Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखनवैमूढ्य

ब — बॅटमॅन, Fri, 06/19/2015 - 13:30
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

प्रतिक्रिया द्या
8108 वाचन

💬 प्रतिसाद (54)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/20/2015 - 09:36 नवीन
गाड्या बरोबर नळ्याची यात्रा (मस्तानीच्या प्रतिक्षेतला) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 06/20/2015 - 14:58 नवीन
येताना स्वत:चं ओळखपत्र आणि मस्तानी घेऊन यावी. ;) सीरियसली, बघू कसं जमतं ते. पुण्यात थांबलोय अजून 10 12 दिवस तरी नक्की आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कवितानागेश Sat, 06/20/2015 - 16:24 नवीन
मस्तच लिहिलय.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Sat, 06/20/2015 - 18:45 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा