Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशभक्ती आणि स्वार्थत्याग

म
मंदार कात्रे
Sun, 07/19/2015 - 06:22
🗣 141 प्रतिसाद
नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे ..... चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

प्रतिक्रिया द्या
34675 वाचन

💬 प्रतिसाद (141)
ट
टवाळ कार्टा Wed, 07/22/2015 - 10:13 नवीन
अल्बत...आप्ल्या म.न.पा. तीच गोष्ट रस्तोरस्ती जाणवून देत अस्ते ;) यहा भी खुदा है....वहा भी खुदा है...ऐसी जगह बताव जहा नही है खुदा....खोद देंगे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
मृत्युन्जय Wed, 07/22/2015 - 10:29 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Mon, 07/20/2015 - 19:55 नवीन
शेवटी प्रत्यक्षानुभवी लोक्सकडून ऐकलेलेच खरे. बाकीच्या नुस्त्या छप्पन्न इंची गफ्फा. धन्यवाद डॉक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रदीप Tue, 07/21/2015 - 01:07 नवीन
गंगाधर मुटेंच्या नेहमीच्या आर्ग्युमेंट्ची आठवण झाली! -- तेरा इंची छाती आणि मुठीपेक्षाकी लहान असलेला मेंदूकुमार, प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/21/2015 - 09:17 नवीन
त्याचं असं आहे की प्रत्यक्षानुभवी लोकांनी इथे बॅलन्स्ड मुद्दे मांडल्यामुळे त्यांना दुजोरा दिला, बाकी काही नाही. एवढ्यावरून मुटे आठवले असतील तर एक नमस्कार घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
न
नाखु Mon, 07/20/2015 - 06:53 नवीन
फक्त बेबी सिनेमातील अक्षयकुमार डॅनी बरोबर मंत्र्याच्या पी ए ला भेटण्याचा आणि समजावण्याचा प्रसंगासाठी तरी एकदा हा सिनेमा पहा आणि इथे प्रतीसाद टंका. मुकाट नाखु
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 07/20/2015 - 07:06 नवीन
तो प्रसंग भारीच आहे. पण त्याला टिपिकल पॉप्युलरिस्ट भारतीय टच आहे. हाच प्रसंग दुसर्‍या देशात (उदाहरणार्थः witty ब्रिटन मध्ये घडला असता, तर कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं गेलं असतं, काही कल्पना?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Mon, 07/20/2015 - 07:27 नवीन
मला चित्रपटाचं उद्दातीकरण वगैरे कारायचं नाही पण जमेस धरण्याच्या वृत्ती वर यापेक्षा "परखड आणि सडेतोड" उत्तर दुसरे काही असेल असे वाटत नाही (परिणाम कारक सुद्धा!!) शेवटी सैन्यात आहेत तीही माणसेच आहेत कुटुंब असलेली त्यांची संभावना करण्याचा आपल्याला किती अधिकार आहे हे एकदा तपासून पाहिले म्हणजे झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नगरीनिरंजन Mon, 07/20/2015 - 07:36 नवीन
एकदा एखाद्याला देव बनवलं आणि त्याच्याबद्दल बोलायचा इतरांना काही अधिकार नाही असं म्हटलं की सगळं कसं सोप्पं होतं. बाकीचे सगळे स्वार्थी जीवजंतू आणि सैन्यात सगळी देवमाणसं. चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Mon, 07/20/2015 - 07:51 नवीन
भले-बुरे त्यांच्या मध्येही असतील्च. तरीही परीणाम माहीत असूनही स्वैच्छेने केली जाणारी एकमेव नोकरी म्हणजे सैन्यदल. अगदी अंतर्गत दंगलींसाठीही आणि "ताज" सारख्या हल्ल्यांसाठीही सैन्याचीच आठवण होते. आणि हो हे त्यांच्या साठी जागेवर बसून कळफलक बडविण्यासाठी थेट १.४५ ते १.५० ही पाचच मिनिटे बास आहेत. पुचाट नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 07/20/2015 - 08:48 नवीन
"लोग कहते है जंग बुरी चीज है, अब आप ही बताइये सर ये बात एक सिपाही से बेहतर कौन समझेगा साहब जी" -सुबेदार मेजर प्रीतमसिंह (लक्ष्य)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 07/20/2015 - 09:24 नवीन
