Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

व
वेल्लाभट
Sat, 07/11/2015 - 16:36
🗣 84 प्रतिसाद
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली. भोजनालय कितीही मोठ्या नावाचं, लोकप्रिय असलं तरी त्यातील खाण्याची खाण्याचा दर्जा कसा बिघडलेला असू शकतो याचं हे उदाहरण मिळालं. ही गोष्ट परिचितांमधे शेअर करताना आणखी धक्का बसला. कारण अनेकांनी आमच्याही मित्राला, नातेवाईकांना, किंवा स्वत:ला असाच अनुभव आला आणि असाच त्रास झाला अशी माहिती दिली. त्याच दिवशी व्हॉट्सअ‍ॅप्प वर एक संदेश फ़िरत होता. ज्यात असं म्हटलं होतं की विवियाना मॉलमधे पाण्याचा काहीतरी घोळ झालेला असून दूषित पाणी लोकांना दिलं जात आहे. त्यामुळेच गेल्या एक दोन आठवड्यात विवियाना मधे ज्या ज्या लोकांनी खाणं खाल्लं त्या त्या लोकांना त्रास झाला आहे. प्रशासनाने म्हणे पाण्याचे नमुने तपासाकरिता घेतले आहेत. पण त्रास झाला त्याबद्दल कोण जबाबदारी घेणार? राजधानी इत्यादी सारख्या मोठ्या हॉटेलांनी, ज्यांनी एवढी मोठमोठी ठिकाणं थाटून ठेवलेली आहेत, याची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट आलीच. परंतु त्याही आधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, म्हणजे तुम्ही जेंव्हा हे वाचाल तेंव्हा त्या नंतर तुम्ही या ठिकाणी जाऊन जेवायचं, खायचं ठरवताना पुन्हा विचार करावा, एवढाच हे शेअर करण्यामागचा हेतू आहे.
वर्गीकरण
जीवनमान अनुभव

प्रतिक्रिया द्या
15971 वाचन

💬 प्रतिसाद (84)
ए
एस Sat, 07/11/2015 - 16:45 नवीन
माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही याबाबत कुठे तक्रार नोंदवली का?
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 16:47 नवीन
बाप रे! आभारी आहे वेल्लाभट साहेब सावध केल्याबद्दल. असो मी पैला!!!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 07/11/2015 - 16:56 नवीन
जमल्यास तक्रार करा... अवांतर : मला तिथले जेवण कधी आवडले नाही... आमच्या इथे असलेले त्यांचे रेस्टॉरंट कधीच बंद झाले !!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 07/11/2015 - 17:00 नवीन
माझाही मागील दोन वर्षातला अनुभव असाच आहे, पण इथल्या उपहारगृहांच्याबाबतीत! अगदी मोजकी ३ हाटेले आहेत जिथे खाल्ले तर चालू शकते. इतर ठिकाणी खाल्ल्यास पोट बिघतेच! सध्या, म्हणजे गेले एक वर्ष बाहेरचे अन्न खाणे जवळ्जवळ बंद आहे. म्हणजे आम्ही आपणहोऊन जात नाही. (कोणी गेट टुगेदरला बाहेरून अन्न मागवल्यास मोजके खाते व औषधे घेते). त्यामुळे बाहेरील कामास जायचे असल्यास बर्‍याच मर्यादा येतात. तास दोनतासांच्या अंतरावर जायचे असल्यास पूर्वी कुठेतरी खाणे व्हायचे. आता तसे नाही. सकाळी न्याहरी झाल्यावर आधी स्वयंपाक करून डबे बांधून घेते. संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत कोणत्याही परिस्थितीत परत येऊन संध्याकाळचा स्वयंपाक होतो. आता असे केल्यावर तब्येतीला फायदे लगेच दिसले. माझे पाच किलो वजन कमी झाले व नवर्‍याचेही असे चारेक किलो कमी झाले. तोटा असा आहे की बाहेचे आता काहीच सोसत नाही. गाडीत घरी फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या, खराब न होणारी स्नॅक्स असतातच पण डबे बांधून घेण्याचे बंधन आले. फायदे जास्त आहेत पण स्वयंपाकाचा कंटाळा करून अजिबात चालत नाही. एकदम आजीबाई झाल्यासारखे वाटू लागले आहे. डिसेंबरात झालेल्या अनाहिता कट्टयालाही घरचे कुकींग होते ते मला मानवले. सगळ्या तपासण्यांमध्ये कोणतेही इनफेक्षन वगैरे आढळले नाही. आता डॉ. ना प्रश्न पडलाय की काय करावे? यावर आयु. औषधे मस्त मानवतायत, मात्र ती अनेक महिने घेत बसावे लागते पण आपल्याला आता आहे हा प्रश्न तर ते करायचे. मुलाचे बाहेरचे खाणे आपोआप कमी झाल्याने तो वैतागतो. ;)
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 17:19 नवीन
तोटा आसा आहे की आता बाहेरचे काहीच सोसत नाही.:- म्हणून तर आम्ही चरण्याचे बाबतीत निर्बंध पाळत नाही.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 07/11/2015 - 17:54 नवीन
सहमत ! रच्याकने तुमच्या आयडीचा काही विशेष अर्थ आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 18:21 नवीन
रच्याकने!!! हीः हीः हीः!!! आयडीचा अर्थ का शोधतोय भावा!!! नाहीतरी उकाला काय अर्थ आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sun, 07/12/2015 - 18:54 नवीन
आयडीचा अर्थ का शोधतोय भावा!!!
काही आयडी बरेच अर्थपूर्ण असतात, उदाहरणार्थ ५० फक्त वगैरे. तुमचा आयडी थोडा वेगळा वाटला त्यामुळे फक्त उत्सुकतेपोटी विचारले .
नाहीतरी उकाला काय अर्थ आहे???
माझ्या आयडीच्या मागेही काही विचार आहेत कधी मुड झाला तर सांगेन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 04:22 नवीन
अरेच्चया कदाचित माझं बोलणं जरा चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं माझ्याकडून. ऐक्षट्रीमली स्वारी भावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 18:24 नवीन
जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती कहाणी इथं सांगणे शक्य नाही. खूप लेंगदी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sun, 07/12/2015 - 18:56 नवीन
जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती कहाणी इथं सांगणे शक्य नाही. खूप लेंगदी आहे.
लेखाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 04:19 नवीन
काय राव चेष्टा करताय गरिबाची! आमच्या नावाला काईच ग्लॅमर न्हाई मीपावर! अजून एक लघुकथा पण नै नावावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 07:10 नवीन
खरडवही चेकवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 07:11 नवीन
तुम्ही कोणाचा तरी डूआयडी आहात असा माझा विचार चाल्लेला...तो समज आता पक्का झालाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 07:33 नवीन
ये नाय रे बाबा चांगला जिताजागता माणूस हाये मी!!! काय छळ मांडलाय! आमाला काय लिवता येत नाय म्हनुन आमी डू आयडीच व्हय डायरेक्ट! तुमचं लिवलेलं वाचून आनंद घेतोच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 07:41 नवीन
खिक्क...कोणी बघितलय तुम्हाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 17:22 नवीन
लई लाड केले न स्वतःचे की हमखास त्रास होतोच!!! त्यापेक्षा काळजी न करता चरत रहावे. शेवटी पोट पण हार मानते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 07/11/2015 - 20:07 नवीन
होय. तेही करून पाहिले. शेवटी मीच हार मानली. असं दिवसेन दिवस आजारी राहून संसार कसा करणार? स्वयंपाक करणार्‍या मनुष्याची तब्येत बिघडली की सगळ्या मेंबरांच्या तब्येती बिघडतात. आपण आपल्याला सांभाळणे हे मला मानवते, म्हणून मी तसे करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
क
कंजूस Sat, 07/11/2015 - 18:06 नवीन
बोअरवेलचे पाणी मिक्स करून वापरतात का?
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 07/11/2015 - 18:09 नवीन
माझाच अनुभव लिहिल्यासारखे वाटते आहे.आजच हाॅस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळाला. रविवारी डोंबिवलीला लिजेंडमध्ये कतारहुन आलेल्या स्वरासाठी कट्टा आणि घरच्या लोकांचा अधिक महिन्यासाठी यायचा आग्रह म्हणून दोन्ही एकाच ठिकाणी जमवुन पटकन घरी जाईन असे ठरवले होते. लिजेंड डोंबिवलीतले नामांकित हाॅटेल आहे.त्या दिवशी मात्र तिथे मिल्कशेक प्यायलाने मला आणि भाच्याला प्रचंड फुड पाॅयझनिंग झाले.उलट्या जुलाब न थांबल्याने डिहायड्रेशन होऊन हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले.तीन दिवसात अगदी हाल झाले.अजून बरी होतेच आहे. मीही यावर लिहिणारच होते.बाहेरचे खाताना, विशेषतः न शिजवलेले,कच्चे,दुग्धजन्य पदार्थ यांना अजीबात हात लावणार नाही यापुढे.लिजेंडमध्ये यासंबंधी तक्रार करण्यात आलेली आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sat, 07/11/2015 - 19:32 नवीन
अगदी ग अजया..!! मी आणि पदम, आम्हां दोघींनाही माफक प्रमाणात का होइना, पण त्रास झालाच. मळमळ आणी पोटदूखी. मी तर फक्त एक छोटा चमचा मिल्कशेक प्यायले होते. मला तर त्याच दिवशी परतीचा प्रवासही करायचा होता. प्रचण्ड टेन्शनमधे प्रवास केला. उतरल्या उतरल्या सरळ हॉस्पिटल गाठले आणि ७ दिवसांचा औषधांचा कोर्स सुरू केला. भारतात आल्यावर खाण्या-पिण्याची प्रचण्ड बंधनं पाळते मी. कच्चं, पुरेसं न शिजवलेलं अन्न टाळते. कुठलिही सलाड्स, ज्युसेस, मिल्कशेक्स ई.ई. अजिब्बात घेत नाही. पाणी बाहेर फक्त बॉटल्ड (स्वच्छच असेल असा विश्वास ठेवावा लागतो). अगदी आईसक्रीम पण नाही कारण आपल्याकडे अजुनही कधीही आणि कितीही वेळासाठी लाईट्स जातात. अगदी माझ्या लाडक्या वडापावातलाही वडाच खाते फक्त. तरिही यावेळी 'नजर हटी दुर्घटना घटी' असं झालच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
व
वेल्लाभट Sun, 07/12/2015 - 07:49 नवीन
अरे बापरे !......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कंजूस Sat, 07/11/2015 - 19:45 नवीन
चहाचे लाल पाणी बरे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/11/2015 - 20:09 नवीन
क्याssssबात!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ए
एस Sat, 07/11/2015 - 22:05 नवीन
त्यातही असलेल्या दुधातच जर भेसळ असेल तर बाहेरचे चहाचे पाणीही घातक ठरू शकते. सोलापूर साईडला चहात चक्क शिळी पारले जी बिस्किटे टाकतात. त्यामुळे रंग आणि दाटपणा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रभो Mon, 07/13/2015 - 07:00 नवीन
>>सोलापूर साईडला चहात चक्क शिळी पारले जी बिस्किटे टाकतात. २५ वर्ष सोलापुरात काढून पण कधी ऐकलं नाही हे.. तुम्ही कुठे ऐकलंत? बूस्ट टाकतात चहात सोलापुरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सदस्यनाम Mon, 07/13/2015 - 13:47 नवीन
पारले जी सोलापुरातच तयार होतात एवढे म्हैते. parle सोलापूरकरांना सगळ्यात ताजी पारले जी मिळत असताना हि भेसळ कोण करणार? कैच्याकै अफवा पसरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
ए
एस Mon, 07/13/2015 - 14:13 नवीन
सोलापूर साईडला म्हणजे त्या बाजूच्या महामार्गावरील टपर्‍या आणि हॉटेल यामध्ये प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. दूध टाकण्याऐवजी चहात पारले जी बिस्किटे टाकली जातात. त्याने रंग आणि दाटपणा, दोन्ही येतो. माझ्या अनुभवावर मी ठाम आहे. सोलापूर भाग सोडता इतरत्र अजून असा अनुभव आलेला नाही. परत कधी इंदापूर तालुका ओलांडला की बाहेर चहा घेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 14:22 नवीन
त्यात काय झालं ? मी तर घरीही टाकतो पारले जी चहामधे, मस्त चव येते करून पहा कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सूड Mon, 07/13/2015 - 15:18 नवीन
एकदा बोक्याला देऊन बघा चहा तो!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 15:23 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 17:58 नवीन
आता समजतय तुमचा आयडी सूड का आहे ते ! अजून किती दिवस सूड उगवणार ? एकदा करूनच पहा, दूध , साखर (नेहमीपेक्षा जरा कमी), रेड लेबल पत्ती . चहा उकळत आला कि एक बिस्कीट नंतर अजून एक मस्त उकळी येउ द्या .आणि प्या कपात चाळून बस क्या कहने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 07/13/2015 - 19:17 नवीन
आता समजतय तुमचा आयडी सूड का आहे ते
तुमने अभी डेमो का डेमो भी नै देखा. सूड भौ बोले तो लै डेंजर होना मिया!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ट
टवाळ कार्टा Tue, 07/14/2015 - 13:34 नवीन
खिक्क...तर तर...बोले तो यम भै का लेफ्त-राईटवाला हँड होना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Wed, 07/15/2015 - 11:13 नवीन
हो तर, यमाच्या रेड्यासाठी व्हेकन्सी आहे. अप्लाय करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 07/15/2015 - 11:17 नवीन
जॉब का सोडतो आहेस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 07/15/2015 - 11:19 नवीन
छे, मी उजवा हात आहे असं तूच म्हणालास. त्याला वाहन हवं आहे. मुद्दा सोडायचा नाय हा टक्कूमक्कू!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 07/15/2015 - 12:56 नवीन
"लेफ्त-राईटवाला हँड होना" दोन्ही ही तुच lllluuuulllluuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 07/15/2015 - 17:11 नवीन
कितीदा सांगितलं असेल असं चारचौघात 'lllluuuulllluuuu' करु नये, अश्लील वाटतं ते!! म्हणून तुला कुठे नेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्रीरंग_जोशी Wed, 07/15/2015 - 17:21 नवीन
>>कितीदा सांगितलं असेल असं चारचौघात 'lllluuuulllluuuu' करु नये, अश्लील वाटतं ते!! आरारारा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
श
शंतनु _०३१ Mon, 07/13/2015 - 11:44 नवीन
हे नवीनच वाचतोय , शिळी ताजी बिस्किटे यावर एखादा लेख आहे का मिपा वर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
स्वप्नांची राणी Sat, 07/11/2015 - 20:05 नवीन
"हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली..." पुरेसा त्रास झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याकडे पद्धत नसते. सहसा आधी कुठे पोटच शेक, चहात लिंबू घालून गळती थांबवण्याचे प्रयत्न कर, ओवाच खा, हिंगाची गोळीच घे असले उपाय केले जातात. खरं म्हणजे पोटात दुखणे + मळमळ + गळती हे कसल्यातरी इन्फेक्शन चे लक्षण आहे आणि त्याकरता विलंब न करता डॉक्टर गाठावा, असं आमच्या डॉक्टरांनी सांगितलय. जितका उशिर, तितके इन्फेक्शन पसरण्यास मदत असं ते म्हणतात. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव लिहीते. तीला पाणीपुरी प्रचण्ड आवडायची. जिथे जाइल तिथली पापु खाणार. 'जितका घाणेरडेपणा जास्त तितकिच पापू चविष्ट ' असे तिचे एक सुत्र होते. एकदा नागपुरला गेली असतांना ऑफिसचे काम आटोपल्यावर नेहेमीप्रमाणे पापू पार्टी केली. परत मुंबईला निघाली तेंव्हाच पोटदुखी सुरू झाली होती, पण त्यात काय मोठं म्हणून गाडीत बसली. गाडी जेमतेम सुटली असेल , हीला प्रचण्ड प्रमाणात उलट्या, मोशन्स सुरू झाल्या. नंतर नंतर तर टॉयलेट्स पर्यंत जाण्याचीही ताकद अंगात राहिली नाही. गाडी वर्ध्याला पोचेपर्यंत ती अर्धबेशुद्धावस्थेत गेली होती. जेमतेम दिड तासात हे घडून गेलं. गाडीतल्या लोकांनी तिला सामानासकट तसच वर्ध्याला उतरवून दिलं. स्टेशनवर मग कोणीतरी तिला हॉस्पिटलमधे एडमीट केलं, ते सरळ आयसीयु मधे. ५-६ दिवस ती जवळ जवळ कोमामधेच होती. नंतर गेलीच... यावेळेला मला जेंव्हा त्रास झाला आणि मी ईथल्या हॉस्पिटलमधे गेले तेंव्हा ते डॉक्टर सरळ म्हणाले "India food is poison..." म्हणणारे डॉक्टरही ईण्डीयनच होते. अन्न आणि स्वच्छता ह्या दोन शब्दांचा आपल्याकडे अर्थाअर्थी काहिही संबध नसतो, त्यामुळे मला त्यांचे बोलणे चूक वाटले नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 07/11/2015 - 20:17 नवीन
बापरे! हे भलतेच झाले. माझ्याकडून एकदा फक्त बाहेरचे सॅलड खाल्ले गेले, जे मी कधीही खात नाही. 'नजर हटी' टैप प्रकार घडला. त्यानंतर सगळ्या तपासण्या झाल्या, काहीही इन्फेक्षन नाही. मग डॉ. म्हणाले आता कोलोनोस्कोपी करून घ्या. आता आमच्या येथे ही तपासणी पन्नाशीनंतरच इंन्शुरन्स कव्हर करतो. आता मला पन्नाशीचे होण्यास कैक वर्षे वाट पहावी लागणार. शेवटी आता होईल तो खर्च होऊदे पण तपासणी करूयात असे ठरलेय, म्हणजे नवर्‍याने ठरवलेय. फक्त मी काही महिने मागितलेत की मला आयुर्वेदिक औषधे घेऊन बघु द्या दोनेक महिने. या नस्त्या गोष्टी मागे लागतात आणि जिवाला आणखी एक काळजी. पण सध्या चालू केलेल्या आयु. औषधांनी बराच गुण आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 18:04 नवीन
चहात लिंबू घालून गळती थांबवण्याचे प्रयत्न कर
हीः हीः हीः भारीच जोक हो तै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
आ
आदूबाळ Sat, 07/11/2015 - 21:26 नवीन
बाप रे! भट आणि इतरांचे अनुभव वाचून धसकलोच आहे... अन्न आणि औषध प्रशासनाला तक्रार करायची काही सोय आहे का?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 07/11/2015 - 21:32 नवीन
बाहेर खावेच लागले तर बिस्किटे हा सगळ्यात सेफ ऑप्शन असतो. कुठेही मिळतात आणि उगीच "तळतळाट" पण नसतो.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 07/11/2015 - 22:02 नवीन
त्यावरही एक्स्पायरी डेट पाहून मगच खरेदी करावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Sun, 07/12/2015 - 05:35 नवीन
१. हो ते आहेच. पण मुख्य म्हणजे आपल्या चवीवर भरवसा ठेवावा. खराब झाली गोष्ट आपल्या चवीला बर्याचदा वेगळीच लागते. २. दुसरं म्हणजे पारले जी टाळावीत कारण माझ्या अंदाजाने नकली बिस्किटे सुद्धा असतात आणि त्याची शक्यता पारले जी बद्दल सर्वाधिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बहारिन् चा खलिफा Sat, 07/11/2015 - 22:19 नवीन
बापरे मी तर रोजच बाहेर खातो.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sat, 07/11/2015 - 22:59 नवीन
बाहेर म्हणजे भारतात बाहेर. बहरीन ला नाही...(बहरीन मधे पण food & drugs control कतार इतकाच strict असावा असे धरून चालतेय..) अर्थात कतार मधेही indian होटेल्स मधे कधीमधी infection चा त्रास होऊ शकतो. पण अशी तक्रार गेली तर baladia म्हणजे कतार म्युन्सिपाल्टी अशी होटेल्स ६ महिन्यांसाठी किंवा कधी कायमची बंद करतात. (जिथे जिथे indian असे म्हणालेय तिथे by default, india आणि indian subcontinent ऎसे घ्यावे. ते लोकही आपल्याच इतके कलाकार आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहारिन् चा खलिफा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा