महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासाची माहिती हवी
नेमेची येतो पावसाळा तसे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांच्या अॅडमीशनांचा हंगाम पालकांसाठी नम्रतेने रांगेत उभे टाकून कापले जाणारे खिश्यांचा अनुभव घेत मागे पडला आहे विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात (आणि क्लासांमध्ये) हजेरी लावू लागला आहे. तर या निमीत्ताने महाराष्ट्राच्या गौरवास्पद उच्च शैक्षणीक परंपरेचा आढावा मराठी विकिपीडियाच्या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था लेखासाठी घेतला जावा अशी इच्छा अस्मादीकास होऊन काही माहिती मिळवण्यासाठी सदर चर्चाधागा काढीला आहे.
आमचे माहिती हवी असलेले प्रश्न असे ?
१) पेशवाईपूर्व महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेचे स्वरूप कसे होते ?
२) पेशवाईकालीन महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेचे स्वरूप कसे होते ?
३) ब्रिटीशकालीन शिक्षणव्यवस्थेचे स्वरूप कसे होते ?
४) मध्य प्रांत, बेरार, उर्वरीत विदर्भ आणि निजामकालीन मराठवाडा येथील शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप कसे होते ?
५) संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले ?
६) दहावीनंतर पदवीपूर्व एकच वर्षाचा कालावधी हे स्वरूप महाराष्ट्रातील कोणकोणत्या विभागात आणि कोणत्या कालखंडात होते ते दहावी+२ असे केव्हा बदलले (अपुर्या माहितीवर प्रश्न विचारला आहे चु.भूदे.घे.)
६) महाराष्ट्रातील शिक्षणाच्या विनाअनुदानित खासगीकरणाची/व्यापारीकरणाची सुरवात नेमकी का, कुणाच्या नेतृत्वकाळात, केव्हा आणि कशी झाली ? त्यातील मुख्य टप्पे कोणते ?
७) महाराष्ट्राय शालेयशिक्षणात इंग्रजीचा वापराचा आलेख/प्रवास कसा कसा घडत गेला आहे ? मुख्य टप्पे आणि वैशिष्ट्ये कोणती ?
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा मागोवा घेणारे अन्य प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचे स्वागत असेल. कुठे संदर्भ उपलब्ध असल्यास आनंद वाटेल.
*सदर धागा मराठी विकिपीडियासाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त समजले जातील तसेच आवांतर चर्चा टाळण्यासाठी आभार
💬 प्रतिसाद