टाटा नॅनो कार घ्यावी काय ?
नमस्कार.
मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे.
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे.
दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत.
गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.
जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये.
नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत.
इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा.
टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.
💬 प्रतिसाद
(151)
च
चौथा कोनाडा
Wed, 06/10/2015 - 16:34
नवीन
हा घ्या अजून एक नॅनोवाला रोचक धागा :
:::::: नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे ::::::
नॅनो
खरे तर नॅनो ही वेगळी गाडी असल्यामुळे इतर "कार्स" ची तुलना उचित ठरत नाही.
स्वतः वापरुन मत बनवावे. गेली चार वर्षे वापरतोय. आमचा अनुभव चांगला आहे.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 06/11/2015 - 14:21
नवीन
स्वतः वापरताहेत. अनुभवाचे बोल.
चौ,को;साहेब,
अजून माहीती द्या ना! आरामदायीपणा (सस्पेन्शन), हाय स्पीडला गाडीची स्टॅबीलीटी,अॅव्हरेज, चालवतानाचा कम्फर्ट, एसीची कार्यक्षमता, मेन्टेनन्स कॉस्ट, डीलर सर्व्हिस वगैरे.
- Log in or register to post comments
म
मनिष
गुरुवार, 06/11/2015 - 07:46
नवीन
नक्की घ्या, फक्त अॅटो ट्रांसमिशन नको कारण ३.५ लाखात अल्टो मॅन्युअल जास्त चांगला पर्याय आहे .मारुती गाड्यांचे जास्त आयुष्य, कमी देखभाल खर्च आणि चांगली रिसेल व्हॅल्यू ह्यामुळे मारूतीचे अल्टोचे पागडे (माझ्या मते) जड आहे.
नॅनो अॅटो ट्रांसमिशन घ्यायची असेल तर हे अवश्य वाचा -
http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/164034-tata-nano-
amt-automatic-official-review.html
स्लॅग्/डीले मुळे चढावावर (अगदी फ्लायओव्हर असला तरी) तारांबळ उडू शकते - खासकरून पहिल्यांदाच गाडी चालवत असाल तर! नॅनो मॅन्युअल एक खरंच उत्तम पर्याय आहे!
- Log in or register to post comments
म
मनिष
गुरुवार, 06/11/2015 - 08:16
नवीन
http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/164034-tata-nano-amt-automatic-official-review.html
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 06/11/2015 - 13:26
नवीन
आमच्या बाबाची न्यानो कार आहे. त्याने ती त्याच्या बॉसकडून घेतली. त्याचा बॉस न्या म्ह्णत होता पण बाबा नो म्हणत होता म्हणून बहुतेक या कारला न्यानो असे म्हणतात. शेवटी बाबाने प्रमोशन आणि कार एकदम बॉसकडून घेतले. बॉस ने आता टोयाटो का काहीतरी घेतली आहे. पुढच्या प्रमोशनला आमच्याकडे टोयाटो असणार आहे.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 06/11/2015 - 14:05
नवीन
:-)
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 06/11/2015 - 18:06
नवीन
एक वर्षांपूर्वी छोट्या कार्समधे टर्बोचार्जर नसायचा. हल्ली सर्रास वापर होतो. त्यामुळे इंजिनची पावर आणि मायलेज या दोन्हीमधे वाढ होते. मारुतीची नवी ६६० सीसी ची कार ४९ - ५१ सीसी इतकी अश्वशक्ती निर्माण करते. भारतात यायला अवकाश आहे. इंजिनची कार्यक्षमता हा निकष असायला हवा.
किंमत हा निकष ठेवला तर हा धागा चर्चेला ठेवण्याची गरज नाही. दोन फटफट्या मधे वेल्ड केल्या आणि वरून हूड ओढलं तरी स्वस्तात कार मिळेल. कल्याण मधे डुक्कर रिक्षा मिळायची तशी कार सहज बनवून देता येईल. इंजिन ३५० सीसी. चंदीगढ मधे उप्र मधे हाताने बनवलेली रिक्षा मिळते. ती सहज कार मधे कन्व्हर्ट होईल. खूप स्वस्तात काम होईल.
झालंच तर लॉनमूव्हरचं इंजिन वापरून पत्रे ठोकून कार बनू शकते. काही वर्षांपूर्वी सिक्स सीटर्स आल्या होत्या अशा.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Fri, 06/12/2015 - 06:01
नवीन
एक चारचाकी ठेला घेऊन त्यावर खुर्ची छत्री फिट केली अन ढकलत न्यायला माणूस नोकरीवर ठेवला तर कसे राहील? अशीही सिटी ट्रॅफिकमधे कितीक स्पीडने जाते गाडी?
"आमची कार" असा बोर्ड लावायचा समोर, की झाले.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 06/12/2015 - 08:36
नवीन
एसीचं कस्काय करावं?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 06/12/2015 - 09:29
नवीन
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 06/12/2015 - 09:48
नवीन
मस्तच...
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 06/12/2015 - 16:53
नवीन
भारीच की! फॅन पण येतील मागून...
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Fri, 06/12/2015 - 09:51
नवीन
धाग्याची शंभरी ओलांडली, तरी सत्कार कसा नाही झाला अजून.. जेपी भौ कुठे गेलेत?
पण शंभराच्या वर प्रतीसाद होऊनही नॅनो घ्यावी की घेवू नये त्याचा उलगडा काय झाला नाही. धाग्याचा प्रवास मात्र नॅनो वरून हातगाडी पर्यंत झाला :)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 06/12/2015 - 10:21
नवीन
मायलेज आणि सेफ्टी मध्ये गाडं अडकलंय. मायलेज मधे मारूती अल्टो सीएन्जी पुढेच असणार नेहमी. सेफ्टी मधे कोण पुढे असेल सांगता येणार नाही. अल्टो नॅनो पेक्षा जास्त सेफ आहे का?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 06/12/2015 - 10:26
नवीन
माझ्या अंदाजाने, धागाकर्त्याला मात्र उलगडा झाला असेल, असे रिप्लाय वरुन वाटत आहे..
आलेले रिप्लाय आणि नॅनो बद्दल थोडासा घ्यावी का म्हणुन सोफ्ट क्वार्नर यामुळे ते नॅनोच घेतील असे मला ९९ % वाटते आहे..
चांगले आहे.. नविन गाडी बद्दल शुभेच्छा !..
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Fri, 06/12/2015 - 11:04
नवीन
या धाग्यात पोटेन्शियल आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 10:49
नवीन
गाडी स्वतः कधीही ६०-७० च्या पेक्षा जास्त स्पीडने चालवणार नसाल
आणि
गाडीच्या आजूबाजूने ६०-७० च्या पेक्षा जास्त स्पीडने जाणार्या गाड्या नसतील
तर बिंधास्त घ्या
वरच्या पैकी एखादी कंडिशन नसेल तर मात्र सेफ्टीचा विचार सगळ्यात आधी करा आणि मायलेजचा नंतर
माझ्यामते चारचाकी घेताना खाली दिलेले मुद्दे सगळ्यात आधी विचारात घ्यावे (दिलेल्या क्रमाने)
सेफ्टी (एबीएस, एअर बॅग्स, ई.)
लेग स्पेस
स्पेअर्स आणि सर्विसिंग सेंटर्स
1. Safety first
ABS, Air bags, etc.
2. Internal usable space
you may not go for long drive now...but in future you will definitely go for it
3. Spares cost and servicing cost and service center availibility
Buying any car is very easy, maintaining it is difficult as well as costly
या तिन्ही मुद्द्यांवर मला नॅनो कुठेच फिट्ट बसलेली दिसत नाही
अजून १ महत्वाची गोष्ट, जी घरी नॅनो असणार्या कुठल्याच मिपाकराने लिहिलेली नाहिये
जर कधी चुकुन माकून एखादी बाईक्/रिक्शा/चारचाकी नॅनोला हलकेच चुंबन/गळामिठी देउन गेली आणि सुदैवाने आतल्या माणसांना साधे खरचटले सुध्धा नाही तरीही बॉडीच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे किती असेल?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 11:30
नवीन
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे.
हा मुद्दा का विसरतो आहेस?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 11:34
नवीन
तेच म्हणतो...३ लाखात बसणारी Ritz with ABS शोधावी
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:23
नवीन
३ लाखात बसणारी Ritz
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 21:29
नवीन
या धाग्यामुळे आजच न्यानो परत निरखून बघितली....मस्त आहे ट्राफिक मध्ये चालवायला
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 06/12/2015 - 11:36
नवीन
नॅनो कुणीतरी घेवून जाताना दिसलं की का कुणाक ठावूक, पण एक दयाभाव मनात दाटून येतो. कदाचित नॅनो घेवून कुणीच माजोरडे पणानं लेन कटींग करून चालवू शकत नाही म्हणून असावं, पन नॅनो वाले नेहमीच सज्जन माणसासारखे गाड्या चालवतात. मोठ्या गाड्या पण नॅनो ला फारसं पींपींपाँपाँ करताना दिसत नाहीत. निमूट वळसा घालून ओव्हर टेक करतात.
मोठ्या गाडीएवढाच (इंडिका) असावा. टाटावाले (उदा: पंडित ऑटो) लुटायलाच बसलेले आहेत असा माझा माझ्या गाडीमुळं अनुभव आहे.
मारूतीचे स्पेअर्स टाटा पेक्षा स्वस्त आहेत का?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 06/12/2015 - 13:38
नवीन
हो हो. दयाभावाबद्दल अगदी खरं आहे. "गरीब बिचारा माधुकरी" छाप नजरा झेलायची सवय झाली होती.
- आमच्या हपीसातला पार्किंगवाला रखवालदार अगदी दयार्द्र मुद्रेने कोपर्यातली जागा देई. तिथे नॅनोव्यतिरिक्त कोणतीच गाडी बसू शकत नसे.
- एकदा रिवर्स घेताना एकाची गाडी पाडली. मला वाटलं होतोय आता राडा. पण त्याने स्वतःची गाडी वगैरे उचलली आणि मागे उभा राहून मला "यूंद्या..यूंद्या..बास..." करत सुरक्षितपणे रस्त्यावर काढलं!
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 06/12/2015 - 21:31
नवीन
हाहाहा!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 06/12/2015 - 14:14
नवीन
णॅणो नेहमीच भांडणाचा विषय होतेच होते तर... :-)
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Fri, 06/12/2015 - 17:05
नवीन
नॅनो नॅनो, ओरीजिलानो
http://cdn2-b.examiner.com/sites/default/files/styles/image_content_width/hash/f1/d4/f1d4cf8f827f49a307fa1fbd7c0e6be8.JPG?itok=8eqYHM-j
- Log in or register to post comments
म
माकड
Fri, 06/12/2015 - 21:00
नवीन
टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 06/23/2015 - 08:13
नवीन
खरंच की काय !
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 12:40
नवीन
छान आहे हो आयडी
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/24/2015 - 17:49
नवीन
=))=))
- Log in or register to post comments
N
nanaba
Tue, 08/16/2016 - 11:01
नवीन
टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली!
>> can we buy auto for personal use? where to buy in Maharashtra/pune?do we need special license for driving? How much does it cost?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Tue, 08/16/2016 - 17:16
नवीन
खासगी वापरासाठी रिक्षा घेता येते. रजिस्ट्रेशन खासगी वापराचे केले की झाले. रिक्षाला रंग वेगळा द्यावा लागतो.
पण,
तीन चाकी अनस्टॅबिलिटीपेक्षा चार चाके बरी. रिक्षा एसी कशी करणार? पाऊस आत येतो म्हणून ताडपत्र्या झाकाव्या लागतात इ.
- Log in or register to post comments
ब
बिहाग
Tue, 06/23/2015 - 08:03
नवीन
नॅनो ला नेहमी दयेच्या दृष्टीने पहिले जाईल पण
गर्दी मध्ये घुसवायला , पटकन पार्क करायला नॅनो सारखी दुसरी गाडी नाही .
घरात एकच गाडी वापरली जाणार असेल तर आल्तो बरी , जर दुसरी गाडी असेल तर शहरामध्ये चालवायला नानो सारखी दुसरी गाडी नाही ( रेवा आहे पण किमत काहीच्या काही आहे . )
- Log in or register to post comments
N
nanaba
Tue, 08/16/2016 - 11:01
नवीन
टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली!
>> can we buy auto for personal use? where to buy in Maharashtra/pune?do we need special license for driving? How much does it cost?
- Log in or register to post comments
न
नया है वह
Tue, 08/16/2016 - 11:56
नवीन
auto त्याहुन भिकार ..
- Log in or register to post comments
N
nanaba
Wed, 08/17/2016 - 04:35
नवीन
If u know answer to my question - let me know. I don't care if it's bhikar or royal.
- Log in or register to post comments
न
नया है वह
Fri, 08/19/2016 - 08:53
नवीन
..
- Log in or register to post comments
व
विनटूविन
Tue, 08/16/2016 - 11:57
नवीन
तिला काय लायसन्स लागत नाही म्हणे
- Log in or register to post comments
अ
अकिलिज
Tue, 08/16/2016 - 18:28
नवीन
कित्ती मोठ्ठं आहे नाही.
जरा हे पहा. अशा दिसणार्या गाड्या जगात भरपूर आहेत. आणि चालतात ही.
https://en.wikipedia.org/wiki/Mitsubishi_i-MiEV
https://en.wikipedia.org/wiki/Toyota_Aygo
https://en.wikipedia.org/wiki/BMW_i3
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/17/2016 - 09:07
नवीन
जाऊ द्या हो साहेब
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. ऐश्वर्या राय भंयकर दिसते असे म्हणणारे काही कमी आहेत का?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Tue, 08/16/2016 - 17:52
नवीन
आज रिकामा वेळ सापडल्याने धागा परत वाचला.
एकंदर सगळे प्रतिसाद वाचून, त्यातल्या त्यात धाविघाभु श्री काळापहाड यांचे सर्वव्यापी प्रतिसाद वाचून मनात एक (छोटीशी) शंका दाटून आली.
इच्चारूनच टाकतो.
कापासैब, तुम्ही पूर्वी टाटा मधे नोकरीला होता का हो? आय मीन, नोकरी का सोडावी लागली वगैरे काही इतिहास आहे का?
हलके घ्या, रागावू नका.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/17/2016 - 10:46
नवीन
डॉक... हा वैयक्तीक प्रश्न काय रूचला नाय ब्वा.
'हलके घ्या असे लिहून असे प्रश्न विचारणे' म्हणजे 'आपल्याला कोणीतरी असाच प्रश्न अशाच डिस्क्लेमरसह विचारण्याची परवानगी देणे' आहे असे वाटत नाही का..?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
गुरुवार, 08/18/2016 - 07:22
नवीन
मोदका,
धागा पूर्ण वाचून फक्त या एकाच महोदयांचे अनेक प्रतिसाद, तेही अगदी कळकळीने अँटी नॅनो दिसले. सहज वाटलं, भै इतनि खुन्नस कायको?
त्यांना प्रश्न विचारला तर तो वैयक्तिक झाला. पण हा प्रश्न त्यांना नको विचारू तर कुणाला विचारता येईल? ;)
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 08/18/2016 - 14:54
नवीन
बरोबरै..
पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा टोन पटला नाही इतकेच.
- Log in or register to post comments
न
नपा
Wed, 08/17/2016 - 09:00
नवीन
कोणती गाडी घ्यावी याचा गुगलाभ्यास करताना हि website सापडली..
http://www.vahanpurchase.com/
निर्णय घेणं सोपं होते का बघा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/17/2016 - 09:16
नवीन
मी माझा भाऊ आणि आमचे वडील या तिघांत मिळून मारुती आणि टाटा च्या ९ गाड्या वापरल्या आहेत. यात नॅनो, इंडिका(पेट्रोल) सुमो आणि सफारी येतात, शिवाय मारुती ८००, अल्टो , वॅगन आर आणि स्विफ्ट येतात.
टाटा च्या गाड्यांचे पत्रे आणि चॅसीस मारुतीच्या पेक्षा नक्कीच जास्त शक्तिमान आहेत त्यांचे सुटे भाग सुद्धा एकंदर जास्त स्वस्त आहेत आणि गाड्यांच्या देखभालीचा खर्च सुद्धा मारुती पेक्षा थोडासा कमी आहे.नॅनो मध्ये अल्टो पेक्षा जास्त आतील जागा आहे. अल्टोपेक्षा ए सी कितीतरी जास्त चांगला आहे.पण नॅनो स्वतःला चालवायला अल्टोपेक्षा कठिण वाटते( पॉवर स्टिअरिंग नाही आणि आहे हा फरक असल्याने) शिवाय मारुतीची इंजिने टाटा पेक्षा जास्त मुलायम आहेत.
ऍव्हरेज मध्ये फारसा फरक पडत नाही.
बाकी लोक काय म्हणतात याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ज्याला नॅनो आवडेल त्याने ती घ्यावी असेच मी म्हणेन.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Wed, 08/17/2016 - 11:50
नवीन
मी नॅनो आणि अल्टो दोन्ही वापरल्या आहेत ,नॅनोसारखी आटोपशीर गाडी नाही,अल्टोचे इंजिन स्मुथ असले तरी तीचात नॅनोएवढी स्पेस नाही हे खते आहे.लोकं नॅनो घेऊन् लेह लडाख करुन आले आहेत ,आता बोला?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 08/18/2016 - 07:02
नवीन
What’s most impressive though is the phenomenal amount of space the Nano has. Legroom, both in the front and the back, can easily rival larger saloons and despite its petite exterior dimensions, it manages to be one of the most spacious hatchbacks across segments.
http://www.autocarindia.com/auto-features/tata-nano-twist-vs-maruti-alto-800-comparison-373333.aspx/0
- Log in or register to post comments
म
महेश श्री देशमुख
गुरुवार, 08/18/2016 - 03:42
नवीन
आमच्याकडे २ नॅनो आहेत, पहिली (Basic Model) लाँच झाली तेव्हा घेतली होती आणि दुसरी (Topend mannual) २०१५ च्या दसऱ्याला घेतली होती. दोन्ही गाड्या ताशी ५५ ते ७० प्रतिकिमी च्या वेगाने चालवल्या तर सरासरी अनुक्रमे २४, २२ चे माईलेज देतात हे अनूभवातून सागतो आहे. माझ्याकडे नवीन नॅनो असते, दर आठवड्याला अंदाजे ३०० किमीचा प्रवास होतो ( चिंचवड-सातारा-चिंचवड). आताच माझे ९७०० हजार किमी पुर्ण झालेत. अतिशय चांगली गाडी,कोणती तक्रार नाही. कसलाही इंधनाचा वास येत नाही, हा मात्र आवाज येतो पण बाहेरच्याना ! तशीही गाडी आतून आपली असते :)
तुमच्या २ चाकी पेक्षा कमी सर्वीस खर्च.
बिनधास्त घ्या.
- Log in or register to post comments
D
DeepakMali
Mon, 08/22/2016 - 23:35
नवीन
2.44 starting
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »