Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?

स
संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 16:58
🗣 160 प्रतिसाद
मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे. दुवा १ दुवा २ दुवा ३ वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे. धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण... एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अ‍ॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा. त्याच अ‍ॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्‍या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली. नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय. कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का? (ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्‍हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )
वर्गीकरण
जीवनमान अनुभव
शिक्षण

प्रतिक्रिया द्या
42699 वाचन

💬 प्रतिसाद (160)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 07/14/2015 - 03:12 नवीन
ते डोळे बांधुन करायचं का डोळे उघडे ठेउन??? =)) (हघ्या. गंमतीमधे लिहिलय)-कॅजॅस्पॅ-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 08:10 नवीन
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ग
गवि Tue, 07/14/2015 - 09:15 नवीन
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...
असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे. सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल. या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल. ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतिश गावडे Tue, 07/14/2015 - 10:49 नवीन
अगदी नेमक्या शब्दांत लिहिलंय गविंनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 07/16/2015 - 18:15 नवीन
असले प्रतिसाद टंकायला काय लागते? तुम्ही फारच स्केप्टिक आहात बुवा. धागाकर्ते करणार आहेत ते "शास्त्रीय" विश्लेषण येऊ द्या जरा या एम्बीए चे. मग गवि अन त्यांचे तत्वनिष्ठ तर्क कसे तोंडावर आपटतात ते पहाच तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बबन ताम्बे Mon, 07/13/2015 - 16:29 नवीन
बाकी सर्वात टॉपच्या व्हीडीयोत तो चष्मेवाला तरुण मुलगा आणि मुलगी चांगले सुशिक्षीत दिसताहेत.एम. बी.ए. आहेत का काय माहीत नाही.पण आजकाल काही टुकार एम.बी.ए. कॉलेजांमधे लोकांना **त्या बनवायचेच शिक्षण देतात की काय? मागे मला एका चांगली नोकरी असलेल्या आणि इंजिनीअर असलेल्या मित्राने आग्रह करून करून एका पॉश ठिकाणी प्रेजेंटेशनला नेले. एक तरुण एम.बी.ए. एक्झीक्युटीव्ह आकडेवाडी मोडून बिझिनेस मॉडेल समजावत होता. तासभर त्याची बडबड चालू होती. दुसरे काही नाही, ते मल्टी चैन मार्केटींग स्कीम होती. पण ज्यांचे त्यात पैसे अडकले होते, ते उगाचाच त्याच्या हो ला हो आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते (माझ्यासारख्या ब-याच नवीन बक-यांना इम्प्रेस करण्यासाठी). मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे सरळ सरळ थोतांड दिसते आहे. लोकांना मामा बनवून पैसे कमवायचे धंदे. यात वाईट एव्ह्ढेच वाटते की लहान मुलांना यात सामील करून घेऊन त्यांना खोटे बोलायला, दाखवायला भाग पाडले जाते. वरील व्हीडिओत ती लहान मुलगी कार्ड ओळखण्यासाठी हाताला, डोक्याला कार्ड चोळतेय हे चक्क नाटक करतेय हे स्पष्ट दिसतेय.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 07/14/2015 - 03:13 नवीन
एक चांदणी जास्त पडलीये का हा कुठला नवा शब्द आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ज
जडभरत Tue, 07/14/2015 - 03:23 नवीन
खीः खीः खीः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बबन ताम्बे Tue, 07/14/2015 - 07:56 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
श
शैलेन्द्र Mon, 07/13/2015 - 16:39 नवीन
च्यामारी, धागा भारी न प्रतिसाद लै भारी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 07/13/2015 - 22:08 नवीन
आमाला 98 नंतर 99 येतं एवढं माहिती आहे. पुढं काय कल्पना नाय!
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Tue, 07/14/2015 - 00:02 नवीन
पुढं १००..!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ज
जडभरत Tue, 07/14/2015 - 03:02 नवीन
मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे
१०० पार! या धाग्याचा मात्र मिपावर धुमाकूळ चालू आहे.
  • Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न Tue, 07/14/2015 - 10:09 नवीन
पुणे तिथे काय उणे.... या धाग्याच्या निमित्ताने अजुन एक माहिती शेअर करु इच्छितो. परवा माझी पत्नी मुलीच्या शाळेत गेली होती. तिथे एक पालक म्हणाली की त्यांनी त्यांच्या मुलीला सुंदर हस्ताक्षराचा क्लास लावला आहे. तीन महिन्याचा कोर्स आणि फी ₹ १५ हजार फक्त !! ३ च महिन्यात ते वळणदार अक्षर आणि तेही वेगाने काढायला शिकवतात अशी माहिती त्यांनी दिली. खरतर एखाद्याचं अक्षर सुंदर आणि वळणदार असणे ही त्या व्यक्तीला मिळालेली नैसर्गिक देणगी असते असे मी मानतो. थोड्याफार सरवाने खराब अक्षर असणारे त्यात थोडी वरची पातळी गाठु शकतात. पण कोर्स वगैरे हे अती झालं. बर त्या बाईसुद्धा कोर्स सुरु केल्यापासुन आमच्या मुलीचं अक्षर सुधारायला लागलयं असा दावा करत होत्या. मला तर यामधे वरील काही सदस्यांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्केटींगच वाटतय.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 10:59 नवीन
मुळात डिजिटल जमान्यात सुंदर हस्ताक्षराची गरजच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
ज
जडभरत Tue, 07/14/2015 - 11:05 नवीन
अगदी बराब्बर बोलतात. बाकी आजकाल कोण कशाचं दुकान उघडून बसेल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या गुरुवार, 07/16/2015 - 12:19 नवीन
मला बरेचजण हस्ताक्षर सुधारण्याचे क्लास घे म्हणून गळ घालतायत पण निव्व्ळ याच कारणाने मी ते टाळतोय. वर सांगीतल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारणे खूप कठीण वाटतंय. सुलेखन वेगळे आणि हस्ताक्षर वेगळे. चांगल्या सुलेखनकाराचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही. ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते. कोणत्याही क्लास कींवा कोर्स केल्यामुळे ते सुधारलेले नसते. नववी दहावीतल्या मुलांना तर हस्ताक्षर सुधारणेच्या क्लासमधे अजीबात पाठवू नये. कारण हस्ताक्षर सुधारायच्या नादात ते सद्या असलेला वेग हरवून बसतील आणि दहावीच्या परीक्षेत भरपूर लीहावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/16/2015 - 21:05 नवीन
ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते
माझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 07/16/2015 - 18:17 नवीन
मी चांगलं अक्षर काढलं, तर हा बोगस डाक्टर हाये अशी शंका येती राव लोकास्नी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
न
नाव आडनाव Fri, 07/17/2015 - 06:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 18:07 नवीन
डॉक्टरांच्या संपाचे व्यंगचित्र आठवले. त्यांच्या हातांतील फलकांवर काय लिहिलेय हे वाचता न आल्याने कुणी लक्षच दिले नाही वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बबन ताम्बे Tue, 07/14/2015 - 12:35 नवीन
त्याने ब-याच शाळांमधे बरेच सेमिनार घेऊन सांगीतले की अक्षर खराब असल्यामुळे ब-याच मुलांना दहावी बारावीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्याने इव्हन हेही पटवले की आधी पालकांचे अक्षर चांगले हवे. तरच मुलांचे अक्षर सुधरेल. आहे कि नाही एका दगडात दोन पक्षी :-) त्यांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे फेबु. वर जोरदार मार्केटींग चालू आहे.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 07/15/2015 - 14:05 नवीन
मला mid brain activation चा मेसेज आलाय मोबाईल वर. पुण्यात तीळक रोड ला परवा फ्री सेमिनार आहे . बघूया तरी जावून काय आहे हे . आता पुण्यात सुधा धुमाकूळ सुरु होणार कि काय
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 14:17 नवीन
जरा मेसेज इथेच फारवड करता काय ? जाउन बघतोच काय प्रकरण आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
संदीप डांगे Wed, 07/15/2015 - 14:28 नवीन
+१०००० जेवढ्या मिपाकरांना जमेल तेवढ्यांनी जावा. पाहीजे तर मिपासाठी खास सेमिनार घ्यायला सांगा त्यांना. दूध का दूध पानी का पानी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 17:01 नवीन
मालक, मी मनोरंजन म्हणून जाणार आहे. दुध-पानी साठी नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 07/15/2015 - 17:04 नवीन
पुण्यात तीलक रोड ला कुठेशिक आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 18:21 नवीन
तीलक रोड
टिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 09:12 नवीन
तीलक रोड>>> खरच चुकलं . माफ करा . टिळक मार्ग बरोबर आहे . मेसेज असा आहे : What is MIDBRAIN ACTIVATION & how it is going to benefit ur child for a lifetime. Attend a free seminar on 17th July 7 pm @MCCIA HALL Tilak Rd, Miscall 9764069900
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 13:39 नवीन
प्रत्यक्ष सेमिनारला जायची चांगली संधी आहे आज. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जावं आणि या धाग्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर तिथे उत्तर मिळतायत का बघावी. सेमिनारला जाणार्‍यांनी आल्यावर नविन धागा काढून मत मांडलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
संदीप डांगे Sun, 07/19/2015 - 10:06 नवीन
काय...? कुनी गेलेवते की नै? असं कसं चाललं? एवडी मार-के-टींग केली या धाग्यावर... सगळी फेल झाली का बावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
द
द-बाहुबली Sun, 07/19/2015 - 13:56 नवीन
मी तरी गेलो नाही कारण बाहुबलीच जास्त मनोरंजन करेल असा निर्णय झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गिरकी गुरुवार, 07/16/2015 - 12:32 नवीन
या असल्या सगळ्या गोष्टी मी वयाचे १५ पार केल्यावरच का सापडायला लागल्या बरं :( ते अ‍ॅबॅकस पण तसंच. मोठ्या माणसाना नाही शिकवणार म्हणे. हे काही खरे असेल असं अज्जिबात वाटत नाहिये. पण असेलच तर काही वर्षांत मोठ्यांना पण कसं हुशार करायचं याचा शोध ही मुलेच लावतील. मला जर असं काय काय अंतर-ज्ञान मिळालं तर काय बहार येईल या स्वप्नात हरवून गेलेय. :) बाकी संदीप भाऊ, तुमच्या अभ्यासाचं फलित नक्की सांगा हो.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 07/16/2015 - 12:40 नवीन
पण बौद्धिक वय कमी असलं तरी चालतं म्हणतात. पहा बरं घेतात का ते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
स
संदीप डांगे गुरुवार, 07/16/2015 - 12:44 नवीन
तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. मोठ्यांचेही अ‍ॅक्टीवेशन सुरू केलंय बरंका...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
ग
गिरकी गुरुवार, 07/16/2015 - 12:51 नवीन
हो का? दोन्ही बातम्या चांगल्याच आहेत माझ्यासाठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
च
चित्रेचा तारा गुरुवार, 07/16/2015 - 17:44 नवीन
http://www.mirror.co.uk/news/uk-news/mind-boggling-magician-shows-how-6039713 या चित्र फितीमध्ये सुद्धा मुलगा असाच काहीतरी करत आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा काही दिवस थांबून निर्णय घेणे चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
त
तुडतुडी Fri, 07/17/2015 - 10:59 नवीन
आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? त्यासाठी एवढे पैसे कशाला घालवायचे ?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 07/17/2015 - 11:24 नवीन
आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? हि मुले अंधारात अभ्यास करू शकतील त्यामुळे उर्जेची बचत होइल, मुलांच्या वस्तू गहाळ होणार नाही. मुलांना चष्मे लागणार नाही. पोलिसांना श्वानपथक बाळगावे लागनार नाही. ...... असे बरेच फायदे आहेत, पैशाकडे बघु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ट
टवाळ कार्टा Fri, 07/17/2015 - 11:49 नवीन
पण मुले आणि पालक एकाच खोलीत झोपत असतील तर पालकांची गोची नै का होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
क
काळा पहाड Fri, 07/17/2015 - 12:45 नवीन
तुला रे काय माहीत? तुझं लगीन तर झालेलंच नै अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 07/17/2015 - 13:05 नवीन
खिक्क...मग कै झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बबन ताम्बे Fri, 07/17/2015 - 13:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आनंदी गोपाळ Fri, 07/17/2015 - 16:05 नवीन
मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या पुढच्या स्टेपला शेजारच्या खोलीतलंही दिसतं म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Fri, 07/17/2015 - 16:28 नवीन
गोपाळ राव मला एक कळत नाही कि हे मिड ब्रेन कशाला अ‍ॅक्टिव्हेट करायला जात आहेत?फोर ब्रेन( मोठा मेंदू) का अ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत? ती अ‍ॅक्टिव्हेट करता आला तर मी सुद्धा आईन्स्टाइन सारखा बुद्धिमान होईन कि. नुसती दृष्टी किंवा कर्ण शक्ती सुधारून माणूस कसा हुशार होणार? वेडा किंवा मतीमंद माणूस सुद्धा व्यवस्थित पाहत असतो किंवा ऐकत असतो. म्हणतात ना डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी फक्त काही लोकांनाच असते. किंवा गाणी आम्ही पण ऐकतो पण गाण्यात कुठला सूर चुकला हि श्रवणशक्ती आम्हाला नाही. हे सर्व कार्य मध्य मेंदूचे नाही तर आद्य मेंदू( मोठा मेंदू)चे आहे. तो अ‍ॅक्टिव्हेट करायचा सोडून हे काय चालले आहे? पाईनीयल ग्रंथीला अ‍ॅक्टिव्हेट करतात असे त्यांचे म्हणणे आहे. पण पाईनीयल ग्रंथी शल्यक्रिया करून काढून टाकली तर माणूस ना बहिरा होतो ना आंधळा होतो. मग हे काय? हे शोधताना मला उत्तर सापडले. ते असे आहे http://www.midbrain-activation.com/IncomeOpportunity.html मोठी ईण्ष्टीट्य़ूट काढू. खाऊ पिऊ मजा करू. १२५ कोटी लोकांच्या देशात आपल्या सात पिढ्या चालवू शकतील असा धंदा आहे. येता का? मला सफाईदार मराठी हिंदी आणी इंग्रजी येते. चार असे विविध भाषा बोलणारे घेऊ. हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
काळा पहाड Fri, 07/17/2015 - 18:30 नवीन
मी पण मी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Fri, 07/17/2015 - 19:44 नवीन
मी पण येउ का या प्लान मध्ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सदस्यनाम Sun, 07/19/2015 - 14:31 नवीन
ह्या टवाळ नगाला घ्या डॉ. डोळे मिटून गाड्या आणि डुआयडी ओलखतेय. व्हिडिओ मधे घ्यायला पण बेस्ट स्याम्पल है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Sat, 07/18/2015 - 13:35 नवीन
initial investment तुम्ही करा डॉक्टरसाहेब. पुढचं आम्ही बघून घेतो. नफ़ा आम्हाला तोटा तुम्हाला वगैरे... कधी सुरु करताय बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 07/17/2015 - 12:05 नवीन
ट.का. पेशल पंच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा