चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)
सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे). मालीकेत कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे. आचार्य चाणक्य मगध साम्राज्याचे पितामह आणि सशक्त मार्गदर्शक स्वरूपात दाखवले आहेत. सध्या पाटलीपुत्र (पाटना) नगरीत अशोकाचे पिता बिंदुसार आणि राजघराण्यास कुमार अशोक एका मोठ्या कटकारस्थानातून वाचवतो आणि ते कटकारस्थान उघडकीस येण्याचे प्रसंग सध्या दाखवले जात आहेत. एकुण प्रसंगाचे सादरीकरण रोचक आहे. सम्राट बिंदुसारची त्याची पत्नी धर्मा आणि कुमार अशोक यांच्या पासून ताटातूट झालेली होती पण राजघराण्यातील कट कारस्थानांमुळे आचार्य चाणक्यांनी सम्राट बिंदुसारना कुमार अशोक त्यांचा मुलगा आहे हे अद्याप (हे लिही पर्यंत) सांगीतलेले नाही आणि राणी धर्मा बाकी राजघराण्यास न सांगता दासीरुपात पण सम्राट बिंदुसारला न दिसता वावरते आहे अशी काहीशी (मालीकेतील) कथा आहे.
कुणा एका मराठी दिग्दर्शकाच वाक्य आहे व्हीलनला जेवढे जास्त व्हीलन केले दाखवले तेवढे हिरो अधिक हिरो वाटतो. तर या मालीकेत बाहेरचे दोन तीन (मांडलीक) राजे व्हीलनच्या स्वरूपात दाखवले आहेत. बिंदुसारची सावत्र आई हेलना ग्रीक राजा सेल्यूकल निकेटरची मुलगी आहे जीने युद्धात वडीलांचा पराभव झाल्यामुळे चंद्रगुप्ताशी विवाह केला, वरून मगधवर प्रेम करणारी पण प्रत्यक्षात कटकारस्थानांनी मगध साम्राज्याचा नाश करून आपला पुत्र जस्टीनला सिंहासनावर बसवून राजमाता होण्याचे तिचे स्वप्न कुमार अशोक आणि आचार्य चाणक्य यांच्यामुळे धुळीस मिळते. बिंदुसारचा पहिला मुलगा सुशीम हा सुद्धा अहंकारी व्हिलन स्वरूपात कुमार अशोकवर उगाचच सतत खार खाऊन असतो आणि त्याच्या आईचे (बिंदुसारच्या महाराणीचे) स्वप्नही राजमाता व्हायचे आहे. सम्राट बिंदुसारची एकराणी शुभरसी चांगल्या स्वभावाची दाखवलेली आहे जीच्याकडे अशोकची आई दासी स्वरूपात लपून राहते आहे. सम्राट बिंदुसारची तीसरी राणी नूरसुद्धा तिच्या मुलाला सम्राट स्वरूपात पाहू इच्छिते. राणी नूरचे चरित्र मात्र ती पत्नी बिंदुसारची असली तरीही प्रत्यक्षात ती बिंदूसारचा मोठा भाऊ जस्टीनवर प्रेमही करते आणि नूरचा मुलगा खरेतर जस्टीन पासून झालेला असतो (इति कलर्स मालीका-लेखकाचे स्वांतत्र्य - बहुधा नकारात्मक गोष्टींच्या अनुभवातून अशोक दुख्खाचे कारण शोधत अशोक पुढे बौद्ध धर्म स्विकारणार आहे त्या दृष्टीने अशोकच्या जिवनातील वेगवेगळ्या प्रसंगांची रचना करण्याचा लेखकाचा प्रयत्न होता का कि केवळ धारावाहीकात मसाला भरणे हे मालिकेत पुढे काय होते यावरून कळेल)
बिंदुसार, त्याची ग्रीक वंशीय आई हेलेना, त्याचा सावत्र सासरा सेल्यूकस निकेटर, मुलगा सुशीम, आचार्य चाणक्याचा शिष्य राधागूप्त, अशोकची आई धर्मा हि नावे अशोकाच्या आईचे राजवाड्यापासून बराच काळ दूर असणे या आता पर्यंतच्या सम्राट अशोकाच्या बाबतीत माहित आहे असे समजल्या जाणार्या गोष्टी मालीकेत जशाच्या तशा आहेत पण बाकीचे दाखवलेले प्रसंग अत्यंत काल्पनीक आणि लेखकाने लेखनाचे प्रचंड स्वातंत्र्य घेतले आहे. योगा योगाने मालिकेच्या लेखकाचेही नाव अशोक बनकर आहे पण ते बहुधा योगा योगा योगानेच. इंग्रजी विकिपीडियावरील माहितीनुसार अशोक बनकरांचे पालनपोषण मॅटर्नल अँग्लोइंडीयन बाजूने झाले आहे. आणि ते इंग्रजी भाषिक लेखक म्हणूनही परिचीत आहेत तेव्हा त्यांची ही मालीका इंग्रजीत अनुवादीत होऊन बाकी जगभर प्रसिद्धी मिळवू शकली तर नवल असणार नाही.
कलर्स आणि अशोक बनकर टिमने मिळून मालिकेत दर्शवलेला इतिहास हा नव्याने लिहीलेला आहे. तो बराचसा पॉलीटीकली करेक्ट लिहिण्याचा प्रयास त्यांचा यशस्वी होताना दिसतो. तो काळाच्या ओघात मिथॉलॉजी म्हणून नजीकच्या भविष्यात जनमान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
खर्या व्यक्ती नामांच्या जवळ जाऊन सुद्धा बहुतांश काल्पनीक आहेत. नकारात्मक प्रसंग इतपत चातुर्याने रंगवले आहेत की सहसा लेखकाच्या स्वातंत्र्यावर सर्वसामान्य जनतेतून फारसे आक्षेप येणार नाहीत उलट लोकप्रीयताच लाभण्याची शक्यता अधीक आहे. या कलर्स मालिकेत मालिका प्रसंग काल्पनीक आहेत हे कुठे सांगीतले जात नाहीत. धागालेख चर्चेसाठी माझा मुद्दा लेखक आणि दिग्दर्शकांनी काल्पनीक प्रसंग रंगवण्याच्या स्वातंत्र्यावर नाही. पण कोणत्यातरी एका स्टेजला हे सर्व काल्पनीक प्रसंग आहेत हे लेखक आणि दिग्दर्शकांनी सांगावयास हवेत असे तुम्हाला वाटते का? या मालिकेतील मुख्य पात्रे सकारात्मक भूमीकेतच नव्हे अत्यंत आदर्श रंगवली आहेत की त्यांच्या लोकप्रीयतेत भरच पडेल.
लेखकाने कल्पनेतून रंगवलेल्या मिथॉलॉजीचा समाजावर ती मिथॉलॉजी खरीच आहे समजून किती प्रभाव पडावा ? बाकीही या मालिके संदर्भाने चर्चा करण्यास हरकत नाही जसे की या मालिकेत दाखवलेल्या पात्रांबाबत आणि प्रसंगांबाबत तुम्हाला काय वाटते. सम्राट अशोकाचा ज्ञात प्रमाण अथवा आख्यायिकातील इतिहास आणि मालिकेतील इतिहास यांची तुलना इत्यादी.
अर्थात काथ्याकुट करताना व्यक्तीगत टिका टाळाव्यात मिपा संपादकीय धोरणांचे यथोचीत पालन करावे हि नम्र विनंती
आर्य चाणक्याचा मृत्यु अशोकाच्या जन्माआधीच झालेला होता. त्यामुळे पुढचे वाचण्यात काहीच स्वारस्य उरले नाही.याबद्दल अजुन माहिती मिळू शकेल का? कारण आंतरजालावर काही वेगळ्याच सनावळ्या उपलब्ध आहेत. विकीवर (जरी तिथली माहिती पुर्णपणे ऑथेंटीक नसली तरी) चाणक्याचा मृत्यु 275 BCE असे दाखवतेय, तर अशोकाच्या राज्याभिषेकाचा कालावधी 269 BCE असे दाखवतेय. जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.अलंकार फारच गोड दिसते बुआतुम्ही त्या 'राजाजीराज' नामक मांडलिकाच्या जो बिंदुसाराच्या हत्येच्या कटात सहभागी आहे कन्येबद्दल बोलताय का? तसे असेल तर तिचे नाव 'अलंकार' नाही 'अहंकारा' आहे :)नाही पाहिला अजून.पाहूही नकात. पाहण्यासारखं एक करीना सोडली तर इतर काहीही नाहीये त्यात. ;)जोधा अकबर मालिकेतील जोधा तर चक्क इंग्रजीत I love You बोलते. आणि अकबराला लिहलेल्या पत्रात चक्क तसे लिहते सुद्धाऐकावे ते नवलच !!!