मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?
मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे.
दुवा १ दुवा २ दुवा ३
वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.
धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण...
एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा.
त्याच अॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली.
नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय.
कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का?
(ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )
💬 प्रतिसाद
(160)
ज
जेपी
Sun, 07/19/2015 - 14:35
नवीन
आमच्याकडे नी* ब्रेन अक्टीवेशन करुन मिळेल.
*knee
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Tue, 07/21/2015 - 05:26
नवीन
तारतम्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या अभावामुळे जाणवणारा अविष्कार आहे.
त्यातूनच मग ईश्वराचे प्रेषित, विविध धर्मातले पूजापाठ निर्माण होतात. विविध धार्मिक उपद्रवी उत्सव, सत्यनारायण, वास्तुशास्त्र, चालते, हे का चालू नये? फक्त सादरीकरण वेगळे आहे. यांनी का कमवू नये?
प्रकाटाआ होण्याची भरपूर शक्यता.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Tue, 07/21/2015 - 09:53
नवीन
पाईनीयल ग्रंथीला अॅक्टिव्हेट करतात असे त्यांचे म्हणणे आहे. >>>
नाही . ते pituitary ग्रंथीला अॅक्टिव्हेट करतात.
मिडब्रेन अॅक्टिव्हेशनच्या पुढच्या स्टेपला शेजारच्या खोलीतलंही दिसतं म्हणे?>>>
हा third eye activation चा प्रकार असेल तर आपल्या सध्या डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी दिसायला लागतात . भुतं , आत्मे वगेरे पण . मग बसा बोंबलत.
ह्या मुले मुलांमध्ये नक्की विकृती निर्माण होऊ शकते . :-)
परवा मी ह्यांचा फ्री सेमिनार attend केला . पण तिथं कुठलंही प्रात्यक्षिक दाखवलं नाही . त्यांच्या सोबत कुणी मुलं नवती . फक्त P P T presentation दाखवलं .तो माणूस सारखा meditation , योग ह्या विषयांवर बोलत होता . २-३ प्रश्नोत्तरे झाली . time लिमिट चं कारण पुढे करून तिथेच सेमिनार गुंडाळला . आणि तेवढ्यावर ३-४ बिनडोक पालक आपल्या पाल्याला शिबिराला पाठवायला तयार झाले . त्यांच्या मनात आलं नसेल का कि आपण आपल्या मुळात एवढा शारीरिक बदल घडवतोय तर आपण थोडी माहिती घ्यावी . असं खरच होतं का ? ह्याचे पुढे परिणाम काय होतील वगेरे
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 07/22/2015 - 17:09
नवीन
पिच्युटरी ग्रंथी म्हणजे पिच्युटस ज्यातून स्त्रवतो अशी कल्पना होती तीच काय?
ही नॉर्मली सूप्तावस्थेत असते ना?
तिला अॅक्टिव्हेट करायचे तर तिच्यातील स्त्राव अधिक केल्याने जे होईल ते व्हायला हवे की नाही?
म्हणजेच अॅक्रोमेगॅलिक मुले निर्माण करून संपूर्ण जगाची Gigantic प्रगती करावयाची. असेच ना?
जरा पिच्युटरी ग्रंथी अॅक्टिवेट झाल्यानंतर काय - काय करते ते सांगणार का?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Tue, 07/21/2015 - 09:56
नवीन
मला त्यांचा आत्ता कॉल आला होता . मी शनिवारी ५ वाजता माझे प्रश्न विचारायला जाणार आहे . ते personaly उत्तरं देणार आहेत . कोणाला यायचंय का ?
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Fri, 07/31/2015 - 07:54
नवीन
मी शनिवारी ५ वाजता माझे प्रश्न विचारायला जाणार आहे .
विचारले का प्रश्न?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/03/2015 - 12:06
नवीन
नाही . आमचं घर कात्रज ला . ह्यांचं सेंटर FC रोड ला . कोण जाणार एवढ्या लांब
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Wed, 08/19/2015 - 12:12
नवीन
कुठवर आलं आपलं रिसर्च. काही सकारात्मक आढळले का?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Fri, 08/21/2015 - 10:50
नवीन
मी नाही गेले . एक तर आमच्या घरात कोणी लहान मुलं नाहीत आणि सगळं थोतांड वाटतंय . त्यामुळे त्यात वेळ घालवावा असं नी वाटत .
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Fri, 08/21/2015 - 11:04
नवीन
कुठवर आलं आपलं रिसर्च. काही सकारात्मक आढळले का?
माफ करा. मी हा प्रश्न आपल्याला नव्हे धागालेखक श्री.संदीप डांगेंना विचारला होता.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4