चर्चा भरकटली आहे. "न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?" हा लेखातील मुख्य प्रश्न आहे. त्यावर उत्तरे न देता इथे सैन्यप्रेमी आणि सैनिकांना (जास्त) भाव न देऊ इच्छिणारे असे दोन तट पडले आहेत. मुख्य प्रश्नाचे उत्तर बाजूलाच राहिले. माझे उत्तर असे आहे की आपत्काळात अशी सैन्यभरती करुन जास्त काही साध्य होत नाही. सैनिकांना युद्धजन्य परिस्थीतीशी लढण्यासाठी, तशी त्यांची मानसिकता घडण्यासाठी बराच काळ मेहनत घ्यावी लागते, सराव करावा लागतो. ऐनवेळेस भरती केलेले रिक्रुटस युद्धात जास्त नुकसान करु शकतात. देशात प्रत्येक धडधाकट तरुण / तरुणीसाठी सैनिकी शि़क्षण कमीतकमी दोन वर्षांसाठी सक्तीचे असावे. (नोकरी सक्तीची असावी असे म्हणत नाही.) त्यामुळे तरुण आज आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होतील. अगोदर या लेखावर दिलेला हा प्रतिसाद उपरोधीक होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/20/2015 - 09:28 नवीन
मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक गोष्टी मला करता येत नाहीत आणि समजतही नाहीत. परंतु आयुष्याची महत्त्वाची २३ वर्षे लश्करात काढल्यानंतर काही गोष्टी समजल्या त्या अशा. १) भारतात लोकसंख्या वाढीचा दर अफाट असल्याने कोणत्याही नोकरी साठी भरपूर लोक उपलब्ध असतात. याचा अर्थ सगळे भिकारीच असतात असे नव्हे. उत्तम शिक्षण आणी पैसा असलेले असंख्य लोक माझ्या २३ वर्षाच्या काळात मी स्वतः पाहिलेले आहेत. एक पराकोटीचे उदार्हर्ण म्हणून आमचे हाड वैद्य शास्त्राचे(ORTHOPEDICS) प्राध्यापक कर्नल चार हे म्हैसूर च्या महाराजांचे नातलग होते. स्वतःची प्रचंड मालमत्ता असूनही स्वखर्चाने इंग्लंड मध्ये एफ आर सी एस करून लष्करात भरती झालेले होते. एक रुपया नाममात्र वेतन घेऊन ते काम करत असत.( कुणालाही राष्ट्रासाठी फुकट काम करायची पद्धत नाही). २) लष्करातील लोक सुद्धा तुम्ही आम्ही असतो तितकेच देशभक्त असतात. अठराव्या वर्षी तरुण उत्साहाने सळसळत असतात त्यांना सन्मार्गाला लावायचे कि कुमार्गाला हे त्यांच्यावर होणारे संस्कार ठरवतात. मग त्यांचा उत्तम सैनिक बनवायचा कि उग्र दहशतवादी ते संस्कार ठरवतात. ३) हे देशभक्तीचे संस्कार लष्कराच्या मुशीत मुद्दाम घडवले जातात. त्यामुळे ते लखलखीत होतात. सोन्याला झळाळी यावी तशी. याचा अर्थ असा नव्हे कि झळाळत नाही( पक्षी: सिव्हीलीयन्स) ते सोने नव्हे. परंतु हे प्रशिक्षण लोकांना मोठ्या प्रमाणावर आत्मबलिदान करण्यास प्रवृत्त करते.( हीच परिस्थिती दहशतवाद्यांची आहे. ४) अमेरिकेची उदाहरणे देऊन उपयोगी नाहीत याचे कारण त्यांच्या स्वतःच्या भूमीवर कधीही युद्ध झालेले नाही. एकदाच काय ते विमान त्यांच्या अभेद्य किल्ल्याला भेदून आत गेले त्याची अवस्था संशयग्रस्त( PARANOID) झाली आहे. ( बी बी सी चे विश्लेषण) बाकी सर्व युद्धे त्यांनी दुसर्यांच्या भूमीवर केली आहेत.एवढा प्रचंड शस्त्रास्त्रे आणी अण्वस्त्रे यांचा डोलारा रशिया आपल्यावर हल्ला करेल या संशयग्रस्त( PARANOID) वृत्तीतूनच उभा केलेला आहे. ५)सैन्य नसते तर भारत पंजाब पासून दक्षिणेत आंध्र पर्यंत आणी पूर्वेस पश्चिम बंगाल पर्यतच राहील यात कोणतीही शंका नाही. तामिळनाडू, काश्मीर आणी पूर्वोत्तर राज्ये फुटीरता वाद्यांच्या कारवायांना बळी पडून कधीच सोडून गेली असती. (या जर तर ला मुळातच काहीच अर्थ नाही) ६ ) जो माणूस सचोटीने आपले काम करतो तो तितकाच देशभक्त असतो. मग तो झाडूवाला असो कि उच्च दर्ज्याचा शास्त्रज्ञ. ७) भ्रष्टाचार हा सर्व क्षेत्रात आहे तसा लष्करातही आहेच. परंतु अ - लष्करात प्रमाण बरेच कमी आहे ब--तुम्ही भ्रष्ट नसलात तर लष्करात तुम्हाला त्रास होत नाही. इतर क्षेत्रात (उदा पोलीस आयकर) येथे तुम्ही भ्रष्टाचारी नसाल तर तुम्हाला दे माय धरणी ठाय करून सोडले जाते. ८) लष्करातील नोकरी खडतर आहे यात वादच नाही. माझ्या मुलीने तिसरीत जाई पर्यंत ६ शाळा बदलल्या होत्या. एका ठिकाणी स्थिर राहू शकण्याचे फायदे काय आहेत ते इतराना सांगून समजणे कठीण आहेत. इतर बदलीच्या नोकर्यात तुमही राजीनामा देऊन बाहेर पडू शकता.लष्करात तसे नाही. ९) तुमच्या कडे नोकरी मिळवण्य़ाजोगे कौशल्य(EMPLOYABLE SKILL) असेल तर तुम्ही बाहेर पडू शकता. तोफखाना दलाचा अधिकारयाच्या तोफा चालवण्याच्या कौशल्याची बाहेरच्या जगात कवडीची किंमत नाही. हे कौशल्य मिळवण्यासाठी त्याने खर्ची घातलेला तारुण्यातील काळ हा नंतर कवडीमोलाचा ठरतो. बाहेर पडल्यावर पंचेचाळीशी पन्नाशीला आपल्याला कुत्रं विचारात नाही हि जाणीव भयानक आहे.या वयात नवीन शिकण्याची उमेद राहत नाही आणी तरुण लोकांबरोबर स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे नैराश्यात गेलेले असंख्य लष्करी अधिकारी मी पाहिलेले आहेत. लिहिण्यासारखे भरपूर आहे पण ज्यांना समजावून घ्यायचे नसेल त्यांना सांगून उपयोग नाही आणी ज्यांना समजते त्यांना समजावण्याची गरज नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 07/20/2015 - 10:08 नवीन
१००% सहमत.. सैन्यदलाशीवाय बाकीच्या क्षेत्रात काम करणारे जे नोकरदार आहेत त्यांनी जरी आपले काम इमानेइतबारे केले तरीही ती एक देशसेवाच ठरेल. सरकारी भ्रष्ट कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचार न करता आपल्याला नेमून दीलेले काम वेळेत पूर्ण केले तरी ती एक देशसेवाच ठरेल. बाकी उद्योजक आहेत ते एक प्रकारे बेरोजगारी कमी करुन देशसेवाच करत असतात. सद्या देशसेवा करण्यासाठी बंदूकच हातात घेतली पाहीजे असे काही नाही. आपला आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेउन रोगराईला प्रतिबंध केला तरी मोठी देशसेवा ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बाबा पाटील Wed, 07/22/2015 - 09:43 नवीन
अती शहाण्यांना काहीही समजावुन उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीरंग_जोशी Mon, 07/20/2015 - 19:50 नवीन
सैन्याच्या उपयुक्ततेत्बाबत प्रश्न या चर्चेत उपस्थित करण्यात आले आहेत. कदाचित बर्‍याच मोठ्या काळात कुठलेच मोठे युद्ध झाले नसल्याने असे प्रश्न उपस्थित केले गेले असावेत. सदर प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी अधून मधून घडत राहणार्‍या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळेस सैन्याचे योगदान लक्षात घेतले तर असा प्रश्न उपस्थित करावासा वाटणार नाही. २००४ सालच्या त्सुनामीनंतर आपल्या देशातल्या मदत कार्याखेरीज इतर अनेक देशांना भारतीय हवाईदल व नौदलाने मदत पोचवली होती. अमेरिकेच्या मदत प्रस्तावाला भारताने नकार देऊन ती मदत इतर देशांकडे वळविण्यास सुचवले होते.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Mon, 07/20/2015 - 20:25 नवीन
१
3. सेना ही शांतिकालात आपली योग्यता दाखवू शकत नाही
आत्ता अलिकडे national disaster response force तयार करण्यात आले आहे. national disaster response force ने काम सुध्दा छान केले आहे. म्हणुन मागील पूर , भूकंप या काळात भारतीय सेनेच्या योगदानाचा विसर पडता कामा नये. राष्ट्रीय आपत्तीत भारतीय सेनेचे काम ( युध्द सोडुन ) यावर चर्चा करा २.
"न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?"
युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक सेनेला भरपुर, तत्पर विनामोबदला सहाय्य केले आहे. खासकरुन ७१ , ६५ युध्दात राजस्थान पंजाब गुजरात या युद्ध छायेतील राज्यानी. सामान्य नागरिक सेनेला इतके पण अलिप्त मानत नाहित त्यामुळे काळजी नसावी..
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Tue, 07/21/2015 - 02:43 नवीन
मंदार कात्रे, आणीन इतर , देहरादून ला ऎक गरीब भिकारड्या लोकांची डून स्कूल म्हणून शाळा आहे हे माहित असेल. राजीव गांधी तिकडे होते - बहुदा नादारीवर शिकले असावेत. लोक होते बरे तिकडे - https://en.wikipedia.org/wiki/List_of_The_Doon_School_अलुम्नी सशस्त्र दलात या शाळेचे १३ जन उच्च पदावर गेले होते गरीब शाळेतील गरीब मुले ?????
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 07/21/2015 - 03:34 नवीन
मुळात माझ्या मूळ प्रतिसादातून सैनिकांच्याबद्दल काहीतरी अपमानकारक लिहीलंय असा अर्थ काढून त्यावर भरकटणारे प्रतिसाद देणार्‍या स्वयंघोषित देशभक्तांचे आभार. स्वतःचा जीव देणार्‍या सैनिकाला व्यवस्थेत काहीही बदल न करता निव्वळ तोंडी उदो-उदो केल्याने आपण सन्मानित करतो असे वाटत असलेल्यांनी पुन्हा नीट विचार करण्याची गरज आहे. सैन्यदलात जाणारे कोवळे तरुण ज्यासाठी जीव देतात ते नक्की तेवढं चांगलं आहे का याचा विचार हे स्वयंघोषित देशभक्त करताना दिसत नाहीत. उलट ठराविक स्टिरिओटाईप करुन "म्हणजे जय जवान, जय किसान" म्हणायचं आणि इतरांना तुच्छ लेखायचं एवढंच हे करु शकतात. प्रत्यक्षात समाजात देशाच्या संपत्तीचा फायदा उचलणारे भलतेच आणि तिच्यासाठी त्याग करणारे भलतेच असं चित्र आहे. हा लाभ उचलणार्‍यांना देशभक्तीचा नुसता ज्वर आणि त्यापायी काहीही करायला तयार होणारे कार्यकर्ते हवेच असतात. आपल्या देशात वंचितांचीच पिळवणूक चालली असताना तिकडे डोळेझाक करुन काल्पनिक शत्रूचा बीमोड करण्याची गर्व गीते गाण्यात किंवा अमुकपासून तमुकपर्यंत प्रदेश आपलाच आहे अशा गफ्फा हाणणार्‍यांना मी तरी देशभक्त म्हणणार नाही. सैनिक हा एक सामान्य माणूस असतो आणि प्रत्येक सामान्य माणूस सैनिक असतो. त्याला देव बनवून नंतर बळीचा बकरा बनवू नये. तिकडे या पोकळ देशभक्तीच्या जयघोषामुळे आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे बॉर्डरवर अनेक सामान्य माणसे तळहातावर जीव घेऊन उभी आहेत आणि इकडे स्वतःची तुटपुंजी संपत्ती वाचवण्यासाठी बरीच सामान्य माणसे रोज संघर्ष करत आहेत. बाहेरच्या शत्रूबरोबर कधीकधी चकमक होत असली तरी देशांतर्गत युद्ध चालूच आहे. देशात समाजवाद होता तेव्हाही यांचं शोषण झालं आणि आता भांडवलवाद आल्यावरही ते चालूच आहे. देशभक्तीच्या बाळबोध कल्पना थोड्या बदलण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/21/2015 - 06:07 नवीन
देशभक्ती, स्वार्थत्याग असे मोठेमोठे शब्द बाजूला ठेवूयात, पण केवळ नोकरीचा भाग म्हणून तरी सैनिकांनी त्यांच्याबद्दल जराही जाणीव नसलेल्या लोकांसाठी आपल्या जीवाची बाजी का लावावी आणि लावावी का, हे दोन प्रश्न मला सद्ध्या हा धागा वाचून पुन्हा एकदा पडले आहेत! बाकी चालूद्यात.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 07/21/2015 - 06:23 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/21/2015 - 06:28 नवीन
तुमचे प्रतिसाद सेरियसली घ्यायचे नाहीत असं पैतैनं सांगितलंय तेव्हा, दुर्लक्ष. एंजॉय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 06:25 नवीन
यशोधरा ताई, सैनिकाना एका विशिष्ट मनोवृत्ती ने तयार केले जाते कि वेळ आला तर देशासाठी प्राणही देणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याचे उदात्तीकरण करणे थोड्या प्रमाणात आवश्यक आहे नाहीतर लष्करातील माणूस म्हणेल कि मीच कशाला मरायचे? त्याला हे सांगून उपयोग होत नाही कि तुला पगार मिळतो म्हणून तू काम करणे आवश्यक आहे. कारण तो कोणत्याही सरकारी कामासाठी जातो तेंव्हा तेथील लोक काय काम करतात आणि किती वरकड पैसे मिळवतात ते त्याला स्पष्ट दिसते.त्याचे कोणतेही काम सरकारी माणसे (लष्करात आहे म्हणून) पैसे न घेता करत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. तेंव्हा ते लोक काम न करत पैसे मिळवतात तर मीच का काम करायचे हा प्रश्न त्याच्या मनाला सतत बोचत राहतो. त्यामुळे हि घोषणाबाजी काही प्रमाणात आवश्यक आहे. लष्करात "ओव्हर टाईम" मिळत नाही. दिल्लीत बसणाऱ्या चपराश्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा सैनिकाला १०% जास्त पगार मिळतो. त्यामुळेच लष्करी अधिकार्यांना तुम्ही साधे( ब्लडी) "सिव्हिलियन्स " नाही हे सतत सांगत राहावे लागते. यातून येणारे नैराश्य बाजूला ठेवण्यासाठी हा शब्दांचा महाल उभा करावा लागतो. सैनिकांना जास्त विचार करू नये म्हणून दारूही दिली जाते. कारण आपण काय आणि का करतो आहोत? हा प्रश्न माझ्यासारख्या मनोविकार शास्त्रात काम केलेल्या सुशिक्षित डॉक्टरला जर पडू शकतो तर सामान्य १०-१२वी पास सैनिकाला पडेल यात वादच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/21/2015 - 06:34 नवीन
डॉक, माझे अजिबात विचारवंती मत नाहीये. हिमालयातून फिरताना भारतीय सैन्याचा आधार म्हणजे काय हे मी व माझ्यासारख्या अनेक ट्रेकर्सनी खूपदा अनुभवलेले असते. कोणी काहीही म्हणो, मला सैन्याबद्दल, सैनिकांबद्दल आदरच आहे. माझे चुलत आजोबाही एअरफोर्समध्ये होते. तेव्हा अगदी जवळून नसले तरी बर्‍यापैकी जवळून सैनिकी पेशा पाहिला आहे. ते प्रत्येकाचे काम नव्हेच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/21/2015 - 06:57 नवीन
अहो ताई तो तुम्हाला नव्हता प्रतिसाद. तुम्ही कळकळीने लिहिलेले आहे ते समजून येते. हा प्रतिसाद "इतर" लोकांसाठी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/21/2015 - 07:24 नवीन
माझ्यामते निरंजन ह्यांना हे सुचवायचे होते की नोबेल प्रोफेशन म्हणुन आपण सैनिकाचा देव करतो पण जाणारा जीवानिशी जातो असेच काहीसे, निरंजन, तुम्ही मला अकादमी वर सुद्धा विचारले होते फौजी सिविलियन्स चा ब्लडी सिविलियन्स असा उल्लेख का करतात? उगाच तुमच्या भावना दुखवतील अश्या भीतीने मी गुळमुळीत उत्तर दिलेहोते ते आज स्पष्ट बोलतो, बटालियन च्या आत आम्ही कायदे तसुभर ही न वाकवता काम करतो, १३ पंजाब ला मी attach असताना मी हेलमेट नाही म्हणुन स्वतः सी ओ असलेल्या कर्नल ला पायी घरी जाताना पाहिले आहे देवा, सिविलियन्स मधे तुम्ही किंवा आपले समस्त मिपाकर भाऊ बहिणी नियम पाळत ही असतील पण बाकी जनतेचे काय?? आम्हाला ते असहय होते, नळस्टॉप ला गर्लफ्रेंड मागे बसली आहे म्हणून उगाच acclerator पिळणारे वीर दिसतात, एक जेरी कैन भरून रॉकेल १७००० फुटावर नेताना फाटलेला विशिष्ठ अवयव आठवतो, तेव्हा अगदी सहज तोंडातून निघत "bloody indiscipliNed civilians" अगदी अगदी सहज
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 07/21/2015 - 07:41 नवीन
ही कोणती शिस्त, ज्यातून महीला पोलिस ही सुटली नाही. http://www.dnaindia.com/india/report-nashik-18-army-officers-arrested-for-ransacking-police-station-2052834
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/21/2015 - 08:14 नवीन
गैरसमज झालेला दिसतो आहे देवा, मी आर्मी वाले कुठेच विंडीकेट केले नाही , मुद्दा सिंपल आहे जितके बेशिस्त वर्तन सिविल लाइफ ला आढळते तितके फोर्सेज मधे नसते, ह्याचा अर्थ फोर्सेज ला मी क्लीनचिट देतोय असा तुम्ही घेत असाल तर माझा निरुपाय आहे, तुम्ही नाशकात केलेला राडा आमच्यावर भिरकावलात, मी नांदेड जिल्ह्यातली केस भिरकावतो, महार रेजिमेंट ला कार्यरत असलेला अन एक अत्यंत शुर डेकोरटेड सूबेदार मेजर, त्याच्या आई ला त्या वृद्धे ला जमिनीच्या वादात नागडी करून चटके दिले अन डोक्यात धोंडा घालून ठार केले गावातल्या मोठ्या प्रस्थाने, आता तुमच्या सारखा विचार मी करायचा म्हणले तर मी काय करावे? तुम्हाला ती लिंक सप्रेम भेट देऊन समस्त सिविलियन्स ना दूषण द्यावे?? ह्या सगळ्यांने तुम्हाला किंवा मला काय उपयोग होणार आहे, मी माझा मुद्दा परत एकदा अधोरेखीत करतो सिविलियन्स मधे जितके बेशिस्त वर्तन सापड़ते तितके फोर्सेज मधे नसते, ह्याचा अर्थ फोर्सेज देव अन सिविल्स मुर्ख असा कृपया घेऊ नका, घ्यायचाच असल्यास आमचा निरुपाय आहे, बाकी एकदा डॉक चे प्रतिसाद नीट वाचा इतकी विनंती मात्र मी करू धजतो जय हिंद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 07/21/2015 - 08:30 नवीन
तुमचा मुद्दा समजला. माझा मुद्द एव्हढाच होता की, शिस्तीचे प्रमाण कमी जास्त आहे म्हणून एखाद्याने दुसर्‍याला bloody वगैरे म्हणणे योग्य आहे असे होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/21/2015 - 08:57 नवीन
तसे पाहता कोणीच कोणाला काही बोलु नये पण मग तो यूटोपिया होईल!! हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो? उलटे जर आपणांस वाईट वाटत असले तर आपण १०% उर्वरीत ९०% शहाणे का करू नये?? जर माझ्यापूर्ते बोलायचे झाले तर आर्मी मधे गुन्हे केल्यास त्याच्या कड़क शिक्षा आहेत व् त्या १० १० वर्षे केसेस पेंडिंग न ठेवता २ महिन्यात निकाली निघतात, सुकना लँड ग्रॅब केस मधे ही हेच दिसले होते, म्हणुन बोलतात ते! डॉक्टर म्हणाल्या प्रमाणे त्या मानाचा अन शिव्यांचाही पैश्यात ५ पैसे लाभ होत नसतो तर फ़क्त एक मानसिक गरज म्हणुन त्यांना थोड़े मान दिल्यास लोकांच्या पोटात का शुळ उठतो हेच मला कळेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 07/21/2015 - 10:22 नवीन
हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?
हे स्टॅटीस्टीक्स कुठुन आणले ? बाकी दुसर्‍यांचा मान ठेवण्याची शीस्त पाळली तरच स्वतःला मान ठेवण्याची अपेक्षा ठेउ शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/21/2015 - 10:30 नवीन
स्टैट्स ढोबळ आहेत, अन दुसऱ्याला मान द्यायची शीस्त आमच्यात नसती तर एखाद्या कर्नल ला एका साध्या ओ आर ने केलेल्या सैल्यूट ला तितकेच कड़क प्रत्युत्तर आले नसते, सिविलियन्स ना आम्ही मान देतो का नाही हे आपण ज़रा एकदा नीट कन्फर्म करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 07/21/2015 - 10:36 नवीन
हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?
ह्या वाक्यातुन काय सजेस्ट होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/21/2015 - 11:02 नवीन
हे बोलणे सुद्धा सुधारावे म्हणुन असते, ते किती होते?? सिग्नल ला उगाच हॉन्किंग करू नये , लाइन मोडू नये, ह्या गोष्टी आधी पाळा मग मान मागा, आम्ही पाळतो अन मान मागत नाही, काही लोक प्रेमापोटी देतात, मान काय असतो? वैयक्तिक आयुष्यात डॉक्टर सुबोध खरेंना एकदा ही न भेटता एक वेटरन म्हणुन त्यांच्या मिपावरच्या पोस्ट ला ही ४ वेळा वाचुन समजून मग रिप्लाई दिला जातो अमच्याकडून, शिवाय आपले स्वतंत्र विचार ऐकून आपण किमान सिग्नल अन रांगा तरी पाळत असावेत असे जाणवते, तस्मात् तुम्ही न मागता ही तुम्हाला मान आहेच but brother plz don't root in for unruly folks! That makes them more unruly!! , मागे मी अकादमी लिहिता झालो तेव्हा एका अश्याच सिविलियन भावाची "do i as a citizen of this country deserve such great forces" टाइप ची कमेंट आली होती, त्यावर मी काय उत्तर दिले आहे ते एकदा जाऊन वाचाच बंधु, माझा मुद्दा सरळ आहे स्वतःचे अवमूल्यन करू नये, १० पैकी ८ लोक फौजी बांधवांस मान द्यावा वाटत असेलही तर तो अव्यवहार्य आहे हे त्यांना पटवा आम्हाला नको कारण आम्ही तो मागितला नाहीये तर तो प्रेमापोटी आम्हाला दिलाय, अन हे संगीत मानापमान बोलायला सोपे असते, तो प्रेमापोटी दिलेला मान वास्तव आयुष्यात जगायला काय घासावी लागते हा वेगळाच मुद्दा झाला, तो नुसता मान नसतो, जबाबदारी असते प्रचंड मोठी, कलेक्टिव रिस्पांसिबिलिटी, अन जे जे सिविलियन्स ते जगतात त्याना ही तसलाच मान दिला जातो आर्मी कडून. मझ्याबाजूने मी इतकेच म्हणेन की प्लीज तुम्ही जे लोक मान देतात त्यांना विचारा का ते! आम्हाला दिला तरी हरकत नाही नाही दिला तरीही नाही जय हिन्द _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ब
बॅटमॅन Tue, 07/21/2015 - 11:23 नवीन
सोन्याबापू, एक नंबर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाखु Wed, 07/22/2015 - 11:16 नवीन
सहमतीला आमची अनुमती+सहमती आनंदी नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
उ
उडन खटोला Tue, 07/21/2015 - 08:50 नवीन
सन्माननीय सोन्याबापू व डॉक्टर खरे साहेब , अत्यन्त आभार्स... आपण लष्कराचे खरे महत्त्व आणि देशासाठीचा लष्कराचा त्याग यावर अतिशय मुद्देसूद विवेचन केलेले आहे धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 07/21/2015 - 13:07 नवीन
अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ?
बरेच तयार होतील पण त्याची कारणे तुम्हाला अपेक्षित आहेत अशीच असतील हा समज नको.
यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
हे ज्याच्या-त्याच्या शारीरीक व मानसिक क्षमतेवर अवलंबुन नाही काय ? मी स्वतः NCC मधे होतो. दुर्दैवान NDA एंट्रंस मात्र संपुर्ण क्लिअर करु शकलो नाही. हे प्रयत्न चालु असताना माझा विचार मला हे जमु शकते तर मी देशाच्या कामी का येउ नये हा होता. देशासाठी म्हणून मला त्यात जायचे आहे हा न्हवता (कारण देशासाठी आपापल्या कुवतीनुसार करण्याच्या गोष्टी अनेक आहेत) थोडक्यात अशी प्रत्येक व्यक्ती जी स्वतःला अशा परिस्थीतीला तोंड द्यायला सक्षम समजते (लिंग, जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे भेदभाव सोडून) ति इथे देशासाठी उभी रहायला नक्किच तयार होइल. जी व्यक्ती सक्षम समजत नाही त्यातील अनेको वेळ आल्यावर देशासाठी बलिदानाला उभे राहतील व काही मोजके मात्र हे कधीच करु शकणार नाहीत आणी आनंदाची बाब म्हणजे देशाचे संपुर्ण भवीतव्य अशा मोजक्या लोकांवर अवलंबुन असतेच असे अजिबात नाही तेंव्हा कृपया आपण निश्चींत असा...वे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 07/21/2015 - 18:52 नवीन
@ननि, तुम्ही जो मुद्दा इथे मांडलाय त्याचा आणि धाग्याचा काहीएक संबंध नाहिये. धागाकर्ता विचारतोय की युद्ध झाल्यास तरूण उभे राहतील का? तुम्ही युद्धच कसं वाईट आहे ह्याचं प्रतिपादन करता आहात. तुमच्या मुद्द्यांमधे "युद्ध झाल्यास" हा मूळ मुद्दा सोडून बाकीचेच विवेचन आहे. जे चूक आहे असे अजिबात नाही पण इथे अप्रस्तुत आहे. मूठभरांची संपत्ती, युद्धखोर वृत्ती, शांतता, विश्वबंधुता, इत्यादी एका वेगळ्या चर्चेचे मुद्दे आहेत. तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही ते अमेरिकेला उद्देशुन लिहिताय असे वाटत आहे. अमेरिका युद्धखोर आहे, तिची संपत्ती पर्यायाने मूठभरांची संपत्ती वाचवण्या-वाढवण्यासाठी ते लष्कराचा वापर करतात. उगाच युद्धे उकरून काढतात, नको तिथे नको त्या प्रसंगी आपल्या तरूण निष्पाप सैनिकांना मरायला पाठवतात. भारतात असे चित्र नाहीये त्यामुळे तुमचे प्रतिसाद इथे लागू होतच नाहीत. राहिला प्रश्न आपल्या युद्धतयारीचा. तर पाकिस्तान व तत्सम राष्ट्रे आपल्यावर चाल करुन आली तर तेव्हा आपण स्वतः त्यांना तुमचे हे प्रतिसाद वाचून दाखवणार का? जेव्हा मानेवर कुणी तलवार ठेवतं तेव्हा त्याला अहिंसेचं बोधामृत पाजून उपयोग नसतो. हे सार्वकालिक सत्य आहे. जेव्हा युद्ध होतं तेव्हा ते तुमची तयारी असो वा नसो लढायलाच लागतं. तुम्ही हिंसावादी आहात का अहिंसावादी याच्याशी वार करणार्‍याला कर्तव्य नसते, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. एखाद्याने आपल्याविरूद्ध युद्ध पुकारल्यावर मग भरती करून लढायला पाठवून उपयोग नसतो. लष्करात एक वाक्य आहे काहीसं की युद्ध कधीतरी एकदाच होतं पण त्याला तोंड द्यायला वर्षानुवर्षे तयारी करायला लागते. ही निरंतर केली जाणारी तयारीच तुमचं बळ असतं. त्यामुळे गेल्या इतक्या वर्षात युद्ध झालं नाही, करदात्यांचा पैसा वाया गेला, उधळला म्हणू नये. बंदूकीतून झाडलेली पहिली गोळीच नेमावर लागत नसते. त्यासाठी हजारो गोळ्यांचा सराव लागतो. तेव्हा हवी ती गोळी हव्या त्या ठीकाणी लागते. तसेच आपले सैनिक हे कुणाचा जीव घेण्यासाठी नाहीतर देशबांधवांचे जीव वाचवण्यासाठी सीमेवर आहेत. देश म्हणजे नेमकं काय हे बहुधा तुम्हालाच कळलं नाहीये म्हणून सारखं 'देश म्हणजे नक्की काय, देश म्हणजे नक्की काय' विचारत आहात. सगळ्या सीमांवरून एकदा सगळी सेना हटवली आहे, शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत, सगळे सैनिक सुट्या घेऊन घरी गेले आहेत अशी कल्पना करा आणि मग काय काय होऊ शकतं याचा कल्पनाविलास करा आणि तुमच्या समर्थ लेखणीतून एक मस्त लेख पाडा, बघू कसं वाटतं ते. देवानंदचा प्रेमपुजारी बघा, तुमचे प्रतिसाद वाचून तोच आठवला. शेवटी बंदूक उचलण्याची गरज का आहे हे त्याला कळतं, तुम्हालाही कळेल अशी आशा आहे. असो. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना समजतं त्यांना सांगायची गरज नाही, इत्यादी... (हुप्प्या यांचा मला असलेला उपप्रतिसाद तर दखल घेण्याच्याही लायकीचा नाही. अर्धवटराव यांनी योग्य शब्दात मोजमाप केले आहे.)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/23/2015 - 10:05 नवीन
http://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/soldier-of-fortune-a-story-that-needs-to-be-told/ सिविलियन्स फोर्सेज चा मान का राखतात अन तो काकणभर जास्त का राखला गेला पाहिजे हे सांगणारे एक उत्तम आर्टिकल प्रत्येकाने जरूर जरूर जरूर वाचाच
  • Log in or register to post comments
क
कन्यारत्न गुरुवार, 07/23/2015 - 10:52 नवीन
आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा