Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाटा नॅनो कार घ्यावी काय ?

अ
अक्षरमित्र
Fri, 06/05/2015 - 16:56
🗣 151 प्रतिसाद
नमस्कार. मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे. माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा. जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये. नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत. इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा. टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.

प्रतिक्रिया द्या
46756 वाचन

💬 प्रतिसाद (151)
ध
धमाल मुलगा Mon, 06/08/2015 - 20:23 नवीन
तुमची गरज तुम्ही खालीलप्रमाणे नमुद केलेली आहे:
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.
तर, ह्या गरजेनुसार तुम्हाला चारचाकी ही लांबच्या प्रवासासाठी नसून 'सिटीकार' ह्या वर्गवारीत मोडणारी हवी आहे असं दिसतं. ह्या निकषांवर उतरणारी दुसरी गाडी मला तरी दिसत नाही. (महिंद्राची एक अशीच छोटी चारचाकी आहे, पण तिचे रिव्ह्यू वगैरे ठाऊक नाहीत, अन नॅनोइतकी विकलीही गेलेली नाही.) माझी २०१२ ची नॅनो LX झक्कास चालतेय. रोजचे जवळपास ७० कि.मी.(घर-हापिस-घर) आणि दोनेक महिन्यांतून पुणे-बारामती चक्कर अशी दामटली जायची. काहीही अडचण नाही. वर काही प्रतिसादात वाचल्याप्रमाणे मागच्या सीटवर गरम वारं लागणं, इंधनाचा वास येणं वगैरे अनुभव आले नाहीत उलट ताकदवान एसीमुळं गाडी पटकन थंड होते. हां, आता इंजिनाचा आवाज येतो बॉ बाहेरच्यांना, पण आपण खिडक्या लावल्या अन एसी चालू केला की आपल्याला काही येत नाही बॉ आवाज. आरामदायीपणाबद्दल (कंफर्ट) बहुतांश तुलना असतात, पण मुळात ह्या गाडीचं सेगमेंटच वेगळं आहे त्यामुळं तिची तुलना अगदी इतर हॅचबॅक्स / स्मॉल कार्ससोबतही होऊ शकत नाही. नेमकी तिथेच चूक करतो आपण अन मग नॅनोमध्ये कमतरता आहे वगैरे म्हणतो. सिटी(पुरती)कार म्हणल्यावर, जे काही हवं आहे ते जवळपास सगळंच आहे. रोजचं अंतर कापण्यात दुचाकीवरुन ये-जा करणं आणि नॅनोमधून ये-जा करणं ह्या निकषावर ती तुलना व्हावी असं मला वाटतं. ऑटो-ट्रान्स्मिशनची नॅनो घेतली तर उत्तमच. निदान २०१२ च्या गाड्यांमध्येतरी क्लच बराच त्रासदायक होता. बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये असताना डावा पाय दुखायला लागेल की काय असं वाटण्याइतपत क्लच घट्ट/हार्ड होता. जर सुरुवातीच्या नॅनोपेक्क्षा २०१२ ची इतकी चांगली असेल तर २०१५ची ऑटो-ट्रान्समिशनची तर अधिकच उत्तम असेल असा माझा अंदाज. तस्मात, घ्या बिन्धास्त. तुम्ही काय गाडी घेऊन रस्त्यात शिटा भरुन वाशी-पुणेस्टेशन अशी लाईन लावणार नाही ना? मग सगळं येवस्थित असतंय, नका जास्त विचार करत बसू. ह्याच धाग्यावर बर्‍याच नॅनोमालकांनी फर्स्टहँड अनुभव सांगितले आहेत ते वाचा न ठरवा. हाय काय अन नाय काय! :)
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 06/09/2015 - 14:13 नवीन
च्यायला.. लै भारी धागा आहे हा. लै मोठेमोठे लोक हजेरी लावताहेत.. रा.रा.श्री. धमुपण अवतरले.. ;-) नॅनोचा फर्स्टहँड अनुभव नाही.. पण आमच्या शिलाँगात भारी चढ-उतार असणार्‍या रस्त्यांवर नॅनोंना बुंगाट पळतांना बघतोय रोज.. त्यामुळे तिच्या ताकदीबद्दल शंका नसावी.. बाकी आम्हीपण टाटा गाडीवालेच असल्याने पार्शल तर आहोतच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
क
केतकी Tue, 06/09/2015 - 08:31 नवीन
सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी आहे? आजकाल बाकी गाड्यांमधे ABS, Airbags वगैरे फीचर्स येतात, यात तसं काही आहे का? पुढे इंजिन नसल्यामुळे जर समोरुन जोरात धडक बसली तर चालकाला गंभीर इजा होण्याची शक्यता इतर गाड्यांच्या तुलनेने जास्त नाहीये का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 06/09/2015 - 08:51 नवीन
हा प्रश्न नॅनोच्या बाबतीत अप्रस्तुत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केतकी
र
रॉजरमूर Wed, 06/10/2015 - 22:30 नवीन
काय केतकी ताई nano बाबत चर्चा चाललीय ऑडी विषयी नाही . हे सगळे फीचर्स हवे असतील तर ऑडी घ्या . एकदम latest proven लेडी सलमान खान . कालच इस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वर एका वकिलीण बाई ने ओम्नी ला तुडविले . ओम्नी चा भुगा करून २ जणांचे वरचे तिकीट कापले . पण या बाईंना साधे खरचटले पण नाही . कारण ? या बाई ऑडी चालवत होत्या . वाचा . लेडी सलमान खान काहीही हं श्री मी शिकलीय गाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केतकी
ख
खटासि खट Tue, 06/09/2015 - 19:52 नवीन
नॅनो मला आवडत नाही. तिचा मागचा लूक सिक्स सीटर रिक्षा पेक्षा कमी नाही. अधांतरी लटकल्यासारखी वाटखीरी सायलेखीरीची नळकांडी धूर ओकताना फार वाईट दिसते. तोच पाईप ग्रीव्हजच्या सिक्स सीटरप्रमाणे वर नेता नेता राहीला की काय अशी शंका येते. समोरून सुद्धा फारसा चांगला लूक नाही. आत बसल्यावर मात्र चांगला फील येतो हे नक्की. आवाज अजिबात डिसेंट नाही. सहाशे सीसीच्या इंजिनला चौदा ते सोळा मायलेज मिळणं हे काही चांगलं लक्षण नाही. या पेक्षा ८००सीसी / १००० सीसीची अल्टो चांगली. शेवीची १००० सीसीची स्पार्कसुद्धा खूप चांगली. स्पार्कला ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे. त्यात्यामधे ही लेगस्पेस भरपूर आहे (उंंचावर बसत असल्याने). सीएनजी वर अल्टो हायवेला ३४ -३६ तर स्पार्क २८ + असा मायलेज देते. सेकंड हँड कार्सची किंमत खूप कमी आहे आणि या कार्स आहेत सुद्धा चांगल्या. बाकी, तुम्ही ऐकावे जनाचे.. या उक्ती प्रमाणे तुम्हाला आवडेल ती कार घ्याल म्हणा. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 06/10/2015 - 04:13 नवीन
१४-१६??? मी २५ चा आकडा ऐकला एकाकडून. प्रत्यक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 08:12 नवीन
m.cardekho.com/maruti/maruti-alto-k10-mileage.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 06/11/2015 - 13:48 नवीन
मी न्यानोची गोष्ट करतोय. १४-१६ च्या आकड्यावर आश्चर्य दाखवतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 02:12 नवीन
@ वेल्लाभट चौदा ते सोळा हा या धाग्यावर आदुबाळ यांनी सांगितलेला मायलेज आहे. अनेक दिवसांपासून ती पोस्ट आहे. कुणी चॅलेंज न केल्याने तो बरोबर असावा या समजुतीने स्विकारला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 08:16 नवीन
Copy paste kara m.cardekho.com/maruti/maruti-alto-k10-mileage.htm Alto k १०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 08:59 नवीन
सीएन्जी अल्टो हायवेला ३४ -३६ देते ? कोणाची हो ? तुमची की "माझ्या एका मित्राची " ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 09:38 नवीन
मी स्वतः चालवलेली गाडी ४१ देताना पाहिली आहे. ९ किलो ला साधारण ३७५ किमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 07:46 नवीन
Kapil muni, Kay farak padato kapilmuni ( maayboli varche Iblis ka?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 07:57 नवीन
Meet punyat ९.५ kg gas bharala. Ghat sodun itaratra ac vaparala. Pune to satara avg speed ७०. Traffic can diversions. Sahara te nipani speed ११०. Tank ajara chya pudhe empty jhala. Trip Meyer २८० kms. Gas bhartana ०० reading set kelela. Car - spark. Mazya sobat santro gala hota tyala ३० molala mileage. Punyat mitrane sangitala ki Alto ३४ dete. Mazyakade alto nahi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
क
कपिलमुनी गुरुवार, 06/11/2015 - 08:58 नवीन
माझे १७६० डुआयडी आहेत. सर्व मराठी संस्थळांवर मीच आलटून पालटून प्रतिसाद देत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
य
यशोधरा Fri, 06/12/2015 - 10:49 नवीन
हैला! तुमचा व तुमच्या आयडींचा १ + १७६० पूस्प्गुच देऊन जंगी सत्कार करण्यात येत आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
इ
इरसाल Fri, 06/12/2015 - 12:28 नवीन
पूस्प्गुच च्या पेटंट्चे बील कवाधरनं तुमच्या नावावं फाटलं म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सुबोध खरे Wed, 06/10/2015 - 09:35 नवीन
आल्तो CNG २२ किमी देते ARAI च्या आदर्श परिस्थितीत आणी शहरात १३-१५ देते. तेंव्हा ३५-३६ देते हे सांगणारा स्वतः ला फसवत आहे कि लोकांना फसवत आहे कि मारुती कंपनीला हे कळत नाही. राहिली आल्तो ची गोष्ट. CNG लावला तर गाडीची शाळेती कमी होते वातानुकूलन आहे कि नाही अशी शंका असावी इतपत चालते. माझ्याकडे मारुती ८०० होती( अल्टो हि तिचीच बहिण आहे ) आणी माझ्या वडिलांकडे नॅनो आहे. नॅनोचे सर्वात मोठे फायदे म्हणजे आतमध्ये अल्टो पेक्षा जास्त जागा आहे आणी त्याची वातानुकुलन यंत्रणा अतिशय उत्कृष्ट आहे.आणी मी महिन्याच्या दुपारीसुद्धा आतमध्ये थंडावा आहे. याच्या तुलनेत आल्टोची वातानुकुलन यंत्रणा जेमतेम आहे. नॅनोच्या आतमध्ये इंजिनचा आवाज अजिबात येत नाही कि मागच्या सीट वर गरम होत नाही. फक्त नॅनोला डिकी जेमतेम आहे त्याचे स्टीअरिंग घट्ट आहे. पण जर पॉवर स्टीअरिंग असेल तर नॅनो चालविणे हा एक आराम दायक अनुभव आहे. नॅनो मधून तिन्ही बाजूचा रस्ता स्पष्टपणे दिसतो आणी शहरातील भरगच्च रस्त्यावर हि गाडी चालविणे हे अल्टोपेक्षा नक्कीच जास्त सोपे आहे. हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत. जाताजाता ३५-३६ CNG वर अव्हरेज मिळत असेल तर मी होण्डा युनिकोर्न विकायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 10:45 नवीन
(काळा पहाड यांचा)अल्टोचा अ‍ॅव्हरेज ४१ पर्यंत पोचला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/11/2015 - 03:25 नवीन
http://www.caranddriver.com/reviews/volkswagen-xl1-concept-first-drive-review २६१ माईल्स पर गॅलन. वोल्क्सवॅगन एक्स.एल.१ कन्सेप्ट कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 08:04 नवीन
@ Dr Subodh Khare m.cardekho.com/maruti/maruti-alto-k10-mileage.htm Navin alto che engine efficient aahe. Tumchi ALTO kadhichi he paha. Tasech continual kit aahe ka te pan paha.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 08:07 नवीन
ARAI cha report kuthaly year cha,aahe ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
स
सुबोध खरे गुरुवार, 06/11/2015 - 15:21 नवीन
http://www.carwale.com/marutisuzuki-cars/alto800/mileage/ माझा प्रतिसाद वरील दुव्यावरून होता.येथे सी एन जी चे मायलेज २१. ९८ दिले आहे. हि एक माझी चूक झाली कि मारुतीचे अधिकृत आकडे दिले नाहीत. http://www.marutisuzuki.com/alto800.aspx येथे ते पहा. परंतु मारुतीच्या अधिकृत जाहिरातीत तेच ३०.४६ आहे. यात केंद्र सरकारच्या वाहन विषयक नियमानुसार केलेल्या चाचण्यात मिळालेले मायलेज आहे. हे वाहनाच्या टायरची हवा बरोबर हवी. त्यातील वंगण व्यवस्थित व्हिस्कोसिटी चे हवे, बाहेरील तापमान ५-३२'सेल्सियस हवे, सरळ सपाट रस्ता, ताशी वेग ४०, वार्याचा वेग ४० किमी पेक्षा कमी गाडी ३०० किमी चालवलेली हवी अशा अनेक अटीनुसार केलेले असते. तेंव्हा या अटी प्रत्यक्ष वापरात असणे अशक्यच आहे. आणि साधारणपणे प्रत्यक्ष वापरत हे २५ ते ४० टक्के कमीच मिळते जास्त नाही. आपण एक गल्लत करीत आहात ती म्हणजे आपण आल्तो k १० ची तुलना न्यानो बरोबर करीत आहात. आपण तुलना अल्टो ८०० शी करणे आवश्यक आहे के सिरीज ची इंजिने नवीन श्रेणीतील आहेत आणि हे इंजीन खरं तर वैगन आर चे इंजिन असून ते अल्टोला लावले आहे.हे ९९८ सी सी चे इंजिन असून त्याची शक्ती ६८ बी एच पी आहे ( पहिल्यांदा हि अल्टो १.१ होती जिला वैगन आरचे १०६१ सी सी चे इंजिन होतेआणि त्याची शक्ती ६४ बी एच पी होती ).तेंव्हा मारुती अल्टो के १० ची तुलना नानो बरोबर करणे म्हणजे घोडा आणि गाढवाची तुलना करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 17:36 नवीन
तुलना कशाशी करावी असं काही या धाग्यावर ठरलेय हे दिसलेलं नाही. १. मी स्पार्कचा स्वतःचा अनुभव दिलेला आहे. २८० किमी मधे फक्त घाट सोडून इतर अंतर एसी लावून. २०० किमी धरा. जर एसी नसता तर ३० च्या वर मिळाला असता मायलेज. २. मित्राची कार बहुधा हुंद्याईची आय १० होती. मी सँट्रो म्हटलेलं आहे. ३. पुण्यात आल्यानंतर सीएनजी च्या मायलेबद्दल सांगितलं असता मित्राने त्याचा अनुभव सांगितला. त्याची नवी अल्टॉ आहे. मी अल्टो असंच म्हटलेलं असताना तुमचा प्रतिसाद अगदीच जाहीर निर्भत्सना केल्याच्या थाटात आलेला दिसला. त्याबद्दल मी खंत, खेद, निषेध वगैरे लोकशाही आयुधं न वापरता फक्त फॅक्टस ठेवल्या आहेत. ४. मी दिलेली लिंक मोबाईल वरून दिलेली आहे. तीत सीएनजीचा मायलेज ३२.४ दिलेला आहे. आणखी एक दोघांचे अनुभव असेच आहेत. जुन्या कारची तुलना का करावी ? ५. मारुतीची सेलेरिओ ही १००० सीसी ची सीएनजी कार हायवेला ३१.७ इतका मायलेज देते. तिचं डिझेल वर्जन २७.८ इतका मायलेज देते. ते ७९३ सीसी इंजिन आहे. पेट्रोल चं ७९३ सीसी इंजिन २३ - २४ मायलेज देते. जर या कारला बाहेरून सिक्वेन्शिअल किट बसवून घेतलं तसुही सुद्धा निश्चित ३२ च्या पुढे मायलेज देईल. ६. आता घोडा आणि गाढवाची तुलना इथपर्यंत प्रगती झालीच आहे तर हळू पळणा-या कमी गर्दभशक्तीच्या गाढवाने कमी खाल्ल पाहीजे, तर जास्त अश्वशक्तीच्या घोड्याने जास्त खाल्लं पाहीजे. पण जर गाढव जास्त खात असेल आणि घोडा कमी खाऊन जास्त कार्यक्षमता दाखवत असेल तर विचार करायला पाहीजे, ६०० सीसी च्या कारला इंधन कमी लागेल की १००० सीसीच्या ? बाकी सगळं ठीक आहे टायर मधे हवा आहे. मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. बकरीला पिल्लं झाली. दोन कोंबड्या खुडूक झाल्या. ओढ्यावरचा पूल वाहून गेला आहे. पण आम्ही तिथपासून २५० किमी अंतरावर राहत असल्याने फारसा धोका नाही. काळजी करू नये. आपला ६०० गदर्भशक्तीचा झोपाळू नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/11/2015 - 18:10 नवीन
६०० सीसी च्या कारला इंधन कमी लागेल की १००० सीसीच्या ?
चुकीच्या पद्धतीने विचारलेला प्रश्ण. इंजिन लाँगॅटिव्हीटी हा मुद्दा फाट्यावर मारुन जर का लिन मिक्स्चर दिलं तर १००० सी.सी. च्या गाडीला ६०० पेक्षा कमी इंधन लागेल असं ट्युनिंग करुन घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 18:21 नवीन
६०० सीसी च्या इंजिनला ट्युनिंग का करू नये ? फक्त १००० सीसीच्या इंजिनलाच का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सुबोध खरे गुरुवार, 06/11/2015 - 20:59 नवीन
जाऊ द्या साहेब तुमचा इगो दुखावला असेल तर माफ करा. पण मूळ मुद्दा त्यांचे बजेट ३ लाख पर्यन्त आहे. त्यात येण्यासारखी गाडी म्हणजे नवी नानो आहे जुन्या सी एन जी अल्टो के १० पेक्षा ती बरी पडेल असे मला वाटते. राहिली गोष्ट आपण मला कारदेखो चा दुवा दिलात मी आपल्याला कारवालेचा दुवा दिला. ते सर्व इतर लोक आहेत. परंतु मारुती कंपनीचा दुवा जर ३० चे मायलेज म्हणत आहे तर कंपनी आपले मायलेज कमी का दाखवेल? बकरीला पिल्ल झाली कोंबड्या खुडूक झाल्या हा आपला इगो दुखावला असल्याची लक्षणे दाखवतात. मी मारुती कंपनीने दिलेल्या आदर्श परिस्थितीतील मायलेज मोजण्याच्या पद्धतीबद्दल लिहिले आहे. जी मोटार वाहतूक कायद्याप्रमाणे असावी लागते. अशी आदर्श परिस्थिती फक्त कागदोपत्री उपलब्ध असल्यामुळे प्रत्यक्ष शहरात मिळणारे मायलेज हे २५ ते ४० टक्के कमी असते. एका धाग्यावर हेरो च्या मोटार सायकलचे मायलेज १०३ म्हणले आहे हे असह आदर्श परिस्थितीत आहे. प्रत्यक्ष त्यांना फक्त ७०-८० इतकेच मिळते. असो मुंबईत आल्तो के १० सी एन जी ची किंमत ४ लाख ६८ हजार आहे. तेंव्हा तीन लाखाच्या आत दुसर्याने वापरलेली चांगली अल्टो के १० मिळणे जरा कठीणच आहे. म्हणून हि तुलना अनाठायी आहे असे वाटले. ४. ६८ आणि २. ५ लाखाच्या गाडीची( नानो) तुलना घोडा आणि गाढव अशी केली ती कदाचित चूक झाली पण हीच तुलना सफरचंद आणि संत्र अशी करायला हवी होती. राहिली गोष्ट आपण टोयोटा प्रायसपण सुचवू शकता.आपल्याकडे अल्टो नाही पण तरीही आपण ऐकीव माहितीवर वाद घालू इच्छिता. माझ्याकडे मारुती तसेच नानो या दोन्ही गाड्या असून मी त्यांची सर्व्हिस पासून सगळे स्वतः पाहिलेले आहे. मी सांत्रो किंवा स्पार्कबद्दल काहीच म्हणत नाही. जो माणूस त्यांना सेकंड hand गाडी विकतो तो बर्याचवेळेस त्यात काहीतरी कटकट असल्याशिवाय विकणार नाही. अशी कटकट असलेली गाडी आपण स्वानुभव नसताना का घ्यायला सांगता आहात हे कळले नाही? असो मी काही इंजिनियर नाही तेंव्हा आपण जास्त बरोबर असाल ठीक आहे माझी चूक मान्य करतो आणि वाद संपवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 21:26 नवीन
इगो दुखावला हे मला माहीत नव्हतं. गाढव आणि घोडा असा नॅनोचा प्रवास सुरू झाल्याने मजा केली फक्त. खरं म्हणजे आपण असा दावा करणारा मनुष्य स्वतःला फसवतोय का, की इतरांना की मारुतीला असा दावा करून १८ चं मायलेज दिलं होतं. आता आपणाला अल्टो ८०० चं मायलेजही १८ च्या पुढे असल्याचं लक्षात आलंच असेल. १८ आणि ३० मधे फरक आहे. ह्सर्वात महत्वाचं, ज्या पोस्टला आपण उत्तर देताना इतकी अ‍ॅग्रेसिव्ह भाषा वापरली आहे, त्या पोस्ट मधे ३ लाखामधे सेकंड हँड गाडी येईल असं म्हटलं आहे. स्पार्क २ लाखात मिळते. तीन लाख बजेट आहे हे ध्यानात असल्याने तसं लिहीलं होतं, ज्याला आपण अमूक तमूक तुलना करू नये असं म्हटलेलं आहे. ते कशासाठी हे अजून गुलदस्त्यातच आहे. किमान कारण तरी जाणून घ्यायचं होतं. मला नॅनो आवडत नाही म्हणून मी असा सल्ला दिला. सिंपल. मनाला लावून घेऊ नका आणि उत्तेजित होऊ नका. शुभरात्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जिन्क्स Fri, 06/12/2015 - 08:08 नवीन
स्पार्क २ लाखात मिळते कौनसे देश मे??? भौ स्पार्क ची किम्मत ४ लाखाच्या खाली नाही. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=130054150&t=1-3181
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 09:17 नवीन
Pura Padha karo bhai. This will save your precious time.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 21:32 नवीन
बरं इनोव्हा माझ्याकडे खरेच आहे. मी त्यांना तसं म्हटलेलं नाही कारण इनोव्हा काही तीन लाखात मिळत नाही. आपण खूप घोळ घालत आहात. मित्राने दिलेली माहीती ऐकीव आणि तुम्ही दिलेली माहीती मात्र ऑथेंटिक असा भेदभाव का बुवा ? की मित्राने इथे लिहीलं की ती लिखीत माहीती होऊन ऑथेंटिक होते ? लॉजीक कळेल का यामागचं ? मी आपल्याला एक सोडून चार ठिकाणचे दाखले दिलेले आहेत. हायवे मायलेज म्हटल्यावर शहरात किती चालते हे कशासाठी ? की हा सारा शब्दच्छल पहीली पोस्ट बरोबरच होती यासाठी ? आता पुन्हा एकदा माझी मूळ पोस्ट वाचा , त्यावर तुमचं उत्तर वाचा आणि आता काय म्हणत आहात हे ही वाचा. आपली रजा घेतो बरं का डॉक्टरसाहेब. नाहीतर आणखी काही दुखावले जाईल हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 06/12/2015 - 06:32 नवीन
मित्राने दिलेली माहीती ऐकीव आणि तुम्ही दिलेली माहीती मात्र ऑथेंटिक असा भेदभाव का बुवा ? की मित्राने इथे लिहीलं की ती लिखीत माहीती होऊन ऑथेंटिक होते ? लॉजीक कळेल का यामागचं ? मी आपल्याला एक सोडून चार ठिकाणचे दाखले दिलेले आहेत. ऑथेंटिक किंवा विश्वासार्ह हि मारुती कंपनीचीच म्हणायला पाहिजे (ज्यांनी ती कार बनवली आहे) . ते तर आदर्श परिस्थितीत ३० च म्हणताहेत. वर त्याच्या खाली तारांकित डीस्क्लेमरही आहे. मग शहरात किंवा हाय वे वर ३६ देणाऱ्या मित्राचेच आपल्याला बरोबर म्हणायचे असेल तर तसं आपण मान्य करून टाकू. बाकी इनोव्हा किंवा सांत्रो किंवा स्पार्क चे येथे प्रयोजन मला कळले नाही. असू द्या. माझ्या मंद बुद्धीमुळे असेल. किंवा फाटे कसे फोडतात ते माहिती नसल्यामुळे असेल. तुम्ही म्हणता ते बरोबर हे मान्यच करून टाकू. मग ठरलं तर अल्टो ३५ ते ४० मायलेज शहरात देते. विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 09:24 नवीन
Adarsh paristhiti chi detonation kaay ?tumhala standard tests condition mhanyachey ka ? Aadhi १४ mhanat hota. १४ varun ३० paryant alat yabaddal thanx. ३० chya pudhe ka denar nahee ? Tumhee posts meet vachat chala. Sequential kit jast mileage deil. Adarsh paristhiti madhe kit konate. Load kiti, speed kiti he sanga.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 09:32 नवीन
Definition. Mobile varun spelling apo aap badaltay. Sorry
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 09:29 नवीन
. बाकी इनोव्हा किंवा सांत्रो किंवा स्पार्क चे येथे प्रयोजन मला कळले नाही. असू द्या. माझ्या मंद बुद्धीमुळे >>> Tumhala uddeshun posts lihayachya hotya ka? Dhaga kartya chya prashnala nahee ka ? Innovative cha ullekh tumheech kelat na ? Asa ka bar kartay ? Tumhee ha vishay prestige issue cha kelay. So full stop from my side. Thanks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जिन्क्स Fri, 06/12/2015 - 10:05 नवीन
Innovative ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 06/12/2015 - 11:07 नवीन
इनोव्हा असं टाईप केलं की मोबाईल वर कधी शब्द बदलतो कळत पण नाही. अनेक ठिकाणी ततपप केलं आहे. हा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की ब्राऊझरचा की मिपाचा हे कळेना (आताही असं होतंय पीसी वरून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
व
वेल्लाभट गुरुवार, 06/11/2015 - 13:46 नवीन
डॉक्टर साहेब, ८०० वापरलीय, आता अल्टो के१० वापरतो गेली २ वर्ष.
याच्या तुलनेत आल्टोची वातानुकुलन यंत्रणा जेमतेम आहे
यावर तीव्र असहमती आहे. बोन चिलिंग्ग एसी आहे गाडीचं. अ‍ॅव्हरेज म्हणाल तर १७-१९. पेट्रोल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/11/2015 - 15:32 नवीन
वेल्लाभट साहेब वर खटासि खट यांना लिहिलेला प्रतिसाद पहा आपण तीच चूक करीत आहात. अल्टो ८००च्या वातानुकूलन यंत्रणेची के १० शी तुलना होऊ शकत नाही. ४८ बिएच पी आणि ६८ बी एच पी शक्तीची इंजिने अनुक्रमे आहेत. अल्टो के १० ची मुंबईत प्रत्यक्ष किंमत ४ लाख ६८ हजार आहे. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=129924116&t=1-3822 हि किंमत वरच्या श्रेणीतील कार ची आहे (ए श्रेणीतील नव्हे तर बी श्रेणीतील) या किमतीला अल्टो क्घेण्यापेक्षा थोडेसे पैसे (१४% किंवा ६०,०००) ५ .२ लाख जास्त टाकून मी WAGON R पसंत करेन. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=129924543&t=1-2784 आता तुम्हांला मायलेज १७ ते १९ मिळते आहे.( ते अर्थातच प्रत्यक्ष आहे दाखवायचे नव्हे). ते कुठे आणी ३६ कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 06/11/2015 - 16:12 नवीन
बर ८०० के १० मधली माझी गल्लत झाली. मी अल्टो के१० व्हीएक्सआय सगळ्या अ‍ॅक्सेसरीज सकट ४.०८ ला ऑन रोड घेतलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 06/11/2015 - 16:45 नवीन
अल्टो व्हीएक्सआयची किंमत ठाण्यात ऑन रोड ४. ३१ लाख दाखविली आहे. (पण हे पेट्रोलचे मॉडेल आहे सी एन जी नव्हे) त्यात आपल्याला मिळणारा डिसकाउंट ३० ते ३५ हजार असेल वरची किमत अ‍ॅक्सेसरीजची. असाच डिसकाउंट ( हा ३७ हजार आहे) आपल्याला wagon R ला हि मिळेल. http://www.autocarindia.com/auto-news/best-car-discounts-for-june-2015-395548.aspx/1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 17:53 नवीन
अल्टो ८०० सीसी चा सीएनजी मायलेज http://www.cardekho.com/maruti/maruti-alto-800-mileage.htm अल्टो के १० चा सीएनजी मायलेज http://www.cardekho.com/maruti/maruti-alto-k10-mileage.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खटासि खट गुरुवार, 06/11/2015 - 17:46 नवीन
डॉक्टर सुबोध खरे आपण आमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही के १० चा मायलेज सांगितलेला आहे. तिला अल्टोच म्हणतात. आपण फसावणुकीचा गुन्हदाखवलल करताना जे आरोप लावले आहेत त्यात मायलेजचा उल्लेख आहे. आता एसी, बीएचपी हे नवेच मुद्दे आलेले आहेत. आपला मायलेजचा मुद्दा खारीज झाला आहे का ? नव्या मुद्यांसाठी आम्ही न्यायालयात नवी सफाई देऊच. पण आधीच्या खटल्यात निर्दोष मुक्तता झाली किंवा नाही हे समजल्यास आपला आभारी राहीन. आमच्या वकिलास एक शंका आहे की के १० चा उल्लेख करू नये असा या धाग्य्वार कुठे करार, तह, एमओयू झालेला आहे का ? आम्ही सेकंड हँड कार नॅनो पेक्षा चांगली पडते असं म्हटलेलं आहे. ६०० सीसी ची कार के १० किंवा ८०० सीसी च्या इंजिनपेक्षा जास्त चांगलं कुलिंग कसं काय देईल हा एक नवा प्रश्न उपस्थित झालेला आहे. टाटाची सिएरा नावाची एक कार आलेली होती. या कारचा एसी भयंकर तापदायक होता. सुरुवातीच्या इंडीका कार्समधेही बोंब होती. एसी ही टाटासाठी नामुष्की बनलेली होती एकेकाळी. के १० ची तुलना करू नये या मुद्याशी मी सहमत नाही. तो तुमचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 06/12/2015 - 13:48 नवीन
होण्डा युनिकोर्न कितीला विकणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अक्षरमित्र Wed, 06/10/2015 - 10:26 नवीन
नॅनोच्या जन्मापासूनचा प्रवास आणि या धाग्याचा प्रवास दोघांमधेही खूप सारखेपणा जाणवतोय. सुरुवातीला नॅनोच्या वाट्याला आलेली तुच्छ गाडीची इमेज बदलून ती नक्कीच चांगली होत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय या धाग्यावर जवळजवळ बर्‍याच दिग्गज मिपाकरांनी लावलेली हजेरी आणि स्वतःचे सांगीतलेले अनुभव नक्कीच उपयुक्त आहेत. थोडे दिवस अजून काही प्रतिसाद येताहेत काय हे बघून लवकरात लवकर निर्णय पक्का करतोय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/10/2015 - 16:03 नवीन
वरील सगळॅ रिप्लाय वाचले आहेत... माझ्यासारखे नॅनोबद्दल निगेटीव्ह रिप्लाय खुप कमी आहेत.. पण ज्यांनी खरे युज केली आहे त्यांचे म्हणे खरेच आहे.. त्यामुळे काही हरकत नाही... पण तरीही ३.४५ का काय कोणी म्हणाले ना.. येव्हडी किंमत दिली तर आणखिन १-२ लाख अजुन घातले तर चांगली गाडी येइल.. जिच्या मध्ये सेफ्टी जास्त असेल तुलनेने... फॅमिली बरोबर बाहेर जायचे म्हणजे सेफ्टी जास्तच हवी.. मी असे म्हणात नाही.. ५ लाखाच्या गाडीचा भरोसाच आहे, पण नॅनो पेक्षा जास्त सेफ्टी... मी आता पुन्हा नविन गाडी घेताना, पुर्ण सेफ्टी फीचर सहीत घेइन.. बाकी गाडीच्या दिसण्यावर असण्यावर थोडेफार पोझीटीव्ह निगेटीव्ह असतेच .. तुम्हाला सेफ्टी पेक्षा, फक्त सिटीमध्ये आरामात .. टुव्हीलर च्या ऐवजी गाडी हवी असेल तर नॅनोच बरोबर... पण तुम्हाला त्यच बरोबर फँमिली ट्रीप.. गावाकदे जाणे वगैरे साठी गाडी हवी तर थोडी सेफ्टी वाली जास्त चांगली.. भले तुम्ही १ वर्षांनतर गाडी घ्या पण ती योग्य घ्या ...
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 06/11/2015 - 05:53 नवीन
५ लाखांच्या कोणत्या गाड्यांत कोणते सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत याबद्दल थोडी माहीती देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 06/11/2015 - 06:25 नवीन
आयला, कमीतकमी नॅनोच्या लुक बद्दल फार कमी निगेटीव्ह रिप्लाय येतात..तुमच्या सेफ्टी ची नक्की व्याख्या काय आहे ?. क्रश टेस्ट हा जर निकष असेल तर भारतात बनणा-या ४-६ लाख या रेंज मधील सर्व गाड्या यामध्ये नापास आहेत..अगदी स्विफ्ट सुध्दा..ही लिन्क बघा.. Indian Car Unsafe मुळात रतन टाटा यांना या गाडीची संकल्पना, भर पावसात एका दुचाकीवर लहान मुलांना घेऊन जाणा-या वडिलांची ताराम्बळ पाहून सुचली होती.. दुचाकीवाल्यांना स्वस्तात चारचाकी का खिशात नसावी ही मुळ कल्पना..डोक्यावर छत्र व दुचाकीला पर्याय...त्यांनी जेव्हा ही कल्पना मांडली, तेव्हा १ लाखात गाडी कशी बनेल, म्हणून टाटांना स्वता:च्या कंपनीकडूनच खूप विरोध झाला.. एक छान वाक्य आहे टाटांचे त्यांच्या इन्जीनियर्सला " जेव्हढा वेळ आणी त्रास तुम्ही मला हे अशक्य आहे, हे पटवून देण्यासाठी घेताय, त्यापेक्षा थोडा जास्त वेळ हे कसे शक्य होईल यासाठी द्या." एव्हड्या कमी बजेटमध्ये बनली म्हणून असेल, पण लक्झरी असणे हे या गाडीच्या संकल्पनेत नव्हतेच कोठे.. पण भारतात ही कल्पना रुचली नाही.. गरीबाला गरीब म्हंटलेले चालत नाही.. म्हणून मार्केटींग पुर्ण फसले... आता हीच गाडी नवीन रुपात आली..लक्झरी आहे, रिफाईनमेंट आहे.. त्यामुळे बेस्ट आहे बघा.. हीच गाडी आता घरोघरी सेकन्ड कार ची जागा नक्की घेणार यात शंका नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 06/12/2015 - 09:37 नवीन
तुम्ही म्हणता तसे असू शकते... आणि गरीबाला गरीब म्हंटलेले आवडत नाही हे वाक्य खरेच... काही हरकत नाही नॅनो नविन घेतल्यावर ... मी नॅनो वापरली नसल्याने रोखठोक काही म्हणत नाही, माझ्या सेफ्टीची व्याखा आहे असे काही नाही.. पण पुढून जर थोडीशी धडक बसली तर मागचा आणि पुढचा भाग एकच होयील ही भिती... बाकीच्या गाड्या तश्या होणार नाहीत असे नाही.. पण तुलणेने त्या नॅनो पेक्षा अधीक चांगल्या असे माझे उगाचच गाडी बघुन मत.. ओमनी गाडी पण मला ह्याच मुळे आवडत नाही... डायरेक्ट पुढे ड्रायव्हर असतो .. अल्टो गाडी उंची ला कमी आहे... बाकी जर ३.५ लाख आणि ५ ते ६ लाखात काहीच जास्त सेफ्टी फिचर चा फरक नसेल तर नॅनोच चांगली मग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा