Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशभक्ती आणि स्वार्थत्याग

म
मंदार कात्रे
Sun, 07/19/2015 - 06:22
🗣 141 प्रतिसाद
नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे ..... चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

प्रतिक्रिया द्या
34675 वाचन

💬 प्रतिसाद (141)
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/21/2015 - 08:57 नवीन
+१०० थोडक्यात पण सारासार विवेकावर आणि सत्य वस्तुस्थितीवर आधारलेला प्रतिसाद. सैन्याविरुद्ध बोलणार्‍या लोकांना सद्या पाकीस्तानने आपल्या सीमेवर चाललेल्या गोळीबारात दोन दिवस रहायला लागले तर (कदाचित) मतबदल होईल. अन्यथा, "जगातले सगळे कसे सत्वशील माणसे बनली पाहिजेत/आहेत." असा विचार सैन्याच्या संरक्षणात सुखाने आपल्या ऑफिसात किंवा घरात बसूनच सुचू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 07/20/2015 - 07:18 नवीन
मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी?
बिझनेसमनचे माहित नाहिउ पण राजकारण्यांची मुले/नातेवाईक मारली गेली आहेत युद्ध्द्दात. १. इस्राइलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भाऊ युगांडातील प्लेन हायजॅक ऑपरेशन मध्ये मारला गेला. स्वतः नेतान्याहू सैन्यात होते तेच पुढे पंतप्रधान झाले. यितजॅक रबीन पण सैन्यात होते.ते पुढे पंतप्रधान झाले. २. मिन्नेसोटा राज्याच्या इराक युद्धाला विरोधी सिनेटर बेकी लॉरी यांचा मुलगा इराक युद्धात मारला गेला. ही गोष्ट २००५ मधील. त्यावेळी मी मिनिअ‍ॅपोलिसवरून डुलुथला जात होतो आणि आय-३५ वरून चुकून मिन्नेसोटा राज्य हायवे-२३ ला लागलो. हा रस्ताही शेवटी डुलुथलाच जात असल्यामुळे यू-टर्न घेऊन परत यायच्या भानगडीत पडलो नाही. त्यावेळी बेकी लॉरी यांच्या केरीक या गावावरून गेलो होतो. ते गाव म्हणजे भारतातील गावातील एक चौक असावा इतके मोठे आहे.तरी तिथे त्या दिवशी अनयुज्यली जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिकही लागला.नंतर कारण कळले. ३. साऊथ डाकोटाचे सिनेटर टिम जॉनसन यांचा मुलगा इराक आणि अफगाणिस्तानातही लढायला होता.त्याच्या सुदैवाने तो मारला गेला नाही आणि अजूनही तो सैन्यात आहे. ४. बुश सरकारमधील कायदामंत्री जॉन अ‍ॅशक्रॉफ्ट यांचा मुलगाही सैन्यात होता आणि तो इराक वॉरमध्ये होता. मला वाटते की जॉन मॅककेन यांचा मुलगाही सैन्यात आहे आणि तो इराक वॉरमध्ये होता. जॉन मॅककेन हे तर २००८ मध्ये अध्यक्षपदासाठीचे उमेदवार होते. आणि ही सगळी उध्दारणे अमेरिका-इसराएलमधील श्रीमंत देशातील आहेत. त्यामुळे गरिबी असल्यामुळे लोक सैन्यात जातात आणि मरायला गरीब पुढे असतात आणि श्रीमंत-इन्फ्युएन्शिअल लोक मागे असतात हा हायपोथिसिस ९५% कॉफिडन्स लेव्हलवर रिजेक्ट करता येईल असे वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 08:46 नवीन
९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-) असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 07/20/2015 - 08:53 नवीन
९५% कॉन्फिडन्स लेव्हलला नॉर्मल डिस्झ्ट्रीब्युशनच लागते असे थोडीच आहे? स्टुडन्त टी, काय-स्क्वेअर, एफ सगळ्यांना ९५% कॉन्फिडन्स लेव्हल चालते :) तुमचाच मुद्दा-- गरीबांपुढे पर्याय नसतो म्हणून ते सैन्यात मरायला जातात याविरूध्द श्रीमंत देशातील उदाहरणे दिली आहेत. (एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 08:57 नवीन
माझा मुद्दा: जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा अर्थः फक्त गरीब लोकच सैन्यात जातात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
म
मृत्युन्जय Mon, 07/20/2015 - 09:08 नवीन
नाही ननि तुमचा मुद्दा असा नव्हताच. हे तुमचेच वाक्य आहे ना?:
एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 09:53 नवीन
होय. त्यातला प्रतिष्ठेचा भाग का गाळता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 07/21/2015 - 07:32 नवीन
अजिबात गाळत नाही आहे. पण तुमचा मुद्दा "जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही." असा नव्हता हे सांगायचे होते, शिवाय उत्तम सांपत्तिक परिस्थिती आणि करण्यासारखी इतर अनेक प्रतिष्टेची कामे सोडुन सैन्यात गेलेले ढिगाने लोक माहिती आहेत (त्यातला एक शाळेतला जवळचा मित्र जो शाळेत असल्यापासुन सैन्यात जाण्याच्या ध्यासाने पछाडलेला होता आणि त्यात केवळ देशसेवा हाच उद्देश होता) . त्यामुळे केवळ पैसा आणी प्रतिष्ठेसाठी लोक सैन्यात जातात हा मुद्दा संपुर्णतः अमान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
L
lakhu risbud Wed, 07/22/2015 - 10:30 नवीन
या मुद्द्या च्या अनुषंगाने डॉ खरे, सोन्याबापू आणि रणजीत चितळे यांची मते जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 08:59 नवीन
कोणते डिस्ट्रीब्युशन लावले ते सांगू शकाल काय? (हौशी स्टॅटिस्टिक्स वाचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 08:47 नवीन
९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-) असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ज
जयंत कुलकर्णी Sun, 07/19/2015 - 14:18 नवीन
कुठल्याही माणसाला पोटासाठी कुठलातरी व्यवस्या करणे भागच असते. प्रश्न आहे तो एखादा व्यवसाय स्वीकारल्यावर तुम्ही तो किती निष्ठेने पार पाडताय तो. भारतीय सैनिक अजून तरी तो निष्ठेने पार पाडतो आहे असेच म्हणावे लागेल... अर्थात जर जरुर पडली तर मात्र प्रत्येक तरुण सैन्यात भरती होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही... जर भरती झाले नाहीत तर दुसरे मार्ग सरकारकडे असतातच....
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/19/2015 - 14:47 नवीन
देशभक्ती आणि स्वार्थत्याग हे शब्द फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसाठी राखीव आहेत. इतर दिवशी त्यांचा उच्च्चार करण्याचे कारणच काय ? युद्ध जिंकायचे असल्यास एसएमएस स्पर्धा घ्यावी किंवा फेसबुकच्या 'वुई लव्ह इंडीया' पेजेसला जास्तीत जास्त लाईक्स द्यावात. देशभक्तीपर मेसेज व्हॉटअपवर फॉरवर्ड करावेत, वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर तज्ञांच्या कंठाळी चर्चा आयोजीत कराव्यात. लैच खाज असेल तर शत्रुराष्ट्राच्या शासनाची संकेतस्थळे हॅक करुन त्यावर आपला राष्ट्रध्वज फडकावावा. प्रत्यक्ष लढाई कशाला करायची ?
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Sun, 07/19/2015 - 17:24 नवीन
मला एक मौल्यवान शंका आहे. सैन्यभरती हा आजचाच इशू नाही. पूर्वीही राजे महाराजे सुल्तान छत्रपती सैन्यभरती करायचे व त्यात सैनिक मरायचे. अनेक महाराजांचे / सुलतानांच आजचे वारस अतीश्रीमंत , जमीनदार व पतदार आहेत. पण त्यांच्यासाठी लढलेले व मेलेले जे लोक होते , त्यांचे वारस आज काय्करतात ? इतिहासात शहीद झालेल्यांचे आजचे वारस यावर एखादा धागा काढून माहिती गोळा होऊ शकेल का ? संकटे व संपत्ती यांचे विभाजन इतिहासात अतीविषम प्रमाणात झाले आहे का ?
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sun, 07/19/2015 - 19:10 नवीन
सगलायंची देशभक्ती क्रिकेट match मधेच दिसते आपण तरी काय करणार
  • Log in or register to post comments
व
विद्यार्थी Sun, 07/19/2015 - 19:40 नवीन
संकट काळ हा खरच देशभक्ती जागवणारा काळ असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाची झालेली आर्थिक प्रगती आणि लोकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे भारतीय तरुण भौतिक सुखवादी झाले आहेत असा भास निर्माण झाला असेल कदाचित. पण त्याच्या रक्तात असणारे भारतीयत्व आणि देशाभिमान याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. कोणतीही युद्धजन्य परीस्थिनी नसतानाही चांगल्या घरातील सुखवस्तू आयुष्य सोडून सैन्यात भारती होणारे तरुण मी पुण्या मुंबई मध्ये पहिले आहेत. जर का कधी युद्धाची वेळ आलीच तर भारतीय लष्कराला सैनिकांची कमतरता पडेल असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/19/2015 - 22:41 नवीन
ज्जे बात. आवडला प्रतिसाद! काही लोकांना सतत नकारात्मक बघायची सवय झाली आहे. हा त्यांचा स्वतःचा दोष नाही. वृत्तमाध्यमांनी त्या पद्धतीने विचार करायची सवय लावली आहे. ही वृत्तपत्रे अगदी त्या लोकांसारखी आहेत ज्यांना पाण्यावर चालणारा कुत्रा दाखवला तर म्हणतात अरेरे ह्या कुत्र्याला पोहता येत नाही बघा. जगात काही चांगलं घडतच नाही, सतत वाईटच घडत असतं असा कुणाचाही समज होईल अशा पद्धतीने वृत्तपत्रे आपल्याकडे बातम्या देत असतात. त्यामागे खूप गुंतागुंतीचे अर्थ-राजकारण आहे. ते एक असो. सुज्ञ माणसाने फार सावध राहिलं पाहिजे. सैनिकांबद्दल बोलण्याआधी थोडी माहिती तरी घ्यावी. लष्करात लोक भाकरीसाठीच जातात, गरिब असतात म्हणून जातात हा सैनिकांचा सरळ सरळ अपमान आहे. सैन्यभरतीसाठी तयार व्हायला सकाळी ४ वाजता उठून व्यायाम व इतर मेहनत करणारे बघितले आहेत. त्यांच्यात जोष असतो, उर्जा असते. काहितरी करून दाखवायची धमक असते. ही मुले म्हटलं तर सहज गुन्हेगारीकडे वळू शकतात आणि कुणाचाच बाप त्यांना मग रोखू शकणार नाही. ते योग्य मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आयुष्याला काही तरी महान अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गरीब म्हणून हिणवणे मला तरी खूप जास्त खटकले आहे. जगात आपणच फार तीर मारतोय अशी संकल्पना असणार्‍या लोकांनी सैनिकांबद्दल बोलतांना तरी तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा आहे. बाकी भ्रष्टाचार करतच नाही असा कुणी सापडणे भारतात तरी शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्यार्थी
म
माहितगार Mon, 07/20/2015 - 06:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ल
लिओ Sun, 07/19/2015 - 21:04 नवीन
पानसिंग तोमर चित्रपटातील दृश्य डाकु पानसिंग:- मैंने पदक जीता तब मुझे किसी ने नही पुछा. डाकु बना तो .................. हि प्रतिष्ठा ????????????????? उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्रीचे वंशज आज भाडयाच्या घरात राहतात ( वाचलेली बातमी) माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी (माजी भारतीय पंतप्रधान) राजकारणात येण्याआधी एक पायलट म्हणून नोकरी करत होते ? () घरत
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 07/19/2015 - 23:15 नवीन
१. सैन्यात भरती होणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यातील धोके, फायदे, तोटे ह्याचा विचार करूनच उमेदवार सैन्यात भरती होतो. त्यामुळे त्याचे सैन्यात भरती होणे हे काहीतरी भलतेच भव्यदिव्य आहे असा समज करून घ्यायचे कारण नाही. कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात. देशातील प्रत्येक नागरिक सैन्यात भरती झाला तर देशाचे दिवाळे निघेल. २. एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक हा सैन्यात भरती न होता कितीतरी जास्त देशसेवा करू शकतो. सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. अण्णा ह्जारे सैन्यात कोण होते? एक साधे सैनिक. बाहेर पडल्यावर कितीतरी मोठे समाजसेवक बनले आहेत. ३. सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे. ४. आधुनिक काळात युद्ध हे पूर्वीसारखे लढले जाणार नाही. अत्यंत विध्वंसक शस्त्रे शेकडो मैल अंतरावरून डागता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईचे प्रमाण कमी कमी होत जाणार. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे. एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 07/20/2015 - 00:50 नवीन
माझे मत थोडे वेगळे आहे: (प्रस्तुत प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उत्तर असला तरी वैयक्तिक हुप्प्या या सदस्यास नसून अशी विचारसरणी असलेल्या प्रत्येक वाचकासाठी आहे) १. सैन्यात भरती होणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यातील धोके, फायदे, तोटे ह्याचा विचार करूनच उमेदवार सैन्यात भरती होतो. त्यामुळे त्याचे सैन्यात भरती होणे हे काहीतरी भलतेच भव्यदिव्य आहे असा समज करून घ्यायचे कारण नाही. >> मी समजा तुम्हाला म्हटले की प्रचंड वेगाने जिथून गाड्या सुसाट जात असतात अशा स्पॉटवर तुम्ही रोज शांतपणे १२ तास उभे राहा. जीवंत राहिलात तर रोज (*) रुपये व जेवन मिळेल, तर तुम्ही उभे राहाल? पैसे मिळतायत म्हणून तुम्ही हे करायला तयार व्हाल? फक्त पैसे मिळतात म्हणून कुणी सैन्यात जात नाही. तेवढे पैसे मिळवायला जीव धोक्यात न घालता करता येणारी कामही देशात उपलब्ध आहेत. (* : तुम्हाला जो आकडा आकर्षक वाटेल तो) कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात. देशातील प्रत्येक नागरिक सैन्यात भरती झाला तर देशाचे दिवाळे निघेल. >> 'कितीही गमजा केल्या तरी' म्हणजे काय? कोण करतंय गमजा? हे जेवढे काही पैसे लागतात ते सैनिकांचे चोचले पुरवायला दिलेले नसून देशाच्या रक्षणावर खर्च करण्यासाठी असतात. त्यामुळे करदाते पैसे देतात तर उपकार करत नाहीत. सैनिक देशावर उपकार करतो. सीमेवर मस्त टेन्ट लावून कॅम्पफायर करून देशाच्या पैशाची दारू प्यायला जात नसतो. देशाचे रक्षण करतो. देशाचे रक्षण करायची गरजच नसल्यास तसे सांगावे. कुणीही शून्य डीग्रीखाली हातापायाचे बोटे सडतील अशा थंडीत, मरण केव्हाही येईल अशा परिस्थितीत फक्त पोट भरायला मिळतं म्हणुन जात नसतो. इतकं काय कष्टाचं काम नाही आहे असं वाटत असेल तर कुणीही फक्त रोज सकाळी चार वाजता उठून चाळीस किलोमीटर पळायला जावे न चुकता. आणि नंतर ८ तास एकाच जागी न हलता उभे राहावे. ते करायची तयारी नसेल तर किमान प्रहार सिनेमा आणि सोन्याबापु यांची मालिका वाचावी. एवढे रोज किमान दहा वर्षे केले तरी माझ्या मते भव्य दिव्य काम होईल. आजकाल 'करदात्यांचे पैसे' हा वाक्प्रचार 'उचलली जीभ लावली' टाळ्याला पद्धतीने वापरला जातोय. अभ्यास वाढवा. लष्कराला जेवढी गरज असते तेवढीच भरती होत असते. जे पात्र आहेत तेच निवडले जातात. कठोर परिश्रमाला घाबरून पळून जाणार्‍यांची गय केली जात नाही. सैन्य म्हणजे अन्नछत्र आहे अशी काहीशी तुमची धारणा दिसते. म्हणून प्रत्येक उपाशी, भिकारी, आळशी, गरीब लष्कराच्या दरवाज्यावर रांग लावून उभा असल्याचं चित्र रंगवत आहात. २. एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक हा सैन्यात भरती न होता कितीतरी जास्त देशसेवा करू शकतो. सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. अण्णा ह्जारे सैन्यात कोण होते? एक साधे सैनिक. बाहेर पडल्यावर कितीतरी मोठे समाजसेवक बनले आहेत. >> सैन्य खडं पहारा देत असतं म्हणुन वर उल्लेखलेले महान लोक शांतपणे आपली कामं करू शकतात. कुठूनही गोळी येऊन त्या कल्पक डोक्यात घुसण्याची शक्यता असते त्या वातावरणात कितपत देशसेवा होते ते बघणं कुतूहलाचं असेल. अशा महान देशबांधवांचा जीव वाचवणं यापेक्षा मोठी आणि महत्त्वाची देशसेवा काय असते बुवा? आणि कुणी सांगितलं, सैन्यात वरील गुणांना वाव नसतो? कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक मिळाले आहेतच की सैन्यातून. सैन्यपश्चात आयुष्यात त्यांना सैन्यशिस्तीचा आपली कौशल्ये अधिक समर्थपणे वापरतांना फायदाच झाला आहे. भ्रष्टाचारासाठी नाटकी उपोषणं करण्यापेक्षा संकटकाळी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन आजवर लाखो लोकांचे जीव वाचवले आहेतच की सैनिकांनी. (म्हणा 'ही तर त्यांची ड्युटीच आहे'.) त्या पोकळ उपोषणबाजीने काय फरक पडलाय तसा तरी (अनुयायांचे खिसे भरण्याखेरीज)? निदान सैनिकांनी ज्यांचे प्राण वाचवले त्यांना तर थेट फायदा झाला ना? ज्यांना जे जमतं त्याद्वारे त्यांनी देशसेवा करावी. कुणाला जबरदस्ती केली नाहीये की असशील तू महान संशोधक, ते सोड आणि इथे बंदूक घेऊन उभा राहा रोज १६-१६ तास काहीही दुसरं न करता. ३. सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे. >> वरील वाक्यात 'सैन्यात' हा शब्द काढून कुठल्याही व्यवसायाचे नाव टाका. पुढचं सगळं जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी दिसेल. ४. आधुनिक काळात युद्ध हे पूर्वीसारखे लढले जाणार नाही. अत्यंत विध्वंसक शस्त्रे शेकडो मैल अंतरावरून डागता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईचे प्रमाण कमी कमी होत जाणार. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे. >> ऐकीव माहितीवरलं ठोकीव विधान. युद्धकलेमधे हजारो वर्षांपासून उत्क्रांती होत आली आहे, कुठल्याही काळात कुठलंच युद्ध त्या काळाच्या पूर्वीच्या काळासारखं लढलं जात नसतं. दहशतवादीही प्रत्येकदा वेगवेगळी तंत्र आणि ठिकाणं निवडतात. तळहातावर शीर घेऊन लढणारे लोक नसतील तर जगात प्रत्येकालाच तळहातावर शीर घेऊन जगावे लागेल. आणि मग सैनिक काय असतो ते कळेल. विध्वंसक शस्त्रे ही फक्त काल्पनिक भीती आहे. आजही हजारो छोट्या-मोठ्या चकमकींमधे रोज कित्येक देशांचे जवान आपले बलिदान देत आहेत. कुठे आहेत ती आधुनिक शस्त्रे आणि युद्धतंत्रं? इथेही म्हणतो अभ्यास वाढवा. एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते. >> परत एक टाळ्याखाऊ पण पोकळ वाक्य. वर उल्लेखलेले महानुभाव निपजायला देशात शांतता लागते, त्यासाठी सार्वभौमत्व लागतं, ते टीकवण्यासाठी मनगटात जोर लागतो. तो जोर म्हणजे सैन्य. सैनिकांचं राहू दे एकवेळ बाजूला, तुमच्या लॉजिकनुसार पोलिस, सिक्युरिटी गार्ड, वॉचमन ह्यांची तरी समाजाला काय गरज आहे? नाही का? कुलुपाची किंमत तिजोरीतल्या संपत्तीपेक्षा अधीक मौल्यवान नसते. पण जोपर्यंत कुलूप असतं तोवरच त्या संपत्तीला अर्थ असतो. आपलं सैन्य उच्चप्रतीचं मनोधैर्य आणि अढळ संयम बाळगून देशातल्या लोकांना हवे ते उच्छाद करू देतं म्हणून असली मुक्ताफळं उधळण्याचं आपल्याला सुचतं. स्वत:चं सैन्य नसणारे देश जगात आहेत पण त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कुठल्यातरी राष्ट्रांनी घेतलेली आहेच. हे असं का असावं आणि याचे परिणाम काय असतात हे आपल्या ठावूक असेलच अशी अपेक्षा आहे. सैनिकाचं आयुष्य हे रोमँटीसीझमसारखं रंगवलं जातं असा आक्षेप असेल तर सैन्यविहिन सुरक्षित देश हा ही रोमँटीसीझमच आहे. (जाता जाता: जगातलं प्रत्येक प्रोफेशन कसं वाईट्टच आहे हे मी सहज पटवून देऊ शकतो म्हणून ते समूळ वाईट्टच आहे असे नसतं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 02:37 नवीन
सरकारच्या उत्पन्नापैकी १०-१५% भाग सैन्यदलावर खर्च होतो; पण गंमत म्हणजे हेच सैनिक सिव्हिलियन लोकांना हीन लेखतात किंवा अपमानास्पद उल्लेख करतात ते चालतं. बापूसाहेबांच्या लेखमालेतल्या पहिल्याच लेखातही मला हेच खटकलं होतं. त्या अमिताभ बच्चनच्या मेजरसाब का कायते नाव असलेल्या चित्रपटात तो इतक्या वेळा "ब्लडी सिव्हिलियन्स" म्हणतो की उठून एक थोतरीत द्यावीशी वाटते. मुळात सैनिक लोक उपकार वगैरे करताहेत ही भाषा एका मर्यादेपर्यंत (सैन्याचे मनोबल का काय ते टिकवायला) ठीक आहे पण सध्या जरा अतिरेकच होत चालला आहे. सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे आणि नंतर मस्त नाश्ता खाणे हे बहुसंख्य सामान्य माणसांना इच्छा असूनही करता येत नाही; त्यांच्या नशिबी रोजच्या कामाची चिंताच असते; त्यामुळे त्याला आत्यंतिक कष्ट वगैरे म्हणू नये. मुळात देशासाठी म्हणजे कोणासाठी याची चर्चा व्हायला पाहिजे एकदा. देशाच्या सकल उत्पन्नापैकी २५% उत्पन्नाची मालकी फक्त १०० लोकांकडे आहे. तितकेच किंवा त्याहूनही जास्त धन गुप्तपणे मूठभर राजकारण्यांच्या मालकीचे असेल. मग नक्की कोणाच्या संपत्तीचे संरक्षण होते आहे? बाकी प्रसंगी हे सैनिक लोक किती उपद्रवी ठरु शकतात हे नगरला लष्करी तळ असल्याने अनेकदा पाहिलेले आहे आणि कायकाय भ्रष्टाचार चालतो त्याच्या सुरस कथाही ऐकलेल्या आहेत. त्यामुळे अतिग्लोरिफिकेशन झाले की त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बॅटमॅन Mon, 07/20/2015 - 19:53 नवीन
मिल्ट्री ही पवित्र गाय झालेली आहे. मिलिटरीबद्दल काहीही बोलले तर बोलणारे देशद्रोही ठरतात. इतक्या गफ्फा मारणारे हे मिल्ट्रीम्यान लोक्स सबॉर्डिनेट लोकांना कसा त्रास देतात- विशेषतः सीआरपीएफ डिव्हिजन मध्ये- याबद्दल एक भयाण लेख आला होता. त्या वेळेपासून तर असे शब्दप्रयोग अतिशयच डोक्यात जाऊ लागले आहेत. कोणी कुणावर उपकार करत नाहीये इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नाखु Tue, 07/21/2015 - 05:33 नवीन
तू सुद्धा ! एखाद्या प्रसंगावरून सगळ्या सैन्यदलाचे एकाच तागडीत मूल्यमापन का केलेस कळू शकेल काय ? अंतर्गत राजकारण वगैरे जाऊ दे पण किमान ती नोकरी (जीचे परीणाम स्व्च्छ आणि स्पष्ट दिसत असूनही स्वेच्छेने आणि मेहनतीने (कठोर परीश्रमाने) मिळवलेली असते !! तू तारतम्य्प्रतीवादी असल्याने लिहिले आहे आधिक उणे क्षमा पण सैनिकांची गरज+मदत अंतर्गत बाबींसाठीही घ्यावी लागणे हे बेफिकीर्/ढिसाळ्/कर्तव्यापासून पळणारे/आत्मकेंन्द्री मुर्दाड समाजामूळेच आहे, आणि तू मी सर्व मिपाकरही आलोच.(ज्या प्रगत देशांचा उल्लेख वर आला आहे तिथे किमान नाही तर कमाल सावधानता/सतर्कता/कायदा पालन केले जाते आणि ऊठ सूट सैनिकांना पाचारण करावे लागत नाही)
गेल्या २०-२५ वर्षांमधील अतिरेकी/नक्शलवादी कारवायांमध्ये मरण पावलेल्यां सैनिकांची संख्या+कारणे निलाखस खोटी आहेत का असे हिरीरीने प्रतीवाद करणार्यांसाठी लघु प्रश्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/21/2015 - 09:17 नवीन
सैन्यात असल्यामुळे अख्ख्या समाजाला झोडण्याचा मॉरल हक्क आपल्याला मिळाला आहे अशा थाटात जे बरळतात त्यांच्यासाठी तसे मुख्यतः म्हटलेले आहे. आणि वैसेभी, दोघांना गरज असते. बिगरलढाऊ लोकांना आपली संपत्ती वगैरे रक्षण करायला म्हणून फुलटाईम लढाऊ लोकांची गरज असते, पण हे लढाऊ लोक हवेतून पैदा होणार नसल्यामुळे पैसे वगैरे देऊन, काही सोयीसवलती देऊन त्यांना तयार करावे लागते. शिवाय सैनिक हेही समाजाचाच भाग आहेत, ते कै आभाळातून पडलेले नाहीत. त्यांनाही त्यांची शेतीवाडी आहे, घरचे आहेत. फक्त इतरांवर उपकार म्हणून ते लढत नसतात. पर्यायाने स्वतःसाठीही ते लढतात असे म्हणायला नक्कीच स्कोप आहे. अवलंबित्व दोन्ही बाजूंनी असताना फक्त एकाच बाजूच्या अवलंबित्वाचा किती गजर करायचा त्याला काही लिमिट आहे की नाही? हे 'ब्लडी सिव्हिलियन्स' वगैरे शब्दप्रयोग त्यामुळेच डोक्यात जातात. मिलिटरीबद्दल सिव्हिलियन्सना जनरली किती आदर आणि कौतुक असते ते पाहता आपणच भरलेल्या टॅक्समधून ज्यांना सोयीसुविधा मिळतात त्यांनी असा माज करावा हे मला अपमानास्पद वाटते. तुम्हांला वाटत नसेल तर न वाटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ह
हुप्प्या Mon, 07/20/2015 - 04:06 नवीन
( हा प्रतिसाद संदीप डांगे ह्या व्यक्तीकरता नसून गुडघ्यात मेंदू असणार्‍या तमाम सैन्यभक्तांना उद्देशून आहे!) >> मी समजा तुम्हाला म्हटले की प्रचंड वेगाने जिथून गाड्या सुसाट जात असतात अशा स्पॉटवर तुम्ही रोज शांतपणे १२ तास उभे राहा. जीवंत राहिलात तर रोज (*) रुपये व जेवन मिळेल, तर तुम्ही उभे राहाल? पैसे मिळतायत म्हणून तुम्ही हे करायला तयार व्हाल? फक्त पैसे मिळतात म्हणून कुणी सैन्यात जात नाही. तेवढे पैसे मिळवायला जीव धोक्यात न घालता करता येणारी कामही देशात उपलब्ध आहेत. (* : तुम्हाला जो आकडा आकर्षक वाटेल तो) << असल्या बिनडोक उदाहरणाबाबतचे उत्तर आहे की, ह्या निर्बुद्ध कामाचा समाजाला उपयोग काय आहे, ह्याकरता कोण आणि का पैसे देतो आहे असे उचित प्रश्न मी विचारीन. माझे शिक्षण, माझी कुवत, माझ्यापुढे उपलब्ध असणारे पर्याय ह्यांचा विचार करुन मगच मी निर्णय घेईन. >> 'कितीही गमजा केल्या तरी' म्हणजे काय? कोण करतंय गमजा? गमजा म्हणजे बढाया, घमेंडखोरी वगैरे. साधारण सैन्याचे उदात्तीकरण करणारे त्यांची भव्यदिव्य शस्त्रे, अस्त्रे, विमाने, रणगाडे ह्यांचे उदात्तीकरण करतात. आणि त्यामागे खर्चल्या जाणार्‍या प्रत्येक पैशाकरता करदाते जबाबदार आहे हे विसरले जाते. बापाच्या जिवावर एखादा लालभडक फ्रेरारी गाडी उडवतो आणि त्याचे सगळे कौतुक करतात त्याची आठवण होते. >> हे जेवढे काही पैसे लागतात ते सैनिकांचे चोचले पुरवायला दिलेले नसून देशाच्या रक्षणावर खर्च करण्यासाठी असतात. त्यामुळे करदाते पैसे देतात तर उपकार करत नाहीत. सैनिक देशावर उपकार करतो. सीमेवर मस्त टेन्ट लावून कॅम्पफायर ..... << मूर्ख विधान. करदाते म्हणजे लोक. लोक म्हणजे देशाचे मालक. सैनिक हे ह्या लोकांचे नोकर आहेत.ह्या नोकरांवर किती खर्च करायचा हे लोकांचे प्रतिनिधी म्हणजे लोकच ठरवतात. देशाचे रक्षण म्हणजे लोकांचे रक्षण. हे सैनिकांचे कर्तव्य आहे. एखादा बंगल्याचा मालक घराच्या सुरक्षिततेकरता रखवालदार ठेवतो तेव्हा त्याचा पगार वगैरे तोच देतो. संरक्षण दल हे ह्या बंगल्याच्या रखवालदारासारखे आहे. बंगला आहे म्हणून रखवालदार आहे. उलटे नाही. अनेक देश असे आहेत ज्यांत सैन्यदल नाही. अशा देशांचे काहीही अडलेले नाही. सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही. >> ऐकीव माहितीवरलं ठोकीव विधान. युद्धकलेमधे हजारो वर्षांपासून उत्क्रांती होत आली आहे, कुठल्याही काळात कुठलंच युद्ध त्या काळाच्या पूर्वीच्या काळासारखं लढलं जात नसतं. दहशतवादीही प्रत्येकदा वेगवेगळी तंत्र आणि ठिकाणं << उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ह्यातला प्रकार. आपण अभ्यास नक्कीच वाढवा. आधुनिक काळातील युद्धांकडे जरा बघा. अमेरिकेने इराक, अफगाणिस्तानवर हल्ले केले तेव्हा सर्वात जास्त आणि दीर्घकाळ चालणारा प्रकार म्हणजे ड्रोन हल्ले हा होता. आणि आता त्या प्रकाराचा सहभाग वाढत जाणार हे उघड आहे. आपल्यासारखे शहामृगी पद्धतीने वाळूत तोंड खुपसलेले लोक काहीही म्हणोत, आता हे नवे तंत्र वाढत जाणार आहे. अगदी दुसर्‍या महायुद्धापासून युद्ध लढणे ह्यात सैनिकाच्या शौर्याचा भाग कमी कमी होत चाललेला आहे. बर्‍याच वेळा युद्ध जिंकणे हे वरच्या अधिकार्‍यांच्या कुवतीवर अवलंबून असते. लढणारे सैनिक हे सामान्य प्यादी असतात. आपण ह्याविषयीचा अभ्यास वाढवावा ही कळकळीची विनंती. सैन्य हे नेसेसरी इव्हिल म्हणजे भारतासारख्या देशाकरता आवश्यक बोजा आहे. आवश्यक ते संरक्षण कमीत कमी खर्चात करता आले तर ते देशाच्याच हिताचे आहे. आज १००० कोटी खर्च होत असतील आणि उद्या तो खर्च ८०० कोटी इतका खाली आला तर देशाचाच फायदा आहे. तमाम सैन्यातील लोक हे तळहातावर शीर घेऊन सीमेवर लढत असतात असे बिनडोक, उथळ, बालिश विचार आपण बाळगून असाल तर धन्य आहात. सीमेवर नेमलेले सैनिक हे एकंदरीत सैन्यबळाच्या तुलनेत कितीतरी कमी असतात. नाविक दल, हवाई दल हे लोक कायमस्वरूपी धोक्याच्या छायेत नसतात. गेल्या ६८ वर्षात देश किती वेळ युद्धात होता? ५ वर्षे? कमीच असतील. अशी युद्धसदृश परिस्थिती फार कमी विभागात असल्यामुळे बढती वगैरे गोष्टीमागे राजकारण, वशिलेबाजी, हुजरेगिरी हे प्रमाण सैन्यात जास्त आहे. बाकी क्षेत्रात जिथे खरोखर काही करुन दाखवायचे असते तिथे ह्या गोष्टी तुलनेने कमी असतात. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, लॅरी पेज, धीरूभाई अंबानी ह्यांचे समाजाकरता योगदान आणि फील्ड मार्शल माणेकशॉ, पॅटन, करिअप्पा ह्यांचे योगदान ह्यात मलातरी पहिला गट जास्त उजवा वाटतो. आणि भारतात तसा कुणीतरी निघावा असे आवर्जून वाटते. माणेकशॉ नसला तरी काही अडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
dadadarekar Mon, 07/20/2015 - 04:20 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/20/2015 - 20:40 नवीन
सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही. पाकिस्तान आर्मी किंवा आय एस आय पैकी कोणू मिपा वाचत असले तर त्या संघटना हे वाक्य सुवर्णाक्षरात लिहून त्यांच्या मुख्यालयावर लावतील. बाकी चालू द्या. स्वखर्चाने पोपकोर्ण आणि पेय घेऊन मोक्याची खुर्ची पकडून बसलो आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आनन्दा Wed, 07/22/2015 - 11:30 नवीन
वैद्यकीय व्यावसायिक पण असेच पैसे घेऊन "सेवा" देत असतात. जरा त्यांच्यावरपण ४ शिंतोडे उडवून बघा काय होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
च
चलत मुसाफिर Mon, 07/20/2015 - 04:17 नवीन
हुप्प्या आणि संदीप डांगे यांचे प्रतिसाद आपापल्या जागी योग्यच आहेत. परंतु सत्य हे कुठेतरी दोहोंच्या मध्ये असावे. 1. सेना ही देशाची एक अपरिहार्य गरज आहे. उदात्तीकरण करा अथवा करू नका, पण खड्या सैन्याशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी अनुपलब्ध आहे. केवळ हवाई व क्षेपणास्त्र हल्ले चढवून युद्ध जिंकणे हे अमेरिकेव्यतिरिक्त कुणालाही शक्य नाही. 2. सेनेचे उदात्तीकरण हे सैनिक नव्हे तर सैनिकेतर नागरिकच जास्त करतात. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सैनिकाचे मनोबल राखणे, जे सैनिक नाहीत (वा होऊ इच्छित नाहीत) त्यांना देशभक्तीदर्शनाचा अवसर उपलब्ध करणे, देशभक्तीपर वातावरण तयार होऊन सरकारचे कार्य सुलभ होणे असे अनेक मुद्दे त्यात येतात. 3. सेना ही शांतिकालात आपली योग्यता दाखवू शकत नाही. मात्र युद्धाला सदैव तत्पर असणे हे अत्यंत अवघड कार्य आहे. शारीरिक व्यायाम हा एकच भाग सामान्य समाजाला दिसतो व समजतो. त्यापलीकडे होणारा सखोल व निरंतर युद्धाभ्यास हा दिसत नाही आणि दिसणे योग्यही नाही. युद्ध हे अतिशय नृशंस आणि रक्तपिपासू असते. तिथे भारतीय सैनिक प्राणाची पर्वा न करता (आणि राजकारण, सरकारी भ्रष्टाचार, जातिभेद, भाषाभेद याचा फालतू विचार न करत बसता) स्वतःला लक्ष्यप्राप्तीकरिता झोकून देत असतो हे अनेकदा दिसून आलेले आहे. 4. सेना ही समाजाचाच भाग असल्यामुळे समाजाचे सर्व गुणदोष सैनिकांत परावर्तित होणे क्रमप्राप्त आहे (उदा. आजही भूदलात जातिविशिष्ट तुकड्या आहेत). पण सेनेमध्ये केवळ हूकूम देऊन काम होत नाही. अधिकारी हा सैनिकाइतकाच, किंबहुना सैनिकाहून अधिक कुशल, तत्पर आणि कर्तव्यपरायण असावा लागतो. राजकीय नेत्यांची मर्जी राखून वर चढणे सैन्यात शक्य नसते. विशेषतः 1962च्या शोकांतिकेनंतर धडा घेऊन राजकीय वर्गाने सेनेला राजकीय हस्तक्षेपापासून बरेचसे मुक्त ठेवले आहे. शिवाय, शत्रूला लाच देऊन युद्ध जिंकता येत नाही हे सैनिकाला माहिती असते. फलस्वरूप, सेनेत भ्रष्टाचार फार कमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
माहितगार Mon, 07/20/2015 - 06:26 नवीन
बहुतांश सहमत, सैन्यदलांच्या कौतुकामागे उदात्तीकरणापेक्षा आभार आणि सैनिकाचे मनोबल राखणे या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. अनेक युद्ध सैन्याच्या मनोधैर्यावर जिंकली जातात. आणि सुयोग्य नेतृत्वाच्या अभावी मनोधैर्य खचल तर युद्ध हारली सुद्धा जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
म
माहितगार Mon, 07/20/2015 - 06:30 नवीन
कुणाच्याही चांगल्या कार्याचे कौतुक करून जीवलावून जी लॉयल्टी मिळवता येते, मनांचे खच्चीकरणकरून ती लॉयल्टी मिळवता येत नाही. मग तुमच्यासाठी कामकरणारा कुठल्याही क्षेत्रातला असू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अर्धवटराव Mon, 07/20/2015 - 06:08 नवीन
थर्डक्लास प्रतिसाद.
कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात.
सैन्य सीमेवर खडं आहे म्हणुन लोकांना आपले पोट भरण्यासाठी उद्योग करायची निवांतता लाभते.. आणि कर भरण्याची देखील.
एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक,...
परत तेच कल्पकता, औद्योगीक स्कील्स दाखवायला मूळात जीवंत आणि स्वतंत्र असणं आवश्यक असतं.
सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.
सैन्यदलाची उपयुक्तता आणि काठीण्य त्यामुळे यत्किंचीतही कमी होत नाहि.
तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.
दररोज आतंकवाद्यांशी हातघाईचा मुकाबला करायला लागणार्‍या सैन्याबद्द्ल त्याच देशातले लोक असे दळभद्री विचार बाळगतात. वाचुन अत्यंत हर्ष झाला.
एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.
इतर रेषा मोठ्या दाखवण्याच्या नादात आपण कुठली रेषा छोटी करतोय याचं काहि तारतम्य?? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सुबोध खरे Mon, 07/20/2015 - 06:31 नवीन
पाच-दहा हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतील "प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक" सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे. सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे आणि नंतर मस्त नाश्ता खाणे हे बहुसंख्य सामान्य माणसांना इच्छा असूनही करता येत नाही; त्यांच्या नशिबी रोजच्या कामाची चिंताच असते; त्यामुळे त्याला आत्यंतिक कष्ट वगैरे म्हणू नये. अनेक देश असे आहेत ज्यांत सैन्यदल नाही. अशा देशांचे काहीही अडलेले नाही. सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही. अगदी दुसर्‍या महायुद्धापासून युद्ध लढणे ह्यात सैनिकाच्या शौर्याचा भाग कमी कमी होत चाललेला आहे. बढती वगैरे गोष्टीमागे राजकारण, वशिलेबाजी, हुजरेगिरी हे प्रमाण सैन्यात जास्त आहे. वाचून करमणूक झाली. अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 07:13 नवीन
डॉक्टरसाहेबांची करमणूक होणार हे माहितच होते. आर्मीवाले सिव्हिलियन्सना नावे ठेवतात किंवा (शस्त्रे घेण्यात उपयोगी पडेल असे) भरपूर परकीय चलन मिळवून देणार्‍या आयटी कर्मचारी व एनाराय लोकांना लोक नावे ठेवतात तेव्हा आमचीही अशीच करमणूक होते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/20/2015 - 08:32 नवीन
" भरपूर परकीय चलन मिळवून देणार्‍या आयटी कर्मचारी व एनाराय लोकांना " बाकी आम्हीच हुशार हे पाहूनही करमणूक झाली. पहिल्या पाचातहि नाही. http://www.business-standard.com/article/finance/india-s-forex-earnings-from-tourism-may-touch-26-bn-by-2015-assocham-113092600562_1.html With over $17 bn earnings, tourism has emerged as India's fourth biggest foreign exchange earner after exports of petroleum at $60.8 bn, gems and jewellery ($43.3 bn) and transport equipments ($18.3 bn), the chamber said. http://www.ibnlive.com/news/india/med-tourism-tipped-to-be-indias-top-forex-earner-by-2012-289970.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 07/21/2015 - 02:41 नवीन
एक्झॅक्टली. पहिल्या पाचात नाहीत म्हणजे हे काही कामाचे नाहीत ही वृत्ती दाखवलीत लगेच हे पाहून परत करमणूक झाली. :-) असो. हे भरकटत चाललंय आणि नक्की देश म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असलेल्या दिसत असल्याने उगाच उत्तरे-प्रत्युत्तरे करण्यात राम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 05:56 नवीन
माझे इतर प्रतिसाद पाहिलेत तर आपल्या लक्षात यायला हरकत नाही कि मी कुणालाही "कामाचे नाहीत" असे म्हणालो नाही. परंतु "आयटी वाले किंवा एन आर आय" "आम्हीच" परकीय चलन मिळवून देतो त्यामुळेच शस्त्रास्त्रे विकत घेता येतात हि टिमकी वाजवली. त्यावर वस्तुस्थिती(प्रत्यक्ष परकीय चलन कोण मिळवतो आणि कोण श्रेय उपटतो) म्हणून हि विदा दिली. डोळे उघडा आणि वस्तुस्थितीचा अंदाज घ्या. आणखी काय लिहिणे. राहिली गोष्ट लष्कराच्या उदात्तीकरणाची -- त्या उदात्ती कारणाचा लष्कराला किंवा त्यातील माणसाना पाच पैशाचा फायदा होत नाही.त्याचा फायदा फक्त त्याचा बाजार करणाऱ्या राजकारण्यांना होतो. कोरडा आदर काहीही उपयोगाचा नसतो हे निवृत्त झाल्यावर समजते. वैयक्तिक उदाहरणे भरपूर आहेत. एकच देतो. ज्या सोसायटीत मी लहानाचा मोठा झालो तेथे दवाखाना विकत घेण्यासाठी चाळीस महिन्याचा ग्रोस पगाराएवढी रक्कम मी भरली तेंव्हा सोसायटीने एक रुपया हि सवलत दिली नाही( त्याबद्दल तक्रारहि नाही). परंतु सोसायटीच्या लोकांना उपचारात सवलत किती हा प्रश्न मात्र प्रत्येकाने आवर्जून विचारला. तशीच स्थिती वरिष्ठ नागरिकांची आहे. मी लष्करात असताना आमच्या भरलेल्या करावर तुमची चैन चालली आहे हे ऐकवणाऱ्या डॉक्टर मित्राला मी भरत असलेल्या आयकराचा आकडा सांगितला. हा आकडा तो तिप्पट उत्पन्न असताना सुद्धा भरत असलेल्या आयकरापेक्षा जास्त होता.या नंतर हा विषय परत त्याने काढला नाही. लष्करात मिळत असलेल्या प्रत्येक पैशाच्या ३० % आयकर भरत असताना सुद्धा लोकांचे असे विचार पाहून फक्त खंत वाटली. वातानुकुलीत कार्यालयात बसून विचार प्रसवत असणार्या विचारवंतांबद्दल काय लिहावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 06:19 नवीन
३० % रक्कम हे त्या स्लॅबमफ्हील सिविलयन्सही भरतात. आर्मीच्या क्यान्टीन , दुकानात दर्जेदार वस्तू आम्हा ब्लडी सिवियन्सना तुमच्या दरात मिळतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 06:52 नवीन
हितेस राव कॅन्टीन मध्ये वस्तू स्वस्त मिळतात याच्या पेक्षा मोठा गैरसमज दुसरा नसेल. माझी शेवटची मोठी वस्तू कॅन्टीनमधून घेतली ती १९९२ मध्ये गोदरेजचा फ्रीज ज्यावर मला ४०० रुपये कमी पडले. यानंतर घेतलेले तीन टीव्ही, दोनही मोटारी ( मारुती आणि इंडिका) मोटार सायकल आणि स्कूटर या मी बाहेरूनच घेतल्या आहेत. याचे कारण बाहेर या वस्तू कॅन्टीनपेक्षा स्वस्त मिळतात.मी २००६ ला निवृत्त झालो त्यानंतर मी कॅन्टीनचे कार्ड काढलेले ही नाही. कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळत असत त्या १९९१ पूर्वी.आपली अर्थ व्यवस्था मुक्त झाल्यापासून बाहेर स्पर्धेमुळे गोष्टी जास्त स्वस्त झाल्या आहेत. एक उदाहरण मला इंडिका (पेट्रोल) विकत घ्यायची होती तिची किंमत २००८ साली ३ लाख ५५ हजार होती.कॅन्टीनमध्ये तिची किमत ३,३५,०००/- होती. त्यासाठी मला खडकीला जाऊन पूर्ण पैश्याचा डिमांड ड्राफ्ट द्यायचा होता. यानंतर त्याची ऑर्डर तट मोटार कडे जाणार मग ते ती ऑर्डर माझ्या जवळच्या( फोर्च्युन मोटर्स कडे पाठवणार) आणि मग मला ती मिळणार.फोर्च्युन मोटर्सच्या व्यव्स्थापकाने मला सरळ सांगितले डॉक्टर कशाला वेळ आणि मेहनत फुकट घालवताय मी तुम्हाला ती ३,३०,०००/- ला देतो. शेवटी माझ्या भावाने ( त्याने त्याच्या कडून एक सुमो आणि दोन सफारी घेतल्या आहेत) वाटाघाटी करून मला ३,१९,०००/- ला ती मिळाली. फक्त स्वस्त मिळते ती म्हणजे दारू. पण एक सैनिक महिन्याला किती दारू पितो जास्तीत जास्त एक हजार रुपयाची( जी बाहेर २५०० रुपयाला मिळते) म्हणजे त्याचे पैसे किती वाचतात रुपये १५००/- एवढी दारू जर तो दर महिन्याला पिऊ लागला तर तो दारूच्या आहारी मात्र जाईल एवढे नक्की. आर्मीच्या क्यान्टीन दुकानात दर्जेदार वस्तू हा अजून एक गैरसमज-- गुणवत्ता चाचणीत नापास( quality control) झालेल्या गोष्टी सर्रास कॅन्टीनमध्ये खपवल्या जातात. उदा. तेथे मिळणारे एरोप्लेन ब्रांडचे लोणचे यात देठे कोयी इ. गोष्टी सर्रास आढळतात. अशा गोष्टी मला माझ्या मित्रांकडून प्रत्यक्ष कळलेल्या आहेत. कारण याचे कंत्राट संरक्षण मंत्रालयातील बाबू लोक देतात.जर लष्कराच्या बर्फात घालण्याच्या बुटात आणि रेनकोट मध्ये भ्रष्टाचार होतो तर हे तर काय कुरणच आहे. (सी एस डी हे सिव्हिलियन "खाते" आहे) कोलगेट सारख्या कंपन्या सुद्धा नापास गोष्टी त्यात सरमिसळ करून देत असत हे मला त्या कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीनेच सांगितले. तेंव्हा आपले गैर समज दूर करून घ्या. सैनिकांना मिळणाऱ्या बहुसंख्य सवलती कागदोपत्री असतात.पाचव्या वेतन आयोगात लष्कराने या सोयीच्या ऐवजी रोख पैसे द्या आम्ही आमच्या वस्तू बाजारातून विकत आणू हे सांगितले होते पण ते बाबू लोकांच्या "पचनशक्तीला" हानिकारक होते. अर्थातच ते मंजूर कसे व्हावे? पण लोकांना दिसतात कि सैनिकाचे आयुष्य किती आरामाचे असते. असो. येथे लोकांच्या पुढे रडगाणे गाउन काय होणार आहे? भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे. ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
ज
जयंत कुलकर्णी Tue, 07/21/2015 - 07:07 नवीन
मला वाटते पूर्वी व्हॅट भारावा लागत नसे. आता व्हॅट भरावाच लागतो त्यामुळे किंमतीत फारसा फरक राहिलेला नाही. उरला प्रश्न दारुचा.... गोव्यात कॅन्टीनपेक्षा दारु स्वस्त आहे....... लोकांचे बरेच गैरसमज आहेत.... लष्करात आराम करुन देत नाहीत. हल्ली प्रत्येक रेजिमेंटला सियाचिन व बॉर्डरवर काम करावेच लागते.... असो ////भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे. ह्याचा त्यास उपयोग नाही /// हे मात्र खरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 07:36 नवीन
कधीतरी कुठल्यातरी उत्पादनात खडे निघणे हे सर्वांच्याच बाबतीत होते. गाडीही स्वस्तात मिळाली की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 07:58 नवीन
तुम्ही नीट वाचत नाही का? जरा चष्मा काढा. थेट डीलर कडून मला गाडी कॅन्टीनपेक्षा १६ हजार रुपये स्वस्त मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 08:29 नवीन
क्यान्टिनातही गाडी स्वस्तातच होती ना ? औरंग्याचाचा लढाइल न जाणार्‍या जनत्कडुन जिझिआ घ्यायचा व तो सैन्यावर खर्च व्हायचा. ब्लडी सिविलियनना जास्त दरात वस्तू देऊन सैन्याला कमी दरात वस्तू देणे हाही जिझियाचाच आधुनिक प्रकार ! ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 08:48 नवीन
हितेस राव, तुम्हाला नीट वाचताच येत नाही का? टाटाचा डीलर सुद्धा कॅन्टीन पेक्षा स्वस्त गाडी देत होता. ३,३०,००० ला (कुणालाही) जी कॅन्टीन पेक्षा ५ ००० रुपये स्वस्त आहे. का हो एवढे वैषम्य वाटते आहे तर तुम्ही आर्मीत का भरती होत नाही? डॉक्टरला वयाच्या ४५ पर्यंत शोर्ट सर्व्हिस कमिशन मिळते.जाती धर्म आणि आरक्षण विरहीत समाज कसा आहे तेही पाहायला मिळेल आणि त्यानंतर आयुष्यभर कॅन्टीन आणि दारू ची सोय आहे? बोला येताय का? शेपूट घालू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चैतन्य ईन्या Tue, 07/21/2015 - 10:20 नवीन
डॉक्टर झोपलेल्याला जागे करता येत नाही. मुळातच हितेशरावाना कसली तरी जाम धुंदी आहे. कसला तरी प्रचंड राग आहे. एकतर स्वताजाला पैसे मिळत नाहीयेत किंवा आपले धड होत नाहीये मग प्रत्येक ठिकाणी राग राग करा. किंवा आपण खूप खूप कष्ट करून चांगले यशस्वी झाले आहेत आणि त्या कष्टाचा एकप्रकारचा राग बाकीच्यांवर काढतायत असे वाटते. असो हे जरा वैयक्तिक पातळीवर टिप्पणी झाली पण त्यांचे प्रतिसाद हे फक्त मुद्दामहून एकाच बाजू धरून काहीही झाले तरी तिरसट वा उद्दाम उत्तर देणारे असतात त्यावर वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 11:25 नवीन
बाजारात दर ३.५५ होता ..... म्हणजॅ ब्लडी सिविलयनचा दर. क्यान्टीनातला दर ... ३.३५ ... म्हणजॅ सैनिकाचा दर. तुमच्या पाहुण्याने अनेक गाड्या त्याच डीलरकडुन घेतल्या asàlyaane डीलरने खास तुम्हासाठी अजुन कमी करुन ३.१९ ला दिली. .. हे सगळे तुम्हीच लिहिले आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 11:28 नवीन
बाजारात दर ३.५५ होता ..... म्हणजॅ ब्लडी सिविलयनचा दर. क्यान्टीनातला दर ... ३.३५ ... म्हणजॅ सैनिकाचा दर. तुमच्या पाहुण्याने अनेक गाड्या त्याच डीलरकडुन घेतल्या asàlyaane डीलरने खास तुम्हासाठी अजुन कमी करुन ३.१९ ला दिली. .. हे सगळे तुम्हीच लिहिले आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 07/22/2015 - 09:13 नवीन
हितेस मिया आपण नीट वाचत नाही हे सिद्ध करून दिलेच आहे. एम आर पी ३,४५,०००/- आहे( एम आर पी ला काहीच अर्थ नसतो) आणी डीलर लुन्ग्यासुन्ग्यालाही कॅन्तीन्पेक्षा स्वस्तात गाड्या विकतो हि वस्तुस्थिती आपल्या डोक्यात शिरत नाही काय?. नीट लिहितहि नाही हेही सत्य आहे. वाटेल ते लिहिण्यात काय हशील आहे? मुसलमानांची दाढी धरणे सोडा निदान खरे तरी लिहा. अभ्यास वाढवा.
औरंग्याचाचा लढाइल न जाणार्‍या जनत्कडुन जिझिआ घ्यायचा व तो सैन्यावर खर्च व्हायचा. ब्लडी सिविलियनना जास्त दरात वस्तू देऊन सैन्याला कमी दरात वस्तू देणे हाही जिझियाचाच आधुनिक प्रकार !
https://en.wikipedia.org/wiki/Jizya In India, Islamic rulers imposed jizya on non-Muslims starting with the 11th century.[142] The discriminatory taxation practice included jizyah and kharaj taxes. These terms were sometimes used interchangeably to mean poll tax and collective tribute, or just called kharaj-o-jizyah.[143] Jizya expanded with Delhi Sultanate and continued during most of the Mughal Empire rule. The tax rates varied, but typically was set at 50% of produce plus a fixed amount per person payable every month. The highest rates ranged from 33% to 80% of all annual farm produce on land inside the Islamic empire Alā’ al-Dīn Khaljī, a Sultan of the Khilji dynasty who ruled over most of North, West and parts of Eastern India, from 1296 to 1316 AD, legalized the enslavement of the jizya and kharaj defaulters. His officials seized and sold these slaves in growing Sultanate cities where there was a great demand of slave labour.[144] The Muslim court historian Ziauddin Barani recorded that Kazi Mughisuddin of Bayanah advised Alā’ al-Dīn that Islam requires imposition of jizya on Hindus, to show contempt and to humiliate the Hindus, and imposing jizya is a religious duty of the Sultan.[145] In late 14th century, mentions the memoir of Tughlaq dynasty's Sultan Firoz Shah Tughlaq, his predecessor taxed all Hindus but had exempted all Hindu Brahmins from jizya; Firoz Shah extended it over all Hindus.[146][147] He also announced that any Hindus who converted to Islam would become exempt from taxes and jizya as well as receive gifts from him.[146][148] On those who chose to remain Hindus, he raised jizya tax rate.[146] Hindus who paid Jizya in Muslim-ruled parts of India were not free to practice their religion openly, and those who did were persecuted and killed. Sultan Firoz Shah Tughlaq, for example, wrote[147][not specific enough to verify] The Hindus and idol-worshipers had agreed to pay the money for toleration (zar-i zimmiya) and had consented to the poll tax (jizya), in return for which they and their families enjoyed security. These people now erected new idol temples in the city and environs in opposition to the Law of the Prophet which declares that such temples are not to be tolerated. Under Divine guidance I destroyed these edifices, and I killed those leaders of infidelity who seduced others into error, and the lower orders I subjected to stripes and chastisement, until this abuse was entirely abolished. – Autobiography of Sultan Firoz Shah Tughlaq, Futuhat-i Firoz Shahi[147] The Hindus hated and evaded jizya.[149][not specific enough to verify] During the early 14th century reign of Muhammad bin Tughlaq, expensive invasions across India and his order to attack China by sending a portion of his army over the Himalayas, emptied the precious metal in Sultanate's treasury.[150][151] He ordered minting of coins from base metals with face value of precious metals. This economic experiment failed because Hindus in his Sultanate minted counterfeit coins from base metal in their homes, which they then used for paying jizya.[150][152] Jizya was temporarily abolished by the third Mughal emperor Akbar, in late 16th century. However, Aurangzeb, the sixth emperor, re-introduced and levied jizya on non-Muslims in 17th century.[153] Aurangzeb ordered that the collected jizya from non-Muslims be distributed as annual income to Muslim clerics and other Islamic causes.[154] Certain historians believe that the tax was intended to encourage conversion of non-Muslims to Islam.[155] खरं तर तुम्ही पाकिस्तानात का जात नाही? पाकिस्तान( LAND OF PURE). तुमच्या सारखे शुद्ध लोक तिथे शोभून दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Wed, 07/22/2015 - 09:30 नवीन
खुदा सर्वत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा