Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसात जळाया लागलो...

स — सतिश गावडे, Mon, 06/08/2015 - 17:07
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो

प्रतिक्रिया द्या
19268 वाचन

💬 प्रतिसाद (102)
य
यशोधरा Mon, 06/08/2015 - 17:09 नवीन
कोणाचं काय, तर कोणाचं काय!! =))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 06/08/2015 - 17:19 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रचेतस Mon, 06/08/2015 - 17:25 नवीन
कसं काय सुचतं ओ तुम्हाला?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 06/08/2015 - 19:28 नवीन
हाच प्रश्न मलाही पडतो. वरीजनल ठावं नाय पर हे जे बी हाये, ते लय भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनुप ढेरे Mon, 06/08/2015 - 17:36 नवीन
हा हा हा... भारी!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/08/2015 - 17:53 नवीन
पाताळेश्वराजवळ सुचली का हि क्वीता?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/08/2015 - 18:46 नवीन
नाही. पात्तळेश्वरा जवळ सुचली असणार! ;-) हापिसात असताना ढ़णाजीराव त्या एकांतवासी स्थानात नेहमी अधून मधून जात असतात. बरुबर ना हो स.गा. ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे Mon, 06/08/2015 - 19:05 नवीन
तुमच्यासारखे "त्या एकांतवासी स्थानी" गेल्यावर सुचायला ही शौच काही कविता नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/08/2015 - 19:23 नवीन
अगदी बरोब्बर ! मलाही शौच काव्य तिथे कधीच सुचलेली नाहित. पिकत तिथे विकत नाहीच! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस Mon, 06/08/2015 - 19:27 नवीन
मग कुठे सुचली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे Mon, 06/08/2015 - 19:29 नवीन
मलाही शौच काव्य तिथे कधीच सुचलेली नाहित.
मग तुम्हाला शौच काव्य कुठे सुचतात?
पिकत तिथे विकत नाहीच
म्हण अस्थानी वाटते. म्हणजे काही टोटल लागत नाही. जरा इस्कटून सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/08/2015 - 19:31 नवीन
पिकायला काय तिकडे आढी लावलेली असते का? बेसिक प्रश्ण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/08/2015 - 19:43 नवीन
संदर्भा पेक्षा आशया कडे पहा चिमणराव! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रचेतस Tue, 06/09/2015 - 03:32 नवीन
तुम्ही वरच्या प्रश्नांना हुशारिने बगल दिलेली दिसत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/09/2015 - 03:50 नवीन
तो तुमचा भ्रामक भ्रमवाद आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 06/09/2015 - 04:58 नवीन
भ्रमवाद भ्रामक असणे म्हणजेच तो भ्रमवाद नसणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Tue, 06/09/2015 - 08:43 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/09/2015 - 10:42 नवीन
वरील संवाद आवडला नाही :-\ प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एखाद्या सदस्याची किती टर उडवावी हे आपल्याला कळायला हवेय. एखादा माणूस चिडत नाही म्हणून त्याची कितीही चेष्टा करायची हे पटत नाही.. #हीणसंवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Tue, 06/09/2015 - 10:55 नवीन
#हीणसंवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Tue, 06/09/2015 - 10:56 नवीन
लिहिल्या कमेंटीवर अशी टीका करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 11:01 नवीन
अशी टिका करू नये तर कशी करावी? आपण साक्षात भाषाप्रभू पाणिनी आहात. आपणच आम्हा अडाण्यांना मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/09/2015 - 11:08 नवीन
तो कमेंटवाला आला होता का सांगत 'माझ्या कमेंटीला प्रतिप्रतिसाद द्या' म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/09/2015 - 10:15 नवीन
@ म्हणजेच तो भ्रमवाद नसणे>> :-D तुम्ही निरर्थक स्वात्मवादाचे बळि आहात! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 06/09/2015 - 10:50 नवीन
एकदा कशाचे बळी ते नक्की ठरवा राव. कधी म्हणताय भ्रामक भ्रमवाद तर कधी म्हणताय निरर्थक स्वात्मवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/09/2015 - 10:57 नवीन
=))))))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
आ
आदूबाळ Mon, 06/08/2015 - 18:09 नवीन
भारी! मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं. माझ्यासारखे जे झंगड असतील त्यांना "कल्लूळाचं पानी..." हे गाणंही आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 09:47 नवीन
मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं.
मलाही. पाच वर्षांपूर्वी मी त्या गाण्याचं रसग्रहण केले होते. एकदा जुन्या हायवेने मुंबईला जात होतो. वाटेत खोपोलीला पेट्रोल टाकायला पंपात गेलो. गाडीत हे गाणं जोराने वाजत होतं. मी गाडीतून बाहेर पडताच पेट्रोल टाकणारा पोऱ्या माझ्याकडे अनाकलनीय नजरेने पाहू लागला. बहुतेक त्याला माझी गाडी, माझा गेटप आणि गाडीत वाजणारे गाणं याची सुसंगती लागत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 09:49 नवीन
दुहेरी प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सदस्यनाम Tue, 06/09/2015 - 10:53 नवीन
दुहेरी प्रतिसाद.
अर्थात.. व्यक्तिमत्वच दुहेरी दिसतय. पंप वाला पोरगा त्यमुळेच पाहात असेल औत्सुक्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/08/2015 - 18:11 नवीन
जमेश.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/08/2015 - 18:49 नवीन
कोणाला कशाचं नि बोडकीला केसाचं!! =))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/08/2015 - 18:59 नवीन
सुंदर कविता गावडे सर !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 06/08/2015 - 20:08 नवीन
हेच म्हणतो. बर्‍याच दिवसांणी गावडे सरांनी झक्कासपैकी लोकगीत लिहीलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मितभाषी Mon, 06/08/2015 - 19:08 नवीन
सलाम :)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 06/08/2015 - 19:42 नवीन
शब्द भारी, भाव भारी सारी कविताच लय भारी
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 06/09/2015 - 04:26 नवीन
बरेच वर्षा पूर्वी बडे गुलाम अली खान यांच्या ठुमरी मध्ये हे बोल ऐकले होते -क्या तमाशा है के बारीश मे घर जलता है- जाणकाराना विचारल्यावर त्यांनी याचा अर्थ असा समजाऊन सांगितला होता- विरहिणी नायिका अश्रु ढाळत असते व ते तिच्या वक्षावर पडत असतात- हे पाहून शाय्र्र म्हणतो क्या तमाशा है के बारीश मे घर (दिल ) जलता है
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 06/09/2015 - 04:39 नवीन
वा वा खूप सुंदर कविता... अशाच येउद्या अजुन...
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 06/09/2015 - 04:41 नवीन
गावडे सरांना लाल सलाम
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 06/09/2015 - 04:42 नवीन
आशय घन कविता
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 06/09/2015 - 05:07 नवीन
तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो मस्त कॅची लाईन्स.. एकदम जबरदस्त... खुप आवडल्या ह्या ओळी
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 06/09/2015 - 05:15 नवीन
जोमदार काव्य. पुभाप्र धीर धरा. मी पळाया लागलो हे विडंबन येईल (माझ्या कडून नाही "शिष्योत्तम,मर्यादापुरूष, लाडोबा") आम्ही दिलेले नामाभिधान किती सार्थ होते ह्याची प्रचीती आली असेलच तरी हि जिल्बी टकायला घेणे. सूचक अभामिपाहाविकसंघ
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 06/09/2015 - 08:04 नवीन
उत्स्फुर्त काव्य म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सगांच्या या काव्यपुष्पाकडे पहाता येईल. "कोणाला कशाच आणि करीनाला सैफच", किंवा "ये ये बैला आपण खेळु भोंडला" ह्या म्हणी सार्थ करणारी अशी ही कविता वाचताना आमच्या चश्म्यासमोर साक्षात सुर्यनारायण चमकून गेले. अहाहा केवढीही अगाध प्रतिभा. ज्ञानदेवांच्या विरहीणींचा आनंद सगळेच घेतो. पण विरह्याची बाजू मात्र आतापर्यंत फारच थोड्या कवींनी मांडली आहे. ज्या काही थोड्या फार कवीता प्रकाशीत झाल्या त्या सर्वांमधे या कवीतेचा नंबर बराच वरचा आहे हे सर्व रसिक "बिनशर्त" मान्य करतील. शतकानूशतके दूर्लक्षीत / अप्राकाशित राहिलेली बाजू इतक्या प्रभावीपणे आणि प्रांजळ पणे मांडण्याचे धाडस दाखवणार्‍या कवीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. पहिल्या चार ओळींमधेच कवी आपल्याला सांगतो की त्याला मैना सोडून गेली आहे आणि त्यामूळे तो जळायला लागला आहे. ही मैना म्हणजे कोण हे जरी कवीने गुलदस्त्यात ठेवले असले तरी ती कोणती तरी महत्त्वाची व्यक्ती किंवा वस्तू यांचे प्रतिक म्हणून कवीने वापरली आहे हे जाणकारांच्या सहज लक्षात येईल. उदा. घरातले "पायलेक्स" अचानक संपले किंवा हरवले तर ते नियमीत वापरणार्‍याची काय अवस्था होईल तशीच काहीतरी अवस्था ही मैना सोडून गेल्या मूळे कवीतेतल्या नायकाची झाली आहे. त्याच्या सर्वांगाचा दाह होत आहे काही केल्या तो दाह कमी होत नाही म्हणून शेवटी अग्नीशामक दलाला पाचारण करावे असे तो सूचवतो. येथे अग्नीशामक दल हे सुध्दा प्रतिक कवीने मोठ्या हुशारीने निवडले आहे. कवीच्या या निवडचातुर्याला नक्कीच "दाद" द्यायला पाहीजे. केवळ या उपमे करता म्हणुन आमच्या तर्फे कवीला दाद खाज खुजली का दुष्मन असलेले "बी-टेक्स" मलम भेट देण्यात येत आहे. थोड्याशा विषयांतराबद्दल क्षमस्व पण मला जेष्ठ कवी आनंद बक्षी साहेबांची "टीप टीप बरसा पानी" हे अजरामर काव्य आणि त्यावर रविनाताईंनी केलेले नृत्य आठवले. तिकडे तर नायकाची नुसती आठवण आली म्हणून नायिकेच्या बॉडीला आग लागली आहे "तेरी याद आयी तो जल उठा मेरा भीगा बदन, अब तुही बता ओ सजन मै क्या करु?" असे ती नायकाला विचारते आहे. (बक्षी साहेबांना त्या वेळी फयरबंब बोलवायचे कसे सुचले नाही?) त्या मैना नामक व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या विरहाने आता आपल्या काव्यनायकाची तहानभूकही हरपली आहे. काय करु आणि काय नको याचे त्याला फारच टेंन्शन यायला लागले आहे.त्यातच मैना जवळ नसल्यामूळे ह्या टेंशनचा निचरा करण्याचे कोणतेही साधन नायका कडे उपलब्ध नाही. मग तो ते टेंन्शन उराशी बाळगत गादिवर तळमळत रहातो. "अग मैना अग मैना तुझी हौस पुरवीन" हे मैनेला दिलेले वचन नायकाने बहुतेक पाळले नसावे. त्यामुळेच रागावून मैनाबाई त्याच्या पासून दुर गेल्या असाव्या. इकडे मध्यमवर्गीय कुटुंबाचा अजून एक प्रॉब्लेम कवीने नकळत अधोरेखीत केला आहे. "कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते. हे कवीने मोठ्या खूबीने सांगीतले आहे. मग आपला काव्यनायक काय करतो? तर मैनेच्या विरहामुळे होणार्‍या या त्रासापासून मोकळे होण्याचे विविध मार्ग शोधू लागतो. म्हणजे बायको माहेरी गेल्यावर घरातला पुरुषमाणूस कसा हॉटेल मधे जोवायला जातो तसेच काहीतरी. पण हे मार्ग मोठे खर्चिक असतात. दोनचार दिवसातच नायकाचा खिसा खाली होतो. एवढे पैसे उडवले तरी हाती काहीच लागत नाही. म्हणून उव्दीग्न झालेला नायक दु:खी होतो. रोज चांगल्या हॉटेल मधे जेवणे त्याला परवडेनासे होते. पैसे संपल्या मूळे नायक बहुतेक कोणत्या तरी खालच्या दर्जाच्या हॉटेल मधे जाउन आपली भूक भागवायला लागला आणि मग होउ नये तेच झाले. तो बहुतेक कोणत्यातरी संसर्गजन्य रोगाचा बळी पडला. नायक इकडे प्रांजळ पणे कबूल करतो "पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो" आणि मग तो आपल्या मित्रांना विनंती करतो की या जाचातून सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा मला हे सगळे आता सहन होत नाही. असे हे एक अर्थवाही पण गुढगर्भ काव्यपुष्प प्रसवल्या बद्दल कविचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. (भेटवस्तु कवीला योग्यवेळी कुरीयरने पाठवली जाईल. त्यासाठी कृपया मागे तगादा लाउ नये) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/09/2015 - 08:23 नवीन
पै. बुवा आजकाल लईच फॉर्मात हायती! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
द
दमामि Tue, 06/09/2015 - 08:26 नवीन
कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" :):):):):) यावर मोरोपंतांची एक आर्या आठवली, परवानगी असेल तर लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जडभरत Tue, 06/30/2015 - 12:05 नवीन
लिहा ना मग, विचारताय काय त्यात इतकं? आमालाबी हसू द्येत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Tue, 06/30/2015 - 13:06 नवीन
त्यापेक्षा व्यनीतुन घ्या...नैतर इथे कोणालातरी जळजळेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ब
बॅटमॅन Tue, 06/30/2015 - 13:07 नवीन
स्व* घ*त नसतां **अतिशमनार्थ ** राखावी | तेही नसतां मग स्वहस्तेंचि ** दा*वी ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ज
जडभरत Tue, 06/30/2015 - 13:52 नवीन
नाहीतरी हल्ली हस्तोद्योगांना चांगले दिवस आलेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Tue, 06/30/2015 - 16:12 नवीन
दात आणि नखे नस्लेला वाघ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जडभरत Wed, 07/01/2015 - 06:54 नवीन
हं हवाच फुस्स झाली त्या कवितेची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा