Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

व
वेल्लाभट
Sat, 07/11/2015 - 16:36
🗣 84 प्रतिसाद
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली. भोजनालय कितीही मोठ्या नावाचं, लोकप्रिय असलं तरी त्यातील खाण्याची खाण्याचा दर्जा कसा बिघडलेला असू शकतो याचं हे उदाहरण मिळालं. ही गोष्ट परिचितांमधे शेअर करताना आणखी धक्का बसला. कारण अनेकांनी आमच्याही मित्राला, नातेवाईकांना, किंवा स्वत:ला असाच अनुभव आला आणि असाच त्रास झाला अशी माहिती दिली. त्याच दिवशी व्हॉट्सअ‍ॅप्प वर एक संदेश फ़िरत होता. ज्यात असं म्हटलं होतं की विवियाना मॉलमधे पाण्याचा काहीतरी घोळ झालेला असून दूषित पाणी लोकांना दिलं जात आहे. त्यामुळेच गेल्या एक दोन आठवड्यात विवियाना मधे ज्या ज्या लोकांनी खाणं खाल्लं त्या त्या लोकांना त्रास झाला आहे. प्रशासनाने म्हणे पाण्याचे नमुने तपासाकरिता घेतले आहेत. पण त्रास झाला त्याबद्दल कोण जबाबदारी घेणार? राजधानी इत्यादी सारख्या मोठ्या हॉटेलांनी, ज्यांनी एवढी मोठमोठी ठिकाणं थाटून ठेवलेली आहेत, याची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट आलीच. परंतु त्याही आधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, म्हणजे तुम्ही जेंव्हा हे वाचाल तेंव्हा त्या नंतर तुम्ही या ठिकाणी जाऊन जेवायचं, खायचं ठरवताना पुन्हा विचार करावा, एवढाच हे शेअर करण्यामागचा हेतू आहे.
वर्गीकरण
जीवनमान अनुभव

प्रतिक्रिया द्या
15971 वाचन

💬 प्रतिसाद (84)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 07/12/2015 - 05:12 नवीन
वेल्ला एफ.डी.ए. कडे तक्रार करायची ना. हा सरळ सरळ प्रोफेशनल नेगलिजन्स चा प्रकार आहे. बाकी तब्बेतीस जप. जिमवेटिंग :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 07/12/2015 - 07:48 नवीन
हो अरे मी स्वतः नव्हतो. माझे आई आणि बाबा गेले होते. त्यांचं बिघडलेलं पोट. आता येतंय ताळ्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
माझीही शॅम्पेन Mon, 07/13/2015 - 10:57 नवीन
हॉटेल वाल्याला जाब विचारला काय ? डोक्याला शॉट आहे राव , साला कधी काळी हॉटेलात खाणार आणि आजारपण घेऊन येणार काय अर्थ आहे हयला खेदाने म्हणाव लागेल भारतात कशात भेसल असेल अस सांगता येत नाही र च्याक ने पाणी-पुरी हा अतिशय भयंकर प्रकार आहे , हल्लीच एक पॅकेज टूर मध्ये एका महिला प्रवशिणीची जी वाट लागली होती पाणी पुरी खाऊन .. त्यानंतर कानाला खडा लावलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 07/12/2015 - 05:13 नवीन
इन जनरल पोट दगड पचवायसाठी बनलेलं आहे असं दिसतयं. कधी कुठे खाउन मित्रांना त्रास झाला तरी मला आजपर्यंत कधीचं त्रास झालेला नाही. तरीही प्रिव्हेन्श्न इज बेस्ट क्युअर हे लक्षात घेउन इथुन पुढे जपुन चरणार बाहेर.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 07/12/2015 - 06:45 नवीन
आपण फक्त आपसात तक्रार करत राहतो.याचाच फायदा हे लोक घेतात.यावत अन्न आणि औषध प्रसासनाकडे आणि ग्राहक कोर्टात तक्रार दाखल करता येते. असाच प्रकार चार वर्षांपूर्वी गजाली या नावाजलेल्या खाद्य्गृहाच्या अंधेरी (पश्चिम)इथल्या शाखेत घडला होता. आम्ही काही मैत्रीणींनी तिथे वेज-नॉनवेज असे दोन्ही प्रकारचे जेवण घेतले.सगळ्यांची पोटे बिघडली.तीन-चार दिवसांनी हे समजले.लगेच तिथे फोन करून कल्पना दिली.बरे वाटल्यावर दोघी-तिघींनी ऐन गर्दीच्या वेळी जाऊन जाब विचारला.तर ते बिलाचे पैसे द्यायला तयार झाले.मग ग्राहक कोर्टात जाणार म्हटल्यावर सगळ्यांची औषधांचीही बिले दिली.कारण दोघींना रुग्णालयातच दाखल करावे लागले होते. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.बिले थोडे दिवस तरी जपून ठेवावीत.नाहीतर हल्ली फोटोवरून पुरावे दाखवता येतात.थोडासा वेळ खर्च करावा लागतो,एवढेच.पण तोच हल्ली आपल्याकडे नसतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 07/12/2015 - 07:51 नवीन
आम्ही तक्रार नाही नोंदवली. हे चुकलंच. पण म्हटल्याप्रमाणे अनेकांना त्रास झाल्याने तक्रार झालेली होती आणि सँपल्स लॅब मधे दिलियत वगैरे असं कळलं. आपली निष्क्रीयताच या गोष्टींना खतपाणी घालते. त्यामुळे तक्रार केली नाही ही चूक मान्य.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 07/12/2015 - 08:44 नवीन
TV 9 च्या बातम्यात मुंबई महानगर पालिकेच्या मालाड मधल्या अधिकार्यांनी झोपडपट्टीतील फरसाणचा कारखान्यावर धाड घातलेली दाखवली. अतिशय निकृ ष्ट द र्ज्याच फरसाण, हिरवे वाटाणे, चकणा वैगेरे तिथे बनत होते. अधिकार्यांनी कॅमेर्या समोर सर्व भांडी, तेल, पिठ सर्व उध्वस्त केले. ह्या सर्व क्लिप्स व्हॉट्स-अपवर फिरत आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 07/12/2015 - 14:30 नवीन
हल्दिरामच्या पिशवीबंद खाद्यपदार्थांविषयीसुद्धा असाच एक निरोप वॉत्सॅपवर फिरत होता. त्यातल्या दुव्यांनुसार अमेरिकेने आयातबंदी घातलेल्या अनेक उत्पादनांपैकी बहुसंख्य उत्पादने ही हल्दिराम्सची आहेत. हे फेब्रुअरी २०१५ मध्ये झाले आहे. चार पाच दिवसांपूर्वी आपल्या वर्तमानपत्रांत एक छोटीशी बातमी आली होती. त्यात हल्दिराम्सच्या उत्पादनांसंबंधी काहीतरी होते. बंदी किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणी असे काहीतरी. माझा स्वतःचा हल्दिराम्सचा अनुभव फारसा चांगला नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 07/13/2015 - 08:53 नवीन
हलदिरामच्या उत्पादनांवर शंका असल्याने गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांचे एकही उत्पादन आम्ही विकत घेतले नाही. सर्वात आधी त्यांची सोनपापडी अप्रतिम असायची. २००५-६ च्या सुमारास बिघडण्यास सुरुवात झाली. दहा वर्षांआधीच्या आणि आताच्या सोनपापडीत जमिन अस्मानचा फरक आहे. तेच कोणात्याही ब्रँडच्या श्रीखंडात. मुळात ते श्रीखंड नसून काहितरी केमिकल लोच्या आहे हे जाणवतं. बर्‍याच वर्षांनी घरीच सहज गंमत म्हणून केलेल्या श्रीखंडानंतर बाहेरचे श्रीखंड अजिबात घ्यायचे नाही याचा साक्षात्कार झाला. १५-२० वर्षे नेहमी बाहेरचेच श्रीखंड खाणार्‍यांना चवीत व केमीकलमधे होत गेलेला बदल लक्षात येत नाही. हे सर्वच पदार्थांबद्दल आहे. मग कसलेसे आजार होतात ज्यांचे मूळ कळत नाही आणि उपायही सापडत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अत्रन्गि पाउस Sun, 07/12/2015 - 18:14 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/thane-viviana-mall/articleshow/48037702.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 07/12/2015 - 18:45 नवीन
फारच वाईट अनुभव. भारतातील बहुतांश उपहारगृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर महाग म्हणावे असेच असतात. तरी देखील स्वच्छता अन वापरले जाणारे जिन्नस ताजे व दर्जेदार असतील याची खात्री वाटत नाही. काही वर्षांपूर्वी कावीळ झाल्याने फार मसालेदार (विशेषकरून बाहेरचे) खाल्लेले मला झेपायचे नाही. त्यामुळे बाहेर जेवताना मसालेदार भाज्या खाणे शक्यतो टाळतोच. खाल्ली तरी एकावेळी एकच मसालेदार भाजी खातो. गेल्या भारतवारीमध्ये प्रथमच ठरवून बाहेरचे भरपूर खाल्ले. सुदैवाने त्रास झाला नाही. तरी पण यापुढे काळजी घेईन.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/13/2015 - 07:31 नवीन
विवियाना मॉलला टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथील पाणी दुषीत आहे अशा अर्थाची बातमी आजच्या लोकसत्ताला आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 07/13/2015 - 08:12 नवीन
कालच्या वर्तमनपत्रात विवियाना व्यवस्थापनाने "वॉसपवर खोडसाळ संदेश पाठवुन आम्ची बदनामी व नुकसानी केल्याची" तक्रार केली असून पोलिसांना या प्रकाराची चौकशी करायची विनंती केली आहे, आपण घेत असलेल्या काळजीबद्दल त्यांनी तपशिल दिला आहे. खरे काहीही असो, बाहेर पाण्यापासून सावध असलेले बरे. मद्यपान करताना बर्फ टाळावा, तो कुठल्या पाण्याचा असतो सांगता येत नाही. मिल्कशेक, ज्युस, पाणीपुरी इतकच काय चटणी देखिल टाळावी कारण कुठले पाणी वापरले जाते माहित नाही. या पदार्थांबरोबर फ्रुट सॅलडही टाळावे. अनेकदा जास्त पिकलेली वा नासलेली फळे फ्रुट सॅलड वा ज्युस मध्ये वापरली जातात. गरमागरम वडा व रटरटणारी मिसळ उत्तम. मामलेदार मिसळ (तिखट) खाल्ली की उदरशुद्धी होते, सहसा जीवजंतु शिल्लक राहत नाहीत. नाकही साफ होते
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 07/13/2015 - 08:37 नवीन
एक शंका - प्रत्येक उपहारग्रुहाची महापालीकेतर्फे आणि अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पहाणी होत नाही का? कालच एक बातमी वाचली - मालाड्मधे पाणीपुरी, भेळ, चायनीज नूडल्स बनवण्याचा कारखाना अत्यंत गलीच्छ जागी होता. त्यावर धाड घालून तो आता बंद करण्यात आला आहे. वर सर्वसाक्षी यांनी गरमागरम वडा उत्तम सांगीतला आहे. पण बर्‍याचवेळा बटाटे एका पत्र्याच्या डब्यात कोंबून त्यावर एक अत्यंत घाण झालेली गोणी ठेउन उकडताना पाहीलेले आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 07/13/2015 - 08:54 नवीन
मी ठाणा स्टेशन च्या प्लॅटफॉर्म नं ५ वर - प्लॅटफॉर्म वर उकडलेले बटाटे ओतलेले पाहिले आहेत. या डोळ्यांनी. गोणपाट/पत्रा काहीही नव्हतं खाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 07/13/2015 - 09:01 नवीन
मी पाहीलेला प्रकार चर्चगेट ला होता. वर सांगीतलेल्या बातमीची लींक - https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1144331555583529&id=659606120722744
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 09:03 नवीन
भारतातल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवरचे काहीही विकत घेउ नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 09:18 नवीन
भारतातल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवरचे काहीही विकत घेउ नये...
तिकीटाचे काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 09:29 नवीन
इथे खाण्याच्य्या गोष्टींबद्दल चर्चा सुरु आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 11:47 नवीन
बहुतेक ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 11:52 नवीन
मग तु रेल्वेची तिकिटे खातोस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 12:38 नवीन
नाय बा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Mon, 07/13/2015 - 09:02 नवीन
एक शंका - प्रत्येक उपहारग्रुहाची महापालीकेतर्फे आणि अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पहाणी होत नाही का?
आपण भारतातच रहाता का? इथं नेहमीची कामं (म्हणजे रिएक्टिव्ह पद्धतीची ( म्हणजे अर्ज केल्यावर होणारी)) हे लोक करत नाहीत. असली प्रो-एक्टिव्ह पद्धतीची (म्हणजे जिथं जनतेचा संबंध पण येत नाही ) ती करतील होय?
कालच एक बातमी वाचली - मालाड्मधे पाणीपुरी, भेळ, चायनीज नूडल्स बनवण्याचा कारखाना अत्यंत गलीच्छ जागी होता. त्यावर धाड घालून तो आता बंद करण्यात आला आहे.
तो पकडला गेला म्हणून. बाकी तुम्हाला काय वाटतं पाणीपुरी तल्या पुर्या, पोळी भाजीतली पोळी आणि भाजी, बटाटे वड्याचा मसाला वगैरे सगळं काय स्वच्छ वातावरणात बनतं काय? काही ठराविक सोडलं तर बाकी सगळं असंच बनत असणार.
वर सर्वसाक्षी यांनी गरमागरम वडा उत्तम सांगीतला आहे. पण बर्‍याचवेळा बटाटे एका पत्र्याच्या डब्यात कोंबून त्यावर एक अत्यंत घाण झालेली गोणी ठेउन उकडताना पाहीलेले आहे.
खरं आहे. बटाटे वडा असो वा मिसळ, जंतू सगळीकडेच वाढू शकतात. तेव्हा घरी खाणे हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 09:02 नवीन
आजकाल बाहेर खाणेच बंद केले पाहिजे असे वाटू लागले आहे...पण मग पोट जरा जास्तच नाजूक होते आणि जर्रा कुठे काही बाहेरचे खाल्ले तर लगेच बिघडू शकते...त्यामुळे आठवड्यातून एकदा गाडीवर वडापाव खातो...बनवणारा ओळखितला आहे त्यामुळे पदार्थांची क्वालिटी उत्तम अस्ते
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 07/13/2015 - 09:09 नवीन
हा माझ्या मते अतिशय चुकीचा विचार आहे. बाहेरचं न खाल्यामुळे पोट नाजूक होत नाही. खाल्यामुळे होतं. त्यामधल्या जंतू मुळे होतं. बाकी तसं नसतं तर गटारीचं पाणी डायरेक्ट पिवून पोटं एकदम 'तयार' व्हायला हवं होतं. डागदर लोकांनी या गोष्टीवर प्रकाश पाडला तर बरं हुईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 09:30 नवीन
खिक्क...हे पण ब्रोब्र आहे...डॉक्टरांनाच लिहूदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ख
खटपट्या Mon, 07/13/2015 - 09:12 नवीन
कुठे रे कुठे ? आमालाबी बोलव की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 09:29 नवीन
माझ्या सोसायटीच्या समोरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 07/13/2015 - 11:04 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Mon, 07/13/2015 - 09:30 नवीन
सावकाशीने एक धागा काढतो सविस्तर माहितीसह.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 07/13/2015 - 13:17 नवीन
वेटिंग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्वप्नांची राणी Mon, 07/13/2015 - 20:32 नवीन
वेटिंग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/13/2015 - 20:43 नवीन
उद्या टाकतो .
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Wed, 07/15/2015 - 08:54 नवीन
मद्यपान करताना बर्फ टाळावा, तो कुठल्या पाण्याचा असतो सांगता येत नाही. होय चांगली किंवा फार चांगली दारू प्यावी आणि शकतच किंवा सिंगले मालत असेल तर " नीट " प्यवि. खाणे खराब असेल तरी चांगली खरी दारू खराब असल्याचे कधी हि आढळले नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा