सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग १
सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
💬 प्रतिसाद
(153)
क
कंजूस
Fri, 06/12/2015 - 08:06
नवीन
सर्वात प्रथम संपादक मंडळाला धन्यवाद इतक्या जलदगतीने हवा असलेला धागा-सदर आणि। तेसुद्धा एक नाहीतर दोन शुरू केलेत. एक हा छोटे प्रश्न विचारण्यासाठी आणि एक बातम्यांकडे लक्ष वेधून त्यावर चर्चा करण्यासाठी.
गवि,तुमच्या वरच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेच.एक प्रश्न जो मी सकाळी या धाग्यानिमित्त संपामंडळाला विचारता होता तोही इथे डकवतो- टॅावरमधल्या वाढत्या आगी आणि त्यात अग्निशमनदलाचेच कर्मचारी बळी का पडताहेत?लिफ्टच्या वापरातूनही अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रशिक्षणात काही चूक आहे का?
स
सुनील
Fri, 06/12/2015 - 08:12
नवीन
दोन्ही संकल्पना (छोटे प्रश्न आणि बातम्या) 'शेजारधर्मातून' आल्या असल्या तरी आहेत स्तुत्यच!
बेपर्वाई आणि प्रशिक्षणाचा अभाव, ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच कारणीभूत आहेत ह्या दुर्घटनांना.
ग
गवि
Fri, 06/12/2015 - 08:25
नवीन
..निश्चित..अनुकरणीय ते अनुसरावे यात सर्वांचा आनंद असतो.
...एकोळी धागे अप्रकाशित होऊ नयेत आणि उलट त्यातून माहिती पुढे यावी याकरिता हे धागे.
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/12/2015 - 08:38
नवीन
अत्यंत उपयोगी उपक्रम !
आग लागण्याची कारणे आणि अग्निशमन करताना होणार्या दुर्घटनांची महत्वाची कारणे...
(अ) मोठ्या इमारतींच्या बांधकामात आवश्यक असणार्या सर्व सुरक्षयोजना बांधण्यात बेपर्वाई, अज्ञान आणि/अथवा केवळ फायद्याकडे पाहून यामुळे बिल्डर्स करत असलेली हयगय.
(आ) बिल्डर्सच्या बेपर्वाईने आणि/अथवा संगनमताने दुर्लक्ष करणारे शासकिय अधिकारी.
(इ) इमारतीत राहणार्या लोकांची सुरक्षितेबद्दलची बेपर्वाई.
(ई) भरतीपूर्वी अपुरे शिक्षण आणि भरतीनंतरच्या सततच्या शिक्षणाचा (कंटिन्युईंग प्रोफेशनल डेवलपमेंट) अभाव असणारे अग्निशमन दलातील कर्मचारी.
(उ) अग्निशमक दलातील कर्मचार्यांसाठी आवश्यक असलेल्या संरक्षक सामग्रीचा अभाव व अपुरेपणा आणि त्याकडे होणारे अक्षम्य शासकिय दुर्लक्ष.
म
मोदक
Fri, 06/12/2015 - 10:48
नवीन
+१११११
बहुदा वरील मुद्द्यांमध्ये याचा समावेश झाला असावा. तरीही देत आहे.
१) बिल्डरने सुरक्षिततेच्या मुद्द्याला संपूर्णपणे फाट्यावर मारून फक्त "कम्प्लीशन सर्टिफिकेटसाठी" केलेली पूर्तता म्हणून बसवलेली कुचकामी यंत्रणा
२) अग्नीशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्यामुळे वाढलेली आगीची तीव्रता. याला कारणीभूत असलेली रस्त्यांची दुरावस्था किंवा त्या अनुषंगाने असलेल्या सर्व गोष्टींचा अभाव.
आपण साध्या साध्या बाबी सहज पडताळू शकतो.
१) आगीचा बंब, पाण्याचा टॅंकर आणि इतर वाहने आपल्या सोसायटीमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करू शकत आहेत का..? दोन इमारततींच्या दरम्यान असलेल्या वायर, केबल किंवा वाटेत उभी असलेली वाहने अशा क्षुल्लक गोष्टी बहुमुल्य वेळ वाया घालवू शकतात.
२) इमारतीमध्ये बसवलेली यंत्रणा वर्षानुवर्षे बंद असते त्यामुळे त्या पाईप ला चिरा जावून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्या पाईपचे आयुष्य वाढवण्यासाठी ती गुंडाळी सोडवणे व बाहेर काढून नीट तपासून गुंडाळणे आवश्यक असते.
३) Fire Extinguisher असतील तर त्यांचे आयुष्य पडताळावे लागते व वेळोवेळी आपल्या भागातील Fire Department कढून प्रमाणीत करून घ्यावे लागते.
स
सुबोध खरे
Fri, 06/12/2015 - 08:45
नवीन
गवि साहेब
एकाच आकारमानाच्या इंजिनात एका वेळेस इंधन किती जाईल आणि कसे जळेल त्यावर त्याची शक्ती अवलंबून असते.
उदा १०० सी सी च्या चार मोटार सायकल बाजारात आल्या. १९८४-८५ मध्ये यात हिरो होंडा CD १००-- ७. ० बी एच पी होती पण ४ स्ट्रोक ची असल्यामुळे तिचे मायलेज ७०-८० होते. इंड सुझुकी ८. ५ बी एच पी होती पण मायलेज ५० ते ५५ होते. बजाज कावासाकी KB १०० ची शक्ती १० बी एच पी होती पण मायलेज ५० होते आणि सर्वात शक्तिमान यामाहा RX १०० -- ११ बी एच पी होती पण मायलेज ४५ होते.
आपल्या भाषेत सांगायचे तर तेवढ्याच आकाराचे विमानाचे इंजिन टर्बो प्रॉप कि टर्बो फ्यान आहे कि टर्बो जेट आहे कि राम जेट आहे यावर त्याची शक्ती अवलंबून असते.
म
मोहनराव
Fri, 06/12/2015 - 10:26
नवीन
डोळ्याचा नंबर (चष्मा) घालवण्यासाठी लेझर प्रक्रीया किती लाभदायक आहे? ती आयडियली कधी करावी? किती खर्च येऊ शकतो.?
याचे काही दुष्परीणाम आहेत का?
आ
आदूबाळ
Fri, 06/12/2015 - 11:09
नवीन
मी २००८ साली ही शस्त्रक्रिया करून घेतली. एका डोळ्याला उणे १२ आणि दुसर्याला उणे १० नंबर होता. चष्मा फुटला तर तळहातावरच्या रेषाही दिसत नसत.
आमच्या फ्यामिली ऑप्थेल्मॉलॉजिस्टनेच शस्त्रक्रिया केली. नंबर पूर्णपणे गेला.
कधी करावी हे ऑप्थेल्मॉलॉजिस्टच सांगू शकतील. आमच्या ऑप्थेल्मॉलॉजिस्टने ३ वर्षं थांबायला लावलं होतं.
खर्च रु. ३५,००० आला. लेसिक शस्त्रक्रिया कॉस्मेटिक सर्जरी प्रकारात मोडत असल्याने इन्शुरन्समध्ये कव्हर झाली नाही.
पुढे साधारण वर्षंभर डोळे कोरडे पडायचा त्रास झाला. पण ते हळूहळू कमीकमी होत गेलं.
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 11:28
नवीन
काही वर्षांनी पुन्हा नंबर येतो असा ऐकला आहे.
तुमचा अनुभव काय आहे ?
आ
आदूबाळ
Fri, 06/12/2015 - 11:37
नवीन
सोळा-अठरा तास डोळ्यांचा हेवी उपयोग करूनही सात वर्षांत तरी नाही आला. (लाकूड-स्पर्श)
पुढे काय माहीत...?
म
मोहनराव
Fri, 06/12/2015 - 12:55
नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या दोन्ही डोळ्यांचा नंबर जास्त नाहिये. १.७५ व २.२५ आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी की न करावी अशा संभ्रमात आहे.
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:59
नवीन
कधी रे झाला ?
म
मोहनराव
Fri, 06/12/2015 - 13:02
नवीन
झाला रे काळानुरुप... काय करणार.. बुढापा पास आ रहा है!! :)
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:59
नवीन
कधी रे झाला ?
अ
अजया
Fri, 06/12/2015 - 13:43
नवीन
या नंबरला लेन्सेस पण वापरता येतील.सर्जरीची काय गरज?
ग
गिरकी
Fri, 06/12/2015 - 13:50
नवीन
लेन्सेस वापरणे सेफ असते का? मध्ये काहितरी स्वयंपाक करताना उष्णतेमुळे लेन्सेस डोळ्याला चिकटून डोळे गेले वगैरे असलं थोबाडपुस्तकावर वाचलेलं होतं. फाट्यावर मारण्याएवढी अतिशयोक्ती असतेच तिकडे. पण खरेच, लेन्सेस चूज कशा कराव्या? आमच्या घरी डोळ्यात फॉरेन ऑब्जेक्ट घालायची नाही येवढेच कारण देऊन नकार घंटा वाजत असते.
म
मधुरा देशपांडे
Fri, 06/12/2015 - 14:21
नवीन
अजयाताईशी बाडीस. कमी नंबर असेल तर लेन्सेस बर्या पडतात. माझा -२.५ आणि -१.७५ आहे. त्यात एका डोळ्याला सिलिंड्रिकल (Astigmatism) नंबर. मी वापरते लेन्सेस. काहीही त्रास होत नाही. उलट फार बरं वाटतं दिवसभर चश्मा न लावता. संगणकावर सगळे काम असले तरीही सलग ८-१० तास काही अडचण येत नाही. घरी गेले की चश्मा.
मी सुरुवातीपासुन मंथली डिसपोजेबल वापरते म्हणजे चुकुन एखादी खराब झालीच, तरी नुकसान कमी होते. चांगल्या ब्रँडच्या कुठल्याही सॉफ्ट लेन्सेस वापरल्या तरी हरकत नाही.
लेन्सेस घालुन झोपायचे नाही, डोळे चोळायचे नाहीत या बेसिक प्रीकॉशन्स. एकदा सवय झाली की हे न ठरवताही जमते. अजुन एक काळजी म्हणजे शक्यतोवर मिरच्या, कांदा चिरुन मग नंतर चुकुन डोळ्याला हात लावला तर त्रास होतो, पण ही काही फार मोठी कटकट होत नाही. कांद्याने डोळ्यातुन कितीही पाणी काढले तरीही लेन्सेस व्यवस्थित राहतात. ;) हे अर्थातच रोज रोज होऊ नये पण चालतं. टु व्हीलर चालवताना हेल्मेट वापरायचे त्यामुळे तेव्हाही डोळ्यात काही जाण्याचा त्रास व्हायचा नाही. उन्हाळ्यात सुर्यचश्मा लावता येतो ही एक माझ्यासाठी आनंदाची बाब. :)
मोठ्या प्रवासात शक्यतो टाळायचे लेन्सेस. नेहमीसाठी त्या लेन्सेसची डबी आणि क्लीनिंग लिक्विड पर्समध्ये ठेवावे लागते ही जरा कटकट, पण कंफर्ट जास्त महत्वाचा. :)
मला लग्नात लेन्सेस घालुन मी खूप रडले तर काय, याचे भयंकर टेन्शन आले होते, प्रत्यक्षात मी शिस्तीत रडण्याआधी काढुन ठेवल्या. ;)
ज
जुइ
Fri, 06/12/2015 - 18:04
नवीन
मी जवजवळ २-३ वर्ष सॉफ्ट लेन्स वापरल्या आहेत. काही त्रास झाला नाही उलट खूप सुटसुटीत वाटते. लेन्सही कशाला वापरायच्या म्हणून लेसरची ट्रीटमेंट घेतली. बरेच वर्ष झाली डोळ्यांना कोणताही त्रास नाही.
अ
अनन्त अवधुत
Sat, 06/13/2015 - 02:57
नवीन
+१ लेन्सेस ने त्रास होत नाही. डोळे लेन्सेस साठी योग्य आहेत अथवा नाहीत ते बघून लेन्सेसचा पर्याय स्वीकारा. लेन्सेस लावायचा सराव डॉक्टर करून घेतात. सुरुवातीला त्रास होतो, वेळ लागतो पण सरावाने विनात्रास लेन्सेस लावणे आणि काढणे साधता येते.
संगणक अथवा टीव्ही समोर फार वेळ बैठक असेल तर लेन्सेस टाळा. कारण फार वेळपर्यंत संगणक अथवा टीव्ही समोर बसलात तर लेन्सेस कोरडे होण्याची शक्यता आहे. त्याने डोळे लाल होतात , जळजळतात.
लेन्सेस ची काळजी चष्म्यापेक्षा जास्त घ्यावी लागते. वेळच्यावेळी लेन्सेस काढून ठेवणे , लेन्सेस चांगल्या सोलुशन मधेच ठेवणे, वगैरे. मुदत संपल्यावर किती वापर केलाय याचा विचार न करता लेन्सेस टाकून देणे योग्य. लेन्सेस ची योग्य काळजी नाही घेतली तर त्याने डोळ्याला अल्सर सुद्धा होऊ शकतो (लेन्सेस चा सराव करताना डॉक्टर ने लेन्सेसची आर होते, त्याचा हा गोषवारा)
Astigmatism कॉमन आहे पण तरीही सगळ्या लेन्सेस astigmatism साठी योग्य नाहीत. त्यामुळे लेन्सेस घेताना हा पण एक मुद्दा पाहून घेणे. माझ्या लेन्सेस ला astigmatism correction नाही पण चष्म्याला आहे.
बाकी माहिती डॉक्टर देतीलच.
अवांतर:
तुमचा चष्मा दूरचा असेल तर संगणक / टीव्ही साठी एक शून्य नंबरचा antiglare चष्मा आणि गाडी चालवायला , बाहेर फिरायला prescribed sunglasses घेऊ शकता
स
सविता००१
Wed, 07/01/2015 - 02:52
नवीन
मी तर गेली ८ बर्षे वापरते आहे मंथली डिसपोजेबल लेन्सेस. काहीही त्रास होत नाही. आणि ....
लेन्सेस घालुन झोपायचे नाही, डोळे चोळायचे नाहीत या बेसिक प्रीकॉशन्स. एकदा सवय झाली की हे न ठरवताही जमते. अजुन एक काळजी म्हणजे शक्यतोवर मिरच्या, कांदा चिरुन मग नंतर चुकुन डोळ्याला हात लावला तर त्रास होतो, पण ही काही फार मोठी कटकट होत नाही. कांद्याने डोळ्यातुन कितीही पाणी काढले तरीही लेन्सेस व्यवस्थित राहतात. ;) हे अर्थातच रोज रोज होऊ नये पण चालतं. टु व्हीलर चालवताना हेल्मेट वापरायचे त्यामुळे तेव्हाही डोळ्यात काही जाण्याचा त्रास व्हायचा नाही. उन्हाळ्यात सुर्यचश्मा लावता येतो ही एक माझ्यासाठी आनंदाची बाब. :)
मोठ्या प्रवासात शक्यतो टाळायचे लेन्सेस. नेहमीसाठी त्या लेन्सेसची डबी आणि क्लीनिंग लिक्विड पर्समध्ये ठेवावे लागते ही जरा कटकट, पण कंफर्ट जास्त महत्वाचा. :) हे अगदीच सेम. नवीन नवीन स्वैपाक करायला लागल्यावर या गोष्टीचा त्रास अजुन आठवतो. जरा जरी मिरची, कांदा चिरून स्वच्छ हात धुवून जरी लेन्सेस घालायच्या म्हटलं तरी डोळे खूप चुरचुरतात. पण नंतर आपण आपली कामं आणि लेन्सेस यातलं आधी काय हे आपोआप ठरवू लागतो.
मला लग्नात लेन्सेस घालुन मी खूप रडले तर काय, याचे भयंकर टेन्शन आले होते, प्रत्यक्षात मी शिस्तीत रडण्याआधी काढुन ठेवल्या. ;) - हे अजून भारी. मी लेन्स सकट रडारड केली. काही त्रास झाला नाही-लेन्सेस चा ;)
म
मोहनराव
Fri, 06/12/2015 - 14:42
नवीन
मी लेन्सेस वापरुन पाहिल्या आहेत. मला खुपदा त्रास झाला त्याचा. डोळे दुखतात. सकाळी लेन्स चढवायला १५-२० मिनिटे जायची. परत डोळ्यात काही गेले तर प्रॉब्लेम. ४-५ हजार खर्च करुन चांगल्या करुन इकडे परदेशात घेउन आलो. पण आता तश्याच पडुन आहेत. त्यापेक्षा चष्मा सोईस्कर वाटतो मग.
म
मधुरा देशपांडे
Fri, 06/12/2015 - 14:53
नवीन
तुम्ही डॉ.शी याबाबत बोलला आहात का? म्हणजे काही केसेस मध्ये लेन्सेसने प्रॉब्लेम होऊ शकतो पण सहसा नाही. अगदी सुरुवातीला मलाही १५-१५ मिनिटे लागायची आणि फक्त चिडचिड व्हायची. पण सवय झाल्यानंतर मात्र २ मिनिटे देखील खूप झाली. गेली ५ वर्ष मी रेग्युलर लेन्सेस वापरते पण डोळे दुखणे, काही इन्फेक्शन असेही काहीच झाले नाही. जेव्हा पोलन्सचा सीझन असतो, तेव्हा अॅलर्जीसारखे वाटले तर फक्त २-३ दिवस टाळते.
आ
आदूबाळ
Fri, 06/12/2015 - 14:52
नवीन
धत् तेरे की... हा काय नंबर आहे?! ;)
(ह घ्या)
आ
आनंदी गोपाळ
Fri, 06/12/2015 - 11:33
नवीन
ऑपरेशन फेल झाल्यास जास्तीत जास्त काय नुकसान होईल? हा प्रश्न तुमच्या डाक्टरांना विचारून पहा. त्याचे उत्तर मिळाल्यानंतर निर्णय घ्या.
र
रेवती
Mon, 06/15/2015 - 20:20
नवीन
माझ्या नणदेनी करून घेतली होती. तिला ३ की ४ असे काहीसे नंबर्स होते. दोन चार दिवसांची काळजी घेतली. हे प्रकरण निदान १८ वर्षांपूर्वीचे तरी असावे. खर्च अदूबाळ म्हणतात त्यापेक्षा कदाचित कमी असावा. माहित नाही. पण डोळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे.
अ
अकिलिज
गुरुवार, 07/30/2015 - 16:18
नवीन
लेझर प्रक्रियेमध्ये कोंर्नियाला जो छेद देतात तो ब्लेडने न देता लेझरनेच देणारी करा. किंवा आजकाल छेद न देताही लेझर करता येणारी प्रक्रिया आली आहे. थोडी महाग आहे इतकंच.
म
मॅक
Fri, 06/12/2015 - 14:21
नवीन
मी ब-याच दिवसापासून अशा काहीतरी कामाच्या शोधात आहे कि, जे मला घरबसल्या माझ्या सोईनुसार करता येईल..आणि काही पैसेही कमवता येतील... मी बराच शोध घेतला पण मला काही मिळाले नाही...मग मी हा विचार केला की हा विचार इथे मांडून पाहू काही माहीती मिळते का ते.
टायपिंग संदर्भात.... तसेच संगणकावरून करण्यासारखे (Online/Offline) असे काही कामकाज उपलब्ध असल्यास जाणकारांनी त्या संदर्भात मार्गदर्शन करावे.... आपले मत अनमोल आहे.
ख
खटपट्या
Fri, 06/12/2015 - 14:51
नवीन
आपल्याला शेअर मार्केटबद्दल माहीती असल्यास आपण डेली ट्रेडींग करु शकता. मार्केट बद्द्ल माहीत नसल्यास प्रशीक्षण घेउ शकता.
(साध्या भाषेत हा जुगार आहे. योग्य व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय करु नये)
क
कंजूस
Fri, 06/12/2015 - 16:18
नवीन
लॉजिस्टिक्स -बंदरात बोटी येतात त्यांच्या मालाचे नियोजन करता येईल.
अ
असंका
Fri, 06/12/2015 - 16:40
नवीन
सगळे उत्तमोत्तम/ आवडते वगैरे धागे एकत्र कुणी ठेवले आहेत का हो? समजा आपल्या स्वतःच्या प्रोफाइलवर?
स
सतिश गावडे
Fri, 06/12/2015 - 16:59
नवीन
संपर्क करा: श्रीरंगरावजी जोशी पाटील
स
सतिश गावडे
Fri, 06/12/2015 - 16:57
नवीन
मोबाईल संगणकाच्या युयसबीने चार्ज केल्यास खूपच मंद गतीने चार्ज होतात हे आज कळले. :)
ल
लंबूटांग
Fri, 06/12/2015 - 17:24
नवीन
USB 2.0 असल्यास ढोबळमानाने दुप्पट वेळ लागतो कारण त्याच्यातून फक्त ५०० मिली अॅम्पिअर इतकाच विद्युतप्रवाह येतो. USB 3.0 असल्यास ९०० मिअॅ इतका प्रवाह येतो. सर्वसाधारणपणे जे आपल्या भिंतीतल्या outletमधे जाणारे चार्जर असतात ते १००० मिअॅ इतक्या प्रवाहाने चार्ज करतात.
सर्वसाधारण पणे तुमच्या फोनमधे १५०० मिअॅअवर (mAh) ची बॅटरी असते. त्यामुळे तिला wall outlet च्या चार्जर ने दीड तास लागेल पण USB 2.0ने १५००/५०० म्हणजेच ३ तास वेळ लागेल.
ह्याच कारणास्तव शक्यतो एका उपकरणाचा चार्जर दुसर्या उपकरणासाठी वापरू नये कारण जर का एखादा चार्जर २००० मिअॅने चार्ज करत असेल आणि तुमचा फोन तितका प्रवाह वापरण्यास सक्षम नसेल तर खराब होऊ शकतो.
माझ्या आठवणी प्रमाणे अॅपलने आपल्या आयपॅड साठी अजून जास्ती मिअॅ चा चार्जर बनवला होता पण तो केवळ १.२ मिअॅ इतकाच होता त्यामुळे iPhone वगैरे खराब झाले नाहीत पण बर्याच लोकांना iPhone चे चार्जर वापरून iPad चार्ज करणे शक्य होत नव्हते. तसेच iPad तुमच्या PC चा USB पोर्ट वापरून अजिबातच चार्ज होत नसे. आता परिस्थिती बदलली असेल तर कल्पना नाही.
माझ्या सद्ध्याच्या नोकरीच्या लॅपटॉप मधे एक USB port केवळ charging साठी dedicated आहे (त्यावर बॅटरीचे चिन्ह आहे) आणि त्याला फोन चार्जिंग ला लावल्यास पटकन चार्ज होतो.
G
gogglya
Wed, 07/01/2015 - 13:57
नवीन
जर चार्जर चे विभवान्तर सारखेच असेल [ ५ v ], तर जास्त अॅम्पिअर च्या चार्जर ने काहिही फरक पडत नाही. आपल्या घरात जसे २४० v ला १० w चा बल्ब लावा किंवा २००० w चा गीझर लावा, तसेच...
ल
लंबूटांग
Tue, 07/28/2015 - 20:03
नवीन
व्होल्टेज, Ampere आणि Wattage मध्ये.
V=IR त्यामुळे 5V च्या charger मधून वेगवेगळ्या mA चा विद्युतप्रवाह पाठवता येऊ शकतो. तसेच १२ V च्या charger मधून 1 mA current पाठवू शकतो. मात्र तुमचे उपकरण केवळ ५V व्होल्टेज साठीच प्रमाणित असेल तर ते जळून जाईल.
यामुळेच अमेरिकेतील उपकरणे जी १२०V वर चालतात ती भारतात आणली असता त्यांना स्टेप down transformer लावावा लागतो.
या उलट W = VI
तुम्ही जे उदाहरण दिले आहे ते त्याचा अर्थ एवढाच होतो की तो बल्ब १०/२४० = ०.०४१६६६६.. A इतका प्रवाह (current) वापरतो तर गीझर २०००/२४० = ८.३३३ A इतका प्रवाह वापरतो.
येथे http://www.helcohi.com/sse/body/hp.html व्होल्टेज करंट आणि Wattage मधील फरक छान समजावला आहे.
ऋ
ऋतुराज चित्रे
Sun, 06/14/2015 - 07:39
नवीन
६-७ वर्षांपुर्वी Lars and the Real girl हा इंग्रजी सिनेमा बघण्यात आला होता. एका सेक्स डॉलच्या प्रेमात पडलेल्या तरुण युवकाची विनोदी अंगाने जाणारी कथा होती. सिनेमा सुंदर होता, बिभित्सपणाचा लवलेशही नव्ह्ता. परंतु भारतात बिभित्सतेच्या नावाखाली सेक्स डॉल विक्रीला बंदी आहे. सेक्स डॉलची ऑनलाइन खरेदी कायदेशीर आहे का?
स
संदीप डांगे
Sun, 06/14/2015 - 11:59
नवीन
खरेदी विक्री बेकायदेशीर नाही. पण आयात बहुतेक कस्टम्स च्या कचाट्यात पडण्याची शक्यता आहे.
जेव्हापासून जिवंत माणसाच्या हुबेहुब प्रतिकृती बघितल्या आहेत तेव्हापासून ह्यांचा वापर वेश्यांऐवजी व्हावा असे वाटायला लागले आहे.
क
कंजूस
Sun, 06/14/2015 - 12:27
नवीन
अगदी पहिल्या गवि यांच्या प्रश्नाचे उत्तर ( गाडी वगैरेचा काही अनुभव नाही )केवळ शास्त्रीय आधारावर--१२००cc पेट्रोल एंजिनअसल्यास वीसने भागून ६० एचपी { आणि ३ लिटर डिझल असल्यास ४० ने भागून ७५ एचपी } ताकद होते.
एखादे एंजिन समझा ८ हजार ताकदीचे असेल तर तो एक वजन आणि वेगाचा गुणाकार म्हणून पाहायचे. १००किग्र वजनाची गाडी ८० किमी वेगाने नेईल अथवा ८० किग्रा वजनाची गाडी १००किमी वेगाने नेईल. आपल्याला अपेक्षित वेगाचे गाडीचे मॅाडेल असले की आपण खुश होतो.
न
नाव आडनाव
Mon, 06/15/2015 - 06:11
नवीन
असाच अजून एक धागा - ज्या धाग्यावर विनोद (फॉरवर्ड केलेले + ऐकलेले + समोर होणार्या गोष्टीतले) टाकता येतील - चालू करता येइल का ? आणी बातम्या, प्रश्न...शंका..., विनोद या तीन धाग्यांसाठी एक सेक्शन (आणी त्यासाठी एक टॅब) सुध्धा वेगळा करता येइल
ख
खटपट्या
Mon, 06/15/2015 - 06:39
नवीन
कल्पना चांगली आहे.
रच्याकने - कल्पना कोण असे क्रुपया विचारु नये.. :)
ग
गवि
Mon, 06/15/2015 - 07:06
नवीन
..हाच जोक नव्या धाग्यावर टाकून जोकधाग्याचा नारळ फोडावा काय?
;-)
ध
धनावडे
Mon, 06/15/2015 - 09:56
नवीन
प्ले ग्रुपला मुलाना शिकण्यासाठी टाकने फायदेशीर आहे का?
क
काळा पहाड
Mon, 06/15/2015 - 19:14
नवीन
टाकलं तर लागणार नाही का त्यांना?
ध
धनावडे
Mon, 06/15/2015 - 20:06
नवीन
अशी प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते(६ वर्ष वाचनमात्र असण्याचा अनुभव)
बाकी प्रश्न चुकलाय थोडा हे माहित आहे.
धन्यवाद
अ
अरुण मनोहर
Wed, 07/01/2015 - 01:34
नवीन
मुलांना टाकले तर कोणीही सोम्यागोम्या उचलून नेईल ते चालेल कां?
स
संदीप डांगे
Mon, 06/15/2015 - 19:18
नवीन
तुमचा प्रश्न सुटा सुटा करा आणि त्यावर विचार करा.
मुलाचं वयः साधारण दिड वर्षांच्या वरची मुले प्लेगृपमधे पाठवावी. काही उत्साही पालकांना नऊ महिने ते एक वर्षाच्या मुलांना प्ले-गृपमधे 'टाकून' देतांना पाहिलंय. इतकी लहान मुले अशा वातावरणात आईविना सोडणे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे असू शकते. (वर्किंग मदरच्या अडचणी मी जाणतो पण त्या बाबतीत माझे विचार जरा कठोर आहेत.)
प्ले-गृप = लहान मुलांना खेळण्यासाठीचे ठिकाण, जेथे मुलांचं प्राथमिक अवस्थेतलं सामाजिकिकरण होतं. वेगवेगळ्या खेळ-खेळण्यांच्या माध्यमांतून त्यांच्या शारिरीक, मानसिक वाढीला मदत होते.
शिकण्यासाठी = काय शिकण्यासाठी? वन-टू-थ्री-फोर, ए-बी-सी-डी, बा-बा ब्लॅक्शीप असं फाड फाड म्हणणं शिकण्यासाठी? 'शिकणे' यातून आपल्याला काय अभिप्रेत आहे त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
फायदेशीर = वय वर्षे दीड ते साडेतीन वयोगटातल्या मुलांच्या शिकण्यातून 'फायदेशीर' असे काय अपेक्षीत आहे?
असो.
माझा सल्ला: दिड ते साडेतीन वर्षे वयाच्या मुलांना भरपूर खेळायला मिळेल, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाईल अशा प्ले-गृप मधे मज्जा करण्यासाठी मुक्त सोडावे. किमान दिड तास ते कमाल तीन तास हा कालावधी असावा. 'शिकण्यासाठी टाकू' नये. दुसर्या मुलांसोबत होणारे आदान-प्रदान, बोलणे, खेळणे, रंग, आकार, आवाज ओळखणे यांतून मूल त्या वयाला आवश्यक ते सर्व योग्य रितीने शिकत जातं. त्याला तशी पार्श्वभूमी देणे एवढंच आपलं काम. बाकी या वयात जबरदस्ती अंक, अल्फाबेट्स आणि लिहायला वाचायला शिकवणे माझ्यामते मुलांच्या बालपणावर अत्याचार आहे. आणि पुढील आयुष्यात त्याचा काही उपयोग नाही.
ध
धनावडे
Mon, 06/15/2015 - 20:07
नवीन
धन्यवाद सर
भ
भिंगरी
Sat, 06/20/2015 - 08:21
नवीन
संदीप डांगे यांच्या मताशी एकदम सहमत.
(वर्किंग मदरच्या अडचणी मी जाणतो पण त्या बाबतीत माझे विचार जरा कठोर आहेत.)
हेही बरोबर आहे.
ज
जयन्त बा शिम्पि
Mon, 06/15/2015 - 18:47
नवीन
मी सेवा निव्रुत्त झालो आहे , भाषांतराचे काम ( मराठीचे इंग्रजीत व इंग्रजीचे मराठीत ) उत्तम जमते. वेळ आहे, पण हे काम कोठे व कसे मिळवावे ? घरी सन्गणक आहेच.( ल्याप्टॉप ). भाषांतरासाठी पर पेज किती पैसे आकारावे ? तेही सांगावे.
आ
आदूबाळ
Mon, 06/15/2015 - 19:08
नवीन
www.proz.com/ सारख्या साईट्सवर मिळेल. तिथे रजिस्टर करा. आपला उत्तम सीव्ही तयार करा. विचारणा आली की पुढच्या पंधरा मिनिटांत निर्णय घेऊन उत्तर पाठवा. वेळेत काम पूर्ण करून पैसे वगैरे मिळाल्यावर त्या माणासाला रिव्ह्यू लिहायला सांगा. लिंक्डईन प्रोफाईल बनवा.
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »