोडणी देउ का? आयटी मधली मुलगी बीए अथवा बीकॉम झालेल्या मुलाबरोबर लग्न करेल? (मुलाचा पगार मुलीपेक्षा कमी असेल तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 07:53 नवीन
जातींचा आणि जनुकांचा संबंध असतो???
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 10:23 नवीन
इतकी चर्चा सुरु आहे पण मी विचारलेल्या बेसिक प्रश्नाला (सोयिस्कर??) बगल??? नै म्हणजे माझ्या समजूतीनुसार इतक्या जाती आहेत त्या सर्व लोकांच्या कामाच्या/व्यवसायाच्या सातत्यामुळे तयार झालेल्या पण सोनार, न्हावी, ब्राम्हण, मराठा, शिंपी, चांभार, आणि बर्याच अठरापगड जाती, ईत्यादी ईत्यादी जातींमध्ये जात स्पेसिफिक जनुक असते???? असे असेल तर मग त्या जनुकांमुळे आपण भारतीय बाकी जगातल्या सर्व माणसांपेक्षा या सर्व व्यवसायांत कुशल असायला हवे कारण बाकी जगात या जातीच अस्तित्वात नैत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चिनार Fri, 06/05/2015 - 08:20 नवीन
ग्रेट थिंकर साहेबांनी विचार करण्यासारखा धागा सुरु केला आहे. जनुकशास्त्रातला मला काहीही कळत नाही पण हा धागा वाचून काही प्रश्न पडले आहेत. जनुकावर भौगोलिक परिस्थिती आणी वातावरणाचा काही प्रभाव असतो का ? दक्षिण भारतीय लोक (आंध्र आणि तामिळनाडू ) हे प्रामुख्याने कृष्णवर्णीय असतात (वर्णभेद करण्याचा उद्देश नाही ). मग तो मुस्लीम असो /हिंदू ब्राह्मण /मराठा असो / ख्रिस्चन असो. याचा अर्थ वर्णाशी संबंधीत जनुक त्या सगळ्यांमध्ये आहे असा होतो का ?. हीच गोष्ट उत्तर भारतीय मुलींची ज्या गोऱ्या आणि सुंदर असतात मग त्या कोणत्याही धर्माच्या असो. ज्यावेळी जातीव्यवस्था अस्तिवात नव्हती (म्हणजे अगदी सुरवातीच्या काळात) त्यावेळी तर जनुके सारखीच विभागल्या गेली असतील. त्यामुळे जनुकांच्या सगळ्याच जोड्या किंवा प्रकार प्रत्येकच जाती /धर्मात असतील का ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 06/05/2015 - 09:35 नवीन
चिनारजी गूगलवर eugenics , Euthenics हे शब्द टाकून पहा तुमच्या प्रश्नाचे वैज्ञानीक उत्तर तेथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
क
काळा पहाड Fri, 06/05/2015 - 09:14 नवीन
@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.
ग्रेटथिंकर साहेब, हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? http://www.aisiakshare.com/node/2449#comment-43122
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 09:20 नवीन
ठ्ठो =)) ग्रेटथुंकरसाहेबांचं कळलं काय ते. बहुत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 09:26 नवीन
ग्रेटथुंकर साहेबांचा नक्की प्रॉब्लेम कळाला आता. याला ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणावे काय? प्राडाँचे याबद्दला काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
श्रीगुरुजी Fri, 06/05/2015 - 14:55 नवीन
>>> ग्रेटथिंकर साहेब, हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? ब्रिगेडी पुरूषोत्तम खेडेकरच्या एका ब्राह्मणद्वेषी पुस्तकातले विखारी लेखन आणि या कॉमेंटमधील विचार यात कमालीचे साम्य आहे. खेडेकरने त्या पुस्तकात ब्राह्मण स्त्रिया व पुरूष यांविषयी अत्यंत किळसवाणे लेखन केले आहे. नानासाहेब नेफळेने कितीही वेगवेगळे आयडी घेतले, माईसाहेबांचा आयडी वापरून सभ्य लेखनाचे बेअरिंग जपले आणि पुरोगामित्वाचा कितीही जाड बुरखा वापरला तरी त्याच्यात लपलेला ब्रिगेडी अचानक बाहेर येतो तो असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
ग्रेटथिंकर Fri, 06/05/2015 - 15:52 नवीन
गुरुजी लेखावर चर्चा करा ,ब्रिगेडी बामसेफी राहु द्यात बाजुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 06/07/2015 - 14:49 नवीन
लेखक आणि लेखाच्या मागची मूळ प्रेरणा ब्रिगेड आहे. त्यामुळे ब्रिगेड चर्चेत येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ध
धर्मराजमुटके Fri, 06/05/2015 - 09:26 नवीन
प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय चाळणीतून गाळू नका ! अरे उद्या लग्न करायचं ठरवलं तर मुलामुलीचा रक्तगट, मलमुत्राचे, वीर्याचे सँपल्सच तपासत बसणार काय ? आपल्याला जी व्यक्ती आवडली तिच्याशी लग्न केले इतकी सोप्पी गोष्ट असू शकत नाही काय ?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 06/05/2015 - 09:31 नवीन
'देशस्थ म्हणजे बेशिस्त' असा समज कोणी निर्माण केला . तो खरा आहे का ? तसेच बरयाच दक्षिणी सिनेमांमधल्या हिरोची नायिका मात्र नॉर्थ ( युपी , महाराष्ट्र ) प्रदेशांतुन आयात केलेली असते असे का ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 09:36 नवीन
देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ = कंजूस, माणूसघाणे हे दोन्ही स्टिरिओटैप एकमेकांनी बनवलेले असण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सुनील Fri, 06/05/2015 - 11:05 नवीन
नुकताच वॉट्सअ‍ॅपवर आलेला विनोद - कोकणस्थ आणि देशस्थ ह्या दोघांकडील जेवणाचे निमंत्रण स्वीकारू नका! कारण कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल, हे सांगता येणार नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
H
hitesh Sun, 06/07/2015 - 03:07 नवीन
अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळुनी देशस्थ निर्मियला. स्वस्तात स्वस्त समस्त वस्तू मिळुनी कोकणस्थ निर्मियला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
य
यमगर्निकर Fri, 06/05/2015 - 11:13 नवीन
वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे. आणि जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे. जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य यांनि एखदि धर्मसंसद बोलाऊन धर्मातिल जातिव्यवस्था नष्ट करायचे मनावर घेतले तर काय अवघड आहे. जातिव्यवस्था नष्ट होने हे हिंदु धर्माच्या बळकटिसाठि आवश्यक आहे. आणी ति नष्ट झालि तरच हिंदु धर्म टिकेल. यासाठि हिंदु धर्मातिलच लोकांचा दबाव होने आवश्यक आहे. जातिव्यवस्था नष्ट झाली तर आपोआपच आरक्षण रद्द होइल व्होट बँकेचे राजकारण बंद होइल आणी ग्रेटथिंकर म्हणतात तसे जनुकिय द्रुष्ट्या आपला समाज सम्रुध्द होइल.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 06/05/2015 - 11:53 नवीन
मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे.
जशी की?
जातिव्यवस्था बळकट झालि
म्हणजे नक्की काय झालं?
जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे.
म्हणजे जातिव्यवस्था आधीपासूनच होती आणि ती फक्त बळकट झाली? समाज जातिव्यवस्था (जी आधीपासूनच होती) ती बळकट होण्यापूर्वी विभागला गेला नव्हता म्हणजे काय? मग जातिव्यवस्था होती म्हणजे तो आधीपासूनच विभागला होता ना?
जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य
१. आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य आहेत हे नक्की का? कारण तसं असतं तर बरेच हिंदू साईबाबांना कसं मानत असते? २. सर्वोच्च नेत्याला फतवा (धर्माधिकार?) काढायचा अधिकार असतो. असा धर्माधिकार शंकराचार्यांनी कधी काढलाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 06/05/2015 - 18:13 नवीन
तुमचा ह्या धाग्याशी काय संबंध? तुम्ही लिइरी वाली ना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर
म
मदनबाण Fri, 06/05/2015 - 11:22 नवीन
ज्यांना विवाह विषयात अधिक "मेंदू" खर्च करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खाली खुराक देउन ठेवतो:- मनुस्मॄति :- अध्यात तिसरा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 06/05/2015 - 11:56 नवीन
अशा चर्चा फक्त मराठी लोकांतच होऊ शकतात. तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/05/2015 - 12:01 नवीन
तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू. Haryana’s crisis: Bridegrooms all decked up, but no one to marry

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/05/2015 - 13:00 नवीन
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे ! १. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!! २. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!! ३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच. भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच. ====== हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्‍या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली. नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अ‍ॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्‍यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्‍यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अ‍ॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अ‍ॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे. (अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्‍या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना आणि (आ) एक मानववंश दुसर्‍या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही; गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे. ====== जनुकशास्त्रिय सत्ये... १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. २. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो. ३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो. ====== "लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये... १. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत ! २. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्‍या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ? ३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्‍यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्‍यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते. समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.
  • Log in or register to post comments
G
gogglya Fri, 06/05/2015 - 14:37 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 15:15 नवीन
अर्रे देवा म्हणजे इतकावेळ चाललेली चर्चा फुकाचीच म्हणायची का? आम्ही निघालो होतो एका नविन जनुकीय संरचनेच्या निर्मितीत आणि हा खोडा आला. आता कशी काय सुदृढ जनुके तयार होणार? आंतर्जालीय, आंतर्धर्मीय, आंतरदेशीय, आंतरबीस्टीय वगैर वगैरे विवाहांना चालना देउन काहीच का उपयोग नाही म्हणजे? महत्तम कार्यात नसते खोडे घालणार्‍या तुमच्यासारख्या लोकांमुळेच पृथ्वी रसातळाला चालली आहे असे नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाव आडनाव Sun, 06/07/2015 - 06:15 नवीन
१. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. अर्र..... ते ५ आणि ७ पण चुकलं का काय? त्यानन्तर ०*०, ०/०, undefined, अनंत अशी बरीच मोठी आकडेमोड झाली ना भौ. ती पण चुकलीच बहुतेक :) ५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे आता ते "बलिदान" पण चुकलं का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 06/08/2015 - 09:19 नवीन
बघा ना. सग्ळेच चुकले. आता काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
स
सुबोध खरे Fri, 06/05/2015 - 16:26 नवीन
एक्का साहेब तुम्ही तर लोकांच्या चड्डीलाच हात घालता एकदम !!! हे म्हणजे ग्रेट थिंकर सिक्सर मारायला गेले आणी तुम्ही मागून त्यांना यष्टीचीत( STUMPED OUT) केलेत कि हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sat, 06/06/2015 - 07:44 नवीन
एक्कासाहेबांना दंडवत, यापेक्षा अचूक काहीच असू शकत नाही. लेख प्रचंड गंडलेला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. (आणि हो, आम्ही लेख कुणी लिहिला यापेक्षा काय लिहिलंय यालाच महत्त्व देतो बरंका..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा