बाहुबलीच्या निमित्ताने …
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
💬 प्रतिसाद
(132)
स
संदीप डांगे
Wed, 07/22/2015 - 11:33
नवीन
तुमचं म्हणणं बरोबरच आहे.
लायनकिंग मधे सिम्बाच्या काकाच्या (जो व्हिलन असतो) डाव्या डोळ्यावर जखमेचा व्रण आहे. अगदी तस्साच इथे शिवाच्या काकाच्या (भल्लाल् देव) उजव्या डोळ्यावर आहे.
सिम्बाचा बाप प्राण्यांच्या गोंधळात फसवणुकिने मारला जातो, इथेही तसंच दिसतंय.
तिकडे सगळे प्राणी (कसंकाय बुवा) सिम्बाच्या बापाचे फॅन असतात, इथेही प्रजा बाहुबलीची फॅन आहे.
अजून पुढचा भाग आल्यावर साम्य शोधता येतीलच किंवा जबरी धक्का बसेल.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 07/21/2015 - 12:50
नवीन
बाजीरावावर असा एक दोन-तीन भागातला पिच्चर काढायचा राव.. फक्त वीस वर्षांतली युद्धं आणि दौरे कवर करायचे. सोबतीला शिंदे होळकर आणि मराठा सैन्य. असं चांदण्या रात्रीत उत्तरेच्या मैदानावर घोडदैड करणार्या घोडदळाचं एरिअल डोळ्यासमोर येतंय.
(ती मस्तानी/पुणे राजकारण वगैरे तूर्तास बाजूला ठेवायचे किंवा चवीपुरतेच अॅडवायचे. बाकी सिकंदरासारखी ऑन-फिल्ड गाथा असेल मग..!)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/22/2015 - 09:23
नवीन
कल्पना आवडली. भव्य दिव्य चित्रपट नक्कीच आला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 07/22/2015 - 11:08
नवीन
महाराजांवर असा चित्रपट का येत नाही, आला नाही याचं नवल वाटतं.
इतकी साहसी दिव्ये आणि कूटनीति दुसर्या कुठल्या ही राजाने वापरली नाही. इतकी भव्य दृष्टी दुसर्या कुठल्याही राजाची नव्हती.
जर इतकी भव्य युद्धं दाखवण्याची कपॅसिटी एखाद्या दिग्दर्शकाची असेल तर इथे स्टोरी तर तयार आहे. आणि सगळं काही खरं खरं आहे.
विचार करा. राजांनी अफजलखानाच्या सैन्याची जी कत्तल केली तो सीन वरून पाचशे फुटावरून चित्रीत केला तर, किंवा कोकणात उतरणार्या कारतलबखानाची ससेहोलपट घोड्यावर विराजमान झालेले, निळं मुकूट घातलेले महाराज जवळच्या पहाडावरून पहाताना सूर्य त्यांच्या पाठीमागे लपला आहे आणि सूर्याची किरणं त्यांच्या मुकूटावरून परावर्तित होवून एक तेजस्वी प्रभामंडल फाकलं आहे, किंवा बाजीप्रभू ची ३०० स्टाईल लढाई किंवा सात मरगट्टे प्रचंड त्वेशाने व संतापाने शत्रूसैन्याचा पाठलाग करून त्याच्यावर तुटून पडतायत किंवा महाराजांचा राज्याभिषेक (देसाईंनी टेलीव्हीजन सिरियल मध्ये हा अप्रतीम दाखवला होता) किंवा केवळ ३०० मावळे वापरून शाईस्तेखानावर छापा..
नाट्याची अजिबात कमतरता नाही.
हां फक्त एखाद्याला लाथ मारून ३० फूट फेकणे, दुसर्या मजल्यावरून उडी मारून जमीनीत भेग तयार करणे किंवा १५ जणांना एकच माणूस वेगवेगळ्या दिशेने उडवून लावतो वगैरे अचाट गोष्टी नकोत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 07/22/2015 - 11:14
नवीन
किती ब्रिगेडच्या परवानग्या लागतील ?
भानगडी निस्तरता निर्माता खच्ची होईल
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/22/2015 - 11:21
नवीन
मक्कायतर. इथं जयंती ठरवण्यापासून ते मृत्यू कसा झाला याबद्दल प्रत्येक घटनेबद्दल दहा हजार मतं आहेत.
निर्माता वेडा होईल...
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Wed, 07/22/2015 - 11:24
नवीन
का.प. या बाबतीत अगदी मान्य.. :)
पण महाराजांच्यासंदर्भात आधीच (काही चांगले/ काही यथातथा ) चित्रपट/ मालिका या मधून आले आहे. त्यांची शौर्यगाथा थोडी फार का होईना लोकांन माहितीय. (अर्थात पोटेंशियल जबरदस्त आहे यात वादच नाही)
तसंच पोटेन्शियल २७ वर्षांच्या युद्धाचं आहे, (संभाजी ते ताराबाई) तिथे तर जबरी मालिका बनेल इतके पोटेन्शियल आहे.
पण बाजीराव हा या बाबतीत उपेक्षित वाटतो. म्हणजे त्याच्या लढाया आणि मोहिमा इतक्या मोठ्या मोहिमा आधी मराठ्यांपैकी कोणी काढल्या नसाव्यात (अर्थात ते शक्य पण नव्हतं तरीही). त्याचा कॅनव्हास खूपच मोठा आहे. शिवरायांच्या बाबतीत आपण मैदानी युद्धं दाखवू शकत नाही पण तशी बाजीरावाची युद्धं पण अचाट अशी आहेत आणि तरीही त्याच्या मस्तानीबद्दल जितकं आलंय तेवढं त्याच्या कर्तृत्वाबद्दल आलेलं नाही असं वाटतं ..
असो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/22/2015 - 11:39
नवीन
सहमत. मागे यावर खफ वर बरीच गहन चर्चा झाली होती.
बाजीराव हा मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल पाहिजे तर. मराठी साम्राज्य दाखवायचे तर बाजीरावावर योग्य तसा चित्रपट निघायला हवा.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 07/28/2015 - 10:50
नवीन
शिवप्रभूंनी रचिला पाया, बाजीराव (थोरला) झाला कळस.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/22/2015 - 13:41
नवीन
पूर्ण सहमत. त्यातून ब्रिगेडचे लोक विषारी प्रचार करकरकरून अज्ञान फैलावतात त्यामुळे तर कैच झेपत नै.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 07/22/2015 - 11:35
नवीन
बाकी माझ्यातल्या दिग्दर्शकाकडे ही एका चित्रपटातलं शेवटचं दृश्य तयार आहे.
क्षितीजावर एक अणुस्फोटामुळे निर्माण झालेला काळा ढग वरच्या दिशेनं सरकतोय. कॅमेरा खाली येतो. एका समांतर रेषेत उडणारी सुखोई त्या दिशेने वेगाने निघून जातात. त्यापाठोपाठ सैनिकी हेलिकॉप्टर्स चा एक जत्था पण निघालाय. कॅमेरा खाली येतो. रस्त्यावरून तिकडे कडे जाणारी सैनिकी गाड्यांची शिस्तबद्ध नि:शब्द रांग आणि त्यात बसलेले 'अणु जैविक रासायनिक' प्रतिबंधक सूट घातलेले सैनिक. कॅमेरा आणखी थोडा खाली जातो. कॅमेरा एका मैलाच्या दगडावर स्थिर होतो. अर्ध्या फ्रेमभर तो दगड आणि राहिलेल्या अर्ध्या फ्रेममध्ये सैनिकी गाड्यांची पुढे जाणारी चाकं. त्या दोन्हींमधून मावळत्या सूर्याचे किरण. दगडावर लिहीलंय: 'اسلام آباد میں 20 کلو میٹر'.
आणि इथे श्रेयनामावली सुरू होते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/22/2015 - 12:41
नवीन
इस्लाम आबाद मैं २० कलो मिटर!
असं वाचलं अन मग प्रकाश पडला, इस्लामाबाद २० किलोमीटर.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Wed, 07/22/2015 - 12:58
नवीन
तुमाला हे पण वाचता येतं व्हय ? आमी सरळ गूगल ट्रान्स्लेटर वापरला.. ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/23/2015 - 10:45
नवीन
बाजीराव-मस्तानी डिसेंबरात प्रदर्शित होत आहे.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/23/2015 - 10:47
नवीन
ट्रेलर...
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
गुरुवार, 07/23/2015 - 11:11
नवीन
हे पाहिलंय एक्का काका.. पण एक तर ट्रेलर मध्येच इतक्या कमतरता/चुका दिसून आल्यात की चित्रपटाकडून काहीच अपेक्षा नै. (त्यांनी अपेक्षाभंग करावा अशी अपेक्षा. :) )
त्याचबरोबर,
हेच या मुव्हीवरून सिद्ध होतंय ना.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Tue, 07/21/2015 - 13:06
नवीन
बाहुबली अतिशय आवडला. पहिल्या हाफ मधे वैतागले होते, पण दुसर्या हाफ मधे डोळ्यांचं पारणं फिटलं. पुन्हा तेलुगु मधे बघायची इच्छा आहे. चित्रपटाबद्दल ऐकून ज्या अपेक्षेने गेले होते, ती पूर्ण झाली. ज्या आतुरतेने एखाद्या हॉलीवूडपटाची वाट बघेन तेवढ्याच आतुरतेने 'द कन्क्लुजन' ची वाट बघतेय.
बाहुबलीची गोष्ट एक तर अस्सल भारतीय मनावर लहानपणापासून झालेल्या तमाम कथांच्या संस्कारांची आठवण करून देणारी, त्यात बॉलीवूडी गाणी आणि प्रेमदृश्ये, त्यात दाक्षिणात्य भव्यदिव्यता, आणि या सगळ्यासाठी तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकाने केलेली मेहनत त्यात दिसत राहते. त्याची ओढून ताणून मराठी सिनेमाशी तुलना करायचा अट्टाहास कशाला?
मराठी चित्रपट चांगले असतील तर बघायला आवडतात, पण मराठी चित्रपट एक तर एका टोकाचे गल्लाभरू नाहीतर दुसर्या टोकाचे गंभीर गहन असतात. एकात फालतू करमणुकीचा अजीर्ण होईपर्यंत मारा तर दुसर्यात करमणुकीला फाट्यावर मारून नुसते मेंदूला छळणारे प्रसंग(काही अपवाद वगळून). त्यामुळे हल्ली आपोआप मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते. हिंदीचं तर बोलायलाच नको. एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे बाहेरून येणारे चित्रपट. पण ते कितीही आवडले तरी काळजाला भिडत नाहीत. त्यामुळे महाभारतीय संस्कारातला आणि भारतीय मातीतला चित्रपट म्हणून बाहुबलीला एवढा रिस्पॉन्स मिळाला त्यात नवल काय? तो मराठीला मिळत नाही म्हणून कुढतच बसायचं का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 07/21/2015 - 19:07
नवीन
प्रतिसाद अतिशय आवडला... :-)
आताच एका वर्तमानपत्रात वाचले:
अवतार ने २ हजार कोटी प्रॉडक्शन वर खर्च केले आणि बारा हजार कोटी कमावले.. मराठी चित्रपट कधी इतक्या उंचीवर पोचेल.
अरे काय मूर्खपणा आहे. कशाची कशाची तुलना करावी याला थोडंतरी डोकं वापरावं की नाही? इथं मराठी चित्रपट २ हजार कोटी तर सोडाच, त्याच्या ०.०००५ टक्क्यासही निर्मात्याचे प्राण कंठाशी येतात. आणि एवढं करून इन-मीन ४०-५० स्क्रीन्स आणि ४०-५० लाख प्रेक्षक. तिथे ४०-५० हजार स्क्रीन्स आणि ४०-५० कोटी प्रेक्षक. काय तुलना आहे का?
उगाच आपलं "मराठी लोक कसे मागे बघा" चं टूमणं वाजवायचं. जौदे ना भाव! इतर खर्च करतायत, आपण बघायचं काम करावं.
झालस्तर आपल्या कथा ग्रेट पद्धतीने इंग्रजीतून लिहाव्या, गाजवाव्या म्हणजे ते ग्रेट दिग्दर्शक, निर्माते कथेतलं ग्रेट मूल्य बघून चित्रपट काढतीलच शिवाजींवर, संभाजींवर, बाजीरावांवर. गेम ऑफ थ्रोन्ससारखी टीवी सीरीजही बनू शकेल. त्या आधी ते ते नाट्य, इतिहास जगाला समजेल अशा भाषेतून फार उत्तुंग पद्धतीने मांडला गेला पाहिजे. जगभर ओळखला गेला पाहिजे. किंवा निदान त्या निर्मात्यांच्या हातात तरी पडला पाहिजे.
धंद्यात कधीही दुसरर्याच्या पैशाने खेळायचं असतं. कथा आपल्या मातीतली पण निर्माते दिग्दर्शक आणि भाषा जागतिक... हा मार्ग कसा आहे? माझ्या मते शक्यही आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 07/22/2015 - 11:00
नवीन
३
मारवाडी संगत आहे वाटत
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/22/2015 - 11:23
नवीन
हालात के थपेडोने मारवाडी बना दिया मुनिवर...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 07/22/2015 - 11:55
नवीन
मते अतिशय योग्य आहेत .
माझा मारवाडी मित्र हेच सांगतो .
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 07/22/2015 - 11:09
नवीन
बाहुबली सोडा राव
मी बाजी पाहिला आहे
मराठी मधील पहिला सुपर हिरो
तो पाहिल्यावर मला सुद्धा वाटले
मी बाजी आहे
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Tue, 07/21/2015 - 19:01
नवीन
मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग" या नावाने येतोय एक सिनेमा. त्यातल्या प्रॉपर्टीची भव्यता डोळ्यात भरणार नाही या साऊथवाल्यांच्या..
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Wed, 07/22/2015 - 09:45
नवीन
==))==))==))==))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/22/2015 - 10:06
नवीन
ट्याच्या आड्डी..."म्राठा ड पॉवर" अस्सा येईल येक ;)
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 07/21/2015 - 19:22
नवीन
बाकी बाहुबलीमुळे तेलगु चित्रपट फार महान वगेरे असतात असा गैरसमज होउ नये.
- दर वीस मिनिटाला जर रक्त सांडले नाही तर फाउल समजतात. (पुलंचे वाक्य बदलून वापरतोय)
- अर्ध्या चित्रपटातला अर्धा भाग ब्रह्मानंदम् आपल्या खांद्यावर उचलतो. बऱ्याचदा चित्रपट टुकार असला तरी त्यामुळे सुसह्य होतो. पुढचा चित्रपट पण बघितला जातो.
- काही कुटुंबाची मक्तेदारी आहे.
- मराठी प्रेक्षकाला तरी तेलगु चित्रपट काही अपवाद सोडले तर फार आवडनार नाही.
ह्या गोष्टी इतरत्र नाही असे नाही.
बाहुबली ही एक मोजून मापून घेतलेली जोखीम होती. परत ती काही जणांनी मिळून शेअर केली. काही बाबी जमेच्या होत्या.
- राजमौलीचा हा काही पहीला ऐतिहासिक चित्रपट नव्हता या आधी मगधीरा येउन गेला होता. तसेच मख्खीला हिंदीत सुद्धा बरेच यश मिळाले होते. मुळात या माणसावर जोखीम घ्यावी अशी त्याची पत होती.
- अनुष्काच्या नावाने चित्रपट चालतात. इथे तर प्रभास, राणा, सत्यराज, रम्या क्रिष्णन सारे होते.
- धर्मावाल्यांनाही साथ दिली. सुरवातीपासूनच काहीतरी भव्य करायचे आहे या हेतूनेच ते केले गेले. कुणीतरी अशी जोखीम घ्यायला हवी होती आणि ती घेतली गेली. एक जबरदस्त चित्रपट तयार झाला.
मराठी तर जाउ द्या आजवर बॉलीवुडमधेही असा चित्रपट बनला नाही. तेंव्हा तेलगु आणि मराठी चित्रपटांची तुलना करीत इथे खल करीत बसण्यापेक्षा परत एकदा थेटरात जाउन चित्रपट बघावा.
- Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४
Tue, 07/21/2015 - 19:51
नवीन
लक्ष्या, मकरंद अनारसपुरे, भारत जाधव, इत्यादी इत्यादी कोमेडीअन आपण हिरो म्हणून आवडीनी बघू तो पर्यंत तरी साउथ सारखे ग्ल्यामर मराठी सिनिमा ना कसे मिळणार?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 07/22/2015 - 11:11
नवीन
नाव लिह्याचं रायलं का ?
- Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४
गुरुवार, 07/23/2015 - 03:05
नवीन
दादा, लिव्हा ना तुम्हि. मला लै भारि वतेल भघा.
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Wed, 07/22/2015 - 17:03
नवीन
काल बाहुबली बघण्याचा योग आला...दोन तीन दिवस कुठेच तिकिट्स मिळत नव्हते. रात्री ११ चा शो असून हाउसफुल्ल होता. सिनेमाबद्दल बोलायचे तर अतिशय भव्य आणि रम्य चित्रकथा आहे. टेक्निकल आस्पेक्ट्स निव्वळ उच्च दर्जाचे आहे. ज्युरासिक वर्ल्डच्या व्हिज्युअल इफेक्ट्स टीमने यासाठी काम केले आहे असे ऐकून आहे. मराठी चित्रपट सोडाच, बॉलीवूडला ही अजून काही वर्ष जातील त्यांच्यासारखे टेक्निकली परफेक्ट काम करायला.. :) :)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/22/2015 - 17:58
नवीन
विज्युअल इफेक्ट्स टेक्निकली परफेक्ट नाहीत:
बर्याच दृश्यांमधे ज्याप्रकारे कॅमेरा फिरणे अपेक्षीत होते तसा तो फिरला नाहीये. धबधब्याचं चित्रिकरण त्यामुळे परफेक्ट लेवलला पोचलं नाही. धबधब्याचं भव्यता दाखवणारं मनोहारी चित्रीकरण मी जुरासिक पार्क पहिल्या भागात बघितलंय. विशिष्ट अँगलने कॅमेरा टॉप-टू-बॉटम सगळा धबधबा एकदा तरी फ्रेम मधे घेऊन वरून खाली आला पाहिजे होता. इथे कॅमेरा दर्शकाच्या आयलेवलवर वरून खाली पॅन केला आहे. त्यामुळे इतका सुंदर धबधबा करून तो वाया गेला असं वाटलं. फ्लॅट वाटतं.
कलर टिन्ट नॉट परफेक्ट. बरेच सीन्स असे आहेत जिथे टिन्ट अपेक्षित होते. ग्लॅडियेटर आणि ट्रॉय बघतांना फिल्म-टिन्ट मुळे वातावरण तयार होतं. युद्धाच्या सीन्समधे टिन्टचा वापर अपेक्षित होता. या चित्रपटात बराच दिवाळी-इफेक्ट आहे. (दिवाळी-इफेक्ट ही आमच्या काही कलाकार वीएफएक्स मित्रांची संज्ञा, दिवाळीच्या काळात जशा जाहिराती येतात, फ्रेश, कलरफूल, वैगेरे. इतर संज्ञा आहेत त्या नंतर कधीतरी.)
आयुधे, शस्त्रे, वाहन, अॅक्सेसरीज यांच्यातलं डीटेलींग पर्फेक्ट लेवलला नाहीये. भल्लालदेवाचं मुकूट याचं उत्तम उदाहरण आहे. जर हा चित्रपट काल्पनिक आहे तर तेवढं स्वातंत्र्य घेता आलं असतं. इतिहासकाळाप्रमाणे वस्तूंमधलं डीटेलींग ऐतिहासिक चित्रपटात लागतं. इथे तो प्रश्न नव्हता.
इतरः कुठेतरी संकलनात गडबड झालीये. पार्श्वसंगीत अप-टू-द-मार्क नाहीये.
ओवरऑल टेक्निकली मी या चित्रपटाला १० पैकी ८.५ गुण देइन.
भारतीय चित्रपटांनी बाहुबलीच्या निमित्त फार मोठी झेप घेतली आहे. पण परफेक्शनसाठी नेमकं जिथे अजून थोडा जोर लावायचा पॉइंट येतो तिथूनच ही टीम परतली आहे असं वाटत होतं. भारतीय तंत्रज्ञ आणि कलाकार त्याबाबतीत थोडे कमी पडतात. यातले जे तंत्रज्ञ अभारतीय आहेत, त्यांच्या कामातलं परफेक्शन आणि भारतीयंच्या कामातलं परफेक्शन कळून येतं. (इथे कोणालाही कमी-जास्त लेखायचा उद्देश नाही याची नोंद घ्यावी.)
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Wed, 07/22/2015 - 19:53
नवीन
जुरासिक वर्ल्ड या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स ज्या कंपनीने बनवले त्यांच्याचकडे यातल्याही काही भागाचं काम झालेलं आहे अस त्या कंपनीतल्या अनधिकृत सूत्रांकडून कळते.
धबधबा केरळमधला असून (एबीपी माझा) त्याचं चित्रीकरण महत्वाचं नाही. कारण पुढचे सर्व सीन्स हे व्हीएफएक्स वापरून दाखवलेले आहेत ( रविवार सकाळ, पुरवणी) - . धबधब्याचे काहीच सीन्स खरे आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 07/23/2015 - 09:06
नवीन
उत्तम प्रतिसाद, बह्वंशी सहमत. पिसं काढायची तर अजून नक्कीच काढता यावीत, पण ये तो शुरुआत है, आता लक्षात येईल अशी अपेक्षा करावयास हरकत नसावीसे वाटते.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 07/23/2015 - 13:47
नवीन
मी 'बाहुबली' दोनदा बघितला थेटरात. (माझ्याकडून हा बहुमान मिळालेला हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.. ;-) ) स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत ही लक्षवेधी झेप असली तरी काही तॄटी आणि कमतरता जाणवल्या..
१. हीरोला तमन्ना पहील्यांदा जेव्हा प्रत्यक्षात दिसते, त्या तिच्या जंगलात पाठलाग होण्याच्या सीनमध्ये दाखवलेले जंगल बर्फाच्छादीत उंचीवर नसते.. चक्क 'मॅनग्रोव्ह्स' ते ' रेनफॉरेस्ट' टाइपातले जंगल दाखवले आहे.. ही चुक नंतरच्या दृष्यांत (avlanche) मध्ये सुधारलीय..
२. दिवाळी इफेक्टशी सहमत..
३. अॅनीमेशन काही दृष्यांमध्ये अभिनयाशी जुळत नाही.. तो हीरो जंगलात पळतांनाच्या अॅक्शन्स जरी 'अवतार' सारख्या असल्या तरी तृटी जाणवतात.
४. माहीष्मती महालात बाहुबलीचा पाठलाग करतांना त्याच्या ज्या उड्या दाखवल्यात, तेव्हा 'मारीयो' काळातले ग्राफीक्स आठवले.. ;-)
मात्र एकंदरीत हा चित्रपट भव्यदिव्य आहे, आणि नक्कीच बघण्यासारखा आहे.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. ;-)
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
गुरुवार, 07/23/2015 - 02:32
नवीन
माझा मूळ मुद्दा जो होता कि मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत , तो वरच्या चर्चेत मागे पडला असे वाटले . खूप लोकांनी मी हा चित्रपट आंतर्जालावर पहिला हा मुद्दा उपस्थित केला . पहिल्या प्रथम म्हणजे हा चित्रपट मी पाहणारच नव्हतो पण माझ्या office मधल्या तेलेगु , तमिळ जनतेने त्याची बरीच माहिती गायली आणि पाहण्याचा आग्रह केला , इथे परदेशात जवळच्या चित्रपटगृहात हिंदी version लागला नसल्यामुळे मी तो आंतरजालावर पहिला . असो …. काही मिपा सदस्यांनी असा अनाहूत सल्ला दिला आहे कि चित्रपट हा चित्रपटगृहा मधेच पाहावा किंवा original CD वर पाहावा . एकदम मान्य …. पण त्यासाठी मराठी चित्रपट परदेशात release तर व्हायला हव ना … परदेशाचे सोडा , मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तरी प्रदर्शित होतात का ? काही अपवाद वगळता … फारच थोडे महाराष्ट्रा बाहेर प्रदर्शित होतात . अरे का नाही आपण मोठी स्वप्न बघत ? का नाही एखादी Fantasy निवडून त्याचा चित्रपट बनवत ? अशी कथा जिला universal appeal असेल . हिंदी मधली यशस्वी मराठी तगडी starcast घ्या , रजनी तर आपला मराठीच माणूस आहे. त्याला घ्या , चित्रपट dub करा हिंदी , दक्षिणात्य भाषेत . करा release जगभरात नाही निदान भारतभरात तरी . मुळात चित्रपट मोठा असेल तर, चालणारा असेल तर तुम्हाला रडावं लागणार नाही आम्हाला multiplex वाले prime time देत नाहीत म्हणून .
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 07/23/2015 - 09:43
नवीन
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले स्टार्स तीन राज्यात ब-यापैकी स्विकारले जातात. बाहुबली तीनही राज्यात डब झालेला आहे. (एरव्ही तीन स्वतंत्र सिनेमे बनले असते, पण खर्चाचे आकडे पाहून एकच सिनेमा रिलीज झाला. यापूर्वी रोबोटला हा मान मिळाला होता. आणखीही असू शकतील.
मनोरंजन उद्योगात त्या त्या राज्यातले भाषिक सिनेमे ही पहिली पसंती आहे. हिंदी सिनेमाचं अस्तित्त्व नगण्य आहे.
पहिल्या आठवड्यात हजार दीड हजार रुपये तिकीटाला घालवण्याची तयारी आहे. जितके पैसे लावले जातील त्याचे रिटर्न्स मिळू शकतात.
आपल्याकडे बाहुबली सारखा खर्चिक सिनेमा चितळे किंवा अविनाश भोसलेंनी बनवलाच तर प्रभासच्या जागी तरणाबांड नायक म्हणून सचिन खेडेकर असेल. तमन्नाच्या जागी सई ताम्हणकर (आठवा तमन्नाचं कुपोषित पोट वि. सईचं बाळसेदार पोट ), राणाच्या जागी अशोक सराफ किंवा दया आलीच तर सिद्धार्थ जाधव वगैरे आणि कटप्पाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे/ अरूण नलावडे अशी स्टारकास्ट असू शकेल. जर टाटाने पायनान्स केलाच तर सिनेमाचं शूटींग होण्याआधीच तिकीटाचं बुकींग घेतलं जाईल. त्यासाठी बॅंकांकडून कर्जही उपलब्ध केलं जाईल. जर रीलीज झाल्यानंतर एका आठवड्यात तिकीटाचा नंबर आला नाही तर व्याज अशी योजनाही जाहीर होईल. सिनेमाचं शूटींग कोकणात होईल हे सांगायला नकोच. सचिन खेडेकर (चष्म्यासहीत) बोरघाट चढून येतो तेव्हां लोणावळ्याचे नयनरम्य धबधबे दिसतील. शूटींग साठी ५० एमपीचा ओप्पो मोबाईल वापरण्यात येऊ शकतो. युद्धाचे प्रसंग शूट करताना पन्नास - पन्नास कलाकार वापरले जातील. मोदींच्या गर्दीचे फोटो रिलीज करणा-या संस्थेकडून त्याचं रुपांतर पाच पाच लाखात केलं जाईल. सेट्सवर पैसे वाया घालवण्यापेक्षा भोरच्या राजवाड्यात शूटींग केलं जाईल. अशा अनेक वैशिष्ट्यांसह पहिला मराठी महामूव्ही तयार होईल आणि झी टॉकीजच्या साथीने त्याचं प्रमोशन देखील होईल. चला हवा येऊं द्या मधे विशेष एपिसोड होईल. आणि ज्या दर्शकांच्या तिकीटाचे नंबर पहिल्या शो साठी लागलेत त्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना स्टेजवर बोलावून त्यांना सिनेमा हॉलचे पासेस चितळे किंवा अभोंच्या हस्ते सुपूर्द करण्यात येतील.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 07/23/2015 - 15:10
नवीन
आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट शिनेमागृहात येईल अशी आशा होती, निदान एक अठवड्यासाठी! पण आला नाही. आता जालावर बघण्याशिवाय इलाज नाही. बाहुबली हा तेलुगु भाषेत थेट्रात चालू आहे व आताचे माहित नाही पण पहिला अठवडा तरी हाऊसफुल चालू होता असे समजले.
रजनीकांतला घेऊन मराठी चित्रपट काढणे सर्व निर्मात्यांना मिळून तरी परवडेल का हा हिशोब मनात चालू आहे. ;)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 07/23/2015 - 16:01
नवीन
रेवती ताई,
एक अनाहूत सल्ला की ज्या भाषेत असेल त्या भाषेत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघून याच. भाषेची फारशी अडचण नाही कारण फार महान कथा नाहीये आणि डायलॉग्स पण यथातथाच आहेत. अॅक्शनवरून सगळं समजतं काय चाललंय ते. मुख्यतः बघण्याचाच चित्रपट असल्याने तेवढं महत्त्वाचं. पण मोठा पडदा मिसू नका... :-)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 07/23/2015 - 17:42
नवीन
ओक्के. मला तेलुगु समजतं म्हणून तसा प्रश्न नाही पण त्या पब्लिकची भक्ती बघून आश्चर्य वाटले.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 07/28/2015 - 11:48
नवीन
आमच्याकडे मामाच्या गावाला जाऊ या व पीजी येउन गेला
आता स्पृहा व कामत तुमच्याकडे येणार आहेत
त्यातील अनिमेशन हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे
अवांतर दिवाळी इफेक्ट्स चे लोण म्हटले तर प्रस्थ आता वाढत चालले आहे
त्यामुळे यात करियर करण्यासाठी काही माहिती मिळू शकेल का
भारतात आलो की अनेक पालक आमच्या मुलांना सल्ले द्या किंवा काय करावे असा प्रश्न विचारतात , मग नेहमी नेहमी तेचतेच सांगून कंटाळा येतो
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 07/23/2015 - 05:56
नवीन
मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत ?
१. कमी प्रेक्षकवर्ग
२. चित्रपटगृहांची अनुपलब्धता
३. मराठी प्रेक्षकांची हिंदी चित्रपटाला असणारी पसंती आणि स्पर्धा ( हिंदीचा कलेक्शन फक्त ६० कोटी आहे आणि बजरंगी आल्यावर ९०% चित्रपटगृहामधून बाहुबली काढला )
४. मराठी निर्मात्यांचे बजेट
५. तिथे बाहुबली पहिलाच बिग बजेट चित्रपट नाही , पूर्वी तिथे असे चित्रपट आले आहेत आणि चालले आहेत . त्यामुळे बाहुबली ही केलक्युलेटेड रिस्क होती.
- Log in or register to post comments
क
कन्यारत्न
गुरुवार, 07/23/2015 - 10:54
नवीन
निशित्तच कौतुकास्पद आहे
- Log in or register to post comments
D
dadadarekar
गुरुवार, 07/23/2015 - 20:56
नवीन
मराठीत नाथमाधवांची वीरधवल कादंबरी बाहुबलीला तोडीस तोड आहे.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 07/24/2015 - 08:23
नवीन
मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत.
- Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया......
Tue, 07/28/2015 - 04:02
नवीन
बाहुबली, एस.एस.राजमौळी, प्रभास, राणा, तमन्ना यातलं एकही नाव मला माहीत नव्हतं. मुळात मला चित्रपट सृष्टीचा गंधच नाही तेवढा. “बावर्ची सिनेमात हिरोचा डबल रोल आहे का??” असले प्रश्न विचारणारा मी. पण आज खास लिहायला बसलोय म्हणजे तसं काहीसं मी पाहिलेलं असणार, असा तर्क लढवायला आजिबात हरकत नाही. परवा सहज मनात आलं, पाहूया हा सिनेमा. पण इतर अनेकांच्या मनात आलं न ते. शो झालेला हाउसफुल. मग पुन्हा प्रयत्न केला दुसर्या दिवशी. तुटकी सीट मिळाली. कारण तिचं तिकीट विकलंच जात नाही ऑनलाईन. त्यामुळे तिकीट खिडकीवर मिळालं तरी. असो खूप झालं. मुद्दा हा आहे की, वरील सर्व नावं मला काल परिचीत झालेली आहेत.
खूप कौतुक कराव्या अशा खूप गोष्टी आहेत या सिनेमात. आता सिनेमासाठी बॉडी वगैरे करणं जुनं झालं, सगळेच करतात. पण त्याचंही कौतुक आहेच. राणा आणि प्रभास. दोघेही वीर असे काही दिसलेत सिनेमात, की चुकून नायिकेला दिग्दर्शकाच्या मताच्या/अन कथेच्या विरोधात नायकाशिवाय दुसरा कुणी आवडला तरी आश्चर्य वाटायला नको. अर्थात मी इथे स्टोरी बिरी सांगायला बसलोच नाहीये, आपल्या लोकांच फक्त कौतुक (जे मी फार कमी वेळा करतो ते) करायला बसलोय.
ह्या चित्रपटात एक 'कालकेय ' नावाची जमात आहे. त्यांची वेगळी भाषा ठसवण्यासाठी मदन कार्की ह्याने एवढ्या एकाच आवश्यकतेसाठी चक्क एक नवीन भाषा निर्माण केल्याचं मला विक्रम एडके यांच्या परीक्षणातून कळालं. अरे काय माणसं आहेत की काय. एवढे कष्ट फक्त हॉलीवूड मध्ये केल्याच्या बातम्या येतात कानावर. आपण म्हणजे “वाहवा, याला, याला म्हणतात डेडिकेशन वगैरे उद्गार काढतो. पण आपली माणसं काय करतात हे पाहूया ना एकदा डोळे उघडून. एक नवी भाषा. ७५० शब्द आणि ४० व्याकरणाच्या नियमांसह. अर्थात हिंदी मध्ये नाही जाणवायचं ते. कारण भाषांतरीत सिनेमे कसे अन कुणाकरवी भाषांतरीत होतात हे मी चांगलंच अनुभवलंय.
आता जरा जिव्हाळ्याचा विषय, सेट्स. साबू सिरील या माणसाने ज्या काही detailing सकट सेट केलाय, त्यासाठी विशेष टाळ्या आहेत. भव्यता...मनभर व्यापून राहिलेली भव्यता. झोपल्यावरही डोळ्यात राहणारी. पहावीच एकदा. त्याला visual effects ची जोड पण आहेच; मान्य. पण मुळात असं काही करावं हे सुचणाऱ्या कलादिग्दर्शकाला सलाम.
या सगळ्यात मला महत्व वाटलं ते स्टोरी टेलिंगचं. इतकी अप्रतिम कथा सांगण्याची पद्धत. त्याला तोड नाही. अर्थात मुळात त्या कथेतच तेवढा दम आहे. पण मांडणी ...प्रेक्षकांना कथेचा एकेक पदर उलगडून दाखवण्याची हातोटी सुन्दर आहे. दोन अभिनेत्यांना हेतुपुरस्सर उच्च/नीच दाखवून हा घ्या तुमचा हिरो वगैरे प्रकार नाहीत. कथेला गरज वाटेल एवढीच प्रेमाची फोडणी, भावनांच्या कल्लोळांचा अभाव, भक्ती, स्वाभिमान अशा संकल्पनांचा भडीमार नसल्यामुळे कथा track सोडत नाही. (नाहीतर कृष्णचा क्रिश होईपर्यंत ६०% सिनेमा संपलेला असतो एरवी)
२५० कोटी मिळाल्यावर तुम्ही काय करू शकता?? उच्च तंत्रज्ञान वापरून उच्च सिनेमा बनेलच असं नाही. इथे सेट्स पाहताना विशेष आभास पाहताना जाणवतं...की किती उत्तम पद्धतीने पैसा खर्च केलाय. महिष्मती नगरीतील व्यवस्था, ८-८ माजली वाडे, इमारतीचं बांधकाम निव्वळ अप्रतिम. मोठ्ठ्ठठ्ठा धबधबा पाहून तर पैसे पाण्यात घालवलेत वगैरे म्हणावसं वाटतं.
छायाचित्रकारांनी पण कमाल केलीय. ही भव्यता, सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते आजिबात कमी पडलेले नाहीत. रात्रीचे प्रसंग चितारण्यासाठी निळा फिल्टर न लावून त्यांनी जे काही मन जिंकलय. वा वा!!
वैदिक काळातील व्यूह रचना, त्यांचा अभ्यास वगैरे पण कथेला हातभार लावायला आहेच. मुद्दा काय, तर चला सिनेमा बनवूया म्हणून कुणीही ह्याला हात घातलेला नाही. त्यामागे खूप अभ्यास अन कष्ट आहेत.
थोड्या अतार्किक गोष्टी पण आहेत. सावळी नायिका एका गाण्यात गोरी, अन गाणं संपल्यावर पुन्हा सावळी वगैरे. पण स्वप्नात असं होऊ शकत म्हणून सोडून दिलय मी ते. ईतर आहे अजून...पण माफ!!!
नार्निया पाहतो आपण, सुपरम्यान, kripton ग्रह वगैरे. पण अरे बॉलीवूडच्या सर्व व्यावसायिक गणितांना छेद देत एक टॉलीवूड सिनेमा आलाय जो सलग २ दिवस हाउसफुल आहे. प्रेम कथा, थिल्लरपणा नसलेला हा सिनेमा प्रचंड यशस्वी होणारे आणि त्याला यशस्वी करण्यात आपला हात असावा असा मला वाटतं. त्याशिवाय असे धाडसी प्रयोग करायला कुणी तयार होणार नाही. आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं सारं गणित पैशापाशी अडत. प्रेक्षकांना काय आवडतं ते दाखवा. अरे पण आम्हाला हे देखील आवडत हे कळू द्या न त्यांना. २५० कोटीला २५० कोटीचा परतावा आहे म्हणावं. धार्मिक सणांना सिनेमा रिलीज न करताही यश पदरात पडत हे कळेल म्हणजे त्यांना.
आता गम्मत म्हणजे हा सिनेमा एका उच्च बिंदुला येऊन क्रमश: राहतो आणि २०१६ मध्ये पुढील भाग येणार असल्याची घोषणा करतो. जे काही असेल ते. मी ज्या आतुरतेने MI सिरीजची वाट पाहतो, तेवढीच याचीही पाहतोय हे नक्की.
वेळ काढून पहा. (सिनेमा विशेष आवडला असल्यामुळे माझं कौतुकाचं लिखाण क्रमश:च राहील, पुन्हा काही लिहावसं वाटेल असं दिसतंय.)
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 07/28/2015 - 05:01
नवीन
भाषा समजत नसली तरी सिनेमा समजला आणि बेहद्द आवडला. एवढी तांत्रिक करमत करून सुद्धा चान्दोबातल्या गोष्टींमध्ये जी निरागसता असायची ती जपण्यात यश मिळाले आहे. ही अतिशय कठिण आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 07/28/2015 - 10:11
नवीन
१०० , २०० कोटी खर्च करुन बनवलेले हे तेलुगु , तामिळ सिनेमे बघताना भव्य दिव्य वाटत असेलही , पण त्याच बरोबर वाईटही वाटते . यातील काही कोटी हे जर तेथिल रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा यांवर खर्च करता आले ते जास्त महत्वाचे आहे . त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमांचे विशेष कौतुक वाटते . कारण कोणत्याही गाजलेल्या मराठी सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खोटी स्वप्ने दाखविली नाहीत .
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/28/2015 - 11:00
नवीन
मराठी चित्रपट विषय आणि सामाजिक जाणिवेच्या बाबतीत पुढे आहेतच. आगामी देउळबंद चित्रपटातून येणारे सारे उत्पन्न विधायक कामासाठी वापरले जाणार आहे.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 07/28/2015 - 11:44
नवीन
तरी वाटलंच होतं हे कोणी कसं म्हटलं नाही !!
अहो, आपल्या पुणे अथवा मुंबई नगरपालिकांमध्ये अथवा इतर पुरेसे उत्पन्न असलेल्या शहरामध्ये "रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा" यातल्या किमान महत्वाच्या गोष्टींवर किती बजेट असते पाहिलेत का हो ? मुंबई मनपाच्या या वर्षीच्या बजेटमध्ये ३००० कोटी आहेत फक्त road repair and development या कामासाठी (संदर्भ). तरी काय अवस्था आहे हो ??
मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता.
isro ने ४०० कोटीचे यान पाठवले तेव्हाही हाच सूर ऐकला होता. त्यांनी त्यांना दिलेले काम यशस्वी केले हे महत्वाचे.
ज्याला जे पैसे अॅलोकेट झालेत त्याने ते नीट वापरावे (यात प्रशासन मुख्यत्वे आले) तरी खूप काम होईल.
हे असले साम्यवादी विचार आता या काळात सध्यातरी तितकेसे लागू होत नाहीत हे ध्यानात घावे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 07/28/2015 - 12:19
नवीन
असा प्रतिसाद अजून कसा आला नाही याचेच आश्चर्य वाटत होते.
असो. शेवटी आलाच.
१००-२०० कोटी खर्च म्हणजे लेडीजबार मधे जाउन धनदांडगे जसे पैसे उडवतात तसे हे २५० करोड उडवले असे वाटणे असेल तर त्या वाटण्याला काय करू शकत नाही. ज्यांना हे उधळणे वाटते त्यांनी एकदा चित्रपट सुरू व्हायच्या आधी आणि नंतर येणारी नामावली व त्यात येणारी नावे मोजली तरी थोडा प्रकाश पडेल की हे पैसे कुठे जातात. त्या नावांशिवाय अप्रत्यक्ष हजारो लोकांना ह्या तथाकथित उधळण्याचा फायदा झालेला असतो. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था उभी आहे, लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार, कलेनुसार कमवायची संधी मिळत आहे. सिनेमा इंडस्ट्री नसती तर ह्या हजारो लोकांना कुठे व काय काम मिळाले असते? जसे दुसर्या एका धाग्यावर आयटी क्षेत्राने नोकर्या देऊन अभियंत्यांचे भलेच केले असे म्हटले जात आहे. तसेच इथेही म्हटले जाऊ शकते.
जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो. निर्माता तर आपले काम करत असतो. तो त्याचा व्यवसाय आहे. त्यात त्याने किती पैसे लावावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. व्यवसायात लावल्या जाणार्या पैशाला उधळणे म्हणणे हा एक फारच मध्यमवर्गीय, मनोरंजक पण अनुत्पादक, क्षुद्र विचार झाला.
चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते.
एखादी कथावस्तू पडद्यावर चितारण्यासाठी त्याप्रकारचे वातावरण उभे करावे लागते. तेवढा प्रचंड अनुभव येण्यासाठी प्रचंड खर्च करावाच लागतो. हा अनुभव घेण्यासाठी दर्शक पैसे मोजतात. जिथे दोन पार्टींमधला हा सरळ सरळ व्यावसायिक व्यवहार आहे तिथे सामाजिक जाणीवेचे, गरज नसलेले कढ काढण्यात कोणती महान मानसिकता आहे हे खरंच कळत नाही.
असा विचार येत असेल तर आपले सगळे जीवनच आपण तपासून पाह्यला पाहिजे. आपण एक व्यक्ती म्हणून जो काही खर्च करतो तो नक्की आवश्यकता आहे की उधळपट्टी हेही तपासून घ्यायला पाहिजे. त्यादृष्टीने पाहिले तर माणसाचे ९५ टक्के खर्च हे उधळपट्टी म्हणून मोजता येतील. झोपायला जमीनीवर चटई टाकली तरी झोप येतेच, तिथे कशाला डबलबेड, किंगसाईझची गरज? तेवढे पैसे किमान शंभर लोकांना चटई विकत घ्यायला उपयोगी पडतील की. तेच लाखो रुपयांची घरे कशाला? झोपायला जागा मिळाली तरी पुरे. कित्येक हजार लोक रस्त्यांवर झोपतात. त्यांतल्या किमान दहा लोकांना चाळवजा घर बांधता येईलकी. टूथपेस्ट तरी का वापरावी. तीही उधळपट्टीच आहे.
अव्यावसायिक उधळपट्टी आणि व्यावसायिक गुंतवणूक यातला फरक समजेल तेव्हाच याबाबतीत चित्रपटांवर केली जाणारी अस्थानी टिका कदाचित थांबेल.
लोक निर्मितीला लागलेला पैसाच बघतात. जमवलेला गल्ला बघत नाहीत. खरी टिका त्यावर झाली पाहिजे. पण तिथे अशी सोयिस्कर भूमिका घेता येत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »