पावसात जळाया लागलो...
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
💬 प्रतिसाद
(102)
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/09/2015 - 08:31
नवीन
=))
क्वीता फर्मास, क्वीतेचं रसग्रह्न बी फर्मास !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/09/2015 - 08:34
नवीन
आरारारा...उठवला धन्याचा बैजवार बाजार
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 09:41
नवीन
बेक्कार हसतोय राव... एव्हढा विचार मी ही कविता पाडताना केला नव्हता. कृपा त्या अमितसांगलीची.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 06/09/2015 - 09:49
नवीन
लैच ब्येक्कार =))
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/09/2015 - 10:49
नवीन
चुकून 'गर्दभगूढ काव्यपुष्प' वाचलं.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 10:59
नवीन
#हीणप्रतिसाद
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 06/09/2015 - 11:09
नवीन
@'गर्दभगूढ काव्यपुष्प'>> ह्ह्या ह्ह्या हुक्क्क! :-D
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 06/09/2015 - 17:10
नवीन
__/\__
कोणत्या गिरणीतून आणलेलं दळण खाता?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 06/10/2015 - 05:45
नवीन
@ पैजारबुवा
मस्त रसग्रहन ...
सगा चे खेचक शब्द खुप मस्त असतात ... कायम लक्षात राहतात..
जसे की तू ये तुला फुकट देईन ..
आणि येथील फायरबंब आणि जळाया लागलोय या २ ओळी..
नक्कीच प्रेरणादायी
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/10/2015 - 05:48
नवीन
ह्या ओळीचे पितृत्व श्री सगा यांचेकडे नाही.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 06:03
नवीन
होय. एका गुर्हाळवाल्याकडून ऐकल्या मी त्या ओळी.
अगदी या कवितेतील "पावसात जळाया लागलो" ही ओळसुद्धा माझी नाही. ती अमितसांगली यांच्या एका प्रतिसादावर आधारीत आहे. आणि "तुम्ही बोलवा फायरबंब" ही ओळ मला माझ्या "तुझी घागर नळाला लाव" या आवडत्या गाण्यावरून सुचली.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/10/2015 - 06:07
नवीन
अग्गाग्गा
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 06/10/2015 - 15:06
नवीन
कवीने शब्द नविन तयार करावा अशी कधीच अपेक्षा नसते.. असलेल्या शब्दातुनच त्याने कविता लिहिलेली असते...
आणि जो माणुस प्रामाणिक पणे हे कबुल करतो त्याचा तर मला जास्त हेवा वाटतोच ..
जरी मुळा वाक्य तुझे नसले तरी मुळा कविता तुझ्याच आहे.. अआणि आम्ही तरी तसेच माणनार.. अंध भक्ती म्हणु शकते कोणी... पण
राजकारणात अंध भक्ती करण्यापेक्षा साहित्यात केली तर जास्त बरी..
आता...
"मन तळ्यात" हे शब्द आधीच होते... तरी संदिप खरेंची सुंदर कविता यावरुन आहेच ना ... तसेच हे...
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 06/29/2015 - 13:55
नवीन
आयला कविता जितकी भन्नाट, त्याच्याहून १०० पट भन्नाट रसग्रहण.
पैजारबुवा यांचे आपण आजपासून चाहते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/09/2015 - 08:43
नवीन
सगाकाकांनी सखू नंतर लैच दिवसांनी एक फर्मास लोकगीत लिवल्याबद्दल पूस्प्गुच देऊन सत्कार केल्या जात आहे.
पैजारबुवांचे परीक्षणही भन्नाट जमले आहे.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 06/09/2015 - 11:18
नवीन
पण सखूची सर कशालाच नै हो.. हे ही नमूद करतो.. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/10/2015 - 10:53
नवीन
(हाणाहितं)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 06/09/2015 - 11:15
नवीन
छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण..
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 06/09/2015 - 11:19
नवीन
अहो जेपी,
जग ही कंपु शाळा,
कुणी न येथ भला चांगला..
असो... :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 11:25
नवीन
कंपु म्हणजे काय?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 06/09/2015 - 11:32
नवीन
सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर अजुन तरी भेटल नाही!!
(नेम अचुक लागला)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 11:36
नवीन
उत्तर भेटणारही नाही. जे अस्तित्वातच नाही ते कोण कसे सांगणार? ;)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 06/09/2015 - 11:45
नवीन
मंजे जे अस्तित्वात नाही त्याच अस्तित्व नाकारुन तुम्ही अस्तित्वात असणार्या गोष्टीच अस्तित्वात असण शक्य नाही अस म्हणत आहात तर ते अस्तित्वावरच शंका घेण्यासारखे आहे..!!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 06/09/2015 - 11:35
नवीन
काव्य मस्त ( कळले शष्प नाही तरीही ) . ....................................याला म्हणतात कंपू बाजी ! ( जय टाटा मोटर्स चा नाका !! )
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 06/09/2015 - 11:40
नवीन
नाका समोर उभा राहणारा
सरळ नाखुस
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/09/2015 - 12:22
नवीन
कंपु म्हणजे काय?
>>> तुम्हाला अलझ्यायमरर्स झाला आहे का सर ?
http://www.misalpav.com/comment/652220#comment-652220
खी खी खी
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/09/2015 - 12:27
नवीन
#हीणप्रतिसाद
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 06/09/2015 - 13:09
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 06/09/2015 - 14:07
नवीन
फायरबंब????
मराठी भाषा उतरणीला लागली ती या मुळेच!!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 15:21
नवीन
लोकसंगीतात लोकांची भाषा असते.
फ़ायरबंब हा रुळलेला शब्द आहे. जर मराठी शब्दच वापरायचा ठरवला तर मला तरी "अग्निशामक दलाची गाडी" असा लांबलचक शब्दच समोर येतो. दुसरा सुटसुटीत शब्द मला माहिती नाही.
याच नियमाने "राया माझ्या हिरीला इंजिन बसवा" या लावणीत इंजिन या शब्दाऐवजी "पाणी उपसायचे यंत्र" असा शब्द वापरायला हवा होता त्यांनी.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/09/2015 - 15:56
नवीन
"आगीचा बंब" हा शब्दही चालेल. मीटरमधे बसतोय का बघा.
-आख्खे बालपण अग्निशमन दलात काढलेला खटपट्या.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 16:40
नवीन
हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये बसते किंवा कसे हे सूडला विचारावे लागेल. त्याच्याकडे शिंप्याकडे असते तशी मीटरपट्टी आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/09/2015 - 16:50
नवीन
अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे बसतेय का असे म्हणतोय...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 16:51
नवीन
चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार प्रकाश टाकतील.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 06/10/2015 - 01:04
नवीन
सगा बाबा इनोद व्हता त्यो!!
कवितेला आणि कधी भाषेचा लगाम रुचेल होय?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 06:05
नवीन
अरारा... म्या उगाच शिरेसली घेतला. पुढच्या वेळी इनोद लिवाल तवा "हा इनोद हाये" आसा सपष्ट लिवा. ;)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 06/10/2015 - 06:14
नवीन
हो चालेल.
कधी कधी गाण्याचे संगीत आधीच तयार असते आणि त्या चालीवर गीतकाराला गाणे लीहायला सांगीतले जाते. अशावेळी गीतकार गाणे लीहून आधीच तयार असलेल्या चालीवर म्हणून बघतो. या प्रक्रीयेला गाणे मीटरमधे बसवणे असे म्हणतात.
चू.भू.दे.घे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 06:19
नवीन
तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये. चाल तयार होती, मी फक्त एका प्रतिसादाला मीटरमध्ये बसवलं. ;)
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 06/10/2015 - 08:02
नवीन
हे कुठ ऐकायला मिळेल?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/09/2015 - 16:15
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 06/09/2015 - 16:17
नवीन
काव्य आणि पैजारबुवांचे कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट !
सध्या आय.टी. मधे रेसेशन आहे का? रेसेशन आले की अॅप्रैजल मनाप्रमाणे होत नै, सॅलरी रेज मिळत नाही, इन्फ्लेशनशी पगार जुळत नाही, मग नाईलाजाने मैनेसाठीचे बजेट कमी होते अन मैना नाराज होऊन, सोडून ("दुस-याकडे") जाते असे ऐकवीत आहे.
या काव्य सुमनामागे अशी काही कल्पित प्रेरणा दडली आहे का की ज्यामुळे भर पावसात आगडोंब उसळलाय?
:-)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/09/2015 - 16:38
नवीन
हे शिघ्रकाव्य आहे. प्रेरणा इथे आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/09/2015 - 16:40
नवीन
काहीही हा बबन...
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 06/09/2015 - 16:50
नवीन
एका ऐकलेल्या जोकवरून हे सुचले.
सिच्युएशन : २००७/०८ ची आय. टी. तील मंदी.
दररोज एका बॅचलर आय.टी. इंजीनीयर बरोबर फिरणारी मुलगी विचारते.
"आज क्या खिलायेगा? "
तो , " क्या करे, रेसेशन है. पेमेंट कम आ रहा है आजकल"
ती " पाणीपुरी भी नही? "
तो , " क्या करे. इस टाइम सॅलरी भी कम आया है"
ती " तो आज कुछ् भी नही? "
तो" नही"
ती" तो ठिक है, आजसे तू मेरा भाई है"
कृ. ह. घे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 06/10/2015 - 06:29
नवीन
कोंबडी पळालीची चाल पण लावता येईल.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 06/10/2015 - 08:12
नवीन
ही... ही... ह्या.... ;)
उगाच असेच एक महान काव्य आठवले ! :- माझं हे सारं सामान गं सखू...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar
From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 11:17
नवीन
मी कितीही आयडी बदलले तरीही सखू मात्र तिथंच आहे. ;)
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 06/29/2015 - 14:09
नवीन
"कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते.
हाहाहा
पाताळविजयम मद्राशी शिणेमातील हास्य
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/30/2015 - 09:20
नवीन
चुकून पातळविजयम वाचले :D
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Wed, 07/01/2015 - 06:56
नवीन
आयला प्रतिसादांचा रोख भलतीकडॅच वळला. असो, पण सगा साहेब कविता नादभरीच!
विरही पुरुषांच्या व्यथेला एक गगनभेदी वाचा फोडली!
दुस-या कुणाला सांगून समजतं का हो हे दु:ख!
मस्त रचना!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »