सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग १
सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
💬 प्रतिसाद
(153)
श
श्रीरंग_जोशी
Sun, 07/26/2015 - 21:45
नवीन
मिलिंद सोमण यांच्या आयर्नमॅन ट्रायथलॉनमधल्या कामगिरीवरचा हा लेख वाचनीय आहे.
Why I Run.
ह
हेमन्त वाघे
Tue, 07/28/2015 - 18:45
नवीन
@ सुबोध खरे @ कंजूस आणि गवी
गाडी चे "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" चा ९ अनेक लोक समजतात तसा काहीही समंध नाही
. आणि
एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
कारण तंत्राद्यान
सध्या अशी इंजिन बनतात - कि त्यात अनेक प्रकारचे तंत्राद्यान असू शकते . नवी सर्व इंजिन मध्ये संगणक कंट्रोल करतो . तसेच प्रत्येक टप्प्यात वेगळे तंत्राद्यान असते , त्यामुळे नवीन इंजिन हे पॉवर बरोबर उत्तम मायलेज देणारी हि असू शकतात.
हे इंजिन बघा.
http://www.indiancarsbikes.in/cars/1-5-litre3-cylinder-400-bhp-engine-nissan-81793/
१५०० सीसी , फक्त ३ सिलीन्देर आणे टाकत - ४०० अश्वशक्ती
आणि हिरो होंडा हि ४ स्ट्रोक तर बाकी सर्व २ स्ट्रोक गाड्या होत्या . हे पूर्णत;; वेगळे तंत्राद्यान आहे.
श
श्रीरंग_जोशी
Tue, 07/28/2015 - 19:14
नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद.
थोडीबहुत अशीच चर्चा पूर्वी इथे झाली आहे.
क
कंजूस
गुरुवार, 07/30/2015 - 05:04
नवीन
हेमन्त आणि श्रीरंग,तुम्ही दिलेल्या लिंकस वाचल्या.
प्र श्न डिस्प्लेसमेंट/पावर/ बद्दल आहे हे धरून -एक ग्रम इंधन (पेट्रोल /डिझेल/नॅचरल गॅस/एथनॅाल वगैरे)जाळल्यास प्रत्येकातून किती ( गणिती /therotical)शक्ती निर्माण होऊ शकते ते केमिस्ट्री /फिजिक्समधून कळते .त्यात काही बदल होणार नाही.आता ती शक्ती वेगासाठी वापरायची का वजन वाहून नेण्यासाठी वापरायची एवढाच पर्याय शिल्लक राहतो.A)रेसिंग कार्सच्या बाबतीत { आणि B)सैन्यातल्या वाहनाच्या बाबतीत } इंधन किती वापरावे लागले हा मुद्दा गौण असतो.A मध्ये वेग आणि Bमध्ये वजन वाहून नेणे महत्त्वपूर्ण असते.आपण उत्सुक आहोत ती वाहने इकनॅामिकल म्हणजे १०० किमी ला ६ ते ८ लिटरस पेट्रोल खाणारी असतात.
मला वाटतंय की हा मुद्दा समजावता आला आहे.
ह
हेमंत लाटकर
गुरुवार, 07/30/2015 - 06:32
नवीन
चीनने जशी 2000 कि.मी. भिंत बांधुन परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण केले. तसे भारतातील खैबर खिंड बंद करून अफगाणी आक्रमणापासून देशाचे रक्षण करण्याचे त्यावेळच्या एकाही राजाच्या मनात कसे आले नसेल. यावर आपले मत मांडा.
स
सदस्यनाम
गुरुवार, 07/30/2015 - 06:51
नवीन
खैबरखिंड ताब्यात असणार्या त्यावेळच्या सगळ्या राजांची नावे सांगा ना म्हणजे सगळ्यांचे एकेक प्रॉब्लेम सांगता येतील क्रमाने?
कसय ते.. ७/१२, एफेसाय, सिंमेंट, रेती, दगड, लोन, घरगुती अडचणी असे बरेच जेन्युन प्रॉब्लेम असायचे हो. ;)
आ
आदूबाळ
गुरुवार, 07/30/2015 - 08:38
नवीन
नाय मांडणार.
अ
अस्वस्थामा
गुरुवार, 07/30/2015 - 11:40
नवीन
वेगळा धागा काढा आणि मंग बगा. ;)
बादवे, तूर्तास गूगल मॅपवरुन खैबर खिंड पहा. मग थोडी फार कल्पना येईल अशी आशा..
(पण कल्पना रंजक आहे)
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/30/2015 - 16:13
नवीन
काही महिन्यांपूर्वी मार्को पोलो ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहिली.
मार्को पोलो हा चंगेझ खानाच्या दरबारातला महत्वाचा माणूस असतो. चंगेझ खान यास एका चिनी राजावर आक्रमण करायचे असते. त्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणाभोवती भक्कम व उंच तटबंदी असते. त्यापूर्वी कुणीही ती भेदू शकलेलं नसतं. मार्को पोलो संशोधन करून एक अजस्त्र यंत्र बनवतो जे अवजड दगडही लांबवर फेकू शकते.
जेव्हा चढाई केली जाते तेव्हा सर्वप्रथम या यंत्राचा वापर करून त्या तटबंदीवर स्फोटकांचा मारा केला जातो. त्या तटबंदीचा एक भाग कोसळल्याची वार्ता त्या चिनी राजाला पोचते तेव्हा त्याचे उद्गार असतात.
That wall was built by men. It can be destroyed by men.
तसेच तुम्ही सुचवलेली कामगिरी व्यवहार्यही नव्हती. कित्येक पिढ्या ते काम चालले असते. काम पूर्ण होई पर्यंत खूप सारे मनुष्यबळ याच कामात राहिले असते जे आक्रमकांच्या पथ्थ्यावर पडले असते.
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/30/2015 - 11:08
नवीन
तुपाला मोहन का म्हणतात
आ
आदूबाळ
गुरुवार, 07/30/2015 - 11:54
नवीन
तुपाला मोहन कुठे म्हणतात. गरम तेल बाईंडर म्हणून वापरलं (उदा० पुरीच्या कणकेत) तर त्याला मोहन म्हणतात. का ते माहीत नाय...
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/30/2015 - 14:21
नवीन
मोहन की मोहण?
मी तर नेहमीच मोहण ऐकले आहे या संदर्भात.
स
स्रुजा
गुरुवार, 07/30/2015 - 16:21
नवीन
बरोबर. मी पण मोहन च ऐक्लं आहे. आणि तेलाचं पण मोहन असतंच. जर मोहन जास्त पडलं तर भजी , पुर्या जास्त तेल पितात.
म
मी-सौरभ
Fri, 07/31/2015 - 17:03
नवीन
मोहन राव फोर एक्ष्पेर्त ओपिनिओन
स
सायकलस्वार
Mon, 08/03/2015 - 22:50
नवीन
4K टीव्ही घ्यावा की एचडी? 4K चे तंत्रज्ञान रूळायला, म्हणजे सर्व प्रमुख चॅनेल्स 4K मध्ये उपलब्ध आहेत, असा दिवस उजाडायला अजून किती वर्षे लागतील? फ्लॅट स्क्रीन टीव्हीचे आयुष्य साधारण दोनतीन वर्षे असते. एवढ्या काळात 4K प्रॅक्टिकल झालेले असेल, की 4K साठी वाजवलेल्या एक्स्ट्रा दमड्या वाया जातील? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा...
प
प्रदीप
Mon, 08/24/2015 - 17:36
नवीन
तांत्रिक विषय असल्याने, मराठीतून टंकणे मला कठीण असल्याने, इथे प्रतिसाद न देता आपल्या खरडवहीत इंग्लिशमधून लिहीत आहे.
र
राघवेंद्र
Tue, 08/04/2015 - 04:34
नवीन
मी सध्या कारने लांब (अंदाजे १०० किमी ) जा-ये करतो. या रोजच्या प्रवासात डुलकी न -लागण्याचे उपाय काय आहेत ?
सध्या चहा बरोबर नेतो.
ए सी प्रवासी सिट कडे करतो .
प्रवासाची वेळ सकाळी ७:३० व संद्याकाळी ६ अशी आहे.
प्रवास सरळ एकाच महामार्गा वरून आहे.
क
काळा पहाड
Mon, 08/10/2015 - 21:09
नवीन
झकास डुलकी काढायचं सोडून कसले प्रयोग करत बसता? विणकाम, भरतकाम, मोबाईलवर गेम खेळणे, पक्षीदर्शन वगैरे होत असेल तर पहा.
ब
बहुगुणी
Mon, 08/10/2015 - 22:41
नवीन
हा उपाय मला उपयोगी ठरला आहे.
तुम्हाला कॉफी आवडत असेल तर कॉफी कँडीज मिळतात त्या जवळ ठेवा, आणि दहा-एक मिनिटांत एक गोळी संपेपर्यंत तरी हुषार रहाल आणि डुलकी लागणार नाही. (त्या गोळ्यांचे पॅकेट उन्हात राहणार नाहीत असं बघा, उन्हात पाघळून त्या आवरणाला चिकटतात, आणि मग गाडी चालवत असतांना ते आवरण सहज दूर करता येत नाही!)
अर्थात्, खूपच झोप येत असेल तर मुकाट्याने गाडी रस्त्यावरून बाहेर काढून दहा मिनिटे आराम करणं आणि डोळे धुवून परत ड्रायव्हिंगला बसणं हेच श्रेयस्कर, अपघातात जीव धोक्यात घालण्यापेक्षा थोडा उशीर सहन करणं कधीही चांगलं!
र
राघवेंद्र
Tue, 08/11/2015 - 15:09
नवीन
धन्यवाद बहुगुणी आणि काळा पहाड साहेब. कॉफी कँडीज चा प्रयोग वापर करण्यात येइल.
अ
अलक निरन्जन
Tue, 08/04/2015 - 09:18
नवीन
मित्रा हो ,
यू एस ए मधुन कोणता टीवी न्यावा / का नेउच नये या बद्दल काहि माहिती असलयास कृपया पोस्ट करा
देस निकाला आहे डिसेंबर मधे
भ
भाते
Mon, 08/10/2015 - 14:20
नवीन
मटामधल्या १५ मुली, एक मुलगा तरीही पुत्रहट्ट! बातमीने हसु आले. मनात पहिले विचार आला कि हा कदाचित एखादा विक्रम तर नसावा. सहज कुतूहल म्हणुन आंजा वर शोध घेतला. तर याही पेक्षा भयानक वाचायला मिळाले. गिनिज बुक मध्ये एकाच पत्नीपासुन सर्वात जास्त अपत्य संख्या ६९ आहे. आणखी शोध घेतला असता हे सुध्दा सापडले.
श
श्रीगुरुजी
Mon, 08/10/2015 - 19:39
नवीन
लादेनच्या बापाला असंख्य बायका होत्या (एकावेळी चारच. पाचवीशी लग्न करायच्या वेळी तो आधीच्या चौघीतल्या एकीला घटस्फोट द्यायचा). त्याला एकूण ५८ मुले झाली (३६ मुली + २२ मुले). लादेन २२ मुलांमधला १८ वा होता.
लादेनने देखील एकूण ६ लग्ने केली होती. त्याचे एक लग्न केवळ २ दिवस टिकले होते. त्याला देखील १९-२० मुले होती.
स
संदीप डांगे
Tue, 08/11/2015 - 00:35
नवीन
आजचा धडा:
१. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात.
गृहपाठासाठी प्रश्नः
१. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे.
२. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे.
परिसर अभ्यासः
१. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे.
पाठ्यपुस्तकाबाहेरचा अभ्यासः
१. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे.
*('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-)
श
श्रीगुरुजी
Tue, 08/11/2015 - 09:17
नवीन
वा! वा! संदीप डांगे, तुमचा गाढा अभ्यास आणि जलद आकलनशक्ती पाहून धन्य झालो.
>>> १. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात.
बरोब्बर. पैकीच्या पैकी गुण.
>>> १. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे.
प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे.
>>> २. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे.
प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे.
१. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे.
>>> 'सत्ताधारी जात' ? ही कोणती नवीन जात? राजपत्रात, राज्यघटनेच्या एखाद्या परिशिष्टात या जातीचा उल्लेख आहे का? असल्यास ही जात उच्चवर्णीय, इतर मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती इ. पैकी कोणत्या गटात मोडते?
>>> १. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे.
प्रक्षोभक भावना म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपाच्या भावना? या भावना मानसिक गंडातून येतात का? या भावना इतर कोणकोणत्या गंडातून येतात आणि मानसिक गंडातून प्रक्षोभक भावनेव्यतिरिक्त अजून कोणत्या भावना येतात का?
>>> *('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-)
मारली.
स
संदीप डांगे
Tue, 08/11/2015 - 16:58
नवीन
अभ्यास वाढवा...
आजचा सुविचारः
अल्पज्ञानाच्या स्वयंकेद्रित मधुकोषात फक्त सडक्या विचारांची पैदास होते.
श
श्रीगुरुजी
Wed, 08/12/2015 - 10:01
नवीन
>>> अल्पज्ञानाच्या स्वयंकेद्रित मधुकोषात फक्त सडक्या विचारांची पैदास होते.
+१
तुमचा स्वानुभावाधारीत सुविचार पटला.
स
संदीप डांगे
Wed, 08/12/2015 - 17:08
नवीन
थांबूया का?
धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो.
या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा.
धन्यवाद!
श
श्रीगुरुजी
Wed, 08/12/2015 - 19:06
नवीन
>>> थांबूया का?
धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो.
मला पहिलाच प्रतिसाद देण्याआधी हा विधीनिषेध पाळण्याचं सुचलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती.
>>> या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा.
न मागता दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद!
स
संदीप डांगे
Wed, 08/12/2015 - 19:29
नवीन
आज तुमच्यावर ही वेळ आली नसती.
कसली वेळ आलीये माझ्यावर...?
ड
डायवर
Tue, 08/11/2015 - 18:02
नवीन
माझ्या अल्पमतीनुसार पोलीसांना कोणत्याही ठिकाणी धाड घालण्याआधी सर्च वॉरंट मिळवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ असा कि जर पोलिसांनी वॉरंट शिवाय एखाद्याच्या घरात प्रवेश केला तर त्यांच्यावर अनधिकृत पणे प्रवेश केल्याची केस तसेच दरम्यान त्यांनी काही वस्तू तपासा साठी नेल्या तरी दरोड्याचे कलम लावता येवू शकते म्हणून खासगी मालमत्तेवर धाड टाकण्या आधी पोलिस वॉरंट घेवून जातात.
मात्र हेच पोलिस रस्त्यावर हमखास खासगी वाहने अडवून चेकिंग करतात, प्रसंगी खासगी असणारे सामान जप्त करून कधी कधी अटक देखील करतात. जर खासगी स्थावर मालमत्तेत धाड टाकताना वॉरंट लागतो तर एखाद्याचे खासगी वाहन हे देखील एक खासगी मालमत्ताच असते. मग अशा वाहनाच्या चेकिंग साठी व काही संशयास्पद असल्यास जप्ती व संबधित व्यक्तीच्या अटकेसाठी वॉरंट का लागत नसावा? केवळ एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारत आहे, जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
द
दा विन्ची
गुरुवार, 08/13/2015 - 20:30
नवीन
माझ्या चेपू अकौंट वरून काही अश्लील पोस्ट्स आणि video आपोआप शेअर होत आहेत. चेपू वर बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्याने मला हा प्रॉब्लेम तातडीने संपवायचा आहे. हे अकौंट तात्पुर्ते बंद करावे का व ते तसे करता येते का ?
श
श्रीगुरुजी
Fri, 08/14/2015 - 09:56
नवीन
(१) सर्वात प्रथम आंतरजालाशी जोडणी न करता तुमच्या संगणकावर विषाणूविरोधी कार्यक्रम तातडीने चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि एखादा विषाणू/ट्रोजन लपलेला असल्यास तो तातडीने नष्ट करून टाका. तो नष्ट केल्यावर पुन्हा एकदा विषाणूविरोधी कार्यक्रम चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि आता कोणतेही विषाणू/ट्रोजन इ. लपलेले नाहीत याची खात्री करून घ्या.
(२) त्यानंतर चेपु खात्याचा कळीचा शब्द ताबडतोब बदला. सुरवातीच्या काळात थोड्या थोड्या वेळाने कळीचा शब्द बदलत रहा.
(३) चेपु प्रशासकांना आपल्या समस्येबद्दल कळवून त्यांचा सल्ला मागा.
(४) संगणकाला जोडण्याआधी पेन ड्राईव्ह, सीडी इ. ची विषाणूसाठी तपासणी करून मगच वापरा.
(५) आंतरजाल जोडणी बंद करताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोग्रॅममधून (ईमेल खाती, चेपु, ट्विटर इ.) लॉगआऊट व्हा. कधीही "रिमेम्बर पासवर्ड" हा पर्याय वापरू नका. कुकीज अलाऊ करू नका. संगणकावर साठलेल्या टेम्पररी फाईल्स नियमितपणे डीलीट करा. भ्रमणध्वनीद्वारे वरील प्रोग्रॅम वापरत असाल तरीसुद्धा हीच खबरदारी घ्या.
(६) जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या आयडीच्या माध्यमातून व्हिडिओ, अश्लील पोस्ट्स इ. शेअर होत असतील, तर तात्पुरते त्या आयडीला ब्लॉक करा.
द
दा विन्ची
Fri, 08/14/2015 - 19:03
नवीन
श्रीगुरुजी
धन्यवाद . हे करून पाहीन.
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 08/13/2015 - 21:16
नवीन
मोबाईल बद्दल प्रश्न आहे. कुठे नक्की विचारावं ते कळेना म्हणुन इथे
जुलै मध्ये नवर्याने US मध्ये Amazon वरुन Lenovo K3 Note मागवला. आता सध्या मी तो वापरतेय. त्याला कधी काही त्रास झाला नाही. मला मात्र खालील प्रॉब्लेम्स येत आहेत.
१. बारिक सारिक गोष्टी चीनी भाषेत आहेत. कुणाचाही नंबर डायल केला की सिटीचे नाव चायनीज मध्ये. कॉन्टेक्ट्स मध्ये यल्लो पेजेसचा टॅब चायनीज. काही अॅप्सची नावं (क्लिन मास्टर) चायनीज. डीफॉल्ट भाषा इंग्लिश आहे तरीही.
२. ह्या नंतर त्रास सुरु झाला ते अॅटोमॅटिक अॅप्स डाऊनलोड होण्याचा त्रास. कुठलेही चित्र विचित्र चायनीज अॅप्स (त्यात अश्लील अॅप्सही येतात मध्येच) आपोआप येतात. मी ते कितीही वेळा उडवले तरी परत हजर. रोज नव नवे अॅप्स येतात. कधी इंग्लिशही असतात.
३. क्रोम उघडलं की आपोआप एकामागे एक ३-४ साईट्स ओपन होतात. गुगल प्ले स्टॉअरची साईट ओपन होऊन अॅप्स दिसतात.
४. चेपु ओपन केलं की खाली चायनीज अॅड्स येत आहेत.
५. मोबाईलमध्ये जो इन्स्टॉल्ड अॅण्टीव्हायरस आहे तो म्हणतो की कंपनीने आधीच डालो करुन दिलेले थीम सेंट्र्स, ट्विटर हे मालवेअर आहेत. आम्ही उडवु शकत नाही. काही तरी "रुट" करण्या विषयी येतं.
नेट्वर शोध घेतला तर अनेकांना हा त्रास आहे आणि तो मोबाईल "रुट" करुन काही प्रमाणात दुर झालाय.
एक अॅप आहे लिनोव्होचं, त्यात मोबाईल डायग्नोस्टीक होते. त्यात मोबाईल रुटेड - येस असं दिसतं.
मला ह्या मोबाईलवर अजिबात खात्री नाही. माझा डेटा सेफ आहे असं वाटत नाही.
काय करावे?
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/13/2015 - 21:32
नवीन
तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी... - कदाचित या धाग्यावर या समस्येबाबत चर्चा झाली असू शकते. पण ५०० हून अधिक प्रतिसाद असल्याने खात्रीशीरपणे सांगता येत नाही.
क
काळा पहाड
Sat, 08/15/2015 - 16:45
नवीन
मोबाईल रूट करणं म्हणजे मोबाईल ची जी ऑपरेटींग सिस्टीम असते उदाहरणार्थ अॅन्ड्रॉईड (जे बहुधा लिनक्स ऑपरेटींग सिस्टीमचं एक रूप आहे त्याला) ताब्यात घेणं. साधारणपणे हा प्रकार ऑपरेटींग सिस्टीम चे डेव्हलपर्स वापरतात. पण जर रूट केलं तर तुम्ही तुमच्या अॅन्टीव्हायरस ला या कंपनीच्या अॅप्स ना उडवायसाठी वापरू शकता. एक धोका यात असतो की रूट करताना काही प्रॉब्लेम झाला तर तुमचा मोबाईल वीट (ब्रीक) होवू शकतो. म्हणजे पूर्णपणे बाद होवू शकतो. मोबाईल फार महाग नसेल तर करून पहायला हरकत नाही. मी माझा जुना मोबाईल रूट केला होता आणि त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. रूट करण्यासाठी सॉफ्टवेअर्स मिळतात. बाकी तुम्ही जे सांगताय त्यानुसार तुमचा डेटा अजिबात सेफ नाही याबद्दल खात्री बाळगा. नेट बँकींग चे व्यवहार मोबाईल वरून करू नका.
ही लिंक पहा: http://www.wondershare.com/mobile-phone/android-root-tool.html
श
श्रीरंग_जोशी
Fri, 08/14/2015 - 18:10
नवीन
'झारीतले शुक्राचार्य' हे पाताळयंत्री माणसांसाठी वापरलं जाणारं विशेषण आहे.
यातले शुक्राचार्य म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य असावेत. पण झारी म्हणजे काय? लहानपणी मी तळणाचा झारा जो असतो तो जर लहान आकाराचा असेल तर त्यास झारी म्हणत असावेत असा समज करून घ्यायचो ;-) .
स
संदीप डांगे
Fri, 08/14/2015 - 18:42
नवीन
झारीतले शुक्राचार्य हे पुराणातल्या एका कथेवरून रुळलेले आहे. हे पाताळयंत्री माणसांसाठी नसून विनाकारण अडवणूक करणार्या माणसासाठी वापरलं जातं.
बहुतेक बळीराजा का कोण देवांना काहीतरी दान करण्याचा संकल्प सोडतो तेव्हा पाणी हातावर सोडतांना कमंडलू हातात घेतो तेव्हा जिथून पाणी पडतं त्या हत्तीच्या सोंडेसारख्या भागाला झारी म्हणतात तिथे हे दान घडू नये म्हणून शुक्राचार्य छोटे रुप घेऊन पाणी अडवण्यासाठी बसतात. नंतर कोणी ऋषी त्यात दर्भ का कायतरी घालून अडथळा काढतो आणि दान संपन्न होते.

श
श्रीरंग_जोशी
Fri, 08/14/2015 - 18:50
नवीन
या सचित्र प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
स्व. गोपिनाथ मुंडे स्वपक्षीय विरोधकांच्या बाबतीत असा उल्लेख करत असल्याने मला वाटायचे की त्यांना अशा लोकांचा पाताळयंत्रीपणा दाखवून देण्याचा उद्देश असावा.
बाकी जय हनुमान या मालिकेतलं दैत्यगुरु शुक्राचार्य माझं आवडतं पात्र होतं :-) .
प
प्यारे१
Mon, 08/24/2015 - 00:07
नवीन
बलि राजाने वामनाच्या तीन पावलं जमिन दान देण्याच्या विनंतीला होकार देऊन दानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हातात कमंडलू घेऊन हातावर पाणी सोडण्यासाठी सुरुवात केली तेव्हा बलिचे गुरु (राक्षसांचे/असुरांचे) गुरु शुक्राचार्य यांनी वामनाचा डाव ओळखला आणि सूक्षम् रुप धारण करून झारीमध्ये आत गेले. बाकी डांगे साहेब म्हणाले तसं. दर्भाची काडी कमंडलू मध्ये वामनानं घातल्यावर शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली आणि डोळा फुटला. त्यांना एकाक्ष असंही म्हणलं जाऊ लागलं.
स
संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 07:20
नवीन
अगदी हेच. धन्यवाद!
मला बळीराजा कन्फर्म नव्हतं, वामनाची तीन पावलांची गोष्ट आणि शुक्राचार्य हे कनेक्शन आठवत नव्हते.
स
संदीप डांगे
Sun, 08/16/2015 - 18:58
नवीन
आज दोन इन्डोअर पाम ची झाडे घेतलीत. त्यांची निगा कशी राखावी व दुसर्या भांड्यात बदली करतांना काय काळजी घ्यावी हे दोन प्रश्न आहेत. कुणाला याविषयी माहीती असेल तर कृपया द्यावी ही विनंती.

ब
बहुगुणी
Sun, 08/23/2015 - 22:38
नवीन
दुवे:
एक
दोन
साधारण सारखीच माहिती आहे. काही काळापूर्वी घरात पाम्स आणून लावायची इच्छा होती, तेंव्हा माहितीची शोधाशोध केली होती, पण ती इच्छा प्रत्यक्षात आणली नाही त्यामुळे आधिक फर्स्ट-हँड माहिती नाही.
हौसेपलिकडे जाऊन आणखी पैसे खर्च करायची इच्छा असल्यास हे पुस्तक उपलब्ध आहे.
स
संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 07:26
नवीन
बहुगुणीजी,
दुव्यांबद्दल धन्यवाद! सुरेख माहिती आहे. जमलं तर पुस्तक घेइन.
म
मारवा
Sun, 08/23/2015 - 16:29
नवीन
हेवीवेट ट्रेनींग ला सपोर्ट करेल असा प्रथिनांची पुर्तता करु शकेल असा प्रोटीन पावडर चा ऑथेन्टीक ब्रॅन्ड कुठला आहे ?
तुम्ही वापरुन बघितलेला आहे का ? खास करुन दिल्ली गाझियाबाद मध्ये आकर्षक डब्यात रीपॅक होणारा इम्पॉर्टेड नको भारतीय उत्पादक बनवत असलेला असेल तर प्राधान्य आणि व्हे प्रोटीन चा च हवा कृपया सुचवा. हेल्थ कार्ट बघुन झालेल आहे.
फार्मास्युटीकल्स कंपनीज ग्लॅक्सो सिप्ला वगैरे व्हे प्रोटीन पावडर बनवत नाही का ?
भ
भुमन्यु
Mon, 08/24/2015 - 08:24
नवीन
सप्लीमेंट्सचा मी समर्थक नाही. काही विशेष कारण असे नाही परंतु, जीम ट्रेनर आणि तिथे बसलेल्या त्या डाएटीशियन्स यांच्यावर आजिबात विश्वास नाही. तस्मात, एखाद्या चांगल्या डाएटीशियन (जीम मध्ये न बसणारी) कडुन सल्ला घेऊनच सुरुवात करा. काही प्रश्नांची उत्तरे:
"व्हे प्रोटीन चा च हवा?"
व्हे प्रोटीन मध्ये कर्बोदकांचे प्रमाण अगदी नगण्य असते. (कर्बोदकांमुळे वजन वाढते).
ब्रांडः
ऑप्टीमम न्युट्रिशन हा बराच नावाजलेला ब्रांड आहे.
फार्मास्युटीकल्स कंपनीज:
अॅबॉट न्युट्रिशन बहुदा देत असावेत. (वडीलांना बायपास नंतर अॅबॉट न्युट्रिशनच्या प्रोटीन सप्लीमेंट्स दिल्या होत्या.)
धन्यवाद
भुमन्यु
म
मारवा
Mon, 08/24/2015 - 10:38
नवीन
जीम मध्ये बसणारे जनरली व्यावसायिक हेतुने प्रेरीत चुकीचा सल्ला देतात. म्हणुनच इथे विचारणा केली. सॉय प्रोटीन मध्ये एस्ट्रोजेन या स्त्री हार्मोन्स चे प्रमाण असते. पुरुषांनी त्याचे सेवन केल्याने प्रॉब्लेम होतो व्हे मध्ये तसे नसल्याने व दुसर व्हे अॅबजॉर्ब व्हायला सुलभ आहे म्हणून. काय गंमत माझ्या एका नातेवाइकांना पण डॉक्टरने ऑपरेशन नंतर एक बँड दिला होता त्याचे नाव व्हिवा ब्लुम २५०० रु. अर्धा किलो किंमत होती. मात्र आश्चर्य म्हणजे फुड अँड ड्रग ला आम्ही बांधील नाही असे चक्क लिहुन हात वर केलेले होते. सर्वच प्रोटीन पावडर जनरली बहुधा शेड्युल्ड ड्रग मध्ये येत नसल्याने असे करत असावीत. त्यामुळे फॉर्मास्युटीकल वेलनोन ब्रँड त्यातला त्यात बरा या साठी तसा ब्रॅन्ड शोधतोय
अॅबॉट चा तपास करतो.
माहीतीसाठी धन्यवाद
भ
भुमन्यु
Tue, 08/25/2015 - 08:14
नवीन
अॅबॉट व्हे प्रोटीन
त
तुडतुडी
Mon, 08/24/2015 - 14:09
नवीन
दर्गा फक्त सुफी संतांचाच असतो का ? इस्लाम मधील इतर पंथातल्या संतांच्या समाधीला काय म्हणतात ?
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »