Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबासाहेब पुरंदरे,महाराष्ट्रभुषण आणि वाद!!

ग
ग्रेटथिंकर
Wed, 06/24/2015 - 10:15
🗣 148 प्रतिसाद
सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत 1.हा आक्षेप योग्य आहे का ? 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?

प्रतिक्रिया द्या
41427 वाचन

💬 प्रतिसाद (148)
म
मृत्युन्जय Mon, 06/29/2015 - 15:43 नवीन
विमानातुन न जाणार्‍या प्रत्येक माणसाचा खून होतो काय? आणी तो ब्राह्मण करतात काय? हेच कर लॉजिक असेल तर मग ठिकाय बी ग्रेड ची अक्कल याहुन जास्त चालेल असे वाटतही नाही म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
उ
उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 16:18 नवीन
विमानातुन न जाणार्‍या प्रत्येक माणसाचा खून होतो काय? आणी तो ब्राह्मण करतात काय?
ब्राम्हणांना सगळे कामधंदे सोडून लोकाचे खुन करत बसावे लागतील कि मग ! कैच्याकै लॉजीक ! लोल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
D
dadadarekar Mon, 06/29/2015 - 17:04 नवीन
बिचार्‍या शिवाजी महाराजांना ते विमान मिळालं असतं तर वायुदलाची स्थापना करण्याचं श्रेयही शिवाजी महाराजाना मिळालं असतं. तुकारामाना इतकी समज नक्कीच होती. त्यामुळे त्याना मिळालेलं विमान त्यानी महाराजा ना दिलं असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 16:30 नवीन
आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 16:42 नवीन
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम मोडला कि त्यांचा आयडी उडाला ? (फक्त उत्सुकता आहे म्हणून विचारलं , काळजी नसावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 16:53 नवीन
उगा काहितरीच समजा पाकिस्तानि क्रिकेट टिम मध्ये ११ च्या ११ खेळाडुंच्या जागि एकटा इझंमाम खेळ्तोय, फलंदाजि, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजि सुद्धा तोच कर्तोय बघणार्याला कसे वाटेल.. धागा सुद्धा हाच काढणार आणि आपल्या अनेक आयड्या वापरुन प्रतिसाद देताना उच्छाद सुद्धा हाच मांड्णार्..चला तुम्हि म्हणाल हा काहि गुन्हा नाहि. पण सदैव एकांगि लेखन, एकाच समाजाला टार्गेट करणे म्ह्णुन कदाचित त्यांचा मि.ईंडिया झाला असेल. पण ते दादा बनुन पुन्हा फुलथ्रोट्ल मध्ये आलेयत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 16:58 नवीन
मग ठिकाय ! आयडी उडन्याच्या यादीत आमचा नंबर यायची शक्यताच नाही मग.(चेक करायचे होते हो , चुकून एखादा नियम तर नाही ना मोडत ) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मृत्युन्जय Tue, 06/30/2015 - 08:09 नवीन
ग्रेट थुंकर आहेत इथेच. फक्त त्यांनी जुने शरीर त्यागुन नविन शरीर धारण केलेले आहे. रावणाची कशी १० तोंडे होती तशी यांची अगणित तोंडे आहेत. आपण असे समजुयात की ते आधुनिक रावणच नाहित तर ते आधुनिक काळातले सहस्त्रकवच आहेत, नर नारायाणांना त्यांचे ९९९ अवतार खर्ची घालायला लागतील तेव्हा एका सहस्त्रकवचाचे निवारण होइल. इतकी साधी गोष्ट नाही ती १०००*१००० वर्षांची तपस्या असेल तर जमेल ग्रेट्थुंकरांना घालवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 16:38 नवीन
मुवि ग्रेट-थिंकर ह्यांनि पुन्हा नविन अवतार घेतलाय.. सध्या ते दादा बनुन फुल्ल थ्रोट्ल मध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 16:51 नवीन
आयला, हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार. मज्जाय बुवा ह्या अवतारी लोकांची. म्हणजे इतका काँन्फिडन्स की, एक अवतार समाप्त होण्यापुर्वीच, दुसरा अवतार घेवून ठेवतात.इतका काँन्फिडन्स तर विष्णू कडे पण न्हवता. अगदी त्या टॉम रीडल सारखे.म्हणजे लॉर्ड वॉल्डेमार्ट होण्यापुर्वीच, कुठे पुस्तकातच दड तर कुठे अंगठीतच लप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
इ
इरसाल Tue, 06/30/2015 - 08:19 नवीन
दादादरेकर म्हणजे हितेस-काउ-जामोप्या ते ग्रेथि वेगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
व
विनोद१८ Tue, 06/30/2015 - 08:33 नवीन
(नाना नेफळाप्रेमी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 16:54 नवीन
"हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार" हा मास्टर स्ट्रोक होता :)
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 17:45 नवीन
"दादाचा नाद करायचा न्हाय" "याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे." दोन वेगळ्या आयडि ने सेम धमकि !!!! मध्यंतरि सिरिया विजिट झालेलि दिसतेय.. एकदम फिदायीन झालायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
फ
फुलथ्रॉटल जिनियस Mon, 06/29/2015 - 17:23 नवीन
मी इथे तार्कीक युक्तीवाद करु शकतो, पण मग त्यात जाती येतील ,शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल! चार घटका गंमत करायला जे लोक मिपावर येतात त्यांच्यासाठी हा एक ताप असतो, उगाच दुसर्याच्या आनंदात आपण का विरजण घालायचे ???म्हणुन गप्प बसतो. याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे. सध्या मिपावर आयडी उडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 06/29/2015 - 17:38 नवीन
समंचे अभिनन्दन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ट
टवाळ कार्टा Mon, 06/29/2015 - 17:42 नवीन
घंटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Mon, 06/29/2015 - 18:01 नवीन
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:09 नवीन
उलट आहे.... त्यांनी "घंटा" हा अतिशय चपखल शब्द वापरला आहे.... १ घंटा = १च्या पुढे १०० शून्य..... जसे १० = दस्म १००= शतम ... ... ... ... त्याच्यामुळे ज्याला अवतारकार्य समजले त्याला घंटा मिळते, असे वाटते. पहा ना, मंदिरात पण घंटा असतेच की.कारण प्रत्येक देवाला त्याचे अवतार-कार्य समजत असते. तर्क चुकीचा असला तर दुरुस्त करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा Mon, 06/29/2015 - 18:24 नवीन
मला अहो वगैरे नक्को हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 18:10 नवीन
सहमत टका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 06/29/2015 - 18:25 नवीन
तुलाच समज्ला माझा प्रतिसाद कम टोमणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Tue, 06/30/2015 - 08:12 नवीन
हाताला हात लावून मम.. नेमस्त भीडस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 06/29/2015 - 17:41 नवीन
थोडक्यात मिळालेले आयडी संपत आलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 17:54 नवीन
वाद वाढेल!" होवू द्या हो वाद-विवाद, पण "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" हे वाचायला नक्की आवडेल. "त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे." आयला, "अवतारकार्य"...... तुमचे नक्की कुठले अवतारकार्य आहे? हे नक्की सांगा.फार कमी लोकांना जीवनाचे ध्येय समजते आणि अवतारकार्य समजणारे फारच विरळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:12 नवीन
मग परत-परत कशाला आय.डी. बनवायचा? ते जावू दे, पण तुमचे नक्की अवतार-कार्य तरी कुठले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/29/2015 - 18:49 नवीन
ऑं!!!!! अच्चं आये का? अलेले...घाबाल्लो बल्का फुलकॉटर जिन्यस सायेब!! नै नक्की संयम सोडणार मंजे काय कलनाल मने तुमी? डुआय्डी वापलुन कंपुबाजी कल्नाल का? ए गालवांनो...घाब्ला बल्का सग्ल्यांनी. नैतल ह्यांना वैत वातेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 17:41 नवीन
अहो तुमच वय (मिपावर) किति तुम्हि बोल्ताय किति.. ठँकु बर का आम्चि अशीच करमणुक करत रहा..
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 17:51 नवीन
"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल!" अहो दत्तु सगळे लोक तुमच्यासारखे नाहि आहेत हो मिपावर, इथे सुशिक्षित आणि सुसंस्कारी लोक आहेत तर वैचारिक मतभेद असणारच पण त्या मतभेदांमध्ये जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 17:56 नवीन
येस्स..... यही है मिपा. "मिपावर जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिये." म्हणूनच तर "मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
शब्दबम्बाळ Mon, 06/29/2015 - 18:30 नवीन
दुर्दैवाने हल्लीच्या काही चर्चा वगैरे पाहून माझी हि भाबडी समजूत मोडीत निघत आली आहे. भलेही ते तसले प्रतिसाद काही ठराविक आयडीसाठी असतात. पण दुसर्याच्या श्रद्धास्थानांना डिवचणाऱ्या, पातळी सोडून टीका करणाऱ्या "काही" आयडी वर कारवाही झालेली दिसत नाही. लावायचाच आहे तर सर्वाना समान न्याय लावला पाहिजे. असो, पण शेवटी एकट्या व्यक्तीच्या वाटण्याने काही फरक पडणार नाहीये…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 18:07 नवीन
या अवतारी लोकांना विणंती आहे- यांनी जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी. नाहीतर तुमचे इथे कोणीच ऐकून घेणार नाही, बसा मग ब्रिगेडी मांदियाळीत निरर्थक अत्मरंजन करत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:16 नवीन
"जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी." आम्हाला कुठलेही पुरावे चालतील.आधी पुरावे तर येवू द्या. बादवे, तुला तुझे अवतार-कार्य समजले का? का अजून तू गोथम शहरांत अडकून बसला आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 18:20 नवीन
मुवि मला मिपाचि ओळ्ख होउन सुद्धा आता ३ वर्षे झालेयत. त्यापुर्वि मला फक्त मनोगत हे एकच मराठि संस्थळ माहित होत, तिथे मि इनमिन ६ महिने हि सदस्य नसेन मिपाचि ओळख झालि आणि आता ह्याच व्यसनच लागलय. मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल. इथे चर्चा सुद्धा फार खुल्या मनाने घडतात, फार कमि वेळा सदस्याच्या प्रतिक्रिया उडवल्या जातात :) आगळिक कधि कधि आमच्याकडुन सुद्धा होते पण त्याला पर्याय नसतो ह्या उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत. आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अ‍ॅप्रिसिएशन सुद्धा करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:25 नवीन
आमची थोडी पुढची पायरी आहे. मिपा ही माझ्या बायकोची सवत आहे. सुदैवाने ही सवत तिची लाडकी असल्याने, गृहकलह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
प
प्रभाकर पेठकर Tue, 06/30/2015 - 06:41 नवीन
>>>>मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल. स्वातंत्र्याबरोबर, जबाबदारीची जाणीव असेल तर स्वातंत्र्य हा मिपाचा सुवर्णकळस ठरावा. पण दुर्दैवाने तसे दिसत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करून 'स्वैराचार' फोफावण्याकडेच वारे वाहताना दिसतात. >>>> उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत. कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही. उच्छाद मांडणार्‍या सदस्यांची इच्छाच तशी असते की कोणीतरी त्यांच्या पातळीवर उतरून सवाल जवाब करावेत आणि आग भडकत ठेवावी. त्यांच्या इच्छेला आपण बळी का पडावे? दुर्लक्ष करणे हेच उत्तम. जेव्हढा वाद कमी होईल तेव्हढा, अशा सदस्यांच्या 'उच्छाद मांडण्याच्या, उद्देशाचा पराभव होईल. >>>>आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अ‍ॅप्रिसिएशन सुद्धा करतो. ह्यालाच निकोप चर्चा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
शब्दबम्बाळ Tue, 06/30/2015 - 07:51 नवीन
भलत्याच उच्च अपेक्षा आहेत राव तुमच्या! इथे असल्या चर्चांमध्ये माझा कंपू कसा मोठ्ठा, मी दुसर्याला कसे तुच्छ लेखले, कमीत कमी शब्दात कसा अपमान केला या गोष्टींची जणू स्पर्धा असते! "कुठला आयडी कोणाचा" हा आवडता खेळ झाला आहे! या गोष्टीची आवश्यकता काय आहे ते खेळणार्यांनाच ठाऊक! दुसर्यांची पातळी काढणाऱ्या लोकांनी प्रथम किमान स्वतःची (वैचारिक) पातळी तरी ठरवावी. बाकी तुम्ही म्हणता तसे होण्यासाठी माझ्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 18:29 नवीन
खरच ह्यावेळेस फिदायिन झालाय... ह्यानंतर आपला पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
य
यसवायजी Mon, 06/29/2015 - 18:33 नवीन
जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही यासाठी संमंत आरक्षण मिळालेच पाहिजे. -कावा गृप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
न
नाखु Tue, 06/30/2015 - 08:14 नवीन
आमच्या साठी फाईजेत म्हंजे फाहिज्य्त. "बार"कावा गृप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कपिलमुनी Tue, 06/30/2015 - 09:44 नवीन
गृप मध्येच बार असल्याने जॉइन करण्यात आला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:34 नवीन
कट्टर उजव्या विचारसरणीला आणि त्यांच्या प्रचारकी कुचाळक्यांना विरोध करणे हे माझे अवतारकार्य आहे. =====> ही कट्टर उजवी विचारसरणी कोणती? मग डावी कोणती? हे उजवे-डावे कोण ठरवते? असा काही लिखित नियम आहे का? असल्यास दुवा दिलात तर उत्तम. आता उजवे-डावे समजले की मग, प्रचारकी कुचाकळ्यांकडे वळू या. परंतु मिपाचे संपादक मंडळच उजव्याविचारसरणीकडे झुकताना दिसत असल्याने अवतारकार्य तडीस जाण्याची शक्यता कमी आहे, जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही तोपर्यंत मिपाचे हिंदुत्वकरण होत राहणार. ====> मिपाचे संपादक मंडळ अतिशय उदार आणि न्यायप्रिय आहेत.माझे पण २-३ लेख आणि बरेचसे प्रतिसाद उडाले तरी, माझे म्हणणे हेच राहील. आणि मिपाचे "हिंदुत्वकरण" म्हणजे नक्की काय? (आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
क
काळा पहाड Mon, 06/29/2015 - 18:43 नवीन
अवतारी बाबांना काळा पहाडचा प्रणाम. बाबा, तुम्ही संपादक मंडळात तुमच्या सारख्यांना पण आरक्षण द्यावं यासाठी उपोषण का सुरू करत नाही? माझं मत आहे की तुम्ही खालील सूचनाही कराव्यात. १/ मिसळपाव हे हिंदूंचं खाणं आहे. तुम्ही हे नाव निदान काही दिवस तरी कलेजाफ्राय असं ठेवण्याचा आग्रह करावा. २/ मिपाची थीम भगवी आहे. हे म्हणजे हिंदुत्व करणाचं ढळढळीत उदाहरण आहे. थोडे दिवस तरी थीम हिरवी किंवा निळी करायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ह
होबासराव Mon, 06/29/2015 - 18:27 नवीन
ईथले होणारे कट्टे :) आजपर्यंत तरि जमल नाहि कट्टेकरि व्हायला..लेकिन गम नहि कट्ट्याचा वृतांत वाचुन आणि फोटो बघुन फिल होत कि आपण तिथेच होतो.. आपण सगळे वेगवेगळ्या आणि कधि कधि विचित्र आयड्या नि एकमेकाला ओळखणारे पण कट्ट्याचे फोटो बघितला कि वाटत जिवलग मित्र कितितरि वर्षानि भेटतायत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 18:36 नवीन
बस्स इतकेच..... तुम्ही कुठल्या गावांत राहता ते सांगा, आपण तिथे कट्टा आयोजीत करू. (एक नंबरचा चकाट्या पिटू) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
उ
उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 19:12 नवीन
आम्हाला पण यायचं आहे कट्ट्याला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 07:53 नवीन
जुलै मध्ये, ठाण्याला एक कत्ता आहे. तारीक आणि ठिकाण आणि इतर गोष्टी नक्की झाल्या की, लगेच धागा काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
फ
फुलथ्रॉटल जिनियस Mon, 06/29/2015 - 18:38 नवीन
मला संपादक मंडळात घ्यावे!!! मी मिपाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेन व हे संकेतस्थळ अधिक लोकप्रिय बनवेण.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/29/2015 - 18:46 नवीन
अवतारी अवलिया बाबांना माझं अनुमोदन. थोड्याच दिवसात मिपाला सौदी, सिरीया, इराक, येमेन, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथले शांतताप्रेमी नागरिक भेट द्यायला गर्दी करतील आणि त्यातून मिपाचा रेव्हेन्यू पण वाढेल. संपादक मंडळानं विचार करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Mon, 06/29/2015 - 19:33 नवीन
+१ ग्रेटथिन्कर उपाख्य टोपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य माईसाहेब कुरसुंदीकर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य मंदार कुमठेकर उपाख्य फुलबॉटल जिनियस यांना संपादक मंडळात घ्यावे अशी माझी हक्काची मागणी आहे. पण यांना संपादक मंडळात घेतलं तर हे स्वतःचेच लेख/प्रतिक्रिया कसे डिलीट करणार आणि स्वतःच स्वतःचा आयडी कसा डिलीट करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा